याकूब आणी फाशी.

Submitted by vijaykulkarni on 21 July, 2015 - 20:43

सुप्रीम कोर्टानेही याकूबची याचिका फेटाळल्याने आता त्याला फासावर चढवणे जवळजवळ निश्चित झाले आहे.
त्याला फासावर चढवू नये असे मला वाटते आणी त्याची काही कारणे मी लिहित आहे. माझे लेखन काही लोकांना संतापजनक, दळभद्री, देशद्रोही, भाबडे असे वाटेल आणी त्या मतांचा मी आदर करतो. शेवटी माबो ही मार्केट प्लेस ऑफ आयडियाज असावी आणी इथे सर्वच मताचे स्वागत असावे. आपले मत काहीही असेल तरी कृपया धागा बंद पडायला कारण होतील असे प्रतिसाद टाळावेत.

१ फाशीची शिक्षा गंभीर गुन्हा निर्विवादपणे (बियाँड रीझनेबल डाउट) सिद्ध झाल्यावरच देण्यात यावी. याकूबचा सहभाग तशा अर्थाने सिद्ध झालेला नाही. त्याच्या विरुद्धचा पुरावा परिस्थितीजन्य आहे.

२ या खटल्यातील त्याच्या पेक्षा गंभीर आरोप असलेल्या अनेक लोकांना फाशी झालेली आहे आणी ती जन्मठेपेत रुपांतरीत झाली आहे. असे असताना केवळ त्याचीच फाशी कायम ठेवणे अन्यायकारक आहे.

३ भारतातल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून तो शरण आला आहे. आल्यावर त्याने सहकार्यच केले आहे. टायगर मेमन ने भारतावर विश्वास ठेवू नको असे त्याला सांगितले होते, असे करून एकापरीने टायगर बरोबर होता हेच आपण सिद्ध करत आहोत. शिवाय अशा शरणागतीच्या विचारात असलेल्या अन्य लोकांना एक संदेश देत आहोत.

४ अशाच गुन्ह्याखाली फाशीच्या प्रतिक्षेत असलेले बलवंत सिंग राजोना, राजीव हत्या प्रकरणातील आरोपी यांची फाशी जवळ जवळ रद्द झाली आहे. बलवंत ने आरोप कबूल केला आहेच पण फाशी द्या अशी मागणीही केली आहे. त्या त्या राज्याच्या विधानसभा त्यांच्या मागे आहेत आणी राजीव गांधी खुनातील आरोपींना तर सोडूनच द्यायची मागणी होत आहे. अशा स्थितील केवळ राजकीय ताकद नही म्हणून एखाद्याला फाशी देणे अयोग्य आहे.

५ शिक्षा देताना इतरांना जरब बसवणे, आरोपीला सुधरायची संधी देणे आणी आरोपीपासून इतर समाजाचे रक्षण करणे हे तीन मुख्य हेतू असावेत. यातला एकही हेतू या फाशीने ( किंबहुना कोणत्याच फाशीने) साध्य होत नाही.

६ केवळ आडनाव मेमन आहे म्हणून फाशी देणे योग्य आहे का ? त्याचे आडनाव इतर काही असले तर हे झाले असते का? १९४८ च्या दंग्यात सातारा जिल्ह्यात "गोडसे" आडनावाच्या एका कुटुंबातील आजोबा, मुलगा आणी नातू या तिघानाही जमावाने ठार केले होते. यात आणी त्यात काय फरक आहे?

७ हा निर्णय राजकीय आहे. या आधी अफझल ला फाशी देण्याचा निर्णय असाच राजकिय होता. तात्कालीन सरकारने भाजपाच्या हक्काची काही मते आपल्याला मिळतील या वेड्या आशेवर अफझलला फाशी दिले होते. अर्थात त्या पक्षाला फायदा झाला नाही हा भाग वेगळा. इतक्या बलाढ्य राष्ट्राने अफझलला रात्री अचानक फाशी देणे खरेच अयोग्य होते. त्याच्या आईच्या डोळ्याला डोळा लावून "होय, तुमचा मुलगा अतिरेकी आहे आणी आम्ही त्याला फाशी देत आहोत" असे सांगायचीही हिम्मत होऊ नये ? एखाद्या माणसाने तुलना भगत सिंग च्या फाशीशी केली तर काय उत्तर आहे?

८ जर्मन बेकरी केसमधेही केवळ परिस्थितीजन्य पुराव्यावरून हिमायत बेग याला फाशीची शिक्षा झालेली आहे. दुसरा आरोपी कातील याची तर येरवडा जेलमध्येच हत्या झाली आहे. देश-नागरीक, पती-पत्नी, कम्पनी-कामगार अशी नाती परस्पर सहाकार्यावर आधारित असतात. एकाने दुसर्‍यावर कितीही अन्याय केला तरी दुसर्‍याने मात्र निरपेक्ष प्रेमच करावे अशी अपेक्षा करू नये. मालेगाव स्फोटात संबम्ध नसताना दहा वर्षे तुरुंगात राहिलेल्या लोकांनी देशावर प्रेम करावे असे कोणत्या तोंडाने सांगणार ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>सॉफ्ट स्टेट झेपलं नाही<<<

अगदीच न झेपण्यासारखं काही वाटलं नाही. Happy अश्या घटनांमधून संदेश जातात ह्यावर विश्वास बसायला हरकत नसावी.

??

हेच लोजिक लावायचे झाले तर मोदीना १९५ x ५ = ९७५ वर्षे विविध देशात घालवल्यावरच पंतप्रधान होण्याचा अधिकार मिळतो.
>>>>

हे गणित मांडणार्‍याच्या अकलेची तारीफ करावी तितकी थोडी आहे!

२००७ चे पत्र आज का बाहेर आले ?

भारत सरकारच्या वतीने या बाजू कोर्टात का नाही पुढे आणल्या गेल्यात ? सर्व न्यायालयिन प्रक्रिया पुर्ण झाली, राष्ट्रपतीन्नी दयेचा अर्ज नाकारला... वर्ष भरानन्तर तारिख जाहिर झाली आणि आताच हे पत्र बाहेर आले....

हे गणित मांडणार्‍याच्या अकलेची तारीफ करावी तितकी थोडी आहे!>>>>> धन्यवाद. तुम्हि दिल्लीत दोन/चार दिवस जाउन १०० लोकांशी बोलुन जसे केजरिवाल सरकाने काहि काम केले नाहि असा निष्कर्ष काढलात त्या पद्धतीचीच बुद्धी वापरुन हे गणित मांडले आहे. Biggrin

ज्याला शिव्या घालायच्या त्याचीच कॉमेंट चोरून स्वतःची म्हणून वापरणार्‍यांची निर्ल्लज मानसिकता कहर आहे.

याकूबला फाशी देऊ नये म्हणून ४० विद्वानांनी राष्ट्रपतीना पत्र लिहिले आहे. त्यातल्या कोणाच्याही घरातले बॉम्बस्फोटात मेलेले अथवा जखमी/अपंग झालेले नाही. त्यातल्या कोणीही त्यांचे म्हनणे इन्टरव्हिनर होऊन उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयात मांडलेले नाही. त्यातले नेहमीचेच गुन्हेगारांच्या मानवी हक्कासाठी गळे काढणारे आहेत. स्फोटात मेलेल्यांना मानवी हक्क नसतात.

त्यातले शत्रुघुन शिंव्ह आणि टाँम शेठमलानी कंच्या पकशाचे हैत? ती त्यांची वैयक्तिक मते हैत म्हणत भगवी उपरणी झटकायला हे मोकळे...

१०० लोकांशी बोलुन
<<
१००?
दोनेक शून्य जास्त झालीत का?

आता या बर सगळ्या मुर्ख याकूबमित्रांनो,
या पंजाबात घुसलेल्या अतिरेक्यांना पण मारू नये, त्यांचा हमला करण्याच्या दृष्टिकोन समजून घ्यावा वगेरे अक्कल पाजळून टाका ..

लष्कराला कारवाई साठी शुभेच्छा!
आणि हो, सो कॉल्ड दीडशहाण्या सिक्युलर माकडांच्या हातात कोलीत देण्यासाठी एकालाही जिवंत पकडू नका.

<<लष्कराला कारवाई साठी शुभेच्छा!>>
------ १०००००००० जवान्नाना शुभेच्छा... ते अविश्रान्त लढत आहेत.

१०००००००० जवान्नाना शुभेच्छा... ते अविश्रान्त लढत आहेत. >>> +१

आणि हो, सो कॉल्ड दीडशहाण्या सिक्युलर माकडांच्या हातात कोलीत देण्यासाठी एकालाही जिवंत पकडू नका. >> नक्किच जिंवत पकडु नका. नाहितर मसर्रत आलम सारखे सोडतील जेल मधुन नाहितर गिलानीसारखा पासपोर्ट हि देतील

12:50 PM
पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला, गुरुदासपूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक शहीद
12:44 PM
पंजाबमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाक सीमेवरील राज्यांना 'अलर्ट'; राज्यांतील महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्याच्या सूचना
12:33 PM
पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला, पंजाबमधील अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांची रेल्वे आणि पंजाब पोलिसांकडून सखोल तपासणी
12:25 PM
पंजाबमध्ये हल्ला करणा-या दहशतवाद्यांना जीवंत पकडण्याचा केंद्रीय गृहमंत्रालयाचा आदेश असल्यामुळे लोकसभेत गदारोळ (टीव्ही वृत्त)

गुरुदासपुर ऑपरेशन पुर्ण होईपर्यंत, या टिव्हीवरिल पॅनलमध्ये चाललेल्या चर्चांना आवर घालायची, सर्वात आधी गरज आहे.

Pages