विषण्ण करणारा अनुभव - लोणावळा

Submitted by टीना on 2 July, 2015 - 03:24

काल सकाळी अगदी झोपेत असताना ताईचा फोन आला लोणावळ्याला चलतेस का म्हणुन. अगदी ताबडतोब हो म्हटल आणि आवराआवर करुन तिच्या घरी पोहचली. तिथुन थोड्याच वेळात लोणावळ्याकडे प्रस्थान केल..

पहिला स्टॉप भुशी डॅम वर आणि पुर्ण दिवसासाठी मुड खराब .. अस वाटलं कुठुन दिमाग आला आणि इथ जाण्याकरीता हो म्हटलं .. पार्किंगसाठी फि रु.१००.. अबब! अस झालं. असो म्हणुन शंभरी त्याच्या हातात कोंबली आणि चालत निघालो. तिथ जाण्याच्या वाटेवर सगळी कचराकुंडी.. प्लॅस्टिकचे चमचे , ताट , सिगरेटचे थोटकं , कपडे काय नको ते पडलेलं.. किळस आली अगदी.. चिखलभरल्या चपलेनं लोक बाजुच्या पायर्‍यांवरुन चढत आणि खालच्या पायर्‍यांवर बसलेले लोक त्या पायर्‍यांवरुन पडणार्‍या पाण्यात बसुन मज्जा घेत होते..
तिथच बसलेल १५ २० पोरांचे २ ३ टोळके घाणेरड्या आवाजात ओरडत होते, अंगविक्षेप करत आहे आणि काय काय..

लोकांच्या मॉडर्न असण्याच्या संकल्पना कुठल्या थरापर्यंत वेगवेगळ्या असु शकतात त्याच पुस्तक उघडून बसल्यासारख वाटत होतं.. मुर्खासारखे वागत होते हे मोठे लोक तिथे.. कुणाला कुणाच सोयरसुतक नाही, करतय करु दे मरतय मरु दे यातला प्रकार..डॅम च्या भिंतीवर शब्दशः २५ ते ३० च्या दरम्यान असलेला सो कॉल्ड तरूण उभा राहुन मुततोय . माफ करा पण त्याच्या कृतीला बघुण दुसरा शब्द मला सुचत नव्हता.. खाली लोक पाण्यात ओले होत मज्जा करत होते.. काय म्हणाव याला ?

त्या पाण्यात भिजत , तिथं बसुन लोक कणिस खात होते आणि अक्षरशः तिथच त्या पायर्‍यांवर फेकत होते..
एक तरूण.. जबरदस्तीने लोवेस्ट करण्यासाठी जमेल तेवढा सरकवलेला जीन्स , कुल टिशर्ट, तारे जमीन पर मधल्या आमिर सारखी हेअरस्टाईल करुन गॉगल लावुन भिंतीवर उभा राहुन पचापचा त्या पाण्यात थुंकतोय आणि खाली छोटे लेकरं त्याच पाण्यात डुंबत असताना हे चाल्लयं.. त्याला मी शिव्या मारल्यावर तो आणि इतरहि लोक निव्वळ बघे बनलेले होते.. कुठ हरवल्या यांच्या संवेदना ? मुर्ख आहेत का हे ? श्शी..

माझ लग्न झालेल नाही , ना ही एखाद्या २ महिन्याच्या लहान मुलाला वागवायचा मला अनुभव आहे तरीही माझ्यामते २ ते ३ महिन्याच बाळ फुलासारखं नाजुक असतं आणि त्याला तसच जपावसुद्धा लागतं.. पण तिथ एक तरुणी तिच्या तेवढ्याच बाळाला भर पावसात हाती गुंडाळून डोक्यावर छत्री सुद्धा न घेता तसच घेऊन त्या पायर्‍या चढत होती.. एखाद्याची हौस मान्य करता येते पण त्या छोट्या न बोलत्या जीवाचे काय हाल होत असणार अथवा होणार ते त्या माऊलीला तरी ठाऊक होते की नाही देव जाणो. भुशी डॅम चा तो सुंदर अनुभव घेऊन इतर कुठ फिरायची इच्छाच मरुन गेली. जाता जाता तेवढ कार्ल्याला गेलो तर तिथही तिच तर्‍हा.

पहिल्यांदा लोणावळा २०१० मधे बघीतला होता.. त्यानंतर डायरेक्ट आत्ता जाण्याचा मुहुर्त निघाला. कित्ती फरक पडला या ५ ६ वर्षात..पुर्ण बाजारीकरण झालय प्रत्येक ठिकाणाचं.. कार्ल्याच्या लेण्यांना देवळाचं स्वरुप आलयं. ना ही त्या लेण्या पहिल्याएवढ्या वैभवात राहिल्याय आणि शंका आहे की देवीच्या देवळाच देवत्व तरी शाबुत आहे कि नाही ? तरी बर हि बेभान तरुणाई देवीदेवतांची तेवढी भक्त नाही .. नाहीतर तिथल्या देवळातल्या भक्तीच्या कृतीला विकृतीची जोड लाभायला असा कितीसा वेळ लागणारे..
लिहण तितकस जमत नाही पण सांगण्यापासुन खरोखरच राहावल नाही..
मला नाही वाटत यापुढं कधी लोणावळा जायची हिम्मत होईल . Sad . आणखी एक सुंदर ठिकाण भेटीला पारख झालं ..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते मध्यप्रांत वाचून अमिताभचा आवाज कानात घुमला... 'मध्यप्रांत के रेगिस्तान में....'

हे उगाचच.... आणखी एक अवांतर पोस्ट Wink

....तो काढलाय ना आधिच "...ते ही मुंबईसारख्या शहरात" असे म्हणुन?
>>>
त्यात एक मुंबईकराने मुंबईबद्दल आपलेपणाने केलेली तक्रार आहे.

इथे आता प्रश्न अस्मितेचा आहे ! आणि मला ज्याची टरफले त्याला परत करायची आहेत.

>>>Srd | 19 August, 2015 - 06:55
१९ ओगस्टच्या प्रतिसादांचे प्रयोजन कळले नाही या लोणावळ्यात
संपादन
रॉबीनहूड | 19 August, 2015 - 08:33
१९ ओगस्टच्या प्रतिसादांचे प्रयोजन कळले नाही या लोणावळ्यात
<>>>
बात निकलेगी तो बहुत दूर तलक जायेगी>>>>

आमही उगाच खो दिला का?

थोडे रूड वाटेल पण जर इतरांना मुंबई एवढी वाईट वाटते आणि स्वतःच्या जन्मगावा बद्दल एवढा जिव्हाळा आणि अभिमान असेल तर मुंबईत येवूच नये. >>>>> अहो हा तर पुणेकर मोड झाला की.. Proud पुलंचे ते 'एक भिकार सात भिकार' आठवा बरं.. Wink

पुलंचे ते 'एक भिकार सात भिकार' आठवा बरं.. >>> पराग, एक्झॅक्टली मलाही हेच वाटले होते. मुंबईकर पुणेकर मोड मधे आले एकदम.

आणि शेवटी माहेरची व्यक्ति भेटली म्हणून कितीही आनंद झाला तरी या धाग्यावर
प्रांतवाद आणायची गरज
नव्हतीच.>>> +1000000

सामी तुझ्या पोस्टिलाही अनुमोदन .

स्वाती आंबोळे , आनंद मलाही झालाय बर Wink . मृण्मयी मस्त पोस्ट्स

आता बाफ विषयाबद्दल , या वर्षी लोणावळा ट्रिप रद्द केली . आधी जाऊन आलेल्या ऑफिस कलिग्जचे अनुभव ऐकले आणि अगदीच मनातून उतरल हे ठिकाण !! टीनाने जे लिहिलेय त्यात काड़ीभरही बदल झालेला नाही Sad

अरे पण लोणावळा का टाळताय? तिथे बघायला अजून जागा आहेत की. श्री स्वामी समर्थान्चे देऊळ, प्रती पन्ढरपूर, एक मोठ सन्ग्रहालय ( मला वाटत लन्डनच्या वॅक्स म्युझीअम सारखे) आणी अजून बरेच काही.

लोणावळा म्हणजे काय फक्त चिक्की आणी भुशी-सुशी डॅम पुरताच मर्यादीतच आहे का? डॅम इट!

खरेय , लोणावळा म्हणजे नुसते भुशी डॅम नाही.
लोनावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये मोदींपासून मायकल जेक्सनपर्यंत बरेच जणांचे पुतळे आहेत आणि ते आपल्यासोबत फोटो काढायचीही परवानगी देतात.
मी अधूनमधून लोणावळा जवळील कामशेतला जाऊन पॅराग्लायडींग करून येतो. तेवढेच हात पाय मोकळे होतात.

बरेच जणांचे पुतळे आहेत आणि ते आपल्यासोबत फोटो काढायचीही परवानगी देतात. >> पुतळेही फोटो काढायची परवानगी देतात पण खरे सेलिब्रिटी भाव खातात यावर माझा पुढचा धाग लवकरच येत आहे...

लोणावळा आणि तत्सम ठिकाणी चालणार्‍या राक्षसी, हिणकस आणि घाणेरड्या प्रवृत्तींना आळा घालणे वाटते तेवढे सोपे नाहीये.
साधारण या दिवसांमधे राज्य राखीव पोलिस दल किंवा वेळ पडल्यास प्रत्यक्ष सैन्यदलाच्या छोट्या तुकड्यांना अशा ठिकाणी काही दिवसांपुरते तंबू ठोकून नेमावे. आणि असल्या चाळ्यांना आवर घातला जावा. (अगदी अयोध्येतल्या सारखी सुरक्षा). काही पथके फिरती ठेवली जावीत. प्रहार मधल्या नाना पाटेकर सारखी अनेक लोके अशा पथकांमधे असतील तर बराच फरक पडेल. अगदी गरज पडल्यास सरळ हवेत गोळीबार करून पळवून लावावे असल्या भुक्कड माकडांना.

अगदी गरज पडल्यास सरळ हवेत गोळीबार करून पळवून लावावे असल्या भुक्कड माकडांना.
>>>>>>
नका हो, त्या हवेतल्या गोळीबारात खरोखरचे माकड म्हणजे आपले पूर्वज मरायचे.
त्यापेक्षा मद्य प्यालेल्या लोकांच्या आत जे मर्कट लपले असते त्याला मारा.

>>राक्षसी, हिणकस आणि घाणेरड्या प्रवृत्तींना आळा घालणे वाटते तेवढे सोपे नाहीये.
हे सर्वात आधी लिहिलेले वाक्य,
गेल्या अनेक वर्षांमधे मोठ्या प्रमाणावर वाढीस लागलेल्या या भिकार मनोवृत्तीचा नायनाट करायचा असेल तर काहीतरी गंभीर उपाय योजावेच लागतील.

लोणावळा म्हणजे काय फक्त चिक्की आणी भुशी-सुशी डॅम पुरताच मर्यादीतच आहे का? डॅम इट!>>>> यात वैताग येन्यासारख काय आहे ते समजल नाही. डॅम इट! वगैरे अति आहे . आम्ही आधीच्या ट्रिप्स मध्ये बाकी सर्व कव्हर केलेय. भुशी डॅमला आजवर एकदाही गेलो नाही . कारण वर टिनाने लिहिले आहेत तेच .

>>राक्षसी, हिणकस आणि घाणेरड्या प्रवृत्तींना आळा घालणे वाटते तेवढे सोपे नाहीये.
>><> +1

>>मी अधूनमधून लोणावळा जवळील कामशेतला जाऊन पॅराग्लायडींग करून येतो. तेवढेच हात पाय मोकळे होतात.>>>नक्की कुठे आणि पत्ता टाका.किती फी आणि कोण जाऊ शकते-क्लबचे सभासद व्हावे लागते का? आपला सेल्फी काढू शकतो का याची माहिती टाका कृपया.

लोणावळ्या जवळची ठिकाणे हा धागा टाका कोणीतरी.(धोक्याच्या सुचनेसह).
वॅक्स म्युजिअमच्या बाहेर बोर्डावर बरीच नावे लिहिली असली तरी बरेच अॅक्टरांचे पुतळे नाहीत .

वेळ पडल्यास प्रत्यक्ष सैन्यदलाच्या छोट्या तुकड्यांना अशा ठिकाणी काही दिवसांपुरते तंबू ठोकून नेमावे

हास्यास्पद!

सो.बा. : हास्यास्पद काय ? हे लोण असेच पसरत राहिले ना तर एकही जागा शिल्लक राहणार नाही फिरायला. आणि हा असला घाणेरडा हालकट आचरटपणा बंद करण्यासाठी दुसरा एखादा जालिम उपाय असेल तर सुचवा.

टीनाजी … अगदी बरोबर लिहिलात तुम्ही ….

पिकनिकछाप, अय्याशी आणि माजूर्रड्या लोकांनी भुशी डॅम आणि लोणावळा परिसराची रया पार घालवली आहे.….
कोणाला तिथल्या निसर्गाशी काही देणं-घेणं नाहिच. लोकं तिकडे एन्जॉय करतात म्हणे. आणि त्यांच्या एन्जॉय ची व्याख्या काय म्हणजे - रस्त्यावर हातात बाटली धरून बियर, दारू पित सिगारेटचे धूर अगदी style ने हवेत टाकत फिरणे, गाडी खुली ठेऊन मोठ्याल्या आवाजात गाणी लावुन नको तसे अंगविक्षेप करत बेशरम होऊन नाचणे, जोर-जोरात दुचाकी चालवत जाणे (रस्त्यावर गर्दी असतानादेखील) आणि जाताना कशात काही नसताना एखाद्यावर ओरडणे (चारचाकी वाले पण काही कमी नसतात), एखाद्या ठिकाणी मुली दिसल्याच कि लगेच हिरोगिरी करणे (यामध्ये नाना प्रकार आहेत हे सांगायला नको)… कोणता असुरी आनंद मिळतो अश्या प्रकारच्या enjoyment ने हेच काळत नाही.

आपणह इकडे फिरायला आलोत कि पैसे खर्च करून मनस्ताप करून घेण्यासाठी आलोत हेच काळत नाहि.

अश्या या सर्व वातावरणामध्ये एखादं कुटुंब सहपरिवार काहीतरी चांगलं तिथे असेल या आशेने तिकडे आलेलं असतं, पण त्यांची अवस्था देखील खराब होऊन गेलेली असते.

२००४ ला जेंव्हा पहिल्यांदा जेंव्हा मी भुशी डॅम पाहायला गेलो तेंव्हा देखील असाच अनुभव मी अनुभवला आहे. त्यानंतर परत २०११ ला मित्राच्या खूप आग्रहामुळे तिकडे गेलो पण अनुभव तोच…

आता स्वताच्या मनाशी एक ठरवून घेतलं आहे---भुशी डॅम --- नको रे बाबा …

अहो उठसुठ काही झाले तरी

"बोलवा आर्मी सरळ करायला "

हे हास्यास्पद वाटते!! दंगे झाले बोलवा आर्मी, पुर आला बोलवा आर्मी, पोरगे हापशीत पडले बोलवा आर्मी, भुशी डॅम ला दंगा होतो बोलवा आर्मी!! सगळे ह्याला बोलवा त्याला बोलवा न काय होणार साहेब, आर्मी ला बोलावण्यापेक्षा आम्ही शिस्त शिकु म्हणा की देवा!! अन हो "आम्ही" वर जोर देतो, कारण उगाच "मी बेशिस्त नाही बाकीचे आहेत" हे सगळे म्हणतात पण तरीही पब्लिक प्लेस ला ९०%लोक बेशिस्त दिसतात असे का असावे??

अहो उठसुठ काही झाले तरी

"बोलवा आर्मी सरळ करायला "

हे हास्यास्पद वाटते!! >> +१००.
सैन्यदल भुशी डॅमवर आले तर घुसखोर पाकिस्तान्यांना रोखायला सीमेवर पोलिस जाणार काय आपले दंडुके सावरत?

आर्मी ला बोलावण्यापेक्षा आम्ही शिस्त शिकु म्हणा की देवा!!>> छे छे... आपण कुठे काय करायचं असतं.. आपण तर कर भरतो.

आर्मी ला बोलावण्यापेक्षा आम्ही शिस्त शिकु म्हणा की देवा!! अन हो "आम्ही" वर जोर देतो, कारण उगाच "मी बेशिस्त नाही बाकीचे आहेत" हे सगळे म्हणतात पण तरीही पब्लिक प्लेस ला ९०%लोक बेशिस्त दिसतात असे का असावे?>> एक्झाक्टली हेच लिहिणार होते. आर्मी बोलावून वचक लावण्यापेक्षा शिस्त शिका की, आणी जो बेशिस्त वागत असेल त्याला शिस्त लावण्यासाठी थोडे तरी प्रयत्न स्वत्: करा की. दुसर्‍यानेच सर्व काही करावे ही अपेक्षा कशाला?

जाई तुम्हाला विनोदाचे वावडे आहे का?:अओ: माझी पोस्ट वैतागुन वा चिडुन लिहीलेली नव्हती. भुशी डॅम आणी महेश कोठारेचे डॅम इट याचा सम्बन्ध लावुन मी तशी कोटी केली, ती दिमाना समजली, पण तुम्ही रागवलात. त्यात काय अती केले मी? आणी मी तुमच्या नावाचा तरी कुठे उल्लेख केला आहे का?. तुमच्या पोस्टनन्तर माझी पोस्ट आली आणी तुमची पोस्ट वाचायच्या आतच मी ती लिहायला घेतली यात माझी काय चूक? माझ्या मते तरी मी काहीच अती केलेले नाहीये आणी माझ्या या मतावर मी ठाम आहे.

दुसरे असे की सगळे जण लोणावळा आणी भुशी डॅम याभोवतीच केन्द्रीत झालेत त्यामुळे लोणावळ्यात बाकी काही चान्गले नाही का हे मी विचारले यात काय माझी चूक? आजकाल जो उठतो तो प्रत्येक शहराला नावे ठेवत सुटतो पण त्याच शहरात अजून काही चान्गले असते किन्वा त्याला दुसरी चान्गली बाजू असेल असे कुणी मानतच नाही. मग ते मुम्बई असो वा पुणे असो वा नागपूर.

मुम्बई मी जास्त पाहिलीच नव्हती. लोकल् प्रवासाला मी घाबरते. पण जेव्हा नातेवाईकान्कडे चर्चगेटला गेले होते तेव्हा खिडकीतुन दिसणार्या समुद्राच्या मी पार प्रेमात पडले आणी गर्दी विसरले.

माझ्या लेखनातला दुसरा आणी तिसरा पॅरा तुम्हाला उद्देशुन नाहीये आणी माझे तुमच्याशी कुठलेही वैयक्तीक भान्डण वा रोष नसल्याने मी तुमची पोस्ट मनावर घेत नाही. पण माझे लिखाण हे क्लीअर झालेच पाहीजे म्हणून हा पोस्टप्रपन्च केला.

मधू : अरे सदू आज आईने मधल्या सुट्टीत काही चिक्की खाण्यासाठी चार आणे ( त्यावेळचं एक नाणं )दिले होते ते तोंडात ठेवले ते पोटात गिळले!
सदू :एवढेच ना ? मी देईन माझ्या डब्यातला लाडू तुला आज.

रश्मी.., मी सुद्धा माझ्या मतावर ठाम आहे. आणि हो मला काही विनोदाच् वावड वगैरे नाही . पण लिखाणात विनोद असला तरच तो समजतो हे ही कळत . उगाच कोणताही पोस्ट विनोद म्हणून घेत नाही
असो . या विषयावर हेमाशेपो .

Pages