रात्रीस खेळ चाले १

Submitted by मी_इंदू on 22 March, 2016 - 01:34

2016 - 1 (1).jpgआपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.

आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443

शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..

पात्र परिचय :

माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट

मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः

१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?

शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .

आज विशेष

अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!

रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न

१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुने एपिसोड बघण्याची सोय असलेली लिंक मागच्या धाग्यावर दिली होती. ती शोधून हेडर मधे टाकावी ही विनंती. रात्रीचा खेळ चुकलेल्यांना दिवसा बघायची सोय होईल.

लिंक नको. थोडक्यात अपडेट्स दिले तरी चालतील. पहिल्या धाग्यावर पण रिक्वेस्ट केली होती कुणी ऐकतच नै.

काल एक बघितल का, तो आर्चिस घरात एखादी हरवलेली वस्तु शोधावी कोपर्‍या सांदाडीत, तसा त्या सोंगास शोधत होता.
आणि शेवटी घरभर शोधल्यावर पाठी तो गणेश अश्या अविर्भावात उभा होता की जस काय अर्चिसची मुंडीच आवळणार आता Lol
कालचा संपुर्ण एपिसोड घराच अंगण, अर्चिसचे हेलपाटे आणि उलटी पावलं इथेच फिरत होता.

काय मुर्खाचा बाजार चाल्लाल होता काल. ५ मिनिटाच्या स्टोरी साठी अख्खा एपिसोड घालवला. दाखवलं तर फक्त ते अंगण आणि छायाचि उलटी पाऊले. (आणि नेहमीप्रमाणे त्या बेरी नानांचा आलाप अगली हातवारे करून)…. आणि तो गणेश असा का आलेला त्याच त्यालाच माहित. डोक्यावर पडलेले लोकं कुठचे. Angry

गणेश आला .. अंगणात नाचला..घरात घुसला..तांब्या पाड्ला ...निघुन गेला.
अर्चिस आत गेला... बाहेर आला.
ठोकळी ने प्रवचन दिले ..वर गेली ..सुस्ल्याक घेउन खाली आली..प्राऊड ममा प्राऊड ममा करत बसली!!
छाया बाहेरून आली..
बाकी सगळे अंगणातच घोळ घालत होते!!!:G

पण ते खेळे नाईकांच्याकडे येतात कसे काय शिमग्याचा खेळ करायला? त्यांना माहित नसत का नाईकांकडे दुखवटा आहे ते? बर बाहेरुन आलेले आहेत अस जरी म्हटल तरी गावात कोणीही सांगितल असत नाईकांकडे जाउ नका म्हणुन..

पण ते खेळे नाईकांच्याकडे येतात कसे काय शिमग्याचा खेळ करायला? त्यांना माहित नसत का नाईकांकडे दुखवटा आहे ते? >>>काय माहीत बै... मुद्दाम पाठवले असेल कोणी ( गुरव किंवा वकिलानी) Uhoh

त्याने काय होणारे क्लिओपात्रा?

बाहेरुन आले असतील खेळे असही नाही म्हणता येणार कारण कोकणात किंवा इतर कुठल्याही खेडोपाडी कुठलीही बातमी ही त्या गावापुरती मर्यादित रहात नाही, किमान आसपासच्या गावांना नक्कीच माहित असत.. हे माझ्या आत्ता लक्षात आल. Sad

ह्म्म! उगाच असे बरेच सीन्स घुसड्त आहेत.. आणि पुढच्या भागात कोणतेच एक्सप्लेनेशन ही नै देतः Uhoh

आपल्याला पडलेले प्र्श्न निदान ठोशा बै ला तरी पडले पाहीजेत कि नै? तीच करणरे ना उकल..

कालचा भाग म्हणजे प्रेक्षकांना मूर्ख करण्याचा प्रकार. घरात तीन तीन अगडबंब भाऊ आहेत. त्यातील दत्तोबा तर जमीन प्रश्नावरून गावातील एकमेव वकील आणि वजन असलेला माणूस याच्या अंगावर त्वेषाने जाताना आदल्या दिवशी दाखविला होता....आजारी असला तरी माधवराव ब-यापैकी तब्येतीचा आहे....आणि त्या तिस-या अभिरामाबाबत काय बोलावे ? "माझं लग्न कर की गं आई....!" म्हणून सकाळसंध्याकाळ भोकांड पसरून, डोळे वटारत बुलेटवरून फ़िरणारा वाघोबा....तिघेही बघत उभे आहेत मूढासारखे आणि तो १७-१८ वर्षाचा पोरगा धाडसाने आत चाललाय. निदान त्या अभिरामाने तरी म्हणावे त्याला, "थांब अर्चिस मीही येतो तुझ्याबरोबर..." ~ घर या तिघांचे आणि एक सोंगाड्या आत लपून बसलाय...त्याला बाहेर काढायला यांची हिंमत होत नाही. अजिबात पटला नाही हा नामर्दाचा प्रकार.

त्यापेक्षा निलिमाचे अभिनंदन करावे लागेल....सुषमाचे घरातील स्थान काहीही असू दे, पण एक मुलगी एकटी वर आहे, तिला खाली आपल्यात घेऊन यायला हवे ही जाणीव आहे निलिमाला आणि ते कामही ती स्वत:च करते.

पण सगळ्यांना एकदम वर जायला काय धाड भरली होती. एकट्या आर्चिस ला पाठवुन ओट्यावर गोंधळ घालत बसले ते.

पण सगळ्यांना एकदम वर जायला काय धाड भरली होती. एकट्या आर्चिस ला पाठवुन ओट्यावर गोंधळ घालत बसले ते.>> +१.. तेच ना किमान अर्चिस सोबत तरी कोणीतरी जायला हवं होतं. एकट्यानेच जायचं असा नियम आहे का? नंतर पण अभि जायला निघाला तर दत्ता म्हणे मी जातय.. दोघे एकदम जाऊ शकत नायत काय.

तो गणेश होता ते कळल्यावर दत्तीने गणेशाक कोणीतरी आणा म्हणून भोकाड पसरलंन... स्वतःच जायच नाही का त्याच्या पाठीमागे धावत. भेटला असता की लगेच. ज्या स्पीडने गणोबा चालत गेला आणि त्याच्यानंतर अर्चिसला त्याला शोधायला बाहेर पडायला लागलेला वेळ यांचा विचार केला तर गणोबा देविकाच्या गावात अभिरामाच्या रस्त्याने पोहोचला असेल. Happy आता अर्चिस कुठल्या रस्त्याने जातो त्यावर गणोबा भेटणार की नाही ते ठरेल. Happy

निधी Rofl

मामा अहो ते सगळे आत गेले असते शोधायला त्या सोंगाला तर बाहेर बसुन तोंड वेंगाडायला दुसर्‍या सोंगांना आणाव लागलं असत ना?
पण त्या निलिमाने, सुसल्याची काळजी वाटुन तिला खाली घेऊन येण्याच्या पराक्रमाला, आर्चिस आय यम प्राऊद ऑफ यु अस चार चारदा म्हणुन गालबोट लावलन.
आर्चिस पण घरात वॉक घेत असल्यासारखा घरभर फिरत होता नुसता.

मला कालचा एपिसोड लई इनोदी वाटला. एक तर ते सोंग घरात जाताना कोणी अडवलं नाही. बरं तो माणूस आहे, भूत नाही. तो आत गेला तर त्याला बाहेर काढायला घरात जायला कोण तयार नाही. माधव तर इतका भित्री भागुबाई आहे. बायको आणि मुलगा वर जात आहेत हे बघून पण शुंभासारखा खाली उभा राहिला. चुल्लूभर पानीमें डूब मरो. नाहीतरी पाण्यापासून भीती असल्याने बुडून मरायला चुल्लूभर पाणी पण पुरेल त्याला. :रागः तो आर्चिस माणूस शोधत होता का मांजर. त्या माईच्या एव्हढ्याशा खोलीत किती वेळ शोधत होता. अरे माणूस दिसेल ना समोर. काय एकेक माठ आहेत. त्यातून त्या नानांचा क्लोजअप दाखवून वैताग आणतात. तरी बर त्यांची आकाशवाणी काल झाली नाही.

गणेश बाहेर आला तेव्हा सोंग उतरवलं होतं तेव्हा कोणी त्याला ना अडवलं ना ओळखलं. आधी दत्ता जात होता तर सरिताने आरडाओरडा केला आणि मग नंतर कोणीतरी वर जा म्हणाली. छाया आत आली तेव्हा तिला कोणी अडवलं नाही. तिनेही आर्चिस कुठे गेला आणि तुम्ही इथे खाली करताय असं विचारलं नाही. शेवटी आर्चिससोबत कोणी गेलं नाही. अगदी माधवसुध्दा. गणेश काही ठेवायला आला होता का काय घेऊन गेला देव जाणे.

ते पाय आर्चिस किंवा गणेश दोघांपैकी एकाचे घरातून बाहेर येतानाचे असतील. नानांच्या खोलीत पाणी सांडलं होतं तेव्हाचे. छायाचे पाय उठलेच नसतील. ह्यांची उगाचच टरकली आहे. आता निलीमा ह्याला scientific explanation आहे असं मोघम म्हणाली ना तर ते स्पष्टीकरण ती देईपर्यंत तिला विहिरीत टांगून ठेवली पाहिजे. नुसती बोलाचीच कढी आणि बोलाचा भात.

काल टिकरमध्ये दाखवत होते 'एक अनोळखी चेहेरा घेऊन येणार नव्या संकटाची चाहूल' - रात्रीस खेळ चाले रात्री १०:३० वाजता. आता कोण पात्र येणार आहे?

आजकाल प्रत्येक एपिसोडच्या शेवटी काहीतरी सनसनाटी दाखवायचं असं त्यांनी ठरव्लं आहे. आधी विहिरीतला एको झाला, मग दत्ता आणि माधव चकव्यात अडकले. आज छाया आल्यावर उमटलेली उलटी पावलं दाखवयची होती. त्यासाठी सगळे घराबाहेर असणं आवश्यक. म्हणून हा फालतू घोळ घातला असावा असं वाटतं.

ते खेळे जेव्हा शिमग्याचा खेळ करत होते तेव्हा त्यांच्यात गणेश दिसला का कोणाला Uhoh मलातर नाही दिसला. तो अचानकच कुठुनतरी उगवला असे वाटले.

ते खेळे जेव्हा शिमग्याचा खेळ करत होते तेव्हा त्यांच्यात गणेश दिसला का कोणाला>> मला दिसला होता. मी माझ्या आईला म्हटलंही होतं गणेश आहे त्यात. सगळ्यांचा closeup दाखवत होते पण त्याचा दाखवत नव्हते.

=)) =))
खि: खि: गण्या समोरुन गेला तरी दत्तीला कळलं नाही, उलट तिच दुसर्‍यांना इचारत होती- हा कोण आहे? Proud

रावी. Biggrin ती एकच होती त्यात 'गोमू' म्हणतत त्या पात्राक. Proud आता देविकाचा पेटनेम गोमू ठेवायस हवा. Happy Lol

गण्या समोरुन गेला तरी दत्तीला कळलं नाही, उलट तिच दुसर्‍यांना इचारत होती- हा कोण आहे? >> खालमानेन गेलो तो, त्यात त्वांड रंगवलेला, आणि काळोख कसां वळखतील मा त्याका.

गण्या चा नाच छान होता !! अधुन मधुन तो चोरासारखे घराकडे लुक्स पण देतोय.
https://www.youtube.com/watch?v=OUFCMCMfB7k ईथे बघाच.
आणि गण्या ऑल राऊंडर आहे वाटतं गुढ विदया , सोंगे, नाच सगळे येते त्याला!

Pages