वृद्धाश्रम, वृद्धाश्रमात पाठवलेले गेलेले वॄद्ध, अतिवृद्ध, त्यामागची कारणे इत्यादी

Submitted by वेल on 15 January, 2016 - 08:34

अनेक जण आपल्या पालकांना वृद्धाश्रमात ठेवतात. किंवा कधी कधी वृद्ध स्वतःच तिथे जाऊन राहतात.
मुलांची, वृद्ध पालकांची विचारसरणी, दोघांचे प्रॉब्लेम्स, बिहेवोरियल प्रॉब्लेम्स.
कुठे कुठे वृद्धाश्रम आहेत, ते कसे आहेत. त्यांचे चार्जेस काय आहेत.
वृद्धाश्रमात वृद्धांना कशी वागणूक मिळते. वृद्धांना घरी कशी वागणूक मिळते, ती का मिळते. वृद्ध जसे वागतात तए का वागतात.

अशा अनेक प्रश्नांवर इथे चर्चा करुया.

आज आपण सुपात असलो तरी कधी न कधी जात्यात जाणार आहोतच, म्हणजे वृद्ध होणारच आहोत. सो त्याआधी जरा मानसिक तयारी करु

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोलायला कुणी नसणे ही जनरलीच बहुतांश वृध्दांची समस्या आहे. कुटूंबात राहणारे असोत की वृध्दाश्रमात.
दीमांच्या पोस्टसना अनुमोदन. 'एकत्र राहत असलो तरी तुमच्या मुलांची जबाबदारी तुम्ही घ्यायची. आम्ही नातवंडं म्हणून हवे ते लाड, माया करू. पण त्यांचे पालन पोषण तुम्हीच करायचे. आमच्या मुलांचे करून आमचे मन भरले. दोघांना नोकरी करायची असेल तर मुलाची सोयही बघा.' असं स्पष्ट बोलणार्या वृध्दांना पूर्वी नाकं मुरडली जायची. पण मला वाटतं तेच योग्य आहे.

देवकी, मी दोन पिढ्यांच्या वृद्धांमधील एक फरक सांगितलाय. आधीच्या पिढीच्या वृद्धांकडे सोशलसाईटवर चार लोकं जोडण्याचा आणि गप्पा मारायचा पर्याय नव्हता जो येत्या पिढीकडील वृद्धांकडे असेल. अर्थात त्यासाठी सोशलसाइटवर रमायची आवड असावी लागते. माझ्या अंगी ती असल्याने मला टेंशन नाही असे म्हणालो ईतकेच.

या विषयावरील "बीइंग मॉर्टल" हेपुस्तज्क जरूर वाचा.
सखोल अभ्यास केला आहे लेखकाने.
लेखकाचे नाव अतुल गावंडे.
वयोमान वाढणे, पालकांचे उत्पन्न वाढल्याने त्यांना स्वत॑न्त्र राहायला आवडणे, मुले सुध्दा आर्थिक दृष्ट्या सबळ झाल्या मुळे त्यांची पालकावरील --- मृत्युपत्रात आपल्याला आई वडिलांनी द्यावे ही अपेक्षा कमी होणे -----इ. गोष्टींचा खूप उहापोह केला आहे.
त्याचबरोबर प्रत्येक वेळेस रोग काही ही असला तरी डॉक्टरांनी इलाजा नंतर जीवंत ठेवणे पेक्षा क्वालिटी ऑफ लाईपवर भर देण्याची गरज इ. वर खूप सुंदर व सखोल चर्चा केली आहे.

असं काहीतरी स्वतःच उभं करावं जिथे समविचारी, समान आवडिनिवडी असलेली, समान पॅशन असलेली विविध वयाची माणसे कायमची वा तात्पुरती राहायला येतील अशी एक महत्वाकांक्षा आहे. बघूया.. >>> मस्तच.

एखादा छंद जोपासावा.
चित्रं काढणे, स्वतःच्या आवाजात (ऐकणारे कुणीच नसेल तरी) गाणी रेकॉर्ड करणे , बरंचसं लिखाण चिक्कार गोष्टी आहेत राहून गेलेल्या ! नाटक बसवून, शॉर्ट फिल्म्स बनवून यु ट्यूब वर टाकायच्यात, जर्मन भाषेचा अर्धवट कोर्स पुरा करायचाय, गिटार शिकायचंय.. असलं काही करू देत असतील तिथे जायला आवडेल की !

आयुष्यभर जे केलं त्यातलं पुन्हा तेच तेच करण्यात मज्जा नाही (माझ्याबाबतीत).

चांगला विषय. चांगली चर्चा.

मलावृध्ध्दा श्रमात रहयला जमणार नाही. कारण वर सातीने सांगितलंय तेच.

अजुन आमच्या कडे कोणीही वृध्दाश्रमात राहिलेलं नाहीये. कारण सातीने लिहिलंय तेच <<<<<स्वतःच्या आईवडिलांना किंवा सासू सासर्‍यांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा प्रश्नच नाही. कारण त्यांच्या दृष्टीने तसं करणं हे मुलांच्या नालायकपणाचं आणि त्यांच्यावरचं प्रेम कमी झाल्याचं लक्षण आहे.>>>>>>

दीमांच्या पोस्ट्स नी विचार करायला लावलाय.

कापोचे - अगदी खरं आहे तुमचं एखादा तरी छंद जोपासायला हवाच,

लहानपणी जे शिकायचं राहून गेलय ते काही तरी ह्या वयात शिकायला घेणं महत्त्वाचं

जे काही छंद जोपासत नाहीत त्यांचं आयुष्य किती भयाण असतं आणि जे काही न काही छंद जोपासतात स्वतःला फुलवतात ते किती मस्त राहू शकतात ही दोन्ही उदाहरणं पाहिलीत मी.

ओळखीच्या एका बाईंनी ५५/ ५६ व्या वर्षी कथ्थक शिकायला सुरुवात केली.
एक जण तरुण वयात फारशी सोशल नव्हती पण आता साठीनंतर स्वतःच्या शाळा सोबत्यांसोबत भेटीगाठींमध्ये छान सोशल झाली आहे.
माझ्याच आईने क्रोशे ब्लँकेट्सच्या त्या गिनिज रेकॉर्ड्साठी पार्टिसिपेट केले २८ ब्लँकेट्स बनवली. आता तिला इतका मस्त कॉन्फिडन्स आला आहे की ह्याचे ती स्वतःच्या छोट्याश्या व्यवसायात रुपांतर करत आहे. पूर्वी ती आपला मोकळा वेळ काँप वर गेम्स खेळण्यात घालवायची. आता हातात सतत सुई दोरा असतो आणि ती अधिक आनंदी असते.

फक्त एकच की आपले छंद जोपासताना इतरांवर त्याचा आर्थिक भार पडू नये

मी तरी छंदाबद्दल म्हणत नाहीये.
डोक्यात जे आहे त्याबद्दल विचार करायला फारसा वेळ नाही सध्या. पण जे करायचंय त्याची सुरूवात पुढच्या ५-१० वर्षात केली तर अर्थ आहे हे नक्की.

<<< त्याचबरोबर प्रत्येक वेळेस रोग काही ही असला तरी डॉक्टरांनी इलाजा नंतर जीवंत ठेवणे पेक्षा क्वालिटी ऑफ लाईपवर भर देण्याची गरज >>>
हि गोष्ट मला खरच फार महत्वाची वाटली.

इथे बाणेर मध्ये मी एक सोय पहिली, इथल्या अनेकांना माहित असेल बहुदा.
ती परांजपे construction ची बिल्डींग होती. त्यामध्ये फक्त वृद्ध मंडळींना राहायला परवानगी आहे. खाली कॅन्टीन वगेरे आहे. काय हवे नको ते फोन करून मागवता येतं. तसेच दवाखान्याची सोय वगेरे पण केलेली आहे.
ती कन्सेप्ट बरी वाटली मला. म्हणजे सगळ्यांचे स्वतंत्र flats आहेत. आणि बाकी समवयस्क शेजाऱ्यांची सोबत पण आहे.
त्यांचा असा नियम आहे कि कोणी निवर्तल्या नंतर या flat चे वारसदार ५५ (कि ६०) वर्षापेक्षा जास्त वयाचे असल्यासच त्यांना तो flat मिळतो. अन्यथा पैसे देऊन तो flat परांजपे वाले विकत घेतात आणि दुसऱ्याला विकतात.
इथे प्रामुख्याने ज्यांची मुले परदेशी आहेत अशी जोडपी राहतात म्हणे. मुले अथवा पाहुणे आल्यावर थोडे दिवस राहायला परवानगी आहे.

छान धागा आणि छान चर्चा.
एकंदरीत सर्वांनीच पुढचा विचार आता पासूनच करायला हवा.

दीमा यांचे सर्वात पहिले पोस्ट खूप आवडले. " ही सिस्टीम स्वत:साठी आपणच तयार करावी असाही एक विचार मनात आहे व त्या दृष्टीने पावलेही उचलत आहोत. "छान विचार. शुभेच्छा! याबद्दल सविस्तर जाणून घ्यायला आवडेल.

मला वाटतं... आपल्या पिढीतल्या बहुतेकांनी थोडीफार आर्थिक तरतूद केलेली असेलच.
पण आपल्याला भिती वाटते ते शरीर कितपत साथ देईल याची.

तसेच आपल्या पिढीला आपापले छंदही जोपासायची संधी मिळाली, पण त्यासाठी हिंडावे फिरावे लागणार असेल तर.. तो ही प्रश्नच आहे.

बाकी सोबतच हवी का नेट वगैरे चालू शकेल, हा ज्याचा त्याचा प्रश्न असावा.

दीमांची पोस्ट मिसली होती. अचूक आहे.
http://www.maayboli.com/node/9795 इथे नुकतंच हेच वाचलं होतं.

तुम्ही म्हणता तसा प्रोजेक्ट पुण्यात आहे. वर अनेकांनी लिहीलेलं आहे. गुगळलं तर दिसेल.
परांजपे स्कीम्स, अथश्री.

मला असेही वाटते की आजच्या वृद्धांची अवस्था पाहून नियोजन करणे हे तितकेसे अचूक ठरेलच असे नाही. येथील लिहिता वर्ग जेव्हा खर्‍या अर्थाने वृद्ध / परावलंबी / पूर्णपणे निवृत्त वगैरे होईल तेव्हाची आव्हाने कदाचित तिसरीच असतील. तेव्हापर्यंत कदाचित वैद्यकीय सेवा, करमणुकीची साधने, वृद्धाश्रमांची अवस्था, वृद्धाश्रम ही संकल्पना सकारात्मकतेकडे झुकण्याचे प्रमाण ह्यात बर्‍याच सुधारणा झाल्या असतील. आजच्या निकषांवर तेव्हाचे वृद्धत्त्व कदाचित अधिक सुसह्य असेल. पण प्रदुषण, वर्तनातील व्यावसायिक कोरडेपणा अशी आव्हाने असू शकतील. आज जसे आपल्याकडे 'कोणीतरी अगदी आपले' असते तसे कदाचित तेव्हा कोणी नसेलही. कदाचित त्यावेळी आपला समाज पुन्हा एकत्र कुटुंब व्यवस्थेबाबत विचार करू लागेल.

कापोचे ह्यांनी ज्या कथेची लिंक दिलीत त्या अनुषंगाने देखील थोडेसे बोलणे व्हावे असे वाटते.

मुले जेव्हा आई वडिलांना गॄहित धरायला लागतात किंवा त्यांच्या पैशावर नजर ठेवून राहतात किंवा आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात तेव्हा आपण मुलांना दोष देतो.

पण कधी कधी आपण जे दिसतं त्यावर बेस्ड जजमेण्ट देतो. पण त्याच्यामागे खुप मोठा असा इतिहास असतो जो आपल्याला माहित नसतो. तो इतिहास कधी मुलांच्या जन्मापासून असतो तर कधी मुलांच्या लग्नापासून.

कधी कधी वृद्ध आणि प्रौढांचे चांगले वागणे ही त्यांच्या वाईट वागण्यानंतर झालेली उपरती असते. पण सगळीच मुले जान्हवी इतकी क्षमाशील नसतात. आणि त्यांच्यावर लहान वयात किंवा तरुण वयात झालेल्या अन्यायाला ते विसरु शकत नाहीत आणि मग त्यांचेही वागणे कडवट होऊ लागते. आणि ह्याचेही कारण बर्‍येचदा आईवडिलच असतात. त्यांनी आपल्याच आईवडिलांना त्यांच्या आधीच्या पिढीला क्षमा न केलेले पाहिलेले असते. मनात कडवटपणा ठेवून वावरलेले पाहिलेले असते. खाण तशी माती ह्या नियमाने मुलेही तशीच वागतात.

अर्थात तरुण वयात गेल्यावर किंवा प्रौढत्त्वाकडे झुकल्यावर प्रत्येकाने स्वतःच्या आचरणाचेच नव्हे तर स्वतःच्या विचारांचेही तटस्थपणे सिंहावलोकन केले पाहिजे. आपले आईवडिल आपल्याशी आपल्या मते चुकीचे वागले किंवा त्यांच्या वागण्याचा आपल्याला तेव्हा त्रास झाला असला तरी खालील प्रमाणे विचारसरणी ठेवली तरी खूप सोपे होईल सारे काही.

१. जे घडते ते आपल्या नशीबात होते म्हणूनच घडले. ते माझ्याच पूर्व कर्मांचे फळ होते.
२. जे घडले ते चांगल्यासाठीच घडले त्याचमुळे मी आज एवढा स्ट्राँग झालो / ले
३. कसेही वागले तरी ते माझे आईवडिल आहेत, त्यांनी मला जन्म दिल्यावर त्यांना जसे आणि जितके जमेल तेवढे चांगले खायला प्यायला दिले कपडे लत्ते दिले, शिकवले. माझ्या अपेक्षा ते पूर्न करु शकले नसले तरीही त्यांनी मला उकिरड्यावर टाकून दिले नाही किंवा भीक मागून जगायला किम्वा धुणी भांडी करायला लावून शिक्षणाचे तीनतेरा केले नाहीत ह्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.
४. त्यांनी जसे माझ्या लहानपणी मला सांभाळले तसे त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना सांभाळणे माझे कर्तव्य आहे. आणि त्यांना घराबाहेर काढून त्यांना बेघर करण्यापेक्षा त्यांना घरातच सांभाळणे ही कसोटी असली तरी ती पार पाडायची माझ्यात ताकद आहे आणि त्यातच माझी माणूस म्हणून ग्रोथ आहे. घरात सांभाळणे अगदीच शक्य नसेल तर कमीतकमी वृद्धाश्रमात ठेवल्यावर तिथली आर्थिक जबाबदारी घेणे माझे आद्यकर्तव्य आहे. त्यात माझी भावंडे भार उचलत नाहीत मी एकटाच का उचलू असे विचार मनात आणून आईवडिलांना भीकेला लावणे म्हणजे अमानुषपणाची परिसीमा आहे.
५. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे - आई वडिलांना सांभाळणे म्हणजे त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकणे त्यांचे प्रत्येक हट्ट पुरवणे असे नव्हे. त्यांचे प्रत्येक बाबतीत मन राखले जाऊ शकत नाही. पण त्यांचे मन एखादे बाबतीत दुखावत असताना जमल्यास इतर एखाद्या बाबतीत त्यांना सांभाळून घेणे त्यांच्या मनाप्रमाणे करण्याचा प्रयत्न नक्की करावा.

पण कधी कधी आपण जे दिसतं त्यावर बेस्ड जजमेण्ट देतो. पण त्याच्यामागे खुप मोठा असा इतिहास असतो जो आपल्याला माहित नसतो. तो इतिहास कधी मुलांच्या जन्मापासून असतो तर कधी मुलांच्या लग्नापासून. <<<<<<<<+१

आई-वडिल लहानपणी मुलांच्या चुका माफ करत असतात तसेच मुलांनी पण वृधाअवस्थेतिल आई-वडिलांना माफ करावे.
एक पुण्यकर्म म्हणुन तरी त्यांचा सांभाळ जरुर करावा.

जान्हवी कोण?

मी सर्व अभ्यासू वाचकांना आग्रहाने विनंती करतो की मी उल्लेख केलेले पुस्तक .... " बिइंग मॉर्टल" चाळा/वाचा.
बर्^याच प्रश्नाची उत्तरे मिळतील

इथे पैशाच्या दृष्टीकोनातून कोणीच विचार मांडलेला दिसत नाहीय.

आईवडलांनी मुलगा/गी वर जेवढे पैसे जन्मापासून खर्च केले असतील (अगदी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, औषधोपचार, इतर सगळं सगळं पकडा) तेवढे आणि फक्त तेवढेच पैसे व्याजासहीत मुलांनी पालकांना परत करावेत किंवा त्यांच्यावर खर्च करावेत. त्यापेक्षा जास्त खर्च करायचा की नाही हे त्या त्या मुलांनी ठरवावे. पालक मुलांशी चांगले वागले/वागत असतील तर मुलं खर्च करतीलही. किंवा करणार नाहीत. त्यांची निवड.

नाहीतर मग मुलांनी वृद्धांना जमतील अशी कामं त्यांच्याकडून करुन घ्यावीत आणि त्याचा मोबदला द्यावा किंवा त्यांचा जेऊनराहुन वगैरे खर्च उचलावा.

जर हे करायला पालक तयार नसतील तर मुलांनी सरळसरळ हात वर करावेत. मुलं म्हणजे इंफ्लेशनला बीट करणारी इंवेस्टमेंट नव्हे!

अ‍ॅमी म्हणताहेत तोच दृष्टिकोण ठेवायचा असेल तर पालकांनीही मुलांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याची योग्यता येईपर्यंतच सपोर्ट करावं. त्यानंतर त्यांना परदेशी शिक्षणाला, लग्न करायला, स्वतंत्र घर घ्यायला अजिबात मदत करू नये. दोघांपैकी एकही पालक जिवंत आहे तोपर्यंत संपत्तीचा कोणताही हिस्सा मुलांकडे वळता करू नये. आणि मेल्यानंतर त्याचे काय होणार आहे हेही गुलदस्त्यात ठेवावे. बेस्टम्हणजे मुलं सज्ञान झाली की त्यांना घराबाहेर काढावे.

त्याहीपुढे जाऊन प्रत्येकाने स्वतःच्या निवृत्तीपश्चात आयुष्याचा प्रथम विचार करावा. मगच मुलांना जन्माला घालायचा विचार करावा.

मुलांना जन्माला घातले ते कोणासाठी? मुलांसाठी का स्वतःसाठी असा एक प्रश्न ऐकून निरुत्तर झाल्याचे स्मरते.
एकंद रीतच ह्या "नात्यात", नातेच उरले नसेल तर कोणीच कोणासाठी काही करू नये. आत्ता रुमाल. नंतर सविस्तर...नुकतेच अनेक अनुभव घेतलेत / चालू आहेत.....

मुल आणि आईवडील हे एकमेकांसाठी असतात. मुले आणि आईवडील ह्यांच्यात फुट पडण्याची खरी परिस्थिती मुलांच्या लग्नानंतर जास्त उद्भवते. ह्याला कारण म्हणजे जर मुलगा असेल तर त्याची बायको आणि मुलगी असेल तर तिला तिच्या संसाराचे स्वार्थ. हे दोन्ही घडताना मी जवळून पाहिले आहे. मुलगा हा खूपदा आई, बायको आणि नोकरी ह्यांत फसतो. त्यातून सोयीस्कर मार्ग काढायला त्याला जमले तर उत्तम पण अशा केसेस मधे खूप शांत, विचारी व्यक्ती लागते. जर आई आणि बायको ह्यांच्यामधे जर पटत नसले तर दोघींपैकी कुणाला तरी त्रास नक्कीच होणार. एकदा मुलगा वेगळा झाला की मग आईवडील मुलाकडे परक्या नजरेनी बघतात. काही आईवडील सहन करत मरतात तर काहीच आईवडील मुलाशी कडवट होऊन त्याला त्याच्या चुकीची शिक्षा देतात. अर्थात हे असे करताना आईवडीलांनाही खूप त्रास होतोच. म्हणून नातीगोती ही प्रेम, विश्वास आणि आधार ह्यावर जास्त अवलंबून असतात.

आमच्यात बाप पोराला पोरगा अठरा वर्षाचा होत आला कीच सांगुन टाकतो की कायद्याने अठरावर्षानंतर तु सज्ञान होत असल्याने माझ्यावर तुझी जबाबदारी नाही अन मी पण माझा बोजा तुझ्यावर टाकणार नाही. पोरगं चट स्वावलंबी बन्तय मग... नैतर आहेच बोळ्याने दुध पीत बसणे आई बापांच्या हातुन. पुढे लग्न झाल्यावर घरी आणलेल्या पोरीचीही वाट लावतात आईबापांच्या पदराखालुन.... सबब आमच्यात व्यक्तिस्वातंत्र्याला "महान किंमत" असते.
अर्थातच, म्हातार्‍या आईबापांचे काय करायचे हा प्रश्न इतरांना पडला तरी आम्हाला पडत नाही. तितके प्रेम ठेवलेले असते पण ते पूर्णपणे वास्तवाच्या अधिन राहुन.
तरीही काही प्रश्न निर्माण होतातच, खास करुन स्त्रीयांचे बाबतीत व मागिल पाचपन्नास वर्षात दोन पिढ्यात पडत असलेल्या जबरदस्त अंतरामुळे अधिकच अवघड स्थिती होते. त्यातुन सासुसुनेचा छत्तीसचा आकडा असला तर बिचारा पोरगा म्हातार्‍या आयशीबापसांचे इच्छा असुनही फारसे काही करु शकत नाही हे वास्तव कारण तो दिवसभर घराबाहेर पैका कमवायला.
वृद्धाश्रमाचा पर्याय जे धनिक आहेत ते निवडू शकतात, पण जे तसे नाहीत त्यांचे काय ? अतिशय घाणेरडी परिस्थिति असते. तरिही आमच्यात हा प्रश्नही उद्भवत नाही. कारण सगळेच "ताठ" असतात, मानी असतात, मोडेन पण वाकणार नाही या वृत्तीचे असतात व ते निव्वळ शाब्दिक नव्हे तर सर्व प्रकारची शारिरीक दु:खे सहन करीत ती वृत्ती जोपासतात.
सबब मी तरी एक ठरवले आहे की वृद्धाश्रमात वगैरे जाण्यापेक्षा अन तिथे पैका खर्च करण्यापेक्षा दोनचार झोपड्यांची कॉलनी बनवायची, अन तिथे माझ्यासारखेच अजुन वृद्ध आणुन वसवायचे. Proud कसा आहे बेत? सोबतही होईल अन कुणावर अवलंबुनही नको.
बाकी आम्हाला फार प्रश्न नाही, अजुन फार फार तर दहा/वीस वर्षेच काढायची आहेत. सत्तरी गाठली तरी खूप झाले, व सध्याची परिस्थिती बघता बहुतेक हातीपायी धड सत्तरी गाठेनही.
खरे तर या धाग्याच्या निमित्ताने "स्वतःसोडुन इतर वृद्धांची" काळजी करत बसणे सोडाच.... Proud
कारण हल्लीच्या पिढीचे काय? जी शारिरीक कमजोरी मी साठी सत्तरीत अनुभवत असेन, ती या नव्या पिढीच्या तिशी/चाळीशीमधे वाट्याला येऊ लागल्याचे दिसते व ही पिढी पन्नाशीत पोहोचेल, तेव्हाच साठीसत्तरीच्या वयाच्या वृद्धाश्रमांची सोय या पन्नाशीत आलेल्यांकरताच करावी लागेल अशा जीवनशैलीने ही लोक जगताहेत, त्याचे काय करायचे हा सर्वात मोठा प्रश्न येत्या दहावीस वर्षातील आहे.
सो, दीडम्याने दिलेले वयाचे गणितच मला मान्य नाही, व वृद्ध कशाला कुणाला का म्हणावे याची व्याख्याच बदलावी लागणार आहे येत्या काळात, त्याचा विचार व्हावा.

तेव्हा जगातल्या/ घरादारातल्या बाकी वृद्धांची पोकळ काळजी /चिंता करत बसण्यापेक्षा स्वतःपुढे काय वाढुन ठेवले आहे त्याची तजवीज करावी हे उत्तम.

माझ्यापुरते म्हणायचे तर एकही डॉक्टरी उपाय/खर्च मला परवडणे शक्य नाही. सबब घरातल्यांना सांगुन टाकलेय केव्हाच की काहि बरवाइट होतय असे दिसलेच तर शेवटच्या स्टेजमधे सरळ सरकारि इस्पितळात नेऊन टाका.... डेथ सर्टिफिकिटचा प्रश्न सुटेल. नैतर त्याकरता तुमचि धावपळ व्हायला नको. काहीही झाले तरी मला जिवंत ठेवायला स्वतःच्या डोक्यावर नको तितके लाखोवारी कर्जांचे बोझे वाढवु नका. माझी तितकी व्यावहारिक व कसलीच किंमत नाही की तुम्ही तुमची भावी आयुष्ये पणाला लावुन, ती कर्जाच्या बोज्यात अडकवुन मला जगवित बसावे.
हृदयात वगैरे काही बिघाड दिसलाच, तर र्‍हाऊद्या तसाच, उगाच मोरीच्या पाईपात टोकाकडे खरखरीत ब्रश लावलेल्या लांब काठी घुसवुन मोरीचा पाईप साफ केल्याप्रमाणे माझा हृदयाचे पाईप्सचे चोक काढण्याकरता त्या धन्दा उघडुन बसलेल्या हॉस्पिटल्सवर लाखोवारी रुपये खर्च करु नका. दात वगैरे उपटुन घेउन कवळी बसवणे वगैरे टप्प्यातल्या बाबी, (त्यादेखिल महाखर्चिक बनत चालल्यात) निस्तरणे वेगळे, अन हे असले रोग/विकार/व्याधी दुरुस्त करीत बसणे वेगळे. तेव्हा फाल्तु मधे माझ्यावर कसलाही वैद्यकीय खर्च करुन स्वतःची आयुष्ये कर्जाच्या बोज्याखाली बरबाद करु नका. मी माझ्या मरणाने सुखाने मरीन. तेव्हडे दिवसवार्‍याचे मात्र करा. हल्ली त्याचीही दक्षिणा परवडेनाशी झालीये, तेव्हा सरळ पुस्तक वाचुन दिवस वारे स्वतः करा. बाहेरुन भटाजी बोलवायलाच हवा, व त्याची भरमसाठ दक्षिणा द्यायलाच हवी, दुखवट्याच्या जेवणावळी घालायलाच हव्यात असे शास्त्रात नाहीये. स्वतः मंत्र म्हणा, अन माझे दिवसवारे करा. केळीच्या पानावर वा पत्रावळीवर मुठभर भाताचे पिंड केलेत तरी पुरतील मला. पण काहीही करुन माझ्या दिवसवार्‍याकरताही विनाकारण फाल्तुच्या वाढीव खर्चात पडू नका. लक्षात ठेवा, स्वतः आद्य श्रीशंकराचार्‍यांनी त्यांच्या मातेचे अंतिम संस्कार "स्वतःच" केले होते. ते विसरु नका व बाहेरच्या कोणत्याच "बाजाराला" मग तो वैद्यकीय असेल वा धर्मश्रद्धांचा असेल, बळी पडू नका. हे असे अत्यंत सु:स्पष्ट पणे सांगुन झालेले आहे. त्यामुळे निदान माझे अंतिम काळात काय याबद्दल मी नि:श्चिंत आहे.

<वृद्धाश्रमात वगैरे जाण्यापेक्षा अन तिथे पैका खर्च करण्यापेक्षा दोनचार झोपड्यांची कॉलनी बनवायची, अन तिथे माझ्यासारखेच अजुन वृद्ध आणुन वसवायचे>

हासुद्धा वृद्धाश्रमच. फक्त दुसर्‍या कोणी वृद्धांसाठी चालवलेला याऐवजी वृद्धांनी वृद्धांसाठी चालवलेला इतकंच.
दीमांनी आधी काय वेगळं लिहिलंय मग?

सगळ्याच गोष्टी पैशात मोजायच्या असतिल तर..
मुलांना वाढवताना घेतलेले कष्ट्, रात्र-रात्र केलेली जागरणे, भरभरुन दिलेले प्रेम, आणि महत्वाचे आईने पाजलेल्या दुधाची किंमत कशी लावायची.

या जगात आणल्या बद्दल मुलांनी आई-वडिलांचे ऋण मानायचे की आई वडिलांनी मुलांचे ऋण मानायचे ज्या मुलांनी आई-वडिल होण्याचे सौभाग्य त्यांना दिले.मी तरी स्वता:ला भाग्यवान समजते मुलांनी आम्हाला आई-वडिल होण्याचे भाग्य लाभु दिले त्या बद्दल

आपण मुलांच्या लहानपणी मुलांना काय दिले आहे तेच आपल्याला वृधावस्थेत परतुन मिळणार आहे

दोनचार झोपड्यांची कॉलनी बनवायची, अन तिथे माझ्यासारखेच अजुन वृद्ध आणुन वसवायचे. >> त्यात एक ब्रिगेडी, एक नक्षली आणि एक कम्युनिस्ट नक्की घ्या म्हणजे तुमचा वेळ कसा जाईल पत्ताही लागणार नाही.

>>>मुलं म्हणजे इंफ्लेशनला बीट करणारी इंवेस्टमेंट नव्हे!<<<

>>>अ‍ॅमी म्हणताहेत तोच दृष्टिकोण ठेवायचा असेल तर पालकांनीही मुलांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याची योग्यता येईपर्यंतच सपोर्ट करावं<<<

शिक्षण देतानाही घरकाम वगैरे करून घ्यावं! जेवढं घरकाम करतील त्या प्रमाणात शिक्षण मिळेल.

===========

जी मुले असे म्हणतील कि आम्ही काय अर्ज केला होता का आम्हाला जन्माला घाला असा त्यांना त्यांच्या पालकांनी म्हणावे की आम्हाला काय तुम्हीच व्हाल हे माहीत होते का?

Pages