सोप्पा पास्ता

Submitted by मृण्मयी on 24 July, 2008 - 11:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एंजल हेअर पास्ता (घेतलात तर फारच लवकर शिजतो.) मी स्पगेटी वापरते.
मीठ
पास्त्यासाठी पाणी
ऑलिव्ह तेल
ब्रॉकोली
बाळ गाजरं
चुलीवर शेकलेललं कोंबडं , नाही तर तळलेलेल मासे, उरलेले, शिजलेले इतर जलचर घरात असल्यास. (नसल्यास वा न घातल्यास काSSSही फरक पडत नाही.) म्हणून कृती शाकाहारीत टाकलीय.
इथे बाजारात JM foods exotics inc चा Parmesan bread dip seasoning मिळतो. तो वापरावा. मस्त चव येते. किंवा लसणीचं तयार मीठ चालेल.
..........

क्रमवार पाककृती: 

कृती:
पास्ता त्याच्या डब्यावरच्या कृतीप्रमाणे शिजवून घ्यावा. (पाण्यात मीठ आणि ऑलिव्ह तेल घालून.)
कढईत ऑलिव्ह तेल घालून ब्रॉकोलीचे बारिक केलेले तुरे खमंग परतून घ्यावेत. त्यावर बाळ गाजरं घालून आणखी जरा परतावं.
वरून पारमेजॉयुक्त पाबुडवण्याचा यता साला घालावा.
पास्त्यातलं पाणी काढून त्यात ह्या भाज्या मिसळाव्या. वरून हवं तर हा पा. बु. आ. म. घालून गरम खावा.
लागणारा वेळ (पास्ता शिजायला लागेल तेव्हडाच. तोवर भाज्या परतून होतात.)
भाज्यांबरोबरच जे काही मांसाहारी जिन्नस घालणार असाल ते घालायचे. (रश्श्यातले तुकडे काढून घालु नयेत.)

वाढणी/प्रमाण: 
ह्याला काही प्रमाण वगैरे लागत नाही. पास्ता उरला तर शिळा खावा. कमी पडल्यास पुन्हा करावा. भाज्या हव्या तितक्या घालाव्यात. (२ पाऊंड दब्यातला पास्ता ८जणांना पुरतो.)
माहितीचा स्रोत: 
वेळखाऊ प्रकार करण्याचा आळस. त्यामुळे हा स्वतः केलेला प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच आहे कृती.
.
मला एंजल हेअर आणि स्पगेटी हे दोन्ही प्रकार आवडत नाहीत. penne/Farfalle/Fusilli किंवा तत्सम काही घेतले तर चालु शकेल ना ?

हरकत काय असणार? चिकन किंवा ईतर काही जलचर वगैरे असले तरी ते हरकत घ्यायच्या अवस्थेत नसतील .. आणि तूला तर angel hair आणि spaghetti पेक्षा हे दुसरे प्रकार आवडतात, मग हरकत कोणाची? :p
.
हो, पण मला वाटतं, angel hair पेक्षा penne, fusilli ह्यांना शिजायला थोडा जास्ती वेळ लागतो त्यामुळे हा सोप्पा पास्ता थोडा कठिण होण्याची शक्यता नाकारता येत नाही .. :p

सिंड्रेला, बिनधास्त घे वाट्टेल तो पास्ता! कुणाच्या xxची टाप आहे नाही म्हणायची! Happy उकळत्या पाण्यात टाकलं की कायबी शिजतं! तेव्हा पास्ता सोप्पा तो सोप्प्पाच!

काय बाई इनोदी बाया तुमी समद्या Wink

मृ, पास्ता त्या प्लेट मध्ये एकदम ऑथेंटिक दिसतोय.

थँक्यू मृण! Happy
आणतेच आता पा.यु.पा.बु.आ.म. Proud

बरं जोक्स् जाऊ देत .. पास्ता हा माझ्या आवडीचा विषय .. तर माझीही एक relatively सोपी कृती देतेय ..

कुठलाही पास्ता, टोमॅटो सॉस, EVOO (म्हणजेच ते extra virgin olive oil, extra virgin नसलं तरी बाकी प्रकार ही चालायला हरकत नाही), असले तर shallots किंवा मग कांदा, लसूण, फ्रेश किंवा dried herbs, मी सहसा बेसिल आणि पार्सली वापरते, मीठ, मीरपूड आणि कायेन पेप्पर ..
.
यात आवडतील तशा कुठल्याहि भाज्या घालता येतील .. मी availability किंवा मूड प्रमाणे, कॉर्न, मटार दाणे, पालक, mushrooms, गाजर, ब्रॉकोली, झ्युकिनी असलं काहिही घालते ..
.
एका बाजूला पास्ता शिजवण्यासाठी पाणी उकळत ठेवावं .. भाज्या वगैरे चिरून तयार असल्या तर पास्ताचं सॉस आणि पास्ता शिजवणे एकाच वेळेला होऊ शकतं आणि वेळ वाचतो .. तर सॉस करायच्या पॅन मध्ये olive oil तापवावं .. तेल तापलं की त्यात कांदा/shallots आणि लसूण घालून परतावं .. ज्या भाज्यांना शिजायला जास्त वेळ लागतो म्हणजे गाजर आणि मोठे तुकडे असले तर ब्रॉकोली तर मी त्या पास्त्याबरोबरच शिजवून घेते .. बाकीच्या पटकन शिजणार्‍या भाज्या कांद्याबरोबर परतून घ्याव्या .. मग त्यात चवीप्रमाणे मीठ, मीरपूड, cayenne pepper घालावं .. canned टोमॅटो सॉस मध्ये मीठ असतं हे लक्षात ठेवून मीठाचं प्रमाण घालावं .. मग त्यात टोमॅटो सॉस, herbs (dried असले तर आताच आणि फ्रेश असले तर सगळ्यांत शेवटी) घालावेत .. सॉस ला छान उकळी आली कि अगदी मंद आचेवर गरम रहण्याकरता ठेवून द्यावं .. बाजूला पाण्याला उकळी आली की त्यात मीठ घालून मग पास्ता घालावा .. पास्त्याच्या पॅकेटवरच्या सूचनांप्रमाणे तो शिजला की मग drain करून सॉस मध्ये घालावा .. एकत्र करून सर्व्ह करावा आणि आवडत असेल तर सर्व्ह करताना त्यावर grated parmesan cheese घालावं ..
.
मला जेवायला बोलावल्यास आणि बरोबर गार्लिक ब्रेड असल्यास फारच चविष्ट लागतो हा पास्ता .. :p

पास्ता करायला खूप सोपा पडतो हे खरं आहे. पार्मेजान चीज ताजंच ग्रेट करून वापरावं; त्याने चवीत खूपच फरक पडतो. शिवाय मॅरिनेटेड कालामाटा रेड ऑलिव्हज मिळत असले तर तेही बिया काढून पास्त्यात इतर भाज्यांबरोबर (झुकिनी, ब्रॉकोली/फ्लॉवरचे तुरे, गाजर, रेड/येलो पेपर्स, वगैरे) घातले तर अतिशय सुरेख चव येते. हे ऑलिव्ह्ज जरा महाग असतात पण वर्थ इट. कुठल्याही मोठ्या सुपरमार्केटच्या डेली सेक्शन मधे मिळायला हवेत.

चाफा, तुझ्या रेसिपीची आतुरतेने वाट बघतोय.;)

पास्ता हा माझ्याही जिव्हाळ्याचा विषय. रोज एकाच चवीचा पास्ता खायलाही माझी ना नसते.
माझी अगदी सोप्पी आणि कदाचित हेल्दी(ही) रेसिपी अशी आहे.

जेवढा हवी असेल तेवढी होल व्हिट लिंग्विनी ( माझा आवडता -Gia Russa brand) , EVOO, लसणीच्या पाकळ्या-स्लाईस करुन- मी शक्यतो 'एलिफंट गार्लिक' वापरते, ४,५ कंपारी टोमॅटो, चवीला हवं असेल ते सिझनिंग, रेड पेपर फ्लेक्स, मीठ चवी प्रमाणे,हवं असल्यास पर्मेजान चीज, किंवा मोझरेल्ला चीजचे क्युब्ज, वरुन बेजिलची पानं बारीक चिरुन.

पास्त्याकरता पाणी उकळत ठेवून उकळी आल्यावर हवं असल्यास मीठ घालून लिंग्विनी शिजवून घ्यावी-साधारण ७,८ मिनिटं, हवं असल्यास थोडं ऑलिव्ह ऑईल्ही घालावं म्हणजे पास्ता एकमेकांना चिकटणार नाही.
एका पॅनमध्ये ऑ.ऑ गरम करुन त्यात लसणीचे स्लाईसेस परतून घ्यावेत. प्रत्येक कंपारी टोमॅटोचे चार तुकडे करुन ते ही तेलावर परतून घ्यावेत व जरा ठेचावेत.त्याला पाणी सुटल्यावर त्यावर पेपर फ्लेक्स घालावेत. हवं असेल ते सिझनिंग घालून जरा शिजू द्यावं. मग त्यावर शिजलेला पास्ता पाणी काढून टाकून घालावा. चांगलं एकजीव होईपर्यंत परतावं. साधारण २,३ मिनिटं. त्यावर फ्रेश बेजिलची पानं घालावीत. आणि प्लेटमध्ये घेतल्यावर चीज घालावं.

मृण, तुझी रेसिपीज बरोबर फोटो द्यायची आयडिया आवडली एकदम! Happy
लवकरच करुन बघेन सगळे पास्ते Happy

मृ, पास्ता खाता खाताच पोस्टते आहे. मस्तच झालाय. दुकानात पा. बु. आ. म. च्या शेजारीच लसुण आणि बेसिल मसाला मिळाला. मी तो पण घातला भाज्या परतुन झाल्यावर. चांगला लागतो आहे.

सिंड्रेला, वा वा मस्तच! आता लसूण- बेसिल (तुळस) (ल. तु. मसाला) आणते.

छान