"बाजीराव मस्तानी" : चित्रपटविचार

Submitted by अमेय२८०८०७ on 18 December, 2015 - 23:23

महाराष्ट्रात नसल्याने म्हणा किंवा काय पण बाजीराव मस्तानी चित्रपट प्रदर्शनपूर्व वादाचा इतका परिणाम झाला नव्हता. पिंगा बिंगाही एक दोनदा कुतूहल म्हणून यू ट्यूबवर पाहिले होते तितकेच त्यामुळे बघायला जाताना पाटी बऱ्यापैकी कोरी होती.

सिनेमा सुरू झाला आणि रंगीलाच्या आमिरप्रमाणे पहिला विचार मनात आला तो म्हणजे,"खर्चा कियेला है". सिनेमॅटोग्राफरने जबरदस्त काम केले आहे पण इथेच विसंवादी सूर लागायला लागतो. भंसालीला उत्तरेतील राजे किंवा मुघलांची आणि मराठी योद्धयांची जीवनशैली यात असलेला सांस्कृतिक फरक दुर्दैवाने समजलेला नाही त्यामुळे शनिवारवाड्याचा आईनेमहाल (आईने अकबरी नव्हे) करणे, युद्ध जिंकल्यावर, 'वाट लावली', म्हणत बाजीराव सैनिकांसोबत नाचणे आणि रजनीकांतची श्टाईल उधार घेऊन बाजीरावाने घोड्यावर दौड मारता मारता शत्रूचे बाण हातात पकडणे अशा फालतू गोष्टी अगदी चकचकीत होऊन समोर आल्या तरी नकोशा वाटतात.

'राऊ' खूप आधी वाचली असल्याने सर्वज्ञात ढोबळ गोष्टी सोडल्या तर बाजीरावाच्या आयुष्यातील बारकावे मला माहिती नाहीत. हा चित्रपट बघताना एक जाणवले की बाजीरावाच्या काळाचा विचार करता ही एक व्यामिश्र आणि अनेक पातळ्यांवर ताण असलेली वेगवान जीवनकथा आहे. सततची युद्धे, परधर्मीय स्त्रीवर जडलेले प्रेम आणि ते निभावून नेण्याची हिंमत, धर्मसत्तेविरुद्ध उचललेले पाऊल, काशीबाई आणि मस्तानीची घुसमट, राधाबाई आणि इतर आप्तांची मानसिकता यासारखे अनेक वैशिष्ट्यपूर्ण कंगोरे असलेली बाजीरावाची कथा आहे. इथे मात्र दिग्दर्शक दर्शनी भव्य दिव्यतेच्या नादात कार्यकारणभावाच्या मुळाकडे जाऊच धजत नाही त्यामुळे होणारा परिणाम फार वरवरचा राहतो.

दिग्दर्शकाने बनवलेले पिच निसरडे असूनही कलाकारांनी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रियांका चोप्रा आणि दीपिका दोघींनीही अनेक प्रसंगात छोटे छोटे बारकावे छान खुलवले आहेत. त्यांना कंबरेच्या खाली नऊवारी नेसवणाऱ्या वेषभूषाकाराला मात्र शनिवारवाड्यावर फटके दिले पाहिजेत.
रणवीर सिंग हा थोडासा वीरेंद्र सेहवागसारखा आहे. सेहवागचा खेळ आवडतो म्हणून त्याच्याकडून कोणी टिप्स घ्यायला गेले तर जसे फारसे हाती लागणार नाही तसेच रणवीरचे आहे. वैयक्तिक छबी काहीशी उथळ असल्याने त्याच्या भूमिकांकडेही तसेच बघितले जाते असे मला वाटते. खरेतर प्रत्येक भूमिका समंजसपणे आणि आपल्या मर्यादा नीट ओळखून सादर करणारा हा कलाकार आहे. चित्रपटातील बाजीरावाची बोली ही मला सर्वात आवडलेली गोष्ट. रांगडा लढवय्या जसा वागेल बोलेल तसाच रणवीरचा वावर आहे. मराठी आघात असलेली हिंदी त्याने छान निभावली आहे. एरवी सिनेमात कामवाली बाई, रिक्षावाले नाहीतर साईडव्हीलन यांची मराठीमिश्रीत हिंदी चेष्टेसाठी वापरली जाते पण बाजीरावाच्या बोलीची तशी चेष्टा करावीशी वाटत नाही.

अशा काही जमेच्या बाजू असल्या तरी बाजीरावाच्या आयुष्यातील मूळ ताणच अतिशय उथळपणे चित्रित करून ठेवल्याने माध्यमाची सवलत म्हणून कितीही गोष्टी माफ करून टाकल्या तरी हा चित्रपट, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूतकाळातील एक महत्त्वाची  ऐतिहासिक व्यक्ती म्हणून, बाजीरावाबद्दल कुठल्याही विशेष भावना प्रेक्षकांपर्यन्त पोचवण्यात सपशेल अपयशी झाला आहे असेच वाटत राहिले.

 त्यातल्या त्यात, हौसेने 'दिलवाले' बघून आलेल्या आणि अंतू बर्व्याच्या भाषेत 'गणित सपशेल चुकलेल्या पोरासारखे' भाव घेऊन क्रुद्ध चेहऱ्याने सकाळी झाडांना पाणी घालत असलेल्या शेजाऱ्याइतके फ्रस्ट्रेशन देणारा हा चित्रपट नव्हता, हेच समाधान. शेजाऱ्याने आस्थेने दिलेले दिलवाले पाहण्याचे निमन्त्रण नाकारून फारशी चूक केली नाही, हे येथील आणि इतरत्र येत असलेल्या प्रतिक्रिया पाहून स्पष्ट होते आहेच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल पाहिला तो बाम.
मला आवडला.
एक प्रियांका सोडून.
ती एक नंबर बावळट्ट दाखवली आहे.
आणि महेश मांजरेकर. शाहू महाराज न वाटता कुणी सुजलेला क्रॉनिक लिव्हर डिसीजचा अल्कोहोलिक वाटतो.
स्पीच पण स्लर्ड!

त्या साड्या सिनेमात पहाताना ऑड वाटत नाहीत.

बाकी शनीवारवाड्यात आरसेमहल वगैरे भारी वाटलं. तो दिवे विझवायचा पाईपपण.

संलीभ चा सिनेमा असल्याने जिथे तिथे दिवे, पाणी आणि रिंगणातले नाच होते.
बाजीराव तर क्रेझ असल्यासारखे दोन्ही बायकांसोबत पाण्यातच रोमांस करत होते दरवेळी!
बिचारे मरतानापण नर्मदेत जाऊन मरतात असे दाखविले आहे .
दिव्यांचा तर अतिरेकच!
स्वार बाहेरून खलिता घेऊन दरवाजाच्या आत येताना चांगला लख्खं दिवस तर आत येताच मात्रं पणत्या पेटलेल्या.
पाण्याचाही अतिरेकच. शाहूमहाराजांचा दिवाणखाना असो की शनीवारवाडा की बुंदेलखंड की निजामाचा तंबू!
सगळीकडे पाणी/कारंजी/पुष्करिण्या.

मात्रं स्पीड चांगला सांभाळलाय सिनेमाचा.
स्पीड सांभाळायच्या नादात मस्तानीबरोबरचे सहजीवन दाखवायचे राहून राज्यकारभारात तिने बाजीरावांना केलेली मदत दाखवायला हवी होती. किंवा राज्यकारभारातल्या चाणाक्षपणाचे एक दोन नमुने!

समशेरला नानासाहेब पेशवे घेऊन जातात तेव्हा त्याला नेऊन ठार मारले असेल असेच प्रेक्षकांचा समज होईल असे दाखविले आहे.
खरे तर समशेरला काशीबाईंनी शनीवारवाड्यात वाढवले ते दाखवायला हवे होते.
किमान काशीबाईंच्या ताब्यात समशेरला दिले असे तरी दाखवायला हवे होते. ते न दाखवल्याने किशोरवयीन नानासाहेब म्हणजे उगाच क्रूरकर्मा वाटतात.

मात्र गृहकलहामुळे आणि व्यक्तीगत आयुष्यातील संघर्षामुळे पराक्रमी बाजीरावांचाही तेजोभंग झाला हे फार परिणामकारकरीत्या दाखवलंय.
पानिपत वाचताना जसं क्षणाक्षणाला पेशव्यांच्या मूर्ख बायकांचा, त्यावेळेच्या पुजारी मंडळाचा, त्यांच्या गृहकलहाचा राग राग येतो तसा राग निर्माण करण्यात सिनेमा यशस्वी झालाय.

आणि इतिहासाचा किमान हा आस्पेक्ट तरी अगदी खरा आहे.
मराठे असोत की पेशवे, त्यांचे मुख्य पुरुष अखंड हिंदुस्थानाचे/ दिल्लीच्या तख्ताचे/हिंदवी स्वराज्याचे भव्यदिव्य स्वप्नं उराशी ठेवून लढले. आणि बायका आणि पुजारी मंडळ फालतू इगो, घरगुती आणि धार्मिक राजकारण आणि धर्माचा अतिरेकी बडेजाव करत या लढवय्यांना मानसिक आधार द्यायचे सोडून त्यांना त्रास देत बसले हे खरे आहे.
पेशव्यांचे गृहकलह निस्तरणार्‍या शाहूंच्या व्यक्तीगत जीवनातही किती क्लेश होते ते आपल्याला माहितच आहे.

पेशव्यांनी ब्राह्मणत्व टाकून क्षात्रत्व स्विकारले तर त्याबरोबर एकापेक्षा जास्त बायका करणे, जनाना बाळगणे , विविध जाती धर्मांत/प्रांतात लग्नसंबंध केवळ राज्यविस्तारासाठी करणे ही तेव्हाच्या क्षत्रियांसाठी सामान्य असणारी बाब स्विकारावी लागणार ही गोष्ट तेव्हाच्या स्त्रियांच्या किंवा धर्मामार्तंडांच्या का लक्षात आली नसेल. किंवा लक्षात येऊनही त्यांनी केवळ स्वतःचे छोटेमोठे स्वार्थ जपाण्यासाठी का स्विकारली नसेल ते कळत नाही.
असं वाटतं की स्वराज्याचे स्वप्न केवळ या क्षत्रियांनी किंवा क्षत्रियत्व स्विकारलेल्या ब्राह्मणांनी पाहिले पण घरातल्या स्त्रिया आणि पुरोहितवर्ग यांना या स्वप्नाची भव्यता आणि उपयुक्तता पटवून देण्यात ते असमर्थ ठरले.

इथे सिनेमातपण बाजीराव चाललेत मोहिमेवर आणि काशीबाई सांगतायत तुम्ही मस्तानीवर जास्त प्रेम करता म्हणून माझ्या महालात आजपासून येऊ नका. ते ही मस्तानीला स्विकारून पिंगा बिंगा घालून नाचल्यावर. आणि बाजीरावपण तिला काही सांगायचं सोडून विषण्ण बिषण्ण होऊन निघून जातात. ओवाळून न घेता.

इतिहास केवळ सिनेमातूनच शिकणार्‍या आमच्या एका शेजार्‍याने म्हटले ' जोधा अकबरका अकबर देखो सबको कैसा दम देके रखता है , जोधा के खिलाफ आवाज नही करनेका, और ये बाजीराव तो अपने मां को भी नही ठिकसे बोल पाता'

Happy

थोडक्यात राजकारणातलं काहिही न कळणार्‍या आई आणि पत्नीमुळे बिचार्‍या पराक्रमी बाजीराव आणि मस्तानीचे हालहाल झाले अशी करूण कहाणी मांडण्यात सिनेमा यशस्वी झाला.

साती अख्खी पोस्ट पटली.:स्मित: पण हा काय कुठलाच पिक्चर मला टाकीजात जाऊन पहाता येणार नाही, कारण आमच ध्यान ( माझी मुलगी) एका जागी १ मिनीट पण बसत नाही, मग सिनेमा काय पाहु देणार्?:अरेरे:

या सिनेमाबद्दल किंवा या सिनेमात दाखवलेल्या विषयाबद्दल अशोकमामांकडून एक मोठ्ठासा प्रतिसाद वाचायला आवडेल.

छान पोस्ट साती.

साड्या वाटल्या जरा ऑड.

काशीबाई अंगडाई दिल्यासारखे वळसे घेत युद्धावर निघालेल्या बाजीरावाला फ्लॅग ऑफ करते तेव्हा भंसाली,
"आता जावा की युद्धाला
धनी वाजले की बारा"

असले काही गाणे वाजवतोय की काय अशी भीती वाटली Happy

म्हणजे माझ्या अंदाजानुसारच आहे तर !

इतपतच असणार, हे माहित असूनही पाहायचा विचार होता. मात्र आता काही व्यस्ततेमुळे पाहणे जमणार नाहीच. आता टीव्हीवरच.

मस्त लिहिलं आहे..!!
थोडक्यात अगदी मुद्देसूद आणि गुद्देसूद आहे ! Happy

मला बा. सारखं ल/नढायला जमले नाही, ना कुणी मस्तानी भेटली, ना अशा वीर पुरुषावर झिनेमा बनवता आला, आता दुसऱ्याने बनवला आहे, तर तो पाहताना माझ्या या दु:खावर डागण्या दिल्यासारखे वाटेल..

झिनेमा = झिम्मावाला सिनेमा.

साती, मस्त पोस्ट.

बाजीरावाच्या बाबतीत त्याच्या पराक्रमाची चर्चा न होता, मस्तानीचीच झाली हेच वाईट झाले.

ह्या सिनेमाचा दुसरा भाग बनवायला खूप स्कोप आहे. जसे पुस्तकांचे खंड असतात तसे ह्या सिनेमाचे पुढचे भाग बनवून एक पुर्ण इतिहास लोकांपर्यत पोचवल्या जाऊ शकतो.

१९५३ सालच्याच भालजींच्या छत्रपती शिवाजी नामक सुपरहिट्ट पिच्चरात सईबाई-सोयराबाई यांचे गाणे दिसलेदेखील.
तेव्हा सवती कशा एकत्र येतात वगैरे प्रश्न भालजींना पडले नसतील का?

<<<पेशव्यांनी ब्राह्मणत्व टाकून क्षात्रत्व स्विकारले तर एकापेक्षा जास्त बायका करणे, जनाना बाळगणे , विविध जाती धर्मांत/प्रांतात लग्नसंबंध केवळ राज्यविस्तारासाठी करणे ही तेव्हाच्या क्षत्रियांसाठी सामान्य असणारी बाब स्विकारावी लागणार ही गोष्ट तेव्हाच्या स्त्रियांच्या किंवा धर्मामार्तंडांच्या का लक्षात आली नसेल. किंवा लक्षात येऊनही त्यांनी केवळ स्वतःचे छोटेमोठे स्वार्थ जपाण्यासाठी का स्विकारली नसेल ते कळत नाही.>>>

इंटरेस्टिंग माहिती आहे. पेशवेकालीन क्षत्रिय राजांनी आंतरधर्मिय विवाह केला आणि त्यातून निर्माण झालेल्या संततीला औरस हिंदू क्षत्रिय संतती म्हणून मान्यता मिळाली याची ५-७ उदाहरणे दया...आमच्या माहितीत भर पडेल!

बाजीरावाच्या बाबतीत त्याच्या पराक्रमाची चर्चा न होता, मस्तानीचीच झाली हेच वाईट झाले.
>>
दिनेशदा, हेच अपेक्षित नाही का? हा 'बाजीराव पेशवे' सिनेमा नसून 'बाजीराव मस्तानी' सिनेमा आहे. त्यांच्या प्रेमकहाणीलाच जास्त महत्व असणार ना

(हे इन जनरल बोलत असाल तर माझी पोस्ट माघारी घेते. मी पोस्ट 'सिनेमात' बाजीरावाच्या बाबतीत त्याच्या पराक्रमाची चर्चा न होता, मस्तानीचीच झाली हेच वाईट झाले. अशी वाचलीये तशी नसेल सॉरी)

@अशा काही जमेच्या बाजू असल्या तरी बाजीरावाच्या आयुष्यातील मूळ ताणच अतिशय उथळपणे चित्रित करून ठेवल्याने माध्यमाची सवलत म्हणून कितीही गोष्टी माफ करून टाकल्या तरी हा चित्रपट, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूतकाळातील एक महत्त्वाची ऐतिहासिक व्यक्ती म्हणून, बाजीरावाबद्दल कुठल्याही विशेष भावना प्रेक्षकांपर्यन्त पोचवण्यात सपशेल अपयशी झाला आहे असेच वाटत राहिले. :- सहमत.

दीपांजलीशी बर्‍यापैकी सहमत.
चित्रपटाच्या सुरूवातीलाच एक भला मोठा डिस्क्लेमर आहे. 'काहीही दाखवलं तरी प्रेक्षकांनो, दिलपे मत लो, भावनाओंको समझो' अशी केलेली विनंतीच आहे ती जवळपास. त्यामुळे आपणही 'ओके, नो प्रॉब्लेम, पैसा वसूल तर होईल ना?' असा स्टान्स घेतो. मग पुढे एक बर्‍यापैकी मनोरंजन करणारा सिनेमा दिसतो. यात इतिहास केवळ पार्श्वभूमीसाठी आहे. बाकी ती त्रिकोण असलेली एक सामान्य लव्हस्टोरीच आहे.

सिनेमा संपूर्णपणे रणवीरचा आहे. तो केवळ आणि केवळ बाजीराव वाटतो. उत्कृष्ठ काम. त्याचा रांगडेपणा, देहबोली, संवादफेक, प्रेमदृश्य, तिरकसपणा अगदी अस्सल. त्याची एरवीची इमेज खरंच टपोरी आहे, ती आता त्याने सुधारायला हवी.
त्यानंतर नंबर तन्वी आझमीचा. राधाबाई बेस्ट. तिचे हातवारे, मराठी अ‍ॅक्सेन्टचं हिंदी, डोळ्यांचा वापर- सगळंच जमून आलंय.
दिपिका मला पहिल्या सिनेमापासून अतिशय आवडते. अगदी तिला 'तेलकट, माडाचं झाड' वगैरे म्हणलं जाई तेव्हापासून. तिची प्रत्येक सिनेमातली प्रत्येक भूमिका मला आवडली आहे. 'मस्तानी'ने मात्र मुळीच प्रभाव टाकला नाही Sad ती इम्पॅक्टच करत नाही काही. तिची एन्ट्री, पुण्यात आल्यावर एकटं पडल्यानंतर तिने केलेला तलवारबाजीचा सराव, तिच्यावर आणि तिच्या मुलावर हल्ला होतो तेव्हा तिने केलेला बचाव असे मोजके सीन्स आवडले फक्त.
वैभव तत्त्ववादी, मिसो फिट. (शाहू महाराज म्हणून मांजरेकरलाच का घेतलं असावं असा प्रश्न पडला. पण ते एक असो.)
सर्वात गंडलंय ते काशीबाईंचं कॅरॅक्टर. त्यामुळे बिचारी प्रियांका काहीही दोष नसतानाही हास्यास्पद होते! काशीला अल्लड दाखवायचं, प्रेमळ दाखवायचं, पेशवीण म्हणून गर्विष्ठ दाखवायचं का सासू-नवर्‍यामुळे पिचलेली दाखवायचं, मॅच्युअर कधी दाखवायचं आणि नटखट कधी हे लिहितानाच समजलं नसावं. शिवाय मोकळे सोडलेले केस, कंबर-पोट दाखवणारी नऊवारी यामुळे काशीबाई सिरियसली 'जा बाई तू, नंतर ये' अशी होते शेवटी. मराठी मात्र सुरेख बोलली आहे ती. तिला त्याचे १० पैकी १०.

बहुचर्चित 'पिंगा'ला तर खरंच आगापीछा नाहीये. प्रमोशनल सॉन्ग म्हणूनच ठेवलं असतं आणि सिनेमातून वगळलं असतं तर अनेक निशाण एकाच तीराने मारले गेले असते. गाण्याच्या आधीच्या प्रसंगात तर दोघींमध्ये मैत्री वगैरे नसतेच आणि गाण्यानंतर तर चक्क नाटकात होतो तसा ब्लॅकआऊट होतो! त्यामुळे केवळ दोघींना एकत्र नाचवलं- हे सोडून काहीच एस्टॅब्लिश होत नाही.

असो, तर सिनेमात इतिहासाचं विद्रूपीकरण वगैरे नाहीये, कारण इतिहास चटणीइतकाच आहे. ती चटणी बर्‍यापैकी जमली आहे. सिनेमा एकदा बघायला हरकत नाही. नाही बघितलात तरी हरकत नाही. 'राऊ' वाचली तरी चालेल! Proud

काशीबाई अंगडाई दिल्यासारखे वळसे घेत युद्धावर निघालेल्या बाजीरावाला फ्लॅग ऑफ करते तेव्हा भंसाली,
"आता जावा की युद्धाला
धनी वाजले की बारा"

असले काही गाणे वाजवतोय की काय अशी भीती वाटली >>>> Lol

काशीबाई दिसते आणि वागतेही वेड्या सारखी , उडी मारून सासूच्या मांडिवर बसते तो सीन कहर विनोदी आहे !>>> Rofl खरेच असे दाखवले आहे Uhoh

काल पाहिला. ऑब्व्हियस पिंगा आणि तत्सम गोष्टी वगळता चांगला वाटला. रणवीर एकदम सही! प्रोमो वरून ज्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या त्याहून पण जास्त भारी वाटलाय !मराठी अ‍ॅक्सेन्ट मस्तच! तो चिमाजी अप्पा ला "मूर्ख " असं ओरडतो तेव्हा पब्लिक ने टाळ्या वाजवल्या ! आणि तो कट्यार फेकून मारतो अन "चला शिक्का आणा" म्हणतो तेव्हाचा सीन पण फार आवडला.
दोन्ही ह्रिविणी रणवीर च्या मानाने काहीच प्रभाव पाडत नाहीत! मला वाटलं होतं त्या मानाने चंगल्या दिसल्या आणि वागल्यात पण डीजे ने लिहिल्याप्रमाणे दीपिका फार मॉडर्न दिसते आणि बोलते. आणि प्रियांकाचे कॅरेक्टर कन्फ्युज्ड आहे. मराठी मात्र मस्त बोलली आहे.
काशी बाई दिसते आणि वागतेही वेड्या सारखी , उडी मारून सासूच्या मांडिवर बसते तो सीन कहर विनोदी आहे !>> Rofl हो हो!! तो मांडीवर बसायचा आणि तो घोड्यावर बसायची येडपट अ‍ॅक्शन पण काही च्या काही विनोदी! असं का हसं केलंय तिचं!!
तन्वीचं कॅरेक्टर एकदम ऑथेन्टिक. मिसो, यतीन कार्येकर, रझा मुराद, आदित्य पांचोलीला अजून जास्त स्कोप असणारे रोल हवे होते असं वाटून गेलं.मिसो कसला मस्त दिसतो! त्याला इतका म्हातारा रोल का दिला! Happy
महेश मांजरेकर मात्र अतिबेक्कार अगदी.

सगळे पैसे सेट्स, कपडेपट यवर खर्च झाल्यावर इतिहास संशोधन, कथा, पटकथा, संगीत, नृत्य दिग्दर्शन यावर खर्च करायला पैसेच उरले नसतील.. पण हा चित्रपट चालेल, त्याचा पैसा वसूल होईल.... मग तो कुणावर चित्रपट काढेल बुवा.. अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, पद्मिनी ???

रणवीर कपूरसाठी चित्रपट पाहेन(पुण्यात सेफली पाहता आला तर, नाहीतर आहेच १-२ वर्षानी टिव्हीवर :))
तो गुणी कलाकार आहे. काहीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना त्याने स्वतःच्या टॅलेंटवर यश कमावले आहे.सलीभ ने जे काही दिव्यांची आणि पडद्यांची आरास केली असेल तो सलीभ दोष आहे, त्याला आरसे,छान छान पडदे आणि दिवे यातून बाहेर पडता येत नाही. बाकी पिंगा, जरदौसी साड्या आणि वाट लावली बद्दल सहमत. मुळात त्या काळी 'वाट लावली' वगैरे शब्द वापरायचे की नाही माहित नाही.
बाकी दोन सुंदर्‍यांबद्दल नो कॉमेंट.

मुळात त्या काळी 'वाट लावली' वगैरे शब्द वापरायचे की नाही माहित नाही. >>> त्याकाळी आजच्यासारखं काहीच बोलत नसणार. आठवा आपल्याला शिवाजीमहाराजांची पत्रं वगैरे होतं त्यातली भाषा.
पण वाट लावली स्लँग आहे. राजेरजवाडे बोलताना भारदस्त, पुस्तकी बोलले तर ते शोभून दिसेल.

जोधा-अकबर पण ऐतिहासिकदृष्ट्या कितपत ऑथेंटीक हे कसं सांगता येणार ! रिसर्च केला असला तरी त्या काळात त्यांच्या खाजगी गोष्टींची नोंद असणं अशक्यच आहे पण निदान त्याने त्या व्यक्तिरेखांचा आब राखला. उटपटांग वागताना दाखवलं नाही. भंसाळीनेही इतकं पथ्य सांभाळलं असतं तर आत्ता होतोय तो विरोध आणि टीका नक्कीच झाली नसती. बाकी इतका पैसा खर्च केल्यावर कथा-पटकथा बिलिव्हेबल वाटेल अशी लिहून घ्यावीशी वाटू नये आणि काय वाट्टेल त्या फँटसीज त्यात घुसवाव्याश्या वाटाव्यात ह्यासारखं दुर्दैव नाही ! वेशभूषा त्या काळाशी सुसंगत राखून आणि त्यावेळच्या सामाजिक संकेताच्या चौकटीत राहूनही प्रणय, सवतीमत्सर-सलोखा दाखवायला अमर्याद स्कोप होता.

चित्रपट न पाहता कमेंट केली म्हणजे अगदी त्या ह्यांच्यासारखं झालंय पण ह्याच कारणांमुळे बघावा की नाही ह्याचा निर्णय होत नाहीये.

'कट्यार काळजात घुसली' आणि 'बाजीराव मस्तानी'चे पटकथाकार एकच आहेत.

अकबराच्या काळातले बारीकसारीक तपशील उपलब्ध आहेत. अगदी अकबराच्या खाण्यापिण्याच्या सवयींपासून ते त्याच्या कपड्यांपर्यंत. त्यामानाने सतराव्या शतकानंतरच्या महाराष्ट्रीय इतिहासाची पुरेशी साधनं उपलब्ध नाहीत. पुण्याच्या आर्काइव्हात पेशवाईतली हजारो कागदपत्रं पडून आहेत. पण शिवाजी-संभाजी यांच्या नावानं तलवार काढणे आणि किल्ल्यांवर चढणे हेच इतिहासप्रेम अशी समजूत असल्यामुळे ती कागदपत्रं अजून कित्येक वर्षं तशीच पडून राहतील.

बाकी, आपल्या आजच्या नैतिक आणि सामाजिक व्यवहारांवरून ऐतिहासिक व्यक्तिरेखांची वागणूक कशी असेल, याचे आडाखे बांधणं धोकादायक असतं.

'कट्यार काळजात घुसली' आणि 'बाजीराव मस्तानी'चे पटकथाकार एकच आहेत. >> धन्यवाद कट्यारचे माहीत नाही परंतू बाजीरावची पटकथा अप्रतिम लिहिली आहे. बरेच सीन्स उत्तम लिहिले गेले. खास करून मस्तानी नामकरणसाठी शनिवारवाड्यात येते तो आणि शेवटचा शनिवारवाड्यातला काशी आणि बाजीराव मधला सीन.

बाकी, आपल्या आजच्या नैतिक आणि सामाजिक व्यवहारांवरून ऐतिहासिक व्यक्तिरेखांची वागणूक कशी असेल, याचे आडाखे बांधणं धोकादायक असतं.

अहो पण तेच तर चालू आहे ना इथे! आज आंतरजातीय /आंतरधर्मिय विवाह समाजमान्य आहेत, अनौरस संततीला न्याय मिळू शकतो पण हे आजचे व्यवहाराचे नियम अठराव्या शतकातील पेशवे घराण्याने पाळले नाहीत म्हणून त्यांच्या नावाने आगपाखड, पेशवे घराण्यातल्या स्त्रियांबद्दल 'मूर्ख' वगैरे भाषा वापरणं हेच तर चालू आहे इथे!

'कट्यार काळजात घुसली' आणि 'बाजीराव मस्तानी'चे पटकथाकार एकच आहेत.
>>>
विचित्र योगायोग! दोन्ही चित्रपटात कट्यार महत्त्वाची भूमिका बजावते आहे Happy

आपल्या आजच्या नैतिक आणि सामाजिक व्यवहारांवरून ऐतिहासिक व्यक्तिरेखांची वागणूक कशी असेल, याचे आडाखे बांधणं धोकादायक असतं. >>> त्यावेळेच्या सामाजिक संकेतांना धरुन प्रसंग लिहावेत असं म्हटलंय. आजच्या काळाला अनुसरुन आडाखे बांधावेत असं नाही.
आजच्या काळातील योग्य भाषा ( जी त्या व्यक्तिरेखांना सुसंगत वाटेल ) वापरली जाते कारण त्या काळची भाषा वापरली तर ती नीट कळू शकणार नाही.

कथा-पटकथा विशिष्ट प्रकारे लिहून घेतलीय ( काय प्रसंग असावेत ह्याबद्दल डिरेक्टरने सूचना केल्याच असतील ना ) भंसाळीवर टीका केलीय पटकथाकारावर नाही.

अकबरावरची कागदपत्रं उपलब्ध आहेत पण पेशवाईवरची नाहीत हे चित्रपटाच्या बाजूने लिहिलंय का ते समजलं नाही.

र्म्द
अगदी हेच्च लिहिणार होते lol

मिसो कसला मस्त दिसतो! त्याला इतका म्हातारा रोल का दिला!
<<
आहे त्या एज चा दाखवलाय, तो अता असाच दिसतो :).

'कट्यार काळजात घुसली' आणि 'बाजीराव मस्तानी'चे पटकथाकार एकच आहेत. >>> ओह्ह्ह्ह्ह्ह बाजीराव-मस्तानीला पटकथा होती??!! मला वाटल देवदास पटकथा कंट्रोल एच फाईंड देवदास रिप्लेस बाजीराव. नाच, पाण्यात उतरणं, दुर्गाचा डायलॉग फार काय नवीन होतं?? सांगित्लं म्हणून कळलं तरी की वेग़ळी पटकथा होती.

Pages