डॉक्टरांचे वाईट अनुभव. पुढच्यास ठेच मागचा शहाणा

Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 02:54

डॉक्टरांचे/ हॉस्पिटल्स्चे वाईट अनुभव इथे लिहुयात. पुढे जाऊन इतरांना फायदा होईल.

ह्या धाग्याचे प्रयोजन, सर्वच डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्याचे नक्कीच नाही, परंतु डॉक्टर हा देव आहे व तो आपले भलेच करेल ह्या (रुग्णाच्या किंवा नातेवाईकांच्या) पारंपारिक, भाबड्या व आंधळ्या श्रद्धेला छेद देणारी अनेक उदाहरणे वरचेवर आजूबाजूला दिसत आहेत. त्यामुळे ह्या व्यवसायातल्या व्यावसायिकांकडून आलेले वाईट अनुभव व धोके इतरांना समजले तर त्यांना अजून जागरुक होता यावे ह्यासाठी हा धागाप्रपंच.

अधिक माहिती - चांगल्या डॉ. चे अनुभव असा दुसरा एक धागा देखिल आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहे ना. अनएथिकलच आहे. पण त्यामुळे झालेल्या नुकसानाला फक्त डॉक्टर जबाबदार नाही. पेशंटची जबाबदारी अधिक आहे.

डॉक्टरची भूमिका सॉफ्टवेअर इंजिनीअरपेक्षा थोssडी अधिक महत्वाची ठरते. >> Happy अंजली हे मला पूर्णपणे मान्य आहेच. रादर अत्यंत महत्त्वाची ठरते. माझ्या पहिल्या प्रतिसादात हार्ट बीटचा म्हणूनच उल्लेख केलाय. की इंजिनिअरचं चुकलं तर स्टेकवर फार कमी गोष्टी असतात तर डॉक्टरची चूक जीवावर बेतते.
परत, माहिती ठेवणे हे क्युअर ऑल सोल्युशन नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी करावे.

राज, पूर्ण अनएथिकल आहे .. गुन्हाच असावा.
पण त्याने पेशंटला काही झालं तर जीव कोणाचा जाणारे? स्वतःच्या फायद्यासाठी तरी प्रयत्न करा.

चिनूक्स आणि अमितव ह्यांचा मुद्दा मुळातच पटला नाही.

क्रॉस चेकिंग करण्याची जबाबदारी पेशंटने घ्यावी (केवळ नेटसज्ञान किंवा तत्सम आहे म्हणून आणि स्वतःचा जीव हे सर्वात मोठे प्राधान्य आहे म्हणून) ह्याचा अर्थ काय होतो? जे अज्ञानी आहेत त्यांना फसवले गेले तरी त्यावर उपाय नाही हाच ना?

येथे प्रश्न डॉक्टरांच्या वाईट अनुभवांबाबत आहे. पेशंट अज्ञानी / हलगर्जी असणे किंवा क्रॉसचेकिंग करत नसणे ह्यावर किती जबाबदारी टाकणार?

क्रोसिनचे चार तुकडे करून स्वतःची गोळी म्हणून विकणारे डॉक्टर सासवडला आहेत. 'दोन दोन तुकडे दिवसातून दोनवेळा घ्या' असे ठणकावून सांगतात.
============

मेडिकल आणि इंजिनरिंग बाबत (संगणकीय अभियांत्रिकी नव्हे, अभियांत्रिकी अभियांत्रिकी, म्हणजे मेकॅनिकल किंवा अनेकदा सिव्हिल, इलेक्ट्रिकल वगैरे):

वर अमितव ह्यांनी ह्याबाबत दिलेला प्रतिसाद पटला. खूप वर्षांपासून असेच वाटते की शरीरातही व्हॉल्व्ह्ज, उत्पादन, वेस्ट, पाईपलाईन्स असलेच सगळे प्रकार असतात. एक प्रकारचा कारखानाच! त्यामुळे डॉक्टरांना शरीराचे इंजिनिअर म्हणावेसे वाटते. ही थट्टा तर नव्हेच पण उगाच कमी लेखणेही नव्हे. डॉक्टरांचे सखोल ज्ञान किती असते ह्याची कल्पनाही नाही. केवळ अंतिम परिणामांची तुलना काहीशी अशी वाटते इतकेच.

घर विकत घेताना फसलेल्या माणसाला 'बिल्डर पेक्षा तुमचा दोष जास्त आहे' ,
किंवा
राजकारण्यानी फसवल्यावर 'तुम्ही निवडून दिलेत, तेव्हा चूक तुमचीच'..
असं सांगितलं जातं त्याची आठवण आली....

चिनूक्स चा मुद्दा पटला नाही. एखाद्या कोळणीने पापलेट म्हणून सरंगा विकला तर ती गिर्‍हाईकाचीच चूक असे म्हणल्यासारखे झाले. तिथे निदान जिवाला तरी धोका नसतो.

प्रत्येक वेळी डॉक्टरचे सर्टिफिकेट पहाणे, त्याचे स्पेशलायझेशन पहाणे वगैरे सोपस्कार पेशंट ने करावे हे अवाजवी आहे. आसपासच्या ग्रामीण भागातून अनेक अशिक्षित लोक आशेने येत असतील.

दोष १००% डॉक्टरचा. नंतर केस होऊन त्याचं लायसन्स रद्द, ५ वर्षे तुरुंगवास.
चंदनाच्या हारांची मागणी अचानक वाढली.
तुमची निवड!
इथल्या सुशिक्षितांना सगळं उपलब्ध असताना अशिक्षित करत नाहीत म्हणून आम्ही पण करणार नाही म्हणायचंय. उत्तम. ठेवेले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान.

गोगा, +१

अतिशय चुकीची तुलना. आणि युक्तिवाद आयटी आणि मेडीकल पेशाची.

आणि , इथे भरपूर प्रश्ण विचारले तर मिरच्या झोंबल्यासारक्गे डॉक्टर ज्यास्त आहेत.

प्रत्येक वेळी, प्रत्येक बाबतीत डॉक्टरची उलटतपासणी शक्यच नसते, जर तुम्च्या कडे हॄदय विकाराचा नातेवाईक असेल आणि शहराच्या मध्यभागी दुकान उघडलेला भोंदू डॉक्टर असेल.

लिहित्र थोड्या वेळाने इतर अनुभव.

विकु,
इथे जे लिहिलं आहे ते ग्रामीण, अशिक्षितांसाठी नाही. माबो वाचणारे व इथे लिहिणारे हे वेगळे आहेत.
फोन अथवा गाडी विकत घेताना आपण हजार चौकश्या करतो, मग एखाद्याच्या हाती आपला जीव सोपवताना निदान आपण योग्य माणसाकडे आलो आहोत, याची खातरजमा नको का करायला?

माझे वडील नागपूरला अ‍ॅडमिट होते. शस्त्रक्रियेनंतर रोज शुगर तपासली जात होती. आम्ही प्रत्येकवेळी नर्सला आकडा विचारायचो. एक दिवस दुपारी शुगर मोजायला नर्स आलीच नाही. मी तिला दोनदा आठवण केली, ती 'येतेच' म्हणाली आणि फिरकलीच नाही. नंतर फिजिशियन आले व त्यांनी चार्ट बघून आपल्या साहायकाला शुगरसाठीची गोळी बदलायला सांगितली. नर्सनं परस्पर शुगर न मोजताच भलताच आकडा लिहिला होता. मग आम्ही तिला बोलवून तिनं शुगर मोजली नसल्याचं वदवून घेतलं, शुगर मोजली. ती काही वाढली नव्हती. आम्ही लक्ष दिलं नसतं तर गोळी बदलली असती आणि माझ्या वडिलांना त्रास झाला असता. चूक नर्सची असली तरी मी लक्ष न देणं ही माझीही चूक आहे. असंख्य दवाखाने, अनेक डॉक्टर यांचे अनुभव, बहुतेक सगळे चांगले, गाठीशी आहेत. पण त्याचवेळी होयबा नातेवाईकही बघितले आहेत.

भारतात आजाराच नाव समजलं तरी डोक्यावरुन पाणी गेलं , खोलात जाऊन मेडीकल टर्म्स समजुन घेऊन , डॉक्टरांनी डेली रिपोर्ट मध्ये काय लिहिलयं हे वाचता येणं आणि ते समजणं , गेला बाजार प्रिस्क्रिपशन वाचता येणं , किती लोक करु शकतील.
साधा ब्लड रिपोर्ट घ्या आणि तो वाचायचा प्रयत्न करा. बघुयात किती टर्म्स समजतात.

श्री, सगळ्या भारताला हा उपाय नाहीचे. माबोवरच्या फक्त आणि फक्त १०० लोकांना करणं जमणार आहे तर मग तो उपायच नाही का? फिट ऑल आहे असं कुणीच म्हणत नाहीये.

हळूहळू चर्चा येथील शंभर जणांपुरती कन्फाईन होऊ लागली आहे.

'नेटसज्ञान मायबोलीकरांनी अविचाराने व कोणतीही चौकशी न करता घिसाडघाईत गाठलेल्या डॉक्टरांचे चुकून आलेले वाईट अनुभव' असे शीर्षक द्यावे लागेल आता Wink Light 1

मागे एकदा वडिलांना एका किरकोळ अपघातानंतर एका ऑर्थोपिडीक सर्जन कडे (पुन्हा एकदा एका प्रथितयश, विख्यात ई. हॉस्पिटल मधे काम करणार्या) घेऊन गेलो होतो. तपासून झाल्यावर, 'औषध लिहून देतो, बरं वाटेल' असं सांगितलं. एक-दीड डझन वेळा आमच्या दोघांचा, 'diagnosis काय आहे? काय औषध दिलय?' - 'औषध लिहून दिलय, बरं वाटेल', लूप झाला. शेवटी हा मनुष्य वेगळं काही उत्तर दिलं नाही तर टळणार नाही, अशी खात्री पटल्यावर, अत्यंत त्रासिक मुद्रा करून जुजबी काहीतरी सांगितलं आणी त्याहून अधिक खोदकाम केल्यावर मग, 'whiplash injury आहे आणी मसल रेलॅक्संट दिलय' हे उत्तर आलं.

As a paid service provider, संपूर्ण माहिती देणं ही डॉक्टरची जवाबदारी आहे. आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेरची केस असल्यास तसं पेशंट ला सांगणं, शक्य असल्यास, योग्य डॉ. कडे पाठवणं, ही जवाबदारी संपूर्णतः डॉ. ची आहे, अन्यथा ती malpractice आहे.

डॉक्टर प्रामाणिक आहे हा विश्वास बरेच जण बाळगतात

रुग्णाची शारीरिक वेदना आणि त्याचे रुग्णावर आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींवर होणारे भावनिक परिणाम यामुळे योग्य, अयोग्य, चूक, बरोबर, खर, खोटं हे सगळ तपासून पाहण्याची क्षमता त्या वेळी कमी झालेली असते.
अस वागणं चूक आहे मान्य, पण अस बरेच वेळा असं होत हे ही तितकच खरं.

अशा वेळी त्या डॉक्टर ची जबाबदारी रुग्णापेक्षा अधिक आहे आणि जर तो किवा ती जाणून बुजून चुकी चे उपचार देत असेल किवा त्या मधील तज्ञ नसताना तस सांगत असेल तर ते अधिक हानिकारक

लवकर बर वाटावं आणि डॉक्टर सांगतोय मग हे बरोबर च आहे या विश्वासामधून बहुतेक वेळा डॉक्टर च ऐकल जात, कोणतेही उलट प्रश्न न विचारता.

जबाबदारी रुग्णाची आहेच की सगळ तपासून घ्यावं.
पण डॉक्टर रुग्ण या नात्यामध्ये डॉक्टर ने किमान प्रामाणिक असणे हे जास्त अपेक्षित आहे.

प्रत्येक प्रोफेशनमधल्या माणसाने आपापलं काम व्यवस्थित केलं तर मग सर्वोत्तमच. पण आज हा धागा लागतो आहे, त्यावर अनेक जण आपले अनुभव लिहित आहेत, याचाच अर्थ काही तरी प्रॉब्लेम आहे. इतकं मान्य?
डॉक्टर समाजाचा भाग आहे. तो याच समाजातून येतो. बरोबर? असेच सगळ्या प्रोफेशन मधली लोकं याच समाजातून येतात. जर समाजात काही खोटे, शोर्टकट घेणारे, कायदा न मानणारे, गुन्हा करणारे, फसवणारे लोक असतात तर ते डॉक्टरपेशात नसतील रादर नसावेत ही अपेक्षाच अवास्तव आहे. ते असणारच. बरोबर? प्रामाणिक असणे, विश्वास ठेवणे हे कितीही चांगलं/ आयडियल असलं तरी ते अशक्य आहे हे वास्तव आहे आणि ते नाकारून (डीनायल) अपाय जास्त होईल. इतकं पटतंय का?

म्हणून रुग्ण म्हणून आपण जागरूक रहायला नको का?

ह्या सर्व अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या, प्रथितयश व सो कॉल्ड हुश्शार डोक्टरांनी, डॉ. काटदरे किंवा डॉ दिवटे लोकांशी कसे बोलतात ते बघायला त्यांच्या पायाशी बसावे. अतिशय शांतपणे ऐकून घेतात व समोरच्याला समजाऊन सांगतात. दिवटे हे मेंदूविकारांचे डॉ. आहेत. अनेकदा नातेवाईक आजाराचे निदान ऐकल्यावर दु:ख व भावनावेग असह्य होऊन समोर कोसळतात. त्यांच्याशी कसे वागावे, बोलावे, त्यांना कसे सांभाळावे ह्याचे ट्रेनिंग व भान त्यांच्या रिसेप्शनपासूनच्या लोकांना आहे असे जाणवते. ते येतात तेव्हा खरंच देव आल्याचा, किंवा आपला तारणहार आल्याची भावना निर्माण होते पेशंटस मधे. हे डॉ. आपले आहेत व आपल्याला कधीच फसवणार नाहीतच ही भावना असते पेशंटस मधे. असे किती डॉ. अस्तात?

शनि/नारातील एक डॉ. दांपत्य, स्वतःच्या जुन्या पेशंटसना मुलाकडे जायला भाग पाडतात. तो लिमिटेड कुवतीचा डॉ.मुलगा दिवसेंदिवस लुबाडत सुटलाय. वाईट बाब अशी की अश्या केसेस कुठे बोलल्यासुद्धा जात नाहीत.

चिनूक्स, पटले नाही. योग्य उपचार मिळाले पाहिजेत ह्यात डॉक्टरची जबाबदारी पेशंटपेक्षा/नातेवाईकांपेक्षा अधिक आहे. आणि जर फसवणूक होत असेल तर व्यवस्था देखिल दोषी आहे.

चिनूक्स, अमितव

तुम्ही विमानप्रवास करत असाल ना ?
तिथे जिवाशीच संबंध असतो. तुम्ही प्रत्येक वेळी पायलटचा अनुभव, सर्टिफिकेट हे पाहून मगच विमानात बसता का ?

सोमणांंचं सर्टिफिकेट मी चेक केलं नाही हे मी मान्य केलंय.

सोमणांच्या बाबतीत माझी चूक झाली, डॉक्टरची काहीच नाही हे मान्य करू.
वडीलांच्या बाबतीत ज्यांची नावे मी लिहीली आहेत त्यांची सर्टीफिकेट्स आहेत. त्यांची नावं आदराने घेतली जातात. त्यांच्या बाबतीत त्याच त्या टेस्टस करायला लावणे आणि त्या बदल्यात कमिशन उपटणे यातून तुम्हाला काहीच शिकायला मिळालं नाही , फक्त डॉक्टरांचे सर्टिफिकेट पहावेत एव्हढाच अर्थबोध तुम्हाला झाला हा सुद्धा फायदाच , नाही का ?

इथे आलेल्या अनुभवातून इतर लोकांनी अव्वाच्या सव्वा तपासण्या सांगितल्यानंतर त्यांना या अनुभवाचा फायदा व्हावा हा हेतू होता खरं तर. या डॉक्टरांच्या चक्रात सापडल्यानंतर ते तुम्हाला किती काळ फिरवणार आहेत, गुण यायला किती काळ लागेल असं प्रेदीक्ट न करता येणं ही पण पेशंटची चूक असेल तर ती पण मला मान्य आहे.

इथून पुढे अनुभव लिहीणा-यांनी हे ध्यानात ठेवावं.
(माझी सांपत्तिक स्थिती, इन्कम हे काहीच त्या काळात ब-यापैकी नव्हतं. जे कमावत होतो ते यातच जात होतं. जमिनी विकून रांगा लावणारे लोक पण असतात. तुम्ही विमानप्रवासाला निघताना, बसमधे चढताना ड्रायव्हर कडे किमान कौशल्य असेल असा विश्वास असणारी यंत्रणा जशी आहे तशी लाईफशी संबंधित या व्यवसायात नसावी याबद्दल या क्षेत्रातल्या लोकांची काहीच जबाबदारी नसावी आणि तरीही नोबल प्रोफेशन म्हणायचं.. तर मान्य आहे)

चिनुक्स, असहमत.

काही उदाहरणे -
माझे डोके प्रचंड दुखत होते. दवाखान्यात गेले. डॉ बाईंनी तपासले गोळ्या सांगितल्या, २०० रु दिले. काय निदान असे विचारल्यावर ...तसे ठिक दिसते पण अ‍ॅसिडीटी वाढली असेल असे सांगितले. डोके पुढील ४ दिवस तितकेच ठणकत राहिले. डोळे तपासून झाले होते. मग परत त्यांच्याकडे गेले. तेव्हा त्यांनी बीपी चेक केले..ते जास्त होते. तर हसत हसत म्हणाल्या....अगंबाई "आपण" गेल्या वेळेस पाहिलंच नाही की हे. ( परत २०० घेतले, गोळ्या सांगितल्या, ह्या वेळेस भगवंताच्या कृपेने डोके थांबले)

जोशी हॉस्पिटलला वडील अ‍ॅडमिट होते. आजाराचे निदान झाले नव्हते. फक्त टेस्ट्स व बिलाचा आकडा फुगत चालला होता. तिथे दिक्षित डॉ. त्यांना बघत होते. वडिलांना काय झाले असेल असे मी विचारले असता तिरसटपणाने हसत हसत म्हणाले की तुम्हाला बरे होण्यात स्वारस्य आहे की निदान समजण्यात?
तेव्हा मी त्यांना तितक्याच शांतपणे म्हणाले होते की, माणूस मेला तरी निदान सांगावे लागते आणि आमचा पेशंट तर जगला आहे. मग निदान समजायला नको? डॉ ना निदान न समजणे असे होऊ शकते पण अशा वेळेस जरा निट बोलायला नको का?

ह्या डॉकटरांना आम्ही वडिलांचा ताप वाढला असता घरून फोन केला होता. जवळपास साडेचार ताप होता व वडिलांचे वय ७८ त्यामुळे डायरेक्ट दवाखान्यात अ‍ॅडमिट करू का असे विचारले. आम्हाला त्यांचे हॉस्पिटलायझेशन करणे शक्य होते कारण ते इन्शुअरन्स मधे कव्हर्ड होते हेही त्यांना सांगितले ( म्हणजे आमचा खर्च वाचावा असे काही कारण नव्हते). तरी, नको आधी क्लीनीकला आणा असे सांगितले. कसेबसे वडीलांना आपटे रोडवरच्या त्यांच्या क्लीनीकमधे नेले, तिथे २ तास थांबवून मग त्यांची टर्न आल्यावर तपासून मग चिठ्ठी देवून अ‍ॅडमिट करायला सांगितले. थोडक्यात स्वतःच्या नावाचा शेंदूर लावून पेशंटला हॉस्पिटलमधे धाडला. त्यासाठी पेशंटला झालेल्या त्रासाची त्यांना त्याची कदर नव्हती.

अमित????

इतकं ऑर्गुमेंट का करताय ? अशाने कुणी अनुभव लिहीतील का आपले ? तुमचे ऑर्गुमेंट खोडून काढायचे नाहीत. पण अशक्यही नाही ते,

डॉक्टर समाजाचा भाग आहे. तो याच समाजातून येतो. बरोबर? असेच सगळ्या प्रोफेशन मधली लोकं याच समाजातून येतात. >>>> इतर कुठल्याही धंद्यात आपण त्या व्यावसायिकाला खडे बोल सुनावू शकतो. कायद्याचा बडगा असतो. हा नोबल प्रोफेशन आहे. या धंद्याला ग्राहक हक्क कायदा लावण्यालाही डॉक्टरांचा विरोध आहे. असं असताना जबाबदारी कुणाची ?
तो कायदा लागू नये म्हणून जे युक्तीवाद केले गेले होते ते एकदा तपासून पहा. अगदीच भारतातलं वातावरण नव्यानेच अनुभवतोय असा पवित्रा नको. थोडं फार लक्षातही असेल जायच्या आधीचं (शॉर्ट टर्म मेमरीचा त्रास नसेल तर Lol Light 1 )

खेड्या-पाड्या मधे अजुनही डॉ.ची डिग्री पहात नाहीत.
सुशिक्षित लोकंपण आयुर्वेदिक्,होमिओपैथी,एलोपैथीतला फरक समजत नाहित कारण हे डॉ.सर्रास इंग्रजी औषध
देतात.(एलोपैथी)
डॉ.चा बोर्ड वाचुन लोकआत जातात.

डॉ.ना प्रश्न विचारलेल आवडत नाही.
कापोचे यांच्या सारखे अनुभव शेकडो लोकांना येतात.

बय्राचदा ट्रीटमेंटचा संशय आल्यावर दुसरीकडे योग्य आणि स्वस्तात उपचार झालेल्याचे बरेच अनुभव आहेत माझ्याकडेही.
एका डॅाक्टराने तर सांगितले "तुम्ही सरांची ( सिनिअर डॅा) ट्रीटमेंट घेत होता म्हणून बोललो नाही. ओपरेशनची गरज नाही.शंभर रु च्या गोळ्यांत बरे होते."
तसे झालेही.

मूळ प्रतिसाद संपादीत करण्यात आल्यामुळे माझाही प्रतिसाद स्वयंसंपादीत, जेणेकरून चर्चा विषयावर होण्यात बाधा येणार नाही.

अमितव
तुमची अनालोगी पटली हो, पण काये प्रॉब्लेम सोल्व्ह नाही झाला तर क्लायंट शिव्या घालतोच. तो काय हो होत आस कधी कधी काही करत नाही. सरळ एकतर पेनल्टी मारतो, येस, देअर इज अ पेनल्टी इफ युअर सॉफ्टवेअर इज बगी.

तर डॉक्टरांना प्रोब्लेम सोल्व्ह नाही करता आला तर पेशंट किंवा इतरांनी शिव्या घातल्या तर काय प्रॉब्लेम?

नेटसज्ञान मायबोलीकरांनी अविचाराने व कोणतीही चौकशी न करता घिसाडघाईत गाठलेल्या डॉक्टरांचे चुकून आलेले वाईट अनुभव' असे शीर्षक द्यावे लागेल आता >>> हे बाजू घेणं आहे का ? धन्यवाद मग यासाठी.

माझे २००७ चे अनुभव नेटसज्ञान नसलेला म्हणून धरावेत ही नम्र विनंती. सुदैवाने नेट वर आल्यानंतर चांगल्या डॉक्टरांशी मैत्री झाली. त्यामुळे इथून पुढे मैत्रीत चांगले रेफरन्सेस मिळतात. चांगली ट्रीटमेंट मिळते. आता मला काळजी नाही. तक्रारही नाही.

>>>नेटसज्ञान मायबोलीकरांनी अविचाराने व कोणतीही चौकशी न करता घिसाडघाईत गाठलेल्या डॉक्टरांचे चुकून आलेले वाईट अनुभव' असे शीर्षक द्यावे लागेल आता >>> हे बाजू घेणं आहे का ? धन्यवाद मग यासाठी.<<<

हे अमितव ह्यांच्या प्रतिसादावरील उत्तर आहे. हे लक्षात येत नसेल तर काही करू शकत नाही.

Mhanalel na ha dhaga bharbharun vahanar : राग: to bee cha important dhaga band padala

Pages