मांसाहार विक्री बंदी ! हुकुमशाहीचा विजय असो !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 September, 2015 - 07:07

जैन पर्युषण काळात जैन समाजाची लोक व्रत करत असल्याने मुंबई महानगरपालिकेने ४ दिवस आणि मीरा भायंदर महानगरपालिकेने तिथे जैन समाजाचे लोक बहुसंख्य असल्याचे लक्षात घेता ८ दिवस मांसविक्रीवर बंदी आणली आहे.

भारतासारख्या लोकशाही तत्वावर चालणार्‍या देशात हा निर्णय तालिबानी स्वरुपाचाच वाटतो.

एक दिवस कायद्याने पुर्ण भारतात मांसाहार बंदी झाल्यास, तसेच लोकांनी फक्त आणि फक्त शाकाहारच करावा असा फतवा निघाल्यास गैर वाटू नये अशी परिस्थिती उद्भवली आहे.

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का! असे आज पुन्हा एकदा म्हणावेसे वाटतेय.
लोकांनी काय खावे आणि काय नाही यात काहीही कारण नसताना हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.

लोकहो, तुम्ही शाकाहारी असाल वा मांसाहारी, पण आज याविरुद्ध आवाज नाही उठवलात तर येत्या काळात अश्याच अनेकानेक निर्बंधासाठी तयार राहा ..
म्हातारी मेल्याचे दुख नाही पण काळ सोकावतो, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही..

___________________________

संदर्भासाठी लिंका

1) #meatban मुळे संताप, ही मुंबई की `बॅनिस्तान' ?
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/big-ban-fest-t...

२) मांसविक्री बंदला शिवसेनेचा कडाडून विरोध
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/controversy-ov...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यावेळेला महानगरपालिकेचे मेयरच स्वतः त्या विशिष्ट समाजाचे आहेत. त्यामुळे २ पेक्षा वाढिव दिवसांचा निर्णय झालेल अस्ण्याची शक्यता नाकारता येत नाही.

>>>

या धाडसी विधानाला हुकुमशाही नाही म्हणावे तर आणखी काय ?

आणि चार दिवस मांसमच्छी नाही खाल्ली, तर मरणार आहेत का मांसाहारी लोक? >> पर्युषण काळात 'ईतरांनी' मांस खाल्ले तर मरणार आहेत कां जैन लोक?? असा युक्तीवाद आला तर? किंवा मुसलमानांनी बीफ खाल्ले तर नरकात जाणारेत का हिंदू लोक?? हा युक्तीवाद कसा वाटतो??

अस्सल हिंदू मारवाडी स्वधर्माचे पालन करण्याबाबत कट्टर असतो.>> अर्रर्र, म्हणजे प्रचंड व्याजाने व्याजाने कर्ज देऊन शेतकर्‍यांना पिचवणारे मारवाडी कट्टर हिंदू वगैरे कां?? छान छान!!
ते "फायनान्स" करतात हा देखिल गैरसमज आहे >> बरं मग हे गैरसमज दूर करतां काय??

हा हिंदुस्थान आहे.हिंदूंना "गोवंशाचे" मांस सोडून अन्य मांस/मासे खाण्यास बंदी नाहीये> हा भारत आहे. आणि हिंदूना कशाला , सर्व नागरिकांना आपण काय कधी खावे याचा अधिकार असला पाहिजेच.

हे जैन बटाटे, रताळी, कांदा-लसुण ई. खात नाहीत. मग यांच्यावर पर्युषण काळात बंदी आणली तर रे लिंबुरामा??

हा प्रश्न मुळात मांसाहार-शाकाहाराचा नसून व्यक्तीस्वातंत्र्याचा आहे असे नाही का वाटत?
>>

कसकाय? ४ दिवसांनी मिळतंय की? तुमच्या लोकलमध्ये म्हणतात तस थोडा 'अड्जस्ट' कर लेओ न भाव …

आणि चार दिवस मांसमच्छी नाही खाल्ली, तर मरणार आहेत का मांसाहारी लोक? >> पर्युषण काळात 'ईतरांनी' मांस खाल्ले तर मरणार आहेत कां जैन लोक?? असा युक्तीवाद आला तर? किंवा मुसलमानांनी बीफ खाल्ले तर नरकात जाणारेत का हिंदू लोक?? हा युक्तीवाद कसा वाटतो??

हे जैन बटाटे, रताळी, कांदा-लसुण ई. खात नाहीत. मग यांच्यावर पर्युषण काळात बंदी आणली तर

>>>

भारी पोस्ट आणि युक्तीवाद Happy

या धाडसी विधानाला हुकुमशाही नाही म्हणावे तर आणखी काय ?

>>

बहुमतात असलेल्यांची हुकुमशाही … सरकार पाडा न राव Proud

आठच दिवसांचा प्रश्न आहे ऋन्मेषा. तू आपले आधीच खरेदी करुन दीप फ्रीज करुन ठेव. छोट्याच्छोट्या पोरशनस मध्ये. करण्यापुर्वी काही तास बाहेर काढुन ठेवायचे. म्हणजे थॉ होते. हा का ना का...

हे जैन बटाटे, रताळी, कांदा-लसुण ई. खात नाहीत. मग यांच्यावर पर्युषण काळात बंदी आणली तर
>>

आणा … कांद्याचे भाव उतरतील …

तुमच्या लोकलमध्ये म्हणतात तस थोडा 'अड्जस्ट' कर लेओ न भाव …
>>>
हरकत नाही, तशी विनंती केली तर विचार करण्यात येईलच.
हे लादण्यात आले आहे असे नाही का वाटत.

हे लादण्यात आले आहे असे नाही का वाटत. >> मग काय प्रत्येकवेळेस "सामन्य जनतेच्य (ढिगभर एसी वापरणा-या) प्रतिनिधिप्रमाणे" जनतेचे मत मागवाच्ये का एस एम एस ने?
तो पर्यंत त्या दुकानात उलटे टांगलेल्या बक-याने काय करायचे?

शाकाहार्‍यांनी भाज्या खाणे बंद करावे, डाळ खाणे बंद करावे ... भाज्या ८० रु. कि, तूरदाळ १४० रु कि, झालीये. भाव खाली येतील. नै का हो वैद्य?

आधी १५ आगष्ट, २ आक्टोबर आन २६ ज्यानेवारीचा ड्राय डे बंद झाला पायजेल ही मागणी करा … मंग आमिबी तुमच्या मागणीस पाठींबा देतु.

आठच दिवसांचा प्रश्न आहे ऋन्मेषा. तू आपले आधीच खरेदी करुन दीप फ्रीज करुन ठेव.
>>>>>
असेही काही करायची गरज नाही पडणार,
ड्राय डे च्या नावावर जो एक दिवसाच्या दारूबंदीचा तमाशा चालतो त्यात कोणीही मद्यपी तहानलेला राहत नाही, उलट हट्टाने न चुकता पितो.. आणि ती उपलब्धही होतेच. गैर मार्गाने

सकुरा इथे मासांहारावर बंदी आणलेली नसुन एका समाजाच्या सणाचा आणि त्यांच्या भावनेचा आदर करुन फक्त काही दिवस "विक्री" वर बंदी आहे.
उगाच संबंध नसलेल्या लिंका देउ नका...

आधी १५ आगष्ट, २ आक्टोबर आन २६ ज्यानेवारीचा ड्राय डे बंद झाला पायजेल ही मागणी करा … मंग आमिबी तुमच्या मागणीस पाठींबा देतु.
<<

ते १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी तर ठिक आहे पण २ ऑक्टोबरला ड्राय डे चा सप्ताह असतो, त्याबद्दल कुणी आवाज उठवलेला पाहीला नाही.

त्यांच्या भावनेचा आदर करुन > Lol मुसलमानांना सणाच्या दिवशी बीफ खायचे आहे. त्यांच्याही भावनांचा आदर व्हावा.

शाकाहार्‍यांनी भाज्या खाणे बंद करावे, डाळ खाणे बंद करावे ... भाज्या ८० रु. कि, तूरदाळ १४० रु कि, झालीये. भाव खाली येतील. नै का हो वैद्य?

>>

बरोबर. मागणी पुरवठा छान समजल आपल्याला! आता पावसाळी वातावरणात सोय करून ठेवायची असते हे लक्षात घ्या! पावसाळ्यात कांदा, डाळींचे भाव वाढतात हे अनुभवाने जाणतात लोक्स. तर पोतभर कांदी उन्हाळ्यात घेऊन पलंगाखाली पसरवून ठेवायची … पावसाळ्यात कांदा खायचाय त वास सहन करायचा बर! आणि डाळीच एक पोत हिवाळ्यात घेऊन ठेवायचं ७५ - ८० च्या भावांनी.

भाज्यातर २० रुपये पाव आहेतच गेली ४ ५ वर्ष! त्यात नवीन ते काय?

उगाच संबंध नसलेल्या लिंका देउ नका.
<<
Lol

मुसलमानांना बिफ खायला कुणी बंदि केलेय? त्यांनी खावे की, फक्त जिथे मिळते तिथे जाऊन.

मुसलमानांना सणाच्या दिवशी बीफ खायचे आहे. त्यांच्याही भावनांचा आदर व्हावा.
>>

माझे अनुमोदन आहेच … पहिलेपासून! बीफबंदी नक्कोच! मटण महाग झालेय त्यामुळे.

मी पण मी पण !
रमजानच्या १ महीन्यात दिवसभर तयार अन्नपदार्थ विकण्यास बंदी करा. रोजे करणार्‍यांना खाणे चालते त्याच वेळेत तयार अन्नपदार्थ विक्री करण्यात यावी.

एका महत्त्वाच्या विषयावर काढलेला 'छातीबडवू' धागा!

बाकी जैन समाजाचे वर्चस्व हळूहळू प्रस्थापित होत चाललेले आहे ह्याचे हे चिन्ह आहे. आहाराबाबत बंदी नसावी. ज्यांनी ही सर्वप्रथम बंदी सुरू केली त्यांचा निषेध!

रमजानच्या १ महीन्यात दिवसभर तयार अन्नपदार्थ विकण्यास बंदी करा.

>>

घरात पण बनवू देऊ नका, अशी सुधारणा सुचवू इच्छितो.

>>एका समाजाच्या सणाचा आणि त्यांच्या भावनेचा आदर करुन फक्त काही दिवस "विक्री" वर बंदी आहे.>>
>>यावेळेला महानगरपालिकेचे मेयरच स्वतः त्या विशिष्ट समाजाचे आहेत. त्यामुळे २ पेक्षा वाढिव दिवसांचा निर्णय झालेल अस्ण्याची शक्यता नाकारता येत नाही.>>

एखाद्या समाजाच्या भावनेचा आदर म्हणून बंदी असणे वेगळे आणि माझी सत्ता आहे, मी विशिष्ठ समाजाचा आहे म्हणून माझ्या समाजाच्या सणानुसार नियम करणे वेगळे! समाजाला धोका आहे तो या दुसर्‍या वृत्तीचा !
तसे तर लोकं शेजारच्या गावातून मास विकत आणू शकतातच. त्यात काय विशेष! चलता है वगैरे विचार करुन चुकीच्या विचारधारेचे समर्थन तर करत नाही ना ?

एका महत्त्वाच्या विषयावर काढलेला 'छातीबडवू' धागा!
>>>>>>>
किमान छाती बडवल्याशिवाय इथे न्याय मिळत नाही बेफिकीर
..

बाकी जैन समाजाचे वर्चस्व हळूहळू प्रस्थापित होत चाललेले आहे ह्याचे हे चिन्ह आहे.
>>>>>>>
नाही बडवली तर हे चिन्ह केवळ चिन्ह राहणार नाही त्याचा नकाशा होईल

जर शासन एखाद्या समाजाप्रती झुकत कायदे बनवत असेल तर याला लोकशाहीचा अंत म्हणू नये तर आणखी काय..

Pages