अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> शक्य आहेही वा नाहीही<<

चला, हे हि नसे थोडके. सहा महिन्यांपुर्वि लोकं छातीठोकुन बोलत होते - ट्रंप प्रायमरीत टिकणार नाहि...

>>आता मुसलमानांना येऊच देणार नाही, नि मेक्सिकन लोकांना हाकलून देईन, असे म्हणण्याने लोकांना हुरुप येतो, कितीहि जोरदार भाषणे ठोकून निवडून आल्यावर प्रत्यक्ष वचन पूर्ण करणे कठीण असते. इथे आधी घटना तपासावी लागेल, कदाचित बदलावी लागेल,
<<
काहीही! बेकायदा घुसखोरी करणार्‍यांना प्रतिबंध करायला वा घुसलेल्यांना बाहेर काढायला कायदे बदलायला लागतील? अहो, आहेत ते कायदे पाळले तरी पुरेसे आहे! कुठले कागदपत्री व्यवहार न करता घुसखोरी करणे हा संविधानिक हक्क नव्हे. एक अँकर बेबीचा कायदा बदलायला लागू शकेल पण बाकी बाबतीत कायद्याचे भक्कम पाठबळ ट्रंपच्या भूमिकेला आहे ह्याची खात्री असू द्या!

तीच गोष्ट मुस्लिमांना येऊ देण्याविषयी. ट्रंपचे ते विधान विपर्यास करुन ऐकवायचा चंग बांधलेला दिसतो आहे. पण त्याने ते विधान सॅन बर्नॅडिनोच्या अतिरेकी जोडप्याच्या खुनी हल्ल्यावर केले होते. अशा बाईला व्हिसा का मिळाला? जर कुणाला व्हिसा देतो आहे ह्याचे भान नसेल तर ते येईपर्यंत मुस्लिमांना देशात येऊ देऊ नये . असे ते विधान होते. अर्थातच हे विधान व्हिसा मिळवून येणार्‍या मुस्लिम लोकांबद्दल होते. ते व्हिसे द्यायचे का नाही हे पूर्णतः दूतावासावर अवलंबून असते जे परराष्ट्र खात्याच्या अख्त्यारीत येते जे राष्ट्राध्यक्षाच्या नियंत्रणाखाली येते. अर्थात कुठलाही कायदेबदल न करता काही देशाच्या लोकांचे व्हिसे थांबवले जाऊ शकतात. तो हक्क त्या मंत्रालयाला आहे. व्हिसा मिळणे हा संविधानिक हक्क नव्हे.

शेण्डे हे थोडेफार खरे असले (स्टेट डि. चे डिस्क्रीशन) तरी हे प्रकरण व्हिसापुरते मर्यादित नाही. अनेक देशांशी अमेरिकेचे करार आहेत त्यामुळे वेगळा व्हिसा लागतच नाही. तेथे हे लागू करायला वेगळा कायदा किंवा कमीतकमी वेगळा आदेश लागेल.

आज व्हॉत्सअ‍ॅपवर एक मेसेज आला ज्यात भारतातील उजव्यांनी ट्रंप जिंकावा म्हणून हिंदू देवतांची उपासना की काय ते केलय म्हणे Uhoh

>>अनेक देशांशी अमेरिकेचे करार आहेत त्यामुळे वेगळा व्हिसा लागतच नाही. तेथे हे लागू करायला वेगळा कायदा किंवा कमीतकमी वेगळा आदेश लागेल.
<<

कुठल्या देशांशी असे करार आहेत ज्या द्वारे तिथले लोक व्हिसाशिवाय अमेरिकेत येऊ शकतात?

ह्या बंधनाची १००% अंमलबजावणी करता येणार नाही असे समजू. पण जिथे अतिरेकी पिलावळ जास्त जन्माला येते त्या सौदी अरेबिया, येमेन, सोमालिया, पाकिस्तान, लिबिया, नायजेरिया ह्या देशांशी तर असे करार नाहीत ना? त्यांचे तर व्हिसे रोखता येतील ना? निदान ह्या उपद्रवी देशातील आयात परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत थांबवता आली तरी पुरे आहे. ट्रम्पने आपले वचन १००% पाळले नाही, अगदी ४०% पाळले तरी माझी हरकत नाही!

ज्या लोकांना इस्लामी अतिरेकामागे इस्लाम आहे हेच मान्य नाही अशा लोकांपेक्षा ट्रंपची भूमिका मला जास्त व्यवहारी वाटते.

शेंडेनक्षत्र, फ्रान्स मधला हल्ला कोणी केला? ते कुठेल नागरिक होते? त्यांना अमेरिकेत यायला काही बंधन आहे का?
युरोपियन युनियन (शेवटी आलेले देश वगळता), कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड , सिंगापूर, साउथ कोरिया, स्कांडीनेव्हीयन देश इ. अनेक नागरिकांना व्हिसा शिवाय प्रवेश आहे.
परत एकदा, नवरा बायको किंवा अशा क्लोज व्यक्तींनी असं काही करायचं ठरवलं तर कोण काय करू शकतो! Sad

मुस्लिम, मेक्सिकन पेक्षाही गन लॉ आणि त्याच्या अराऊंड सोल्यूशन वा कायदेबदल मोठा डिस्क्स्शन टॉपिक असायला हवा होता. गोळी चालवणारा टेररिस्ट, रेसिस्ट, ड्रग डीलर, माथेफिरू की स्वतःचा अजाण मुलगा कोणीही असले तरी मरणार्‍याचे आणि त्याच्या गॅमिली व फ्रेंड्स च्या दु:खात काही फरक पडतो का?
गन्स प्रॉब्लेम आहेत असे म्हणणे नाही पण एक व्हायेबल सोल्य्यूशन पाहिजे हे तर नक्की. आणि त्या दृष्टीने प्रयत्न जर ह्या तिघांपैकी ऑफर करत असेल तर चांगले झाले असते, दोन्ही पार्ट्यांचे गन लॉ वरचे स्टँड बघता आणि एवीतेवी ट्रंप आणि रिपब्लिकन पार्टीचे तसेही सासू-सुनेसारखे चालू आहे.

https://www.cbp.gov/travel/international-visitors/visa-waiver-program/vi...

अनेक युरोपियन देशातील नागरिकांना व्हिशाशिवाय प्रवेश मिळतो पण ही सवलत सरसकट सर्वांना लागू नाही. जे लोक नुकतेच सोमालिया, येमेन वा लिबिया ह्या देशात जाऊन आले आहेत त्यांना ही सवलत नाही. त्यांना व्हिसाकरता अर्ज द्यावा लागतो.
तेव्हा हे नियम आधीच आहेत. त्यात नव्या देशांची भर घालणे तितकेसे अवघड नसावे.

आणि घराची खिडकी तोडून चोर घरात घुसू शकतो आणि चोरी करू शकतो म्हणून पुढचे दार कडी कुलुप न लावता सताड उघडे ठेवले तरी चालेल ह्या मताचा मी नाही. जेवढे शक्य आहे तेवढे संरक्षण करावे. जर त्यात त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करता येतीलच.

ओके. म्हणजे सोमालिया, येमेन आणि तुम्ही म्हणता तसे नव्याने घातलेल्या आणि १०० देशांत जाऊन आलं तर आणि तरच तो धोका असतो. Happy अगदी बरोबर आहे हे.
हो दार बंद तर करू शकत नाही, मग फळवाले आणि विक्रेत्यांना बंदी अशी पाटी लावणे विरुध्द रंग, वर्ण, जात, लिंग अशी विभागणी करून पाट्या लावणे. यात दुसरं जास्त परिणामकारक ठरणार, मतं मिळवायला तरी.

>>ओके. म्हणजे सोमालिया, येमेन आणि तुम्ही म्हणता तसे नव्याने घातलेल्या आणि १०० देशांत जाऊन आलं तर आणि तरच तो धोका असतो. स्मित अगदी बरोबर आहे हे.
<<
आपण अलीकडे घडलेल्या अतिरेकी घटना पाहिल्यात तर बहुतेक अतिरेकी अशा कुठल्या तरी देशाची तीर्थयात्रा करून पवित्र होतात आणि मगच आपल्या अतिरेकी कार्यक्रमाची मुहुर्तमेढ रचतात. पूर्वी ही तीर्थक्षेत्रे तालिबानी अफगाणिस्तान वा पाकिस्तान असायची आता त्यात आयसिस नामक नव्या क्षेत्राची भर पडली आहे. तेव्हा अशी बंधने अनाठायी म्हणता येत नाहीत.
इतकी ठोस कारणे असताना आपल्याला अशा दक्षतेमागे आंधळा द्वेषच आढळत असेल तर आनंद आहे.
मूळ मुद्दा असा आहे की कुठलाही कायदाबदल न करता व्हिसा नाकारण्याचा हक्क राष्ट्राध्यक्ष वा त्याच्या मंत्रालयाला आहे. आणि तो सिद्ध झाला आहे.

वरील सर्व वाचून मी मा़झी मते बदलली. आता उगाच काहीबाही लिहिण्यापेक्षा एव्हढेच म्हणेन की......

काहीही! बेकायदा घुसखोरी ......... घुसखोरी करणे हा संविधानिक हक्क नव्हे.

जर कुणाला व्हिसा देतो आहे ह्याचे भान नसेल ........... नियंत्रणाखाली येते.

हे म्हणणे अगदी बरोबर आहे. खरे बोलणे ही चूक नाही.

शिवाय ट्रंप स्वतःच सांगतो आहे की तो सगळ्यांच्या पेक्षा हुषार आहे, इतर लोक मूर्ख आहेत. तो श्रीमंत आहे, त्याने डील करण्यावर पुस्तक लिहीले आहे, तो श्रीमंत आहे. तो चीन, मेक्सिको, आयसिस सर्वांना वठणीवर आणेल. इतर लोक मूर्ख असल्याने त्यांना जमले नाही, पण ट्रंप हुषार आहे, तो डील करेल, इतरांना डील करता येत नाही.
शिवाय ट्रंप श्रीमंत आहे. हे लक्षात ठेवा.

उगीच विचार करू नका. तुम्ही हुषार नाही म्हणून लिहितो - ३ इडियट सिनेमात अमीरखान, का कुणितरी म्हणतोच की आल इज वेल का असे काहीतरी.

ट्रंप एकटाच हुषार आहे, श्रीमंत आहे, त्याला एकट्यालाच डील करणे जमते, असे खूद्द तोच म्हणतो. तेव्हढेच लक्षात ठेवा, बाकी काही विचार करू नका.

Happy

विरंगुळा:
छान आहे. मी कुठलेच वर्तमानपत्र वाचत नाही, अधून मधून टीव्ही बघतो, पण बहुधा चुकीचे चॅनेल बघत होतो.

काल असे पाहिले की ट्रंप ने सांगितले की तो जे बोलत होता, ते फक्त सजेस्शन.
तर मेक्सिको कडून पैसे घेऊन भिंत बांधा, मुसलमानांना येऊ देऊ नका वगैरे फक्त सजेस्शन्स. ते कसे करता येईल हे त्याला आत्ताच का विचारावे?

ट्रंप एकटाच हुषार आहे, श्रीमंत आहे, त्याला एकट्यालाच डील करणे जमते, असे खूद्द तोच म्हणतो.

तेव्हढेच लक्षात ठेवा, बाकी काही विचार करू नका. त्याची पॉलिसी काय हे विचारू नका. विश्वास ठेवा.

तो आज एक उद्या दुसरेच असे बोलतो, असे काहीतरी मी त्या चुकीच्या चॅनेलवर पाहिले होते पण आता वरचे वाचल्यावर नष्टो मोहो स्मृतिर्लब्धा असे झाले आहे.
तेंव्हा विश्वास ठेवा.

ट्रंप एकटाच हुषार आहे, श्रीमंत आहे, त्याला एकट्यालाच डील करणे जमते, शिवाय तो शक्य तितका कमीत कमी टॅक्स भरतो, असे खूद्द तोच (काल) म्हणाला.

ट्रंपलाच मत द्या.

Happy

नंदन..... मस्त लिंक....

The Los Angeles Times is read by people who wouldn't mind running the country, if they could spare the time, and if they didn't have to leave LA to do it.
आणि
The San Francisco Chronicle is read by people who aren't sure there is a country or that anyone is running it; but whoever it is, they oppose all that they stand for. There are occasional exceptions if the leaders are handicapped minority feminist atheist dwarfs, who also happen to be illegal aliens from ANY country or galaxy as long as they are Democrats.
वाचून मित्रमंडळातील अनेकजण आठवले. Lol

http://www.cnn.com/2015/12/07/politics/donald-trump-muslim-ban-immigration/
ही बातमी वाचा आणि ठरवा की मुस्लिमांना देशात यायला बंदी असावी असे जे ट्रंप म्हणाला ते आश्वासन होते, आज्ञा होती, हुकूम होता का सुचवणी होती ते. मग हवी तेवढी राख डोक्यात घालून घ्या!

ते नक्की कळणे कठीण आहे हो. हे पहा:
https://www.yahoo.com/katiecouric/trump-spokesperson-on-the-paul-ryan-me...

कशावर विश्वास ठेवावा?
त्याबद्दल स्वतःच्या डोक्यात राख घालून घेण्याची काय गरज?

फक्त ट्रंपबद्दलच बोलण्यात, त्याचे ऐकण्यात मजा येते. मग आपणहि असेच काहीतरी प्रक्षोभक लिहायचे, मग इथलेहि लोक डोक्यात रा़ख घालून घेतात.

हिलरी म्हणजे अगदीच फिक्की. तिच्या अनेक गोष्टी १९९२ पासून चावून चोथा झाल्या आहेत.

आता लवकरच ट्रंप हिलरी बद्दल नवीन काय शोधून काढतो हे बघायची वाट बघतो आहे. त्याला हवे तेव्हढे तो त्याच्या ट्वीट मधून रि ट्वीट करतो, नॅशनल एन्क्वायरर वाचतो, नि म्हणतो, " बाकीचे लोक का नाही बोलत की क्रुझ चा बाप केनेडी हत्या प्रकरणात गुंतला होता, खरे नसेलहि, पण बोलायला पाहिजे!"
जॉन मिलर, जॉन बॅरन बनून बोलतो, कबूल करतो, मग नाही म्हणतो. मध्य पूर्वेतील देशातली चित्रे दाखवून ती अमेरिकेतलीच आहेत असे सांगतो (हजारो मुस्लिमांनी ९/११ नंतर आनंदोत्सव केला!)

तसे आता कुणि टॉम, डिक किंवा हॅरी बनून नॅशनल एन्क्वायरर मधे हिलरी बद्दल लिहील, नि म्हणेल, लोकांनी बोलायला पाहिजे.

थोडक्यात, लै मंजे लैच्च धम्माल राव.
पूर्वी राजकारणात कधीहि रस न घेणारे लोक आता त्याच्यामुळे राजकारणाच्या बातम्या बघू लागले, कारण विनोद सर्वांनाच आवडतो.
तसे कुणि का निवडून येईना, अशी जबरदस्त पावर आहे काँग्रेसकडे नि सुप्रिम कोर्टाकडे की काही म्हणजे काही होऊ देणार नाहीत!!
नि केले मोप कायदे, तरी काय? सध्या पण बेकायदा घुसखोरी, व्हिसा देण्यापूर्वी सक्त चौकशी, गन विकण्यापूर्वी चौकशी असे कायदे आहेत. काय होत आहे त्यांचे? आणिक काही कायदे केले तर त्याचीहि तीच गत!

नुसते बोलून फक्त नुसती करमणूक होते. बाकी काही होत नाही.

तेंव्हा करमणूक म्हणून बघा, डोक्यात राख घालू नका. विचार करू नका, विश्वास ठेवा. ट्रंपलाच मते द्या. तोच एकटा हुषार आहे. तो श्रीमंत असे तोच सांगतो, कधी जॉन मिलर तर कधी जॉन बॅरन बनून, पण विश्वास ठेवा. Happy

ट्रंप येणार निवडून राव!
आता लोकांना तोच पाहिजे तर तोच येणार. त्यालाच तर लोकशाही म्हणतात.
मागे ओबामाला निवडून दिले कारण तो जुन्या खोंडांपेक्षा जरा नवीन होता वॉशिन्ग्टनमधे. त्याने काही लोकांचे समाधान झाले नाही.
म्हणून आता ट्रंप, एकदम बाहेरचा.
खरे तर तो काही वॉशिंग्टनला नवीन नाही, तिथल्या सगळ्या कॉन्ग्रेस, सिनेटमधल्या दोन्ही पक्षाच्या लोकांना भरपूर पैसे दिले आहेत, त्यामुळे ते ट्रंपला फारसा विरोध करणार नाहीत.

शिवाय, काहीच जमत नाही तर निदान ट्रंपला तरी संधि द्यावी. बघू काय करतो. चार वर्षांनंतर निदान फार खराब नाही झाली देशाची हालत, तर पुनः दुसरा कुणी बघू.
तसेहि तो म्हणतो ते करणे फार कठीण, इतक्या टोकाची भूमिका केवळ मते मिळवायला. पण प्रत्यक्षात, एकंदरित जरा तरी व्हिसा देताना जास्त खोलवर तपासणी केली, बेकायदेशीरपणे घुसणार्‍यांवर जरा जास्त नियंत्रण आणले, काही उद्योगधंदे परत देशात आणले तर फायदाच आहे.

माझा भर, मॅन्युफॅक्चरिंग उद्योगधंदे परत देशात आणण्यावर आहे, त्याच क्षेत्रात जास्त लोक इथे आहेत नि बेकार आहेत. दुर्दैवाने त्या धंद्यांना भांडवल फार लागते.

त्या मानाने कॉम्प्युटर, क्म्युनिकेशन क्षेत्रात कमी पैशात बर्‍यापैकी उद्योग चालवले आहेत. त्यामुळेच भारतीय, फिलिपिनो, चिनी यांच्यामुळे ज्यांच्या नोकर्‍या गेल्या, ते परत स्वतःची सोय करतीलच. फेसबूक सारखे अनुत्पादक धंदे काढून, सगळ्या जगात पसरवून का होईना, पैसे मिळवले. तसले काही हे भारतीय, चिनी, फिलिपिनो करतील अशी भीति नाही. ते आपले अमेरिकन लोक जो धंदा काढतील त्यात स्वस्तात कामे करून देतील. बरेच आहे.

तुमचे भारतात एखादे घर आहे का? कदाचित तातडीने सर्व सोडून धावावे लागेल परत! सांभाळून, जपूनच रहा. आणंदोत्सव मानायला रस्त्यावर याल नि मेक्सिकन किंवा मुसलमान समजून काही दगा फटका होण्याची शक्यता फार.

"आणंदोत्सव मानायला" म्हणजे काय? साजरा करायला का? तसे असेल तर आम्ही घरच्या घरीच गोडधोडाचा बेत करुन आणंदोत्सव साजरा करु. जमले तर भारताच्या घरी जाऊनच ट्रंप विजयोत्सव साजरा करु. उगाच अमेरिकेच्या रस्त्यावर येऊन दगाफटका व्हायला नको, काय? मग तर ठीक?
आपल्या आगाऊ (आणि आगलाऊ) सूचनेबद्दल आभार! पण ट्रंप निवडून येणार हे नक्की का? नाहीतर ह्या आणंदोत्सवाचे आमचे मनोरथ हिलरीच्या आश्वासनांसारखे हवेतच विरुन जायचे!

Pages