याकूब आणी फाशी.

Submitted by vijaykulkarni on 21 July, 2015 - 20:43

सुप्रीम कोर्टानेही याकूबची याचिका फेटाळल्याने आता त्याला फासावर चढवणे जवळजवळ निश्चित झाले आहे.
त्याला फासावर चढवू नये असे मला वाटते आणी त्याची काही कारणे मी लिहित आहे. माझे लेखन काही लोकांना संतापजनक, दळभद्री, देशद्रोही, भाबडे असे वाटेल आणी त्या मतांचा मी आदर करतो. शेवटी माबो ही मार्केट प्लेस ऑफ आयडियाज असावी आणी इथे सर्वच मताचे स्वागत असावे. आपले मत काहीही असेल तरी कृपया धागा बंद पडायला कारण होतील असे प्रतिसाद टाळावेत.

१ फाशीची शिक्षा गंभीर गुन्हा निर्विवादपणे (बियाँड रीझनेबल डाउट) सिद्ध झाल्यावरच देण्यात यावी. याकूबचा सहभाग तशा अर्थाने सिद्ध झालेला नाही. त्याच्या विरुद्धचा पुरावा परिस्थितीजन्य आहे.

२ या खटल्यातील त्याच्या पेक्षा गंभीर आरोप असलेल्या अनेक लोकांना फाशी झालेली आहे आणी ती जन्मठेपेत रुपांतरीत झाली आहे. असे असताना केवळ त्याचीच फाशी कायम ठेवणे अन्यायकारक आहे.

३ भारतातल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून तो शरण आला आहे. आल्यावर त्याने सहकार्यच केले आहे. टायगर मेमन ने भारतावर विश्वास ठेवू नको असे त्याला सांगितले होते, असे करून एकापरीने टायगर बरोबर होता हेच आपण सिद्ध करत आहोत. शिवाय अशा शरणागतीच्या विचारात असलेल्या अन्य लोकांना एक संदेश देत आहोत.

४ अशाच गुन्ह्याखाली फाशीच्या प्रतिक्षेत असलेले बलवंत सिंग राजोना, राजीव हत्या प्रकरणातील आरोपी यांची फाशी जवळ जवळ रद्द झाली आहे. बलवंत ने आरोप कबूल केला आहेच पण फाशी द्या अशी मागणीही केली आहे. त्या त्या राज्याच्या विधानसभा त्यांच्या मागे आहेत आणी राजीव गांधी खुनातील आरोपींना तर सोडूनच द्यायची मागणी होत आहे. अशा स्थितील केवळ राजकीय ताकद नही म्हणून एखाद्याला फाशी देणे अयोग्य आहे.

५ शिक्षा देताना इतरांना जरब बसवणे, आरोपीला सुधरायची संधी देणे आणी आरोपीपासून इतर समाजाचे रक्षण करणे हे तीन मुख्य हेतू असावेत. यातला एकही हेतू या फाशीने ( किंबहुना कोणत्याच फाशीने) साध्य होत नाही.

६ केवळ आडनाव मेमन आहे म्हणून फाशी देणे योग्य आहे का ? त्याचे आडनाव इतर काही असले तर हे झाले असते का? १९४८ च्या दंग्यात सातारा जिल्ह्यात "गोडसे" आडनावाच्या एका कुटुंबातील आजोबा, मुलगा आणी नातू या तिघानाही जमावाने ठार केले होते. यात आणी त्यात काय फरक आहे?

७ हा निर्णय राजकीय आहे. या आधी अफझल ला फाशी देण्याचा निर्णय असाच राजकिय होता. तात्कालीन सरकारने भाजपाच्या हक्काची काही मते आपल्याला मिळतील या वेड्या आशेवर अफझलला फाशी दिले होते. अर्थात त्या पक्षाला फायदा झाला नाही हा भाग वेगळा. इतक्या बलाढ्य राष्ट्राने अफझलला रात्री अचानक फाशी देणे खरेच अयोग्य होते. त्याच्या आईच्या डोळ्याला डोळा लावून "होय, तुमचा मुलगा अतिरेकी आहे आणी आम्ही त्याला फाशी देत आहोत" असे सांगायचीही हिम्मत होऊ नये ? एखाद्या माणसाने तुलना भगत सिंग च्या फाशीशी केली तर काय उत्तर आहे?

८ जर्मन बेकरी केसमधेही केवळ परिस्थितीजन्य पुराव्यावरून हिमायत बेग याला फाशीची शिक्षा झालेली आहे. दुसरा आरोपी कातील याची तर येरवडा जेलमध्येच हत्या झाली आहे. देश-नागरीक, पती-पत्नी, कम्पनी-कामगार अशी नाती परस्पर सहाकार्यावर आधारित असतात. एकाने दुसर्‍यावर कितीही अन्याय केला तरी दुसर्‍याने मात्र निरपेक्ष प्रेमच करावे अशी अपेक्षा करू नये. मालेगाव स्फोटात संबम्ध नसताना दहा वर्षे तुरुंगात राहिलेल्या लोकांनी देशावर प्रेम करावे असे कोणत्या तोंडाने सांगणार ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<<<<<<<दहशतवाद्यांना मारून दहशतवाद संपत नाही, हे वाक्य केवळ टाळ्या मिळवण्यासाठी नाही याचा विचार व्हावा. >>>>>>>>>>>>>>>>

जरुर करा विचार, फक्त एक लक्षात ठेवा,

यासिन भटकळ कैदेत असताना त्याला सोडवण्यासाठी दमास्कसहुन लोक येतील अशी बातमी आहे, त्यामुळे त्या ला मारण्यात काही अर्थ नाही, सिरीयातला द हशत वाद भारतात बसुन संपवावा अशी भोळी आशा ठेवा !!

ह्याच यासिन भटकळच्या पालकांनी भटकळ पोलिसांच्या हाती लागण्याच्या पुर्वी पोलिसांना सांगीतले होते की त्यांच्या मुलगा त्यांच्यासाठी फार फार पुर्वी मेलेला आहे, पण तेच पालक त्याच यासिनने दु बईहुन पाठवले ल्या पैश्यावर मजा मारत होते !!

पण तुम्ही त्यावर लक्ष देऊ नका !! दहशतवादमुळापासुन संपवण्यासाठी काय करता येईल तेच नव्हे तर कोणा कोणाचा अजुन बळी देता येईल ह्याची यादी तयार करुन ठेवा !!

३ भारतातल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून तो शरण आला आहे.
>>>>>

न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणे याचा अर्थ गुन्ह्याची शिक्षा माफ करा वा सौम्य करा अशी अपेक्षा बाळगणे होतो की केलेल्या गुन्ह्याला अनुसरून योग्य तीच अन तेवढीच शिक्षा द्या असा होतो?

जर ३१७ लोकांना मारुन आणी कित्येक लोकांना का यमच जायबंदी करुन जे गुन्हेगार लोक हाती आलेत त्यांना दिलेली फाशीची सजा जास्त आहे हे म्हणणे हे हास्यास्पद आहे.

जर याकुब मेमन जर पुर्ण पणे ह्या गुन्हात सहभागी नव्हता तर मग ह्या गुन्हाला जबावदार कोण ?
ज्याने ह्या गुन्ह्याला पैसे पुरवले तो, की ज्याने बाँब बनवले तो ?
की ज्याने बाँब हाताने त्या गाडीत ठेवले तो ?
की ज्याने गाड्या चालवुन त्या त्या ठीकाणी नेल्या ती लोक ?
की ज्याने रिमोट कंट्रोलचा ट्रीगर दाबुन बाँब उडवला तो ?

संपुर्ण गुन्हात सहभागी होणारा म्हणजे त्याने ही सर्व काम स्वहस्ते केलेली असतीत !!

एकच प्रश्न,

याकूब हा 'मेमन' नसता तर त्याला फाशी देऊ नका यासाठी कारणं सांगणारा धागा निघाला असता का?

दुर्दैवाने, टण्या यांनी दिलेल्या लिंक्स आणि त्यांनी मांडलेली मतं सिरीअसली वाचण्याची तसदी काहीजण घेत नाहीयेत.

१. न्यायालयाने दिलेल्या निर्णयात गफलती/गोंधळ/चुका असू शकतात, आणि न्यायव्यवस्था निर्दोष नसण्यात सर्वांनाच, दीर्घकालीन तोटा आहे. याकूब मेमनच्या केसमधे असा प्रकार झाला असावा, असं मानायला जागा आहे.

२. याकूब मेमनला केलेल्या सर्व गुन्ह्यांसाठी योग्य शिक्षा झाली पाहिजे. पण त्याला सुनावलेल्या शिक्षेबद्दल (म्हणजे, शिक्षेच्या प्रमाणाबद्दल) कायद्याचे जाणकार/वकीलही आश्चर्य व्यक्त करत आहेत.

३. एखाद्या गुन्ह्याबद्दल सगळ्या समाजात राग/खदखद असू शकते. पण 'न्याय' म्हणजे 'सूड' नव्हे.

याकूब हा 'मेमन' नसता तर त्याला फाशी देऊ नका यासाठी कारणं सांगणारा धागा निघाला असता का?

प्रश्नाचा रोख कळला. सध्या अटकेत असलेल्या साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित किंवा त्यांच्याशी संबंधित कुणालाही फाशीची शिक्षा झाली तर ती देऊ नका असा धागा मीच काढेन. त्यांना जामीन मिळावा असेच माझे मत आहे.

एखाद्या गुन्ह्याबद्दल सगळ्या समाजात राग/खदखद असू शकते. पण 'न्याय' म्हणजे 'सूड' नव्हे. +१

अगदी पटले. समाजात अशी खदखद /राग निर्माण झाला की सारासार विवेकाचा पहिला बळी जातो आणी सरकार पक्षाने सांगितले ते खरेच आहे आणी जे ते मान्य करत नाहीत ते देशद्रोही असे वातावरण होते. सांबा हेरगिरी प्रकरणात हेच झाले. सीमेवर असलेल्या एका ठाण्यातील बरेचशे अधिकारी आणी जवान पाकिस्तान ला सामील होतील हे केवळ अशक्य होते. अगदी शाळकरी मुलाचाही विश्वास बसणार नाही. पण एकदा त्या अधिकारी/जवानांवर देशद्रोही असा शिक्का ( तेही पाकिस्तान साठी हेरगिरी करणार्‍या दोन माणसंच्या तोंडी सांगण्यावरून् )बसला की मग त्यांची बाजू घेणारे देशद्रोही असे त्रैराशिक तयार झाले आणी त्या लोकांची ससेहोलपट झाली. कलक्त्याच्या धनंजय चेतर्जीला फाशी देतानाही असाच उन्माद निर्माण झाला. तो बहुदा निर्दोष होता.

केदार,
याच्या विरुद्धचा पुरावा परिस्थितीजन्य आहे. >>>. आणि तरीही कोर्ट फाशी देतेय. बहुदा भारतीय न्यायव्यवस्था अतिशय नालायक आहे.

तुम्ही हे उपरोधाने लिहिले आहे हे मान्य आहे पण खालच्या कोर्टाने फाशी शिक्षा दिलेले तीस टक्के लोक वरच्या कोर्टात निर्दोष सुटतात असे असेल तर न्यायव्यवस्था परफेक्ट नाही हे तर मान्य करायला हरकत नसावी. अशा परफेक्ट नसलेल्या व्यवस्थेला फाशी सारखी नॉन रिव्हर्सिबल शिक्षा देण्याचा अधिकार असावा ? याकूब पोर्तुगाल ला पळून गेला असता तर त्याला आणण्यापूर्वी फाशी देणार नाही असे लिहून द्यावे लागले असते ना?

कुलकर्णी साहेब साळसूदपणे धागा काढून इतक्या लोकाना उचकवण्यात यशस्वी ठरल्याबद्दल अभिनंदन ! त्यासाठी तुम्हाला 'ऋsssन्मेष करंडक '' बक्शीस !

तुम्ही हे उपरोधाने लिहिले आहे हे मान्य आहे पण खालच्या कोर्टाने फाशी शिक्षा दिलेले तीस टक्के लोक वरच्या कोर्टात निर्दोष सुटतात असे असेल तर न्यायव्यवस्था परफेक्ट नाही हे तर मान्य करायला हरकत नसावी. >>

हो पण ह्या केस मध्ये राष्टपतींनी पण दयेचा अर्ज फेटाळला आहे. मग राज्यपालाकडे कडून काय फायदा? की राज्यपाल मोठा असतो?

खालचे कोर्ट / हायकोर्ट / सुप्रिम / राष्ट्रपती अश्या ऑर्डरला काहीच महत्त्व नाही का? कुठल्याही सिस्टिम मध्ये काही चुका असतात. मेमन इतकाही साधा नाही की त्याला सिस्टिम मध्ये न आणता दुसरी काही वागणूक द्यावी.

एकीकडे आपण म्हणतो सिस्टिम आहे / घटना आहे / ब्ला ब्ला आणि दुसरीकडे लगेच हे चुकीचे आहे. फाशी नको इत्यादी इत्यादी. मग नक्की काय करावे हा प्रश्न मला आहे. जेन्युईन. एकतर सिस्टिम बदला अन्यथा आहे त्या सिस्टीम मध्ये नविन दुरूस्ती आणा. पण एलेवंथ अवरला , न्यायव्यवस्था परफेक्ट नाही हे नाही म्हणता येत कारण ती गेले ६५ वर्षे परफेक्ट नाही.

-

दहशतवाद्यांना मारून दहशतवाद संपत नाही, हे वाक्य केवळ टाळ्या मिळवण्यासाठी नाही याचा विचार व्हावा. >>>

<कुठलाच गुन्हा कुठल्याच शिक्षेने संपत नाही.>

धन्यवाद. स्मित

>>>>

आय अ‍ॅम क्युरिसस की मग काय करावे. अल्टरनेट व्यवस्था काय आहे? मोकळे सोडणे? की अजून काही. व्यवस्थित विवरण वाचायला आवडेल.

जगातील दहशतवादावर तुमच्याकडे काय उत्तर आहे? (म्हणजे ज्यांचे असे मत आहे त्यांच्याकडे) गेलाबाजार भारतातील दहशतवाद कसा थांबेल?

आणि गुन्हा कुठल्याच शिक्षेने संपत नाही हे मत असल्यावर बलात्कार करणारे / घरफोडी करणारे / खून करणारे (ज्यांच्या दहशतवादाशी संबंध नाही) त्या लोकांचे काय करायचे? हा उपप्रश्न आहे. ( इथे खटले चालवून जेल मध्ये टाका हे उत्तर देता येणार नाही, कारण ती सध्याची सिस्टिम आहे, जी मला मान्य आहे गुन्हा आणि गुन्हेगार ह्यात फरक आहे हे ही मान्य. पण गुन्हाच कसा संपवणार? ती आयडीयल सोसायटी होईल, जी जगात कुठेच नाही. म्हणून गुन्हा आणि गुन्हेगार ह्यात खूपच थिन लाईन आहे. त्याला संपवायला सिस्टिम लागते.

व्हॉट इज युवर आल्टरनेट फॉर दिस? नसेल तर ते वाक्य टाळ्यासाठीच होईल. विचार वाचायला आवडतील.

लोकहो,

न्यायव्यवस्थेवरील चर्चा चालू आहे ते चांगलंय. चर्चा करतांना एका गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. ते म्हणजे दाऊदने याप्रसंगी न्यायव्यवस्थेस वेठीस धरलेलं आहे.

याकूब मेमनला पुढे करून दाऊद चाचपणी डाव (=ट्रायल रन) मांडू पाहतो आहे. आपण ( = न्यायालय + शासन) याला बळी पडावं का?

आज जर याकूब मेमन फाशीतून सुटला तर उद्या दाऊदही भारतात शरणागती पत्करून येणार. याकूब मेमन म्हणे माफीचा साक्षीदार आहे. त्याने म्हणे पोलिसांना पुरावे दिलेत. दाऊदचं नाव झळकणार नाही असेच नेमके पुरावे त्याने कशावरून दिले नसतील? आणि दाऊद जेव्हा स्वत:ला निष्पाप म्हणवतो तेव्हा तो दोष टायगर मेमन, छोटा शकील इत्यादिंवर ढकलणार हे उघड आहे. म्हणजे टामे, छोश कसले परतताहेत. याचा अर्थ जे स्फोटांतील मुख्य आरोपी आहे ते बाहेरंच राहणार. आणि बदल्यात भारताने आपल्या उरावर खुनी दहशतवादी दाऊद कंपनीला पोसायचं. त्यांना म्हणे नजरकैद पाहिजे आहे. आणि काय आजून?

ते काही नाही! याकूब मेमनला फासावर लटकवलाच पाहिजे. ज्यांना कोणाला दयेचे उमाळे आले असतील त्यांनी दाऊदला पत्र लिहून जाब विचारावा. कारण दाऊदने याकूब मेमनचा घात केला आहे. सुरुवात तिकडून झाली आहे.

आ.न.,
-गा.पै.

दहशतवाद्यांना मारून दहशतवाद संपत नाही, हे वाक्य केवळ टाळ्या मिळवण्यासाठी नाही याचा विचार व्हावा. >>>>> याच धर्तीवर मग "बलात्कार्‍याला मारुन्/शिक्शा देउन बलात्कार व्हायचे थांबत नाहीत" असं म्हणुन शकतो का? मग त्यावर उपाय / शिक्शा काय असावी असं तुम्हाला वाटतं?

<<दहशतवाद्यांना मारून दहशतवाद संपत नाही, हे वाक्य केवळ टाळ्या मिळवण्यासाठी नाही याचा विचार व्हावा. >>>>> याच धर्तीवर मग "बलात्कार्‍याला मारुन्/शिक्शा देउन बलात्कार व्हायचे थांबत नाहीत" असं म्हणुन शकतो का? मग त्यावर उपाय / शिक्शा काय असावी असं तुम्हाला वाटतं?>>

----- "दहशतवाद्याला मारुन..... किव्वा बलात्कार्‍याला मारुन.... " दोन्ही वाक्ये अत्यन्त कठोर पण सत्य आहेत...

समाजप्रबोधन आणि शिक्षण हाच यावर परिणामकारक, दुरगामी उपाय आहे.

फाशी योग्य पण जाहीर करायची आवश्यकता नव्हती. त्याला फाशी देवून फार मोठा तीर मारणार नाही सरकार किंवा न्यायालय. शेकडो बळी आणि हजारो जखमींच्या जबाबदार व्यक्तीला दया कशासाठी ? स्फोट करताना फाशी होऊ शकते याची कल्पना असूनही त्यांनी ती काळी कृत्ये केलीच ना ? मग अशा मुर्खांना दयेचा अर्ज करण्याचा अधिकार तरी का द्यावा हेच समजत नाही.

लोकहो,

ज्या माफीच्या मुखंडांना याकूबच्या दयेचा पुळका आला आहे त्यांनी दाऊदला पत्र लिहून जाब विचारावा. संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेले दाऊदचे कराचीतील पत्ते असे आहेत :

१. व्हाईट हाऊस, सौदी मशिदीपाशी, क्लिफ्टन, कराची.
२. घर क्रमांक ३७, रस्ता क्रमांक ३०, डिफेन्स हाऊसिंग ऑथोरिटी, कराची.
३. राजेशाही बंगला, नूराबाद टेकडी, कराची.
४. मार्गल्ला मार्ग, एफ ६\२, रस्ता क्रमांक २२, घर क्रमांक २९, कराची.

स्रोत :
http://zeenews.india.com/news/india/dawood-ibrahims-four-addresses-in-pa...

आ.न.,
-गा.पै.

भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवा हो ..
कहिच्या काही धागे निघतात काय आणि त्यावर चर्चा होते काय .. अजबच आहे सगळ ..
किमान या मुद्द्यावर तरी माबो करांमधे दुमत नसेल अस वाटल होत ..

अभिनंदन.. पेढे वाटा अस काहितरी असेल म्हणून आत डोकवलो तर इथे सारासार विचारांचा अतिरेक आहे..
सर्व जगात वेगवेगळ्या प्रकारचा अतिरेक आहे.. हिमालयात् निघुन जाव तर तिथे थंडीचा अतिरेक आहे..

हताश मी, हतबुद्ध मी, श्री राम नामचा जप करत ठेविलें अनंते जैसे तैसेचि बसून राहतो .. नमस्कार ..

ज्या माफीच्या मुखंडांना याकूबच्या दयेचा पुळका आला आहे त्यांनी दाऊदला पत्र लिहून जाब विचारावा.
<<
खरय!
दाऊदला पत्र लिहिणे म्हणजे, मायबोलीवर एका विशिष्ठ समाजाचे लांगुलचालन करण्याकरता धागा काढण्याएवढे सोपे नसल्याने, तेवढी हिम्मत इथले 'दयेचा पुळका' येणारे दाखवतील असे वाटत नाही.

टण्या, तुम्ही दिलेल्या सगळ्या लिंका वाचल्या. ज्यात, माझ्या मते, एक अजेंडा ठरवुन लिखाण केले आहे असे जाणवते. पहिली लिंक, जिथे तीन लोंकाची नावे दिली आहेत, तो लेख जुनाच असुन पुन्हा प्रकाशीत केला आहे. मधल्या काळात त्या लेखाचा काहिच रीलेव्हन्स राहिला नाही किंवा फार कमी राहिला आहे. तिन्ही लेखांमध्ये तर अनेक वाक्ये अशी लिहिली आहेत, ज्यामुळे भ्रम निर्माण व्हावा. जे दाखले दिले आहेत, त्यात काहि प्रमाणात सत्यता असली तरीहि, ह्या केसमध्येही असेच झाले आहे, हे भासवायचा प्रयत्न ठळकपणे दिसतो. अजेंडा ठरवुन, आरोपी विषयी सहानभुती निर्माण होइल असे लिहिले आहे.

आता मी एकच लिंक देतो. जी ९ एप्रिल २०१५ रोजी, आदरणीय सुप्रीम कोर्टाने याकुब मेमनची याचीका फेटाळताना दिलेला निकाल आहे. हे न्यायालय तीन जजचे आहे. १. न्या. अनील दवे २. न्या. जे. चेल्लामेश्वर आणि ३. न्या. कुरीयन जोसेफ.

http://indiankanoon.org/doc/49006242/

काय लिहिले आहे न्यायपत्रात? इथे सर्व भाषांतर देत बसत नाहि.

We have heard the learned senior counsel appearing for the review petitioner and the learned senior counsel appearing for the respondent, at length. We have gone through the judgment sought to be reviewed and we have considered the arguments advanced on both sides. As requested, we have also gone through the judgment of the trial court, in order to appreciate the contention on conviction and sentence. We find that all the arguments advanced by the review petitioner have been considered in detail in the judgment which is sought to be reviewed. Hence, we do not find any error apparent on the face of record or any other ground so as to warrant interference in exercise of our review jurisdiction.

The review petition is hence dismissed.

तीन न्यायाधीश असलेल्या बेंचने ट्रायल कोर्टाचा सर्व निकाल वाचला आहे. सर्व तपशील पुन्हा तपासला/पुनरावलोकन केले आहे. कसलीही त्रुटी आढळली नाही. बरं अशी याचीका काहि पहिल्यांदा फेटाळली आहे, असेही नाही. जेवढे वाचले आणि समजले त्यानुसार आरोपीस बचावाची नैसर्गीक संधी आत्ता पर्यंत पुरेपुर दिलेली आहे, असा माझा समज झाला आहे. जर नवीन विश्वसनीय तथ्य समोर आली ज्यामुळे असा समज चुकीचा ठरला तर तो बदलण्यास आनंदाने तयार आहे.

आणि आरोपी हा आरोपीच असतो. त्यात धर्म आणुन बुध्दीभेद कोणीही करुन घेवु नये.

>>>सर्व जगात वेगवेगळ्या प्रकारचा अतिरेक आहे.. हिमालयात् निघुन जाव तर तिथे थंडीचा अतिरेक आहे..<<<

Lol

खालच्या कोर्टाने फाशी शिक्षा दिलेले तीस टक्के लोक वरच्या कोर्टात निर्दोष सुटतात असे असेल तर न्यायव्यवस्था परफेक्ट नाही >>>>>>>>>>>

विकु - "निर्दोष" सुटतात हे चुकीचे विधान आहे. गुन्हा त्यांनी केला हे सिद्ध करण्यात ( बियाँड रीजनेबल डाउट ) सरकारपक्ष अपयशी ठरला , अश्या पद्धतीचा तो निकाल असतो. आणि बर्‍याच वेळा त्यात कायद्याच्या तांत्रिक बाजुंचा वापर करुन आरोपीची सुटका केलेली असते. न्यायालय फार क्वचित आरोपीला "निर्दोष" असे म्हणते.

<<निर्दोष" सुटतात हे चुकीचे विधान आहे. गुन्हा त्यांनी केला हे सिद्ध करण्यात ( बियाँड रीजनेबल डाउट ) सरकारपक्ष अपयशी ठरला ,>>

याच खटल्यात कोणावर तरी फ़क्त बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा ठेवुन मूळ आरोपातुन वगळलेले आहे.

एव्हढा कीस पाडण्यापेक्षा ती चर्च मधली कन्फेशन पध्दत अमलात आणावी. उगीच वादविवाद, कोर्ट कचेऱ्या, वकील, पोलिस यावर खर्च करण्यापेक्षा तो पैसा अशा अपराधी लोकांच्या पुनर्वसनासाठी वापरावा. शिक्षाच होणार नसल्याने निदान गुन्हेगार बिनदिक्कत गुन्हा कबूल तरी करेल.

मत देता येत नाही पण फाशी देणार असे म्हणत सतत टांगती तलवार ठेवणे ही जास्त शिक्षा आहे. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याअगोदर गुन्हेगाराची मानसिक स्थिती काय असते यावर मानसशास्त्रज्ञांचे काय म्हणणे आहे हे जाणुन घेणे अधिक रोचक ठरेल.

http://www.rediff.com/news/column/exclusive-b-ramans-unpublished-2007-ar...
>>>>
मी या आर्टिकलची वाट बघत होतो.

माझी भुमिका: याकुब मेमनचा गुन्हा सिद्ध झालेला आहे. तेव्हा त्यास शिक्षा होणे क्रमप्राप्त आहे. मात्र त्याने दिलेले सहकार्य, त्याच्याबरोबर भारतीय पोलिस/गुप्तचर संस्थांचे झालेले डील-माहिती देवाणघेवाण, व या प्रकारच्या शरणागतीचा वापर करून इतर दुसर्‍या-तिसर्‍या पायरीवरील गुन्हेगारांना भारतात आणून बड्या गुन्हेगारांविरुद्ध भक्कम केस उभी करण्यासाठी याकुब मेमनचे उदाहरण कायम ठेवता आले असते. भारतीय गुप्तचर संस्था व पोलिसांचाही मान यात टिकून राहिला असता.

बी.रमन हे आर.अँड.ए.डब्ल्युचे वरिष्ट अधिकारी होते, पाकिस्तान डेस्क बघत होते व सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा मृत्यु झाला त्या दिवसापर्यंत आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील एक प्रमुख भाष्यकार होते. त्यांच्या म्हणण्याला मोठे वजन आहे.

Pages