अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट्रंपची इकाॅनाॅमी बाबतची धोरणं >> तुम्हाला कळली असतील तर इथेही टाका. आम्हाला तर फक्त अमेरिकेच्या सीमा बंद करू आणि तिकडे गेलेले जॉब्ज परत आणू इतकंच कळलं आहे. तुम्हाला यापल्याड काही आतल्या गोटातली माहिती असेल तर सांगा की

विकु,
हेच भारताबाबत विचार केला तर गेल्या निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेस प्रचंड करप्ट आहे आणि भाजपा काही बदल करेल असं वाटत होतं. तेव्हा भारतात असतो तर भाजपाला मत दिलं असतं. पण आज वाटतंय की करप्ट असणं आणि देशात फुट पाडणं यात पर्याय निवडायचा असेल तर करप्टपणा कधीही अगदी कितीही असला तरी परवडला.

विकु 'ट्रंप university' हा नक्की काय प्रकार असावा असे तुम्हाला वाटले ?

राज नक्की कळले नाहि. ट्रंप कुठल्या बाजूने उभा आहे ते कळले पण तो हि धोरणे अधिक योग्य तर्‍हेने राबवेल असे तुम्हाला वाटले ते कशाच्या आधारावर वाटले ते नाहि कळले. स्वतः चे कँपेन नीट चालवताना नाकी नऊ आले आहेत तिथे ज्यात दोन्ही बाजूंचे पाय वेडेवाकडे अडकले आहेत ती धोरणे राबवता येतील हा विश्वास ?

विकु, तुम्हाला अमर सिंगने येऊन सांगितले का? Wink
चटवाल फॅमिली क्लिंटनचे 'मित्र' आहेत ते डेमोक्रॅटिक पार्टीला मिलीअन्समधे डोनेशन देतात म्हणून का? बुशच्या मित्रांमधे असे डोनेशन देणारे कोण होते बघायला हवे.
ती करप्ट आहे, ट्रस्टवर्दी नाही म्हणतात पण उदाहरण द्यायची वेळ आली की शेंडाबुडखा नस्लेली ऐकीव माहिती देतात.
नोटः मी हिलरी सपोर्टर नाही, पण मला ती ट्रंपपेक्षा चांगली प्रेसिडेंट होऊ शकेल असं वाटतंय. व्होट फॉर द लेसर डेव्हिल Wink

>>ते कशाच्या आधारावर वाटले ते नाहि कळले.<<

१: ट्रंप हा करीयर पाॅलिटिशीयन नाहि, पण सिजन्ड प्रशासक आहे
२: वाचाळ आहे, पण साळसुदपणे धडधडीत खोटं बोलणारा नाहि
३: एखाद्या यशस्वी सीईओ प्रमाणे चाणाक्श टिम (स्वत:तले गॅप्स भरुन काढण्यासाठी) निवडण्याची क्शमता त्याच्यात आहे
४: कुठल्याहि गटाचा, लाॅबीचा त्यांच्या फायद्याचा एखादा निर्णय घेण्यासाठी त्याच्यावर प्रभाव/दबाव नाहि
५: नो बॅगेज, नो डार्क पास्ट हेंस वोंट लेवरेज एक्झिक्युटिव पावर्स टु कवर हिज *##

नाऊ, लाइक अदर्स इफ यु आर आस्किंग "हौ हि इज गोइंग टु डु इट?", द आन्सर इज सिंपल.

८ इयर्स ॲगो ए रुकि सेनेटर फ्राॅम इलिनाॅय, विथ नो एक्स्पिरियंस इन एनी ॲडमिनिस्ट्रेशन वाट्सोएवर बिकेम पोटस, जस्ट आॅन हिज ओरेटरी स्किल्स. इफ हि कुड डु इट, देन व्हाय नाॅट ट्रंप. ट्रंप पझेस वे बेटर ट्रेट्स दॅन हिम... Happy

इंट्रेस्टींग व्यु. एकदम अचानक तो नॉट सो बॅड वाटला काही सेकंद तरी! Lol
मेक्स सेन्स प्ण एक दोन मुद्दे आहेत. थोड्यावेळानी लिहितो.

त्या रुकी स्टेट सेनेटर चे ओरेटरी स्किल्स जगासमोर यायच्या आधी इलीनॉय मधल्या त्याच्या संपर्कात असलेल्यांनां वाटत होतं की तो अमेरिकेचा पहिला ब्लॅक प्रेसिडन्ट होणार. ट्रम्प बद्दल असं कोणाला एव्हढा पॉझिटीव्ह कॉन्फिडन्स आहे का?

आणि एव्हढा स्ट्राँग अ‍ॅड्मिनिस्ट्रेशन चा अनुभव असताना ट्रम्प युनिव्हर्सिटी, दोन-तीनदा कर्जातून पळवाट काढायला बँक्रप्सी, अविचारी वक्तव्यं प्रेसिडेन्शियल कॅम्पेन मध्ये इत्यादी हे सगळं बॅगेज असणारा, केवळ "अँग्री" "फिअर" इत्यादीवर मतं मिळवणारा ओबामा पेक्षा आणि हिलरी पेक्षा "मच बेटर"??

>>ट्रम्प बद्दल असं कोणाला एव्हढा पॉझिटीव्ह कॉन्फिडन्स आहे का?<<

हा हा. घोडा मैदान जवळच आहे...

ॲंड डोंट गेट मी स्टार्टेड आॅन हौ (रादर व्हाय) ओबामा वन द इलेक्शन...

बॅंकरप्सी, डिवीजन क्लेजर, प्राॅडक्टलाईन सनसेट हे सगळे पार्ट ॲंड पार्सल आहेत, प्रत्येक बिझिनेस चे. देर आर मेनी फॅक्टर्स ड्राइव/लिड टु दॅट सिचुएशन.

डेमोक्रॅटिक पक्षाने एका मूळ पाकिस्तानी असणार्‍या युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकाच्या बापाला बोलावून एक अत्यंत सवंग प्रयोग केला आहे. त्या बापाने अगदी भावनेला हात घालून भाषण केले की माझ्या मुलासारख्या लोकांना ट्रंप व्हिसा नाकारणार का वगैरे.
आता एका दुसर्‍या प्रसंगाची कल्पना करा. ट्रंपच्या अधिवेशनात सॅन बर्नार्डिनोच्या हल्ल्यात बळी पडलेल्या कुठल्या स्त्रीचा बाप असेच भावनेला हात घालणारे भाषण करतो आहे की "त्या नीच अतिरेकी तश्फीन मलिकला ओबामा प्रशासनाने व्हिसा दिला नसता तर माझी मुलगी आज जिवंत असती". हा प्रसंग काय कमी अश्रूखेचक ठरला असता काय?

आता त्या सैनिकाचे मरण जास्त महत्त्वाचे का सॅन बर्नार्डिनोच्या बळीचे? सैनिक निदान जाणून बुजून धोका पत्करून युद्धात उतरतो. सॅन बर्नार्डिनोत काय झाले? कुठल्याशा ख्रिसमस पार्टीला जाणारी महिला अतिरेक्याची शिकार झाली.

अशा प्रकारे अश्रूखेचक भाषणे करुन धोरणे ठरवली जाऊ नयेत.

आणि ज्या युद्धात तो पाकिस्तानी मूळ असलेला सैनिक बळी पडला त्या बिनडोक, खर्चिक, विध्वंसक युध्दाला कुणी पाठिंबा दिला होता? ट्रंपने ? आजिबात नाही. हिलरीने दिला होता. तेव्हा त्या सैनिकाच्या हौतात्म्याचे कारण निदान काही प्रमाणात हिलरी हेच आहे हे विसरून चालणार नाही. कितीही परदेशी लोकांना व्हिसे दिले तरी त्यांना असल्या खाजवून खरूज प्रकाराच्या युद्धावर पाठवून शहीद करणे कितपत शहाणपणाचे वा धोरणीपणाचे आहे?

ट्रंप व्हिसा देणे बंद करा म्हणत होता ते त्या सॅन बर्नार्डिनोच्या पार्श्वभूमीवर. तेही तो असे म्हणाला की अशा लोकांना व्हिसा इतका बिनबोभाट का मिळतो ह्याचा तपास लागेपर्यंत अशा देशातून मुस्लिमांना येऊ देऊ नये. ह्यात फार काही वावगे नव्हते. पण ह्या पाकिस्तानी बापाच्या निमित्ताने मिडिया ट्रंपवर अकारण हल्ला करत आहे.

त्यात हिलरी व तिच्या दबावगटाने डेमो पार्टी कशी हायजॅक केली आणि बर्नीचे पद्धतशीरपणे खच्चीकरण केले हा विषय विसरला जातो आहे. प्रायमरी निवडणुकीत असा पक्षपातीपणा करणे हे लोकशाही परंपरेला शोभते का?

१. ट्रंप हा करीयर पाॅलिटिशीयन नाहि, पण सिजन्ड प्रशासक आहे
सिजन्ड प्रशासक असल्याबद्दल शंका आहेत कारण त्याचा रेकॉर्ड एखादी कंपनी घेऊन ती नीट पुढे चालवून तिची प्रचंड प्रगती वगैरे झाली असा नाहीये. इतर बिलियनेअर (असुमिंग ट्रंप इज वन) त्यांचा तसा रेकॉर्ड आहे. त्यात व्हाईट हाऊस मध्ये प्रशासक असणे इज डिफ्रंट दॅन बिईंग इन अ कंपनी. बायपार्टिसन डील करता आल्या तर काही खरं आहे. लोकं तुम्ही म्हणाल तसं एकत नाहीत. यु हॅव टू लिसन अ‍ॅन्ड होपफुली प्लए द गेम फॉर द ग्रेटर गूड (कंट्री).

२: वाचाळ आहे, पण साळसुदपणे धडधडीत खोटं बोलणारा नाहि
आयँम सो सरप्राईज्ड यु सेड धिस. त्याला पोलिटिक्स मध्ये सध्या धडधडीत खोटं बोलणं शक्य नाहीये कारण सिंपली त्याला हिस्ट्री नाही पॉलिटिक्स मध्ये पण इतर ठिकाणी हा प्रताप त्यानी केलाय. स्टेक्सच्या वेंचर मध्ये, युनिवर्सिटी बाबत केलेल्या प्रॉमिसेस आणि त्या सगळ्यांना फिकं पाडेल असं वाट्टेल त्या गोष्टींमध्ये जिथे आजिबात पुरावा नाही तिथे तो मी याँवय अन त्याँवय हे अगदी बिनबोभाटपणे प्ल्ग करतो. ह्या काही नुसत्या वाचाळपणाच्या साईन्स नाहीत. उद्या तो सत्तेत आला की तिथेही हेच करेल ह्यात शंका नाही.

३: एखाद्या यशस्वी सीईओ प्रमाणे चाणाक्श टिम (स्वत:तले गॅप्स भरुन काढण्यासाठी) निवडण्याची क्शमता त्याच्यात आहे
नं १ मध्ये ह्याबाबत लिहिलय. असं कुठेही त्यानी खुप चांगले सकसेसर नेमले आणि एखादी कंपनी जी १) त्यानी मोठी केली आणि २) त्यानी नेमलेले सक्ससेर पुढे ती कंपनी/ब्रँड पुढे इफेक्टिवली चाल्वू शकतील अशी कुठलीच उदाहरणं नाहीत. He might've done some good deals in the real estate market back then but there's no steady record of building a long lasting company/brand.

४: कुठल्याहि गटाचा, लाॅबीचा त्यांच्या फायद्याचा एखादा निर्णय घेण्यासाठी त्याच्यावर प्रभाव/दबाव नाहि
आज नाहीये पण पुढे त्याचा फायदा करुन देणार्‍या लॉबीजचे अजेंडाज तो अगदी निर्लज्जपणे पुश करेल ह्याची खात्री निर्माण करणारा त्याचा सध्याचा बिहेवियर नक्कीच आहे. कुठल्याही अँगलनी ट्रंप हा सेल्फलेस माणूस वाटत नाही (क्लिंटन सेल्फलेस आहे असं आजिबातच नाही Proud )

५: नो बॅगेज, नो डार्क पास्ट हेंस वोंट लेवरेज एक्झिक्युटिव पावर्स टु कवर हिज *##
Lol! oh he may not have a dark past... just yet but he is so damn ready to make a murkier past for himself! His statements, his behavior and his own record of flipflopping on very important issues pretty much guarantees that. I hope you don't believe he is going to become a saint overnight after he takes the oath. Lol

Saying all this, I still like the way you put it. I agree, Obama's oratory skills probably overshadowed his actual abilities but still he is a harvard educated lawyer and at least projects some sense of responsibility and duty towards the nation. I don't even get that feeling from Trump! It's hard to really assess what someone's abilities are from what's available to us and we have to just try and create a picture in our heads based on what issues these candidates raise and how they respond to questions based on issues raised by the public.

शेंडेनक्षत्रं, टोटली अग्री वित एवर्रिथिंग यु सेड. खान दाम्पत्याला कन्वेशन मध्ये आणणं हे टोटली प्लॅन्ड मूव होती. बट ट्रंपनी टोटल मुर्खपणा केला ते हँडल करताना.
वासर्समनच्या कबूलीबाबत पण एकदम बरोबर. आय वॉज शॉक्ड अ‍ॅज हेल आणि त्याला काहीच कवरेज मिळत नाहीये! इतकं की असं वाटावं की सगळ्यांनी मिळून निर्णयच घेतलाय की हिलरीला आणायचं निवडून!
कुंपणानी शेत खाललं टाईप उदाहरण आहे हे अक्षरशः. सँडर्स मस्ट बी लिविड!! (राईटफुली!) Forget Sanders, we all should be livid for heaven's sake! This is a mockery of democracy.

शेंडेनक्षत्र >> ट्रंपच्या कन्वेन्शन मध्येही बेंगाझी मधल्या सैनिकाची आई आली होती. पण मग ते झाल्यावर ट्रंप ने जसा त्या आई बापांवर हल्ला केला तसा हिलरीनी केला नाही. यातच त्याची थिन स्किन दिसते. कोणी एक बोट दाखवले की हा बाबा लागला त्याच्यावर आगपाखड करायला. अशी माणसं खुप लवकर चिडतात - अजिबात पेशन्स दाखवत नाहीत. खरा मुद्दा या सगळ्या चर्चेनंतर असा होता की त्यानी समजुतदारपणे आणि शांतपणे त्यांचा आदर ठेवून साधा प्रतिसाद देवून हिलरीवर इतर गोष्टींकरता (इकॉनॉमी वगैरे) हल्ला करायला हवा. पण हा बाबा त्या गोल्ड स्टार फॅमिलीवरच घसरला. यामुळेच तो देशापुढचे गंभीर निर्णय घेण्यास पात्र आहे की नाही अशी शंका उपस्थित होते.

राज >> मी तुम्हाला काल प्रश्न विचारला होता, त्याचे उत्तर तुम्ही देण्याचे टाळले आहे. ट्रंपची इकॉनॉमी सुधारायची धोरणे तुम्हाला कळली असतील तर ती समजावून सांगा. काय पॉलिसी / प्लॅन्स आहेत ?

धनि, बरोबर आहे ट्रंप बद्दल लिहिलेलं पण मला वाटतं शेंडेनक्षत्रं डेम्स आणि हिलरीच्या बाजूने कशा चुकीच्या गोष्टी गेल्या जात आहेत त्याबाबतीत सांगतायत. ट्रंपनी बरोबर केलं असं त्याचं म्हण्णं नसून मिडिया फक्त ट्रंपच्या उत्तरांवार फोकस करत आहे आणि इतर मुद्द्यांवर आजिबात फोकस नाही. जे मलाही पटतं.
एकंदरितच वेडेपणाचा कळस आहे हे इलेक्शन.

बुवा, चांगली पोस्ट. राज च्या ट्रम्पबद्दलच्या पोस्टीमधे मला "एका हिलरी हेटर चा आशावाद" एवढेच दिसले Happy त्या आशावादावर ट्रम्प स्वतःच पाणी फिरवत आहे रोज च्या रोज.
पर्पल हार्ट बद्दलचे विधान पण असेच उथळ. ट्रम्प बाबा शुद्धीत आहे की नाही असेच वाटते एकेक वक्तव्य ऐकून. Uhoh

डार्क पास्ट म्हणजे काय? आणि तो ट्रम्प कडे कसा नाही हे कोणी मला सांगेल काय?

स्वतःकडच्या पैशाच्या जोरावर काहिही करता येऊ शकतं ह्याबद्दल प्रचंड आत्मविश्वास ह्याव्यतिरीक्त अजून काय दिसतं ट्रम्प मध्ये?

बुवा, सकाळीच मी चक टॉड ला हिलरी मध्ये किती चुका आहेत ते सांगताना ऐकले. पण जर दुसरा माणूस स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्यायला निघाला आहे तर मिडीयाला तर टीआर पी हवीच आहे ना . आणि तुंही सांगा तुमहाला काय इकॉनॉमी पॉलिसी दिसतेय त्याच्या बोलण्यात ?

भौ मला तर ट्रंप टोटल सावळा गोंधळ वाटतो. त्याचा बिन्धास्त अ‍ॅटिट्युड अन बोलताना बळच केअरफुली निटपिक करुन पिसि करेक्ट बोलायची गरज नाही हे धोरण बर्‍याच लोकांना अपील झालं आणि म्हणून तो इथ पर्यंत आला असं माझं मत होत चाललं आहे. त्याच्या बोलण्यात कुठेच काही ठोस असं नसतच! ही जस्ट विंग्स इट! दॅट्स ऑल.
त्यामुळे पॉलिसी वगैरे दुरच्या गोष्टी आहेत. टु बि क्लियर, आयॅम टोटली वित यु ऑन हाऊ ट्रंप इज जस्ट क्रेझी! Happy
हे सगळं जरी खरं असलं तरी वर शेंडेनक्षत्रंनी दिलेल्या गोष्टीही तितक्याच खर्‍या आहेत असं म्हणत होतो. Happy

पण बुवा, हिलरीला मिळालेल्या ३ मिलियन अधिक मतांचे काय? म्हणजे तुम्ही लोकशाहीची मॉकारी कशाला म्हणत आहेत.

हिलरीला एफ बी आय नी क्लीन चीट दिलेली नाही, पण तिने ती असुम केली .

इकॉनॉमी सध्या खाली जातेय आणि ती ओबामा adaministration च्या निर्णयांमुळे ही नवीन बातमी आहे.

राज बुवांनी सविस्तर उत्तरे दिल्यामूळे त्याच मुद्द्यावर तेच तेच लिहिणे टाल्तो. फक्त त्यातल्या दोन मुद्द्यांवर जे बुवांना नीट मांडता आले नाहियेत असे वाटले त्यावर ..
४: कुठल्याहि गटाचा, लाॅबीचा त्यांच्या फायद्याचा एखादा निर्णय घेण्यासाठी त्याच्यावर प्रभाव/दबाव नाहि.
>> I'm not so sure about this any more. His campaign adviser Caren Page, was an adviser for Gazprom (Russian State owned energy goliath), Paul Manafort was a strategist for Victor Yanukovych (Putin's choice for Ukrain's President). Now put his tweet about Russian hacking in context and see. Check out what Alexandra Chalupa has to say about her attempts to find out Manafort's Russian links.
२. नो बॅगेज, नो डार्क पास्ट > > सशलचाच प्रश्न मलाही पडलाय "डार्क पास्ट म्हणजे काय?" Trump University, casino, हे एका प्रकारचेच डार्क पास्ट नाहियेत का ? तो politician नव्हता म्हणून तुम्हाला तो त्या भागापुरता क्लीन वाटतोय पण तो ज्या क्षेत्रात होता त्याबद्दल काय ? What has left in his wake ? bankruptcies, pyramid schemes, frauds .....

त्याच्या बोलण्यात कुठेच काही ठोस असं नसतच! ही जस्ट विंग्स इट! दॅट्स ऑल. >> एकदम बरोबर नि शहाणे सुरते लोक त्याला भुलतात हआश्चर्य आहे.

मलाही बुवांसारखंच वाटतं. डेम्स कडून सँडर्स आला असता तर मग वेगळी गोष्ट.

चटवाल सारखे लोक ज्यांच्यावर आधीच भारतीय बेंकेचे कर्ज आहे ते अचानक सामाजिक कामाचा उमाळा येऊन हिलरीला देणगी देतील ? आपला अपराधही त्यांनी कबूल करून तीन वर्षाचे प्रोबेशन स्वीकारले आहे. क्लिंटन फाउंडेशन डस नॉट स्मेल राईट. याचा अर्थ मी ट्रम्प समर्थक आहे असा नाही. बुवांनी ल्हिलेले त्याचे दुर्गुण खरेच आहेत. गेल्या चोविस एक तासातच त्याने केलेली विधाने पहाता पक्षाने त्याचा ट्विटर पासवर्ड काढून घ्यावा असे वाटते.

आता तर म्हणे मेलनियाही इल्लीगल इमिग्रंट होती.

इराक युद्द्याचा दोष हिलरीच्या डोक्यावर तोही रिपब्लिकन्स नी मांडणे ह्या पलीकडे हास्यास्पद प्रकार नसावा. ' त्या युद्धास पूरक असे खोटे पुरावे देणारे कोण होते ?' हे बघायलाही हरकत नसावी ना. दोन्ही पक्षांनी खर तर आपण मूर्खपणा केला असे मान्य करून तो प्रकार फाईल करायला हवा.

इकॉनॉमी सध्या खाली जातेय आणि ती ओबामा administration च्या निर्णयांमुळे ही नवीन बातमी आहे.>>> कोणी दिली?

निवडणुकांबद्दल, उमेदवारांबद्दल फॅक्टस असलेली माहिती दिली तर निर्णय घेणं सोपं जातं. बातम्या कोण देतंय यालाही महत्व आहे. तटस्थ असलेल्या राजकिय विश्लेषकांकडून बातम्या आल्या तर त्यावर विश्वास ठेवता येतो तसंच उमेदवारांबाबत निर्णय घेता येतो. जागतिकीकरणामुळे अमेरीका शिंकली तरी अनेक देशांना सर्दी होऊ शकते. इथे होणार्‍या निवडणुकीचे परीणाम बाकी जगावर होऊ शकतात. त्यामुळेच मार्च मधे जेव्हा ट्रंप 'मी युरोपमधेही न्यूक्स वापरू शकतो' म्हटल्यावर धडकी भरली होती.

चटवाल सारखे लोक ज्यांच्यावर आधीच भारतीय बेंकेचे कर्ज आहे ते अचानक सामाजिक कामाचा उमाळा येऊन हिलरीला देणगी देतील ? आपला अपराधही त्यांनी कबूल करून तीन वर्षाचे प्रोबेशन स्वीकारले आहे. क्लिंटन फाउंडेशन डस नॉट स्मेल राईट>>> त्यानं हिलरीला कधी देणगी दिली होती? कुठल्या वर्षी?

अंजली, मी वर लिहिलय ते "हिलरीच्या बाजूने कशा चुकीच्या गोष्टी गेल्या जात आहेत" असं आहे ज्यात डेम नॅशनल कमिटी पण आली. कमिटीचं काम आहे "त्यांच्या" प्रत्येक कँडिडेटला त्याचा फेअर शेअर देणं. इथे जर ते स्वतःच कँडिडेट्स मध्ये भेदभाव करत असतील तर कुंपणानी शेत खाललं टाईप उदाहरण नाही होत का? तेच शेंडेनक्षत्रं म्हणत होते ज्याला मी दुजोरा दिला.

धनि, हिलरी ३ मिलियन पेक्षा जास्त मतांनी निवडून आली त्याला मध्ये कमिटीनी दाखवलेला बायस पण जबाबदार आहे ना? ठीक आहे की हिलरी समजा लीड करतच होती आणि हा बायस नसता तर निवडून आली असतीच पण मेबी कमी मतांच्या आघाडीनी पण हू नोज? प्रोसेस फेअर असायला पाहिजे ही सगळ्यात मोठी गोष्ट नाहीये का डेमोक्रसी मध्ये? उद्या प्रोसेसेस जर रिग्ड असतील तर मग काय उपयोग आहे ह्या प्रायमरीजचा? इट डिफिट्स द परपज! म्हणून म्हणालो की मॉकरी आहे डेमोक्रसीची हे असलं काही करता आलं ते.

अंजली ते जुने आहे, मी सांगितलेली माहिती ऑगस्ट मधली आहे. आणि vox काय फॉक्स न्यूज पण नाही

Pages