विषण्ण करणारा अनुभव - लोणावळा

Submitted by टीना on 2 July, 2015 - 03:24

काल सकाळी अगदी झोपेत असताना ताईचा फोन आला लोणावळ्याला चलतेस का म्हणुन. अगदी ताबडतोब हो म्हटल आणि आवराआवर करुन तिच्या घरी पोहचली. तिथुन थोड्याच वेळात लोणावळ्याकडे प्रस्थान केल..

पहिला स्टॉप भुशी डॅम वर आणि पुर्ण दिवसासाठी मुड खराब .. अस वाटलं कुठुन दिमाग आला आणि इथ जाण्याकरीता हो म्हटलं .. पार्किंगसाठी फि रु.१००.. अबब! अस झालं. असो म्हणुन शंभरी त्याच्या हातात कोंबली आणि चालत निघालो. तिथ जाण्याच्या वाटेवर सगळी कचराकुंडी.. प्लॅस्टिकचे चमचे , ताट , सिगरेटचे थोटकं , कपडे काय नको ते पडलेलं.. किळस आली अगदी.. चिखलभरल्या चपलेनं लोक बाजुच्या पायर्‍यांवरुन चढत आणि खालच्या पायर्‍यांवर बसलेले लोक त्या पायर्‍यांवरुन पडणार्‍या पाण्यात बसुन मज्जा घेत होते..
तिथच बसलेल १५ २० पोरांचे २ ३ टोळके घाणेरड्या आवाजात ओरडत होते, अंगविक्षेप करत आहे आणि काय काय..

लोकांच्या मॉडर्न असण्याच्या संकल्पना कुठल्या थरापर्यंत वेगवेगळ्या असु शकतात त्याच पुस्तक उघडून बसल्यासारख वाटत होतं.. मुर्खासारखे वागत होते हे मोठे लोक तिथे.. कुणाला कुणाच सोयरसुतक नाही, करतय करु दे मरतय मरु दे यातला प्रकार..डॅम च्या भिंतीवर शब्दशः २५ ते ३० च्या दरम्यान असलेला सो कॉल्ड तरूण उभा राहुन मुततोय . माफ करा पण त्याच्या कृतीला बघुण दुसरा शब्द मला सुचत नव्हता.. खाली लोक पाण्यात ओले होत मज्जा करत होते.. काय म्हणाव याला ?

त्या पाण्यात भिजत , तिथं बसुन लोक कणिस खात होते आणि अक्षरशः तिथच त्या पायर्‍यांवर फेकत होते..
एक तरूण.. जबरदस्तीने लोवेस्ट करण्यासाठी जमेल तेवढा सरकवलेला जीन्स , कुल टिशर्ट, तारे जमीन पर मधल्या आमिर सारखी हेअरस्टाईल करुन गॉगल लावुन भिंतीवर उभा राहुन पचापचा त्या पाण्यात थुंकतोय आणि खाली छोटे लेकरं त्याच पाण्यात डुंबत असताना हे चाल्लयं.. त्याला मी शिव्या मारल्यावर तो आणि इतरहि लोक निव्वळ बघे बनलेले होते.. कुठ हरवल्या यांच्या संवेदना ? मुर्ख आहेत का हे ? श्शी..

माझ लग्न झालेल नाही , ना ही एखाद्या २ महिन्याच्या लहान मुलाला वागवायचा मला अनुभव आहे तरीही माझ्यामते २ ते ३ महिन्याच बाळ फुलासारखं नाजुक असतं आणि त्याला तसच जपावसुद्धा लागतं.. पण तिथ एक तरुणी तिच्या तेवढ्याच बाळाला भर पावसात हाती गुंडाळून डोक्यावर छत्री सुद्धा न घेता तसच घेऊन त्या पायर्‍या चढत होती.. एखाद्याची हौस मान्य करता येते पण त्या छोट्या न बोलत्या जीवाचे काय हाल होत असणार अथवा होणार ते त्या माऊलीला तरी ठाऊक होते की नाही देव जाणो. भुशी डॅम चा तो सुंदर अनुभव घेऊन इतर कुठ फिरायची इच्छाच मरुन गेली. जाता जाता तेवढ कार्ल्याला गेलो तर तिथही तिच तर्‍हा.

पहिल्यांदा लोणावळा २०१० मधे बघीतला होता.. त्यानंतर डायरेक्ट आत्ता जाण्याचा मुहुर्त निघाला. कित्ती फरक पडला या ५ ६ वर्षात..पुर्ण बाजारीकरण झालय प्रत्येक ठिकाणाचं.. कार्ल्याच्या लेण्यांना देवळाचं स्वरुप आलयं. ना ही त्या लेण्या पहिल्याएवढ्या वैभवात राहिल्याय आणि शंका आहे की देवीच्या देवळाच देवत्व तरी शाबुत आहे कि नाही ? तरी बर हि बेभान तरुणाई देवीदेवतांची तेवढी भक्त नाही .. नाहीतर तिथल्या देवळातल्या भक्तीच्या कृतीला विकृतीची जोड लाभायला असा कितीसा वेळ लागणारे..
लिहण तितकस जमत नाही पण सांगण्यापासुन खरोखरच राहावल नाही..
मला नाही वाटत यापुढं कधी लोणावळा जायची हिम्मत होईल . Sad . आणखी एक सुंदर ठिकाण भेटीला पारख झालं ..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे कॅमेरे वगैरे प्रकरण कितीही उपयोगी असले तरी आपल्याकडे टिकणार नाही. आंबोलीला कावळेसाद पॉइन्टवर वीज नाहीय. तिथे सौरौर्जेवर चालणारे दिवे बसवले. आठवड्याभरात सगळे दिवे मुळापासुन गडप. काय मिळते हे करुन? जिथे गडप करता येत नाही तिथे ते शक्य तितके तोडफोड करुन टाकले जाते.

भारतियांची मानसिकताच नाही काहीही चांगले टिकवण्याची. आम्ही फक्त परदेशातले फोटो पाहायचे रस्ते आणि बागा फुलांनी बहरलेल्या. इथे सकाळी बाहेर पडावे तर रोडवर लावलेल्या तगरीची फुले तोडायचे काम आमचे जेष्ठ नागरिक करत असतात. सोबत पिशवी असते फुलांसाठी. धावत्या रस्त्याच्या मध्यभागी दोन फुट उंच रेलिंग आणि त्या रेलिंगच्या आत असलेल्या फुलांसाठी ही मंडळी त्या रेलिंगवर चढतात. मुलीला सोडायचा स्टेशनवर जातानाचे रोजचे हे दृष्य. आता ही म्हातारी खोडे चढताना रस्त्यावर उताणी पडली आणि एखादा दुर्दैवी गाडीवाला तिथुन ६० च्या स्पिडने आपली गाडी घेऊन जात असला तर तो काय करणार? गाडी हवेत उडवणार? आणि मग दुस-या दिवशी पेपरात बातमी ही की जेष्ठ नागरिकाला गाडीखाली चिरडले. तो जेष्ठ नागरिक तिथे काय करत होता हे क्कोणी विचारणार नाही.

असो, हेही खुपच विषयांतर झाले.

सगळ्या आठवणि फोटोतच काय त्या सेव्ह होतात. देवाने ज्ञानेंद्रिये दिली आहेत ती नुसती बटणे आहेत असे वागतात लोक. दिसेल त्या गोष्टी चा फ़ोटो काढत सुटतात. काया, वाचा, मने आनंद घेणे, अनुभवणे हे नाहीच.
एखादि अनुभवलेली सुरेख संध्याकाळ याचे वर्णन करणे नाहिच... नुसता फोटो दाखवणार...बघ काय ऑसम आहे ना! झाले संपले..++१०००००००००० दुर्दैवानेमच्याकदे आहेत असे महाभाग.

मैत्रेयी, यामुळे अशा ठिकाणी तिर्हाईतांचे, अनोळखी माणसांचे कुठूनही, कसेही फोटो काढण्याची न भूतो न भविष्यति अशी चढाओढ लागेल. सतत चोरून लपून राहावे लागेल. उदा. कोण जाणे, खाण्यासाठी तोंड उघडावे आणि कुणी फोटोत खेचून भलताच फोटोशॉप जॉब करून शेम शेम करेल. रोगापेक्षा इलाज भयंकर. पूर्ण अर्थ, उद्देश न समजता प्रत्येक नव्या गोष्टीचे खूळ बनवायचे वेड लागलेल्या आमच्या सोशल पिढीचे काहीही होऊ शकत नाही.

(कचरा अर्थातच जवळच्या पिशवीत आणि मग रस्त्यात दिसलेल्या कचरापेटीत). >> प्रिती विराज..वाचुन दिलासा वाटला<<<< टीना अग घरातुनच majhya yaa thinking varun vinod hotat kay bolnar Sad

आमच्याकडे पण कचरा, कचरा कुंडीत किंवा मी सरळ पिशवीत घालून घरी आणते आणि कचऱ्याच्या डब्यात टाकते.

डोंबिवलीत बऱ्याच ठिकाणी कचरा इथे तिथे पडलेला असतो. आम्ही त्यात आमच्याकडून भर पडणार नाही हा प्रयत्न करतो. बऱ्याचदा गाडीतून उतरून कचरा साफ करावा असंही वाटतं.

एक कॉमन हॅश टॅग जसे "#शेम शेम" किंवा "#पर्दा फाश" वापरून असले रस्त्यावर कचरा टाकणरे , असभ्य , आचरट वागणार्‍यांचे फोटो घेऊन पोस्ट करायचे, ते जास्तीत जास्त लोकांनी शेअर करून अशा लोकांना फेमस करून टाकायचे!! असंख्य लोकांच्या गर्दीत कुणीही आपल्या आचरट वागण्यचे फोटो घेऊन ते अशा पेज वर पब्लिश होऊ शकतात हे कळून लोकांमधे थोडा जरी अवेअरनेस आला तर उत्तमच.

>>>>>>>>

सेक्शुअल ओरिएंटेशनच्या धाग्यावर मी गूगलवरून चेहरे रंगवलेले फोटो टाकलेले तेव्हा मला समजले की असे परवानगी शिवाय इकडचे फोटो तिकडे टाकणे गुन्हा आहे,
तर मग असे कोणाचेही फोटो स्वत: काढून अपलोड करणे तर दस गुन्हा ठरेल.

ऊपाय नेहमी कायद्यात बसणाराच हवा.

फारच भाबडा विचार.
एका आठवड्यात कॅमेराच चोरिला जाणे किंवा मग असा एखदा प्रसंग घडल्यावर पुरावा म्हणून चेक करायला गेल्यावर कॅमेरा दुरुस्त नसल्याचे लक्षात येणे वगैरे बर्‍याच वेळा घडलेले आहे.

>>>>

जर प्रत्येक उपायात त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होईल का असा फाटा फुटला तर एकही ऊपाय आपल्या ईथे कामाचा ठरणार नाही. आणि आपले अच्छे दिन कधीच येणार नाही. बस्स सरकारे आणि कायदे बदलत राहतील.

सेक्शुअल ओरिएंटेशनच्या धाग्यावर मी गूगलवरून चेहरे रंगवलेले फोटो टाकलेले तेव्हा मला समजले की असे परवानगी शिवाय इकडचे फोटो तिकडे टाकणे गुन्हा आहे, >>
मला जर असे काही माझ्या कृतीबद्दल समजले असते तर,
लोकांची अक्कल काढत फिरण्याआधी,
मी ते फोटो काढुन टाकले असते.

असो.
जैसी जिसकी सोच(ऑर से. ओ.)

थोडक्यात कठीणे म्हणायचं सगळचं..
असुदेत.. आपण आपल्या पद्धतीने जमेल तस टिकवून ठेवायचा प्रयत्न करायचा.. लोकांना समजावण्याचा प्रयत्न करुन पाहायचा. मानलं तर ठिक नाही तर जाय माय लेका म्हणत जोरात नेक्श्ट म्हणुन सामोर जायच..
कामाला लागाव लागेल भरभर Happy

मी पस्तीस वर्षे पावसाळी फिरतोय .सुट्ट्यांच्या दिवशी कधीच जात नाही आणि काही अनवट ठिकाणी जातो."पळसदरी पावसात" हा लेख मागे इथे लिहिला आहे. भुशी डॅमला चालतच जातो पाउण तास लागतो.येतांना भुशि गावातील रिक्षाने (१०रु सीट ) परत .

भुशी डॅम सारख्या पाण्याच्या साठा अश्या पिकनिक मुळे किती प्रदुषीत होत असेल ?
तेच पाणी त्या गावाना देतात, अश्या ठिकाणी लोकांनी केलेल्या बीअरच्या बाटल्यांच्या काचांचा खच सहजा सहजी नाहीसा होणार नाही, अश्या प्रकारे आपलाच निसर्ग आपणच प्रदुषित करत आहोत ह्याच भान लोकांना नाही. पण कोणाला तरी सुरुवात करावीच लागेल !
शहरातील मॉल्स बंद व्हायच्या मार्गावर आहेत, लोकांना वीक-एंड साठी नविन नविन जागा उपलब्ध होणे गरजेच आहे पण अश्या स्थळांच विकसीत होण गरजेच आहे.

प्रत्येक गोष्ट सरकारनेच करावी अस नाही काही प्राईव्हेट इन्वेस्टर्स सुद्धा अशी डेव्हलोपमेंट करु शकतात,

सरकारच्या फतव्यांची वाट बघण्याऐवजी लोकांनीच काहीतरी ठोस पावले उच्लायला हवी.. आपला परिसर आपल्यापरिने आपणच स्वच्छ ठेवायला हवा.. वाट बघ्त बसु तोवर खुप काही घडून जाईल..

संदिप, काच हि अशी वस्तू आहे जिचे नैसर्गिक रित्या विघटन होऊच शकत नाही. त्यामूळे काचा तश्याच राहणार. त्यावर आघात होत राहिले तर फारतर त्याचे बारीक तूकडे / कण होतील. पण विघटन नाही. त्यामूळे पायाला जखमा करण्याचे काम ती करतच राहणार.

खालील उपाय करु शकता.
१. १५ औगस्ट, शनिवार- रविवार, २/३ जोडुन आलेल्या सुट्या या टाळंणे
२. भुशी डैम सारख्या ठिकांणांएवजी ट्रेकला जाणे - शकय झाले तर कारण सिनियर ना शक्य नाहि
३. काहि ठिकाणे अजुन चांगली आहेत - जसे लवासा रस्ता अजुन तरी फैमिली क्राउड असतो त्यातला त्यात असा अनुभव आहे.
४. रीसोर्ट ला जाणे - भुशी डैम सारख्या पब्लिक प्लेस ला जाण्याएवजी. जास्त पैसे गेले तरी लोक (क्राउड ) बरा असतो.

बाकि स्थानिक पब्लिक आणी पोलिसांनी/प्रशासनाने ठरवले तर गोष्टि सुधरु शकतात- उदाहरण म्हण्जे सिंहगड. बराच कंट्रोल आला आहे आता. दारु /नोन्वेज मिळत नाहि. फैमिली क्राउड असतो. रहाण्याची परवानगी बंद केली.

त्यामुळे दबाव निर्माण करणे महवाचे आहे. बरीच चांगली माणसे काम करित असतात. त्यांना सामील व्हा, मदत करा, सपोर्ट करा शक्य त्या मार्गाने.

शाळेत संस्कार करण्यावर भर देणे हाच प्रभावी उपाय

मूळ वृत्तीमध्ये जर शिस्त नसेल तर कायदे नियम शिक्षा यांनी फरक पडण्याची शक्यता फार कमी. संस्कार करण्यासाठी घरचे जबाबदार कि शाळा यावरून पूर्वी एकदा मोठा वादविवाद झडला होता.

मला सातत्याने असे वाटत आले आहे कि शाळेत या विषयांवर जास्त भर द्यायला हवा. आयुष्यात पदोपदी उपयोगी होईल असे शिक्षण हवे. समाजात कसे वागावे, इतरांना त्रास होईल असे वागणे कसे चुकीचे आहे, आत्मसन्मान म्हणजे स्वत: बरोबर इतरांचाही आदर करायला शिकणे इत्यादी गोष्टींवर शाळेतच ब्रेन वॉशिंग होणे खूप गरजेचे आहे. एकवेळ दाब तापमान आणि पदार्थाची अवस्था ह्यातील संबंध कळले नाही तरी चालेल, हायड्रोजन पेरोक्साईड ची संज्ञा पाठ नसली तरी काही फरक पडत नाही, वर्गसमीकरण सोडवता नाही आली तरी काही हरकत नाही, पानिपतचे युद्ध कोणत्या साली झाले हे माहित नसले तरी काही आभाळ कोसळत नाही. पण आयुष्यातली गणिते सोडवायची अक्कल येणे महत्वाचे आहे. समाजाशी केमिस्ट्री जुळणे आवश्यक आहे. व्यक्तिमत्व विकास या विषयाला शाळेत आजकाल शून्य महत्व आहे. वैचारिक परिपक्वता, सामाजिक भान, जबाबदारी, इंटिग्रीटी, जगण्याची गुणवत्ता या गोष्टी मुलांच्या मनावर बिंबवल्या तर रस्त्यावर थुंकण्यापासून जोरजोरात आवाज करून (दिवाळी असो किंवा गणेशोत्सव किंवा लग्न किंवा पर्यटन स्थळ) इतरांना त्रास देणे या सगळ्या बाबत प्रत्येकाच्या मनात जागरूकता निर्माण होईल.

लहान वयात यावर परिणामकारक संस्कार झाले तर पुढच्या पिढ्यातील कुणाला असे विषन्न करणारे अनुभव येणार नाहीत असे माझे स्पष्ट मत आहे.

सोबत पिशवी असते फुलांसाठी.>>>>>>>>>>.
साधना या पिशवीसोबत काही ज्ये.ना. कडे तारेची आकडी असते. सर्व आयुधानिशी सज्ज!

हायड्रोजन पेरोक्साईड ची संज्ञा पाठ नसली तरी काही फरक पडत नाही, वर्गसमीकरण सोडवता नाही आली तरी काही हरकत नाही, पानिपतचे युद्ध कोणत्या साली झाले हे माहित नसले तरी काही आभाळ कोसळत नाही. >> यातील रोख समजला व कळाला. पण हे दोन्ही बरोबरीने शिकवू देत की. इतिहासाच्या बाबतीत तर इतिहास काय होता यापेक्षा आजकाल कशाला इतिहास म्हणावे हे शिकवण्याची जास्त गरज आहे. आपण वाचलेले एकमेव पुस्तक, आपल्याच सारख्या विचाराच्या लोकांनी ठोकून दिलेल्या गोष्टी, आपल्याला आलेले सोशल नेटवर्क वरचे मेसेज म्हणजेच इतिहास आहे समजून जिकडे तिकडे 'गर्व' दाखवत फिरणारे ग्रूप आणि अशा ठिकाणी दंगा करणारे ग्रूप बहुधा बरेचसे तेच असतील Happy

सहसा असे दिसते की साधारण ७-८वी पर्यंत मुले/मुली नियम पाळणे हे स्वाभाविक पणे करतात, पालकांनाही आठवण करून देतात. नंतर काय होते माहीत नाही :). त्यामुळे शाळाबाह्य गोष्टींचा प्रभाव असावा.

soha,

>> असं सगळं असतानाही भारतीय लोकांना घाईघाईने विमानात का चढायचं असतं, हे मला आजतागायत
>> कळलेलं नाही.

भारतीयांकडे स्वीयनग (=केबिन लगेज) बरेच ऐसपैस असतात. त्यामुळे अधांतरी खणांची (=ओव्हरहेड लॉकर्स) जागा पटकावायला ते घाई करतात.

आ.न.,
-गा.पै.

atuldpatil,

तुमच्याशी सहमत. विशेषत: या विधानाशी तर खूपच सहमत :

>> लहान वयात यावर परिणामकारक संस्कार झाले तर पुढच्या पिढ्यातील कुणाला असे विषन्न करणारे अनुभव येणार
>> नाहीत असे माझे स्पष्ट मत आहे.

लहान मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून हे एक संकेतस्थळ आहे : http://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/

आ.न.,
-गा.पै.

>>>हायड्रोजन पेरोक्साईड ची संज्ञा पाठ नसली तरी काही फरक पडत नाही, वर्गसमीकरण सोडवता नाही आली तरी काही हरकत नाही, पानिपतचे युद्ध कोणत्या साली झाले हे माहित नसले तरी काही आभाळ कोसळत नाही. >> यातील रोख समजला व कळाला. पण हे दोन्ही बरोबरीने शिकवू देत की.

गरज नाही असे वाटते. रसायन गणित इत्यादी अनेक विषयात मुलांच्या डोक्यात विनाकारण ज्यादाची घुसडगिरी सुरु आहे. पुढच्या आयुष्यात त्यातल्या किती गोष्टी उपयोगाला येतात? त्यातील केवळ मुलभूत गोष्टी शिकवून (३०%) जास्त भर जीवनाभिमुख शिक्षणावर (७०%) दिल्यास जास्त उपयोग होईल. अहो एकदा वैचारिक पाया पक्का झाला आणि आवड कशात आहे ते कळले कि त्या विषयातील तपशीलवार अभ्यास पुढे ती व्यक्ती आपणच करते. पंचवीस तीस वर्षापूर्वी शाळेत असताना संगणक किती जणांना माहित होते? पण त्या पिढीतील कित्येकांनी त्यात चांगले करियर केलेच ना? असो. थोडे विषयांतर झाले. पण सार्वजनिक ठिकाणी दंगा घाण करून उपद्रव करणाऱ्याना लहानपणी "ते चुकीचे आहे" असे संस्कार झालेले नसतात. ते करणे महत्वाचे असा माझा मुद्दा. सातवी आठवीनंतर मुले कोणत्याही कारणाने वाम मार्गाला लागत असतील तरी तो सुद्धा शाळेतील संस्कार कमी पडल्याचाच तर परिणाम नाही का?

लहान वयात यावर परिणामकारक संस्कार झाले तर पुढच्या पिढ्यातील कुणाला असे विषन्न करणारे अनुभव येणार नाहीत असे माझे स्पष्ट मत आहे. >> सहमत
परंतु
शाळेत संस्कार करण्यावर भर देणे हाच प्रभावी उपाय >> या वाक्याशी असहमत..
मुळात ७वी ८वी नंतर मुलांना मित्रमैत्रीणी जास्त जवळचे होतात पण त्यापुर्वी जरी शाळा हि त्यांच्या जडणघडणीत महत्वाचा रोल निभावत असेल तरीही घरचे संस्कार जास्त महत्वाचे..
लहानपणापासुनच आईवडील हे मुलांसाठी प्रत्येक गोष्टीत रोल मॉडेल असतात..ते कसे वागतात, कसे बोलतात, समोर उभ्या असलेल्या प्रश्नांचा गुंता कसे सोडवतात त्याचप्रमाणे ते इतरांबद्दल काय आणि कसा विचार करतात हे जसच्या तस मुल अंगिकारत असतात.. माझी आई, माझे बाबा हा भाव त्यावेळी खुप मोठ्या प्रमाणात असतो.. त्यानंतर इतर लोक येतात.. म्हणुन जसे आईवडील मुलांसमोर वागतील तसे मुल इतरांसोबत वागतील..

म्हणुन घरी संस्कार करण्यावर भर देणे हा जास्त प्रभावी उपाय

<<<<< असं सगळं असतानाही भारतीय लोकांना घाईघाईने विमानात का चढायचं असतं, हे मला आजतागायत कळलेलं नाही. >>>>>>>>>

भारतीय लोकांना विमानत चढायची घाई असते, विमान धावपट्टीवर उतरनाच सीट बेल्ट काढायला ललागतात,विमान थांबायच्या अगोदर उभे राहुन ओव्हर हेड लॉकर्स उघडुन बॅगा काढायचा प्रयत्न करतात,

विमानात फुकट मिळणार्या दारुसाठी लाज सोडुन एअर होस्टेसच्या मागे लागतात. अगदी सोमालीयातुन आलेले लोक सुद्धा एखाद्या ब्रेडच्या तुकड्यासाठी इतके आणी असे वागणार नाहीत. विमान चालु झाल्यावरही मोबाईलवर बोलणे वैगेरे नेहेमीचेच असते . ह्याच कारणाने परदेशातील विमानातील एअर होस्टेस इंडीयन पॅसेंजर्सची सर्वां समोर लाज काढतात.

लहान मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून हे एक संकेतस्थळ आहे : http://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/>>>>>

या विषयाला धार्मिक रंग देण्याची गरज आहे ???

यातील रोख समजला व कळाला. पण हे दोन्ही बरोबरीने शिकवू देत की. इतिहासाच्या बाबतीत तर इतिहास काय होता यापेक्षा आजकाल कशाला इतिहास म्हणावे हे शिकवण्याची जास्त गरज आहे. आपण वाचलेले एकमेव पुस्तक, आपल्याच सारख्या विचाराच्या लोकांनी ठोकून दिलेल्या गोष्टी, आपल्याला आलेले सोशल नेटवर्क वरचे मेसेज म्हणजेच इतिहास आहे समजून जिकडे तिकडे 'गर्व' दाखवत फिरणारे ग्रूप आणि अशा ठिकाणी दंगा करणारे ग्रूप बहुधा बरेचसे तेच असतील स्मित
<<
Very aptly put and true, sir.
Hats off to that.

सहसा असे दिसते की साधारण ७-८वी पर्यंत मुले/मुली नियम पाळणे हे स्वाभाविक पणे करतात, पालकांनाही आठवण करून देतात. नंतर काय होते माहीत नाही स्मित. त्यामुळे शाळाबाह्य गोष्टींचा प्रभाव असावा.
<<
१३-१४वे वर्ष टीनेजर उर्फ पौगंडावस्था असते. इथून बंडखोरीस सुरुवात होते. नियम मोडून पाहण्याची एक आंतरिक उर्मी निर्माण होते. हे प्रगतीसाठी व उत्क्रांतीसाठीही गरजेचे आहे.

रॉबीनहूड | 5 July, 2015 - 14:41 नवीन
आताच भुशी डॅमवर दोन तरुण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त टीव्हीवर पाहिले. आनन्द वाटला.
<<

मलाही फार आनंद वाटला,
भारतातील सर्व बेशिस्त लोकांना अशीच शिक्षा मिळायला हवी निसर्गाचा योग्य तो सन्मान न राखल्या बद्दल.

Pages