रात्रीस खेळ चाले १

Submitted by मी_इंदू on 22 March, 2016 - 01:34

2016 - 1 (1).jpgआपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.

आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443

शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..

पात्र परिचय :

माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट

मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः

१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?

शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .

आज विशेष

अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!

रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न

१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< याचे नाव रात्रीस खेळ चाले २ असायला पाहिजे होते! >> 'रात्रीस खेळ चाले - ठेवा नांवं !', असंही शोभून दिसेल !!! Wink

जानुबैचा रेकॉर्ड ठोकळी नक्कीच मोडेल. ठोकळी इतक्या लवकर जानुबै डोक्यात नव्हती गेली .आणि जानुबैच्या बाळापेक्षा यातल भूत जास्त वाट बघायला लावणार .

मालिकेचा दर्जा चांगला, बरा, वाईट काहीही असो पण या निमित्ताने कोकण दर्शन जे घडत आहे त्यामुळे डोळे आणि मन प्रसन्न होऊन जात आहेत. घराबाबत तर प्रश्नच नाही, त्यातही ती झाडलोट, अंगण, विहीर, तेथील कामे, शेती, गावातील ये-जा, बाजारहाट, गुरवाची लगबग, बकिलाकडील बैठक.....आदी अनेक जागा आहेत अशा की तिकडे लक्ष देताना हे सारे फ़्लॅट आणि बंगला कल्चरपासून वेगळे आहे हे जाणवते....सुखद हिरवेगार वाटत राहते आहे हे सारे भाग पाहाताना.

....शिवाय काल अभिराम मोटार सायकलवरून देविकाला भेटायला चालला आहे आणि ती आतुरतेने त्याची रस्त्याशेजारी असलेल्या एका शेतात, गवताच्या राशीला टेकून उभी आहे, हा प्रसंग फ़ारच आपुलकीचा वाटला. "थोरातांची कमळा" नावाचा एक चित्रपट होता....त्यातील नायक सूर्यकांत घोड्यावरून अशाच एका रस्त्यावरून चालला आहे. आपल्या प्रेयसीला, उमा...ला भेटायला, तीही अशीच एका शेतात त्याची वाट पाहात उभी आहे. तो प्रसंग आठवला.

अशा सुंदर आठवणी जर ही मालिका उपलब्ध करून देणार असेल तर त्यासोबत येणारी भुतेही मला आवडतीलच.

अशोकमामा>> सहमत.
काल छाया दिसली म्हणून अभिराम-देविका गवताच्या राशी मागे लपतात तेव्हा उगीचच.. "का????... बघतात" आठवलं Happy

'रात्रीस खेळ चाले - ठेवा नांवं !'.>> Lol Lol Lol

या निमित्ताने कोकण दर्शन जे घडत आहे.>>> कसच काय अजुन? घर- दार अन् अंगण यापलिकडे काहीच जास्त दाखवत नाहीत. Sad त्या अभ्या-अभीला म्हणावं जरा पिरेम केल्यावानी हिंडाकी दोघंजन रानावनातनं त्या निमित्ताने तरी आंम्हाला कोकण बघायला मिळेल! Wink

त्या अभ्या-अभीला म्हणावं जरा पिरेम केल्यावानी हिंडाकी
दोघंजन रानावनातनं त्या निमित्ताने तरी आंम्हाला
कोकण बघायला मिळेल! >>>> पहिल्यांदाच दोघे बाहेर भेटले , जातील हळूहळू सगळीकडे फिरायला . बाकी अभिला काही अभ्यास नाहीच . त्याच डायरेक्ट पोस्टिंगच होणार आहे . तर मग इतका वेळ आहे त्याला , तो सत्कारणी लावण्यासाठी नक्की कोकण दर्शन घडवत सगळीकडे फिरणार आहेत अभि-देविका .

आता हयसर लिवूचा काय?>> व्हय.. तिकडे पूर आणलाव आता हयसर आणायचो. Wink शिरेलीक बरोबर एक महिनो झालो आज आणि नवीन धागो विणूची येळ आली. Happy

ता छाया असता असता गायब खय व्हता? Uhoh

काल तयारी करण्याच्या नावाखाली देविका ४ मिनीटं केस इकडून तिकडून ओढत होती शेवटी पिन लावल्यावर पण एकाबाजूनं पोचकाडं आलंच होतं. Uhoh

निधी!:P
पोचकाडं च आवडत असेल तिच्या अहोंना!!!
वैनीला तु खूप आवडलीयेस वैगरे ऐकल्यावर कसे चायनीज हास्य केले तिने!

ता छाया असता असता गायब खय व्हता? >>अगो गायब व्हता तर व्हता पण चालतंच दूसर्या गावाक कसा पोचता?
बाकी अण्णांच्या दोघी पोरींका गुलाबी रंग लय आवडता हाsssss!!

Rofl
जानुबैचा रेकॉर्ड ठोकळी नक्कीच मोडेल. ठोकळी इतक्या लवकर जानुबै डोक्यात नव्हती गेली .आणि जानुबैच्या बाळापेक्षा यातल भूत जास्त वाट बघायला लावणार .>>>>>:हहगलो:

चिन्गः- काय गो माय, माका का अडवुन धरल्यात नायकानी? माका जाऊचा असा आत, काल मिया भेळ अन पाणीपुडी जोरदार हाणल्यानी. माका जावचाच ना, जावचाच!

चॉन्गः अगो माझी बाय, आत खय जातला? थय लाईन लागलेली असा माय सकाळपासुन. गप् रव, तुझा घोव येतलो अन तोच कायतरी सोय बगील. इतक्या मोठय घरात दुसरी सोय असेलच ना मा! आता चाय बी पिऊ नको, चाय पिल्याने पोट साफ होतलो. गप रव!

वरच्या फोटुत नाईकांच्या घराकडे बघत, कापाळार आंठ्ये घालून, धसको घेतल्यागत, देविका बहुतेक जानुबैचीच री ओढताहा - ' होणार सून मीं या घरची ? '

आमाला वाटलं कायतरी भूताटकी दावतील पण कसलं काय ,फॅमिली ड्रामा दावतातयत, घेऊन जा रे बाबा घेउन जा ( बेरीनाना मोड ऑफ)

दत्ता त्या वकिलाशी भान्डताना दाखवलाय. तो वकिलाला बोलतो की तुम्ही काहीतरी लबाडी केलीत ( बहुतेक असेच ) मग ते शेतात येतात आणी अन्धार असतो तर माधव म्हणतो की आपले घर तर दोन पावलावरच होते मग सापडत का नाही. आज रात्री पाहुया हे.

Pages