कृपया लक्ष द्या.

Submitted by नंदिनी on 9 February, 2015 - 07:23

अ‍ॅडमिन, वेबमास्टर आणि इतर मायबोलीकर. परत एकदा हाच्ग बीबी एडिट करतेय. कारण जे काही चालू आहे ते अत्यंत धक्कादायक आणि डिस्टर्बिंग चालू आहे.

आता २०:०८ वाजता मला +९१९०२८५८८८४१ या क्रमांकावरून फोन आलेला आहे. पलिकडची व्यक्ती म्हणे मी वैभव कुलकर्णी बोलत आहे. मी पुन्हा फोन केलात तर पोलिस कंप्लेंट करेन इतके बोलून फोन बंद केलेला आहे.

माझा नंबर या व्यक्तीकडे कसा गेला माहित नाही, तो माझ्यादृष्टीनं फार महत्त्वाचा इशु नाही. पण हे अशापद्धतीनं फोन करणं, एखाद्या बीबीवर फोन नंबर मागनं आणि मग फोन करणं इज क्रीपी आणि हॉरीबल.

बहुतेक या व्यक्तीला मानसोपचारांची नितांत गरज आहे. पण मनोरूग्ण म्हणून त्याचे असले नखरे आणि धंदे इग्नोर करायचे का?

आजचा अख्खा दिवस मायबोलीच्या इतक्या वर्षांमधला सर्वांत वाईट दिवस होता. इतकंच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झाले गेल गन्गेला मिळाले ......विचार करुन मनस्तापाशिवाय काहि मिळनार नाहि...वेळ हे उत्तम औषध आहे ........ सोडुन द्या असे लोक रोजच्या आयुश्यात कुठे नी कुठे भेट्तात. म्हनुन आपन बाहेर निघायचे सोड्तो का? कुनि कहि बोलले म्हनुन लिखाण सोडु नये हि कळकळीचि विनन्ति.

वैवकुंनी केलेल्या चुकांच कुठलही समर्थन देणे हा हेतू अजिबात नसून त्यांना त्याची योग्य शिक्षा मिळावी हे मान्य असले तरी त्यांच लिखाण हरवू नये ही कळ कळ वाटणे ही बाब अनाठायी नक्कीच नसावी !

दोष जाहीर ( आणि मान्यही ) आहेतच पण म्हणून गुणांचा उल्लेख॑ही होवू नये हा आग्रह का असावा ?

-सुप्रिया.

गुणांचा उल्लेख नको असा आग्रह नाही. पण गुणदोषांचा एकत्र धांडोळा घ्यायला इथे त्यांचे व्यक्तिचित्र मांडण्याचा उपक्रम सुरू नाही.
इथे मुद्दा त्यांनी केलेल्या चुकीचा आणि त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा आहे.
वेबमास्तरांनी अ‍ॅक्शन घेतली आणि त्यावर निवेदनही दिले.
ते झाले.
आता नंतर वारंवार गुणांचा उल्लेख करणे, परिस्थितीचा उल्लेख करणे याचा अर्थ काय? हे सिंपथीसाठी असावे की काय अशी शंका अनेकांना येऊ शकते.

पैलवान यांनी माझ्या नावाच्या उल्लेखासगट लिहिलेल्या पोस्टला उत्तर दिले होते यात सहानुभूती निर्माण करण्याचा कुठलाही उद्देश नाहीय . कृ गै न.

ओके. फेअर इनफ!
कृपया वैयक्तिक घेऊ नका. तो प्रश्न किंवा ती शंका तुमच्या एकटीच्या पोस्टमुळे निर्माण झाली नव्हती.

मागे एका आयडीने एका धाग्यावर माझा मोबाईल नंबरच जाहीर केला होता...आयडी नंतर उडाला.
सांगायचा उद्देश एवढाच की वैवकू एकटेच नाहीत असे करणारे!

सरळ सरळ क्लॅरिटी मिळवणे शक्य असताना मुद्दाम घोळ का घातला जात आहे?

१. वैवकुंनी येथील एका सदस्याला मायबोली संकेतस्थळावर त्रास दिला, त्याबद्दल त्यांचे सदस्यत्व रद्द झाले. येथपर्यंत कोणीही त्यांच्या वैयक्तीक आयुष्यातील परिस्थितीबाबत व गुणांबाबत बोललेले नव्हते.

२. कायदेशीर कारवाई केलीच जावी असा जोर काही सदस्याकडून व प्रशासनाकडून धरण्यात आल्यानंतर पार्श्वभूमी सांगितली. अर्थ उघड आहे, की वास्तव आयुष्यात कारवाई होणार असेल तर वास्तव आयुष्यातील परिस्थितीसुद्धा सांगितली गेलीच पाहिजे. आणखी एक, वास्तव आयुष्यात मी (किंवा कोणी) वैवकुंच्या परिस्थितीबद्दल सहानुभुती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हा माझा माझ्या वास्तव आयुष्यातील प्रश्न आहे व त्याचा येथील कोणाशीही संबंध नाही. येथे प्रश्न वास्तव आयुष्यात कारवाईचा जोपर्यंत चाललेला होता तोपर्यंत वास्तव आयुष्यातील माझ्या स्वभावाप्रमाणेच मी माझी बाजू मांडणार. कोणीतरी चुकला असेल आणि माफी मागीतली असेल (तीही सतरांदा) तर कोणीही पुढील कारवाई करू नये अश्या मतापर्यंत येते. येथे मात्र उलट आग्रह वाढताना दिसला.

तेव्हा, वैवकुंवर ह्या संकेतस्थळावर झालेल्या कारवाईबाबत वाईट वगैरे वाटल्यामुळे कोणीही त्यांची पार्श्वभूमी सांगत बसलेले नाही आहे. एकदा आणि शेवटचेच हे क्लीअर करून घ्यावे.

प्रतिसादातील ह्यापुढचा भाग मी स्वयंसंपादीत केला आहे ह्याचे कारण ज्या गोष्टी झाल्याच नाहीत त्यांची चर्चा निदान माझ्यामुळे पुढे वाढू नये.

क्षमस्व!

वैवकु काय करतात ( दरवेळी ) तर एखादी गोष्ट पसन्त नाही पडली की ती योग्य तर्‍हेने न सान्गता त्याचा चोथा-पाणी करत बसतात. नाही आवडले तर नाही सान्गायचे, पण समोरचा इरीटेट होईल या पद्धतीने ते असले उद्योग करत रहातात, आणी प्रकरण अन्गाशी शेकले की मग सतरान्दा माफी मागत बसतात.

नन्दिनी ला त्रास देण्या पेक्षा त्याना वाटले असेल की फोन करुन माफी मागु, पण वरती इनाम वगैरे जाहीर करण्याचा तद्दन मुर्खपणा ते करत बसले. त्यान्ची अवस्था पाचरीत शेपटी अडकलेल्या माकडासारखी झाली. रादर, त्यानी ती करुन घेतली.

हे वरचे माझे वैयक्तीक मत आहे, कयास आहे. त्यान्चा आय डी उडुन त्याना योग्य शिक्षा झालीय.

आजच सगळे वाचले. नंदिनी यांना जो मनस्ताप झाला त्याविषयी सहानभुती आहे. वेमा नी केलेल्या कारवाईला पुर्ण पाठींबा. वैवकु यांनी मर्यादा ओलांडायला नको होती. बेफींच्या मनाला जे वाटले ते त्यांनी त्यांच्या नावाला जागत इथे बेफिकीरपणे मांडले. त्यात वैवकु विषयी त्यांना सहानभुती का वाटत आहे यामागची कारण मिमांसा पुरेशी स्पष्ट व्हावी म्हणुन जे सांगणे जरुरी वाटले, तेवढेच त्यांनी सांगीतले, असेच वाटले. जे झाले त्याची पुरेशी चर्चा झाली आहे. या वाइटातुन जे चांगले निघाले ते एवढेच की, मर्यादे बाहेर जावुन जे प्रतिसाद देतात, त्यांना होवु शकणार्‍या परीणामांची चुणु़क पहायला मिळाली.

नंदिनी,

>> ... हे नंबर कशासाठी तर आम्ही त्यांना हसलो म्हणून. किती तो इगो!!

अहंकाराबद्दल तत्त्वत: सहमत. वैवकु यांच्यासाठी एक महत्त्वाचं अध्ययनसूत्र (लर्निंग पॉईंट) असू शकतं. मात्र हे खरोखरच अहंचं प्रकटीकरण आहे का याविषयी जरा शंका आहे. यासंबंधात तुम्हाला संपर्कातून पत्र पाठवले आहे.

आ.न.,
-गा.पै.

काय गम्मत आहे.

नेटवर असभ्य भाषा वापरली ,त्याबद्दल शिक्षा झाली.

तर लोक युक्तिवाद करताहेत.. नुसता फोन नंबरच मागितला ना ? फोनवरुन काही बोलला का ? मग हा गुन्हा कसा ?

समजा फोन करुन काही असभ्य बोलला असता तरी लोकानी युक्तिवाद केलाच असता ... नुस्ता बोललाच ना ?की प्रत्यक्ष हल्ला केला ? मग नुसते बोलले तर तो गुन्हा कसा होइल इ इ .
Proud

लोकहो,

या बाफचं गांभीर्य कायम ठेवायचं असेल तर कृपया काउ यांच्या वरील प्रतिसादाकडे दुर्लक्ष करावं.

आ.न.,
-गा.पै.

>>>
वैव्कुंच्या सगळ्या कथा/कविता/गझला फक्त माबोवर (त्यांच्या सांगण्याप्रमाणे) आहेत्/होत्या. कुठेहि बॅकअप नसल्याने त्या गमावल्याचं दु:ख हे गयावया करण्या मागचं मुळ कारण असावं. हि बाब खरी असेल तर या सगळ्या लिखाणाची एक कॉपी त्यांना देण्याची व्यवस्था करण्यात यावी. माझ्यामते तो सुसंस्कृतपणा आहे.<<< +१

वैवकु यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. या धाग्यामधे जे काही वाचायला मिळाले तेवढेच.
ही व्यक्ती जरा विक्षिप्त असणार असे वाटले.
पण माबोवर अनेक धाग्यांवर कितीतरी लोक एकमेकांना एवढे इरिटेटीन्ग लिहित असतात की बासच.
अनेक धाग्यांवर खिजविणारे केवढे तरी प्रतिसाद असतात. तो नाही का गुन्हा होऊ शकत ? Uhoh
येथे तर फक्त फोनचा विषय आहे, एका धाग्यावर "रस्त्याने चालताना अपघात" असा विषय पण झाल्याचे आठवते. Sad
स्वतःची ओळख जगजाहीर न करण्याची सवलत संकेत स्थळावर असली तरी त्याचा नको एवढा गैरफायदा घेऊन लोक एकमेकांना एवढे हैराण का करत असतात ? अन्य ठिकाणचे राग येथे काढतात की काय देव जाणे ? Uhoh

<< पण माबोवर अनेक धाग्यांवर कितीतरी लोक एकमेकांना एवढे इरिटेटीन्ग लिहित असतात की बासच.
अनेक धाग्यांवर खिजविणारे केवढे तरी प्रतिसाद असतात. तो नाही का गुन्हा होऊ शकत ? >>

महेश यांच्याशी शतप्रतिशत सहमत.

महेशजी तुम्ही ज्या अनेक धाग्यांवरील खिजविणार्‍या प्रतिसादांचा उल्लेख केला आहे तिथे ज्या व्यक्तिला खिजविले गेले आहे त्या व्यक्तिने तक्रार केली नसल्याने गुन्हा झाला असला तरी तो उजेडात आणला गेला नाही आणि त्यावर कारवाई झाली नाही असे असावे.

<< येथे तर फक्त फोनचा विषय आहे, एका धाग्यावर "रस्त्याने चालताना अपघात" असा विषय पण झाल्याचे आठवते. >>

हे विधान माझ्या http://www.maayboli.com/node/47813 ह्या धाग्याविषयी आहे का?

धाग्यावर होणारी जनरल वादावादी, वादाच्या भरात कधीतरी दिले जाणारे पर्सनल प्रतिसाद, विनोदी प्रतिसाद, कोणीतरी एकच एक टुमणं लावून धरलं म्हणून इरिटेटिंग होऊन दिले जाणारे प्रतिसाद आणि ही घटना यातील फरक कळत नसेल तर समजावणं कठीण आहे.

इथे प्रत्येकजण आपापली चिकणमातीची भांडी या आयत्याच तापल्या आव्यात भाजतोय हेच खरे!

"हम करे तो चमत्कार और दुजा करे तो %^&*" किंवा "हम करे तो रासलीला और दुजा करे तो उसका कॅरेक्टर ढीला" असाही इथे काहींचा सूर लागलेला दिसतोय. आपला तो बाब्या दुसर्‍याचे ते कार्टे, स्वतःकरिता आणि इतरांकरिता दुहेरी मापदंड ह्या संज्ञांची आठवण झाली.

नंदिनीला विनंती: या धाग्याचे नाव बदलून 'कृपया लक्ष देऊ नका' करून प्रतिसाद थांबण्यात काही फरक पडतो का बघावे.

लगोबै उर्फ लक्ष्मी गोडबोले व वैवकु यांच्यातही हे फोनाफोनी व त्यावरुन पानिपत घडले होते.

आता तो धागा वाहता झालेला आहे. http://www.maayboli.com/node/49096

gaj1.JPGgaj2.JPGgaj3.JPGgaj3.JPG

हे वरचे एस एस वाचून वैवकुंच्या एकुणच आंतरजालीय असभ्य वावराचा निषेध करत आहे. त्यातल्यात्यात नशीब (वैवकुंचे) इतकेच की लक्ष्मीबाई एक बाई वाटल्यामुळे त्यांनी फोन नंबर मागीतला नाही आणि त्या बदल्यात पैसे वगैरे देऊ केले नाहीत.

>>>लक्ष्मीबाई गोडबोले ह्या आय डी च्या इसमाचे खरे नांव......<<<

ह्या वाक्यावरून हे लिहिले.

बापरे!!!भयानक.

माफी मागणे 'घडियाली आंसू' वाटत आहेत.
स्वभाव व स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन चुकिचा वाटतोय.

या धाग्यातील माझ्या सुरुवातीच्या आणि एकमेव पोस्टमधील हे एक वाक्य, पुन्हा कॉपीपेस्ट करतो.

जर संबंधितांना प्रकरण इथेच थांबवायचे असेल तर कोणी आपले पर्सनल स्कोअर सेटल करायला या प्रकरणाचा वापर करू नये. यातून आता फक्त बोध/धडा घेणेच योग्य.

पर्सनल स्कोरचा संबंध नाही.

आधी नेटवर शिवीगळ. मग फोनवरुन वादावादी करायला आव्हान देणे.

अगदी स्टिरिओटाइप बिहेवियर आहे... तीच तीच पद्धत पुन्हा पुन्हा वापरणे

काऊ ते आपल्यासाठी असे नव्हते, एकंदरीतच आता इथे असेच काही चालण्याची शक्यता निर्माण झाली म्हणून आधीच वर्तवलेली शक्यता पुन्हा टाकली इतकेच. Happy

वैवकुच्या गझला शोधत आलो तर हा सर्व इतिहास वाचला. वैवकुवर सदस्य निलंबनाची कार्यवाही झाली, ती मला वाटतं पुरेशी आहे.

-दिलीप बिरुटे

Pages