रात्रीस खेळ चाले १

Submitted by मी_इंदू on 22 March, 2016 - 01:34

2016 - 1 (1).jpgआपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.

आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443

शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..

पात्र परिचय :

माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट

मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः

१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?

शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .

आज विशेष

अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!

रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न

१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालचा दत्ता, सरिता आणि माईचा सीन मस्त होता. पांडूची एक्टिंग पण झक्कास आहे. खरच वेडा वाटतो तो. नाईक लोकांचं मलाही आता हसू येतंय. अंगावर घातलेल्या कपड्यांवर फुल्या नाही ना आल्या? मग एव्हढं काय घाबरायचं? वर विचारतात की कपड्यावर कोण कशाला फुल्या करेल. जो वाईटावर आहे तोच करणार ना. गणोबा एकदम बरे झालेले दिसताहेत. पट्ट्या गायब झाल्या की सगळ्या. कपाटात शेवंताचे दागिने दिसताहेत. जमिनीचे कागद पण मिळणार काय? घरभर शोधलेन ह्या लोकांनी. तेव्हाच उघडून बघायचं ना ते कपाट.

काल माधव असा काय एक्टिंग करत होता. विशेषत: निलीमा सरिताला समजावून सांगताना. मला तर त्याची भूलभुलैया मधली अवनी झाली आहे असा दाट संशय येतोय. कारण तो मनाने दुबळा आहे. तोच तर हे सगळं करत नसेल? दुसरी संशयित छाया आणि तिसरा पांडू.

बाकी निलीमाने असलं डोळे वटारून पाहिलं सरीताकडे शेवटी की अनेक गाणी मनात तरळून गेली - तुम्हारी नजर क्यो खफा हो गयी, गोरे गोरे मुखडे पे काला काल चष्मा, जरा नजरोंसे कह दो जी......

>>नाईकांच्या घरांत आतां रात्रीच्या खेळांवांगडा 'हाऊसी' चो पण खेळ सुरू होताहा.फुल्यो मारूंक तयार रवा

Proud

दोन्ही फोटोत छाया आऊट ऑफ फोकस आसा. हे काय रहस्य? Uhoh माई एकदम धिनचॅक दिसतात.

छन्नपकैय्या छन्नपकैय्या
छन्नके उपर खिडकी
निलीमाको किचनके बाहर देखकर
सरिता जमीनपर लुडकी

क्या है कपडोपर लगे दागका राज? क्या बंद अलमारीमें जमीनके गुमशुदा कागज मिलेंगे? क्या निलीमा उठा पायेगी अ‍ॅट लिस्ट इस राज पर से परदा? अगले एपिसोडमें देखेंगे हम लोग.

डेन्जर दिसली काल निलिमा...लास्ट सिन ला!
एकतर तिचे ते भोकरे डोळे, बसायची स्टाईल... पहिल्यान्दा हादरायला झाल!

निलिमा आपला आड्मुठेपणा कधी सोडणार ??
ती सरिताला समजवायला बोलावते , मग एक्दम कडक सूर कशाला ठेवायचा ?
सुरवात मवाळपणे करायची ना . आणि मग लॅपटॉप काढून काम करत बसली.

अ‍ॅक्च्युली कथा मस्त आहे . श्रद्धा, अंध्श्रद्धा आणि विज्ञान यांचा झगडा .
भाउबंदकी , लोकांच्या समजूती , त्यांचा गैर फायदा , लोकांचे आपापसातले संबंध यांचा वापर करून सशक्त पटकथा फुलवता आली असती.

पूर्वा , विज्ञानाची विद्यार्थिनी आहे . मनाने निर्मळ आहे .
तिच्या स्वभावाचा उपयोग कुटुम्ब जोडून ठेवायला केला आहे . पण तिच शिक्षण , अभ्यास याचा उपयोग ना दिग्दर्शक करून घेतोय ना निलिमा .
आर्चिस चे ही तसेच . ही तरूण मंडळी नुसते माडीवर बसून गप्पा मारण्यापेक्शा काहितरी वेगळे करताना दखवली असती तर ?? ( काय ते मल माहित नाही Happy )

कालच्या भागात निलिमाला बघून मीही दचकले . तिच्या बसण्याची स्टाईल छायाची वाटत होती . मला तर वाटते , स्वतः निलीमाच तिथे येउन बसली असेल . सरीताला समजावयाला.

तरूण मंडळी नुसते माडीवर बसून गप्पा मारण्यापेक्शा काहितरी वेगळे करताना दखवली असती तर >>>>+११
ठो बै पेक्शा ही तरुण मुलं रह्स्यभेद करतात असे दाखवायला पाहीजे होते.. ठोकळी या लोकांची विचारसरणी बदलु पाह्तीय..त्या पेक्शा काही प्लान करुन शोध का लावत नै.. नुस्ताच लॅपटॉप बडवत बसते

मला पण. माई सहज अभिनय करतात. दत्ता-दत्ती असली नवरा-बायकोचा अभिनय करतात. अभिराम अभिनय करण्याचा प्रयत्न करतो, पण त्येका जमुक नाय. ठोकळा ठोकळी बरोबर लपाछपी खेळतो. पान्डु अस्सल खुळा वाटतो. काल सुसल्याने एकदम मादक हावभाव करत पान्डुला समजावले. निलीमा, दत्ता रडत असताना सरीताला जाऊन बोलावते, पण विचारत देखील नाही की भावजी तुम्ही का र्‍डत आहात? काय झाले?. एकदम कोरडी वाटते. भागाचा शेवट मात्र भारी होता.

काल सुसल्याने एकदम मादक हावभाव करत पान्डुला समजावले. >>> कालचा भाग बघितलो नाय पण सुसल्या कायमच मादक वाटता.

काल सुसल्याने एकदम मादक हावभाव करत पान्डुला समजावले.>> अगदी. मी पण हेच म्हणाले. ह्यांचं लग्न होणार की काय ? Lol

निलीमा, दत्ता रडत असताना सरीताला जाऊन बोलावते, पण विचारत देखील नाही की भावजी तुम्ही का र्‍डत आहात? काय झाले?. एकदम कोरडी वाटते.??? दिग्द. ची चुक

काल सुसल्याने एकदम मादक हावभाव करत पान्डुला समजावले. >> शेवटी शेवंताची पोर ती. Happy

निलिमाला बघून मी पण दचकले. जनरली गावात राहणार्‍या बायकांना अशा स्टाईलमध्ये बसायची सवय असते.

कालचा दत्ता, सरिता आणि माईचा सीन मस्त होता.>>
माई सहज अभिनय करतात. दत्ता-दत्ती असली नवरा-बायकोचा अभिनय करतात>>>
पान्डु अस्सल खुळा वाटतो. >>
+ १००००००००

काल दत्ता किती मनापासून रडला असं वाटलं

रश्मी मालवणी डेज ची लिंक मस्त!! कधी होती ती सिरियल?? मला बघितल्याचे किवा घरातल्या कुणी चर्चा केल्याचे आठवत नाही. भाऊ कदम तेव्हापासुन स्री भुमिकेत माहिर होते! Happy

राखेचा बद्दल बोलायचे तर खरतर अगदीच सुमार दर्जा आहे. निर्मिती, दिग्दर्शन, मुख्य म्हणजे पटकथा खुपच ढिसाळ आहे... तरी देखिल सद्ध्या चालू असलेल्या एकूण रतिबात तीच वेगळी उठून दिसते.

धन्यवाद Happy आजच्या भागाचा गोशवारा(?) जरा उशीरा पोस्ट करेन. आज आमच्या गावात शास्त्रीय, नाट्यसंगीत, भावगीताचा भरगच्च कार्यक्रम आहे त्यामुळे घरी यायला उशीर होईल.

हो ना निलीमा अगदी एका शब्दाने विचारत नाही दत्ताला काय झालं फारच खटकलं ते!
पांडूची दया आली बिचारा! Sad सरिता दत्ताला समजावताना तीच तीच वाक्य रिपीट करत होती.

<< नुस्ताच लॅपटॉप बडवत बसते>> काल मीं निरखून बघलंय तर लॅपटॉपवर निलीमा भगवतींचां आधीच्या एपिसोडचां रिपोर्टींग बरोबर आसा काय, तां चेक करत असता असो संशय इलो माकां !! Wink

Pages