अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सूनटून्याने लिहीले आहे ते बरोबर आहे. बहुतेक शासकीय कर्मचारी अश्या प्रकारे पुढील शिक्षण दूरस्थः शिक्षण पध्दतीने पुर्ण करतात.

सूनटून्या,

माहितीसाठी धन्यवाद. सुरवातीपासून प्रायव्हेट सर्विसमध्ये असल्याने याची कल्पना नव्हती.

मिर्ची , तुम्हाला बुक क्रिकेट नावाचा गेम माहित्येय का?
एक जाडजूड पुस्तक घ्यायचं आणि रँडमली पाने उघडायची.
प्रत्येक पानक्रमांकाची शेवटची संख्या असतील तेवढ्या धावा.

तर आम्ही काय करतो, एकेक खासदाराचे नाव मनात धरतो आणि कायद्याचे पुस्तक तीन चारदा रँडमली उघडतो.
जी जी कलमे येतील ती ती त्या खासदाराला लावता येतील अशी एक स्टोरी क्रिएट करतो.

मिर्ची,

जितेंद्र तोमरना कोर्टाने पोलिस कस्टडी का दिली आणि अवध युनिव्हर्सिटीने तोमर यांची डिग्री खोटी आहे असं का सांगितलं हे जरा सांगता काय?

सोमनाथ भारतींच्या पत्नीने मिडीयामध्ये त्यांच्याविरुद्ध दिलेल्या वक्तव्याबद्दल काय? चक्क व्हिडीओवर बोलली बरं का ती!

आणि त्या कमांडो सुरेंद्र सिंगच्या डिग्रीचीही भानगड काय निघाली बुवा? आर टी आय मध्येच निघालं आहे ते पण.

जरा सांगता का सगळं तपशीलवार?

.

१. जितेंद्र तोमरची खूप उलट-सुलट गुंतागुंत दिसते आहे. लिहायचं मनात आहे. पण फेब्रुवारीपासून वाचलेलं आठवून, शोधून सुसूत्रपणे लिहायचा कंटाळा येतो आहे. तरी बघते जमलं तर आज-उद्यात.

२. सोमनाथ भारतींचं असं म्हणणं आहे की "माझ्या पत्नीवर आणि मुलांवर माझं खूप प्रेम असलं तरी तिचे आणि माझे मतभेद आहेत. ती मला माझ्या आईला सोडून दे असं सांगत आहे आणि राजकारणातूनही बाहेर पडायला सांगत आहे. मी माझ्या आईला ह्या वयात कुठेही सोडून देऊ शकत नाही."

"I m in kerala 4 party work n shocked 2 learn 4m TV abt wife's complaint. Deeply pained 2 know that my wife hs gone public w family matter."
"Allegations of domestic violence if any are baseless n inconceivable. I love my wife n my little children. I urge media 2 respect my privacy"
"I love my wife but her demands that I should leave serving my mother and motherland are not acceptable. She reacted with a false complaint."

इथे सविस्तर बातमी वाचता येईल.

असंही वाचलं की ते दोघं आत्ताही वेगळं राहत आहेत. ते मालवीयनगरमध्ये आणि ती द्वारकामध्ये राहते. मग मारहाण कशी होते आहे? मारहाण झाली तर पोलिस ठाण्यात गुन्हा का नाही नोंदवला? वैद्यकीय तपासणी का नाही केली? ५ वर्षांत आत्ताच अचानक तक्रार का आली? असे अनेक प्रश्न उठतात.
मला माहीत नाही कोण खरं बोलत आहे आणि कोण खोटं. पण दिल्लीतील महिलाआयोगाचा इतिहास मुळीच विश्वासार्ह नाही. वेळ मिळाला तर नंतर एक दोन उदाहरणे सविस्तर लिहीन.

३. सुरेंद्र सिंगविरुद्ध भाजपाच्या नेत्याने उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयाने सुरेंद्र सिंगची बाजू मांदायला ४ आठवड्याचा वेळ दिला आहे. सुरेंद्र सिंग खात्रिशीरपणे सांगत आहेत की "माझी डिग्री खरी आहे. मी सगळे पुरावे कोर्टात सादर करीन."
न्यायालयाची प्रक्रिया पूर्ण़ होईपर्यंत आपण थांबायला हवं.

सुरेंद्र सिंगबद्दल थोडं -
"He was earlier an Indian Army commando, from one of its oldest infantry regiments, The Grenadiers. He took part in the Kargil War, Operation Parakram, Operation Sadbhavna and Operation Black Thunder and was part of the UN mission in Congo. He lost his hearing while countering the 2008 Mumbai attacks, when he shot two of the attackers. "

ह्या पराक्रमी इतिहासामुळे त्यांना खोटी कागदपत्रे देणं माफ आहे असं मुळीच नाही. आरोप खरा असेल तर कायदा सर्वांना सारखाच असायला हवा.
पण सध्या चालू असलेलं आरोपसत्र आणि व्यक्ती ह्यांचा अजिबात मेळ जमत नाहीये.

भाजपाची आज पुन्हा केजरीवालांच्या घरासमोर निदर्शने चालू आहेत. 'धरनाकुमार' म्हणून अकेंची खिल्ली उडवता-उडवता भाजपाने काय अवस्था करून घेतली स्वतःची !

असो. आता संध्याकाळी.

असंही वाचलं की ते दोघं आत्ताही वेगळं राहत आहेत. ते मालवीयनगरमध्ये आणि ती द्वारकामध्ये राहते. मग मारहाण कशी होते आहे? मारहाण झाली तर पोलिस ठाण्यात गुन्हा का नाही नोंदवला? वैद्यकीय तपासणी का नाही केली? ५ वर्षांत आत्ताच अचानक तक्रार का आली? असे अनेक प्रश्न उठतात.
मला माहीत नाही कोण खरं बोलत आहे आणि कोण खोटं. पण दिल्लीतील महिलाआयोगाचा इतिहास मुळीच विश्वासार्ह नाही. वेळ मिळाला तर नंतर एक दोन उदाहरणे सविस्तर लिहीन.>> you are defending Somanth Bharti. This is shocking.This man is insensetive towards ladies. Kejriwal should sack this man. Rest BJP tamasha is entertaining.:-)

मिर्ची | 11 June, 2015 - 13:12 >>>>> तुमच्या कडून अशी एक पोस्ट येणार हे माहितच होतं. चालूद्या.

पण पोस्ट लिहीताना सुध्दा मागच्या पानावर जी सुचना अ‍ॅडमिनने केली आहे त्याकडे तुमचे दुर्लक्ष झाल्यासारखे वाटते. Wink

जरा सांगता का सगळं तपशीलवार?>>>>या प्रश्नांमुळे तपशीलवार सांगत बसायला लागल.व्हय ना मिर्ची तै?

२. सोमनाथ भारतींचं असं म्हणणं आहे की "माझ्या पत्नीवर आणि मुलांवर माझं खूप प्रेम असलं तरी तिचे आणि माझे मतभेद आहेत. ती मला माझ्या आईला सोडून दे असं सांगत आहे आणि राजकारणातूनही बाहेर पडायला सांगत आहे. मी माझ्या आईला ह्या वयात कुठेही सोडून देऊ शकत नाही."
<<
<<
हे काय स्पष्टीकरण झाल, पत्निला बेदम मारहाणीच....
हे सोमनाथ भारतीं तेच ना ज्यांनी मागच्या सरकार मध्ये असताना, छापा टाकण्याच्या नावावर काही विदेशी महीलांबरोबर गैरवर्तन केले होते.

स्मृती इराणी यांनी देखील शिक्षणाची माहीती देताना गोंधळ घातलेला आहे. त्यांच्या विरुध्द कारवाई कधी होणार आहे कृपया तपशीलवार सांगण्यात यावे.

धन्यवाद

विकु म्हणतातंत तसं मोदी आणि अमित शाह हे केजरीवालांचा 'संजय जोशी' करण्याच्या मागे असावेत असं दिसंतय. संजय जोशी हरेन पंड्यांच्या तुलनेत सुदैवीच म्हणावेत.

महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध कोर्टात जाण्याचा इशारा माजी सनदी अधिकारी अरुण भाटीया यांनी दिला आहे.

सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे.
<<
>>

हे वरच जे धाग्याच्या हेडरमध्ये लिहील्याप्रमाणे
कदाचीत असल्या खोट्या डिग्री आणि सर्टीफिकेटस् घेऊनच आप मधील सर्व नेते जास्त शिक्षित झाले असावेत

त्या हिंदुस्थान टाईम्स मधला त्या आपच्या आमदाराचा/माजी मंत्र्याचा फोटो बघून कसेसेच वाटले.
पोलीस एकाद्या सराईत गुन्हेगारासारखी या शहरातुन त्या शहरात वरात काढतायत बिचार्‍याची.

<< you are defending Somanth Bharti. This is shocking.>>

नो, आय अ‍ॅम नॉट. त्यांनी पत्नीला मारहाण केली आहे आणि त्या मारहाणीचं मी समर्थन करत आहे असं असेल तर तुम्ही म्हणताय ते मान्य आहे.
तुम्ही सोमनाथ भारतींच्या विधानांवर विश्वास ठेवत नाही आहात पण त्यांच्या पत्नीच्या विधानांवर मात्र कसलीही शंका न घेता लगेच विश्वास ठेवत आहात असं का?
बायका खोटं बोलूच शकत नाहीत, डोमेस्टिक व्हायोलन्स कायद्याचा कधी गैरवापर होतच नाही वगैरे मला मान्य नाही. Happy

<< This man is insensetive towards ladies.>>

असा निष्कर्ष कशावरून काढलात?
काही ठोस निरीक्षणं असतील तर लिंक द्या. माझ्या माहितीत भर पडेल.

<<हे सोमनाथ भारतीं तेच ना ज्यांनी मागच्या सरकार मध्ये असताना, छापा टाकण्याच्या नावावर काही विदेशी महीलांबरोबर गैरवर्तन केले होते.>>

म्हणजे काय केलं होतं? पुरावा द्या. ह्या विषयावर पहिल्या धाग्यावर भरपूर चर्चा झालेली आहे.

हायला, हे तोमर प्रकरण फारच झोलझाल दिसतंय.
युनिव्हर्सिटी अजूनही 'तो इथे शिकला नाही' म्हणते आहे तर कॉलेज मात्र 'तो आमच्याइथे शिकला आणि पास झाला' असं अजूनही म्हणतंय.
कॉलेजच्या प्रिन्सिपलचं म्हणणं आहे की विद्यापीठाने आमच्याकडे पाठवलेल्या टॅब्युलेशन रजिस्टरची कॉपी आम्ही सांभाळून ठेवली आहे. त्यात तोमरसोबत अजून १००० विद्यार्थ्यांचंही रेकॉर्ड आहे. आता ते रजिस्टर विद्यापीठातून मात्र गायब आहे. तोमरला घेऊन जायच्या आधी दिल्ली पोलिस कॉलेज आणि विद्यापीठाला भेटून सर्व कागदपत्रे जमा करून घेऊन गेले होते असं प्रिन्सिपलचं म्हणणं आहे Uhoh

एकतर पोलिसांच्या बाजूने काहीतरी मोठ्ठं गौडबंगाल आहे नाहीतर तोमरने प्रचंड धूर्तपणे कॉलेजलासुद्धा मॅनेज केलंय.
केजरीवालांनी सरळ तोमरला बाहेरचा रस्ता दाखवावा.

भाजपाच्या अखत्यारित असलेल्या नगरनिगमने दिल्लीमध्ये स्वच्छतेची पूर्ण वाट लावली आहे. मोदींच्या स्वच्छता-अभियानामध्ये दिल्ली येत नाही का?

भाजपाचं नगरनिगम ---- पगार मिळाले नाही की केजरीवालांच्या घरासमोर निदर्शने
भाजपाचं नगरनिगम ---- लाच घेताना दिल्ली एसीबीने पकडलं की ''ह्यँ?? आम्ही दिल्लीसरकारच्या अखत्यारित येत नाही. तुम्ही आम्हाला पकडू शकत नाही"

दुतोंडीपणाचा कळस.

तीन महिन्यात दिल्लीसरकारच्या टॅक्स कलेक्शनमध्ये ३८% ने वाढ झाली. सुमारे ८५० कोटी जास्त टॅक्स जमा झाला. तोसुद्धा विकासकामासाठी सुखाने वापरू देणार नाहीत हे नगरनिगमवाले. Angry

भाजपाचं नगरनिगम ---- पगार मिळाले नाही की केजरीवालांच्या घरासमोर निदर्शने>> Govt has to pay to Muncipality & Kejriwal has promised to pay them. So this is correct.

असा निष्कर्ष कशावरून काढलात?
काही ठोस निरीक्षणं असतील तर लिंक द्या. माझ्या माहितीत भर पडेल.

>> Pl check the way he foreced Nigerian women to do Urine test. It was horrible & that time he was minister.

Please don't become blind follower of AAP. What is wrong is wrong. Tomar, Somanth Bharti, Rakhi Bidla, Kumar Vishwas etc will cause more damage to AAP. Unfortunately Kejriwal removed good people like Yogendra Yadav, Prashant Bhushan and kept this lot.

BTW overall people of Delhi are happy with Kejriwal Govt. (including me :-))

BTW overall people of Delhi are happy with Kejriwal Govt. (including me स्मित) >> Happy

Delhi Government Releases Salaries of Sanitation Workers, Arvind Kejriwal Blames Centre for Delay

http://www.ndtv.com/india-news/delhi-government-releases-salaries-of-mcd...

दिल्ली नगर निगमच्या कर्मचार्यांच्या दहा दिवसांच्या निदर्शनानंतर अरविंद केजरीवालांनी एप्रिल महीन्याचा पगार दिला !!

केंद्राच्या अधिकारातील निगमच्या कर्मचार्यांना दिल्ली सरकार पगार कसा काय देऊ शकते ?
पगार द्यायला त्या कर्मचार्यांची पगाराची माहीती (फाईल) ही राज्य सरकारकडे उपलब्ध असावी लागते,
जर आता पर्यत केंद्र सरकार पगार देत होती मग अचानक त्या कर्मचार्यांना दिल्ली सरकार पगार देऊ शकते ?

असले प्रश्न विचारु नका.

रुल नंबर १ केजरीवाल कधीही चुकीच वागत नाहीत

रुल नंबर २ केजरीवाल काहीही करु शकतात.

दुसर्‍या रुल समजला नसेल तर पहिला रुल परत वाचा.

++++++++++++ एकतर पोलिसांच्या बाजूने काहीतरी मोठ्ठं गौडबंगाल आहे नाहीतर तोमरने प्रचंड धूर्तपणे कॉलेजलासुद्धा मॅनेज केलंय. केजरीवालांनी सरळ तोमरला बाहेरचा रस्ता दाखवावा. ++++++++++++

" आता पर्यंत तोमरला बाहेरचा रस्ता दाखवला नाही याचा अर्थ तोमरने केजरीवाललाही मॅनेज केलेले आहे असा होतो का ? "

तोमरच जगजाहिर झालेच आहे.हे कोण बोलणार

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांची येल विद्यापीठाची पदवी वादग्रस्त आहे किंवा त्यांच्या खात्याचे राज्यमंत्री रामशंकर कथेरिया यांचेही पदवी प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप आहे. त्यामुळे, इतरांवर शिंतोडे उडवून स्वतःच्या शुभ्रतेची चमक दाखवण्याआधी भाजपने माजघरात डोकावणे इष्ट ठरले असते. केंद्राच्या सत्तेपुढे केजरीवाल म्हणजे हिंदकेसरीसमोर जत्रेतील पैलवानासारखे आहेत. अशावेळी आक्रमण करण्याऐवजी धीराने मुकाबला करणे फायद्याचे असते. परंतु क्रांती करायला निघालेल्या केजरीवालांकडून तशी अपेक्षा गैरलागू ठरते. सगळ्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्नात केजरीवाल आणि केंद्र सरकार या दोघांकडूनही नैतिकता वेशीवर टांगली जात आहे.

वरची लिंक

Pages