रात्रीस खेळ चाले १

Submitted by मी_इंदू on 22 March, 2016 - 01:34

2016 - 1 (1).jpgआपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.

आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443

शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..

पात्र परिचय :

माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट

मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः

१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?

शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .

आज विशेष

अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!

रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न

१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिराम म्हणजे बेडूक आहे.

बटबटीत डोळे आणि तेच सारखे एकच डराव डाराव ... माझे लग्न माझे लग्न..

काल इतकी भयाण अँक्टींग केली.. नुसते डोळे बाहेर काढून बघय होता..

देवीकाचा चुडीदार भयानक... सारखं मागून का शॉट घेत होते कळलं नाही.....
देवीकाची आए कजाग एकदम.

माधव काहितरी गंभीरपणे विचार करून छोट्या वहीत लिहीत असतात. सुसल्या विहीरीतुन पाणी काढत का परत विहीरीत टाकत असते. तेवढ्यात दत्ता दात घासता घासता विहीरीपाशी येतात तर सुसल्याला तिकडे बघुन त्यांचा पारा चढतो. माधव अजुनही काहितरी लिहीत असतात. दत्ता यमुनाला हाका मारतो व सुसल्याला तिकडून हाकलायला लावतो. यमुना सुसल्या असं जेव्हा संबोधते तेव्हा सुसल्या चिडते व बाईसाहेब म्हण असे बजावते व तिचे कपडे धुवायला लावते. इकडे माधव अजुनही काहितरी लिहीत असतांना खिडकीतुन डोकावून बघतात. सुसल्या जातांना दत्ता तिच्याकडे बघुन थुंकतात. यमुना सुसल्याचे कपडे धुवू पाहते तर दत्ता तिला नंतर बघू म्हणुन घालवुन देतात.ते विहीरीतुन पाणि काढत असतांना सरिता येते व टाॅवेल घ्या म्हणते आणि साबण पण देते. दत्ता म्हणतात कि मला अंघोळ करू दे तर ती म्हणते कि सुसल्याला बाहेर काढू आपण. ते म्हणतात कि मृत्युपत्राप्रमाणेच ती इथे राहतेय त्यावर ती तुम्ही कसे भोळे म्हणुन मागे राहिलेत वगैरे म्हणते. मग सुचवते कि सुसल्याचे लग्न करून द्या. दत्तांना ही कल्पना आवडते. माधव अजुनही कोणी जवळपास नाही ना हे बघुन चोरून लिहीत असतात. पुर्वा माईंना चहा नेऊन देते. त्या म्हणतात कि मी बाहेर आले असते. मग त्या रिकाम्या बशीतुन चहा पितात. मग पुर्वा अण्णांच्या फोटोकडे एकटक बघुन आठवणी काढते कि कसे अण्णा पहिला चहा माझ्या हातचा घ्यायचे वगैरे आणि दोन नातू पण मी एकटीच नात म्हणुन लाडकी होते. माई पण खरय म्हणतांना स्वत:चे पाय दाबत असतात. पुर्वा मग त्यांचे पाय दाबू लागते त्यावर त्या विचारतात कि का एवढे प्रेम ऊतू जातय तर ती म्हणते अग तुझे पाय दुखताय म्हणुन दाबतेय. इतक्यात दत्ता त्या खोलीत येतात व पुर्वाला पिटाळतात. मग माईंना सुसल्याच्या लग्नाची कल्पना सुचवितात. माई म्हणतात कि तिला घरात घेतली तर लोकं नाव ठेवताय तर लग्न केले तर काय म्हणतील? त्यावर ते वैतागतात आणि माधवने हे सांगितले असते तर तू लगेच एकले असते आणि धमकावतात कि मी तालुक्याच्या जागी बिर्हाड हलवतो. मी का म्हणुन सगळे सहन करू? माई शंका उपस्थीत करतात कि हिच्याशी लग्न कोण करेल मग दत्ता म्हणतात कि मी बघतो काय ते.
पुर्वा स्वयंपाक घरात येते तर सरिता म्हणते कि मीठ आहे का भाजीत ते बघ. ती सांगते कि नाहीये मग सरिता म्हणते कि तिलाच सगळे करावे लागते.अजुन कपडे वाळत टाकायचे आहेत. पुर्वा पातेलभर भाजीत चिमटीभर मीठ टाकते. मग बशीत पोहे का काय ते भरते तर सरिता वैतागते कि त्या काय राणी आहेत का? तर ती म्हणते कि कामात असेल काकू. तुला काही मदत करू का तर ती म्हणे नको तु पुस्तक हातात धर. माधव अजुनही काहीतरी लिहीत असतात. सुसल्या स्वयंपाक घरात येऊ बघते तर सरिता तिला अडवते व मी तुला आत येऊ देणार नाही असे बजावते. ती उडदाचे पीठ संपल्यामुळे मागायला येते. सरिता तिला हिणवते कि वेगळी चुल मांडली तर तुझ्याकडे नाही? घे जमिन, पैसा सगळे घे. ही म्हणते कि पीठ देते आणुन नंतर. सरिता परत घेणार नाही असे सांगते. सुसल्या पीठाबरोबर डाव पण लंपास करते.
सरिता कपडे वाळत टाकत असते. पांडू तिथेच बसलेला असतो. चादरीमागे तिला फक्त पायच दिसतात तर ती किंचाळते. बघते तर छायाच असते. पांडू मोठ्याने हसतो ते बघुन सरिता चिडते, म्हणते कि ह्यांनाच सागते व पांडूला (खराखुरा) दगड मारते. सरिता एक कपडा दोरीवर वाळत टाकते व दहा पावलं चालुन परत बादलीतले कपडे उचलते. असे बराच वेळ करते. तिने बादली उचलली असती तर तिचा त्रास वाचला असता, असो तर ती छायाला मदत करायला लावते. छाया म्हणते कि तुझे काम तुच कर. मी रांधुन पण दिले असते, तुम्हाला सुसल्या चालते स्वयंपाकघरात आलेली पण मी नाही. त्यावर सरिता म्हणे मी तिला येऊ दिले नाही. त्याच्या लक्षात येते कि सुसल्या ऐकतो आहे, छाया म्हणते घाबरलीस ना? त्यावर ती नाही म्हणते. छाया निघुन जाते. यमुना सुसल्याचे कपडे वाळत टाकायला येते तर सरिता तिला मनाई करते. निलीमा खोलीत आल्यावर माधव चपापतात. ती विचारते कि काय झाले तर ते म्हणतात कि खोलीत पसारा झालाय असे म्हणुन चादरीखाली वही लपवीतात. अर्चीस खोलीत येवुन आईकडे नवीन कपडे आणायला पैसे मागतो. ती म्हणते की आपण हे सगळे निस्तरले कि निघतोच आहे, तिकडेच घे. माधव मध्यम हो लावतात. ( हो म्हणतात) दत्ता बाहेर जायला निघतात तर कपड्यावर फुल्या दिसतात ते जोरजोरात आई आणि सरिताला हाका मारतात. सगळेच घाबरतात. सरिता म्हणते फुल्या कोणी मारल्या? माई म्हणतात कि अशाच येणार नाहीत त्या.
*** मी ही मालिका लंच टाईमला बघते आणि घरी आल्यावर टाईपते त्यामुळे काही प्रसंग मीसतात, जेवढे आठवते तेच लिहीले जाते. गोड मानुन घ्या Happy
*** आजच लिहीले होते कि सुसल्याचे लग्न करून द्या Biggrin
***अनुत्तरीत प्रश्न - माधव वहीत काय लिहीतात?

पुर्वा पातेलभर भाजीत चिमटीभर मीठ टाकते>> :p
मस्तं अपडेट.. आज च्या एपिचा पण नक्की दे हं भगवती.. कारण म्याच आहे ना आज..ही शिरेल लावता नै येणार

<< माधव डायरी (वही) सस्पेन्स >> रोज 'रामरक्षा' लिवांक सांगली असतली बहुतेक गुरवान माधवाक; बाईल ओरडात म्हणान तिकां लपवून लिवता तो डायरीत !!! Wink

माईंचा चा !

Capture1.JPG

दिनेश्दा कुठे गेले ??
मागे त्यानीच ना , उकळती आमटी तळव्यावर घेउन चव घेणार्या जुहीवर टीका केली होती Happy
काल पूर्वा ने तेच केलं नेमकं . आणि मीठ खरच चिमुटभर होतं.

बाकीची भांडी पितळेची आहेत , डाव आणि चमचे स्टीलचे का?
ते पाय बघून मी पण दचकले

भगवतीचे अपडेस वाचल्यावर सिरीयल पाहयची गरज नाही...नाहीतरी प्रत्येक एपिसोड्च्या शेवटी एक सस्पेन्स्चे पिल्लु सोडायचे मग डोन्गर पोखरके उन्दीर निकाल्या!! सिरीयल मध्ये घाबरण्यासारखे काहिच नाही, उलट 'भाउबन्द्कीच; चालली आहे. आताशा सिरीयल मधला इन्टरेस्ट कमी होतोय. प्रत्येक एपिसोड् मध्ये सस्पेन्स अर्धवट सोडलेला.

स्वस्ति पर्फेक्ट पकडले.:फिदी: काल पाहीले तेव्हाच बशी कोरी करकरीत दिसत होती. काय हे! निर्मात्याला साधा चहाचा खर्च पण परवडेना?:अओ:

रोज 'रामरक्षा' लिवांक सांगली असतली बहुतेक गुरवान माधवाक; बाईल ओरडात म्हणान तिकां लपवून लिवता तो डायरीत !!! >>>>:हाहा: भाऊ तुम्ही पण अचूक बाण मारलात.:फिदी: पण हा ठोकळो माधव, बाईलेसमोरच लपवुक जाता ता डायरी. काल पान्डु उगवला होता, त्येका बघुन माका जाम हसू येता.:खोखो: तो एकमेव विरन्गुळा असा या सिरीयलमध्ये.

परवापासुन बेरी नाना दिसले नाहीत, ते पण कागद शोधाक लागले का? सुसल्या काल परकर- पोलक्यात दिसला, ड्रेस धुवायला टाकला एकदाचा तिने.:फिदी:

बहुतेक म्हणतात. खेड्यात ( देशावरच्या, कोकणातल्या नव्हे) सुद्धा म्या आलो हुतो/ म्या गेलो होतो असे ऐकले आहे. बहुतेक तो च्या ऐवजी ता असेल ते.

ता -- बरोबर ... तो चूक
खरतर , पूर्वाने पण तळव्यावर घेउन भाजी चाखली असेल असे वाटली नाही .
तीने नुसतिच अ‍ॅक्टिन्ग केली . तळव्यावर ओठ लावायची . एक्दम लहान मुलांच्या नाटकाची आठवण आली

श्रीरामपुरला आल्ता, गेल्ता ऐकलंय.

कोकणातले असून आमच्या घरात सासरी-माहेरी प्रमाण मराठीच बोलतात म्हणून मला चिपळूण, संगमेश्वरी, देवगडी कुठलीच बोली भाषा येत नाही Sad .

हो खेड्यात बोलतात. पण आता नाही. मी कॉलेज मध्ये असताना ऐकले होते. पण मला सगळ्यात जास्त आवडलेली सिरीयल म्हणजे मालवणी डेज. तेव्हापासुन मी मालवणी भाषा आणी कोकणाच्या प्रेमात पडले.:स्मित:

<< सरीता आणि छाया तो सुसल्या काय म्हणतात >> सरिताची व्यक्तीरेखा सच्ची कोकणातली वाटली तरी तिची 'मालवणी' मात्र अगदींच कच्ची आहे. 'तां' सुसल्या हें खरं मालवणी !!

काही कलाकारांची खरी नावे ,धाग्याच्या हेडरमध्ये टाका
दत्ता=सुहास सिरसाट
पुर्वा= पुजा गोरे
निलिमा= प्राची सुकथनकर
गणेश = कल्पेश समेळ
सरीता= अश्विनी मुकादम
देविका= नुपुर चितळे
सुषमा= रुतुजा धर्माधिकारी
पांडू= प्रल्हाद कुडतरकर
बाकीची मिळेल तशी टाकतो

Pages