डॉक्टरांचे वाईट अनुभव. पुढच्यास ठेच मागचा शहाणा

Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 02:54

डॉक्टरांचे/ हॉस्पिटल्स्चे वाईट अनुभव इथे लिहुयात. पुढे जाऊन इतरांना फायदा होईल.

ह्या धाग्याचे प्रयोजन, सर्वच डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्याचे नक्कीच नाही, परंतु डॉक्टर हा देव आहे व तो आपले भलेच करेल ह्या (रुग्णाच्या किंवा नातेवाईकांच्या) पारंपारिक, भाबड्या व आंधळ्या श्रद्धेला छेद देणारी अनेक उदाहरणे वरचेवर आजूबाजूला दिसत आहेत. त्यामुळे ह्या व्यवसायातल्या व्यावसायिकांकडून आलेले वाईट अनुभव व धोके इतरांना समजले तर त्यांना अजून जागरुक होता यावे ह्यासाठी हा धागाप्रपंच.

अधिक माहिती - चांगल्या डॉ. चे अनुभव असा दुसरा एक धागा देखिल आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>>म्हणून रुग्ण म्हणून आपण जागरूक रहायला नको का?<<<<<
हो असायला हवे ना.
पण डॉक्टर म्हणून त्यांनी सुद्धा त्यांची जबाबदारी आणि प्रामाणिकपणा दाखवायला हवाच ना.. की डॉक्टरची जबाबदारी नाहीच?

इथे लोकांचे 'बरे वाईट ' अनुभव लिहा असा धागा असताना, तुमचे अनुभव कसे तुमच्याच चुकीनेच आहेत हे अगदी ठासून सांगून त्यांचे प्रतिसाद खोडून काढायचे कारण काय?

आणि जरी दुसर्‍याला मदत करायचीच असेल तर तसे मुद्दे लिहा ना , "स्वतःकडचेच", "स्वतःच्या अनुभवाचेच" की हे करून पहा.

हे एक उदाहरण आहे...
ईंटरनेट उपल्ब्ध असलेल्यांना, किती जणांना अगदी घरात मधूमेहाचे रुग्ण आहेत म्हणून नक्की माहित असते की, इन्सुलिन ज्यास्त झाले की नक्की कशाप्रकाराची रुग्ण प्रतिक्रिया देतो? नक्की काय स्टेप नातेवाईकाने घ्यावी हॉस्पिटलात पोचेपर्यंत?
ईंटरनेट वर अगदी रोज माहिती वाचून काही प्रत्येक रुग्णाचा नातेवाईकला त्या "क्षणाला" समजत नाही, उमजत नाही आणि वेळ लागतो तो वाचिल माहिती उपयोगात आणायला.

हा माझा अनुभव,
माझ्या काकांसाठी त्यादिवशी माझी हॉस्पिटल ड्युटी होती काकांना हृदय विकाराचा झटका आल्याने हॉस्पिटलात होते. डॉक्टर रात्री १ वाजता पान( हो पानच) चघळत यायचा स्वतःच्या दवाखान्याची कामं झाली की.तसेही घरच्यांना सेवा काहीच पसंत न्हवती तिथली.
रात्री एक हि वेळ आहे का? दोन मिनिटे फाईल बघितल्यासारखा करून एक दोन प्र्श्णांची उत्तरे कसेतरी वैतागून द्यायचा. नंतर बिल मध्ये मात्र विजिट चार्जेस १२०० रुपये(स्पेशालिस्ट म्हणून).
डॉक्टरांना नसेल इतकी जबाबदारी झेपत तर नका घेवू अ‍ॅडशनल हॉस्पिटलची कामं. दर वेळी काय आपलं , अहो कॉल होता ईमरजेन्सीचा. बरा असला कॉल तरी काहीच कळत नाही नक्की नातेवाईकाने काय करावं? झोपावं की जागावं?
आता कोणी युक्तीवाद करेल, की ते सुद्धा माणूस आहेत, पोटासाठी करतात ज्यास्तीची ड्युटी. मग करा ना, पण दुसर्‍याला का शिक्षा? इथे तुमच्यावर विश्वास टाकून एक रोगी झुंज देतोय. बरे मध्येच , डिस्चार्ज नाही घेता येत रोग्यामुळे. कारण अर्धे अधिक सोपेस्कार चालले होते त्यांना(काकांना) हार्टअ‍ॅटॅक आल्यावर त्या हॉस्पिटलात, तेव्हा तिथून अचानक रिलीज करून कुठे नेणार अशी शारीरीक परीस्थिती होती काकांची.
एकदा मी हॉस्पिटलाच्या खालील मजल्यावर बिल चेक करायला अकाउंट मध्ये गेलं असताना,
सुबह ओर दुपेरका का खाया नही था हि माहिती असून'ही' असे म्हणत तोच सेम युनिटचा ईन्सुलिन डोस दिला काकांना(नाश्ता नाही केलाय वा जेवलाय रुग्ण तर युनिट तरी कमी करा किंवा पुन्हा थोडं थांबून युनिटची गरज तीच आहे का हे डॉक्टरला कळायला हवे की आम्ही सांगायचे? फोनवरून डॉक्टरंनी नर्सला तरी सांगावे, की वॉच कर. वर डॉक्टर पण म्हणतोय, आहेच तशी त्यांची रक्तातील पातळी ज्यास्त, नाहि खाल्ले तरी काय गरज नाही डोस बदलायची. बरं, नर्स (गधडी ..होच) सांगकाम्या हो नाम्या सारखी काम करून दुसर्‍या वार्डात पशार जी तीन चार वेळा बोलवून, आय यम बीजी वुईथ अथर पेंशट्स म्हणेल?
मी वर (साधारण अर्धा तास बहुधा) येइपर्यंत , ते घाबरेघाबुरे.
आता काय, नातेवाईक चिकटून बसणार का? की डॉ ला वारंवार शोधून पकडत आणणार? बरे नर्स तरी येइल तर बया, एकच रडगाणं गात बसलेली.
शेवटी नर्स हेडला जोरात ओरडाओरड करून बोलावले , मग दुसर्‍या रुग्णाच्या नर्सला. मग डॉक्टर (त्या पाळीचे, स्पेशालिस्टने फोनच नाही उचलला) वगैरे आले आणि कमी झालेली रक्ताची पातळी हे निदान होते.
मला अंदाज आलाच होता यांची लक्षणे बघून कारण हे आधीही झाले होते घरच्या नर्सने गोंधळ घातल्याने. मी मागचा पुढचा विचार न करता स्वतःच्या पर्समधली साखरेच सॅचेट काढणारच होते. म्हटले, हेच जर कारण असेल तर मग बघू. पण खूपच पातळी खाली गेली आणि शॉक मध्ये गेले तर अश्या भितीने आधी नर्सला शोधायला पळाले स्वतः शहानिशा करत बसण्यापेक्षा.

आम्ही हॉस्पिटलच्या अ‍ॅडमिनला चांगले ठोकलेच. नंतर आम्ही नर्सेसना पण दमटावून वेळेत कामे करून घ्यायचो. जोवर काका स्टेबल होत न्हवते तेव्हा सर्वांना अगदी ड्युटी होती.
आधी आम्ही आमचा पेंशट आहे, म्हणून प्रेमाने, अदबीने नर्सेसशी/डॉक्टरशी वागायचो. पण ह्या प्रसंगाने आम्ही सावध होतो. एकदंर ताब्य घेवून सगळी कामे करून घ्यावी लागत. अगदी संडास साफ करायला पण अर्धा तास लावणारे पंधरा मिनिटात येत. हि त्या वार्ड्बॉय मामाची चूक नसली तरी, भरमसाठ पैसे हॉस्पिटल उकळून , एक दोनच मामा अख्य्ख्या मजलयाला.

काका नशीबाने वाचले. हार्टअ‍ॅटॅक ने गेले नसते तरी ह्या प्रकाराने निश्चितच.

ह्या अनुभवाने, आम्ही काय केले मग,
१) रोज नर्स कडून फाईल घेवून रोजचे नंबर (साखरेचे प्रमाण) बघणे. युनिटचे प्रमाणावर डॉक शी स्वतःच बोलणे. नर्से बोलली असली तरी... काकांनी खाल्ले नाही मग काय करावे.
२) ज्या काही ब्लड टेस्ट्स केल्या त्याचे रीपोर्ट्स फाईल केलेत की नाही बघणे.
३) चूकून सांगून लावलेली रोजचे चार्जेस चेक करणे(असे बरेच चूकून चार्जेस असतात हो डॉ विझिट्स्चे, औषधांचे, सामानाचे) Wink
४) रोजची औषधे नर्सेस गायब करत. वोह अबी बाजूवाले पेशंटस को एक गोली देता है , बाद मे रेप्लेस करेगा. प्रोटीन डब्बे गायब. काका तर खात नाहीत प्रोटीन वासाने मग गेले कुठे डब्बे? रोजची तीच तीच औषधे एक दिवसाआड गायब.
सगळा अंदाधुंदीचा कारभार. नर्से ते डॉ ते अ‍ॅडमिन असे नमुनेदार हॉस्पिटल.
आमची केस जरा फेमस झाली होती , हॉस्पिटल अ‍ॅडमिनशी नंतर आमचे बरेच वाजले असल्याने इथे नाव टाळलेय . Happy

दुसरा किस्सा,

कोणाला काय करावे कळते ईंटरनेट वाचून? पेन्किलरचा डोस किती कमी करावा हॉस्पिटलात गाडी पोचेवर, काय करावे , कोणत्या नेमक्या डॉक्टरला बोलवावे हि मनस्थितीही नसते.

पण परत टेस्ट करुया पुन्हा खात्री करायला ह्यावर काय बोलावे? किंवा आताच ऑपेरेशन करा कॅन्सर आहे. आणि मग कळावे की, मॅमोग्राफीचे सॅम्पल रीपोर्ट दुसर्‍या कोणाचा होता हे एकून काय करावे? पैसा हि नसतो कोर्ट केसेस करायला. मानसिक स्थिती तर त्याहूनही नाही.

काही डॉक्टर अगदी एक आठवड्या आधीचे पण दुसर्‍या डॉक्टरांनी सांगितलेले, त्याच सेम टेस्टचे रीपोर्ट्स घेत नाहीत. परत त्या टेस्ट्स सांगतात. काय कारण तर आम्ही आमच्या मशिनीनेच काढलेले रीपोर्टस अभ्यासतो. Sad
------------------------------------------------------------
तर शेवटी विश्वास हाच ह्या सेवेचा पाया आहे. एक विश्वास असतो की आपण आलोत ते ठिकाण योग्य आहे आणि आपल्याला सेवा वेळीच आणि योग्य मिळेल. हॄदय विकाराचा झटका आला की लांब हॉस्पिटलात पळत नाही ना? जे काहि जवळ आहे तिथेच जाणार ना? की थांबा आधी मी इंटरनेटवर माहिती शोधतो आणि नेतो. Wink

ज्या काहि मानसिक अवस्थेतून नातेवाईक जातात हे तोच माणूस त्यावेळी सांगू शकतो हि काय अवस्था असते.

चिनुक्स, अतिशय असहमत.
झालेल्या नुकसानाला फक्त डॉक्टर जबाबदार नाही. पेशंटची जबाबदारी अधिक आहे.>>>हे अतिशय बेजबाबदार विधान आहे.

बंगलोरमधे CMH रोडवर अमरज्योती हॉस्पिटल्मधल्या जनरल फिजिशियन चा चांगला अनुभव आला नाही. नांव सुद्धा लक्षात ठेवायची तसदी घेतलेली नाही. माझ्या स्त्रीरोग तज्ञ डॉकनी सांगितले की ती मणिपालमध्ये पण बसत असली तरी रुटीन चेकपसाठी तिथे भेटायला येऊ नका. आम्हांला तिथे उपलब्ध असलेल्या सोयी रेफर करायचे टार्गेट्स असतात. मणिपालमध्ये हॉस्पिटलायझेशन ची गरज असेल तर सर्वोत्तम आहे. परंतु, माझ्या एका नातेवाईकाला मणिपालचा पण वाईट अनुभव आलेला आहे. तिची साडेसहा महिन्यांत प्रिमॅच्युअर डिलिव्हरी झाली. बाळाला अर्थात NICU मधे ठेवले होते. डिलिव्हरीनंतर तीन दिवसांनी आईबरोबर बाळाला घेऊन घरी जा असे सांगितले. ऑलरेडि, बाळाचे मेंदूत रक्त्स्त्रावची complication सुरूच होती, रोज वेगवेगळ्या स्टेज. घरांतली इतर मोठे मण्डळी विचारायला / भांडायला गेली की बाळ NICU मधे आहे. तरी कसे तुम्ही घरी घेऊन जा सांगता? घरांत प्रिमॅच्युअर बेबी सांभाळायची काय सोय असणार? पेपरवर लिहून द्या की बाळ घरी घेऊन जायला योग्य परिस्थितीत आहे. डॉक्टरने सरळ हात वर केले की मी असे काही म्हणालोच नव्ह्तो. पुढे जे व्हायचे होते ते झालेच पण जर त्यावेळेस घरांतल्या मोठ्या माणसांनी सारासार विचार केला नसता. तर कदाचित आई-वडिलांवर पोलिसकेस होउ शकली असती, इतर सर्टिफिकेट्स फक्त attending physician देऊ शकतो. ती मिळायला कदाचित पोलिस चॅनेल थ्रू जावे लागले असते आणि किती त्रास झाला असता?

वर उल्लेख केलेल्या स्त्रीरोग तज्ञ आईच्या डॉक होत्या. पण ह्या प्रकारानंतर आई काही परत त्या डॉक कडे जात नाही का तिचा नाव सुद्धा काढत नाही. त्यामुळे गायनॅकचा काहीच संबंध नसताना, त्या गायनॅक्बद्द्ल एक unfavourable opinion आहे.

खरं तर डॉक्टरांचे नुसते अनुभव लिहिण्याने इतरांना काहीही फायदा होणार नाही. डॉ. च्या नावासकट अनुभव लिहिले तरच काही अर्थ आहे अन्यथा इतरांना समजणार कसे? डॉक्टरकी हा बिजनेसच झालाय मग नावासकट रिव्ह्यु लिहायला हरकत का असावी?

कपोचे सहमत... कितीही योग्य वाटत असले तरी बहुतेक वेळा डॉक्टर यान्चे सर्टिफिकेट बघणे ऋग्णास किव्वा त्याच्या नातेवाईकान्ना शक्य नसते, तसे करणे प्रॅक्टिकल नाही वाटत. सर्टिफिकेट भिन्तीवर टान्गलेले असेल तरी सर्व लोक वाचतही नसतील.

किती व्यावसायात आपण समोरच्या व्यक्तीचे सर्टिफिकेट (किव्वा परवाना) बघतो. विना परवाना ते असे महत्वाचे काम करुच शकत नाही असा ठाम (अन्ध)विश्वास असतो.

झालेल्या नुकसानाला फक्त डॉक्टर जबाबदार नाही. पेशंटची जबाबदारी अधिक आहे. >>>> चिनुक्सच्या ह्या विधानाला असहमत.

डॉक्टरनी योग्य ट्रीटमेंट दिली की नाही ही पेशंटची जबाबदारी कशी होऊ शकते? डॉक्टरनी त्यांचे काम जबाबदारीनी पार पाडले की पेशंटची जबाबदारी सुरु होते. जशी की औषधे आणणे, वेळेवर घेणे, पथ्य पाळणे इ.

एवढीशी कळ आली की पेशंट डॉ. च्या दारात लगेच जात नाही. काही वेळा घरगुती उपाय वगैरे करुनही बरं वाटंत नसेल तर डॉ.कडे जातात.थोडक्यात काही दिवस वेदना/दु:ख सहन करत असणार्‍या माणसाची मानसिक अवस्था डॉचे सर्टीफिकेट बघण्याची कशी असू शकेल?

खरं तर डॉक्टरांचे नुसते अनुभव लिहिण्याने इतरांना काहीही फायदा होणार नाही. डॉ. च्या नावासकट अनुभव लिहिले तरच काही अर्थ आहे अन्यथा इतरांना समजणार कसे \\>> कोन म्ह्न्तय नाव लिहु नका ?आणि का ?

माझ्या नवर्‍याला अपघातात पायाला कॉम्प्रेस्ड फ्रॅक्चर झाले होते. माझ्या नेहेमीच्या ऑर्थोनी शस्त्रक्रिया सांगितली. सेकंड ओपिनियन घेतले असता शस्त्रक्रिया करण्याबद्दलच सांगितले गेले. नवर्‍याला म्हटलं की असं असं दोन्ही डॉ.म्हणत आहेत तर शस्त्रक्रिया करु या.त्यावर तो म्हणाला'तुला काय,पाय माझा आहे". एक क्षण वाईट वाटलं ,पण त्याचं बरोबर होते.तो त्यासाठी तयार नव्हता.
माझे एक नातलग डॉक्टर याविरुद्ध होते.त्यांनी मला सांगितले की जेव्हा ऑर्थोकडे जाशील तेव्हा मला फोन कर.
तेव्हा पहिल्या ऑर्थोकडे परत गेलो असता त्यांना सांगितले की नवरा ऑपरेशनसाठी तयार नाही.तेव्हा ते(प.ऑ.) म्हणाले की नाही ,ते ऑपरेशन करावं लागेल्,नाहीतर आणि ४-५ वर्षांत चालणे कठीण होईल.तेव्हा माझ्या नातलग डॉक्टरांशी तुम्ही याबाबत बोलाल का असं विचारल्यावर फोनवर दोघांचे बोलणे झाले.त्यानंतर ठीक आहे तुम्ही नाही ऑपरेशन करणार तर नका करु,मी तुम्हांला पुढच्या दृष्टीने सांगत होतो म्हणून सांगितले.
त्यावेळी ऑपरेशन टळले.नी कॅप्स आणि व्यायाम चालू ठेवले. वर्षात नवरा चांगला चालू लागला.बाईक फिरवायला लागला. ५-६ वर्षे.त्यागोष्टीला झाली. वाईट याचेच वाटते की ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो,त्याच्यालेखी आपण फक्त एक पैशाचा स्रोत असतो का? पेशंटचा पैसा,त्याहीपेक्षा ऑपरेशनच्या/नंतरच्या वेदना याबाबत काहीच विचार केला जात नाही.
याघटनेनंतर मात्र एक झाले ,ते डॉक्टर माझ्याकडून चेकिंगसाठी ५००/-घ्यायचे ते १०००/- घेऊ लागले. Wink

मी आधीही अनेकदा स्पष्ट शब्दात लिहिलं होतं परत लिहितो.
डॉक्टरना शिव्या घाला, त्यांची बदनामी करा, त्यांच्यावर केस करा, कोर्टात भांडा, त्यांचं लायसन्स रद्द करण्यासाठी प्रयत्न करा. सर्व प्रकारे निषेध व्यक्त करा. रादर हा चांगला धागा आहे आणि नावासकट माहिती वाचयला आवडेल हे ही मी पहिल्या प्रतिसादात लिहिलं आहे.
पण... इतक्यावर थांबू नका. हा अनुभव येण्यात डॉक्टरचा दोष आहे. मान्यच. पुढच्यावेळी हाच अनुभव येऊ नये म्हणून तुम्हाला काही प्रयत्न करणे शक्य असेल तर ते नक्की करा. ते तुमच्या हातात आहे, आणि ते प्रयत्न सकारात्मक फायदा करतील. पुढच्यास ठेच मागचा शहाणा फक्त त्या विशिष्ट डॉ कडे न गेल्याने होणार नाही तर पुढच्याच्या अनुभवातून (त्या व्यक्तीकडे जायचं नाही या व्यतिरिक्त) काही सकारात्मक शिकायला मिळालं तर इट विल टेक ए लॉंग वे. अन्यथा परत तोच अनुभव दुसरीकडे आला तर फक्त कडवटपणा वाढेल. त्या सिस्टीमवर जरब बसायला हवी असेल तर बदमानी करून थांबलात तर फार साध्य होणार नाही. होप आता तरी क्लियर झालं असावं.

माझ्या अनुभवांमधे अमरज्योतीचा अनुभव खूपच जुना आणि बंगलोरमधे पहिलाच होता. परत कधिही तिथे गेले नाही. मणिपालच्या पेडीचा अनुभवांत मी third party होते, त्यामुळे डॉकचे नांव माहित नाही. मला असे वाटते की खूपदा मोठ्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल अ‍ॅड्मिनिस्ट्रेशन जास्त जबाबदार असते, प्रायव्हेट प्रक्टिसमधे डॉक जबाबदार.

वरच्याच अनुभवानुसार एकाच डॉकबद्द्ल वेगवेगळी मतं असू शकतात, त्या डॉकचा अर्थोअर्थी काहिही संबंध नसला तरी. एखाद्या डॉक्टरबद्द्ल इथे caution-note ठेऊ शकतो. पण सरसकट अमुक एक डॉक वाईटच असे छातीठोकपणे कसे काय म्हणू शकू? शेवटी दोघंही माणसंच आहेत आणि interpersonal relationship, हाताचा गुण इ, विचार व्हायला हवा.

मुळात डॉक्टराना काही प्रश्न विचारले की त्यांचा इगो दुखावला जातो. पेशंटला काय कळते हा डॉक्टरची धारणा असतेच असते. ( अर्थात ही कोणत्याही तांत्रिक विषयत्तील तज्ञाची असते.) काही 'नीम हकीम "पेशंट त्यातून डोक्टरचे ज्ञान जोखायचा प्रयत्न करतात त्याचाही डॉक्टराना राग येणे स्वाभाविक आहे.
जवळ जवळ सर्वच हॉस्पिटलस्मध्ये पॅरामेडिकल स्टाफ आणि सपोर्ट स्टाफ अत्यंन्त कामचुकार असतो. दीनानाथ्मध्ये पार्किंगशी संबंधित स्टाफ अत्यन्त कार्यक्षम आहे त्याने समाधान वाटते. काऊण्टर वरच्या मुली ना आपापसात विनोद करण्याचे वेतन दिले जाते. हेही बरे आहे. आता त्यांच्या गप्पा संपेपर्यन्त थोडे थांबावे लागते तर ते असो. दीनानाथ मध्ये नर्सेसना शोधण्यात पेशंतच्या नातेवाईकांचा वेळ बरा जातो.

माझीही खरड बदलली,बेफिकिर.
मी मध्येच वाचन केल्याने तसे झाले.शिवाय माबोवर आपली प्रतिक्रिया योग्यठिकाणी त्याखाली उमटवता येते का?शेवटी लटकते.

खरं तर डॉक्टरांचे नुसते अनुभव लिहिण्याने इतरांना काहीही फायदा होणार नाही. डॉ. च्या नावासकट अनुभव लिहिले तरच काही अर्थ आहे अन्यथा इतरांना समजणार कसे? डॉक्टरकी हा बिजनेसच झालाय मग नावासकट रिव्ह्यु लिहायला हरकत का असावी?>>> ++++१०००००००००००००००००००००००००००००००

झालेल्या नुकसानाला फक्त डॉक्टर जबाबदार नाही. पेशंटची जबाबदारी अधिक आहे. >>>> भोपळा विळ्यावर पडुदे अथवा विळा भोपळ्यावर, विळा थोडाच कापला जाणार आहे? चिनुक्सच्या विधानाचा कदाचित असा अर्थ होत असेल.

बाकि डॉ. नी पुर्ण समाधान केल्याशिवाय त्यांची ट्रीटमेंट घेणे मला पटत नाही, आणि घेउही नाही असे स्पष्ट मत आहे.
पण वर बर्‍याच लोकांनी लिहल्याप्रमाणे अशिक्षित लोकांची फार फरफट होते. पण ती काय फक्त याच क्षेत्रात होते असे नाही, सगळीकडेच होते.

लोकांच्या काही भ्रामक समजुती.

ज्या डॉ. फी जास्त तो डॉ. चांगला व हुशार..
ज्याच्या कडे गर्दि जास्त तो पण चांगला.
महिना-महिना आधी appointment घावे लागनारे जास्तच चांगले.
चका-चक चमकनारे डेकोरेशन केलेले हॉस्पिटल चांगले

अजुन सुचले की सांगते.

दुर्दैवाने एका अनुभवामधे सर्टिफिकेट पाहीलं नाही यावरच जास्त काथ्याकूट झालेला आहे. जिथे प्रमाणपत्रं होती, डॉक्टर नामांकित होते त्यांनी केलेल्या रॅकेटबद्दलचे, पैसे उकळण्याचे अनुभव दिले आहेत, तसेच इतरांचेही अनुभव आहेत. पण धाग्यामधे त्याच एका गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रीत केले गेले आहे. अर्थात, त्याबद्दलही मतभेद असणारच. साधा एसटीचा ड्रायव्हर सुद्धा चुकीचा मनुष्य नसणार हा लोकांचा विश्वास असतो अशी यंत्रणा आहे. विमानातल्या पायलटचं प्रमाणपत्रं प्रवाशांना पहायची आवश्यकता पडणार नाही अशी यंत्रणा आहे ती लाईफशीसंबंधित प्रोफेशन मधे नाही. लॉटरी विकणारा, रस्त्यावर चपला बूट दुरूस्त करणारा आणि हा व्यवसाय एकसारखेच आहेत हे मान्य होत असेल तर मग पेशंटच जबाबदार हे मान्य करायला काहीही हरकत नाही.

अजुन एक अति बेसिक प्रश्न मला पडलेला आहे तो म्हणजे,

आता इथे पुण्यातली जास्त उदाहरणे आहेत, पण प्रत्येक गावागावात बरीच आहेत. मग आमचे गाव कसे अपवाद असणार,
आक्खे गाव ज्यांच्या नावाने शिमगा करते ( तो कापतो म्हणुन) त्याच्याच दुकानात पाय ठेवायला जागा नसते. अगदी मागच्या आजारपणात त्याने कसे कापले, किती जास्त पैसे खर्च झाले, दुसरीकडे गेलो असतो तर बरे झाले असते असे म्हणणारे परत परत त्याच दुकानात जातात. अशी कुप्रसिद्धी होउन सुद्धा यांच्या धंद्यावर कसलाही परिणाम झालेला नाहीय, उलट गर्दी वाढतच आहे.
काय कारण असावे बरे?
१) लोकांना दुसरा ऑप्शन नसावा?
२) अ‍ॅट लिस्ट मागच्या खेपेला बरा होउन गेलो होतो (भले पैसे जास्त जाइनात)
३) परत दुसरा डॉ. घेउन रिस्क कशाला घ्या .
४) कि आणखी काही?

आज इथे पब्लिक फोरम वर जरी नाव गाव पत्यानीशी अनुभव शेअर केले तरी त्यांच्या धंद्यावर काही परिणाम होइल असे वाटत नाही. जाणारे जातच राहतात. का जातात हाच बेसिक प्रश्न मला पडला आहे. किती जणांचे दुकान अश्या माउथ पब्लिसिटी मुळे बंद झालेत / कमी चालतात?

खुप इन्व्हेस्टमेट केलेली अस्ते, तसेच ती वाया जाउ नये अशी पण व्यवस्था केलेली असते.

पुण्याजवळ भोसरी येथील डॉक्टरांचा अतिशय वाईट अनुभव आहे.
तिथल्या गल्लीबोळात किराणामालाच्या दुकाना प्रमाणे क्लिनिक आहेत. एका मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटल मधे तर स्त्रीभृण गर्भपात होत असल्याच्या केसेस प्रत्यक्ष बघितल्या. तसेच त्या हॉस्पिटल वर कारवाई झाल्याचे सुद्धा पाहिले आहे.

त्यातल्याच एक डॉ. मंगुडकर यांचे प्रसुती ग्रूह,
मंकिकर यांचा लहान मुलांचा अतिदक्षता विभाग.
फार बेक्कार.

माझ्या मुलाच्या बाबतीत खुप वाईट अनुभव घेतला. घरातल्या लोकांनी वेळेवर निर्णय घेतल्याने त्याला तत्काळ पुण्यात केईएम मधे हलवले. नाहितर ....

पुर्ण केस तपशीलवार लिहेन नंतर कधितरी.

अवांतरः

वरच्या एका प्रतिसादात हे वाचलं :

>>
तुम्ही विमानप्रवासाला निघताना, बसमधे चढताना ड्रायव्हर कडे किमान कौशल्य असेल असा विश्वास असणारी यंत्रणा जशी आहे तशी लाईफशी संबंधित या व्यवसायात नसावी याबद्दल या क्षेत्रातल्या लोकांची काहीच जबाबदारी नसावी आणि तरीही नोबल प्रोफेशन म्हणायचं.
<<

बस ड्रायव्हरकडे किमान कौशल्य असेल असा विश्वास असणारी यंत्रणा आहे? कुठे व कोणती?

*

अवांतर २:

मी काका हलवाईच्या दुकानात जाऊन चितळेंच्या बाकरवड्या मागणार. पाटी वाचायची जबाबदारी माझी नाही. हलवायाचं दुकान आहे ना? मग हे मिळायलाच पाहिजे. मला समजत नसलं म्हणून काय झालं? मी घरच्याघरी बाकरवडि शोधायचा प्रयत्न करून थकलोय. ऐनवेळी घाबरलोय. तेव्हा मी दुकानात पोहोचल्याबरोब्बर मला जे पाहिजे ते द्यायची जबाबदारी त्यांची. अगदी मी बाकरवडी मागत असलो, अन मला खरं तर पोटभर जेवायची गरज आहे हे धडधडीत दिसत असले, तरी मला बाकरवडी दिलीच पाहिजे, व मी न जेवल्याने होणार्‍या वाईट परिणामांची जबाबदारीही त्यांनीच घेतली पाहिजे.

कोणत्याही क्षेत्रात चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रवृत्ती असणारच असे अमितव यांनी त्यांच्या स्वतःच्याच प्रतिसादात स्पष्ट मान्य केले आहे आणि आपल्याकडुनही मान्य करुन घेतले आहे.

तरी अमितव व ईतर यांचा असा दावा आहे की रामगढवालो को गब्बर लुटता है, उनपर अत्याचार करता है तो ये सिर्फ और सिर्फ रामगढवालो का दोष है! गब्बर ला गावात आश्रय देण्याआगोदर त्याचे पोलिस व्हेरीफिकेशन करुन घ्यायला पाहिजे होते, शेजारील गावातील डाकुंकडुन सेकंड ओपिनियन घ्यायला पाहिजे होते व असे न केल्यामुले भो.आ.क.फ रामगढवाल्यांनो!

नुसते असे म्हणुन हे थांबत नाही आहेत तर माबोवरील आणखी कुणी सदस्य, त्यांचे डॉक्टरांबद्दलचे वाईट "अनुभव" (मत नव्हे!) इथे येउन लिहिण्याआधीच "हायला, आपलेच तर काही चुकले नव्हते ना!" असा विचार करुन अपराधी भावनेने किंवा न्युनगंडाने, अतिशय महत्वपुर्ण असलेली माहिती इथे इतर सदस्यांसोबत शेअर करण्यापासुन हमखास परावृत्त होतील अशा पद्धतीने प्रबळ प्रतिसाद करणे चालु आहे. त्यात ते यशस्वीही होताना दिसत आहेत.

अमितव व ईतर हे त्यांच्या आयुष्यत कधीच कोणाकडुनही फसवले / लुबाडले गेलेले नाहीत. एवढेच काय अगदी लहाणपणी त्यांचे मित्र भिंतीआड लपुन मग अचानक (आमोरा) समोर येऊन त्यांना घाबरवुही शकलेले नाहीत, इतके हे सगळे १००% २४ * ७ * ३६५ * आजपर्यंतची वर्षे अलर्ट असतात. मिलीटरी प्रमाणे.
त्यामुळेच "स्वतःच्या व अतिशय जीवाभावाच्या अप्तेष्टांच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या व्यवसायाबाबत - त्यातील ग्राहकांकडुन" हे अलर्ट आणि माहितीने अद्ययावत राहअण्याची अपेक्षा करत आहेत.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ज्या प्रमाणे आपण एखाद्या समोर, शारीरीक ताकदीने / पैशाने कमजोर असतो म्हणुन आपल्यावर अन्याय होऊ शकतो व त्याने केलेल्या अन्यायाविरुद्ध आपण लढु शकत नाही,
अगदी त्याप्रमाणेच अनेक वेळेला आपण "परिपुर्ण माहितीचा अभाव" या मुद्यावर ही एखाद्यासमोर कमजोर असु शकतो आणि म्हणुनच फसवले / लुबाडले जाउ शकतो - आपल्यावर अन्याय होऊ शकतो हे मान्य करण्यात एवढ्या अडचणी का येत आहेत?
इतर अनेक सामान्य बाबींप्रमाणेच ही सुद्धा एक सामान्य बाब नाही का?
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अमितव व इतर,
१) आपल्यावर एखाद्या कडुन अन्याय झाला त्याचे अनुभव शेअर करावेसे वाटणे, असे करुन इतरांना सावध करणे
आणि,
२) आता झाले ते झाले या पुढे आपण व आपल्या अनुभवातुन इतरजन काय खबरदारी घेऊ शकतो?

हे दोन वेगळे मुद्दे आहेत असे आपणास वाटत नाही का? पहिल्या मुद्द्यात कोणी निव्वळ भावनांना वाट करुन देण्यासाठी / दु:ख / वेदनांना वाट करुन देण्यासाठी त्यांचे अनुभव शेअर करत असतील तर तुम्ही त्यात मुद्द क्र. २ आणुन त्याला आणि त्याच्यासारख्या इतरांना परावृत्त का करत आहता?
मुद्दा क्र. २ साठी तुम्ही वेगळा स्वतंत्र धागा का नाही काढत?
इथे कोणालाही कोणत्याही ऑकवर्ड / आपलेच चुकले जाऊदे, अश्या गिल्ट भावनांशिवाय अनुभव शेअर करु देत की?
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
गब्बरशी, तुलना करण्याबाबत -> तो शुरु किसने किया? Proud
एका शुल्लक चुकीमुळे कायमचे अपंगत्व / मृत्य येऊ शकतो अशा व्यवसायाची तुलना निर्जीव संगणकाची आज्ञावली लिहीण्याच्या व्यवसायाशी करण्यासारखे अनेक मनोरंजनात्मक खेळ इथे चालु असल्यामुळे मी ही अशी तुलना गब्बरशी केलेली आहे.
यात "सरसकट सगळ्या डॉ.ची" तुलना त्याच्याशी केलेली नसुन, या व्यवसायातील जे "काही" वाईट प्रवृत्ती असलेले थोडे डॉ. आहेत त्यांचीच केली आहे.

वरच्या प्रतिसादातील बस ड्रायव्हर = सरकारी एस्टीबस वाला = ससूनमधला डॉक्टर.
मी चकाचक एयरकंडीशन्ड व्होल्व्हो गाड्यांच्या डायवरसायबांबद्दल बोलतोय.

बस ड्रायव्हरकडे किमान कौशल्य असेल असा विश्वास असणारी यंत्रणा आहे? कुठे व कोणती? >>> बस ड्रायव्हर कामाला ठेवणारी संस्था अपघाताला जबाबदार असते. त्यांच्याविरुद्ध न्याय मागता येतो. अपघात झाल्यास ड्रायव्हरचे प्रमाणपत्र पाहीले नाही म्हणून मयतच जबाबदार असं ऑर्गुमेंट होण्याची शक्यता शून्य असते. तेच पायलटबाबत. जर अपघात झाला आणि पायलट अर्हताधारक नाही असे सिद्ध झाले तर ती विमानकंपनी बंद करावी लागेल.

मी असंही म्हटलेलं आहे की अनेक हॉस्पिटलमधे योग्य अर्हताधारक नसलेले असिस्टंट डॉक्टर्स असतात. या सर्वांची प्रमाणपत्रं पेशंट्सने पाहणे अपेक्षित आहे का ? आळंदी रस्त्यावर विश्रांतवाडी इथे शेटिया हॉस्पिटल आहे. २००५ साली यांच्याकडे होमिओपॅथी डॉक्टर्स होते रेसिडेंट म्हणून. फक्त पाचशे रूपये पगार.

आणखी एक हॉस्पिटल आहे. त्यांचा अनुभव चांगला असल्याने नाव देत नाही. पण त्यांची सर्वात जुनी रेसिडेन्ट डॉक्टर हॉस्पिटल सांभाळते. हॉस्पिटल डॉक्टरांच्या नावाने चालतं. पण ही डॉक्टर आयुर्वेदीक आहे असं नुकतंच कळालं. या प्रोफेशन मधले लोक आम्हाला कायदे नकोत म्हणत असतात. मग हे गैरप्रकार थांबवण्याची जबाबदारी घेणारी यंत्रणा त्यांची त्यांनी नको का उभारायला ?

निपा
इथे कुणीही भली मोठी रांग असेल तोच डॉक्टर चांगला असा क्लेम केलेला नाही. लोक रेफरन्स घेऊन जातात. बी यांच्या धाग्यावरही लोकांनी रेफरन्सेस्च दिलेले आहेत. मनस्मी १८ यांचा असाच एक धागा होता. तिथे या अनुभवातून शहाणा होऊन तुमच्या नेहमिच्या जनरल प्रॅक्टीशनरना विचारा ते सांगतील असा प्रतिसाद दिलेला आहे.

स्पॉक,

तुमच्या लांबलचक प्रतिसादातला एकमेव मुद्दा समजला.

वरच्या प्रतिसादांपैकी किती ठिकाणी

१. स्वतःचं(ही) काय चुकलं असावं, ज्यामुळे ही फसवले गेल्याची परिस्थीती आली असावी?

२. अशा प्रकारच्या चुकीच्या वागणुकीबद्दल : उदा. नर्सने खोटी शुगर लिहिणे, औषधे गायब करणे इ. नक्की काय इलाज करता येईल? त्याबद्दल योग्य रिड्रेसल फोरम कोणती? तक्रार कशी करावी, व काय रिझल्ट्सची अपेक्षा ठेवावी?

या बाबींबद्दल माहिती आली आहे?

***

माझ्या पाहण्यातल्या ९९.९९% डॉ-पेशंट भांडणाच्या घटना फक्त कम्युनिकेशन गॅपमुळे, रफ बोलण्यामुळे घडलेल्या आहेत. ०.०१% वेळा अ‍ॅक्चुअल निग्लिजन्स असतो.

निग्लिजन्ट डॉक्टरला, योग्य स्किल नसताना प्रॅक्टिस करणार्‍याना, वैद्यक व्यवसायाचे रूपांतर 'हेल्थकेअर इंडस्ट्री'त करणार्‍यांना व त्या इंडस्ट्रीला मार्केटिंगचे, माल 'खपवण्याचे' एम्बीए फंडे लावून नासवणार्‍यांना चाप बसलाच पाहिजे.

यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमचे अ‍ॅलोपॅथ डॉक्टरच आपली मेडीकल काउन्सिल आपल्यालाच चाप लावते. आयुर्वेद होमिओवाल्यांची काउन्सिल पहा, कशी त्यांना मालप्रॅक्टिस करू देते, अशी चिडचिड करतान आढळतात. त्याबद्दल नंतर केव्हातरी.

-*-

धाग्यात नावे लिहून डॉक्टरांबद्दल लिहिताना कृपया त्या डॉक्टरची डिग्री, व पॅथी याबद्दलही लिहा.

हॉस्पीटल स्टाफमुळे आलेल्या वाईट अनुभवाला त्या स्टाफलाच जबाबदार धरा.

या अनुभवावर आपण काय इलाज केलात तेही लिहा,

अशी विनंती करतो.

दीड मायबोलीकर

मी जे कमिशन बद्दल लिहीलेले आहे त्याकडे तुमचे दुर्लक्ष झालेले आहे का ? यात पेशंटची चूक कशी हे समजून घेणे आवडेल. की कमिशन नावाचा प्रकारच नसतो ?

मागच्या वेळेला तुम्ही माझा प्रतिसाद कोट करताना त्याचा अर्थाचा अनर्थ होईल अशा पद्धतीने कोट करून गहीवर आला वगैरे विधाने केल्याने तुमचा समाचार घ्यावा लागला. तुम्हीच पुन्हा पहा केव्हढा अनर्थ झालेला आहे. असं करण्याची आवश्यकता काय होती हे ही समजावून सांगा कृपया. असं केल्यानंतर का चिडू नये हे ही.

नक्कीच असतो कापोचे,

अन अशा कमिशन मागणार्‍या जिपड्यांचं मी काय करतो ते मिपावर लिहिलंय, ते तुम्ही वाचलं असेलच.

पण तुम्हाला एक गम्मत सांगू का? अशी कमिशन्स कॉर्पोरेट हॉस्पिटल्स चेकने देतात. ऑफिशियली 'रेफरल चार्जेस' म्हणून. हे कायदेशीर आहे म्हणे चक्क. होलसेलरने रिटेलरला कमिशन द्यावे तसे Happy

"इंडस्ट्री" बनवून नासवणार्‍यांचं लिहिलंय वर. पाहिलंत का?

>>दीनानाथ मध्ये नर्सेसना शोधण्यात पेशंतच्या नातेवाईकांचा वेळ बरा जातो.<<

तुम्हाला "नातेवाईकांचा बराच वेळ जातो" असं म्हणायचंय का? Proud

Pages