आपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.
आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443
शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
पात्र परिचय :
माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट
मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?
शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .
आज विशेष
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!
रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न
१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .
(No subject)
रात्रीस खेळ चाले टीम . ओळखा
रात्रीस खेळ चाले टीम . ओळखा बघू
हायला माई बघ....
हायला माई बघ....
हो ना
हो ना
पांडू फुलो इलो फुलो इलो, असे
पांडू फुलो इलो फुलो इलो, असे बडबडत घरात येतो. खाली कोणी दिसत नसल्याने तो वरच्या खोलीच्या सज्जात येतो. तिथे गणेश अभिराम आणि अर्चिस बसलेली असतात. पांडू तिथे येतो हे विचारतात कि काय झाले तर म्हणे कि दत्ताभाऊंनी हाका मारली मग मी खाली आलो, तिकडे कोणी नव्हते म्हणून वर आलो आणि इथे बसलोय. अभिराम विचारतो कि दत्तादादाचा आवाज का आला? तो म्हणे मला काय माहित? अर्चिस वैतागतो व म्हणतो मी बघुन येतो. तेवढ्यात पांडूला आठवते, तो सांगतो कि कपड्यांवर काळ्या फुल्या आल्या आहेत. अर्चिसला काही कळत नाही मग पांडू गणेशला सांगतो कि ह्यांना माहित नाही, गणेश म्हणतो कि कोणीतरी वाईटावर उठले आहे. पांडू तेच परत त्याच्या भाषेत सांगतो कि कोणाचे वाईट होणार असेल तर त्याच्या कपड्यांवर काळ्या फुल्या येतात. कपडे जपुन ठेवा. तो पुढे सांगतो कि ह्या काळ्या फुल्या....गणेश कशाच्या सांगू पाहतो तर पांडू त्याला अडवतो. असे नाव घेऊ नाही म्हणतो. मग अभिराम पुन्हा मुळ प्रश्न विचारतो कि दत्तादादा का ओरडत होता तर पांडू सांगतो कि त्यांच्या कपड्यांवर फुल्या आल्यात. सगळ्याच्या कपड्यांवर आल्या आहेत. आता सगळ्यांचे वाईट होणार. सगळे खाली येतात. अभिराम माईजवळ बसुन विचारतो कि काय झाले. माई काळजीयुक्त स्वरात म्हणतात कि बघ काय होऊन बसलयं, कोणीतरी आपल्या वाईटावर उठलय. तितक्यात निलीमा तरातरा बाहेर जाते. माधव तिला थांबवायचा प्रयत्न करतात. सरिता म्हणते कि त्यांना पटलेलं दिसत नाही. गणेश सांगतो, संकट दारापर्यंत आलय आता घरात येणार, दत्ता त्याला गप्प करतात. सरिता समजावते कि त्याच्यावर डाफरून काही होणार नाही, आता काय करायचे ते बघा. तितक्यात पांडू खाली येतो व परत म्हणतो काहितरी वाईट होणार. दत्ता त्याला हाकलून देतात. माईंना म्हणतात कि गुरवकाका म्हणतात तेच बरोबर होते, ह्या सुसल्यालाच घरातून बाहेर काढले पाहिजे. निलीमा फुल्या मारलेल्या कपड्यांपैकी एक कपडा घेऊन येते. माई घाबर्या होतात व विचारतात कि हे कशाला आणले आहे? तुला माहित आहे ना कि हे वाईट आहे. ती म्हणते ह्या बिब्याने मारलेल्या फुल्या आहेत. सरिता म्हणते त्याचे नाव पण काढू नका. माई म्हणतात कि कोणी कशाला हे करेल? लोकांना कामं नाहीत का? निलीमा म्हणते कि सगळ्यांना कामे आहेत. दत्ताभाऊजी तुम्हाला पण कामे आहेत ना? मग तुम्ही लक्ष देऊ नका,माई म्हणतात कि तुला नाही कळायचे मग निलीमा इरेलाच पेटते कि काय होते ते सांगा. माई सांगतात कि वाईट होते, माणसे मरतात, होत्याचे नव्हते होते. घरातील पैसा अडका जातो. ती म्हणते आधी मला ह्या सगळ्याचा राग यायचा आता हसू येते. ती समजावून सांगण्याचा प्रयत्न करते कि हा पण एक समज आहे (ती मनमोकळं हसते !?!) म्हणते कपड्यांवर फुल्या आल्या म्हणजे कोणीतरी आपले वाईट करते असा का विचार करायचा. जगात इतकी लोकं एकमेकांच्या वाईटावर आहेत मग सगळ्यांच्या कपड्यांवर फुल्या पाहिजेत. ती म्हणते कि हे कोणीतरी मुद्दामुन केले आहे. तुम्ही घाबरलेले आहात तर अजुन घाबरवत आहे. दत्ता आता अजुन चिडतात व निलीमाच्या हातातील शर्ट बाहेर फेकून देतात. ते म्हणतात कि आम्ही खुळी ना? ती म्हणे मला तसे म्हणायचे नव्हते पण तुम्ही पण ह्याचा सखोल विचार करा.
तुम्हालाच त्रास होतोय ना? मग सोडुन द्या. सरिता मधेच बोलते आम्हाला त्रास होतोय ना मग आमचा विचार सोडून द्या. अर्चिस म्हणतो कि काकी खरच असे होते का? त्यावर ती म्हणते कि असचं होते, ह्या गावात हे खुप होते. आता निलीमा खरच चिडते व सांगते की बास करा, तुम्ही इतके प्रामाणिकपणे सांगता आहात कि तो पण विश्वास ठेवेल. ती अर्चिसचा हात धरून त्याला ओढत वर नेते. ती माधवलापण यायचे असेल तर ये म्हणते. माधव त्यांच्यापाठी जातात. सरिता माईंना सांगते कि इथे काय चालले आहे ह्यांची त्यांना काहिच पडलेली नाही. आता बघत रहा काय होते ते. निलीमा आर्चिसला वरती आणते व बजावते कि परत खाली जायचे नाही. तो म्हणतो कि मला उत्सुकता आहे कि हे काय आहे. त्यावर माधव म्हणतात कि असेच होते इथे. निलीमा थांबवते, तुमच्यामुळेे तो पण असाच विचार करायला लागेल. अर्चिस परत सांगतो कि मला उत्सुकता आहे त्यावर निलीमा म्हणते कि कोणीतरी मुद्दाम केलेय, मग आधी कसे असे झाले नाही असे माधव विचारतात. निलीमा म्हणते कि ते शोधुया आपण. तर ते तु शोधणारच आहे असे माधव तिला सांगतात. निलीमा म्हणते कि त्या आधी घरच्यांची विचारसरणी बदलायला पाहिजे मी सरिताशी बोलणार आहे. माधव म्हणतात कि ती ऐकेल का? तर ही म्हणते कि प्रयत्न तर करते. खाली दारात गावातील चार लोक येतात. दत्ता बाहेर येऊन बघतो तर ते विचारपुस करतात कि सगळं ठीक आहे ना? आम्हाला कळल कि कपड्यांवर फुल्या आलाय. त्यातील एकजण म्हणतो कि माझ्या मेव्हण्याला असे झाले होते तो रावाचा रंक झाला, जपा. दत्ता सांगतात कि काळजी करू नका व विचारतात कि तुम्हाला कोणी सांगितले? ते म्हणतात कि पांडू गावभर बडबडत गेला. दत्ता त्यांना काळजी करू नका सांगतो व पांडूला खुप मारतो. सरिता त्याला सोडवते. पांडु खुप रडतो. तेवढ्यात सुसल्या येते व म्हणते आपल ह्या जगात कोणीच नाही म्हणुन हे असे वागत आहेत. मग ती त्याला घेउन जाते. इकडे सरिता दत्तांना समजावते कि पांडू अनाथ आश्रित आहे तो काय बोलतो ते त्याला कळत नाही, जाऊद्या. दत्ता म्हणतात कि मलाच समजत नाही कि काय चालले आहे ते.
मी काही पांडूचा वैरी नाही पण जे चालले आहे ते सहन होत नाही. मग सगळा राग पांडूवर निघतो. मला त्याची अवस्था कळत नाही का? हे सगळे अण्णांनी ऊभे केले. मला म्हणायचे कि माझ्यानंतर हे सगळं तुच बघायचे आहेस. हे सगळं नानांनी आणि अण्णांनी ऊभे केलेले असे जातेय हे आणि मी काहीच करू शकत नाही सहन होत नाही. माईपण दारात ऊभे राहून हे सगळे डोळ्यात पाणी देऊन ऐकत होत्या. सरिता सांगते कि आपण जेवढे सगळे जमते ते करतोय घरासाठी मग वाईट वाटून घेऊ नका. माई दत्तांना जवळ घेतात व समजावतात कि माझा दत्ता असा रडणारा नाही लढणारा आहे वगैरे. निलीमा सरिताला वर बोलावते. ती विचारते कि मला का बोलावले तर ही म्हणते का बैस, तुला खरच वाटतय कि हे सगळे विद्येनी फुल्या आल्याय? त्यावर ती हो म्हणते. आणि माझ्या माहेरी असेच एका व्यक्ती बरोबर झाले आणि त्याच्याकडे पैसा राहू लागला नाही तो सतत आजारी पडायला लागला. दुसरीकडे जाऊन उतरवले तेव्हा ठीक झाले. निलीमा समजावते कि तु त्या फुल्या बघतांना तुझ्या मनात वेगळे विचार चालू होते. आणि त्या दोघांची तु सांगड घालतेय. पुर्वा शास्त्राचा अभ्यास करतेय काय उपयोग तिच्या शिकण्याचा? सरिता सांगते कि आम्ही तिला अभ्यास करू नको असे सांगत नाही , ता हे सगळे बघतेय. सरिता काही ऐकत नाही. ती चहा करू का विचारते तर ही म्हणते कि काम झाले कि येईन मी. मग सरिता खाली येऊन पाणी प्यायला जाते तर तीला दारात तिला निलीमा बसलेली दिसते. सरिता हे बघुन चक्कर येऊन कोसळते.
दत्ता, सुसल्याचे लग्न पांडूशी
दत्ता, सुसल्याचे लग्न पांडूशी लावू शकतात.
भगवती धन्यवाद, मस्त लिहीतेस.
भगवती धन्यवाद, मस्त लिहीतेस. टिम बघुन आनन्द झाला. पण अण्णा अन नाना खय गेले? फोटोत सुदीक दिसुक नाय ते? माई आणी सुसल्या भारी दिसताव!
पांडूशी लग्न लावलं तर सुसल्या
पांडूशी लग्न लावलं तर सुसल्या तिथेच राहील ना... पांडु पण यांच्याकडेच राहतो.
मुळात सुसल्या लग्नाला तयार होईल असे वाटतच नाही... तिचे वागणे बघून.
भाऊ
भाऊ
<< पण अण्णा अन नाना खय गेले?
<< पण अण्णा अन नाना खय गेले? फोटोत सुदीक दिसुक नाय ते? >> फोटूच्या मागे तीन काळे चौकटी दिसतत ? अण्णा, नाना आणि... शेवंता !!!
भगवती.... ....थॅन्क्स.
भगवती....
....थॅन्क्स. कालच्या सामन्यामुळे हा भाग जरी पाहता आला नसला तरी तू घेत असलेला हा मागोवा वाचल्यानंतर त्याची चुटपूट लागून राहिली नाही....इतके सविस्तर लिहिले आहेस.
फोटोतील कलाकार पाहून मस्त वाटले...विशेषतः माई, सुषमा आणि देविका अजिबात ओळखता येत नाहीत.
हायला माई बघा. दत्ता तर
हायला माई बघा.
दत्ता तर रजनीकांतच दिसतोय.
चिंग चॉन्ग देविका पण एकदम पोझ मधे.
कालच्या भागातला शेवटला सीन
कालच्या भागातला शेवटला सीन मस्त जमला. इतक्या दिवसात पहिल्यांदाच दचकायला झालं. सॉलीड जमला होता सीन. त्या ट्विस्ट करताच सगळा भाग जुळवल्या सारखं वाटलं नंतर. गावभर बोभाटा केल्याने दत्ताने पांडुला झापणे, त्यावर सुसल्याने पांडूला 'जिसका कोई नही होता है, सुसल्या है यारो' थाटात सांत्वन करणे, मग दत्ताने रडत बसणे, माई-दत्तीने समजूत काढणे. तेवढ्यात निलिमाने खाली येत, "दत्ता भावजी रडतायत का, अच्छा, अच्छा, टाइम प्लीज हां ... जरा वर चल गं" केल्यागत दत्तीला वर घेऊन जाणे, समजावण्याचा प्रयत्न करुन झाल्यावर, दत्ती खाली येते तेव्हा दत्ताचे रडून झालेले असते आणि तो कामाला गेलेला असतो, माई पण वाती वळायला गेल्या असतील.. आणि मग किचन मधला सीन ! असं सगळं त्या सीनसाठीच गुंफल्या सारखं
हाय्य लोक्स!! भगवती धन्सं फॉर
हाय्य लोक्स!! भगवती धन्सं फॉर अपडेट
अरे वा सगळेच लई भारी ! छाया देविका सुसल्या ट्काट्क! आभिरामाचे सासु सासरे नै आले काय?..हम्म रागातच असतील अजुन!! अणि माई तर अनेक्सपेक्टेड!!
या सगळ्याना चला ह्वा येउ द्या मध्ये बोलवलं पाहीजे ना एकदा?!
गणेश खंयं ???
गणेश खंयं ???
सुजा फोटो मस्त पण सरिता
सुजा फोटो मस्त
पण सरिता कुठेय? मला नाही ओळखता आली ह्यात 
सगळ्यात उजवीकडचा लाल शर्टातला
सगळ्यात उजवीकडचा लाल शर्टातला कोण ? दिग्दर्शक काय ?
सरिता कुठेय>> पोपटी कुर्ता
सरिता कुठेय>> पोपटी कुर्ता सुसल्या के बाजुमे हय ना..
तांच गणेश आसा ना? सरीतान
तांच गणेश आसा ना?
सरीतान पोपटी ड्रेस घातल्यानी मा.
वरच्या रांगेत : माई , निलिमा
वरच्या रांगेत : माई , निलिमा , दत्ता , सरिता , सुसल्या , माधव ,आर्चिस, पूर्वा ,पांडू .
खालच्या रांगेत : नाथा , छाया, अभिराम , देविका ,< माहित नाही >
आणखी एक फोटो
आणखी एक फोटो

सुसल्या अणि अर्चिस च्या मध्ये
सुसल्या अणि अर्चिस च्या मध्ये माधव आहे
सुसल्या अ॑णि देविका ने वनपीस घातलाय नं?
बरच्या रांगेतला माहित नाही
बरच्या रांगेतला माहित नाही >>> तो माधव आहे ना
एडिटलं
एडिटलं
या फोटोत ( दुसर्या ) बाजूला
या फोटोत ( दुसर्या ) बाजूला उभी नीलिमा
आणि वरच्या रांगेत सुसल्या , सरिता ,माधव , नाथा ,पाठीमागे पांडू,दत्ता, माई, पुर्वा आणि गणेश
आणि खाली बसलेले अभिराम , छाया आणि देविका
फोटो भारी आहेत दोन्ही. निलीमा
फोटो भारी आहेत दोन्ही. निलीमा ला हसता येतं हे पाहून संतोष जाहला
नाथाच्या जवळ बल्बसारख्या
नाथाच्या जवळ बल्बसारख्या पिवळ्या उजेडामुळे फोटोपण गुढ वाटतोय.
पहिल्या फोटोत मागे उभे माई,
पहिल्या फोटोत मागे उभे माई, नीलिमा, पाठीमागे दत्ता , सरिता , सुसल्या, माधव , अर्चिस ,पुर्वा आणि पांडू
आणि खाली बसलेले नाथा, छाया ,अभिराम , देविका आणि लाल शर्टवाला ?
दोन्ही फोटोत ती छायाच
दोन्ही फोटोत ती छायाच भुतासारखी दिसतेय
लाल शर्टवाल्याचं कॅरेक्टर
लाल शर्टवाल्याचं कॅरेक्टर यायचं असेल अजून.
Pages