रात्रीस खेळ चाले १

Submitted by मी_इंदू on 22 March, 2016 - 01:34

2016 - 1 (1).jpgआपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.

आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443

शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..

पात्र परिचय :

माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट

मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः

१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?

शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .

आज विशेष

अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!

रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न

१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rofl अरे काय लिहता तुम्ही लोक!!!

भगवती नाईस अपडेट!!

फौग चललाहा Rofl

सुसल्या खरंच रावडी बनायच्या नादात अगोचरपणा करते...ओढणी मस्ट आहे तिला.

चौन्ग बै लै डँम्बिस , कपटी दाखवलीये अगदी..

बाकी या वरच्या फोटुत ठोकळी बारिक दिसतिये Lol

कागदपत्रांसह जमीनीच्या वाटण्यांसाठी मुदत १ महिना
अभिरामाचे देविकाशी लग्न मुदत २ महिने

सुशलया वकिलाकडे असे बघते की, आज की रात सुरु करेल....
काय ते नयनो के बाण, आणि तो म्हातारा उठून... नाचायला लागेल अशी नजर भिडवत...

देवीकाची आई, फोन वरून लोक काय म्हणतील आणि इथे बॅगा भरून सोडते मुलीला याचे काय..

त्या बिचार्या गणेशला नीट झोपू पण देत नाही. तीन तीन लोक बसतात त्याच गादीवर..>>> आणि जोरजोरात आरडाओरडा करतात.

सुसल्या कमरेवर हात टेवून एझल पोजमधे उभी राहून जरा जास्तच बोल्ड वाटते .
त्यात , नेने वकिल खाली येतात तर माई त्याना म्हणते , तुमचा काय चालल्ला ता तुमच्या वयाक शोभत नाही Rofl

सुसल्या आण्णा आणि शेवंताची मुलगी . फार डेडली कॉंबिनेशन आहे हे . प्रत्येक मनुष्य वेगळा पण काही स्वभावगुण अनुवांशिकतेने येतात . तेच आता हळूहळू दिसू लागले आहेत .

नवीन ट्रेलर मध्ये सगळे विहिरीजवळ गोळा होऊन टरकलेल्या नजरेने बघत असतात आणि.आज दत्ता दत्ती माई सुसल्या च्या बाबतीत कैतरी गौडबंगाल करणार आहेत

काळ दिवसभर जी जाहिरात दाखवत होते आणि स्क्रोल फिरवत होते त्यात म्हटलं होतं की वाळत घातलेल्या कपड्यांवर अचानक डाग उमटणार कसलेतरी, ते कुठे दाखवलंच नाही Uhoh

हे माझेही चार आणे:
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत ठेवला उपमा,
अण्णीला आली मोठी सून,
नाव तिचं नीलिमा!!

अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत ठेवल्या खारका,
अण्णीला आली दुसरी सून,
नाव तिचं सरिता!!

थँक्स रश्मी.
स्वप्ना मस्त .
आणि सगळ्याच छान कमेंट टाकता आहात असच सुरू राहू द्या . थँक्स .
चाय विथ सुसल्या...
सुसल्या बाकी शेवंताची चेडु शोभतासा . काय ते बोलण . काय ते उभ राहण आणि काय ती नजर...
अगोचर कार्टी कुठली ..

क्लिओ, हि घे देविका:
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत दिसतात भुतां,
अभिराम आणणार बायको करून,
नाव तिचो देविका!!

देविकाची आय काय हो बेरकी
नेमकी बघा कशी लावता ती फूस
अभिराम बिचारो तडफडताहा
माबोवरचो तरी सुरूच धूडगूस II

एक बेसिक प्रश्न:
गुरव जे करतात तसंच सिमिलर काहीतरी गणेश करतो ना ? मग गुरवाला घरात ते सगळं निस्तरण्यासाठी बोलवतात आणि गणेशला सगळी थेरं बंद कर म्हणून का सांगतात? उलट घरचा माणूस आपल्या घरासाठी नक्कीच चांगलं करेल ना आणि तेही कोणत्याही अपेक्षेशिवाय.

गुरव जे करतात तसंच सिमिलर काहीतरी गणेश करतो ना?>> गुरव करतो ते देवाला साक्षी ठेऊन करतो, म्हणजे चांगला मार्ग.
आणि गणेश अघोरी साधना करतो. देवदेवस्की म्हणतात त्याला.. याच्या मागे लागून अनेक जण वाया जातात.

मी गुरव असे टाईप करायला गेले तर क्रोमच्या मेहेरबानीने तिथे गुरगुर टाईपले गेले.:फिदी:

गणेश ला हे सगळे विरोध करतात त्याचे कारण पुढले असावे. तो एकतर घरात मिळुन मिसळुन रहात नाही. अफुचे व्यसन असते. तो जे सान्गतो त्यातले काहीच खरे होत नाही किन्वा त्याला तसा वेळ दिला जात नाही. आठवा दहाव्याच्या दिवशी पणती खाली काहीतरी उमटलेले असेल असे तो बोलला होता पण तो प्रसन्ग यानी (सिरीयलचा निर्माता व लेखक ) दाखवलाच नाही. गुरव मात्र वयाने मोठे, अनूभवी आहेत, अण्णा तसेच बाकी गाव पण त्यान्च्यावर विश्वास ठेवतय मग आम्ही का नको असा दत्ता-दत्तीचा विचार असावा.

आणी पुतण्या अर्चिस तसेच मुलगी असुनही पूर्वा मात्र शिकतायत पण गणेश नाही याची त्याना टोचणी असावी.

हो निधी, देव-देवस्की. कोकणातील काही भाग, बाकी अदिवासी जग यात याला फार महत्व आहे. खेडेच काय मुम्बईसारख्या ठिकाणी सुद्धा बर्‍याच वेळा याबाबत वाचलेय.

मी गुरव असे टाईप करायला गेले तर क्रोमच्या मेहेरबानीने तिथे गुरगुर टाईपले गेले.>> Lol बरोबर आहे ना. गुरगुरतच असतो की तो.

Rofl

म्या पण म्या पण

रघुनाथ गुरवाचे माकडचाळे
अभिरामाचे गटाणे डोळे
घरात कै चललाहा कोणा न कळे
असा हा रात्रीचा खेळ चाले
धाग्यावर या , मिळुन फुगडी घालु सगळे!!

हंयच्या कोणाच्याय बघण्यात बरोसो नवरो मुलगो असलो तर सुसल्यासाठी दत्ता नाईकाक ताबडतोब सुचवा.
नाईकांच्या घरांत आतां रात्रीच्या खेळांवांगडा 'हाऊसी' चो पण खेळ सुरू होताहा.फुल्यो मारूंक तयार रवा !!

Pages