याकूब आणी फाशी.

Submitted by vijaykulkarni on 21 July, 2015 - 20:43

सुप्रीम कोर्टानेही याकूबची याचिका फेटाळल्याने आता त्याला फासावर चढवणे जवळजवळ निश्चित झाले आहे.
त्याला फासावर चढवू नये असे मला वाटते आणी त्याची काही कारणे मी लिहित आहे. माझे लेखन काही लोकांना संतापजनक, दळभद्री, देशद्रोही, भाबडे असे वाटेल आणी त्या मतांचा मी आदर करतो. शेवटी माबो ही मार्केट प्लेस ऑफ आयडियाज असावी आणी इथे सर्वच मताचे स्वागत असावे. आपले मत काहीही असेल तरी कृपया धागा बंद पडायला कारण होतील असे प्रतिसाद टाळावेत.

१ फाशीची शिक्षा गंभीर गुन्हा निर्विवादपणे (बियाँड रीझनेबल डाउट) सिद्ध झाल्यावरच देण्यात यावी. याकूबचा सहभाग तशा अर्थाने सिद्ध झालेला नाही. त्याच्या विरुद्धचा पुरावा परिस्थितीजन्य आहे.

२ या खटल्यातील त्याच्या पेक्षा गंभीर आरोप असलेल्या अनेक लोकांना फाशी झालेली आहे आणी ती जन्मठेपेत रुपांतरीत झाली आहे. असे असताना केवळ त्याचीच फाशी कायम ठेवणे अन्यायकारक आहे.

३ भारतातल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून तो शरण आला आहे. आल्यावर त्याने सहकार्यच केले आहे. टायगर मेमन ने भारतावर विश्वास ठेवू नको असे त्याला सांगितले होते, असे करून एकापरीने टायगर बरोबर होता हेच आपण सिद्ध करत आहोत. शिवाय अशा शरणागतीच्या विचारात असलेल्या अन्य लोकांना एक संदेश देत आहोत.

४ अशाच गुन्ह्याखाली फाशीच्या प्रतिक्षेत असलेले बलवंत सिंग राजोना, राजीव हत्या प्रकरणातील आरोपी यांची फाशी जवळ जवळ रद्द झाली आहे. बलवंत ने आरोप कबूल केला आहेच पण फाशी द्या अशी मागणीही केली आहे. त्या त्या राज्याच्या विधानसभा त्यांच्या मागे आहेत आणी राजीव गांधी खुनातील आरोपींना तर सोडूनच द्यायची मागणी होत आहे. अशा स्थितील केवळ राजकीय ताकद नही म्हणून एखाद्याला फाशी देणे अयोग्य आहे.

५ शिक्षा देताना इतरांना जरब बसवणे, आरोपीला सुधरायची संधी देणे आणी आरोपीपासून इतर समाजाचे रक्षण करणे हे तीन मुख्य हेतू असावेत. यातला एकही हेतू या फाशीने ( किंबहुना कोणत्याच फाशीने) साध्य होत नाही.

६ केवळ आडनाव मेमन आहे म्हणून फाशी देणे योग्य आहे का ? त्याचे आडनाव इतर काही असले तर हे झाले असते का? १९४८ च्या दंग्यात सातारा जिल्ह्यात "गोडसे" आडनावाच्या एका कुटुंबातील आजोबा, मुलगा आणी नातू या तिघानाही जमावाने ठार केले होते. यात आणी त्यात काय फरक आहे?

७ हा निर्णय राजकीय आहे. या आधी अफझल ला फाशी देण्याचा निर्णय असाच राजकिय होता. तात्कालीन सरकारने भाजपाच्या हक्काची काही मते आपल्याला मिळतील या वेड्या आशेवर अफझलला फाशी दिले होते. अर्थात त्या पक्षाला फायदा झाला नाही हा भाग वेगळा. इतक्या बलाढ्य राष्ट्राने अफझलला रात्री अचानक फाशी देणे खरेच अयोग्य होते. त्याच्या आईच्या डोळ्याला डोळा लावून "होय, तुमचा मुलगा अतिरेकी आहे आणी आम्ही त्याला फाशी देत आहोत" असे सांगायचीही हिम्मत होऊ नये ? एखाद्या माणसाने तुलना भगत सिंग च्या फाशीशी केली तर काय उत्तर आहे?

८ जर्मन बेकरी केसमधेही केवळ परिस्थितीजन्य पुराव्यावरून हिमायत बेग याला फाशीची शिक्षा झालेली आहे. दुसरा आरोपी कातील याची तर येरवडा जेलमध्येच हत्या झाली आहे. देश-नागरीक, पती-पत्नी, कम्पनी-कामगार अशी नाती परस्पर सहाकार्यावर आधारित असतात. एकाने दुसर्‍यावर कितीही अन्याय केला तरी दुसर्‍याने मात्र निरपेक्ष प्रेमच करावे अशी अपेक्षा करू नये. मालेगाव स्फोटात संबम्ध नसताना दहा वर्षे तुरुंगात राहिलेल्या लोकांनी देशावर प्रेम करावे असे कोणत्या तोंडाने सांगणार ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाटवण्याची प्रक्रीया काय असते??
विहिरीत पाव टाकायचा मग ते पाव टाकलेल पाणी जो कोणी पिणार तो इसाई.

Proud

मग शंकराचार्यांनी विहिरीत मोदक किंवा शंकरपाळी किंवा रामफळ टाकून ते पाणी पीइल तो हिंदू असे जाहीर करायचे की.

साती,

>> मग आता व्हिसा संपलेल्यांना जाळून मारायचा अधिकार 'धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी' लोकांना मिळावा म्हणता?

Rofl

आता काय बोलायचं यावर! वेसोंघेपेजा?

स्टेन्सला व्हिसा संपला म्हणून जाळला का? शिवाय दारासिंगाला स्वप्न पडलेलं का की स्टेन्सचा व्हिसा संपलाय म्हणून?

आ.न.,
-गा.पै.

अरे निच माणसा,

>> बाटवण्याची प्रक्रीया काय असते??
>> विहिरीत पाव टाकायचा मग ते पाव टाकलेल पाणी जो कोणी पिणार तो इसाई.

बाटवाबाटवी म्हणजे काय ते सांगायला कशाला पाहिजे? डोळे फुटलेत का? कुठली मध्ययुगीन पद्धत सांगताय आम्हाला? हल्ली सेवाभाव, दानधर्म यांच्या नावाखाली आकाशातल्या बापाच्या कळपात भरती होते.

तो स्टेन्स ऑस्ट्रेलियन होता ना? मग त्या ऑस्ट्रेलियातल्या आदिवासींना बाटवायचं होतं हवं तेव्हढं. इथे भारतात यायचं कारणच काय? तिथे आदिवासी संरक्षित आहेत म्हणून त्याची डाळ शिजत नाही. भारतात मात्र कोणीही येऊन सेवेच्या नावाखाली काहीही हैदोस घालावा.

भारतातल्या आदिवासींनासुद्धा संरक्षित म्हणून घोषित केलं पाहिजे.

आ.न.,
-गा.पै.

लबाड कोल्हया,

भारतातल्या वनवासींना इंग्रजी राज्यात अवकळा आली आहे. त्यास हिंदू जबाबदार नाहीत. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी कॅनडातल्या आदिवासींवर भीषण अत्याचार केलेत. तिथे कुठे हिंदू होते?

http://www.reuters.com/article/2015/06/03/us-canada-aboriginal-idUSKBN0O...

आ.न.,
-गा.पै.

AUDIENCEMalegaon bomb blast case accused Colonel Purohit in the court has made his submission. Colonel Purohit stated in the Bombay High Court that he was collecting intel for the Indian Army and was performing his duty towards the nation. He further added that he attended the conspiracy meet in order to get intel details. Colonel Purohit filed a petition in the Bombay High Court, which the court was hearing. He further added that a case was registered against him without seeking permission from the Central government. The hearing has now been adjourned for February 2. Malegaon bomb blasts happened in 2008, which killed 60 people.

कर्नल पुरोहित - आर्मीला मदत करण्यासाठी मालेगाव स्फोटात सामील झालो होतो

https://www.timesnownews.com/videos/times-now/india/malegaon-bomb-blast-...

जिथे सायनाईड च्या गोळ्या गळ्यात बांधुन अतिरेकी आत्मदाह करतात ते फाशिला घाबरनार आहेत का?

Submitted by सकुरा on 22 July, 2015 - 09:44

अरे वा. मग फाशीपेक्षा त्यालाही सायनाईड चघळायला द्यायचं म्हणता का?

भक्त लोक बोलत आहेत की कर्नल पुरोहित म्हणे हेर म्हणून सामील झाले होते , ह्यांना बहुतेक डॉन 3 सिनेमाची लहर आलेली दिसतेय

...

मालेगाव ब्लास्ट 2008 ला झाला

जर कर्नल पुरोहित सेनेचा गुप्तहेर म्हणून गेला होता, तर मग सरकार काँग्रेसचे म्हटल्यावर त्यांना माहीत असणार ना ?

आणि गुप्तहेर , साक्षात आर्मीचाच असूनही मग स्फोट टळला कसा नाही ?

आणि मुसलमानांनी म्हणे स्फोट करायला आणि ते शिकायला म्हणे पुरोहित नावाचा माणूस आपल्यात घेतला म्हणे ! पहिले मिसाईल टिपू सुलतानाने बनवले , अमेरिकेवर विमान आदळले तेही मुसलमानांनीच , संघोटयांचा अख्ख्या इतिहासात हिंसक प्रयोग एकच झालाय , नथुराम गोडसेने केलेला गांधींचा खून , संघ , सनातन ह्यांचे निम्मे बॉम्ब घरातच फुटतात , आणि धारदार शस्त्रे अशी की वापरणाराच धनुर्वात होऊन मरेल !

https://www.thenewsminute.com/article/two-children-injured-after-bomb-st...

मुसलमानांचे डोके फिरले काय की ह्यांच्याकडून शस्त्रविद्या शिकतील. पुरोहिताने मुसलमानांना शस्त्रविद्या शिकवली हे ऐकले तर कर्णाला विद्या नाकारणारया गुरुजीना किती वाईट वाटेल.

असो , भावी आमदारकीच्या शुभेच्छा

मग यात 'वेगळ' काय आहे ?
पप्पू व त्याच्या ईटालियन मम्मीला देखील अनेक वेळा कोर्टात हजर न राहण्याची सुट दिलेय कोर्टाने.

Pages