अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केजरीवालांनी आशिष जोशींना तंबाखू खाण्याच्या आरोपावरून काढलं होतं अशा बातम्या होत्या. त्याबाबत दिल्लीसरकारचं स्प्ष्टीकरण इथे वाचता येईल.
तर आता ह्या आशिष जोशींनी अकेंच्या सचिवावर भ्रष्टाचाराचे आरोप करून दिल्ली एसीबीला ह्याचा तपास करायला सांगितला आहे. अ बिग अ‍ॅण्ड गुड थिंग. त्यामुळे दिल्ली एसीबी अधिकार्‍यांचा तपास करू शकत नाही हा उपराज्यपालांचा हट्ट मोडीत निघेल आणि सीएनजी फिटनेस घोटाळ्यात अडकलेल्या बाबुंच्या चौकशीतील अडसरसुद्धा दूर होईल.
कारण ए के मीणांना जंगांनीच एसीबीमध्ये नसलेलं खास पद तयार करून नियुक्त केलं आहे. सेल्फ गोल??

आणि आरोप खरे असतील तरी उत्तमच. आणखी एक भ्रष्ट मासा जाळ्यात आला. तपास करून कारवाई करा.

आम आदमी पार्टी पर शिकंजा कसने की तैयारी में दिल्ली पुलिस
सरळ आणीबाणी जाहीर करून टाका दिल्लीत. सगळ्या आमदार, मंत्री, मुख्यमंत्र्यांची धरपकड करून तुरूंगात डांबा. नाहीतर मग आहेच खास गुजरात मॉडेलचं अमोघ ब्रह्मास्त्र. टाका वापरून एकगठ्ठा. कटकट जाईल एकदाची.

अंजली दमानियांनी दाखल केलेल्या जनहितयाचिकेमुळे मुंबई उच्च न्यायालयाने एसीबीला आदेश देऊन छगन भुजबळांना हैराण केलंय. त्यामुळे त्यांचे लोकही चिडलेले असतीलच.
"In the wake of a PIL filed by AAP activist Anjali Damania, the Bombay high court had asked the ACB to form a special investigation team to probe charges against Bhujbal and his family members."

भाजपा फक्त सत्तेत नसतानाच आरोप करते हे इतक्यांदा दिसलं असूनही छगन भुजबळांचा तपास भाजपाच्या किरीट सोमैय्यांनी सुरू करायला लावला असं मानणार्‍या 'मोदकां'ना त्रिवार मुजरा.

+++++++++++जनहितयाचिकेमुळे मुंबई उच्च न्यायालयाने एसीबीला आदेश देऊन छगन भुजबळांना हैराण केलंय ++++++++++++

भुजबळां साठी ईतका कळावळा ? असा कळवळा असणे पण आम आदमी असण्याचा क्रायटेरीया आहे काय ?

श्री,
मला पडलेल्या प्रश्नांसाठी तुमच्याकडे उत्तरं नसतील तर तुमचा प्रणिपात मी स्वीकारू शकत नाही Happy

सत्तारभाई, आप रहने दो Proud
उच्च न्यायालयात भुजबळांविरुद्ध PIL अंजली दमानियांनी टाकली होती हे वाचूनही तुम्हाला असे प्रश्न पडत आहेत ह्यातच सगळं काही आलं.

मिर्ची,

लिपिका भारतीची पत्रकार परिषद ती खोटी कारण तिने सोमनाथ भारतीचे कारनामे जगजाहीर केले आणि प्रिती तोमर बोलते ते सगळं खरं कसं काय हो?

आपल्याला सोईस्कर तेवढं बरोबर आणि जे सोईस्कर नाही तेवढं लगेच चुकीचं हा उघड-उघड दुटप्पी पणा आहे.

बाय द वे,

अंजली दमानिया बाईंचं कोणाला नावही माहीत नव्हतं तेव्हापासून किरीट सोमय्या भुजबळांच्या संपत्तीविषयी पाठपुरावा करत आहेत, तेव्हा सगळ्याचं क्रेडीट आम आदमी पार्टीसाठी ढापण्याचा प्रयत्न करु नका.

तोमरलाअ राजीनाम द्य्ययला लावला आहे.
सुषमा स्वराज, वसुंधरा राजे, निहालचंद , इराणी कधी राजीनामा देणार ??
वसुंधरा राजेंनी तर देशद्रोह केला आहे असा आरोप आणी पुरावा दिला आहे.
भक्त कधी जागे होणार ?

Leave Tomar,Bharti episode behind and look forward. I don't understand why people are defending him when AK is also not commenting on this. Also the sistution in Delhi is not so bad as propogated by you Happy

मिर्ची, तुम्ही वर दिलेली आणीबाणी संदर्भातील लिंक उघडत नाही. पण हीच का ती बातमी?

२१ आप आमदारांवर लवकरच चार्जशीट

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/21-aap-mlas-have-criminal-...

<<लिपिका भारतीची पत्रकार परिषद ती खोटी कारण तिने सोमनाथ भारतीचे कारनामे जगजाहीर केले आणि प्रिती तोमर बोलते ते सगळं खरं कसं काय हो? >>

देशमुखभौ, आता हाच प्रश्न उलट विचारून बघा.

मी तोमरला डिफेण्ड करत नाहीये. डिग्री खोटी असेल तर लगेच पक्षातून हाकलून लावा हा माझा पहिल्या दिवसाचा स्टॅण्ड आजही तसाच आहे. मी अपडेटस लिहीत आहे किंवा शंका मांडत आहे ते त्यांना दिल्या जाणार्‍या सिलेक्टिव वागणुकीबद्दल. स्मृती इराणीला अटक झाली का? बबन लोणीकरांना अटक झाली का? छगन भुजबळांना अटक झाली का?
कायदा सर्वांसाठी सारखा असतो. तसा तो वापरला जात नसेल तर आपापल्या कुवतीप्रमाणे निषेध नोंदवणं किंवा आवाज उठवणं एवढं तरी आपण नक्कीच करू शकतो.

आणि शक्य झालं तर उरलेल्या ३ प्रश्नांबद्दलही तुमचं मत व्यक्त करा. काहीतरी मत असेलच ना तुमचं? बाजूने किंवा विरोधी?

किरीट सोमैय्यांनी २०१२ मध्ये छगन भुजबळांबद्दल CAG कडे तक्रार केली होती. इथे वाचता येईल.
(लिंकायण वाचायला आवडत नसेल तर उघडू नका.)
त्यानंतर निवडणूक प्रचाराच्या वेळीही ह्या मुद्द्याचा भाजपाकडून पाठपुरावा केला गेला. मात्र सत्तेत आल्यावर सगळं प्रकरण गुलदस्त्यात गेलं. त्यामागे सरकार स्थापन करायला NCP चा पाठिंबा घ्यावा लागण्याची शक्यता, मोदींची पवारांसोबत झालेली व्हॅलेंटाइन डेची भेट अशी अनेक कारणे असू शकतील.
अंजली दमानियांनी मुंबई उच्च न्यायालयात PIL दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने SIT बनवण्याचे आदेश दिले आणि पुढच्या हालचाली घडल्या. भुजबळांच्या खोट्या डिग्रीबद्दलची FIR, पंकज भुजबळ, समीर भुजबळ ह्यांच्यावरच्या FIR सुद्धा अंजली दमानियांनी करवल्या आहेत.
ह्यात श्रेय 'ढापण्याचा' संबंध कुठे आला??
असो. किरीट सोमैय्या सत्तेत आहेत. त्यांनी पुढच्या तपासात अडथळे येणार नाहीत आणि दोषींना योग्य ती शिक्षा होईल एवढं केलं तरीसुद्धा खूप चांगलं होईल. भ्रष्टाचार थांबणं गरजेचं आहे, कोणी थांबवला ह्याला माझ्या दृष्टीने फार महत्व नाही.

<<मिर्ची, तुम्ही वर दिलेली आणीबाणी संदर्भातील लिंक उघडत नाही. पण हीच का ती बातमी?
२१ आप आमदारांवर लवकरच चार्जशीट>>

होय माने. हीच ती बातमी. पण मी दिलेल्या लिंकवरून बातमी उडवलेली दिसतेय. 404 not found Uhoh
६७ वजा २१ = ४६
२१ च्या २१ तुरुंगात गेले तरी सरकार पडणार नाही. Thanks to Delhi people. आता काय बरं करतील दिल्लीपोलिस??

<< Leave Tomar,Bharti episode behind and look forward. I don't understand why people are defending him when AK is also not commenting on this. Also the sistution in Delhi is not so bad as propogated by you >>

अकेने मागेच जाहीर केलंय - "सरकारच्या कामकाजासंबंधी कुठल्याही प्रश्नांना उत्तरे देईन. पण वैयक्तिक चिखलफेकीवर प्रतिक्रिया देणार नाही. मिडिया अपना काम करती रहें. आखिर उनकी टीआरपी का सवाल है''

मीसुद्धा बर्‍याचदा ठरवते असंच. पण तरी लिहिलं जातं. रिकामा वेळ, दुसरं काय? Wink

आशुतोषचं ट्वीट ---- "My name is missing in the list of people to be arrested by Delhi police.Many cases Ag me also.Feeling left out and unimportant." Proud

दिल्लीसरकारने वीजकंपन्यांना विभागानुसार पॉवरकटसचं वेळापत्रक बनवून ऑनलाइन टाकायला सांगितलं आहे. सलग दोन तासांपेक्षा जास्त वेळ वीज बंद केली तर कंपन्यांकडून दंड वसूल केला जाणार.
NBT Dilli ‏@NBTDilli 3h3 hours ago
Power Cut : DISCOMS will directly pay the fine to consumers. First one hour Rs 50 and then 100 Rs per hour subsequently.
ही बातमी खरी असेल तर धमाल येईल. लोकांना एकतर व्यवस्थित वीज तरी मिळेल नाहीतर भक्कम वरकमाई होईल Lol

केजरीवाल निवडून आल्यानंतर 'दिल्लीला पाणी पुरवणार नाही' असं हरियाणाच्या खट्टरकाकांनी सांगितलं होतं. तेव्हा पण असाच 'विचित्र आणि अराजक' पवित्रा घेतला होता अकेने.
"पाणीकपातीचा त्रास फक्त सामान्य नागरिकांना का द्यायचा? पंतप्रधान,राष्ट्रपती,विदेशी दूतावास आणि हॉस्पिटल्स सोडून बाकी सर्वांच्या घरी पाणीकपात लागू होईल. केंद्रीय मंत्री, आमदार, खासदार आणि स्वतः माझ्या घरी सुद्धा."
आपोआप पाणीपुरवठा सुरू झाला !

आमदारनिधी आणि त्याचा वापर ह्याची माहिती ऑनलाइन उपलब्ध करण्याची प्रक्रिया चालू आहे. दोन महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

महिला सुरक्षेसाठी बसेसमध्ये ४००० मार्शल्स नियुक्त करण्यासाठी नजीब जंग परवानगी देत नाहीयेत. आपने जंगांना एक आठवड्याचा वेळ दिला आहे. नाहीतर राजभवनाबाहेर निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. (सरकार करणार नाही, सरकारात नसलेले आपचे कार्यकर्ते निदर्शने करणार. नाहीतर रेल्वेमंत्रालयाच्या बाहेरची 'नौटंकी' आठवून वैताग येईल!)

आशुतोषचं ट्वीट ---- "My name is missing in the list of people to be arrested by Delhi police.Many cases Ag me also.Feeling left out and unimportant."
--
--
कैद्यांच्या मनोरजंनासाठी फक्त २१ जोकरांचीच गरज असेल, म्हणुन आशुतोषचे नाव नसेल पोलिसांच्या यादित. शिवाय अरविंद केजरीवाल यांचेही नाव आहे त्या यादित.

हायला, वीजकंपन्यांना दंड थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करायला लावण्याच्या आदेशाची बातमी खरी आहे की. लय भारी. मोगॅम्बो खुष हुआ Lol

power fine1.jpgpower fine2.jpg

किरीट सोमैय्यांनी २०१२ मध्ये छगन भुजबळांबद्दल CAG कडे तक्रार केली होती.
>>>>

१९९९ पासून किरीट सोमय्या छगन भुजबळांविरोधात लढत आहेत. तुम्हाला माहीत नसेल किंवा तुम्ही सोईस्करपणे त्याकडे दुर्लक्षं केलं असेल म्हणून इतरांनीही तसं करावं ही अपेक्षा करु नका.

२१ आप आमदारांवर लवकरच चार्जशीट> सरकार द्वेषाचे राजकारण करत आहे दिल्लीत आपने जो त्यांचा लाजीरवाणा पराभव केला त्याने त्यांचा इगो दुखावलंय नि एक लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारच्या बळी घेण्याचा विचार दिसतोय. ते २१ आमदार गुन्हेगार आहेत? हाच नियम भाजपला लावायला गेले तर संसदेत ते अल्पमतात येतील. केजरीवाल ह्यांच्यासाठी हि परीक्षेची घडी आहे. ब्रिटिशांनी आपल्या लोकांचा जेवढा द्वेष केला नसेल तो स्वकियांकडून दिसून येतोय. आप हा राजकारणात नवखा पक्ष असल्याने त्याला सरकारशी टक्कर देता येत नाही आहे पण केजरीवाल हा सच्चा माणूस आहे दिल्लीतील जनता त्याच्या बाजूने आहे.अन्याविरुध्ह लढण्यासाठी केज्रीवाल्लाना शुभेच्छा नि दिल्लीतील जनतेने त्यांना पाठबळ द्यावे हि आशा

>>सरकार द्वेषाचे राजकारण करत आहे<<

पगारेंच्या वरील वाक्यात काहि तथ्य असेल तर ते दुर्दैवी आहे. स्वत:चा सर्वनाश करण्याचं पोटेंशियल अके आणि कं. मध्ये असताना इतरांना काहिहि करण्याची गरज नाहि... Happy

<<स्वत:चा सर्वनाश करण्याचं पोटेंशियल अके आणि कं. मध्ये असताना इतरांना काहिहि करण्याची गरज नाहि..>>

4 seats out of 432 seats in 2014
67 seats out of 70 seats in 2015
अके आणि आपचा हा असा 'सर्वनाश' प्रत्येक वेेळी होवो अशा मन:पूर्वक शुभेच्छा !

<<स्वत:चा सर्वनाश करण्याचं पोटेंशियल अके आणि कं. मध्ये असताना इतरांना काहिहि करण्याची गरज नाहि..>>

Raj,
How can a man be so blind? In latest elections Mr. Kejari won with record 67/70
BJP and Congress completely lost...That's why BJP trying hard to put EMERGENCY gov in Delhi....

I don't know whether I laugh at you or ignore you Happy

मोदी द्वेषाचे राजकारण करत आहे हे त्यांच्या साठी चांगले नाही दिल्ली काय हारले आंघोळ करून केजरीवालच्या मागे लागलेत पुरे करा हा खेळ देशावर लक्ष द्या

धन्यवाद

मिर्ची | 17 June, 2015 - 21:41 नवीन

एक-दोन दाखले देऊन आमच्याही ज्ञानात भर घाला की मग. मला लिंका चालतात.

>>>>>

मी फक्त व्हिडीओ पाहते हे तुमचंच विधान होतं ना मिर्ची?
आजपर्यंत इतक्या जणांनी दिलेल्या इतक्या लिंकांपैकी एक तरी लिंकवर तुम्ही विश्वास ठेवलात का?
उगाच मानभावीपणा करु नका.

@मून - डुड, टेक इट इझी. माझी कमेंट वाचुन मिर्ची झोबल्या सारखं करु नका.

>>How can a man be so blind? <<

दॅट्स अ‍ॅक्झॅट्ली द पॉइंट. यु आर गेटिंग हंग अप ऑन ६७/७०, अँड मिसिंग ऑल दॅट हॅपन्ड इन लास्ट वन इयर (अँड इयर बिफोर दॅट). पण तुम्ही सुद्धा इतर आप्टार्ड सारखे डोळ्यावर कातडं पांघरुन बसलेले असाल तर केजरीवाल सुद्धा तुम्हाला वाचवु शकत नाहि. Happy

तेच तुम्ही करत आहात राज इतकी भक्ती करू नये
आप्टर्ड काय बोलत आहात? तुम्हाला भाज्टर्ड बोललेले चालेल? वक्तव्यावर लक्ष राहू द्या शब्दाचा अर्थ माहीत असून बोलणे हे निंदनिय आहे. जनाची नाही किमान मनाची तरी लाज राखावी ही विनंती

धन्यवाद

१९९९ पासून किरीट सोमय्या छगन भुजबळांविरोधात लढत आहेत. तुम्हाला माहीत नसेल किंवा तुम्ही सोईस्करपणे त्याकडे दुर्लक्षं केलं असेल म्हणून इतरांनीही तसं करावं ही अपेक्षा करु नका. >>>>
खरच ?? निवडणुकिपुर्वी किरिट भाइ टिव्हिवर कागदपत्रे नाचवीत होते सिंचनाची त्यानंतर ते जे गायब झाले ते कागदपत्रांसकटच

कैद्यांच्या मनोरजंनासाठी फक्त २१ जोकरांचीच गरज असेल, म्हणुन आशुतोषचे नाव नसेल पोलिसांच्या यादित. शिवाय अरविंद केजरीवाल यांचेही नाव आहे त्या यादित. >>>> त्या एकवीस जोकरांची सुरवात केंद्रापासुन नको का व्हायला ? सुषमा, वसुंधरा, इराणी, निहालचंद हे जाउदेच पण राहुन, वाद्रा, चिदंबरम हे देखील विसरले कि काय भक्त ?
तसे १८२ जोकर आहेत त्यांनी आधी करमणुक करु दे. मग राज्यांकडे या.

स्वत:चा सर्वनाश करण्याचं पोटेंशियल अके आणि कं. मध्ये असताना इतरांना काहिहि करण्याची गरज नाहि.. >>>
स्वता:चाच करत आहेत ना ? मग करु द्या ना! मग मोदि आणी एल़़जी कशाला मध्येच येत आहेत.
याचाच अर्थ इतर "काहितरी" करत आहेत असाहि होतो.
भक्तांनी थोडेतरी लोजिकली बोलावे हि विनंती! Biggrin

बाकि भाजपा देशाचा सर्वनाश करत आहे हे जेव्हा भक्तांना कळेल तो सुदिन.

पावर कट चे सर्विस स्टॅंडर्ड सेट करुन नुकसान भरपाईची व्यवस्था केल्याबद्दल दिल्ली सरकारचे अभिनंदन.

ही कारवाई एकतर्फ़ी नाही.

विज कंपन्यांकडून 'पॉवर कट केल्यास' दंडवसुलीचा योग्य निर्णय घेतल्याबद्दल दिल्ली सरकारचे अभिनंदन!!!!

पावर कट चे सर्विस स्टॅंडर्ड सेट करुन नुकसान भरपाईची व्यवस्था केल्याबद्दल दिल्ली सरकारचे अभिनंदन.>>> +१

ही कारवाई एकतर्फ़ी नाही.>>> मतलब? पॉवर कट झाल्यास ती का केली गेली ह्याचे स्पष्टीकरण कंपन्या देऊ शकतात का? कधी कधी पॉवर ग्रीडचे वगैरे प्रॉब्लेम्स येतात तेव्हा मोठ्या एरियात वीज पुरवठा खंडित होतो. कधी विजेच्या तारांवर झाड पडणे सारखे प्रकार होतात. काही नैसर्गिक आपत्ती येवून वीजपुरवठा खंडीत होतो. तेव्हाही दंड लागू होणार का?

उगाचच्या उगाच उठसुठ पॉवर कट होत असेल तर नुकसान भरपाईचा निर्णय चांगलाच भारी पडेल कंपन्यांना आणि असे प्रकार त्या टाळतील. वीज ग्राहकांना दंडाची रक्कमही उठसुठ मिळेल Wink

बादवे, मला खरंच माहित नाही, दिल्लीत वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वारंवार घडतात का? इतर राज्यांमध्ये जसे नेमके उन्हाळ्यात भारनियमन करावे लागते तसेच तिथेही असते का?

Pages