जोशीबुवा रिटर्न्स (टु यन्जे)गटग

Submitted by वैद्यबुवा on 4 February, 2016 - 09:26
ठिकाण/पत्ता: 
मैत्रेयीच्या घरी. कोणाला पत्ता हवा असल्यास डायरेक तिला इमेल धाडा.
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, March 5, 2016 - 11:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्या खुंटीवर माधुकरी मागायची झोळी टांगत असे त्याच खुंटीवर अमेरिकेचा व्हिसा असलेली बॅग टांगल्यावर घरच्यांना झालेला आनंद, अमेरिकेत येऊन खोर्‍याने पैसा ओढण्याची जिद्द,

>> Lol विकु महान आहेत.

गटग भारी झालं. लिटरली. खूपच खाल्लं.

ऑरेंज गाडीत मी विकुंना बसवायला बाहेर पडू लागलो, तर सोनिया रागावतील म्हणून ते पटकन थंडीचा फायदा घेऊन निघून गेले. खरेतर मध्येच मी भाजपाच्या अनेक गोष्टी मला पटत नाहीत असे म्हणल्यावर विकु दुसरीकडून कुठून तरी आले अन लगेच माझ्याशेजारची खुर्ची बळकावली. त्यांना मी आता काँग्रेस मध्ये कन्वर्ट होतो की काय असे वाटले असावे.

गाडी कन्वर्टीबल होती, पण थंडीमुळे लोकांनी (रिड बायांनी) टॉप उघडूच दिला नाही. तरी मैच्या घरी गेल्यावर टॉप उघडून फोटोफिचर मात्र करून घेतले. बुवांनी गाडी भगवी असल्यामुळे तिला मॅच व्हावे असे भगवे जॅकेट मात्र घातले होते.

विकु, Biggrin

गटग नेहमीप्रमाणेच धमाल. फारेन्डाची भेट हुकली. तिथे दर अर्धा तासानं कुणी ना कुणी 'अरे फारेन्डाचं काय झालं? त्याला फोन करा' अशी आठवण करून देत होतं.

यंदाच्या गटगचा हायलाइट आंब्याचा शिरा आणि दुधीहलवा. दुधीहलवा अशक्य भारी होता. केदारनं ती-न वाट्या दुधीहलवा खाल्ला. त्यातल्या दोन पग्याच्या नावाच्या होत्या म्हणे Proud

वाट्या? कुठे होत्या म्हणे? मस्त मुदी पाडून त्यावर बदाम पिस्त्याचे काप आणि चांदीचा वर्ख बिर्ख असा राजेशाही थाट होता.
पग्याच्या नावाने चीज केकचे किती तुकडे खाल्ले केदारने?
तो दुधीहलवा खाऊन मी मस्त पेंगत होते पण जोरात फोन वाजला आणि जाग आली.

अरे पग्याच्या नावाने तर सिंडीने पण एक मोठा बोल भरुन डिजर्ट्स घेतल्याचे दिसले मला! पग्या, आता तुझं काही खरं नाही. Happy

विकु Rofl

सॉलिड मजा आली! मेनू तर खत्तरनाक होताच. सॉलिड खाय खाय झाली. मी अक्षरशः न राहवून रिवर्स ऑर्डर मध्ये जेवलो! आधी दुधीहलवा मूद (रीडः गुलदस्त्यातला बदामाचा शिरा) , मग चिंगरी रस्सा-भात, मग पनीर/बघारे बैंगन-नान. मग नंतर जरा दम खाऊन अजून दुधी हलवा आणि थोडा चीझकेक असा डोंगर खालला!
बिर्यानी आणि आंब्याचा शिरा खायचा राहून गेला. Sad

परागच्या ४ ४ गुलाब जंबू एका मागून एक खायच्या सवयीचा तात्यांनी बर्‍याच वेळा उद्धार केला. केदार मामांची लै रॅगिंग घेतली काकवांनी. प्रेमळ होमकमिंग रॅगिंग म्हणून तात्यांनी ही वेल लेफ्ट केलं. इतका बोललो की आवाज बसला होता संध्याकाळी घरी येऊ पर्यंत.

अरे मी नाही एवढं गोड खाल्लं बुवांनी तीन वाट्या हाणल्या. मी आपली एकच मुद जी पानात गोराक्काने वाढून ठेवली होती ती खाल्ल्ली.

४ ४ गुलाब जंबू एका मागून एक खायच्या सवयीचा तात्यांनी बर्‍याच वेळा उद्धार केला. >> लोल. गोड कोण जास्त खाऊ शकतं हे मी सांगत होतो. Proud

केदार मामांची लै रॅगिंग घेतली काकवांनी. >> हो ना. च्यायला माझी वाटच लावली होती. मी अजूनही त्या ट्रॉम्यातुन बाहेर आलेलो नाही. Lol

केदार!! वाट कुठे लावली. चांगलं प्रबोधन केलं ते गेलंच कुठे. कित्ती बेसिक बेसिक मज्जा माहितच नव्हत्या तुला!
यू आर वेलकम Happy

यु आर वेलकम! Lol मै चं नाव आता प्रेमळ सासूबाई वरुन अपग्रेड करुन प्रेमळ ट्रंप सासूबाई ठेवण्यात येत आहे. Lol आम्ही तुम्हाल धोपाटतो अन कसं धोपाटलं म्हणून मग तुम्ही आम्हाला धन्यवाद म्हणा!

यू आर वेलकम >>>> Biggrin एवढ्या महत्वाच्या ऐतिहासिक घटनेचे दस्तावेज दाखवले ते गेलं उडत का?

चीजकेक खाता खाता माझी आठवण न काढल्याबद्दल निषेध !

कसली भारी डेझर्ट्स आहेत. मी असते तर मी ही रिव्हर्स ऑर्डरमध्येच जेवले असते बहुतेक Happy

हो ना, राहिलाच चिंगरीचा फोटु! लोक तुटूनच पडले चावा घ्यायला. बघता बघता उडालीचः)
हावरट आहेत बाराकर Happy वडे अन सुव पण , ट्रे खाली ठेवेपर्यन्त फस्त!

Pages