Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 02:54
डॉक्टरांचे/ हॉस्पिटल्स्चे वाईट अनुभव इथे लिहुयात. पुढे जाऊन इतरांना फायदा होईल.
ह्या धाग्याचे प्रयोजन, सर्वच डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्याचे नक्कीच नाही, परंतु डॉक्टर हा देव आहे व तो आपले भलेच करेल ह्या (रुग्णाच्या किंवा नातेवाईकांच्या) पारंपारिक, भाबड्या व आंधळ्या श्रद्धेला छेद देणारी अनेक उदाहरणे वरचेवर आजूबाजूला दिसत आहेत. त्यामुळे ह्या व्यवसायातल्या व्यावसायिकांकडून आलेले वाईट अनुभव व धोके इतरांना समजले तर त्यांना अजून जागरुक होता यावे ह्यासाठी हा धागाप्रपंच.
अधिक माहिती - चांगल्या डॉ. चे अनुभव असा दुसरा एक धागा देखिल आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नावानिशी एखाद्याची जाहीर
नावानिशी एखाद्याची जाहीर बदनामी करावी का असा मॉरल प्रश्न मला पडला होता. पण मग टायटल मधे पुढच्यास ठेच, मागचा शहाणा वाचलं आणी प्रश्न सुटला.
बाजीराव रोड ला डॉ. अनिल लोंढे नावाचे एक डेंटीस्ट आहेत. एके काळी पूर्ण कुटुंबाचे डेंटीस्ट असल्यामुळे चांगला चौरस अनुभव आहे. दात ठणकतोय आणी जगात फक्त हा एकच डेंटीस्ट आहे, अशी परिस्थिती उद्भवलीच तर Castaway मधल्या Tom Hanks चं नाव घेऊन बत्त्याने दात पाडीन पण ह्या माणसाकडे जाणार नाही. अर्धवट आणी कधी कधी अनावश्यक, चुकीचे उपचार (पुढची सोय?), अवाच्या सवा बिलं असे असंख्य सद्गुण ह्या गृहस्थांकडे आहेत.
कपोचे, तुम्हाला आलेल्या
कपोचे,
तुम्हाला आलेल्या अनुभवांतल्या पहिल्या गायनॅकॉलॉजिस्ट क्वालिफाईड नव्हत्या असे दिसते.
दुसरे डॉक्टरही तसेच क्वालिफाईड नसावेत असे त्यांची रिसेप्शनिस्टच सांगते आहे.
हे दोन्ही क्वॅक या सदरात मोडत नाहियेत का?
कठीण आहे ब्वा तुमचं. तुमच्या बाजूने बोललं तरी तुम्ही शिंगे रोखून अंगावर का येता?
दीडमा कॉपी पेस्ट करताना निदान
दीडमा
कॉपी पेस्ट करताना निदान पूर्न तरी करत जा. तिचं म्हणणं काय आहे हे पुन्हा एकदा वर जाऊन वाचा बघू. ती पेशंटस हँडल करते असं म्हणाली असं लिहीलेय का मी कुठे ? तरी तुम्ही सद्गदीत कशाने झालेला आहात ? काहीही माहीत नसताना गोळीबार कशाला करत असता नेहमिच ? त्या आमीरखानच्या धाग्यावर तुम्ही एकटेच हास्यास्पद युक्तीवाद करत होतात.
सरकारी नोकरांमधेही अनेक लोक प्रामाणिक असतात. पण सरकारॉ नोकर भ्रष्ट असतात अशी टीका होऊ लागली की ते अशी अंदाधुंद गोळी चालवत नाहीत. कारण असा भ्रष्टाचार आहे हे त्यांना मान्य अस्त > भ्रष्ट लोकांची बाजू कशाला घ्ञायची ? तुम्ही कसे आहात हे तुमचं तुम्हाला ठाऊक असेल. इतरांच्या उठाठेवी करताना अंधपणे खोटं ठरवताना तुमच्याकडे काय आधार आहे स्टेटमेण्ट करण्ञाचा ?
कपोचे, तुम्ही काय बोलताहात,
कपोचे,
तुम्ही काय बोलताहात, ते तुम्हाला ठाऊक आहे, असे दिसते.
सध्या माझा तुम्हाला पास.
मला प्रतिसादात उपरोध
मला प्रतिसादात उपरोध जाणवला.
सद्गदीत होणे इत्यादी. पहिली डॉक्टर क्वालिफाईड नव्हती. पण ती गानलांकडे प्रॅक्टीस करत होती. पुण्यात गानलांचं नाव आहे हे तुम्हाला माहीती असायला पाहीजे. गानलांचं नाव ऐकून कुणी खोलात शिरणार नाही. आणि जर असे अनुभव आले तर मग पुढे ब्रह्मदेव आला तरी त्याच्यावर सहजासहजी विश्वास ठेवला जाणार नाही. अशा अनुभवातून शिकलो म्हणावं लागेल.
डॉक्टर सोमण हे स्त्रीरोगतज्ञ नव्हते तर पोटाचे सर्जन होते.
सेनेतून मनसे बाहेर पडली की
सेनेतून मनसे बाहेर पडली की क्वॉय होते बरे?
सध्या माझा तुम्हाला पास. >>
सध्या माझा तुम्हाला पास. >> योग्य निर्णय. अभिनंदन आपले.
खळळ फट्याक. या धाग्यावर
खळळ फट्याक.
या धाग्यावर एखाद्या व्यक्तीला विशिष्ट डॉक्टरचे वाईट अनुभव आले असं त्याने लिहिलं तर त्या व्यक्तीची उलट तपासणी घ्यायला विरोध असू नये. तुम्ही तुमच्या अनुभवातून काही लिहिताय त्याला अनेक पदर असू शकतात. तो डॉक्टर माबो वर नाही, तर कोणी लिहिणाऱ्या व्यक्तीचं इथे इथे चुकलं म्हटलं तर त्याला राग येऊ नये असं वाटतं. रादर राग आला तरी दुसरी बाजू असेल असं वाटत असेल तर लिहाच. तिसऱ्याला त्याचाही फायदाच होईल.
@ अमितव अमुक महोदयांना
@ अमितव
अमुक महोदयांना (लक्ष्मी रोडला स्मृतीशेष डॉ. सोमण) डॉक्टरकीतलं काही कळत नाही, मलाच हँडल करावं लागतं असं रिसेप्शनिस्ट सांगते, व हँडलही करते, हा अनुभव सद्गदित करून गेला.. >>>> हे वर कॉपी पेस्ट केलेलं विधान.
मूळ विधान असं होतं.
त्यानंतर त्यांच्या क्लिनिकमधली रिसेप्शनिस्ट भेटली होती. तिने सांगितलं की ते स्त्रीरोगतज्ञ नाहीत. त्यांना यातलं काहीही कळत नाही. भरपूर तक्रारी येतात, बरेचदा मलाच हँडल कराव्या लागतात.
आय रेस्ट माय केस. चालूद्या सर्वांचं.
कपोचे, दीड वर्षांत ते
कपोचे,
दीड वर्षांत ते स्त्रीरोगतज्ज्ञ नाहीत, हे लक्षात न येणं हेही चूक आहे, असं नाही का वाटत तुम्हांला?
हो चूक आहे. पण मला कसं कळणार
हो चूक आहे. पण मला कसं कळणार होतं ?
बायकोच जात होती. संध्याकाळी असेल तर मला जमत होतं. तेव्हढ्या वेळात संशय देखील नाही आला.
मीरा हॉस्पिटल मधून अल्ट्रासॉनिकसाठी यांच्याकडे पाठवलं जायचं. तेव्हां ते बरेचदा गोड बोलत असत. त्यांनी अशी प्रॅक्टीस करावी का हा प्रश्न आहे. हा अनुभव इथे मांडलाय.
प्रत्येकवेळी आपण क्वालिफिकेशन्स कुठे चेक करतो ? हे माझंच नाही. तिथे रांग असायची पेशंटसची. कोर्ट केसेस बद्दल नंतर कळालं. हे आधी कळालं असतं तर बंद केली असती ट्रीटमेंट. .
चिनूक्स, I beg to differ.
चिनूक्स, I beg to differ. तुमचं हे विधान retrospective आहे आणी hindsight is always 20/20. जनरली डॉक्टरकडे जाण्याची वेळ बरेच वेळा सारासार बुद्धीवर मात करते आणी बुडत्याला काडीचा आधार म्हणायला लावते. दुसरं म्हणजे, आलेले अनुभव ईथे मांडणं अपेक्षित असताना, असे retrospective प्रश्न विचारून अनुभव मांडणारे defensive होतात.
अहो त्यातून कुणाला कळलं की
अहो त्यातून कुणाला कळलं की यापुढे दवाखान्यात सर्पतिकट लावलेलं बघावं तर फायदाच आहे की.
डॉक्टरच्या प्रोफेशनचं
डॉक्टरच्या प्रोफेशनचं सॉफ्टवेअर इंजिनियरशी कंपॅरिझन आणि तेही जिथे एखाद्याचा जीव जाऊ शकतो , कायमचं अपंगत्व येऊ शकतं अशा ठिकाणी >>> सिरियसली ?
सर्टीफिकेट समोर असूनही
सर्टीफिकेट समोर असूनही विश्वास असेल तर पाहीलं जात नाही. विश्वास उडाल्यावर त्याचाही काही फायदा नाही. सोमण स्त्रीरोगतज्ञ नाहीत पण ते अशी प्रॅक्टीस करतात हे डॉक्टरांना माहीत नसेल का ? कुणी त्यांच्यावर कारवाई नाही केली. तेच उदाहरण गानलांकडे काम करणा-या असिस्टंटचं.
आणखी एका मोठ्या रुग्णालयात असिस्टंट म्हणून होमिओपॅथी डॉक्टर आहे. सेठिया हॉस्पिटलमधे कमी पैशात मिळतात म्हणून ठेवतात कामाला. तुम्ही काय काय चेक कराल ?
आता नावं घेऊन लिहील्याने मायबोलीकडून आयपी अॅड्रेस घेऊन हे केसेस टाकतील तर माझी तयारी आहे .
दुर्दैवानं गेली १०-१५ वर्षं
दुर्दैवानं गेली १०-१५ वर्षं कुटुंबात अनेक आजारपणं अनुभवली असल्यानं त्या आधारे लिहितो आहे -
आपण डॉक्टराकडे जातो तेव्हा त्याचं क्वालिफिकेशन दवाखान्याबाहेरच्या पाटीवर लिहिलेलं असतं. माझ्या समजुतीनुसार तसं करणं कायद्यानुसार बंधनकारक आहे. अगदीच आणीबाणीच्या प्रसंगी आपल्याला डॉक्टर निवडण्याचं स्वातंत्र्य नसू शकतं, पण जेव्हा अशी वेळ नसते, तेव्हा आपला डॉक्टर आणि आपला आजार एकमेकांशी सुसंगत आहेत की नाही, त्या डॉक्टरांना अनुभव किती ही माहिती सहज मिळू शकते.
उपचार सुरू झाल्यानंतर डॉक्टर माहिती देत नसतील तर ती आपणच विचारावी. दिलेल्या औषधांचं काम नक्की काय, आजाराचं कारण काय ही माहिती पेशंटच्या कुटुंबीयांना असायलाच हवी. दवाखान्यात अॅडमिट केल्यावर गोळ्या वेळच्या वेळी दिल्या जात आहेत की नाही, शुगर / बीपी वेळेवारी मोजलं जातं आहे की नाही, हेही आपण बघायला हवं. शस्त्रक्रिया का आणि कशी केली जाणार आहे, त्यातले धोके काय, नंतर काय काळजी घ्यावी हेही माहीत असायला हवंच.
डॉक्टर चुकू शकतो. पण पेशंटनं अथवा पेशंटच्या नातेवाइकानं चुकणं, 'आम्हांला माहीतच नव्हतं / सांगितलंच नाही' असं म्हणणं हे अक्षम्य आहे. ज्यांच्याकडे पैसा नाही, साधनं नाहीत, त्यांच्या बाबतीत हे अज्ञान मी मान्य करतो. पण पैसा, इंटरनेट, इतर डॉक्टरांचं मत घेण्याची ऐपत असं सगळं असताना आजाराचे आणि उपचाराचे तपशील माहीत नसणं, हे मला गैर वाटतं.
हे केवळ याच बाफच्या संदर्भात लिहिलेलं नाही. अवतीभवती 'आम्हांला नाही माहीत / माहीतच नव्हतं / कळलंच नाही' म्हणणारे अनेक असल्यानं हे लिहिलं आहे.
डॉक्टरांचे जर काही वाईट अनुभव
डॉक्टरांचे जर काही वाईट अनुभव आलेले असले तर ते लिहिण्यासाठी हा धागा आहे असे म्हंटल्यानंतर ते वाईट अनुभव जर पेशंटच्याच अज्ञानामुळे किंवा काहीश्या हलगर्जीमुळे आले असले तर त्यात पेशंटला पूर्ण जबाबदार म्हणायचे का?
मला तरी फेरफटका ह्यांचा मुद्दा पटत आहे बुवा. डॉक्टरी ज्ञानातील काही कळत नसते म्हणून माणूस डॉक्टरकडे आशेने जातो. पोझिशनिंग असे असते की मालविक्रेत्याला विचारले जाऊ शकते तसे डॉक्टरला त्याचे सर्टिफिकेट, पूर्वानुभव, ट्रॅक रेकॉर्ड वगैरे विचारता येत नाही. सर्टिफिकेट अनेकदा मागे लावलेले असते म्हणा! त्यात पुन्हा डॉक्टर अधिकारवाणीने कोणत्याही आजाराबाबत बोलू लागला की पेशंट गपचूप होतो. इतर पेशंट्सची गर्दी वगैरे बघूनही मनावर परिणाम होतो.
टीप - बरेचसे डॉक्टर्स असे असतात असे मुळीच म्हणायचे नाही. पण कोणीच नसतात असे तरी कसे म्हणता येईल?
पंधराच दिवसांपूर्वी एका
पंधराच दिवसांपूर्वी एका कॉलेजशी निगडीत एका कामाच्या संदर्भात एक पोक्त वयाच्या बाई भेटल्या ज्या गायनॅकची प्रॅक्टिस करत असत असे त्याच म्हणाल्या. एका कागदपत्रावर त्यांची पदवी एम डी गायनॅक अशी लिहिलेली दिसतात त्या उसळून म्हणाल्या की मी प्रॅक्टिस करत असे, मी एम डी नव्हे. हे मला काही समजलेच नाही. गायनॅकची प्रॅक्टिस करण्यासाठी एम डी असणे किमान आवश्यक असते अशी माझी समजूत! तसे नसते का? साधा एम बी बी एस डॉक्टर अशी प्रॅक्टिस करू शकतो का?
त्या बाईंचा सात्विक संताप पाहून मी आपले दोनतीनदा सॉरी म्हणालो. पण सॉरी कोणी म्हणायला हवे असा प्रश्न मला तेव्हाही पडला होता. त्या इतके मात्र म्हणाल्या की त्यांच्या डिग्रीच्या उल्लेखाबाबत त्या अतिशय पर्टिक्युलर असतात. पण मग त्या प्रॅक्टिस कश्या काय करत होत्या हे समजले नाही.
अर्थात, एका एम बी बी एस ला शरीरातील संपूर्ण ज्ञान असते इतके मलाही समजते.
चिनूक्स माझे अनुभव इंटरनेटवर
चिनूक्स
माझे अनुभव इंटरनेटवर येण्याच्या आधीचे आहेत. तसंच डॉक्टरांचीही उलटतपासणी घ्यायची असते हे किती टक्के लोकांना ठाऊक अस्तं ?
सोमणांचे क्लिनिक लक्ष्मी रोडवर सरस्वती शाळेच्या शेजारच्या इमारतीत चाळीत दुस-या मजल्यावर होते. व्हरांड्यात रिसेप्शन्सिटची जागा बनवली गेली होती. आत उजव्या हाताला कन्स्लटन्सी आणि डाव्या जाताला सोनोग्राफी. सर्टीफिकेट पण दिसलं नसतं. असतं तरी पाहीलं गेलं नसतं.
उघड उघड लक्ष्मी रोडवर एखादा भोंदू प्रॅक्टीस करू शकतो हे कसं काय ? मुळात कुठला स्पेशालिस्ट कशासाठी असतो हे सुद्धा अनेकांना ठाऊक नसतं. एमबीबीएस, एमडी हे पाहीलं की बास असतं लोकांना. या लाईन मधे इतरांकडून कसं काय चालू दिलं जातं हा प्रश्न महत्वाचा नाही का ?
आपण प्रवासाला निघतो तेव्हां ड्रायव्हरकडे लायसेन्स आहे हे पाहतो का ? त्याच्याही हाती आपला जीव असतो. ज्या अर्थी तो बस चालवतोय त्या अर्थी ..... याच विचाराने लोक जात असतात.
असो. चूक ती चूक.
कपोचेंच्या उदाहरणात त्यांनी
कपोचेंच्या उदाहरणात त्यांनी डाॅक्टरचं क्वालिफिकेशन तपासण्यात हलगर्जीपणा केला; कबुल. पण त्या डाॅक्टरांनी स्वत:कडे ते स्पेशलायजेशन नसताना दिड वर्ष उपचार/सल्ला देत रहाणं हे जास्त अनएथिकल, डेंजरस नाहि?
श्री, हो. कारण प्रॉब्लेम
श्री, हो. कारण प्रॉब्लेम सोल्व्हिंग स्किल्स ही सारखीच असतात. टेस्ट इ. मध्ये अचूक निदान झालं तर उत्तमच. पण झालं नाही तर जे इंजिनिअर करतो त्याच प्रकारे डॉक्टर करतो हा माझा अनुभव आहे. रादर डॉक्टरकडे फ्लो चार्ट असतो जो बऱ्याच केसेस मध्ये तो फॉलो करतो. त्याला अनुभव आणि कौशल्याची जोड देतो जी इंजिनिअरही देतो.
एक एम. आर. आय. केली त्यात नीट कळलं नाही तर मग रक्तातून स्टेन टाकून परत एम. आर. आय. करू त्यात जास्त सुस्पष्ट दिसेल हा विचार आणि वेगवेगळ्या गोष्टी बग शोधताना ट्राय करणे यात फार फरक वाटत नाही.
कृपया या विधानाचं व्हाईट वॉश जनरलायझेषन करू नका.
चिन्मयशी पूर्णपणे सहमत. डॉक्टरने काहीही सांगितलं तरी तिथे त्याला/ तिलाच स्वतःला समजेपर्यंत प्रश्न विचारावे. ते काही कारणाने शक्य नसल्यास घरी आल्यावर व्यवस्थित शोध घ्यावा. आपलं समाधान करायचा शक्य तेवढा प्रयत्न करावा. नेट वर समजेल अशा भाषेत काही आहे का? काही फोरम आहे का? सपोर्ट ग्रुप आहेत का? त्यात काही माहिती मिळत्येय का? हे करणं बेसिक काम आहे. डॉक्टर चुकला/ली तर जीव तुमचा आहे. तुम्ही पुरेसे प्रयत्न केले नाहीत ही डाचणी मनात येऊ नये इतपत तरी प्रयत्न ज्यांना शक्य आहेत त्यांनी कराच करा. विषयाला धरून नसेल तर माफ करा, पण तुमचा जीव दुसऱ्यावर सोपवताय तर कमाल प्रयत्न तुम्ही करणे अत्यंत आवश्यक आहे.
अमितव, ॲनलजी थोड्याफार
अमितव, ॲनलजी थोड्याफार प्रमाणात ठिक आहे पण मुद्दा हा आहे कि दोन्हि प्रोफेशन मध्ये हुशार, सज्जन लोकांबरोबर लुच्चे, पाट्या टाकणारे लोकहि आहेत. हा धागा लुच्च्या लोकांना फुकट प्रसिद्धि देण्याकरताच आहे...
वर विषयांतरा बद्दल माफी
वर विषयांतरा बद्दल माफी मागितली आहे. परत मागू का?
अमितव, >>> डॉक्टरने काहीही
अमितव,
>>>
डॉक्टरने काहीही सांगितलं तरी तिथे त्याला/ तिलाच स्वतःला समजेपर्यंत प्रश्न विचारावे. ते काही कारणाने शक्य नसल्यास घरी आल्यावर व्यवस्थित शोध घ्यावा. आपलं समाधान करायचा शक्य तेवढा प्रयत्न करावा. नेट वर समजेल अशा भाषेत काही आहे का? काही फोरम आहे का? सपोर्ट ग्रुप आहेत का? त्यात काही माहिती मिळत्येय का? हे करणं बेसिक काम आहे. >>>>>
शहरात रहाणार्या, किमान शिक्षित रूग्णानं ही काळजी घेतली पाहिजे हे खरं, पण दूरवरच्या खेड्यातून ('डागतरानं चिठी दिलीया, तवा कामाचा खुळंबा करून आलुया') आलेल्या इयत्ता चौथीच्या पुढे न गेलेल्या रूग्णानं अथवा रूग्णाच्या नातेवाईकानं काय करावं?
त्याने काय करावं माझ्याकडे
त्याने काय करावं माझ्याकडे उत्तर नाही.
माबोवर जे लोक वाचतायत त्यांनी तरी इतकं करावं इतकच ह्या ओडीयंस समोर सांगेन. माझ्या पाहण्यात/ नात्यात असे बहुतांश लोक आहेत जे हे करत नाहीत. त्यांनी सुरुवात तरी करावी.
डॉक्टरने काहीही सांगितलं तरी
डॉक्टरने काहीही सांगितलं तरी तिथे त्याला/ तिलाच स्वतःला समजेपर्यंत प्रश्न विचारावे. ते काही कारणाने शक्य नसल्यास घरी आल्यावर व्यवस्थित शोध घ्यावा. आपलं समाधान करायचा शक्य तेवढा प्रयत्न करावा. नेट वर समजेल अशा भाषेत काही आहे का? काही फोरम आहे का? सपोर्ट ग्रुप आहेत का? त्यात काही माहिती मिळत्येय का? हे करणं बेसिक काम आहे. डॉक्टर चुकला/ली तर जीव तुमचा आहे. तुम्ही पुरेसे प्रयत्न केले नाहीत ही डाचणी मनात येऊ नये इतपत तरी प्रयत्न ज्यांना शक्य आहेत त्यांनी कराच करा. >>> अमितव हे नक्की कुठल्या भारताविषयी बोलतोयस ? वेस्टर्न कंट्रीज मध्ये जेवढा वेळ डॉक्टर त्याच्या पेशंटला देतो / डिस्कस करतो त्याच्या १/१० वेळही भारतात देत नाहीत.
आणि ऑनलाईन माहीतीविषयी बोलायचं तर आपण मायबोलीवर माहीती विचारणार्यांची टर का उडवतो मग ?
अमितव पुन्हा पुन्हा लिहावंसं
अमितव
पुन्हा पुन्हा लिहावंसं वाटत नाही. तुमचं म्हणणं योग्य आहे. चिनूक्स म्हणतात ते ही योग्य आहे.य्ते कुणीही अमान्य करणार नाही.
मूलासाठी ट्रीटमेंट घेतात त्यांच्या बाबतीत आशा असते. वाईट असते ती. लोक तर भोंदू बाबांकडेही जातात. आम्हाला ते मान्य नाही म्हणून डॉक्टरांकडे जातो. ते फसवणार नाहीत असा विश्वास असतो. जी कायदेशीर प्रॅक्टीस आहे असा विश्वास असतो. डॉक्टरांचीही तपासणी करावी इतका अवेअरनेस अजून आलेला नाही. मी इंटरनेटवर आलो २००७ साली. तेव्हांच सेकंड ओपिनियन वगैरेच्या बाबतीत आणखी स्पष्टता आली. यापूर्वी आधीच्या डॉक्टरांना वाईट वाटेल म्हनून गुपचूप सेकंड ओपिनियन घेतला होता. अनेकांना तशी गरज भासत नाही. ही पण अंधश्रद्धाच.
अशा प्रकारच्या ट्रीटमेंट मधे तेच रिपीटेशन असतं जे वेळखाऊ असतं. त्यात काही संशय येण्यासारखं घडलेलं नाही. ती रिसेप्शन्सिट भेटली नसती तर अशी फसवणूक झालेली आहे हे देखील कळालं नसतं.
पुणे शहरासारख्या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी साठीच्या पलिकडचा एक डॉक्टर राजरोस मी ट्रीटमेंट देतो असं म्हणून अनेक वर्ष आपलं दुकान चालवतो, तर संशय येईल कसा ? त्याला अटकाव कसा नाही होत ? आपल्याला इतर धंद्यातही दोन नंबरचं काम उघड उघड करायची भीती वाटते.
अनेकदा आपलं डोकं तज्ञांकडे सोपवून निर्धास्त व्हावं असंही वाटतं. अशाने आपलं कामधंदा सोडून गाडी गॅरेजमधे द्यायची म्हटली तरी शक्य होणार नाही. सगळ्याच गोष्टींचं ज्ञान आपण ठेवणं खरंच गरजेचं आहे का ?
ज्याचं काम त्याने विश्वासाने केलं तर इथे अनुभव लिहायची पाळी आली नसती. माझ्या समजुतीप्रमाणे रुग्णाचा डॉक्टरबद्दल गैरसमज झाला असे माझे अनुभव नाहीत. त्याबद्दल उलटतपासणी घेतली तर चांगलेच होईल.
डॉक्टर वेळ देत नाही ही दुहेरी
डॉक्टर वेळ देत नाही ही दुहेरी समस्या आहे. तुम्ही जर प्रश्न विचारले की डॉक्टर (बऱ्याचदा भारतातही) वेळ देतात असा मला तरी अनुभव आहे. अनेक ठिकाणी त्यांचे असिस्टट सांगू शकतात. वेळ दिलाच नाही आणि तुम्हाला त्याच डॉक्टर कडे जायचं असेल तर ऑनलाईन शोध घ्या हे म्हणतोय. टर उडवतोच, पण आज इथे शहाणे करून सोडावे मोड घेतलाय. इतकंच.
तुझ्या मुद्द्याला छेद द्यायचा
तुझ्या मुद्द्याला छेद द्यायचा आहे म्हणून लिहीलं नाही, किंवा वाद घालायचा म्हणूनही लिहीलं नाही. हा अगदी खरा प्रॉब्लेम आहे. माझ्या माहेरी सासरी मागच्या आणि आताच्या पिढीत जवळचे नातेवाईक डॉ. आहेत. माझे काका ६०च्या दशकातले बीजेचे ग्रॅअॅज्युएट. त्या पिढीतल्या नामांकित डॉ. चे जवळचे / घरगुती संबंध अजूनही आहेत. काकांचा दवाखाना मंडईजवळ असल्यानं येणार्या रूग्णांमधे गरीब, अशिक्षित लोक-कामगार असायचे. त्यांना चिठी देऊन काका मग 'मोठ्या डागदाराकडं' पाठवायचे. स्पेशालिस्ट मग काकांना फोन करून टेस्टसचे रीझल्टस सांगायचे. काका त्या रूग्णाला समजेल अशा भाषेत समजवून सांगायचे. तंत्रज्ञान पुढं गेलं तरी भारतात अजूनही 'मेडीकली इन्फॉर्मड' असणं अनेक कारणांनी शक्य नाही. अशा रूग्णांसाठी डॉ. हा देव, अंतिम शब्द असतो ही आजही वस्तुस्थिती आहे. तेव्हा डॉ.ची पदवी, ज्ञान, अनुभव अतिशय महत्वाचा ठरतो. काहीही झालं तरी रूग्णाच्या जीवाचा संबंध आहे तेव्हा डॉक्टरची भूमिका सॉफ्टवेअर इंजिनीअरपेक्षा थोssडी अधिक महत्वाची ठरते.
>>पण त्या डाॅक्टरांनी
>>पण त्या डाॅक्टरांनी स्वत:कडे ते स्पेशलायजेशन नसताना दिड वर्ष उपचार/सल्ला देत रहाणं हे जास्त अनएथिकल, डेंजरस नाहि?<<
चिनुक्स, अमितव - माझ्या या वरच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे का?
Pages