शाहरूख खानचा लोकाना इतका राग का येतो ?

Submitted by केदार जाधव on 17 December, 2015 - 01:51

नमस्कार , हा धागा सुचायच तात्कालिक कारण म्हणजे दिलवाले सिनेमा पाहू नका म्हणून येणारे वाटेल ते मेसेज .
अगदी तो देशद्रोही पासून मुसलमान अन पाकडा आहे इथपर्यंत .

इथे मी सुरूवातीलाच नमूद करतो की मी शाहरूखचा फॅन आहे . त्याच सर्वात महत्वाच कारण म्हणजे "ही इज सेल्फ मेड मॅन" . त्याची स्ट्रगल अन त्यानंतर त्याने घेतलेली झेप तर कुठल्याही क्षेत्रातील माणसाने आदर्श घ्यावा अशी आहे .
दुसर या इंडस्ट्रीत राहून ही उगाच हिरोईनशी स्क्कॅंडलचा आधार न घेता फॅमिलीला महत्व देण .
त्याहूनही जास्त आवडतो मला त्याचा कभी हा , अंजाम , डर अन बाजीगर मधला अभिनय . राहुल अन राज कधी आवडलेच नाहीत मला Happy

पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यात काही दुर्गुण नाहीतच .
तो स्वतःला शहाणा समजतो , अ‍ॅरोगंट आहे वगैरे मी ऐकल आहे . अभिनयाबाबतही तो अगदी सर्वोत्तम आहे असही काही नाही , त्याच्या बर्याच मर्यादा आहेत .
याबद्द्ल टीका झाल्यास वाईट वाटायच काही कारण ही नाही .
पण समहाऊ बर्याच लोकाना त्याच्याबद्द्ल परकोटीचा राग का आहे ते मात्र समजत नाही .
आयपीएल मधे पाकिस्तानी खेळाडू घ्यायचा निर्णय त्याचा होता का ? इतर कोणीच आपल्या चित्रपटाच प्रमोशन पाकिस्तानी वाहिनीवर करत नाही का ? सगळेच सेलेब्रिटी सगळ्या आपत्तीवेळी जाऊन मद्त करतात का ?
हिंदुत्ववाद्याना सगळ्या खानात त्याचच वावड का ?

शाहरूख एक अभिनेता म्हणून न आवडण समजू शकतो , पण एक व्यक्ती म्हणून एवढा राग का ?

संयत शब्दात आपल मत मांडाव अन चर्चा हो द्यावी एवढीच अपे़क्षा . Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू एक यकःश्चित माबो वरील आयडी आहेस माझ्यासाठी >>>> मी तुमच्यासाठी काय आहे यापेक्षा मी स्वतःसाठी काय आहे हे मी जास्त महत्वाचे मानतो. लोकांना मी कसा वाटतो यावर मी स्वतःबद्दलचे मत नाही ना बनवू शकत Happy पण तरीही प्रामाणीकपणे सांगायचे झाल्यास मी कोण आहे याची आपण दखल घेऊन ते आपणास मला सांगावेसे वाटले यातही मी खुश आहे. आजचा दिवस बनवलात माझा. आज तर भेल पार्टी झालीच पाहिजे Happy

सर एक महान व्यक्तिमत्व आहेत, त्यांनी त्यांचे सारे आयुष्य दारुड्याला प्रमोट करायला पण दारूला डीमोट करायला खर्ची घातले आहे
>>>>>>

माझ्यामते दारू वाईट आहे, दारूडे वाईट नसतात.
तुमच्यामते दारू वाईट नसते, दारुडे वाईट असतात.

आपण एकमेकांची मते बदलायचे प्रयत्न करत राहूया Happy

मी कधी म्हणलं दारुडे वाईट असतात
उगाच तुमची मते माझ्या नावाने खपवू नका

तुम्हाला तुमची पुष्कळ मौल्यवान अशी मते आहेत
ती माझ्यासारख्या व्यक्तीच्या नावावर खपवून काय मिळणार
पाहिजे तर नाना पाटेकर, विश्वास नांगरे पाटील, वपु यांच्या नावाने खपवा

आपण एकमेकांची मते बदलायचे प्रयत्न करत राहूया>>>
खिक Happy (दारुड्या शाहरुख सारखं गरीब हसण्याचा प्रयत्न)
पालथा घडा गँग चे आजीवन सदस्य आहात सर तुम्ही
आयुष्यात पाण्याला जमले नाही ते माझ्यासारख्या पामराला काय डोंबल जमणार
त्यापेक्षा दोन पेग अधिक पेउन झोपी जावे हे उत्तम Happy

आशु२९, करण जोहरने आपला लैंगिक कल डायरेक्टली उघड केलेला नाही. त्यामुळे त्यासाठी त्याचं कौतुक करावं अशी वेळ अजून आलेली नाही.

आशु२९, करण जोहरने आपला लैंगिक कल डायरेक्टली उघड केलेला नाही. त्यामुळे त्यासाठी त्याचं कौतुक करावं अशी वेळ अजून आलेली नाही.
Submitted by भरत. on 28 December, 2021 - 15:04
>>>>

मग आशू यांनी पुराव्या शिवाय त्याचा लैंगिक कल ईथे नमूद केला आहे असे म्हणायचे आहे का आपल्याला ..

प्लीज कोणीतरी कन्फर्म करा, त्याने आपला लैंगिक कल उघड केला आहे की लोकं पुराव्याशिवाय त्यावर बोलत आहेत?

तू एक यकःश्चित माबो वरील आयडी आहेस माझ्यासाठी >> यावर एक धागा यायलाच पाहिजे.
>>>>

त्या नाही काढणार. असे धागे मीच काढू शकतो.

मी कधी म्हणलं दारुडे वाईट असतात
>>>>

शाहरूखला दारुडे म्हणून हिणवता. सिगारेट ओढणारा म्हणून हिणवता. प्लीज आता पोस्ट शोधायला नका लाऊ. बाकी मी नेहमी दारूला नावे ठेवतो. दारू पिणार्‍यांना नाही. ते तर अडकले असतात दारूच्या विळख्यात

सर तुम्ही तुमचेच वाचत नाही, निदान बाकीच्यांचे तरी वाचत जावा
कसे होणार देशाचे अशाने?
मी फक्त त्याला दारुडा म्हणले, हिणवणे शब्द आणि अर्थ तुमचा
यावरही चर्चा झालेली आपली, मलाही ती शोधायला लावू नका
Happy

सर एक महान व्यक्तिमत्व आहेत, त्यांनी त्यांचे सारे आयुष्य दारुड्याला प्रमोट करायला पण दारूला डीमोट करायला खर्ची घातले आहे
>>>>

ईथेही आपण दारूडा हा शब्द शाहरूखला हिणवायलाच वापरला आहे.
असो, माझी काही हरकत नाही. मला काही सिद्ध करायचे नाहीये. त्यापेक्षा मी थोडे काम लवकर संपवतो. रात्री एखादा धागा काढता येईल Happy

ऊप्सम सॉरी.. धागा शाहरूखचा लोकांना राग का येतो हाच आहे.. म्हणजे आपली चर्चा अवांतर नाही. तुम्ही म्हणू शकता त्याला दारूडा Happy

सतराशेछपन्न प्रकारचे धागे काढायचे, ते सतत पेटते राहतील याची काळजी घ्यायची, सतरा प्रकारच्या आयडींना अठराप्रकारचे प्रतिसाद
द्यायचे, इतकं सगळं कसं जमतं हो तुम्हाला? आणि इतका फावला वेळ भेटतो तरी कसा.
माबोवर येणाऱ्या प्रतिसादांपैकी ५ टक्के प्रतिसाद तुमच्यामुळेच येत असतील. तुमचा खरतर सत्कार करायला पाहिजे माबोने.

धन्यवाद सर आपले अंतकटरण करणासारखे उदार आहे
आपण इतक्या मनाने शाहरुख ला दारुडा म्हणायची परवानगी दिलीत त्याचे पांग कसे फेडू हे कळत नाहीये
तुमच्यावरच्या गौरवग्रंथात हे उदाहरण नक्की लिहुया
(गौरव ग्रंथ म्हणजे एखाद्या व्यक्तीची स्तुती करणारा ग्रंथ नैतर माझं नाव अभिषेक असताना गौरव वरती का ग्रंथ लिहिला म्हणाल, सरांचा काय नेम नसतो, ते काय वाचतात आणि काय अर्थ लावतात हे आपल्यासारख्या पामर लोकांना कळत नाही Happy )

तुमचा खरतर सत्कार करायला पाहिजे माबोने>>>
नुसता सत्कार नाही, लकडीपुलावर जाहीर मुकाही घेण्यात यावा, असा प्रस्ताव मांडत आहे

Happy

सर तुम्हाला आवडत नाही असे काही आहे का
तुम्हाला तर खप्पड शाहरुख, सारण भरलेल्या मोदकासारखा दिसणारा स्वप्नील जोशी, सई असेही लोकं आवडतात
मग सर उपाधी आवडणारच
पण हे श्रेय शांत माणूस यांचे आहे, त्यांनी माझे डोळे उघडले
त्यांच्यामुळे मला कळलं की आपण दवणीय अंडे च्या वरची केस आहात (इंग्रजी केस, मराठी नव्हे)
त्यामुळे आपल्या सोबत त्यांचाही कुणीतरी मुका घ्यावा Happy

पण हे श्रेय शांत माणूस यांचे आहे, त्यांनी माझे डोळे उघडले>> सरांचे जबरा फॅन आहेत ते.
सर माबोवरचे अवतारी पुरुष आहेत. त्यामुळे तो देखील सरांचा एखादा अवतार असावा अशी काहीवेळा शंका येते.

मला सर ही उपाधी फार आवडू लागली आहे
हे वाचून फार छान वाटलं. आता सगळेच मोकळ्या मनाने तुम्हाला सर म्हणू शकतील

सर एक महान व्यक्तिमत्व आहेत, त्यांनी त्यांचे सारे आयुष्य दारुड्याला प्रमोट करायला पण दारूला डीमोट करायला खर्ची घातले आहे
अशी माणसे दुर्मिळ असतात
वाळवंटातील गुलबकावली चे फुलच जणू >>>> Rofl

सारण भरलेल्या मोदकासारखा दिसणारा स्वप्नील जोशी>>> ओह माय गॉड.. Rofl टू मच हसतिये मी..
आता स्वजो दिसला तर मोदक च आठवेल Lol

अरे मी नाही उडालो. सरांच्या चाहत्या एका ताईंनी त्यांना मिळालेले अधिकार वापरून उडवलं.
सर शाखासरांचे भक्त. ते सरांची भक्ती कुठेही करतात. मी सरांचा आदर्श घेऊन सरांचे धागे वर काढून सरांची भक्ती केली. यात ताईंना काय खटकले की दुसरीकडची धुसफूस निमित्त झाली समजले नाही. पण मला माझ्या विट्ठलापासून दूर केले गेले.
आता पुन्हा भक्तीत लीन होण्यासाठी आलो आहे. या भक्तीत ताईंचाच धोका आहे. त्यांना खडीसाखर चारत जाईन. पण विट्ठलापासून दूर करू नका एव्हढेच मागणे.

मी तर च्रप्स सर आणि कटप्पा सरांची ही उपभक्ती करायला तयार आहे. ताईंपासून मुख्य भक्तीलाच भय आहे. नाहीतर उपग्रहांची भक्ती आपल्याकडे चालते.

सर पोट मोकळे झाले की सारण भरलेल्या मोदकासारखे दिसणे बंद होते. मग बॉडीशेमिंग होत नाही. या विषयावरचा आपला एक धागा आहे. शौचास सकाळी जाता कि असं काहीतरी आहे. तोच वर काढा. ताई खवळलेल्या असल्याने मी भक्तीत वर काढत नाही.

Pages