रात्रीस खेळ चाले १

Submitted by मी_इंदू on 22 March, 2016 - 01:34

2016 - 1 (1).jpgआपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.

आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443

शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..

पात्र परिचय :

माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट

मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः

१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?

शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .

आज विशेष

अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!

रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न

१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाय्गो भगवती म्या असतुया ना वाचायला.

तुमी लिवायचं अन आमी वाचायचं Wink .

तुमी बघायचं, सांगायचं अन आमी मन लावून ऐकायचं. Lol

सगळे जण आर्चीसची वाट बघत असतात, अजुन कसो नाय आलो म्हणुन एकमेकांना प्रश्न विचारतात. इकडे माई छाया आल्यानंतर कसे तीचे पाय उलटे उमटले म्हणुन आश्चर्य करतात पण निलीमा गणेशाचे कसे असू शकतात हे समजावण्याचा व्यर्थ प्रयत्न करते. सरिता अर्चीसचे कौतुकमिश्रीत आभार मानते की कसे गणेश घरातून निघून जातो तेव्हा त्याला कोणीच आणायला जात नाही. दत्ता म्हणतात की तो मेला तरी चालेल, त्याला आमची काळजी नाही वगैरे, पण निलीमा वैतागते आणि त्यांना समजावते की त्याला सुधारायचे असल्यास तो काय करतो व कुठे जातो हे बघायला पाहिजे. शेवटी जनाची नाहीतरी मनाची लाज असल्यामुळे (सैरभैर असलेला) अभिराम उठतो व गणेश अर्चीसचे ऐकणार नाही मीच जातो आणायला म्हणुन निघतो तेवढ्यात पुर्वा अर्चीस आल्याचे कळवते.
अर्चीस सुन्न होवून चालत येतो, शुन्यात नजर, मानसिक धक्का बसल्यासारखा चेहरा करतो.

सगळे विचारतात काय झाले? सरिता हात लावून विचारते तर तिच्या लक्षात येते की त्याला खुप ताप आहे. ती अर्चीसला आत घेउन येते व वृत्तांत विचारते तर अर्चीस सगळ सांगतो की कसा तो गणेशच्या पाठी पाठी गेला व त्याने पुरलेला चित्रविचीत्र दगड काढला त्याला स्वत:च्या रक्ताने अभिषेक घातला, मंत्र पुटपुटले आणि सांगीतले की तो हे सगळं घराकरिता करतो आहे. इकडे सरिता तोंडाला पदर लावुन व बाकीचे सगळे आ वासुन बघत असतात. पुढे तो सांगतो की तो चांगला आहे आणि त्याचा विश्वास बसतोय आणि निलीमा चश्म्यातील डोळे फिरवते आणि म्हणते की आर्चीस पण गणेश सारखा होतोय. त्याला वरच्या खोलीत नेवून गोळी देते. इकडे सरिता मीठ मोहरी घेउन आर्चीसची द्रुष्ट काढायला जाते निलीमा परत अडवते पण सरिता लावुनच धरते व माधव होss हो करतात. दरम्यान बेरीनाना नका नेऊ त्याला म्हणुन पुटपुटतात.
मग सरिता खाली येवून चुली ओवाळुन टाकलेली मीठ मोहरी टाकते आणि म्हणते ज्यानी हे सगळे केले त्यालाच उलटवून जाऊदे.
बाहेर पांडू उभी असतो तर कोणीतरी येवुन त्याला सांगतो की गणेशला ट्रकने उडवले आहे पण पांडू वरच्या खोलीत जाईपर्यंत विसरतो. थोड्यावेळाने सरिता बाहेर येउन त्या गृहस्ताला विचारते काय काम होते तर तो म्हणतो गणेशला ट्रकने उडवीले हे ऐकून सरिता हंबरडा फोडते व पांडूला आठवते की गणेशला अपघात झालाय. हे ऐकून सगळे छाया सोडुन बाहेर येतात.

बेरीनानाना बुकलुन काढा कोणीतरी, रोज नवीन आयटेम सोन्ग ( स्वान्ग) गात असतात. ते ही एकाच चालीत, एकाच लयीत.

हे ऐकून सगळे छाया सोडुन बाहेर येतात.>>>> सगळे छाया ( सावली ) सोडुन बाहेर कसे येतील? छाया सोडुन मग बाकीचे सगळे बाहेर येतील.:फिदी:

भगवती, भारी डिटेलमध्ये अपडेट. Happy

शेवटी गणोबाला ट्रकने उडवल्याचं कळल्यावर सरिता ज्या स्टाईलमध्ये बसून जसे हातवारे करत होती, ते पाहून वाटले हिच्या हातात तानपुरा दिला तर..... Proud पर्फेक्ट गाणेच म्हणण्याची पोझ घेतली होती तिने. आणि रडत पण होती अगदी आलाप काढुनच. Lol

<< भगवती, असेच अपडेट्स देत जा.. प्लीज.>> एपिसोड शूट झाल्याबरोबर त्येच्या स्क्रिप्टची कॉपी भगवतींकडे येता, असो माकां सॉल्लीड डाऊट आसा ! Wink
<< गणेशचा गेम केला की काय? >> उलट तोच तर डेंजर गेम खेळत असता ! काय होवचां नाय त्येकां. धक्क्यान डोक्यातलां खूळच निघून जायत !!

भगवती production टीममधेच असेल डायरेक्ट ;). आपल्याला सांगत असेल अमेरिकेत राहते (संशय येऊ नये आपल्याला म्हणून).

भगवती पोरगी गोड आहे....त्यामुळे मालिकेतील झाडावर लटकलेले ते समस्त आत्माराम भुते आणि को. तिच्यावर खूष आहेत....साहजिकच ही देखील बिनधास्त लिहित राहिली आहे...मजेत.

अरे, ह्या सिरियलीत संवाद लिहायला नकोत आणि वेळ भरून काढायचाय म्हणून एक प्रश्न दहा वेळा विचारतात का? काल पहिलं सगळ्यांनी आर्चिसला काय झालं म्हणून खोदून विचारलं. मग तो पांडू वरच्या मजल्यावर आला त्याला दत्ता आणि माधव दोघांनी दहा वेळा काय झालं म्हणून विचारलं. तो गणेशची बातमी सांगायला आलेला माणुस पांडूला ओळखत होता ना? मग त्याने पांडुला कशी बातमी दिली? आणि दिली तर दिली वर आपण बाहेर थांबला. सरिताने त्याला खोदून खोदून विचारलं. आणि चौथ्यांदा म्हणजे सरिता गळा काढून रडताना तिला सगळे काय झालं म्हणून विचारत होते. टीव्ही फोडून टाकावासा वाटला मला.

तरी बरंय काल निलिमाने उलट्या पावलांचं स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला. छाया आली आणि उलटी पावलं दिसली ह्याचा माईने काय अर्थ लावला मला कळला नाही.

काल आर्चिसबद्दल सरिता म्हणाली ते मनापासून बोलल्यासारखं वाटलं. तिच्या पोटात माया आहे पण बोलून सगळं पाण्यात घालवते. माईंनी छायाला कुठे गेली होतीस हे विचारलं नाही. काल बरी संधी होती.

बायगो स्वप्ना, कीतीही राग आला तरी टिव्ही फोडू नकोस Wink , ते एक संवाद १० वेळा म्हणून कमावतात. तु उगाच नुस्कानीत जायचीस.

त्या नानांना कुठनं उचलून आणलंय कोणास ठाऊक. त्यांचा तो लुकलुकणारा एक दात पाहून मला वैताग आलाय. एकतर कोणालातरी घरात बोलावतात नाहीतर घेऊन जायला सांगतात. काल कोणालातरी वाचवायला सांगत होते. आणि प्रोमोत कोणालातरी झाडावरून डोळे वटारून काय बघतंस विचारत होते. ह्यांची नानी कुठे आहे? ती का येऊन घेऊन जात नाही ह्यांना? देशव्यापी चळवळ करून त्यांना ह्या सिरियलीतून हद्दपार करायला हवं. Angry

आर्चिस हेही सांगतो की गणेश खिशातून काहीतरी काढून चघळत होता. त्यावर दत्ता म्हणतो की त्याला अफूचं व्यसन लागलंय. तसंच ज्या माणसाबरोबर तो आण्णा गेले असताना आला होता त्याच्याच सोबत गणेश होता असंही आर्चिस सांगतो.

बाकी पूर्वालाही गणेशला उडवल्याचं फारसं दु:ख झाल्याचं दिसत नाही. एकटी सरिताच रडत होती.

आर्चिस मात्र बापावर गेलाय. त्याने चिखल बघून ताप काढला, ह्याने दगडाला रक्ताचा अभिषेक बघून. निलिमा आपली पोतडीतून गोळ्या काढतेय. सारखं सारखं औषधं घेणं पण आरोग्याला हानीकारक असतं ते ह्या सायंटिस्ट बाईला कोण सांगणार? Uhoh

शक्यता आहे पण आणी नाही पण. कारण गणेश नुसतीच अफु नाही तर बाकी कुठल्याही तारेत असेल तर त्याला भान राहीले नसणारच. त्यातुन रात्रीची वेळ. सरीता बाबत स्वप्नाला अनुमोदन. तिला निदान याची जाणिव तरी होते की अर्चिस लहान असुनही गणेशचा विचार करतोय, त्याला बघायला एकटाच बाहेर गेलाय. आणी तसेही एवढा मोठा अपघात झाल्यावर गणेशला आराम नको का? तो येडा गुरव येऊन काहीही बरळताना दाखवलाय.

@स्वप्ना-- त्या नानांना कुठनं उचलून आणलंय कोणास ठाऊक. Biggrin Biggrin
एकतर कोणालातरी घरात बोलावतात नाहीतर घेऊन जायला सांगतात.>>>
ते एकपात्री नाटक साकारत आहेत. Wink

स्वप्ना Rofl
प्रचंड हसतेय!!!
नानांना कुठनं उचलून आणलंय कोणास ठाऊक. त्यांचा तो लुकलुकणारा एक दात पाहून मला वैताग आलाय. एकतर कोणालातरी घरात बोलावतात नाहीतर घेऊन जायला सांगतात. काल कोणालातरी वाचवायला सांगत होते. आणि प्रोमोत कोणालातरी झाडावरून डोळे वटारून काय बघतंस विचारत होते. ह्यांची नानी कुठे आहे? ती का येऊन घेऊन जात नाही ह्यांना? देशव्यापी चळवळ करून त्यांना ह्या सिरियलीतून हद्दपार करायला हवं. राग>>>>> Rofl

लुकलुकणारा एक दात >>>यक्क आहे अगदी!!
त्यांचं बोलणं आत ये घेऊन जा आणून सोड वाचवा येवढंच असतं....बेरीनानांनाच गचकवलं पाहिजे कोणीतरी!

बेरीनानांनाच गचकवलं पाहिजे कोणीतरी!>> ए, असं बोलू नकोस हांऽऽऽ... Uhoh
पहिल्या भागात ते अण्णा म्हणाले ''आता गेलाव तर तुम्हीच जाशाल. " आणि स्वतःच गेले.

निधी Proud

Rofl

ह्यातला थोडा पाणी जरी सरिताच्या डोळ्यांतना इला ना तर भारी अॅक्टींग वाटात सरिताची. Wink

Pages