दलिया खिचडी

Submit to kanokani.com

दलिया म्हणजे काय?

अल्पना दलिया म्हणजे खीर करतो तो च ना ? भरडलेला गहु थोडक्यात.
करुन बघेन नक्की

भरड दळलेला गहु. गहु तसा भरड दळायच्या आधी त्यावर काही प्रोसेस करतात का हे माहित नाही. इंग्रजीत बहुदा Cracked Wheat म्हणतात.
हा दलिया वापरुन दुध घालुन खीर किंवा शिर्‍यासारखा पदार्थ पण करतात. तसेच दलिया वापरुन सांज्यासारखा पण पदार्थ करता येतो. हिवाळ्यामध्ये खायला पौष्टिक पदार्थ.

छान पाककृती आहे. नक्की करून बघेन

~साक्षी

दलिया दळताना काही प्रोसेस केली जात नाही.

सांजा दलिया पेक्षा बारिक दळला जातो.

>>१ चमचा कच्चा मसाला
कच्चा मसाला म्हणजे काय?
बाकी पाकक्रुती मस्त आहे. वन डिश मिल वाटतेय अगदी !

मस्तच. मसुरीच्या डाळीची पण छान लागते.

मला डायटीशीयननी दलिया सुचवलेला डायेट मध्ये बदल करण्यासाठी...
अशी दलिया खिचडी मी फोडणी न देता करते आणि खाते.... चवीलाही चांगली, पोटभर्रीची, आणी महत्वाचे म्हणजे वजन कमी करायला मला खुप मदत झाली ह्याची.

वरील कृतीचा खुप उपयोग होईल मला अजुन बदल आणण्यासाठी. मी पाहिलेय की गरम मसाल्याऐवजी काळा मसाला वापरला तर चव खुप छान येते.

प्रथमच log-in झाले आहे

मस्तच. मी डाळ न घालता आणि सगळ्या भाज्या घालून करते. आता डाळ घालून करून बघते.

अशीच बाजरीची भरड आणी मुगाच्या डाळीची खिचडी पण छान लागते, फक्त बाजरीची भरड थो डा वेळ भिजत ठेवावी लागते.

मस्त आहे ही रेसिपी! सोपी आणि पटकन जमणारी. स्मित

सोपी वाटते आहे पाकृ....आणि हेल्दीपण आहे. स्मित

आज केली होती. छान झाली होती स्मित सालासहीत डाळ नव्हती म्हणून मोड आलेले मूग घातले.

छान आणि सोप्पी वाटत्ये पाकृ. पण कच्चा मसाल मला पण कळल नाही. गोडा टाकुन बघेन.

कालच केली दलिया खिचडी.. मस्त झालेली. मी आपली साधीच मुगडाळ घातली.

मिही आज केली ही खिचडी, मस्त लागते आहे. धन्स अल्पना

अग आमच्याकडे आई नेहेमीच्या खिचडीसाठी काळा मसाला / गोडा मसाला नाही वापरत. कच्चा मसाला वापरते (पुलाव साठी पण तोच वापरते, बहुतेक अन्नपुर्णामधल्या पुलाव मसाल्याच्या प्रमाणानुसार करते) नक्की प्रमाण माहित नाही. मी तिच्याकडूनच घेवून येते.
गोड्या मसाल्याने पण छानच होते खिचडी.

दलिया आधी भिजवुन ठेवावा लागतो की तसाच फोडणीत परतुन घेतला तरी शिजतो ?

काल केलेली ही खिचडी मी. माझ्याकडे पण पिवळी ( सालीशिवाय) मूगडाळ होती - तीच घातली. अन फ्लावर नव्हता म्हणून लाल अन हिरव्या फुग्या मिर्च्या घातल्या. मस्तच झाली एकदम. पुढच्यावेळेस प्रेशर पॅन मधे न करता साध्या भांड्यात करून बघणार.

दलियाच्या ऐवजी तांदूळ वापरले. दलिया नव्हता. बाकी हिच रेसिपी. कच्चा मसाला ऐवजी खडा मसाला वापरला. एकदम मस्त चव.

मी नेहेमी खिचडीत ४ कप पाणी घालयच असेल तर ३ कप पाणि आणि एक कप दूध वापरते. फार छान लागते खिचडी.

अल्पना, गेल्या आठवड्यात दोनदा केली लागोपाठ एकदा नुसतंच पुलाव सारखं केलं होतं डाळ न घालता तेही आवडलं सगळ्यांना. जाम हेवी होतं पण थोडंसच खाल्ल तरी पोट फुल्ल.

तुला धन्नो या रेसिपीसाठी स्मित

अल्पना, कालच ही रेसीपी करुन पाहिली.
छान झाली होती.
आर्च, सेम स्मित मी पण थोडे दुध घालते खिचडी आणि पुलाव करताना, त्याने छान चव येते.