याकूब आणी फाशी.

Submitted by vijaykulkarni on 21 July, 2015 - 20:43

सुप्रीम कोर्टानेही याकूबची याचिका फेटाळल्याने आता त्याला फासावर चढवणे जवळजवळ निश्चित झाले आहे.
त्याला फासावर चढवू नये असे मला वाटते आणी त्याची काही कारणे मी लिहित आहे. माझे लेखन काही लोकांना संतापजनक, दळभद्री, देशद्रोही, भाबडे असे वाटेल आणी त्या मतांचा मी आदर करतो. शेवटी माबो ही मार्केट प्लेस ऑफ आयडियाज असावी आणी इथे सर्वच मताचे स्वागत असावे. आपले मत काहीही असेल तरी कृपया धागा बंद पडायला कारण होतील असे प्रतिसाद टाळावेत.

१ फाशीची शिक्षा गंभीर गुन्हा निर्विवादपणे (बियाँड रीझनेबल डाउट) सिद्ध झाल्यावरच देण्यात यावी. याकूबचा सहभाग तशा अर्थाने सिद्ध झालेला नाही. त्याच्या विरुद्धचा पुरावा परिस्थितीजन्य आहे.

२ या खटल्यातील त्याच्या पेक्षा गंभीर आरोप असलेल्या अनेक लोकांना फाशी झालेली आहे आणी ती जन्मठेपेत रुपांतरीत झाली आहे. असे असताना केवळ त्याचीच फाशी कायम ठेवणे अन्यायकारक आहे.

३ भारतातल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून तो शरण आला आहे. आल्यावर त्याने सहकार्यच केले आहे. टायगर मेमन ने भारतावर विश्वास ठेवू नको असे त्याला सांगितले होते, असे करून एकापरीने टायगर बरोबर होता हेच आपण सिद्ध करत आहोत. शिवाय अशा शरणागतीच्या विचारात असलेल्या अन्य लोकांना एक संदेश देत आहोत.

४ अशाच गुन्ह्याखाली फाशीच्या प्रतिक्षेत असलेले बलवंत सिंग राजोना, राजीव हत्या प्रकरणातील आरोपी यांची फाशी जवळ जवळ रद्द झाली आहे. बलवंत ने आरोप कबूल केला आहेच पण फाशी द्या अशी मागणीही केली आहे. त्या त्या राज्याच्या विधानसभा त्यांच्या मागे आहेत आणी राजीव गांधी खुनातील आरोपींना तर सोडूनच द्यायची मागणी होत आहे. अशा स्थितील केवळ राजकीय ताकद नही म्हणून एखाद्याला फाशी देणे अयोग्य आहे.

५ शिक्षा देताना इतरांना जरब बसवणे, आरोपीला सुधरायची संधी देणे आणी आरोपीपासून इतर समाजाचे रक्षण करणे हे तीन मुख्य हेतू असावेत. यातला एकही हेतू या फाशीने ( किंबहुना कोणत्याच फाशीने) साध्य होत नाही.

६ केवळ आडनाव मेमन आहे म्हणून फाशी देणे योग्य आहे का ? त्याचे आडनाव इतर काही असले तर हे झाले असते का? १९४८ च्या दंग्यात सातारा जिल्ह्यात "गोडसे" आडनावाच्या एका कुटुंबातील आजोबा, मुलगा आणी नातू या तिघानाही जमावाने ठार केले होते. यात आणी त्यात काय फरक आहे?

७ हा निर्णय राजकीय आहे. या आधी अफझल ला फाशी देण्याचा निर्णय असाच राजकिय होता. तात्कालीन सरकारने भाजपाच्या हक्काची काही मते आपल्याला मिळतील या वेड्या आशेवर अफझलला फाशी दिले होते. अर्थात त्या पक्षाला फायदा झाला नाही हा भाग वेगळा. इतक्या बलाढ्य राष्ट्राने अफझलला रात्री अचानक फाशी देणे खरेच अयोग्य होते. त्याच्या आईच्या डोळ्याला डोळा लावून "होय, तुमचा मुलगा अतिरेकी आहे आणी आम्ही त्याला फाशी देत आहोत" असे सांगायचीही हिम्मत होऊ नये ? एखाद्या माणसाने तुलना भगत सिंग च्या फाशीशी केली तर काय उत्तर आहे?

८ जर्मन बेकरी केसमधेही केवळ परिस्थितीजन्य पुराव्यावरून हिमायत बेग याला फाशीची शिक्षा झालेली आहे. दुसरा आरोपी कातील याची तर येरवडा जेलमध्येच हत्या झाली आहे. देश-नागरीक, पती-पत्नी, कम्पनी-कामगार अशी नाती परस्पर सहाकार्यावर आधारित असतात. एकाने दुसर्‍यावर कितीही अन्याय केला तरी दुसर्‍याने मात्र निरपेक्ष प्रेमच करावे अशी अपेक्षा करू नये. मालेगाव स्फोटात संबम्ध नसताना दहा वर्षे तुरुंगात राहिलेल्या लोकांनी देशावर प्रेम करावे असे कोणत्या तोंडाने सांगणार ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो मी वाचली आहे. हा "उन्माद" दोन्ही बाजूंनी आहे हे माझे म्हणणे आहे. सोशल मिडीया मध्ये मत मांडणारे सर्वच विचार करून मांडत नसतात, भावने पोटी ९० टक्के मत मांडतात. जी उन्मादाची असू शकतात.

इनफॅक्ट तुम्हाला असं वाटतंय की फाशी द्याच म्हणणारा आहे, मी वर लिहिले आहे ( माझ्या एकमेव पोस्ट मध्ये आधी) की त्याला आजन्म कारावास दिला असता तरी चालण्यासारखे होते.

असो. फाशी नको तर अश्या लोकांना काय शिक्षा हवी ? त्या मागची थॉट प्रोसेस काय आहे? हा माझा प्रश्न आहे.

याकुबवर खटला टेररीस्ट म्हणून चालवला गेला. TADA खाली.

ते प्रशांत भुषण आणि इतर काळाकोट CJI च्या घरासमोर काल रात्री एवढ्या उशीरा कशाला जमले होते, याकुबला मिळालेली फाशीची शिक्षा कायम व्हावी ह्यासाठी, की रद्द व्हावी यासाठी?

Ravish Kumar yanna alelya dhamakya ha unmad nasel tar sampalach.

Kaal president na nivedan dilelya tya ४२ lokanchi list social media var first noted. Tya var is kahi chalale hote to unmad nahi ka ?

@ 'काही लोकं म्हणताहेत.'... तसं म्हणणारे चूक आहेत.

इथे हा 'जिहादी'चा मुद्दा निघाला - "फक्र है म्हणवणार्‍या जिहाद्यानं दयेचा अर्ज का करावा" या प्रश्नावरुन.

टाडा कायदा साध्या गुन्हेगारांसाठी आहे की अतिरेक्यांसाठी?
मलतरबैकैकळतच्नै!

Yakub la shiksha jhaleli aahe. To muddach shillak nahi urala. Pan saman nyay asava ka yabaddal ajun charcha hou shakate. Yakub la fashi yogya ki ayogya yavar ya dhagyavar pahilyanda je mat Mandalay te kayam aahe.

Itar lokani je mat Mandalay tyat justice kataju, jethmalani vagaire lok hote. Tyamule issue tapala. Death warrant ३० April la sunawale gele. Charcha atach ka?

Ravish Kumar yancha sambandh nastana tyana target ka kele gele ?

झाली का फाशी एकदाची?
इतकी चर्चा (इथली नाही) आणि हाईप करून बिनकामाचा हिरो बनवलं त्याला.
याकुबच्या फाशीबाबत मला स्वतःला काहीच मत नव्हतं, पण नंतरचा उन्माद अगदीच अनावश्यक वाटतोय. ह्या उन्मादाच्या दूरगामी परिणामाबद्दल धास्ती वाटत आहे.

@ ' सोशल मिडीया मध्ये मत मांडणारे सर्वच विचार करून मांडत नसतात, भावने पोटी ९० टक्के मत मांडतात. जी उन्मादाची असू शकतात.' - अगदी पटलं. पण मला वाटतं, सोशल मीडिया हा इतर कोणत्याही प्रत्यक्ष सामाजिक व्यवहारासारखाच गांभीर्यानं घ्यायचा व्यवहार आहे. इथल्या अपारदर्शकतेचा वापर करुन कोणी बेजबाबदार वागत असेल, तर ऑनलाईन कम्युनिटीनंच पहिल्या प्रथम त्याला आळा घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (सोशल मीडियावर केलेल्या कृतींची आता पोलीसही दखल घ्यायला लागले नाही का?) नाहीतर उन्माद (कितीही बाजूंचा) बोकाळत राहील, प्रत्यक्ष सामाजिक व्यवहार गढूळ करत राहील.

@ 'टाडा कायदा' - तो होता, आता नाही. आणि अतिरेकी कारवायांसाठीच होता. त्या कायद्याच्या आधारे याकूबला दोषी ठरवलं गेलं.
(अतिरेकी आणि जिहादी वेगळ्या कॅटेगरीज.)

मी मगापासून तेच सांगतेय. त्याला जिहादी नव्हे अतिरेकी म्हणा.
एका तरी पोष्टीत मी त्याला जिहादी म्हटलंय का?
पण या अतिरेकाचाच त्यांना पश्चत्ताप नाही तर अभिमान आहे.

(हे उत्तर वर लिहीलंय, पुन्हा - ) जगातल्या शंभर-सव्वाशेहून जास्त देशांनी काय केलंय, त्याचा अभ्यास करुन आपल्या देशाला अनुरूप कायदे करणार्‍यांना पाठिंबा द्यायचा >>

जगातल्या किती देशांना भारतासारखा टेररिस्टसारखा त्रास आहे?

अमेरिका = अमेरिका कायद्याने जाणार राष्ट्र आहे म्हणून त्यांना "फक्र"वाले जिहादी, आताश्या पकडतच नाही. ड्रोन चा वापरत करते. बाकी स्पायिंग / रेशियल प्रोफाईलिंग वगैरे बद्दल मी बोलतच नाही. ते चुकीचे होते की नाही ती चर्चाच नाही.

ब्रिटन = David Cameron to fast-track tough anti-terror laws - The Prime Minister will say that the Queen’s Speech at the end of the month will now include a series of measures designed to confront “poisonous Islamist extremist ideology”.

फ्रान्स = France to strengthen spies' powers in new anti-terror law

भारत = टाडा खारिज Proud सिरियसली?

थोडक्यात काय जगात १२५ देशांनी फाशीची शिक्षा रद्द केली म्हणून आपणही करू, ह्याला खरचं अर्थ नाही, ती लोकं दुसरे मार्ग अवलंबंत आहेत. फाशी ऐवजी. आणि आपण ज्युडिशियल सिस्टीम मध्ये राहून सर्व करतो. आपल्याकडे अजून लोकांना ड्रोनने मारण्याएवढी प्रगती नाही ये हो.

भारताला जेवढा टेररिझमचा त्रास आहे तेवढा जगातील किती देशांना / तितक्याच प्रमाणात आहे हे सांगाल का? आणि मग तो कसा रोखणार? म्हणजे घटना घडल्यावर जिहादी जर हाती आले तर काय करणार? तुम्ही मागे लिहिलंय असे मोघम लिहिले आहे, कुठेही अश्या टेररिस्ट ( चला जिहादी नको) ना तुम्ही काय शिक्षा करणार?

(चर्चाच आहे. Happy )

लोकहो,

याकूब मेमनच्या चाहत्यांनी आज आनंद व्यक्त करावा. कारण आज त्याचा वाढदिवस आहे. तर याकूबच्या फाशीमुळे त्याचे विरोधकही आज खुशीत आहेत.

अशा प्रकारे नेमक्या दिवशी फाशी देऊन समाजातल्या सर्व घटकांची ख़ुशी साधल्याबद्दल भारत शासनाचं अभिनंदन.

आ.न.,
-गा.पै.

आज ही बातमी फार फिरत आहे सोशल मिडियावर. सप्टेंबर २०१३--

Gujarat govt asks SIT not to seek death penalty for Maya Kodnani in 2002 Naroda Patiya massacre case
The Gujarat government has refused permission to the Supreme Court-appointed SIT to file an appeal in a higher court seeking death penalty for former minister Maya Kodnani in the Naroda Patiya riot case.
This was decided on the basis of advocate general Kamal Trivedi's opinion that there was "no direct evidence" against her.
Maya Kodnani and Bajrang Dal activist Babu Bajrangi, along with 30 others, were sentenced to life imprisonment in the 2002 post-Godhra Naroda Patiya riot case, in which 96 people were killed.

बेफिकीर,

असं बघा की, गेले काही दिवस याकूबला फासावर चढवण्यासाठी शासनाची इतकी धडपड कशासाठी चालली होती? नेहमी एक दोन आठवड्यांनंतर गठित होणारी न्यायालयाची पीठे इतक्या तातडीने का कार्यरत होत होती? भर रात्री अडीच वाजता जगातल्या कुठल्या न्यायपीठाने काम केलंय? ३० जुलैचा मुहूर्त चुकू नये म्हणूनच ना? यावरून काय ते ओळखावं.

आ.न.,
-गा.पै.

गामा,

तुम्ही ह्या दृष्टिकोनातून बघा बरं एकदा!

एका खूप मोठ्या देशाने देशावर हल्ला करणार्‍याला बावीस वर्षे जिवंत ठेवले, त्याला निष्पाप असल्याचे सिद्ध करायला पूर्ण मुभा दिली, त्यानंतरही तो दोषी ठरल्यावर त्याच्या फाशीची तारीख जाहीर केली, त्यावर त्याने केलेले सर्व दयेचे अर्ज न्याय्य धोरणानुसार फेटाळले. एवढे केल्यानंतर जर ३० जुलै ही तारीख मेन्टेन करता आली नसती तर जगभरात छी थू झाली असती.

बेफिकीर, तुम्ही म्हणता ते पूर्णपणे पटतंय मला. पण काये की हत्तीचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात.
आ.न.,
-गा.पै.

समाधान वाटले एकतरी चढला फासावर , न्यायालयाचे अभिनंदन , मन आत्ता थोडे शांत झाले , माझ्या मित्रा च्या आत्म्याला शांती मिळाली असेल २२ वर्ष्या नंतर

@vijaykulkarni
ज्या लोकांची फाशी रद्द झली आहे , त्यांनी देश विरुद्ध युद्ध पुकारले नव्हते , म्हणून वरील सर्व मुद्दे इथे लागू होत नाही
१ फाशीची शिक्षा गंभीर गुन्हा निर्विवादपणे (बियाँड रीझनेबल डाउट) सिद्ध झाल्यावरच देण्यात यावी. याकूबचा सहभाग तशा अर्थाने सिद्ध झालेला नाही. त्याच्या विरुद्धचा पुरावा परिस्थितीजन्य आहे.= होय त्याचा गुन्हा सिद्ध झला आहे .
२ या खटल्यातील त्याच्या पेक्षा गंभीर आरोप असलेल्या अनेक लोकांना फाशी झालेली आहे आणी ती जन्मठेपेत रुपांतरीत झाली आहे. असे असताना केवळ त्याचीच फाशी कायम ठेवणे अन्यायकारक आहे.=ज्या लोकांची फाशी रद्द झली आहे , त्यांनी देशा विरुद्ध युद्ध पुकारले नव्हते
३ भारतातल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून तो शरण आला आहे. आल्यावर त्याने सहकार्यच केले आहे. टायगर मेमन ने भारतावर विश्वास ठेवू नको असे त्याला सांगितले होते, असे करून एकापरीने टायगर बरोबर होता हेच आपण सिद्ध करत आहोत. शिवाय अशा शरणागतीच्या विचारात असलेल्या अन्य लोकांना एक संदेश देत आहोत.= तो शरण आल्याचा कुठला हि पुरावा नाही
४ अशाच गुन्ह्याखाली फाशीच्या प्रतिक्षेत असलेले बलवंत सिंग राजोना, राजीव हत्या प्रकरणातील आरोपी यांची फाशी जवळ जवळ रद्द झाली आहे. बलवंत ने आरोप कबूल केला आहेच पण फाशी द्या अशी मागणीही केली आहे. त्या त्या राज्याच्या विधानसभा त्यांच्या मागे आहेत आणी राजीव गांधी खुनातील आरोपींना तर सोडूनच द्यायची मागणी होत आहे. अशा स्थितील केवळ राजकीय ताकद नही म्हणून एखाद्याला फाशी देणे अयोग्य आहे.= वरील कासेस अजून हि न्यालयात पेंडिंग आहेत त्या वर भाष्य करणे योग्य नाही
५ शिक्षा देताना इतरांना जरब बसवणे, आरोपीला सुधरायची संधी देणे आणी आरोपीपासून इतर समाजाचे रक्षण करणे हे तीन मुख्य हेतू असावेत. यातला एकही हेतू या फाशीने ( किंबहुना कोणत्याच फाशीने) साध्य होत नाही.= भारतातील ७०% विचारवंत याच्याशी सहमत नाहीत (याचा गुन्हा rarest ऑफ rare होता २००२ आत्तपर्यंत १३२२ लोकांना फाशी झाली पुन फक्त तीन लोकांना दिली गेली
६ केवळ आडनाव मेमन आहे म्हणून फाशी देणे योग्य आहे का ? त्याचे आडनाव इतर काही असले तर हे झाले असते का? १९४८ च्या दंग्यात सातारा जिल्ह्यात "गोडसे" आडनावाच्या एका कुटुंबातील आजोबा, मुलगा आणी नातू या तिघानाही जमावाने ठार केले होते. यात आणी त्यात काय फरक आहे?= न्याय आडनावा वरून दिला जात नाही वरील निकल वरून स्पस्ट होते
७ हा निर्णय राजकीय आहे. या आधी अफझल ला फाशी देण्याचा निर्णय असाच राजकिय होता. तात्कालीन सरकारने भाजपाच्या हक्काची काही मते आपल्याला मिळतील या वेड्या आशेवर अफझलला फाशी दिले होते. अर्थात त्या पक्षाला फायदा झाला नाही हा भाग वेगळा. इतक्या बलाढ्य राष्ट्राने अफझलला रात्री अचानक फाशी देणे खरेच अयोग्य होते. त्याच्या आईच्या डोळ्याला डोळा लावून "होय, तुमचा मुलगा अतिरेकी आहे आणी आम्ही त्याला फाशी देत आहोत" असे सांगायचीही हिम्मत होऊ नये ? एखाद्या माणसाने तुलना भगत सिंग च्या फाशीशी केली तर काय उत्तर आहे?= हा राजकीय निर्णय असता तर इतकी २ मरशी पिटीशन आणि १ curetive पिटीशन फ़ेटळ्ल्यवर १० वर्षा पूर्वीच त्याला फासावर लटकावले असते
८ जर्मन बेकरी केसमधेही केवळ परिस्थितीजन्य पुराव्यावरून हिमायत बेग याला फाशीची शिक्षा झालेली आहे. दुसरा आरोपी कातील याची तर येरवडा जेलमध्येच हत्या झाली आहे. देश-नागरीक, पती-पत्नी, कम्पनी-कामगार अशी नाती परस्पर सहाकार्यावर आधारित असतात. एकाने दुसर्‍यावर कितीही अन्याय केला तरी दुसर्‍याने मात्र निरपेक्ष प्रेमच करावे अशी अपेक्षा करू नये. मालेगाव स्फोटात संबम्ध नसताना दहा वर्षे तुरुंगात राहिलेल्या लोकांनी देशावर प्रेम करावे असे कोणत्या तोंडाने सांगणार ?= मालेगाव स्फोटा मध्ये सुधा शिक्षा झल्या आहेत फक्त एका बाजूने विचार करू नका ,वरील विचार सर्वांनाच लागू होतात

झाली का फाशी एकदाची?
इतकी चर्चा (इथली नाही) आणि हाईप करून बिनकामाचा हिरो बनवलं त्याला.
याकुबच्या फाशीबाबत मला स्वतःला काहीच मत नव्हतं, पण नंतरचा उन्माद अगदीच अनावश्यक वाटतोय. ह्या उन्मादाच्या दूरगामी परिणामाबद्दल धास्ती वाटत आहे.
<<
बिनकामाचा नव्हे.
लै कामाचा होता हा प्रकार मिर्चीताई.
ध्रुवीकरण अधिक पक्के झाले. बाकी भ्रष्टाचाराचे विषय मागे पडले. अगदी पंजाबातले टेररिस्ट अ‍ॅटॅकही विसरले गेले. पुढचे परिणाम भारी आहेत.

275 लोकांना मारल्यावर दयेचा अर्ज हा जोक च आहे आणि 22 वर्ष खटला चालवून सलमान सारखे xxxxxx लोकं समर्थन करतात हा त्यावरचा ताशेरा आहे
खरं म्हणजे media ने याला महत्त्वच दिले नाही पाहिजे.....
अमेरिका बरी.....सद्दमला फाशी देऊन मोकळे.....कसला अर्ज आणि काय....त्याची बाजू ऐकून न ऐकल्यासारखी केली.....
ओसामाला तर कुठे फेकला समजलं पण नाही
इतक्या लोकांना मारल्यावर कसाब याकूब ला इतकी वर्ष बाजू मांडायची संधी देणं हा लोकशाही वरचा जोक आहे....
कोणाला कसलं स्वातंत्र्य द्यायचं हे पण कळत नाही....
ही आपली घटना

अत्यंत धूर्त आणि बारीक योजना ध्रुवीकरणाची.
काटजूसारख्यांनी मोलाचा रोल अदा केला. अपेक्षित गदारोळ झाल्याने आता बिहारमधे मुझफ्फरपूर नसल्याची उणीव भासणार नाही.

Pages