Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 02:54
डॉक्टरांचे/ हॉस्पिटल्स्चे वाईट अनुभव इथे लिहुयात. पुढे जाऊन इतरांना फायदा होईल.
ह्या धाग्याचे प्रयोजन, सर्वच डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्याचे नक्कीच नाही, परंतु डॉक्टर हा देव आहे व तो आपले भलेच करेल ह्या (रुग्णाच्या किंवा नातेवाईकांच्या) पारंपारिक, भाबड्या व आंधळ्या श्रद्धेला छेद देणारी अनेक उदाहरणे वरचेवर आजूबाजूला दिसत आहेत. त्यामुळे ह्या व्यवसायातल्या व्यावसायिकांकडून आलेले वाईट अनुभव व धोके इतरांना समजले तर त्यांना अजून जागरुक होता यावे ह्यासाठी हा धागाप्रपंच.
अधिक माहिती - चांगल्या डॉ. चे अनुभव असा दुसरा एक धागा देखिल आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पादुकानंद यांचे, मुळात
पादुकानंद यांचे,
मुळात डॉक्टराना काही प्रश्न विचारले की त्यांचा इगो दुखावला जातो.
हे वाक्य, आणि "तुम्ही माहिती काढली नाहीत, सेर्टीफिकेट बघितले नाही" ही तुमची चुक असे म्हणनारे अमितव व इतर,
जेमतेम शालेय शिक्षण असणा-या पण निव्वळ रक्तातील बिझनेस सेन्स मुळे भाजी पोळी केंद्र चालवणा-या ५० वयाचा आसपासच्या हॉटेल चालीकेस,
ही भाजी आत्तची ताजी आहे ना?
असे विचारले असता, म्हणजे आम्ही काय शिळी भाजी ठेवतो का?
नाही तु निघ. भाजी नाहीये. नाय देणार.
असे उत्तर मला मिळलेले आहे.
"अशा" (भारतीय) समाजात, तुम्ही अशी अपेक्षा करता की "देव" असलेल्या "डॉ.ला" आमच्या सारख्या "सामान्य" लोकांनी विचारावे तुझे शिक्षण काय / अनुभव काय म्हणुन? कसे विचारवे ते ही सांगा? वॉर्डॉबॉयला (योग्य शब्द काय - मेल नर्स?) सांगितले की खुप वेळ झाल पेशंट वाट बघतोय, तु इ॓जेक्शन द्यायला कधी येतो? तो म्हणतो थांबा जरा, १ मि.च झालाय येतो हो. मी म्हटले १ नाही ५ मि. झाले. निव्वळ या मुद्द्यावर रागावुन इगो दुखावुन ईंजेक्शन देताना मुद्दम जोरात टोचुन देने. "अशा" (भारतीय) समाजात तुमची काय अपेक्षा आहे आम्ही नक्की कसे बोलावे आणि कशी माहिती काढावी आणि कसे काम करुन घ्यावे?
आधी माझासोबत येऊन त्या हॉटेल मालकीनीसोबत बोलुन दाखवा. मग बघु.
निपा इथे कुणीही भली मोठी रांग
निपा
इथे कुणीही भली मोठी रांग असेल तोच डॉक्टर चांगला असा क्लेम केलेला नाही. >>>
क्न्फ्युझज इन अन्डर्स्टँडींग..... जरी गाव नावे ठेवत असले तरी गर्दी कमी होत नाही.
माझ्या पाहण्यातल्या ९९.९९% डॉ-पेशंट भांडणाच्या घटना फक्त कम्युनिकेशन गॅपमुळे, रफ बोलण्यामुळे घडलेल्या आहेत. >>> % माहित नाही पण बर्याच प्रमाणात असेच आहे. काही ठिकाणी तर बील द्यायला लागु नये म्हणुन देखिल आहेत.
बाकी चालु देत. नेहमीचे वळण आलेच आहे.
सर्टीफिकेट पहाण्यावर आणि डॉ
सर्टीफिकेट पहाण्यावर आणि डॉ शी बोलण्यावर सगळा चर्चेचा भर दिसतोय.
तर ते सगळं करुन वाईट अनुभव आल्यावर काय करायचं?
आईच्या पायाचे दुखणे अनेक वर्ष होते. त्यासाठी अनेक डॉ करुन झाले पण मधेच कमी व्हायचे परत वाढायचे. एकदा राजेश मंगला या ऑर्थोपेडीक डॉक्टरकडे आई गेली. ते तेव्हा ज्यु. हॉ. मधे होते ( त्यांची डीग्री वगैरे सगळंच ओके होतंच). त्यांनी सांगितले की मणक्यात स्टेरॉईड इंजेक्शन्स घ्यावी लागतील. बरेच हो ना करता ती ट्रिटमेंट सुरवात केली. चक्क दर आठवड्या का दोन आठवड्याला एक इं. अशी सहा इ< त्यांनी दिली. एकदा इं द्यायचे म्हणजे पाच सात हजार गेले कारण ते ऑप थिएटर मधे द्यावे लागते ( म्हणे. पण असेलही कारण मणक्यात द्यायचे होते ) त्याचवेळी इतरही एकदोन पेशंट अशीच ट्रिटमेंट तिथे घेत असताना भेटलेही. त्या ट्रिटमेंटनेही आईला अजिबात बरे वाटले नाही. थातुरमातुर उत्तरे मिळत राहिली. आई वैतागुन तिथे जायचं बंद केलं. मग काही वर्षांनी दुसर्या ऑर्थो. डॉ. कडे गेल्यावर त्यांनी फाईल पाहीली तर ते आश्चर्यचकीत. म्हणे इतक्या फ्रिक्वेन्सीने अशी इंजेक्शने देतच नाहीत. नंतर बोलताना म्हणाले की डॉ ला त्याचा ठराविक कोटा पूर्ण करायचा असला की अशा गोष्ती केल्या जातात. त्या डॉ ला अनेक तक्रारी नंतर ज्यु.हॉ मधुन काढले असेही ऐकले. आम्ही लेखी तक्रार केली नव्हती कारण तेव्हा फसवले गेलो हेच माहित नव्हते.
त्यावेळी अनेक प्रश्न पडले. या इं. ने काही बरेवाईट झाले असते तर? अशा हॉस्प मधे प्रत्येक डिपार्टमेंट्चे हेड असतात ते केसेस वर वर तरी बघत असतीलच ना? मग एकच पेशंट इतक्या फ्रिक्वेन्सीने ( ऑपरेशन थिएटर, नावावर बुक असते त्यावेळेत) काय ट्रीटमेंट घेतोय हे त्यांनी बघितलेच नाही? की पैसे मिळतात म्हणुन गप्प रहायचं?
त्या आधीचा एक अनुभव.
लेकीच्या पोटात बरेच दिवस दुखत होते. आम्ही जपानवरुन सुट्टी साठी इथे आलो होतो. ( तिथे असतानाही मधेच केव्हातरी दुखायचे) नेहेमीच्या, विश्वासातल्या पेडीने बाकी चेकअप केल्यावर सोनोग्राफी करायला सांगितली. पेडी ज्यु. हॉ मधे होते म्हणुन सोनोग्राफी तिथेच केली. रिपोर्ट मधे काहीतरी सिस्ट वगैरे आले असे मी वाचले. तो रिपोर्ट घेऊन पेडीला दाखवला. त्यांनाही आश्चर्य वाटले. ते म्हणाले की असं काही असतं तर अजुन लक्षणं दिसली असती. त्यांनी सोनोग्राफी चित्रंही चेक केली, त्यांना तसे काही दिसले नाही. मग लगेच सोनोग्राफी डिपा. ला फोन केला. तिथल्या रिपोर्ट टेक. शी बोलले. त्यावरुन कळलं की रिपोर्ट चुकीचा लिहीला होता!!! पोटातल्या इन्फेक्शनसाठीचे औषध दिले. इथे नेहेमीचे आणि चांगले पेडी नसते तर काय चुकीची ट्रिटमेंट मिळाली असती देव जाणे!!!!
तरिही आता शंका नको म्हणुन लेकीला तिथुन उचलुन दुसर्या सोनोग्राफी सेंटरमधे गेले. तिथे आधीच्या प्रीस्क्रिप्शनवर सेम टेस्ट करवल्या. टेस्ट करताना त्यांना आधी टेस्ट केल्याबद्द्ल सांगितलेच नाही. तो रिपोर्ट घेऊन दुसर्या एका फेमस पेडी कडे गेले. त्यांना पूर्ण केस सांगितली आणि दोन्ही रिपोर्ट दाखवले. त्यांनीही काही प्रॉब्लेम नसल्याचे सांगितले. पोटात दुधाच्या बदलामुळे इन्फेक्शन होऊ शकते असे सांगितले. ( जे शक्य होते कारण मधे गावी गेलो तिथे नॉन पाश्चराईज्ड ताजे पण उकळलेले दुध ती प्यायली होती )
आजकाल बर्याच मोठ्या हॉस्पीटल मधे पहिल्यांदा गेलात तर ८०० ते १००० रुपये फाईल रजिस्ट्रेशन म्हणुन घेतात. मग नंतरची फी डॉक्टर स्पेशालिटी प्रमाणे ३०० ते १००० असतेच. इथे मात्र मधे दोन ते तीन महिने गॅप झाली आणि परत त्याच डॉ कडे गेलात तर पुन्हा पहिल्या सारखे १००० रुपये घेतात. त्या गॅपमधे दुसर्या डिपार्टमेंटला वगैरे गेले असेल तर ते धरत नाहीत. प्रॉब्लेम असा आहे की बरेच स्पेशालिस्ट डॉक्टर आता या ज्युपिटर हॉस्पीटलमधे व्हिजिटला अस्तात आपल्या वेळेत जमवायचे तर इथे जाणे कधीकधी टाळता येत नाही. आणि इथे गेले की किती पैसा वाहवायला लागतो याचा नेम नाही असे सगळेच म्हणतात.
एक चांगला अनुभवही आला होता. मिलींद पाटिल म्हणुन ऑर्थोपेडीक डॉक ने त्यांच्या अख्यतारीबाहेरची केस ( डायबेटीक + हार्ट पेशंट वर स्पाईन ऑपरेशन) आम्हाला केईएम , फोर्टीस किंवा ज्युपिटर हॉस्पिटल मधे न्यायला सुचवले. केइएम लांब होतं त्यामुळे ज्यु. हॉ ला डॉ. चौबे यांनी ऑपरेशन केलं. आमचे जितके प्रश्न होते त्याला वेळ देऊन उत्तरं दिली. सुरुवतीला तर एकदम हाय रिस्क ऑपरेशन आहे, तुम्हला करायचे नसेल तर करु नका, पेशंट आहे त्या बेडरिडन स्थितीत जिवंत राहील हे ही सांगितले. पण आम्ही रिस्क घ्याय्चे ठरवले. पेशंटला अॅडमिट केल्यावर चार दिवसांनी ऑप. करावे लागले कारण शुगर आणि इतर मिनरल्सच्या टेस्ट योग्य येत नव्हत्या. पण ते ही चांगले समजावुन सांगितले. हे सांगितले नसते तर आम्हाला उगाच पैशासाठी टाळाटाळ करताहेत असे वाटले असते. चांगला अनुभव होता. ३/४ वर्ष झाली पेशंट व्यवस्थित चालु शकतोय.
स्पॉक, "अजीव" संगणक? निर्जीव
स्पॉक,
"अजीव" संगणक?
निर्जीव म्हणायचंय का तुम्हाला?
मुंबई- वाडिया मॅटरनीटी
मुंबई- वाडिया मॅटरनीटी हॉस्पिटल.
सिझरींग झालं. नॉर्मल डीलीवरीचं सामान, सगळी औषध गायब.
अतिशय वाईट अनुभव.
माझ्या प्रेगनन्सी मधे, सोनोग्राफीमधे बाळाच्या डो़क्यात काही कॉम्प्लिकेशन्स आहे त्यासाठी अॅडमीट व्हा. मग स्कॅन सेप्शालिस्ट पुन्हा एकदा स्कॅन करुन काय ते सांगतील. असं सांगितलं. घाबरुन अगदी मी आले होते तशीच अॅड्मीट झाले. स्कॅस्पे ला वेळ नाही, अपॉइन्ट्मेन्ट घ्यावी लागेल असं करुन ३-४ दिवस घालवले. ह्या दिवसात स्टाफ आणि मुर्ख (हो. मुर्खच) शिकाउ डॉक्टर मुलींचा अतिशय संताप्जनक अनुभव आला. अतिशय उर्मट. समोरच्या पेशंटला काही कळतच नाहीये असा अविर्भाव. विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायचं तर सोडाच पण काही विचारलं तर सरळ दुर्लक्ष करुन आपापसात बोलत बसायचं. नाहीतर दुसर्या पेशंटकडे जायच. रोज नवीन रीपोर्ट्स करा. रोज नवीन औषध आणा. कहर म्हणजे माझी शुगर वाढलेली नसताना (मी अॅक्युचेकवर चेक केलं होतं) शुगर आहे. डायबिटीस स्पे. चा ओपिनीयन घ्या. डायट लिहुन आणा. नवीन शुगर चेकींग मशीन आणा. डॉक्टर राउंडचा ठीकानाच नाही. दिवस दिवस फिरकायच्या नाहीत. आणि विसिटिंग हावर्स मधे बाळाचे ठोके चेक करायला यायच्या. ५ व्या दिवशी स्कॅस्पे ची अपॉइन्ट्मेन्ट मिळाली. तर बाई स्कॅन करुन झाल्यावर म्हणे "९९.९९ सगळं नॉर्मल आहे. मुझे तो सब ठीक लग रहा है." मी इकडे हुश्श्य करते तो- "लेकीन पॉइन्ट १ परसेन्ट के लिये मै कुछ बोल नही सकती. कुछ भी हो सकता है. बच्चा अॅबनॉर्मल हो सकता है. इइ." अपेक्षेप्रमाणे आम्ही घाबरलोच. मग रुपये ५०००० ची एक टेस्ट आहे ती करा. असं सांगितलं. आम्ही तयार झालो. ती होणार दोन दिवसांनी. पुन्हा त्या मु. शि. डॉ. चा त्रास. दोन दिवसात टेस्ट झाली. फर्स्ट रीपोर्ट चांगला आला. दुसरा रीपोर्ट ८ दिवसांनी येणार होता. मी डीस्चार्ज घेतला.
माझ्या फॅमिली डो कडे गेले ज्या स्त्रीतज्ञ आहेत. त्या म्हणाल्या की अगं एकदा मला तर विचारायच्स. इअतकं काही करायची गरज नसते. बाळाच्या वाढीबरोबर नॉर्मल झालं असतं.
दुसरा रीपोर्ट ही अगदी उत्तम होता.
आता एवढी ट्रीटमेन्ट तिथेच झाली आहे आणि ही केस पण माहीत आहे त्यांना म्हणुन हे सगळं विसरुन तिथेच चेकप साठी जात राहीले. तर एकदा चेच्कप झाल्यावर ताबडतोब अॅडमीट व्हा. कधीही डीलीवरी होइइल, असं सांगितलं. मी पुन्हा अॅडमीट. रात्रभर चेकप चालुच. मी आत माझा नवरा बाहेर. रात्रभर. मी काही विचारलं तर हु नाही की चु नाही. :रागः
दुसर्या दिवशी सुट्टीचा दिवस (१५ ऑगस्ट). त्यांची सिनीयर डॉ येउन रीपोर्टींग घेउन गेली. ह्या आपापसात " अरे ये पुरा दिन निकालेगी. क्या करे क्या करे." आणि मी सगळं ऐकतेय. पण माझी सगळी शक्तीच संपलेली. मग अचानक १५-२० मिनिटांनी ' तुझ्या बाळाने पोटात शी केलीये सी सेक्शन करावं लागेल." मी अवाक.
१० मिनिटात सगळी तयारी करुन माझं सिझरिंग केलं.
ते सुरु असतांना ज्या स्पे ला बोलावलेलं ती ह्या मु.शि.डॉ. ना झापत होती की इसको अॅडमीट ही क्यो किया? बच्चा अभी नीचेभी नही आया है. नॉर्मल हो जाती ४-५ दिनमे. मी ऐकतेय मुकाट्याने.
बदल केला आहे.
बदल केला आहे.
तुझ्या बाळाने पोटात शी केलीये
तुझ्या बाळाने पोटात शी केलीये सी सेक्शन करावं लागेल.
हाच हाच प्रकार भोसरी मधे मुद्दामुन घडवून आणला जातो, डिलिव्हरी ची वेळ पुढे ढकलली जाते इंजेक्षन देवून, बाईला प्रसुती वेदना होत असताना त्या थांबाव्या म्हणुन इंजेक्षन दिले जाते. बाळाला पोटात शी होते. ती त्याचा श्वसन मार्गात जाउन तेथे इन्फेक्शन होते. मुल जन्मल्यावर लक्षात नाहि आले तर त्याचा श्वास गुदमरु लागतो, किंवा तत्काळ त्याला आय्सीयु मधे हलवावे लागते.
सस्मित, खरेच वाईट
सस्मित,
खरेच वाईट अनुभव.
तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला ऐकायला हवा होता.
>>माझ्या पाहण्यातल्या ९९.९९%
>>माझ्या पाहण्यातल्या ९९.९९% डॉ-पेशंट भांडणाच्या घटना फक्त कम्युनिकेशन गॅपमुळे, रफ बोलण्यामुळे घडलेल्या आहेत.<<
हम्म... कंसिडरींग योर डिमीनर हियर आॅन माबो, आय काइंडा अग्री विथ धिस स्टेटमेंट...

राज, माझा डिमिनर तुमच्याशी
राज,
माझा डिमिनर तुमच्याशी बोलताना जसा असतो, तसा माझ्या पेशंटसोबत नसतो. तुम्ही माझे पेशंट नसल्याने, तुमच्यासाठी स्पेशल ट्रीटमेंट असते.
तुम्हाला "नातेवाईकांचा बराच
तुम्हाला "नातेवाईकांचा बराच वेळ जातो" असं म्हणायचंय का? फिदीफिदी
>>
बराच वेळ तर जातोच पण त्यामुळे हॉस्पिटलमधला असह्य मोकळा वेळही बरा जातो.
आधी आमचा ताजा अनुभव
आधी आमचा ताजा अनुभव सांगते
हिरानंदानी हॉस्पिटल पवई. मी १० वर्ष हिरानंदानीच्या कॉर्पोरेट ऑफिस मधे हेड-फायनान्स म्हणुन काम करत होते. हॉस्पिटल चा सगळा फायनान्स मी सांभाळलेला आहे. अनेक डॉक्टर्स, फायनान्स हेड्स मला फारच चांगले ऑळखतात. माझ्या साबुंना ब्लड प्रेशर चा त्रास आहे. साबां ची हार्ट एन्लार्जमेंट ची तक्रार आहे. दोघेही कार्डिओलॉजिस्ट सीनीयर डॉ. चे गेली ७ वर्ष पेशंट आहेत. डॉ. वर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांनी अनेकदा अती योग्य सल्ला दिल्यामुळे आमचे पैसे आणि वेळ वाचलेले आहे.
आता अनुभव.
सासरे आंदमान ला फिरायला गेले होते ते ३ फेब. ला परत आले. त्यांचा डावा हात दुखत होता. फॅ. डॉक्टर ने कार्डिओ कडे जायला सांगितले. आम्ही ८ तारखेला गेलो. डॉ. ना इ.सी.जी आणि २डी. एको दोन्ही मधुन ब्लॉकेज ची शंका आली. दुसर्या दिवशी सकाळी ७.३० ला बोलावले, अँजीओग्राफी करु म्हणाले. मी आणि सासरे दुसर्या दिवशी ७ ला अॅडमिट व्हायला गेलो. आमचा अँजीओग्राफी चा नंबर लागायला २ वाजले. डॉक्टर अतिशय बीझी होते कारण ४ इमेर्जन्सी केसेस माझ्या डोळ्या समोरच आल्या. आमची काहीही तक्रार नाही.
मधल्या वेळेत सासर्यां जवळ मला थांबुही देइनात. बाकीच्या पेशंट जवळ नातेवाईक बसुन खात पीत होते. मग मलाच का दुजा भाव?
मी शेवटी १२ वाजता घुसुन त्यांच्या जवळ बसुन गप्पा मारायला लागले. त्यांना बरं वाटलं. नर्स सारखी बाहेर हकलत होती. मी हलले नाही. नंतर डॉक्टर गणेश स्वतः बाहेर येवुन मला आणि सासर्यांना आता तुमचा नंबर... असे सांगुन आत घेवुन गेले. तेंव्हा ती नर्स गप्प बसली. नंतर डॉ. माझे मित्र असल्याने मला आत घेवुन गेले. तिकडे काँप्युटर वर सगळे ब्लॉकेज दाखवुन आता एका ठिकाणी स्टेंट घालावी लागेल बाकीचे औशधाने बरे करु असे निदान झाले. सगळी प्रोसीजर मला दाखवुन केली. नन्तर आय.सी.यु.ला अॅडमिट केले.
खर्च सांगितला. मी म्हणाले की इंशुरन्स आहे. तेंव्हा डोक्टर हळुच मला म्हणाले की "कॅशलेस मधे जाउ नको. नंतर क्लेम कर. नाही तर ४० हजार वाढतिल. आणि डी पॅकेज घे. आय.सी.यु. बाहेर फक्त १ दिवस रहावे लागेल. कशाला पैसे घालवतेस?" मी त्या वेळेस काही समजले नाही. पण ते काहीतरी हिंट देत आहेत हे जाणवले.
नंतर आय.सी.यु. मधे सासरे दोन दिवस होते. तब्येत उत्तम होती. आतल्या आत फिरत ही होते. हॉस्पिटल वाले मस्त काळजी घेत होते. आम्हाला दिवसातुन फक्त ४ वेळा त्यांना भेटता येत होते. हॉस्पिटल चा वेटिंग एरीआ दुरुस्तिला काढला होता. दुसर्या वेटिंग एरीयात ही गर्दी!!! म्हणुन मी आणि माझा नवरा समोरच एका हॉटेल मधे रुम घेवुन रात्री झोपायला जात होतो. नाहीतरी रात्री ८ नन्तर पेशंटला सकाळ पर्यंत भेटायला देतच नाहीत. आय.सी.यु. मधुन ११ तारखेला नॉर्मल वॉर्ड मधे हलवणार असे समजले. म्हणून आम्ही आदल्या दिवशी कस्ट्मर एक्झीक्युटिव्ह नामक प्राण्या कडे पुढल्या चौकशीला गेलो आणि एपिसोड सुरु झाला ( पिक्चर अत्त्ता सुरु होतो आहे!!!!!)
त्यांनी आम्हाला रुम रेट दाखवले. वॉर्ड चे २००० पेर डे, डबल शेअरींग २५००, सिंगल ६००० आणि सुप्रीम १०,००० इ.इ. आम्ही विचार केला की सिंगल ६००० घ्यायला हरकत नाही कारण एकच दिवस, परत पेशंटच्या नातेवाईकाला सेपरेट बेड. म्हणजे हॉटेल सोडले तरी चालेल. आम्ही हे म्हंटल्यावर लगेच त्याने सांगितले. की तुमचे रेकमेंडेड पॅकेज डी आहे. त्यात वॉर्ड मधे ठेवावे लागेल. म्हणजे साधारण ६-७ पेशंट बरोबर. नातेवाईकाला गादी मिळेल. आम्ही म्हंटले पण समजा पॅक्ज बदलायचे असेल तर? त्यावर उत्तर मिळाले की जर का डबल शेअरींग मधे गेलात तर सर्जरी वगैरे सगळे चार्जेस ४०% ने वाढतात. जर ६००० च्या रुम ला गेलात तर ते चार्जेस १००% वाढतात. आणि १०,००० च्या रुम साठी ते १५०% ने वाढतात. म्हणजे जी प्रोसीजर आम्हाला ९०,००० मधे मिळणार होती, ती फक्त डबल शेअरींग घेतले तर १,२६,००० , सिंगल रुम साठी तीच कॉस्ट १,८०,००० आणि अजुन वर्च्या साठी २,२५,०००. परत स्टेंट घातले ती कॉस्ट अलग होतीच. म्हणजेच नुसती रुम वेगळी घेतली तर एवढी हजामत. हे असे बिलींग कुठेच ऐकले नव्हते. माझे स्वतःचे ठाण्याच्या पॉश अश्या ज्युपिटर मधे ३ वर्षांपुर्वी ऑपरेशन झाले, तेंव्हा सर्जरीची रक्कम वेगळी होती, त्याचा रुम क्लास शी संबंध नव्हता. त्या वेळेस मी प्रेसिडेन्शीयल सुट घेतला होता. माझ्या इंशुरन्स मधे बसत होतं म्हणुन. परत तेंव्हाही २ दिवसच रहायचं होतं. हा प्रकार जाम पैसे काढु वाटला.
असो.
सासरे आणि नवरा म्हणाला की एकाच रात्रीचा प्रश्न आहे. वॉर्डातच राहु. म्हणुन मग ११ ला सकाळी वॉर्डात शिफ्ट करायला परत त्या कस्ट्मर केअर वाल्या कडे गेलो. कारण तिकडुन कुठला बेड तो अॅलॉट होतो. त्यांनी सांगितले की अत्ता कुठल्याच जनरल वॉर्डात बेड नाही. त्या मुळे तुम्हाला डबल शेअरींग मधे शिफ्ट करतो. तुम्हाला फक्त ५०० जास्त द्यावे लागतिल, बाकी सगळे पैसे डी पॅकेज प्रमाणे लागतिल. म्हंटले उत्तम... छानच झाले. प्रश्नच मिटला. त्या बयेने तिथल्या तिथे ह्या नव्य व्यवस्थे बद्दल दिलगीरी आणि नवे चार्जेस ह्या वर माझी सही घेतली. आम्ही खुश. त्या खुशीत हॉटेल सोडुन दिले. सामान घरी पाथवले. आणि नव्या खोलीत शिफ्ट झालो बरोब्बर दुपारी १२ वाजता. दुपारी मस्त सिनेमा पण बघितला तिकडच्या टि.व्ही. वर. संध्याकाळी डॉक्टरांबरोबर मस्त गप्पा झाल्या, चहा झाला. डॉक्टर त्याच रात्री ११ च्या विमानाने इटलीला जाणार होते. म्हणुन ते लौकर घरी गेले. इकडे ८ वाजता नर्स आली सांगत की तुम्हाला जनरल वॉर्ड ला शिफ्ट करत आहोत. म्हंटल का? तर खाली कस्टमर केअर ला विचारा!!!!!
परत आमची वरात खाली. तर तो भांडायलाच लागला. की डी. पॅकेज घेता आणि डबल मधे रहाता. हे चुक आहे. आता बेड रीकामा आहे जनरल मधे. आता तिकडे जा!!! मी सकाळच्या बयेचा कागद दाखवला. तुमचाच बेड खाली नव्हता. आम्ही काय करणार ? वगैरे सागिंतले. तरी बधेना. म्हंटलं पेशंटचे जेवण देखिल झाले. आता तो झोपणार. त्या वर "ते आम्हाला माहित नाही....तुम्ही अत्ताच्या अत्ता जनरल ला जा..... "
तो काही ऐकुनच घेत नव्हता. मी फायनान्स हेड ला फोन लावला. त्याने बिचार्याने त्या येड्याला समजवायचा प्रयत्न केला. की शिफ्टींग अत्ता करु नकोस. नाहीतरी फक्त १२ तासांचा प्रश्न आहे. डॉक्टर सकाळी ९ चा डिस्चार्ज लिहुन गेले आहेत. तो काहीच ऐकेना. माझे सगळे जॅक कुचकामी ठरले. आता शिफ्ट करण्या वाचुन पर्यायच नव्हता. सी.इ.ओ ना त्रास द्यावा येवढ्या रात्री असे वाटेना. मी काय नीरंजन हिरानंदानीना पण फोन करु शकले असते. आम्ही त्याला पॅकेज सी कर म्हणुनही सांगितले. चल ४०% जास्त तर जास्त.... त्यालाही तो तयार होइना. त्यासाठी त्याच्या बॉस ची परवानगी लागेल म्हणाला. आता तो घरी गेला. काहीच तयार होइना. आधी इंग्लीश मधे भांडत होतो. नंतर त्याच्या शर्टावर नाव पाहिले तर तो मराठी निघाला. मग मराठीत सुरु झालो. पण नाही म्हणजे नाही........ शेवटी गेलो जनरल ला.
ज्या वॉर्ड मधे शिफ्ट केलं तो हॉरीबल होता. पेशंटच्या नातेवईकांना झोपाय्ला जागाच नव्हती,. मला थांबु देईनात. कारण तो पुरुशांचा वॉर्ड होता. माझा नवरा रात्र भर खुर्चीवर बसुन होता.
१२ तारखेला डिस्चार्ज च्या वेळेस हातात बिल पडलं ते सगळं "सी" पॅकेज प्रमाणे!!!!! म्हणजे ठरल्या पेक्शा ४०% जास्त.!!!!! मग मात्र माझे रुपांतर रणंरागीणी मधे झाले. त्यांचे म्हणणे असे की तुम्ही डबल चा चार्ज भरा कारण तुम्हाला ती रुम अॅलॉट केलेली होती. मग मात्र मला त्यांच्या सी.इ.ओ. कडे जाण्या वाचुन पर्याय नव्हता. माझी झाशीची राणी झाली. शेवटी दीड तासाने बील बदलुन मिळाले. आणि १० वाजता निघायचे आम्ही २ वाजता निघालो. सासरे फक्त सकाळ च्या नाश्त्यावर होते. त्यांना आधी ईडली खायला घाअतली. उशीर झाला म्हणुन कोणीही त्यांना जेवण दिले नाही. कारण त्यांची डिस्चार्ज ची वेळ ९.३० होती ना !!!!!!
मी त्या हॉस्पिटल परिवाराचा माजी का होईना भाग होते. त्यामुळे हा सगळा प्रकार अतिषय दुख्ख दायक होता. डॉक्टर्स उत्तम, नर्स चांगल्या,,,, पण व्हेरी बॅड अॅडमिनिस्ट्रेशन!!!!!!!!
आता ह्या पुढे वेळ आली तर आय.सी.यु नंतर आफ्टर केअर साठी ठाण्याला ज्युपिटर नाहीतर कौशल्या मधे आणणार. तिकडचे सगळे डॉक्टर ओळखतात!!!
पॅकेज शब्दाला घाबरतो हल्ली आम्ही. !!!!
इकडे डॉक्टर, नर्सेस, कोणाचाच
इकडे डॉक्टर, नर्सेस, कोणाचाच दोश नाही...... दोष असेलच तर तो ही पॅकेज सीस्टीम ठरवणार्यांचा!!!!!
जी सर्जरी ची कॉस्ट तुमच्या बेड प्रमाणे ठरणार असेल तर मग ही शुध्ध लुट आहे!!!!!
पर्फेक्ट. @ मोकिमी. पुन्हा
पर्फेक्ट. @ मोकिमी.
पुन्हा एकदा एक्झाम्पल ऑफ 'इंडस्ट्रियलायझेशन' ऑफ माय प्रोफेशन.
डॉ. नी तुम्हाला पैसे वाचवायचा सल्ला दिला होता बरोब्बर.
बेफिकीर, तुम्ही वर लिहिलेला,
बेफिकीर, तुम्ही वर लिहिलेला, ' गायनँक आहेत, पण एम डी नाही' हा प्रकार बहुधा D.G.O. असावा, जो डिप्लोमा असतो, MBBS नंतर करण्याचा ( आणि बहुतेक BAMS वालेही करू शकतात) .
मोकिमी, तुम्ही हा अनुभव
मोकिमी, तुम्ही हा अनुभव पब्लिकली लिहिल्याने बिचार्या तुमच्या प्रामाणिक डॉक्टरांना मॅनेजमेंटकडून त्रास होऊ शकतो.
आणि असा त्रास की जो देताना त्याचे कारण ही केस आहे याचा त्यांना पत्ताही लागू नये.
बाकी तुमची मर्जी!
मग ही शुध्ध लुट आहे > +१ भारी
मग ही शुध्ध लुट आहे > +१ भारी बिझनेस मॉडेल आहे.
येस. डी.जी.ओ. पण गायनॅक
येस.
डी.जी.ओ. पण गायनॅक प्रॅक्टीस करु शकतात.
वावे, बीएएमएस वाले एमडीही करू
वावे,
बीएएमएस वाले एमडीही करू शकतात, पण हे सगळे त्यांच्या 'पॅथी' मधले असते. त्याचा MBBS DGO शी संबंध नाही.
मोकिमी, तुम्ही हा अनुभव
मोकिमी, तुम्ही हा अनुभव पब्लिकली लिहिल्याने बिचार्या तुमच्या प्रामाणिक डॉक्टरांना मॅनेजमेंटकडून त्रास होऊ शकतो.>>> +१.... तो संदर्भ हलवला तरी चालेल...
मी नावं दिली नाहीत कारण, एक
मी नावं दिली नाहीत कारण,
एक तर तो काकांचा अनुभव आहे/होता. तरी एवढे सांगेन की, पुण्यातील मध्यवर्ती उगाचच प्रसिद्ध असलेले हे हॉस्पिटल व तिथले डॉक्टर आहेत.
साबांबाबतीत, हॉस्पिटलने माफी मागितले म्हणून आणि त्यावेळच्या मनस्थितीनुसार आम्ही माफ केले.
बाकी, डॉक्टर सुद्धा माणूस असतो तर पेशंट सुद्धा माणूसच असतो. तरी इथे सेवा पुरवताना, "interpersonal relationship" चा मुद्दा म्हणजे, आमच्या मित्रांसाठी "फक्त" आम्ही चांगली सेवा असा मुद्दा वाटतो. तो मुद्दा का ठरावा हे कळत नाही.
आणि बरेच अनुभवा वरून हा निव्वळ निष्काळपणा ह्यामुळे आहे. अगदी साध्या साध्या गोष्टी डॉकनेच दुर्लक्षित केल्याने. त्याच जर वेळेत केल्या असत्या, वेळीच सुचना दिल्या असत्या पॅरामेडिकल तर टाळता येण्यासारख्या होत्या.
आणि हो, काही अॅलोपॅथीच डॉक्टरच आपले आणखी एक मोठे दुकान काढून आयुर्वेदिक, होमिओपॅथी असे शिकलेल आर एम ओ म्हणून ठेवतात(अगदी कमी पगारात १५००० सुरुवात वगैरे). त्यांना धड काही समजावून सुद्धा सांगता येत नसते. कित्येक डॉक्टरचे सहाय्यक असे आयुर्वेदिक कुठलया तरी फलाणा युनिवर्सिटीतून असतात. फी स्पेशालिस्टची भरा आणि आधी या अर्धवटरावांची भेट घेतल्यावरच "खास" डॉक्टर भेटणार असा प्रकार असतो. .
तर मोठ्या हॉस्पिटलात, डॉक्टर आणि हॉस्पिटलची "मिलिभगत" असतेच ना शेवटी. त्यामुळे जरी अॅडमिन जबाबदार असले काहि बाबतीत तरी डॉक्तर थोडी ना त्या दुकानाविरुद्ध साक्ष देणार? माझ्या साबांच्या केसमध्ये, आम्ही कोर्टाची धमकी दिली म्हणून डॉक्टर आणि मॅमोग्राफी करणारा हेड कबूल झाले की हॉस्पिटलची चुकीच आहे. नाहितर उंदराला मांजर साक्ष हा प्रकार चालतो बर्याच वेळा.
ज्यांना घ्यायचय त्यांनी ह. घ्या तितकेच्च प्रकृतीला बरे. डॉकटरकडे जावू नका. 
--------------------------------------------------------
बरं, काका हलवाई बाकरवडी विकतो. आणि मला जर बाकरवाडी खाण्याचा झटका येणार आहे हे जरी आदलया दिवशीच समजले तरी मी दुसर्या दिवशी काका हलवाई कडेच जाणार आणि आता मटण मागेन, बाकरवडी एवजी कारण मला झटका कशाचा का येइना , त्याने मटण सर्विस हि दिलीच पाहिजे हा माझा विश्वास.
साती. मी ऑलरेडी त्यांच्या
साती.
मी ऑलरेडी त्यांच्या वेब साईट वर तक्रार केली आहे. तसच नीरंजन हिरानंदानीना पण मेल पाठवला आहे. माझे डॉक्टर खुप सीनीयर आहेत. मागे एक दोनदा त्यांनी नुसतेच तपासले काहीही औषधे दिली नाहीत म्हणुन व्हीजीटींग फी सुध्धा परत करायला लावलेली आहे. पूर्ण कार्डिओलॉजी विभाग त्यांच्या इशार्यावर चालतो.
त्यांचे नाव काढुन
त्यांचे नाव काढुन टाकते....... तसा काही फरक नाही पडत.....पण ठीक आहे
दीमा, पण BAMS + DGO जर कुणी
दीमा, पण BAMS + DGO जर कुणी असेल, तर ते DGO आणि MBBS + DGO मधले DGO हे एकच असते का? की वेगळे?
साती एक डॉक्टर म्हणुन
साती
एक डॉक्टर म्हणुन तुम्हालाही अशी चुकलेली वासरं ( भरकटलेले, दुसर्या डॉक्टर नी फसवलेले पेशंट ) भेटतच असतिल.... त्यांचे काही किस्से नाव न घेता लिहा.....
वेगळे असते, वावे. एमबीबीएस व
वेगळे असते, वावे.
एमबीबीएस व बीएएमस मधे जो क्वालिटेटिव्ह फरक आहे, त्याच्यासारखाच, पण शंभर पट जास्त फरक तिथे आहे.. ही तथाकथित आयुर्वेदिक 'पोस्टग्रॅज्युएशन्स' केली की कोणत्याही क्वालिटि कंट्रोलविना हे लोक अॅलोपथीचीच प्रोसिजर्स बिनदिक्कित करीत असतात.
'नीम हकीम, जान-ए- खतरा '
'नीम हकीम, जान-ए- खतरा ' अशी एक म्लेंच्छ भाषेत म्हण आहे ना?
गेल्या पिढीत देशांतर केलेल्या
गेल्या पिढीत देशांतर केलेल्या एका नागपूरच्या डॉ गावंडे यांचे चिरंजीव डॉ. अतुल गावंडे हे अमेरिकेचे नागरेक आणि खूप मोठे शस्त्रशल्यचिकित्सक आहेत.
त्यांनी अभियांत्रिकी व्यवसयाचा खूप सखोल अभ्यास केला आहे त्याच बरोबर उत्पादन कशा प्रकारे सातत्य पूर्ण गुणवत्तेचे बनवतात या साठी ७ क्यू सी टूल्सचा अभ्यास केला आहे.
या नंतर त्यांनी चेकलिस्ट मॅनिफेस्टो हे पुस्तक लिहिले ते खूप रंजक आहे व अनेक मूलभूत प्रश्न प्रस्तुत करते.
उदा: रुग्ण आल्यावर सर्व शक्यतांची प्राथमिक चाचणी होते का? ..... नाही ( टक्केवा री -- फ्क्त ३ ते ४ टक्के डॉक्टर अशी चेक लिस्ट वापरतात. त्या क्षणी त्यांच्या मानसिक ( डॉक्टरांच्या) स्थितीनुसार काही गोष्टी सुटतात आणि उशीराने लक्षात येतात.
अशा रुग्णांची टक्केवारी ३ ते ४ टक्क आहे.
त्यांच्या या विस्तृत आणि सखोल अभ्यासपर पुस्तका नंतर त्यांच्यावर अमेरिकेत टीकेची झोड उठली.
या बाफवरील अनेक मुद्द्यांचे त्यात विवेचन आहे.
जाता आता , मद्याच्या आहारी गेलेल्या डोक्टरांचे प्रमाण बरेच मोठे आहे व त्याचा सुध्दा त्यांच्या निदानावर खूप परिणाम होतो असे त्याचे निष्कर्ष आहेत
रेव्यू हा डेटा भारतातला आहे
रेव्यू
हा डेटा भारतातला आहे की अमेरिकेतला?
डॉ शारंगपाणी बद्दल खूप ऐक्लं
डॉ शारंगपाणी बद्दल खूप ऐक्लं होतं. पण माझा अनुभव एकुणात असमाधानकारक होता. वडिलांन्ना घेऊन गेले होते. खूप वेळ थांबून नंबर आल्यावर ५ मिनिटात बाहेर. सुचनेप्रमाणे सर्व गोष्टी थोडक्यात लिहून बरोबर नेल्या होत्या. त्या वाचायचे कष्ट अर्थातच कोणी घेतले नाहीत. मुख्य डॉ. बरोबर ५ / ६ असिस्टंट डॉ चे कोंडाळे. अशा वेळी पेशंट हा काही डेमो पीस नाहीये. त्याचे म्हणणे ऐकुन घेणे हे सर्वात महत्वाचे आहे. त्याचे शंकानिरसन करणे हे कर्तव्य आहे याची कुठलीही जाणीव दिसली नाही . तिथेच बाहेर डॉ. ची पुस्तकं होती. त्यातलं एक आधी थोड्यावेळ वाचत हो ते. ते फार सुरेख होतं . पण प्रत्यक्श पेशंट्ला ५ /१० मिनिटात फुटवून लावणे असा अनुभव आला :(.
डॉक्टरी पेशाकडे नुसत्या प्रोफेशन म्ह्णून पहाण्याऐवजी मिशन्+प्रोफेशन म्हणून पहातो म्हणून बहुतेक अपेक्षाभंग होतो काही वेळा
Pages