जोशीबुवा रिटर्न्स (टु यन्जे)गटग

Submitted by वैद्यबुवा on 4 February, 2016 - 09:26
ठिकाण/पत्ता: 
मैत्रेयीच्या घरी. कोणाला पत्ता हवा असल्यास डायरेक तिला इमेल धाडा.
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, March 5, 2016 - 11:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्र आणि गाणं भारी आहे.

पग्या, बुवांनी त्या थाळीवाल्याकडे नेले तरी मी गोड खाणार नाही. फार तर एखादा गुलाब जामून.

बुवा आपण त्या बाबुजी किंवा वतनला जाऊ.

अवो तुम्ही तर टेंशनमदी आले लगेच. Lol बस क्या? असं पाहुण्यांना तोंडघाशी पाडत नाही आम्ही Happy

(सायकल वर आले म्हणून काय झालं?)
Proud

च्यायला "तात्यांच्या" जयघोष चालू आहे सर्व बाफंवर. असं दिसतंय की ही लोकं बकर्‍याला कापायच्या आधीची पुजा करत आहेत.

Lol

तात्या बिल "कॅश" मध्ये देतात .. Happy

आणि सगळ्यांचे एक्स्प्रेशन्स् एक से एक आहेत .. पहिला माणूस एकदम रिजॉइस्ड (बहुतेक बुवा असणार ते) .. दुसरी काहीच देणंघेणं नसल्यासारखी नाक मुरडत आहे .. तिसरी भयभीत नजरेने बघतेय (ह्याबदल्यात आता तात्या काय डिमाण्ड करणार असा विचार करत असावीय) .. आणि चौथा /चौथे रागाने बघत आहेत .. त्यांनां दाढी असल्यासारखी वाटतेय .. तर ते भाई असतील कदाचित ..

स्वतः केदार तात्या जबरी तु. क. देत म्हणतायत .. "बघताय काय अचंब्यानं, बिल दिलंय तात्यानं" .. Lol

त्यांनां दाढी असल्यासारखी वाटतेय <<< दाढी नाही.. उजवीकडचे केस असावेत.. भाई असल्यास मिश्या पण असत्या ना? Happy

हो होऊ दे खर्च ! >> न्यू यॉर्क मधे $५०० पर नाईट असं हॉटेल तात्यांनीच रेकमेंड केलेलं ना Happy

उजवीकडचे केस >> मला गळ्यावरचे केस वाटले, म्हटले असेल कोणी आयाळ वाढवलेली Lol

लोकं बकर्‍याला कापायच्या आधीची पुजा करत आहेत. >> Lol

णिषेध !णिषेध !णिषेध !
मी असताना नेहमी देसी रेस्टॉरंट गटग आणि आता मै च्या घरी ग्रँड मेनु पॉटलक गट्ग.. कुफेहेपा..ये न्याय्नै अन्याय है !

Lol

गाणं, चित्रं आणि चर्चा Rofl

घरी भेटणार म्हणजे पदार्थांचे फोटोज व्गैरे पाहावे लागणार का काय आता किंवा गेलाबाजार मेन्यु अपडेट्स...मटकीला मोड आणायला घेतले, वेण्या बांधायच्या का?? वगैरे वगैरे Wink

एंजॉय Happy

पदार्थांचे फोटोज व्गैरे पाहावे लागणार का >>>> लागणार का???? पदार्थांचे फोटो पहाण्यातच तर खरा इंटरेस्ट असतो.. !!!

गेलाबाजार मेन्यु अपडेट्स.. >>>> देऊ द्यात मेन्यू अपडेट्स.. विंटरात सारखा बर्फ पडून, तो रस्त्यांवर साठून, शाळा बंद पडून, मुलं घरी अडकूनही (क्रिब न मारता) रांधतात बापडे ! Wink

Pages