शाहरूख खानचा लोकाना इतका राग का येतो ?

Submitted by केदार जाधव on 17 December, 2015 - 01:51

नमस्कार , हा धागा सुचायच तात्कालिक कारण म्हणजे दिलवाले सिनेमा पाहू नका म्हणून येणारे वाटेल ते मेसेज .
अगदी तो देशद्रोही पासून मुसलमान अन पाकडा आहे इथपर्यंत .

इथे मी सुरूवातीलाच नमूद करतो की मी शाहरूखचा फॅन आहे . त्याच सर्वात महत्वाच कारण म्हणजे "ही इज सेल्फ मेड मॅन" . त्याची स्ट्रगल अन त्यानंतर त्याने घेतलेली झेप तर कुठल्याही क्षेत्रातील माणसाने आदर्श घ्यावा अशी आहे .
दुसर या इंडस्ट्रीत राहून ही उगाच हिरोईनशी स्क्कॅंडलचा आधार न घेता फॅमिलीला महत्व देण .
त्याहूनही जास्त आवडतो मला त्याचा कभी हा , अंजाम , डर अन बाजीगर मधला अभिनय . राहुल अन राज कधी आवडलेच नाहीत मला Happy

पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यात काही दुर्गुण नाहीतच .
तो स्वतःला शहाणा समजतो , अ‍ॅरोगंट आहे वगैरे मी ऐकल आहे . अभिनयाबाबतही तो अगदी सर्वोत्तम आहे असही काही नाही , त्याच्या बर्याच मर्यादा आहेत .
याबद्द्ल टीका झाल्यास वाईट वाटायच काही कारण ही नाही .
पण समहाऊ बर्याच लोकाना त्याच्याबद्द्ल परकोटीचा राग का आहे ते मात्र समजत नाही .
आयपीएल मधे पाकिस्तानी खेळाडू घ्यायचा निर्णय त्याचा होता का ? इतर कोणीच आपल्या चित्रपटाच प्रमोशन पाकिस्तानी वाहिनीवर करत नाही का ? सगळेच सेलेब्रिटी सगळ्या आपत्तीवेळी जाऊन मद्त करतात का ?
हिंदुत्ववाद्याना सगळ्या खानात त्याचच वावड का ?

शाहरूख एक अभिनेता म्हणून न आवडण समजू शकतो , पण एक व्यक्ती म्हणून एवढा राग का ?

संयत शब्दात आपल मत मांडाव अन चर्चा हो द्यावी एवढीच अपे़क्षा . Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशू,

१) कूठलीही लिंक न देता जर तुम्हाला शाहरूखच्या उत्साहाचे रहस्य ड्रग्स म्हणायचे असेल तर तुम्ही म्हणू शकता. माझी हरकत नाही. फक्त मी त्यावर विश्वास ठेवणार नाही.

२) कभी अलविदा ना केहना चित्रपटाबद्दल मी चांगले म्हटले म्हणून मला करण जोहर आवडतो हा थेट निष्कर्श काढलात हरकत नाही. असे निष्कर्श काढणे हा प्रत्येक मायबोलीकराचा हक्क आहे.

३) मायबोलीकरांना करन जोहर आवडत नाही हे देखील आपणच ठरवले. हरकत नाही.

पण फक्त आपल्या माहितीसाठी सांगतो. एआयबी रोस्ट नामक फालतू कार्यक्रमावरून मी स्वतःच ईथेच करन जोहरला झोडपले होते तेव्हा कैक मायबोलीकर त्या कार्यक्रमाची बाजू घेत चर्चेत उतरले होते.
धागा ईथे बघू शकता. https://www.maayboli.com/node/52596

थोडक्यात तुम्हाला ऋन्मेष समजलाच नाही. मी व्यक्तीप्रेमी वा व्यक्तीद्वेष्टा नाही. एखाद्याचे जे पटेल त्याला चांगले बोलतो जे नाही पटत त्याला विरोध करतो.

४) करन जोहर समलिंगी असल्याचा उल्लेख इथे आपण केलाच आहे तर हे मात्र नमूद करू ईच्छितो की त्याबाबत मात्र त्याला मानतो की त्याने आपले सेक्शुअल ओरिएंटेशन चारचौघात उघड करायची हिम्मत दाखवली. तसेच आजवर जो नुसते कुजबुजण्याचा विषय होता त्यावर दोस्ताना सारखे हलकेफुलके चित्रपट बनवले. तो देखील अभिषेक, जॉन, प्रियांका अश्या आघाडीच्या कलाकारांना घेऊन. अन्यथा दुर्दैवाने आजही हा शब्द हिणवायलाच वापरतात लोकं

ashu29 आर यु आऊट ऑफ यूर माईन्ड???. लूझर...
Submitted by च्रप्स on 22 December, 2021

>>> आशु यांना वेगळाच आयडी समजून मी हे लिहिले... मी इथे जाहीर माफी मागू इच्छितो कि मी हार्श कमेंट टाकली...
त्या ओरिजिनल जुन्या आयडी आहेत हे नंतर कळले.
आशु - अपॊलॉजीस ...

३) मायबोलीकरांना करन जोहर आवडत नाही हे देखील आपणच ठरवले. हरकत नाही.>>>>> कशाला आवडायला पाहीजे तो? काय समाजाचे काम केले? समाज सुधारक आहे का? फालतु पिकचर काढायचे . पब्लिकला येडे बनवायचे आणी मोठा आव आणायचा. तू असशील त्याचा फॅन, बाकी तुझ्या सारखे रिटे नाहीत.

मी ऋन्मेष सरांचा फॅन आहे. सर शाखा, स्वजो, सई आणि कजो चे गुण गात राहतात आणि राहणार.
मी पण सरांचे धागे वर काढतो आणि काढत राहणार.
फॅनचे कर्तव्यच असते , ज्याचे गुण गावेत त्याला शिव्या पडाव्यात.
आई मीन, शिव्या पडल्या तरी बेहत्तर फॅनने थांबता कामा नये.
उद्या शाखा ने येऊन जरी बास कर म्हटले तरी सर थांबणार आहेत का ?
संत कावळाराम यांनी म्हटलेचि आहे

जो आवडतो सरांना, तोचि नावडे सर्वांना

मला पण आश्चर्य वाटले च्रप्सच्या आशुला बोलण्याचे. च्रप्स, होते असे कधी कधी. आजकाला ड्युंचा सुळसुळाट झालाय. पण तुम्ही पटकन असे लिहायला नको होते. असो, तुम्ही सॉरी म्हणालात ते आवडले. मनाचा मोठेपणा असला हे खूप आहे.

कशाला आवडायला पाहीजे तो? काय समाजाचे काम केले? समाज सुधारक आहे का? फालतु पिकचर काढायचे . पब्लिकला येडे बनवायचे आणी मोठा आव आणायचा. तू असशील त्याचा फॅन, बाकी तुझ्या सारखे रिटे नाहीत.
>>>>

कलाकार आवडायला तो समाजसुधारक असायला हवा हा निकष कुठून आला Happy

कलाकार आवडायला तो समाजसुधारक असायला हवा हा निकष कुठून आला >>>>>> अरे बाबा मी शाहरुख खान बद्दल नाही, करण जोहर बद्दल बोलतीय. Proud येडं आहे ते आय एस जोहरचं पोरगं. तो तरी बरा होता, किमान मनोरंजन करत होता.

Biggrin
करण जोहर हा आय एस जोहरचा मुलगा हे सामान्य ज्ञान कुठून मिळालं?

करण जोहर करतो की लोकांचं मनोरंजन. त्या शिवाय त्याचे पिक्चर लोक बघतात का?

करण जोहर हा आय एस जोहरचा मुलगा हे सामान्य ज्ञान कुठून मिळालं?>>>>>> हायला, सॉरी. मला माहीत नव्हते. Proud

धन्यवाद सांगीतल्या बद्दल.

यश

च्रप्स, तुला नाही आशु २९ या आय डीला बोलले. याच पानावर पहिला प्रतीसाद आहे.

की तो समलिंगी आहे म्हणुन की दर्जाहीन चित्रपट बनवतो म्हणुन?
>>ashu29 आर यु आऊट ऑफ यूर माईन्ड???. लूझर...

@ रश्मी,
मग आता करन जोहर हा आय एस जोहरचा नाही तर यश जोहरचा मुलगा आहे हे समजल्यावर आपले त्याच्याबद्दलचे मत बदलले का?

जर त्याचे वडील कोण आहेत याने मत बदलणार नव्हते तर तो आवडीचा नाही हे सांगताना त्याच्या वडीलांचा उल्लेख अनावश्यक वाटला.

ठोकळा ,अभिनय न येणाऱ्या प्रदीपकुमार, भारतभूषण सारख्या लोकांना म्हणतात.
. करण जोहर पण यातलाच हे माहीत नव्हतं.

In 2007, Johar was chosen as one of 250 Global Young Leaders by the Geneva-based World Economic Forum 2006.[31]
On 30 September 2006, Johar became the first Indian filmmaker to be a jury member in the Miss World competition, in Warsaw, Poland.[32]
He was the only other Indian apart from PM Manmohan Singh to be invited for the opening ceremony of the London Olympics.[33]
In 2017, Johar was invited as cultural leader in World Economic Forum.[34]
On 25 January 2020, his name was announced for the Padma Shri award, India's fourth highest civilian honour in the field of Arts.[35]

येडं आहे ते आय एस जोहरचं पोरगं.
उथळ विधाने करण्यात यांचा हाथ कोणी धरू शकत नाही. वरच्या वाक्यातला एकही शब्द खरा नाही.

परत एकदा जाहीरपणे माफी मागतो...>> इट्स ओके च्रप्स.

१) कूठलीही लिंक न देता जर तुम्हाला शाहरूखच्या उत्साहाचे रहस्य ड्रग्स म्हणायचे असेल तर तुम्ही म्हणू शकता. माझी हरकत नाही. फक्त मी त्यावर विश्वास ठेवणार नाही.>>> तू लिंक देऊन ही विश्वास नसता ठेवलास, तुझं तुणतुणं वाजवत राहिला असतास..असो.

थोडक्यात तुम्हाला ऋन्मेष समजलाच नाही. >>> इट्स ओके ना..तू एक यकःश्चित माबो वरील आयडी आहेस माझ्या साठी. तू समजलास का नाही ह्यानी काही फरक पडत नाही मला.. मला जिवन कळलेच नाही या थाटात मारे तू हे वाक्य म्हणत आहेस :लोलः

क.जो. छातीठोक पणे कबूल करतो त्याचे जेंडर स्टेटस ही चांगली गोष्ट आहे पण मग त्याने तरी ह्या विषया वर चा चित्रपट उथळपणे दाखवायला नको होता ना.. अनेक सिन्स मधे लोचे आहेत दोस्ताना च्या, पुन्हा बघा. आणि लक्षात आले तरी जशी मी कबूली दिली कभि अलविदा च्या मताबद्दल तशी काही तू देणार नाहिस..हे ही मला माहित आहे.

तू एक यकःश्चित माबो वरील आयडी आहेस माझ्या साठी>>>>
असे बोलू नका हो
सर एक महान व्यक्तिमत्व आहेत, त्यांनी त्यांचे सारे आयुष्य दारुड्याला प्रमोट करायला पण दारूला डीमोट करायला खर्ची घातले आहे
अशी माणसे दुर्मिळ असतात
वाळवंटातील गुलबकावली चे फुलच जणू Happy

अनेक सिन्स मधे लोचे आहेत दोस्ताना च्या, पुन्हा बघा. आणि लक्षात आले तरी जशी मी कबूली दिली कभि अलविदा च्या मताबद्दल तशी काही तू देणार नाहिस..हे ही मला माहित आहे.
>>>>

पुन्हा कसा बघू? मी एकदाही पाहिला नाही.. लहानपणी केबलवर लागलेला तेव्हा अध्येमध्ये काही सीन पाहिलेत. चित्रपटाची जातकुळी हलकाफुलका चित्रपट आहे एवढे कळलेय. तो स्वतः जे आहे ते त्याने स्विकारून स्वतःवर विनोद करावा असा चित्रपट बनवला हे मला ग्रेट वाटते. मग त्यातला ह्युमर जमलाय की फसलाय हा मुद्दा गौण आहे. आज हळूहळू का होईना आपल्याकडे समलिंगी संबंधांना स्विकारले जात आहे त्यामागे त्याचाही मोठ्या खारीचा वाटा आहे.

आणि कबूली कशी देऊ, कश्याची देऊ. मुळात मी माझे मत कुठलेही पूर्वग्रह मनात न ठेवता मांडतो. मी पोस्टला रिप्लाय देतो. ती पोस्ट कोणाची आहे यावर काय उत्तर द्यावे हे ठरवत नाही Happy

मला शाहरूख आवडतो तर आवडतो, उद्या माझ्या दुश्मनाला तो जास्त आवडतो म्हणून मी त्याचा राग करणे हे अनाकलनीय आहे. कोणाला काय आवडते वा समाजातील बहुतांश लोकांना काय आवडते यावरून मी माझ्या आवडीनिवडी ठरवत नाही Happy

Pages