कृपया लक्ष द्या.

Submitted by नंदिनी on 9 February, 2015 - 07:23

अ‍ॅडमिन, वेबमास्टर आणि इतर मायबोलीकर. परत एकदा हाच्ग बीबी एडिट करतेय. कारण जे काही चालू आहे ते अत्यंत धक्कादायक आणि डिस्टर्बिंग चालू आहे.

आता २०:०८ वाजता मला +९१९०२८५८८८४१ या क्रमांकावरून फोन आलेला आहे. पलिकडची व्यक्ती म्हणे मी वैभव कुलकर्णी बोलत आहे. मी पुन्हा फोन केलात तर पोलिस कंप्लेंट करेन इतके बोलून फोन बंद केलेला आहे.

माझा नंबर या व्यक्तीकडे कसा गेला माहित नाही, तो माझ्यादृष्टीनं फार महत्त्वाचा इशु नाही. पण हे अशापद्धतीनं फोन करणं, एखाद्या बीबीवर फोन नंबर मागनं आणि मग फोन करणं इज क्रीपी आणि हॉरीबल.

बहुतेक या व्यक्तीला मानसोपचारांची नितांत गरज आहे. पण मनोरूग्ण म्हणून त्याचे असले नखरे आणि धंदे इग्नोर करायचे का?

आजचा अख्खा दिवस मायबोलीच्या इतक्या वर्षांमधला सर्वांत वाईट दिवस होता. इतकंच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येथील सर्व सदस्यांच्या मोठ्या मनावर माझा तरी विश्वास आहे. वैवकुंनी जे काही केले असेल त्याचे समर्थन अजिबात होऊ शकत नाही. तरीही येथील सदस्यांना उद्देशून काही लिहू इच्छितो. हे मला वैवकुंनी स्वतःहून वगैरे सांगितलेले नाही ह्यावर कृपया विश्वास ठेवावात.

वैवकुंचे तुलनेने अ-व्यावसायिक असलेले शिक्षण, अनेक वर्षे नोकरी नसणे व आर्थिक स्थिती कमजोर असणे ह्या परिस्थितीत त्यांचे लग्न ठरत नव्हते. काही महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झाला व त्यांची पत्नी आता कॅरिंग आहे. आर्थिक परिस्थिती अजूनही कमजोरच आहे.

वैवकुंना वागण्याचा पोच कमी आहे हे विधान लिहिताना मला वाईट वाटत आहे ह्याचे कारण तो त्यांचा एकट्याचाच कमी आहे असे नाही ह्याची मला जाणीव आहे, पण आत्ता विषय त्यांचा चाललेला आहे.

मात्र त्यांच्या ह्या बदललेल्या कौटुंबिक पार्श्वभूमीकडे पाहून कृपया येथील भगिनींनी मोठ्या मनाने कायदेशीर कारवाईचा विचार मनातून काढून टाकावा असे आवाहन!

- भूषण कटककर

जे झाले ते वाईट आहेच. मी पहिल्यापासून सर्व पोस्टस वाचत होते. गंमतीत चाललेल्या गोष्टींनी अचानक गंभीर वळण घेतलेलेही वाचले. वैवकु यांनी जे काही लिहीले ते घृणास्पद आहे यात शंकाच नाही. (त्यांचा इतरत्र वावर कसा आहे कल्पना नाही) पण जेव्हा त्यावर तीव्र निषेध नोंदवला तेव्हा त्यांनी जाहीर माफीही एकदा नव्हे अनेकदा मागितली आहे याकडे कानाडोळा करून चालणार नाही. पोस्ट प्रकाशित झाल्यानंतरच काय मुक्ताफळे लिहीली आहेत हे कळू शकते. त्यामुळे असे प्रकार घडण्यावर कुणाचाही ताबा नाही. प्रकाशनपूर्व तपासणी नसणे हे मायबोलीचे बलस्थान आहे,त्याच्या गैरवापराची झळ सर्वांनाच बसते. परंतू, वारंवार माफी मागितल्यावरही, त्या आयडीचीही शक्य तेवढी जाहीर बदनामी झाल्यावर प्रकरण आटोक्यात येऊ शकले असते. नंदिनीचा फोन नंबर जाहीररीत्या उपलब्ध असताना कुणीही तिला फोन करू शकतो त्यामुळे तो मुद्दाच होऊ शकत नाही. तसंच, नंदिनीने लेखन चालू ठेवावे की बंद हा सर्वस्वी तिचा निर्णय असेल पण इथले लेखनस्वातंत्र्य सर्वमान्य आहे. प्रशासनाच्या बाजूने विचार केला असता, त्यांनी धोरणानुसार पहिली वॉर्निंग दिली तर त्यावरही प्रश्नचिन्हं उमटली जी अनाठायी होती असे वाटते. विदाऊट वॉर्निंग कुणालाही मायबोलीवरून काढून टाकणे चुकीचे नव्हे का? तरीही पुढे त्यांनी आयडीही डिलीट केला. पुन्हा पुन्हा माफी मागूनही जर हेच होणार असेल तर उपयोग काय त्या माफीचा, असा विचार मनात डोकावला. टोकाची मस्करी करताना अनवधानाने झालेल्या अपराधाचा विपर्यास पोलीस चौकशीत होईल असे आपल्यापैकी कुणाच्याही मनात नसेल. पुन्हा पुन्हा वैवकुंच्या पोस्टी वाचल्या तर संशयाचा फायदा सहज घेता येईल. पोलीसात जा सांगणं सोपं आहे पण उद्भवणारा मनस्ताप सहन कोण करणार? नंदिनी, वैवकु, प्रशासन. गुन्हे, अपराध घडतात तसंच पश्चात्ताप, माफी, प्रायश्चित्त, क्षमाही व्हायला हवी. झालेल्या बदनामीवरून कदाचित वैवकुंना धडा मिळालाही असेल, पण आता ते तपासण्याची संधी हुकली. आता कुणीतरी डुआयडी येऊन पुन्हा डूख धरल्यागत थयथयाट करून हे दुष्टचक्र चालूच राहणार. एवढंच म्हणायचंय की मूळ घटनेपेक्षा झालेले नाट्य अवाजवी होते.

आशू, तुझी ही पोस्ट अजिबातच पटणारी नाही.
जी घटना घडली ती अत्यंत गंभीर आहे. सायबर क्राईम हा गंभीरतेने घेण्याचाच विषय आहे. आणि या घटनेवर उमटलेल्या प्रतिक्रियांना 'नाट्य' म्हणणं मला अत्यंत चुकीचं वाटतं.

आशूडी,

तुमचा प्रतिसाद वाचून डोळ्यात पाणी येत आहे.

मी त्या माणसाला खूप वेळा भेटलो आहे आजवर. त्याने जितक्या वेळा आणि जितक्या विविध सदस्यांची विविध मार्गांनी माफी मागीतली ते पाहून त्याचे सदस्यत्व गेले ही कारवाई पुरेशी होती असे माझे मत आहे.

कायदेशीर कारवाई करण्यास इतरांनी पाठबळ देणे ह्या प्रकाराचा अत्यंत खेद झाला. नंदिनीं निर्णय घ्यायला सक्षम आहेतच.

ज्यांना ह्या प्रकाराची कोणतीही वैयक्तीक झळ पोचली नाही त्यांच्या सल्लामसलती पाहून प्रथमच ह्या व्यासपीठावर मन फाटून गेल्यासारखं वाटलं

वैवकू जे वागले त्याचं अजिबात समर्थन करायच नाहीये. आणि त्यांचा आयडी बॅन झाला हेही योग्यच झालं.
पण या प्रकाराची सुरूवात जिथून झाली ते पटलं नव्ह्तं.
त्यांनी कथेवर टीका केली, ती नंदिनीनेही लाईटली घेतली. पण नंतर रिया, तुझी ती कॉमावाली पोस्ट आली नसती तर हा इतका मोठा इश्श्यु झाला नसता हेमावैम. त्यांच्यावर पर्सनल टीका झाल्यावर त्यांनी तो धूडगूस घातला.
हे अव्हॉईड होऊ शकलं असत. या सगळ्या प्रकारात नंदिनीच्या लिखाणाला मुकणार याचे वाईट वाटत आहे.
पोस्ट पटली नाही तर दुर्लक्ष केलं तरी चालेल.

डिस्क्लेमरः वैवकू आयडीचा माझ्याशी काडीमात्र संबंध नाही. त्यांनी जो गोंधळ घातला त्याच समर्थन तर अजिबातच नाही.

मंजूडी, तुझ्यासारखीच शेकडो लोकांना ती पटणार नाही याची खात्री आहे. कुणाला पटावी म्हणून लिहीलेली नाही.
सायबर क्राईम हा खरंच गंभीरतेने घेण्याचा विषय आहे.
एकामागून एक वेगळी वळणं घेत ज्या प्रकारे ही घटना घडली ते नाट्यमय वाटलं म्हणून लिहीलं, त्यात कुणीही 'नाटक' केलं असा अर्थ मुळीच नाहीये.
गैरसमज वाढून पसरू नयेत म्हणून हे लिहीले काहीशा अनिच्छेनेच.

ज्यांना ह्या प्रकाराची कोणतीही वैयक्तीक झळ पोचली नाही त्यांच्या सल्लामसलती पाहून प्रथमच ह्या व्यासपीठावर मन फाटून गेल्यासारखं वाटलं
>>
+१११११११११११११११

मी या वाक्याशी सहमत आहे पण दुसर्‍या बाजुने.
वैवकुंची तू इतकी बाजू घेतोयेस, ते ही त्यांनी मोठीच चुक केलेली असताना हे मला पचायला जड जातंय.
नंदिनीने स्वतः पोलीसात वगैरे न जाण्याचे कबूल केले आहे याचा अर्थ वैवकुंवर तिच्यामार्फत सध्या तरी कोणतीही कारवाई होईल असं वाटत नाही असं असतानाही,त्यांची जी वारंवार बाजू घेतली जातेय ती खेदजनक आहे.
आशू, तुझ्याही पोस्टचंही आश्चर्य वाटलं.

यासर्वात नंदिनीचा नंबर वैवकुंकडे कोणातरी मार्फत पोहचला असेल तर त्या व्यक्तीला योग्य ती शिक्षा होईलाच हवी हे माझं मत (त्यांनी कुठुन तरी वाचून/शोधून मिळवला नसल्यास)

सायबर क्राईम म्हणजे पोरखेळ नाही हे सगळ्यांनाच कळायला हवंच.

एखाद्या व्यक्तीची पार्श्वभूमी आणि त्याने सतत माफी मागणे (केलेली चूक उघडकीला आल्यावर, सगळेच त्या चुकीला चूक म्हणतायत हे लक्षात आल्यावर!) या गोष्टींमुळे एखादी व्यक्ती 'निरपराध' कशी काय होते?

कायदेशीर कारवाई करणार नाही हे नंदिनीने कालच लिहिले होते ना मग आता परत काय?

काही गोष्टी पुन्हा स्पष्ट करतो.

वैवेकु यांनी फोन करण्याच्या अगोदर जे केले ते त्यांचा आयडी काढण्यासाठी पुरेसे होते. आणि म्हणून तो काढला आहे. हे फक्त आजच्या घटनेवर अवलंबून नव्हते. या अगोदरही त्यांना इतर आयडींशी केलेलल्या वर्तनाबद्दल ताकीद दिली गेली होती.

एका सद्स्याने फोन आला अशी तक्रार केली तर , लगेच ज्या व्यक्तीचा फोन आला अशी तक्रार आहे, त्या व्यक्तीवर (ते सिद्ध होईपर्यंत) मायबोली प्रशासनाने कारवाई करणे हे चुकीचे ठरेल. पुन्हा दोन व्यक्तींमधे नक्की काय संवाद झाला याची शहानिशा करणेही अवघड आहे. असा फोन येणे ही अतिशय गंभीर बाब आहे याची मला कल्पना आहे. आणि अशा गंभीर गोष्टींचा सर्व तपास आणि कारवाई (मायबोलीबाहेरचीही) करणे ही पोलीसांच्या अखत्यारीतली गोष्ट आहे. त्यामुळे मी असे सुचवेन की यापुढे अशा परिस्थितीत जरूर सायबर क्राईम सेल कडे तक्रार करा. ते सर्व गोष्ट पडताळून पाहतील आणि योग्य ती कारवाई करतील. आमचे त्यांना पूर्ण सहकार्य नेहमीच असेल.

मायबोली प्रशासन खरोखर फोन आला होता की नाही हे ठरवू शकत नाही आणि त्यावर निर्णय घेऊ शकत नाही. काही सतर्क मायबोलीकरांनी हे निदर्शनास आणून दिले आहे की फोनच्या आलेल्या कॉल लॉगचा स्क्रीनशॉट हे ठरवू शकत नाही. कारण खोटे कॉल लॉग तयार करणारे अनेक अ‍ॅप्स अँड्रॉईड आणि आयफोनवर उपलब्ध आहेत. त्यामुळे पोलिसांकडून फोन कंपनीच्या मार्फत मिळणारा फोन लॉग हाच काय तो पुरावा मानता येईल. त्यामुळे कुणीतरी अमुक अमुकला फोन केला ही गोष्ट कितीही गंभीर असली तरी या तक्रारीवर मायबोली प्रशासनाने काही करणे चुकीचे ठरू शकेल.

पण यामुळे या गोष्टीचे गांभीर्य कमी होत नाही. आणि अशा गोष्टींसाठी पोलिसांकडेच जा असे मात्र मी पुन्हा सुचवेन आणि आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य देऊ.

रीया,

वर फारेण्ड ह्यांनी बी ह्यांना जे उद्देशून लिहिलेले आहे ते मला पूर्णपणे पटलेले नाही. तू आत्ता जो प्रतिसाद देत आहेस तो उत्साहाच्या भरात देत आहेस. मी काय म्हणू इच्छितो हे खाली लिहीत आहे.

१. मला वैवकुंची बाजू घ्यावीशी वाटत आहे ती फक्त प्रत्यक्ष आयुष्यात त्यांच्यावर कारवाई होऊ नये ह्यापुरतीच. तेसुद्धा ह्यासाठी की त्या माणसाचा हेतू घाणेरडा असता तर तो स्वतःच पळून गेला असता, माफी मागत बसला नसता आणि सदस्यत्व जाण्याला घाबरला नसता. जो मुळात घाणेरड्या इच्छेने नंबर मागत असेल तो एक तर असा मागणारच नाही आणि मागीतला तर वारंवार व अनेकांकडे मागेल.

२. ह्या व्यासपीठावर 'मेल-फिमेल' एलिमेंट असलेला हा वाद झाला म्हणून तो सायबर क्राईमच्या पातळीचा मानला जात आहे (व हे मान्यही आहे). पण ह्याच व्यासपीठावर असा एलिमेंट नसलेले कित्येक वाद होत असतात व माणसाची प्रकृती बिघडेल इतका मनस्ताप काहींना होऊ शकतो. आजवर अश्या कोणत्याही वादात कोणीही सायबर क्राईमचा उल्लेख इतका गंभीरपणे केलेला मी पाहिलेला नाही. म्हणूनच 'मूळ घटनेपेक्षा नाट्य अवाजवी वाटले' ह्या आशूंडींच्या मताशी सहमत आणि ते वाचून डोळ्यात पाणी ह्यासाठी आले की एक स्त्री असूनही त्यांनी प्रामाणिकपणे जे वाटले ते लिहिलेले आहे.

३. दोन परदेशातील स्त्री सदस्यांनी नंदिनींना 'तू केस करच' असा सल्ला जाहीरपणे ह्याच धाग्यावर दिलेला आहे. त्यांना व्यक्तीशः वैवकु किंवा कोणाकडून (नंदिनींच्या ह्या धाग्यावर) कोणताही मनस्पात सहन करावा लागलेला नव्हता. उद्या कॅनडातील एका माणसाला मी इथे भारतात बसून कॅनडातील दुसर्‍या सदस्यावर केस कर म्हणालो आणि त्याने माझे ऐकले तर? माझे काय जाणार आहे?

४. प्रत्येकाला खासगी आयुष्य असते. वैवकुवर संकेतस्थळाने कारवाई केलेलीच आहे. एकदा घडलेल्या अपराधाची वारंवार व त्रिवार लेखी जाहीर माफी मागीतल्यानंतरही त्याच्या बाजूने, त्याच्या आजवरच्या वावराचे स्मरण ठेवून, त्याने गझलविभागात दिलेले योगदान स्मरून एक वाक्यही लिहिले जाऊ नये अशी अपेक्षा कशासाठी? माणूस आहे, चुकला आहे, माफी मागत आहे, काढून टाकण्यात आलेला आहे. बास की आता?

>>>कायदेशीर कारवाई करणार नाही हे नंदिनीने कालच लिहिले होते ना मग आता परत काय?<<<

हा विषय परत लिहिण्याचे कारण आज सकाळी घडलेल्या काही गोष्टी आहेत ज्या येथे लिहू शकत नाही. मात्र त्यात वैवकुचा सहभाग नाही एवढा विश्वास असू द्यावात.

वेबमास्टर - माफ करावेत, तुमचा प्रतिसाद येईपर्यंत मी रीयाला उद्देशून भला मोठा प्रतिसाद दिला.

अश्यारितीने त्रास देण्याचा प्रयत्न करणे अतीशय दुर्देवी आहे. योग्य कारवाई वेळेवर झाली हे योग्य झाले, याने भविष्यात असे करू इच्छिणार्यांना जरा तरी जरब बसेल असे वाटते.

ऑनेस्टली, मला आज सकाळी साधारणपणे आशूडी सारखेच वाटले. साधारणपणे - म्हणजे तिच्या शब्दाशब्दाशी मी सहमत आहे असे नव्हे. मात्र नंतर वेमांच्या पोस्टमुळे आणखी माहिती मिळाली, जी आधी नव्हती.

बेफि - ती माझी पोस्ट फक्त बी ला उद्देशून नव्हती.मला वाटते त्यावर आपण दुसरीकडे चर्चा करू, कारण ते मुद्दे येथे चर्चिले जाउ लागले, तर सगळा बाफ भलतीकडेच जाईल. माझे मत चुकीचे असू शकते याची मला कल्पना आहे.

बेफिंशी सहमत.
नंदिनीसोबत जे झाले ते चुकीचे होतेच पण जे घडले ते संकेतस्थळावर म्हणजे इंटरनेटवर. वैवकुने नंदिनीला फोन केला पण त्यात काही हीन किंवा गलिच्छ भाषेचा वापर केला नाही असे नंदिनीच्या सांगण्यावरुनतरी वाटते म्हणजे तसा कुठे उल्लेख नाहीये. जर त्याने फोनवर काही गैरभाषेचा वापर केला नसेल तर बाकी जे घडले ते संकेतस्थळावर म्हणजे इंटरनेटवर त्यामुळे त्याला जी शिक्षा झाली ती पुरेसी आहे असे मलातरी वाटते.
कायदेशीर कारवाई करणार नाही हे नंदिनीने कालच लिहिले होते तरीही एकच मुद्दा सारखा सारखा उचलला जात आहे. इथले प्रतिसाद सुरु राहिले तर सतत कुणितरी यवुन इतरांच्या प्रतिसादावर सहमत आहे / असहमत आहे करत ही आग भडकतच राहील. म्हणुन मलातरी असे वाटते की आता या प्रकरणाची झाली तेव्हढी चर्चा बस झाली आणि आता इथले प्रतिसाद बंद करावेत.
तरीही नंदिनीने जर यापुढे जर त्या आयडीकडुन काही त्रास झाल्यास (यापुढे होणार नाही असे वाटते) नक्कीच कायदेशीर कारवाई करावी.

आशूडी, वेगळा विचार आवडला. अशा बाजूनेही विचार करायला हवा होता इथे वैवकुंना काढण्यापुर्वी.

प्रशासक, तुम्ही म्हणता वैवकुंनी ह्यापुर्वीदेखील इतरांसोबत गैरवर्तन केले होते. कुणाकुणासोबत काय काय गैरवर्तन केले होते ते लिहू शकाल का?

नंदीनी, वैवकुंचा तुला फोन आला तर ते तुला काय म्हणाले? काही अश्लील बोलले का? शिवीगाळ केली का? की फक्त फोन आला हे तुला गैर वाटले?

फारएण्ड, तुझी ती पोष्ट मलाच उद्देशून होती पण तू ते उगाच नाकारतो आहे. ज्यांची नावे घेतली ते तुझे चांगले मित्र आहे हे मी समजू शकतो पण आपले मित्र चुकत आहेत आणि आपण त्यावर पांघरुन घालतो आहोत ह्याचा थोडा विचार करावा.

येथील चर्चा थांबवण्याबाबत निल्सनशी सहमत. (सॉरी - येथे आधी चिनूक्स लिहीले होते)

बी - मी कोठे नाकारले? मी फक्त म्हणतोय की फक्त तुला उद्देशून नव्हती. दुसरे म्हणजे मी फक्त म्हणतोय की ती चर्चा दुसरीकडे करू. मी तुझी किंवा त्यांची कोणाचीच बाजू घेतलेली नाही. तू ही माझा मित्रच आहेस की!

पुन्हा पुन्हा वैवकुंच्या पोस्टी वाचल्या तर संशयाचा फायदा सहज घेता येईल. >>> त्या सर्व पोस्ट्स एडीटेड आहेत. मूळ पोस्टींपैकी काहीच पोस्ट्स मी कॉपी केल्या आहेत. स्क्रीनशॉट एकही घेतला नाही (कारण, मला इतरही काही कामे होती!)

इथं बहुतेकांचा रोख त्यानं मला फोन केला इतक्या गोष्टीवर सीमित दिसत आहे. तो फार मोठा इशु नही हे आधीच लिहिलेले आहे.. त्याआधी केलेले माकडचाळे जास्त शॉकिंग आहेत.

मुळात विषय चालू झाला तो त्याने दिलेल्या निगेटीव्ह कमेंट्वरून. मी ती कमेंट अत्यंत खेळकरपणे घेतली, रीयादेखील त्यावर हसली. त्या आयडीला आपला उपहास होतोय ही एक गोष्ट इतकी सहन झाली नाही!!! लगेच त्यानं खराखुरा मोबाईल नंबर देणार्‍याला हजार रूपये इनाम जाहीर केले.

मी प्रामाणिक मत नोंदवलं
त्यावर नंदिनी कुत्सित्पणे म्हणाली असेल तर माहीत नाही पण रियानं हसायला नको होतं
मायबोलीवरील काही कटु आठवणींमुळे मी नंदिनीला प्रतिसाद देताना जपून देत असतो इतकंच

मला रिया आणि नंदिनी यांचा फोन नंबर खरखुरा जो देइल त्याला रोख १००० रु प्रतेक फोन नंबर मागे देण्याचे
अत्ता इथे जाहीर करत आहे (माझ्याकडे आत्त तेवढेच आहेत )

* काही नियम व अटी लागू
ही ती मूळची पोस्ट.

ही पोस्ट आल्याआल्या... प्प्लीज नोट आल्याआल्या मी त्यावर अ‍ॅडमिनकडे तक्रार नोंद्वलेली आहे आणि तसेच त्या बीबीवर लिहिलेदेखील होते. (माझी पोस्ट १७:१०ची आहे) मग त्यानं माफी मागितली का? नाही!!! त्यानं १७:१९ ला ही पोस्ट टाकली.


वैवकु | 9 February, 2015 - 17:19
तसाही नंदिनी तुझा हा लग्गेच अ‍ॅडमीन्कडे धाव घेण्याचा जो पलायनवादी प्राकार आहे त्याच्या जोरावर कितीदा बचाव करशील स्वतःचा मागेही तू असेच वागलेलीस कारण नसताना मी नुसता तुला नंदिनीआज्जी असेच तर म्हणालो होतो फक्त

याहीनंतर मी बीबीवर इतर आयडींसोबत बोलणे चालूच ठेवले होते. म्हटलं अ‍ॅडमिन करतील काय ती कारवाई. यानंअर १७:२२ ला वैवकु यांनी अजून एक पोस्ट टाकली.

वैवकु | 9 February, 2015 - 17:22
अ‍ॅडमीन ना मेल कशी आणि कुठे करतात
मला माझी बाजू मांडायलाच हवी !!! म्हणजे तशी संधीतरी मिळालीच पाहिजे मला


पूर्वी मी एकदोनदा त्यांना विचारपूएस मध्ये की काय ते कळवले होते काही बाबतीत पण आता कसे पाठवायचे ते विसरलो आहे

यानंतर अजून एक प्रतिसाद आला. याची म्मूळ आवृत्ती माझ्याकडे सेव्ह नाहिये,

वैवकु | 9 February, 2015 - 17:50
आदरणीय नंदिनीजी नाराज झाल्यामुळे हा प्रतिसाद संपादित:)

त्यानंतर आलेला प्रतिसाद.
वैवकु | 9 February, 2015 - 17:43
आनेकांचा गैरसमज झालेला दिसतो मी चेष्टा केलेली फक्त
त्या आधीच्या प्रतिसादात रियाने केलेली चेष्टा मी का सहन करावी ? हा कुठला न्याय ???


वैवकु | 9 February, 2015 - 17:47
बर बाबा माझे आक्षेपार्ह शब्द काढून टाकतो उगाच असुरक्षित वाटून घेवू नका बाईसाहेब स्मित


वैवकु | 9 February, 2015 - 17:52
माझे प्रतिसाद शक्य तितके संपादित केले आहेत अजून काहीआक्ष्वेप असेल तर लग्गे मला कळवा प्लीज स्मित

ह्वे अतिच झाक्यावर यानंतर मी तो बीबी एडीट केला, अप्रकाशित केला. नवीन बीबी ओपन करून कथा त्यवर टाकली. कारण मला या आयडीचं उपद्रव मूल्य नको हवं होतं. तिथं जर ते आले नसते तर प्रशनच आला नसता. पण तिथे हे महाशय सर्वात आधी पोचले. तो संपादित प्रतिसाद याच बीबीच्या पहिल्या पानावर वाचता येईल.

वैवकु | 9 February, 2015 - 18:18
आता उडवालात ना तो धागा मग आता काय झालं

नंबर मागीतले त्यात काय वाईट स्त्रियांचे असले म्हणजे काय झालं
ही असुरक्षितता आपल्या मनातच घर करून असेल तर मी काय करणार

नंबर मिळाला असता तर मनमोकळेपणे बोलून मनातले गैरसमज दूर करता येतात यास्तव मागीतलेले
बाकी मला माझा नंबर देण्यात काहीच अडचण नाही

९०२८५८८८४१ हा माझा नंबर आहे मी महाराष्ट्रात पंढरपुरात राहतो

आणि जरा काही खुट्ट झाले की संयोजकाना कळवणे म्हणजे आपण आपल्या स्त्रीत्वाचा अगाउ गैरफायदा घेणे नव्हे काय मी काय बोध घ्यावा हा कसला स्त्रीसक्षमीकरण प्रयत्न म्हणायचा

असो आपल्याला वाटले तर आपला नंबर आपण स्व्तःदेवू शकता किंवा मला फोन करू शकता

स्व्तःला आपला एकतर्फी मित्र समजणारा

वैवकु

यानंतर मी माझे इंटरनेट बंद केले आणि इतर कामांमध्ये बिझी होते जेव्हा २०:०८ ला त्यांनी मला फोन केलाय. फोन केल्यावर लगेच मी सर्व प्रकर वेबमस्टर आणि अ‍ॅडमिन यांना मेलवरून कळवला आहे. त्यानंतर वरील कथेचा बीबी एडिट करून आता जो हेडर दिसतोय तो लिहिला आहे. जेणेकरून इतरांनादेखील या उपद्रवाची कल्पना येऊ देत.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
या सर्वांमध्ये मला झालेला मनस्ताप बाजूला ठेवून देऊ, आय अ‍ॅम स्ट्राँग इनफ टू हँडल सच इडियट्स. पण आपण एका स्त्री आयडीचा नंबर जाहीरपणे मागत आहोत वर तो देणार्‍याला हजार रूपये इनाम देणार हे मोठेपणानं लिहितो ही गुर्मी कसली आहे? हा नंबर मागणे प्रकार माफीसाठी खचितच नव्ह्ता काअरण तोपर्यंत माफी मागण्यालायक काहीच विषय नव्हता. मग नंबर कशाला हवा होता?? त्यामध्ये माझे नाव सामिल होतेच पण रीयाचेही होते. ती या आयडीला हसली म्हणून याला राग आला???म्हणून हा आमचे फोन नंबर घेऊन आम्हाला धमकावणार होता???

एका तरूण अविवाहित स्त्रीचा (रीया) आणि एका विवाहित स्त्रीचा (नंदिनी) मोबाईल क्रमांक आपण मागत आहोत तेदेखील थेट नव्हे तर जाहीर इनाम द्यायच्या भाषेमध्ये!!!! समजतात कोण हे स्वतःला आणि हे नंबर कशासाठी तर आम्ही त्यांना हसलो म्हणून. किती तो इगो!!

माझा जर आक्षेप असेल तर तो या गोष्टीला आहे आणि राहील.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

राहता राहिला, पोलिस तक्रारीचा विषय. मी कालच लिहिलं आहे की मी "सध्या" तक्रार करत नाहिये. कारणं वेबमास्टरांना कळवलेली आहेत. प्रकरण अगदीच पुढं चालू राहिलं तर तक्रार करणारच- त्यात वाद नाही. आज सकाळीच एका रत्नागिरीमधल्या पोलिस अधिकार्याशी बोलून माहिती विचारून ठेवली आहे. अधिकही इकडची तिकडची माहिती काढून ठेवलेली आहे- तीदेखील कामी येऊ शकेलच. तूर्तास इतकेच..

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

या प्रकरणामध्ये मी चिडून "मायबोलीवर लेखन बंद" असे लिहिले होते. कारण त्याक्षणी त्यावेळेला मला तितका संतप आलेला होता. मायबोलीवर इतकी अनेक वर्षे लिहत असून कित्येक वेळेला वादविवादांमध्ये सामिल असून असला प्रकार मी आजवर पाहिलेला नाही. माझ्याच बाबतीत नव्हे तर इतरांच्याही बाबतीत. आपल्याला एक स्त्री हसली म्हणून झालेला अपमान आणि त्यानंतर केलेले हे थयाथया नृत्य एकमेवाद्वितीय होते हे इथं नमूद करते.

मला जे म्हणायचं आहे ते म्हणून झालेलं आहे. सांगून झालेलं आहे. यापुढे माझ्याकडे सध्या या विषयावर बोलण्यासारखे काहीही नाही. मात्र, परत एकदा कसल्याही पद्धतीनं उपद्रव देण्याचा प्रयत्न झालाच तर मात्र मी कस्लीही हयगय करणार नाही याची खात्री बाळगा.

मला वाटलं, पोलिसच बीचा आयडी घेऊन आले इथं!
बी, लगे हाथ मायबोलीवर उडालेल्या सार्‍याच आयडींचा लेखाजोखा मागून टाक. शिवाय तुझ्याबद्दल आजवर कोण कोण काय काय बोललं होतं त्याचे लेखी पुरावेही माग. सोबत तुम्हाला कितीही वेळ लागला आणि मायबोलीशी संबंधित इतर तांत्रिक कामं ठप्प झाली तरी चालतील, पण तरी हे देणं तुमचं काम आहे - असंही बजावून टाक.

एखाद्या प्रसंगातून इथं प्रत्येक जण आपापला स्वतंत्र अजेंडा रेटत असले, आणि ते कितीही योग्य असलं तरी इथल्या प्रत्येकाकडे कडेकोट लक्ष आणि प्रत्येकासाठी आवश्यक तो बंदोबस्त - अशा अजेंड्यावर मायबोली टिकू-वाढू शकत नाही- हे समजत नसेल तर अवघड आहे.

येथील चर्चा थांबवण्याबाबत निल्सनशी सहमत. (सॉरी - येथे आधी चिनूक्स लिहीले होते)>>> ओके!
खरंय. हा बाफ प्रतिसादांसाठी बंद करण्याबद्दल सहमत आहे.

...

बापरे, जे घडले ते खुप धक्कादायक घडले. नंदिनीच्या वरच्या शेवटच्या पोस्टीत तिने जे लिहिलेय त्याच्याशी सहमत.

वैवकुचा आयडी बॅन करुन वेमांनी चांगले केले. वर बेफिकीरांनी लिहिलेय तसे त्या आयडीला पश्चाताप व्.व. झाला असेलही, पण आपण पब्लिक फोरमवर लिहिताना काय लिहितोय याचे भान त्यांनी राखले नाही. मायबोलीवर हल्ली बरेचवेळा ब-याच आयडींचे हे भान सुटल्याचे दिसते. निदान या निमित्ताने असे प्रतिसाद द्यायही हौस असलेल्या आयडीज पुढच्याच ठेच मागचा शहाणा या न्यायाने आपले प्रतिसाद प्रकाशित करण्यापुर्वी एकदा वाचायचे कष्ट तरी घेतील ही आशा.

नंदिनी, धन्यवाद सर्व प्रकार नीट सविस्तर सांगितल्याबद्दल. तो वाचून तुला काय त्रास झाला असेल ह्याची कल्पना येत आहे.

साजिरा, कुणी सांगत आहे म्हणून आपण फक्त मान डोलावयची का? मला नाही पटत म्हणून मी स्पष्टपणे नंदिनीला आणि प्रशासकांना जाहिररित्या विचारले. तुझा माझ्यावरचा राग मी समजू शकतो. मला सवय झाली आहे त्याची आता.

Lol असं समजू या की आता आज मला तुझा राग आलाय.
पण आधी का आला असेल उदाहरणार्थ, तुला सवय होण्याइतका?

Pages