याकूब आणी फाशी.

Submitted by vijaykulkarni on 21 July, 2015 - 20:43

सुप्रीम कोर्टानेही याकूबची याचिका फेटाळल्याने आता त्याला फासावर चढवणे जवळजवळ निश्चित झाले आहे.
त्याला फासावर चढवू नये असे मला वाटते आणी त्याची काही कारणे मी लिहित आहे. माझे लेखन काही लोकांना संतापजनक, दळभद्री, देशद्रोही, भाबडे असे वाटेल आणी त्या मतांचा मी आदर करतो. शेवटी माबो ही मार्केट प्लेस ऑफ आयडियाज असावी आणी इथे सर्वच मताचे स्वागत असावे. आपले मत काहीही असेल तरी कृपया धागा बंद पडायला कारण होतील असे प्रतिसाद टाळावेत.

१ फाशीची शिक्षा गंभीर गुन्हा निर्विवादपणे (बियाँड रीझनेबल डाउट) सिद्ध झाल्यावरच देण्यात यावी. याकूबचा सहभाग तशा अर्थाने सिद्ध झालेला नाही. त्याच्या विरुद्धचा पुरावा परिस्थितीजन्य आहे.

२ या खटल्यातील त्याच्या पेक्षा गंभीर आरोप असलेल्या अनेक लोकांना फाशी झालेली आहे आणी ती जन्मठेपेत रुपांतरीत झाली आहे. असे असताना केवळ त्याचीच फाशी कायम ठेवणे अन्यायकारक आहे.

३ भारतातल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून तो शरण आला आहे. आल्यावर त्याने सहकार्यच केले आहे. टायगर मेमन ने भारतावर विश्वास ठेवू नको असे त्याला सांगितले होते, असे करून एकापरीने टायगर बरोबर होता हेच आपण सिद्ध करत आहोत. शिवाय अशा शरणागतीच्या विचारात असलेल्या अन्य लोकांना एक संदेश देत आहोत.

४ अशाच गुन्ह्याखाली फाशीच्या प्रतिक्षेत असलेले बलवंत सिंग राजोना, राजीव हत्या प्रकरणातील आरोपी यांची फाशी जवळ जवळ रद्द झाली आहे. बलवंत ने आरोप कबूल केला आहेच पण फाशी द्या अशी मागणीही केली आहे. त्या त्या राज्याच्या विधानसभा त्यांच्या मागे आहेत आणी राजीव गांधी खुनातील आरोपींना तर सोडूनच द्यायची मागणी होत आहे. अशा स्थितील केवळ राजकीय ताकद नही म्हणून एखाद्याला फाशी देणे अयोग्य आहे.

५ शिक्षा देताना इतरांना जरब बसवणे, आरोपीला सुधरायची संधी देणे आणी आरोपीपासून इतर समाजाचे रक्षण करणे हे तीन मुख्य हेतू असावेत. यातला एकही हेतू या फाशीने ( किंबहुना कोणत्याच फाशीने) साध्य होत नाही.

६ केवळ आडनाव मेमन आहे म्हणून फाशी देणे योग्य आहे का ? त्याचे आडनाव इतर काही असले तर हे झाले असते का? १९४८ च्या दंग्यात सातारा जिल्ह्यात "गोडसे" आडनावाच्या एका कुटुंबातील आजोबा, मुलगा आणी नातू या तिघानाही जमावाने ठार केले होते. यात आणी त्यात काय फरक आहे?

७ हा निर्णय राजकीय आहे. या आधी अफझल ला फाशी देण्याचा निर्णय असाच राजकिय होता. तात्कालीन सरकारने भाजपाच्या हक्काची काही मते आपल्याला मिळतील या वेड्या आशेवर अफझलला फाशी दिले होते. अर्थात त्या पक्षाला फायदा झाला नाही हा भाग वेगळा. इतक्या बलाढ्य राष्ट्राने अफझलला रात्री अचानक फाशी देणे खरेच अयोग्य होते. त्याच्या आईच्या डोळ्याला डोळा लावून "होय, तुमचा मुलगा अतिरेकी आहे आणी आम्ही त्याला फाशी देत आहोत" असे सांगायचीही हिम्मत होऊ नये ? एखाद्या माणसाने तुलना भगत सिंग च्या फाशीशी केली तर काय उत्तर आहे?

८ जर्मन बेकरी केसमधेही केवळ परिस्थितीजन्य पुराव्यावरून हिमायत बेग याला फाशीची शिक्षा झालेली आहे. दुसरा आरोपी कातील याची तर येरवडा जेलमध्येच हत्या झाली आहे. देश-नागरीक, पती-पत्नी, कम्पनी-कामगार अशी नाती परस्पर सहाकार्यावर आधारित असतात. एकाने दुसर्‍यावर कितीही अन्याय केला तरी दुसर्‍याने मात्र निरपेक्ष प्रेमच करावे अशी अपेक्षा करू नये. मालेगाव स्फोटात संबम्ध नसताना दहा वर्षे तुरुंगात राहिलेल्या लोकांनी देशावर प्रेम करावे असे कोणत्या तोंडाने सांगणार ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साती, परत एकदा +१

एखादी गोष्ट पटत नसेल तर त्याला लगेच दुसर्‍या टोकाला नेवून उन्माद किंवा तश्याच अजून स्ट्राँग शब्दात पाणौतारा करणं हे सगळीकडेच (अगदी मायबोलीवरही) दिसतं.

नंदिनी, मस्त पोस्ट.

एखादी गोष्ट पटत नसेल तर त्याला लगेच दुसर्‍या टोकाला नेवून उन्माद किंवा तश्याच अजून स्ट्राँग शब्दात पाणौतारा करणं हे सगळीकडेच (अगदी मायबोलीवरही) दिसतं.<<<

+१

नंदिनी,

'इतर लेखांच्या लिंक्स नकोत' हे आणखी काहींनाही सांगण्याची आवश्यकता आहे.

नंदिनी - अत्यन्त महत्वाचे प्रश्न... कृपया नवा धागा सुरु केला तर चालेल. अनेकान्च्या महत्वपुर्ण प्रतिक्रिया येतील.

हं... कोणाच्याही राष्ट्रभक्तीला उन्माद म्हणू नये, हे खरंच. पण झालं काय गेल्या काही दिवसात की 'व्यवस्थाविरोधी मत मांडणारे देशभक्त नव्हेत' असा टिपेचा सूर लागला. बॉम्बस्फोटातल्या आरोपीच्या फाशीविरोधात बोलणारे देशभक्त असूच शकत नाहीत, असं ते प्रमेय होतं. रामनच्या लेखातला nuanceही कोपर्‍यात ढकलला गेला की नाही?
म्हणजे मग हे लोक देशभक्त नाहीत तर कोण - फाशीच्या बाजूनं बोलणारे, अशी सिध्दता झाली! तारस्वरातल्या अशा टिप्पण्यांना लो.स.नं 'उन्माद' म्हटलं असावं, असं मला वाटतं.
आपआपले जसे काही अनुभव असतात, तसेच पेपरवाल्यांनाचे काही अनुभव असतील Happy

(हात्तिच्या.. काही प्रश्न आलेत वाटतं. जरा वेळ गेला मी पुढे चेक करण्यात.)

मुख्य प्रश्न असा दिसतो की फाशीला विरोध की पाठिंबा? तर उत्तरः विरोध.

मग पुढचा प्रश्न असा दिसतो की 'नाहीतर मग काय करायचं?' तर, जगातल्या शंभर-सव्वाशेहून जास्त देशांनी काय केलंय, त्याचा अभ्यास करुन आपल्या देशाला अनुरूप कायदे करणार्‍यांना पाठिंबा द्यायचा.
जिथे अशी शिक्षा नाही, तिथे गुन्हे होतात आणि जिथे ही शिक्षा आहे, तिथेही.

त्या आरोपीला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत असेल तर फाशीला विरोध करण्यात अर्थं आहे.
त्यांची सिच्युएशन 'फक्र है' अशी असेल तर इथे आम्ही फाशीला विरोध करून केवळ आत्मघाताची तयारी करतोय.

मुख्य प्रश्न असा दिसतो की फाशीला विरोध की पाठिंबा? तर उत्तरः विरोध<<< मग त्या खालच्या उपप्रश्नांची उत्तरे सविस्ताराने वाचायला आवडतील.

@ 'त्यांची सिच्युएशन 'फक्र है' अशी असेल तर इथे आम्ही फाशीला विरोध करून केवळ आत्मघाताची तयारी करतोय'... या वाक्यामागची कळकळ अगदी कळते, पण असा विचार करुन पहा बर - ज्यांना 'फक्र है' असं वाटत असेल, त्यांना फाशीनं काय फरक पडणारे? त्यांना काही वेगळा deterrent लागेल ना?

>>इतक्या सर्व किचकट न्यायप्रक्रियांमधून गेल्याबद्दल आणि तरीही आरोपीला
बचावाची प्रत्येक संधी दिल्याबद्दल भारतीय न्यायसंस्थेचा प्रचंड अभिमान
वाटतो आहे.<<+10000
नंदिनी , सर्वच पोस्ट उत्तम आहेत

अपराध्याला शासन झाले अखेर !!!

ज्यांना 'फक्र है' असं वाटत असेल, त्यांना फाशीनं काय फरक पडणारे? >>> "फक्र है" असं वाटत असलं तरी फाशी म्हटल्यावर तंतरलीच ना? दयेचा अर्ज केलाच ना?

बरेच आहेत प्रश्न? तीन दिसताहेत. मी माझ्या उत्तराचं सार लिहीलं होतं, पण चला हरकत नाही.
१. कायदा सगळीकडे समान - आत्ताही आहे, नंतरही असेल. नाहीतर 'कायदा' कसा म्हणता येईल?
२. सर्व प्रकारचे कैदी 'पुनर्वसनास पात्र' नसतात - आजही कॅटेगरीज असतातच की. माझ्या बाजूनं म्हणाल तर नागरिक म्हणून जी पडेल ती जबाबदारी घ्यायला मी तयार असेन.
३. (हे उत्तर वर लिहीलंय, पुन्हा - ) जगातल्या शंभर-सव्वाशेहून जास्त देशांनी काय केलंय, त्याचा अभ्यास करुन आपल्या देशाला अनुरूप कायदे करणार्‍यांना पाठिंबा द्यायचा

जर फाशी कॅन्सल करून असले गुन्हेगार पाळत राहिलो असतो तर त्यांना काय मेसेज जाणार? उलट त्याच्या सुटकेचे प्रयत्न होणार.
आय मीन फाशी कॅन्सल होऊनही अश्या प्रकारच्या गुन्हेगारांना वचक बसावा अशी काही स्कीम आहे का हो ?

हं.. हा याकूबबाबतचा मुद्दा दिसतोय ""फक्र है" असं वाटत असलं तरी फाशी म्हटल्यावर तंतरलीच ना? दयेचा अर्ज केलाच ना?" तर, याकूब "फक्र है" कॅटेगरीतला नव्हता. २-४ दिवसांपूर्वी नंदिनी यांनी एक चांगली पोस्ट लिहीली होती. 'प्रत्येक मुस्लिम गुन्हेगार दहशतवादी नव्हता, आपलं (जगाचं) आकलन ९/११ नंतर तस घडत गेलं' असा काही आशय होता त्यात. कदाचित वाचली असेल तुम्ही.

वाचलीय.
त्यावरच मी अड्ड्यावर आज लिहिलेली पोस्ट-

नंदिनी , तो पूर्वी नुसताच माफिया डॉन होता. आता मुस्लिम माफिया डॉन झालाय.
आणि पाकिस्तान्यांची मदत घेत धर्मावर आधारित हिंसा करू पहातोय, भले त्याला धर्माविषयी काही वाटत असो नसो, म्हणून तो आता अतिरेकी समजायला हरकत नाही. भले जिहादी नका म्हणू.

"फाशी कॅन्सल होऊनही अश्या प्रकारच्या गुन्हेगारांना वचक बसावा अशी काही स्कीम आहे का" ... फाशी deterrent होत नाहीये, असं दिसतंय. फक्त भारतातच नव्हे. मग दुसरं काही शोधलं पाहिजे ना? कधी ना कधी तो पर्याय शोधण्यासाठी जोमदार सुरुवात (सामाजिक चर्चेला) झाली पाहिजे.

ज्यांना 'फक्र है' असं वाटत असेल, त्यांना फाशीनं काय फरक पडणारे? त्यांना काही वेगळा deterrent लागेल ना? >>

करेक्ट. आणि तो काय आहे म? जन्मठेप की सुटका?

मग दुसरं काही शोधलं पाहिजे ना? कधी ना कधी तो पर्याय शोधण्यासाठी जोमदार सुरुवात (सामाजिक चर्चेला) झाली पाहिजे. >>>

पहिल्या पानावर पण मी हाच मुद्दा लिहिला होता की गुन्हा आणि गुन्हेगार हे दोन्ही वेगवेगळे असले तरी फार थिन लाईन उरते. त्या मुद्द्यावर पुढे कोणी काही लिहिले नाही. काय केले म्हणजे हे सर्व बंद होईल? त्यांना तर फक्र आहे, मग उपायच योजायचे नाहीत?

माझ्या मते जे "मरू मोड मध्ये आहेत = जिहादी " त्यांच्या बाबतीत अगदीच इतका त्रास करून घ्यायची गरज नाही. दे चोझ देअर प्रोफेशन, वि चूझ जस्टिस. जर ज्युडीशिअरी सिस्टिम त्यांना निर्दोष म्हणून सोडत असेल तर ते ही मान्य आणि फाशी देत असेल तर ते ही मान्य !

मी एक वाक्यही लिहिले होते की, "फाशी देणे बंद करा हे वाक्य अश्या ११थ अवरला" म्हणून गोंधळ करण्यापेक्षा, तुमच्यासारखे लोकं दुसर्‍या कुणाला फाशी ठोठावायच्या आधीच तुम्ही लोकं "फाशी देणे बंद करा" असे काहीसे आंदोलन का नाही करत? जेणे करून पुढच्या गुन्हेगाराला फाशी मिळणार नाही. पण सध्या ती शिक्षा आहे. तर ती मिळणारच. मग आम्हीच कसे बुद्धीवादी, आणि ज्यांना फाशी आवडते, ते कसे १६०० ची मानसिकता असणारे हा सूर तुम्ही लोकं ( तुम्ही वैयक्तीक नाही, तर तुमचे समविचारी सध्या जालावर लावत आहेत, माबोवर लावत आहेत) लावू पाहता तो देखील " वैचारिक उन्माद" आहे का?

<<ज्यांना 'फक्र है' असं वाटत असेल, त्यांना फाशीनं काय फरक पडणारे? त्यांना काही वेगळा deterrent लागेल ना? >>
------ फक्र है असे वाटणार्‍यान्साठी deterrent अस्तित्वात आहे... पण कायद्यात बसणार नाही...

फाशी देणे बंद करा हे वाक्य अश्या ११थ अवरला" म्हणून गोंधळ करण्यापेक्षा, तुमच्यासारखे लोकं दुसर्‍या कुणाला फाशी ठोठावायच्या आधीच तुम्ही लोकं "फाशी देणे बंद करा" असे काहीसे आंदोलन का नाही करत?<<< फाशी २००७ ला ठोठावली होती, तेव्हा देखील असे आंदोलन करता आले असते. २००७ ते २०१५ बिचारा एकटा याकूब आणि त्याचे गिनेचुने वकील कोर्टात फाशीविरूद्ध केस लढत होते.

@ "...जेणे करून पुढच्या गुन्हेगाराला फाशी मिळणार नाही..." - नाही, या केसमधे अजूनही काही होतं.
I was disturbed to notice that some mitigating circumstances in the case of Yakub Memon and some other members of the family were probably not brought to the notice of the court by the prosecution and that the prosecution did not suggest to the court that these circumstances should be taken into consideration while deciding on the punishment to be awarded to them. In their eagerness to obtain the death penalty, the fact that there were mitigating circumstances do not appear to have been highlighted. - B.Raman

यावर सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींनी 'याची स.न्या.नं आपणहून दखल घेतली पाहिजे, नाहीतर न्याय अपूर्ण राहील' असं मत नोंदवलं. म्हणून झाली ती सगळी चर्चा झाली.

आणि 'आम्हीच कसे बुद्धीवादी' असं अजिबात म्हणणं नाही हो...

हं.. हा याकूबबाबतचा मुद्दा दिसतोय ""फक्र है" असं वाटत असलं तरी फाशी म्हटल्यावर तंतरलीच ना? दयेचा अर्ज केलाच ना?"
<<

सहमत!
२५६ निरपराध लोकांना त्यांचा कोणताही अपराध नसताना, ठार मारुन पाकीस्तानात पळून जाणार्‍या या याकुबला स्वत:चा मृत्यु डोळ्यासमोर दिसु लागल्यावर मात्र, जगायला किमान आणखी चौदा दिवस मिळावेत म्हणुन आज सकाळी पाच वाजेपर्यंत, जो आटापीटा चाललेला तो बघुन स्वत:ला जिहादी म्हणवणार्‍या या दहशतवाद्याची दया येत होती.

आणि 'आम्हीच कसे बुद्धीवादी' असं अजिबात म्हणणं नाही हो... >> लोल. ती पोस्ट वैयक्तीक तुमच्यासाठी नाही ये हो. लोड नका घेऊ.

यावर सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींनी 'याची स.न्या.नं आपणहून दखल घेतली पाहिजे, नाहीतर न्याय अपूर्ण राहील' असं मत नोंदवलं. म्हणून झाली ती सगळी चर्चा झाली. >>

करेक्ट आणि चर्चा झाली. तरीही फाशीच दिली. तर चर्चेला इथे पूर्णविराम मिळायला हवा. तर लोकसत्ता लगेच उन्माद म्हणते आणि माझे अनेक मित्र न्यायव्यवस्था कशी चुकली हे म्हणत आहेत. म्हणून थोडा वैताग. बाकी काही नाही. त्याला जन्मठेपच काय बाईज्जत बरी ( जसे लोकसत्ता म्हणते की त्याला काही माहितीच नव्हते म्हणे ) केले असते तरी तो निर्णय मी आनंदाने मान्य केला असता. पुढे जाऊन तो पोलिटिकल निर्णय आहे असे म्हणालो नसतो.

@ 'तुम्ही लोकं आंदोलन का नाही करत?' ... क्षीण का होईना, कोणीतरी मत मांडायला लागलं आहे ना! होईल.. होईल, कधीतरी आंदोलन Happy म्हणून तर मगाशी म्हणलं ना, 'जोमदार सामाजिक चर्चा व्हायला हवी'

@ 'स्वत:ला जिहादी म्हणवणार्‍या या दहशतवाद्याची दया येत होती'.... त्यानं स्वतःला जिहादी म्हणवलं नव्हतं.
गुन्हेगार खरा, पण 'जिहादी' वेगळे - उदा. गुरुदासपूरला आलेले.

@ 'तर लोकसत्ता लगेच उन्माद म्हणते ..' ते का लिहीलं असावं, ८-१० पोस्टींआधी कुठेतरी लिहीलंय बघा मी. वाचली का चर्चा तुम्ही तिथली?

(पुन्हा इथे: कोणाच्याही राष्ट्रभक्तीला उन्माद म्हणू नये, हे खरंच. पण झालं काय गेल्या काही दिवसात की 'व्यवस्थाविरोधी मत मांडणारे देशभक्त नव्हेत' असा टिपेचा सूर लागला. बॉम्बस्फोटातल्या आरोपीच्या फाशीविरोधात बोलणारे देशभक्त असूच शकत नाहीत, असं ते प्रमेय होतं. रामनच्या लेखातला nuanceही कोपर्‍यात ढकलला गेला की नाही?
म्हणजे मग हे लोक देशभक्त नाहीत तर कोण - फाशीच्या बाजूनं बोलणारे, अशी सिध्दता झाली! तारस्वरातल्या अशा टिप्पण्यांना लो.स.नं 'उन्माद' म्हटलं असावं, असं मला वाटतं.)

@ 'जसे लोकसत्ता म्हणते की त्याला काही माहितीच नव्हते' ... लोकसत्ता म्हणतेय तो निरपराध नाही.

त्यानं स्वतःला जिहादी म्हणवलं नव्हतं.>>> काही लोकं म्हणताहेत.

https://www.facebook.com/photo.php?fbid=1594467030820528&set=gm.85579198...

हे आणि असेच बरेच मेसेजेस सध्या फिरत आहेत. (पन त्याला उन्माद नाही म्हणायचं! दुखवटा म्हणायचं)

Pages