निसर्गाच्या गप्पा (भाग २७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2015 - 05:07

रामराम दोस्तांनो,

वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. "
या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्‍याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .

सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..

सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्‍यांचा मित्र असणार्‍या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्‍या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्‍या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.

वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्‍या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्‍या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्‍या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.

त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
Wink .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

are waa, navaa dhaagaa aalaa paN.
mee aataa Colombo Airport varun post karatoy. 5 divas bharapur bhaTakalo. anokhee jhaaDe, fule baghitalee. bharapur phoTo kaaDhalet.. te deoon pakavaayalaa yetoch ! paN Angolalaa mhaNaje swagruhee gelyaavar.

aataa vimaanaachee vaaT baghatoy... !

मुंबई ला पोचलास का> बॉन वॉयेज दिनेश..

श्रीलंका तुझ्या कॅमेर्‍या च्या डोळ्यांतून पाहायला उत्सुक आहोत

बरोबर एखादी श्रीलंकन रेस्पी पण आहे ना?? Happy

सकाळपासून एक पक्षी टीव टीव करून सतत ओरडत आहे.दिसत नाही,त्यामुळे वर्णन करू शकत नाही.पिंजार्‍याची धनुकली कशी न थांबता आवाज करते तसा हा पक्षी न थांबता (पूर्ण पाऊण ते एक मिनिट) टीव टीव करतोय.टिटवीचा आवाज नाही.कोण असेल त्याची उत्सुकता आहे.

हो हो देवकी.......इथेही अगदी तू वर्णन केलेला पक्षी रोज ओरडतो. शेवटी वाटतं....थांबल्यावर हा एक मोठा श्वास घेणार छाती भरून!

शेवटी वाटतं....थांबल्यावर हा एक मोठा श्वास घेणार छाती भरून!>>>>>>>>अगदी अगदी.फक्त तो ओरडायचा थांबला त्यावेळी मी निश्वास सोडला.

देवकी, मानुषी तुम्ही खंड्याचा (white throated kingfisher) आवाज ऐकला आहे का? नसल्यास ह्या (xeno-canto.org) स्थळावर किंवा युट्यूब वर बघा. तुमच्या पक्षाचा आवाज असा येतो का?

आणि एक इंडियन रोलर म्हणून पक्षी आहे. त्याचा आवाज धनुकलीच्या जास्त जवळचा आहे पण तो श्वास रोखून सतत ओरडल्यासारखा वाटत नाही...

व्हीटी २२०
ऐकला मी त्याचा आवाज. पण नाही...... हा तरी जरा मधे श्वास घेतो. तो अगदी छोटासा असावा...आणि अग्दीच breathless ओरडतो.

व्हीटी २२०,
हा नाही. याच्या ओरडण्यात जरा तरी चिर्र असा आवाज येतो.मी म्हटलेल्या पक्षाच्या आवाजात तसा आवाज नाही.
लिंकमधील बरेच खंड्यांचे आवाज ऐकले ,पण तो ,हा नाही. तरीही धन्यवाद!

टीना , प्रचि मस्त!

निरु,
https://www.youtube.com/watch?v=DmfWUsU8VEo यात येणारा आवाज टिवी टिवी असा येतोय.आता मीच बर्‍यापैकी गोंधळले आहे. उद्या परत त्याचा आवाज ऐकते आणि कळवते. धन्यवाद!

निरु, हीच ती लिंक आहे.मी चुकीची दिली आहे.यातल्या पक्षाचा आवाज टिवी असा येतोय.मी उद्या सांगू का? ( जसा काही तो पक्षी माझ्यासाठी ओरडणारच आहे.)

मला नाही ग तेवढे माहिती! खंद्या माझ्या खिडकीसमोरच्या झाडावर कधी कधी येतो म्हणून त्याचा आवाज माहित आहे. रोलरचे फेसबुकवर फोटो येतात. काय अप्रतिम सुंदर पक्षी आहे!! मला बघायची खूप खूप इच्छा होती आणि गेल्या वर्षी कन्याकुमारीला हॉटेलच्या मागे तो आला. इतका आनंद झालेला! तिथेच त्याचा आवाज ऐकलेला.
तू पिंजर्याची धनुकली म्हणालीस तर रोलरची आठवण झाली. पण तो असा श्वास न घेता गायल्यासारखा नाही वाटत. मग वाटले कदाचित किंगफिशर असेल. ब्रेथलेस आणि आपल्याला ब्रेथलेस करणारा म्हणून शिंपी पण वाटलेला पण धनुकलीसारखा नाहीय तो... Happy

पक्ष्यांचे आवाज गोड आहेत अगदी.. कोडं मात्र उलगडलेलं दिसत नाहीये Happy

सुप्र

सुहानी सकाळ आणी माझा वॉकिंग ट्रॅक

सुहानी सकाळ आणी माझा वॉकिंग ट्रॅक>>>>>> वा! असा सुरेख ट्रॅक . मग काय तुम्ही वजन कमी केलेत यात नवल नाही.आमच्याकडे असा ट्रॅक असता तर आम्हीही बारीक झालो असतो ( अशीच आमुची आई....या तालावर) Wink

काय तु पन ना वर्षू,
मी असत त तिथच फतकल मारुन व्ह्यु एन्जॉय केला असता Wink
इतक्या सुंदर ठिकाणावरुन कुणी धावत जाईल..छे..काहिहि..

आणि हो त्या नारळ / पाम ला धरुन जुने गाणे तरी म्हटले असते नै तर गोल गोल राणी इत्ता इत्ता पाणी तरी म्हटल असत.. निरसे बुवा तु..छे..

सुहानी सकाळ आणी माझा वॉकिंग ट्रॅक>>>>>खुप छान.
अश्या निसर्गरम्या ठीकाणी रहाताना किंवा रहाणार्‍याना त्या वातावरणा मुळे त्या निसर्गामुळे आंतरिक शांतता पण जाणवत असेल ना ? शांत आणि प्रसन्न.

देवकी, मानुषी तुम्ही तांबट (coppersmith barbet) चा आवाज ऐकलात का? तो कधी कधी डोक्याला ताप देऊ शकतो.
https://www.youtube.com/watch?v=Vl_H9XieKkQ

सायली माझ्या माहितीप्रमाणे ह्या फिल्म मध्ये जे साधन वापरले आहे ते धनुकली आणि ते लोक पिंजारी आहेत. पूर्वी खूप यायचे. लोकांचे लक्ष वेधण्यासाठी ते पिंजारी रिकामी धनुकली वाजवायचे.
https://www.youtube.com/watch?v=xHEOkZ6xnUU

गोल गोल राणी इत्ता इत्ता पाणी तरी म्हटल असत.. निरसे बुवा तु..छे..>>> Happy

इकडे सकाळी ११ वाजता पासुन संध्याकाळचे ५.३० वाजलेय..
लाईट लावुन बसुने मी यावेळी सुद्धा..
पण एक टिप्पुस्स असेल तर शप्पथ..

देवकी, मानुषी तुम्ही तांबट (coppersmith barbet) चा आवाज ऐकलात का? >>> vt220 , तो हा नाही ग. आज त्याचा आवाज फार उशीरा ऐकू आला.खरंतर मी काल निरूंनी पाठवलेली लिंक उघडून बसले होते.उद्या परत ऐकेन म्हणते.धन्यवाद ग. मी इथे बाकीच्यांना त्रास देतेय.उद्यापासून पक्षी विषय बंद .

टिने..किती दिवस निसर्ग पाहणार .. अजूनही पाहतेच रोज पण जॉगिंग करताना..
देवकी Lol खर्रंय.. सब क्रेडिट ट्रॅक को Wink
निसर्गचक्र.. यस्स!! सकाळी सकाळी तर एकदम शांत वाटतं इथे... ऑक्सीजन चा भरपूर फ्रेश स्टॉक भरून घेऊन जाते, दिवसभर पुरते ही एनर्जी..
सक्काळी ५.३० एम ते ६.३० एम इथल्या मोकळ्या मैदानात चायनीज ,' ताय ची' आणी ,' छी कुंग' लिटरल अर्थ
,' लाईफ एनर्जी कल्टीवेशन'' चे फ्री क्लासेस चालतात. Qigong practice typically involves moving meditation, coordinating slow flowing movement, deep rhythmic breathing, and calm meditative state of mind.

Pages