कृपया लक्ष द्या.

Submitted by नंदिनी on 9 February, 2015 - 07:23

अ‍ॅडमिन, वेबमास्टर आणि इतर मायबोलीकर. परत एकदा हाच्ग बीबी एडिट करतेय. कारण जे काही चालू आहे ते अत्यंत धक्कादायक आणि डिस्टर्बिंग चालू आहे.

आता २०:०८ वाजता मला +९१९०२८५८८८४१ या क्रमांकावरून फोन आलेला आहे. पलिकडची व्यक्ती म्हणे मी वैभव कुलकर्णी बोलत आहे. मी पुन्हा फोन केलात तर पोलिस कंप्लेंट करेन इतके बोलून फोन बंद केलेला आहे.

माझा नंबर या व्यक्तीकडे कसा गेला माहित नाही, तो माझ्यादृष्टीनं फार महत्त्वाचा इशु नाही. पण हे अशापद्धतीनं फोन करणं, एखाद्या बीबीवर फोन नंबर मागनं आणि मग फोन करणं इज क्रीपी आणि हॉरीबल.

बहुतेक या व्यक्तीला मानसोपचारांची नितांत गरज आहे. पण मनोरूग्ण म्हणून त्याचे असले नखरे आणि धंदे इग्नोर करायचे का?

आजचा अख्खा दिवस मायबोलीच्या इतक्या वर्षांमधला सर्वांत वाईट दिवस होता. इतकंच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी,

तुम्ही प्रशासकांकडे केलेली विचारणा अवास्तव, अनावश्यक व अधिकारवाणीने केल्यासारखी वाटत आहे.

===============

हा धागा प्रतिसादांसाठी खुला राहणे हे एक प्रकारे सहाय्यकारकच ठरेल असे वाटत आहे. त्यामुळे एक चांगले 'एकत्रीत-मत' तयार होऊ शकेल. प्रतिसादांसाठी हा धागा बंद करणे हे (काही दिवसांनी वाचणार्‍यांना वगैरे) तसा अजिबात उद्देश नसतानाही मुस्कटदाबी केल्यासारखे वाटू शकेल असे वाटत आहे.

===============

सायबर सेलला इन्व्हॉल्व्ह करण्याची निवड ज्या त्या सदस्याकडे असेल हे समजू शकतो. पण माहितीसाठी विचारत आहे, कोणाला माहीत असल्यास कृपया येथे नमूद करावेत. कोणकोणत्या परिस्थितीत सायबर सेलकडे जाणे शक्य असते? (मी राजकीय / धार्मिक / जातीय तेढ वाढवणारे प्रतिसाद किंवा विकृत मतांबाबत म्हणत नसून दोन सदस्यांमधील वैयक्तीक मतभेदांच्या अनुषंगाने विचारत आहे).

बेफीकिर, विषयाशी निगडीत अशीच मागणी मी केलेली आहे आणि मायबोलिचा एक सभासद ह्या नात्यानी मी तशी मागणी करणे म्हणजे अधिकार गाजवणे असे नाही. उलट तुमच्या भाषेत नेहमीच एक टेकन फॉर अ ग्रान्टेडचा सुर मला जाणवतो. वर वैवकुचे लग्न मोडले आहे इतके वैयक्तिक तुम्ही इथे सांगायला नको होते. मायबोलिवर नवीन आयडी घ्यायची सोय आहे.

पुर्ण धागा वाचला, एवढाच काय तो विषय माहिती आहे, या संदर्भातले अन्य धागे, विपु काहीही पाहिलेले नाहीये.

वि.सू. : मी खाली माझे जे मत लिहित आहे ते नंदिनी किंवा या विषयाशी संबंधित असलेल्या कोणाबद्दलही नाहीये. वेगळ्या संदर्भात आहे, पण रिलेव्हन्ट वाटल्याने येथे लिहित आहे.

काही आयडी ठराविक प्रकारे लॉबिन्ग करून कित्त्येक चांगल्या आयडींना कोणत्याही धाग्यावर गाठून हैराण करत असत. आणि अनेक आयडी स्वतः चूक असुन देखील अ‍ॅडमिनकडे तक्रारी करून आपण किती चांगले आहोत हे दाखवित असत. गेल्या काही दिवसापासुन असे प्रकार कमी झाले आहेत,

माझा मुद्दा एवढाच आहे की जर कोणी कोणाविरूद्ध तक्रार केली तर दोन्ही आयडींचे माबोवर्तन पुर्णपणे तपासले जावे, आणि मगच योग्य तो निर्णय घेतला जावा. यात कोणी लाडके आणि दोडके असण्याचा संबंध नाही.

संकेतस्थळे ही पब्लिक प्लेस असल्याने, साधे डिसेन्सीने लिहिण्याचे भान लोकांना असू नये ?
आपली मते जर अन्य लोकांना पटत नसतील तर ती बळे बळे पटवून देण्याच्या हट्टापायी आपण काय करत आहोत हे ही समजत नाही अनेकांना. मग त्यातुन अगदी गॅन्गवॉर सारखे लिखाण चालू होते. Sad

माबो अ‍ॅडमिन यांनी एक जोरदार घटना तयार करावी, आणि त्याचे पालन न करणार्‍या आयडीवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच एका व्यक्तीस एकच आयडी आणि तो सुद्धा वेरिफाईड असणे बंधनकारक करावे.

धन्यवाद !

बी,

तुम्ही न वाचताच लिहीत आहात. वैवकुचे लग्न मोडलेले वगैरे नाही. उशीरा झाले असे लिहिले आहे मी!

वैयक्तीक लिहिण्याचे कारण वैयक्तीक आयुष्याशी निगडीत अ‍ॅक्शन घेतली जाण्याची चर्चा चालू आहे.

टेकन फॉर ग्रॅन्टेडचा सूर<<< तुमच्या वैयक्तीक मताचा आदर आहे. आपण आपल्या दोघांतली चर्चा हवे तर विपूतून किंवा वाहत्या पानावर करूयात असे सुचवतो.

एखाद्या प्रसंगातून इथं प्रत्येक जण आपापला स्वतंत्र अजेंडा रेटत असले, आणि ते कितीही योग्य असलं तरी इथल्या प्रत्येकाकडे कडेकोट लक्ष आणि प्रत्येकासाठी आवश्यक तो बंदोबस्त - अशा अजेंड्यावर मायबोली टिकू-वाढू शकत नाही- हे समजत नसेल तर अवघड आहे. >> +१

महेश, खूप छान पोष्ट!

वैवकुंचे तुलनेने अ-व्यावसायिक असलेले शिक्षण, अनेक वर्षे नोकरी नसणे व आर्थिक स्थिती कमजोर असणे ह्या परिस्थितीत त्यांचे लग्न ठरत नव्हते. काही महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झाला व त्यांची पत्नी आता कॅरिंग आहे. आर्थिक परिस्थिती अजूनही कमजोरच आहे. >>बेफिकिर, तुम्ही ही जी माहिती पुरवली ना ती पुरवायला नको होती असे मला वाटते.

बीबी वरची पुर्ण चर्चा वाचली नाही. पण नंदिनीने वर जे लिहिले आहे त्यावरुन कल्पना आली. वैवकु या आयडी वर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

<<माझा मुद्दा एवढाच आहे की जर कोणी कोणाविरूद्ध तक्रार केली तर दोन्ही आयडींचे माबोवर्तन पुर्णपणे तपासले जावे, आणि मगच योग्य तो निर्णय घेतला जावा. यात कोणी लाडके आणि दोडके असण्याचा संबंध नाही.>>+११११११

लगे हातो पोल घेऊन टाका

१) वैवकु ना झाली एवढी शिक्षा पुरे आहे
२) नंदिनीने सायबर क्राईम सेल कडे जावे आणि गुन्हा दाखल करावा

धागा प्रतिसाद देण्यासाठी इतक्यातच ( एवढ्या लवकर ) बंद करू नये .जे कोणी या दोन /चार दिवसात माबो वर फिरकलेले नाहीयेत त्यांचा प्रतिसाद देण्याचा हक्क अबाधित ठेवावा. फक्त काही एका काळानंतर ( एक महिन्यांनी -पुरेसे चर्वित चर्वण झाल्यावर) धागा प्रतिसाद देण्यासाठी बंद करावा हे माझे वैयक्तिक मत.

<<वैवेकु यांनी फोन करण्याच्या अगोदर जे केले ते त्यांचा आयडी काढण्यासाठी पुरेसे होते. आणि म्हणून तो काढला आहे. हे फक्त आजच्या घटनेवर अवलंबून नव्हते. या अगोदरही त्यांना इतर आयडींशी केलेलल्या वर्तनाबद्दल ताकीद दिली गेली होती.>> वेमा प्लीज स्पष्ट करणार का ? Happy

वेमा च्या भूमिकेशी सहमत.
सध्या केवळ आय डी काढण्यात आलेला आहे त्याउपर काय कारवाई करावी हे नंदिनी ठरवतीलच.
कुणाचा फोन नं मिळाला तर फोन करण्याआधी विपू तून परवानगी घेणे शक्य आहे, त्यानंतर येणा-या प्रतिसादावर फोन करावा किंवा नाही हे ठरवावे . तसेही सहसा व्ययक्तिक कॉल करण्याची आवश्यकता पडत नही. मात्र आय डी वैवकु चे बेजबाबदार वागणे अजिबात पटले नाही.
माबोचे धोरण प्रकाशित नसले तरी आपण काय करत आहोत याचे भान प्रत्येकालाच असायला हवे. व्ययक्तिक शेरेबाजी तर अजिबात खपवून घेतली जावू नये.
बादवे .. ब-याच लोकांनी सांगितले आहे त्याप्रमाणे नंदिनीने माबोवर लिखाण करणे सोडू नये, आपल्याला झालेला त्रासाचे दडपन न घेता आपण त्याला अधोरेखीत करुन सर्वासमोर आणला हे खूपच चांगले केले. कदाचित यामुळे भविष्यात असा त्रास कोणाला होणार नाही.

शेर याद आया...

वैवकूची आज भाषा गर्व होउन मातली
विठ्ठलाने लाथ मग कमरेत त्याच्या घातली

( बेफिभौ , जमीन आमचीच आहे . ढापली न्हाई Proud )

हो.

नंदिनी - तुमची काहीच चुक नसताना तुम्हाला झालेला त्रास, मनस्ताप समजू शकतो. झालेला प्रकार दुर्दैवी आहे... काळजी घ्या.

मायबोलीवर आपण काही विचार लिहीण्यासाठी, आणि अजुन इतरान्नी लिहीलेले विचार वाचण्यासाठी येतो... त्यातुन काही शिकायला मिळते. चर्चा करताना गैरसमज होणे शक्य आहे आणि ते माध्यमाच्या मर्यादा आहेत. पण ज्या माध्यमातुन चर्चा, सन्वाद साधतो (लेख, प्रतिसाद) त्याच माध्यमात राहुन झालेले गैरसमज दुर करणे आवश्यक आहे असे मला वाटते. लेख प्रतिसादा यात निर्माण झालेले गैरसमज दुर करण्यासाठी या माध्यामातुन बाहेर जाणे अआणि फोन, ईमेल इत्यादी अतिरीक्त साधनान्चा वापर करणे, तसा प्रयत्न करणे हे माझ्या समजण्या पलिकडे आहे.

उद्या फोनवर देखिल गैरसमज दुर झाले नाही, करता आले नाही तर प्रत्यक्ष भेटीची अपेक्षा हे महाभाग ठेवतील आणि पत्ता मागत फिरतील... येथे तुम्ही समोरच्याला खुप गृहित धरत आहात आणि त्या व्यक्तीच्या स्वातन्त्र्यावर गदा आणत आहात. Angry

वेबमास्तरान्ची तत्काळ कृती आणि भुमिका योग्य वाटली.

>>>उद्या फोनवर देखिल गैरसमज दुर झाले नाही, करता आले नाही तर प्रत्यक्ष भेटीची अपेक्षा हे महाभाग ठेवतील आणि पत्ता मागत फिरतील... येथे तुम्ही समोरच्याला खुप गृहित धरत आहात आणि त्या व्यक्तीच्या स्वातन्त्र्यावर गदा आणत आहात<<<

उदय,

भावनांशी पूर्ण सहमत आहे. पण ह्याचा कोणत्याही संकेतस्थळाच्या व्यवस्थापनाशी काहीही संबंध नाही. एखाद्या व्यक्तीला 'ते' स्वातंत्र्य संकेतस्थळाने दिलेले नसते. ते त्या व्यक्तीने सदस्यत्वामार्फत आपोआपच मिळवलेले असते.

'सायबर सेल'कडे जा असा सल्ला प्रशासनाने तीनतीनदा नंदिनी ह्या सदस्याला देण्यामागे 'संकेतस्थळ संपूर्ण पारदर्शक व व्यक्तीस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहे' ही भूमिका दर्शवणे आहे हे समजू शकतो. पण त्या किंवा कोणीही खरच सायबर सेलकडे गेले तर जे वळण लागेल ते नक्कीच अनिष्ट असेल. वेबसाईट विल नॉट बी द सेम देअरआफ्टर.

'संकेतस्थळ संपूर्ण पारदर्शक व व्यक्तीस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहे' ही भूमिका दर्शवणे आहे हे समजू शकतो.
----- याबाबत कुठलिही शन्का नाही... त्यान्च्या परिने ते अथक परिश्रम घेत आहेत.

नाही, माझा मुद्दा अधिक स्पष्टपणे लिहू इच्छितो, ह्या स्थळावर मनातील लिहायची परवानगी असते ह्या अधिकाराचा वापर करून! Happy

पारदर्शकता सिद्ध करण्यासाठी वारंवार दिला गेलेला सल्ला हा भविष्यात उलटणारा सल्ला ठरू शकतो असे माझे तुटपुंजे ज्ञान मला सांगते.

उदाहरणार्थ, त्या निमित्ताने स्क्रुटिनीखाली आलेले स्थळ इतर गोष्टींसाठी चेक केले गेले तर असेही होऊ शकेल की प्रशासनाने काही ठिकाणी सक्रीय सहभाग नोंदवून काही गोष्टी बंद करायला हव्या होत्या ज्या केल्या गेल्या नाहीत.

हे घातक आहे ना? Happy

उदय,

अगदी ह्याच धाग्यावर एक पोस्ट जातीय तेढ वाढवणारी मानली जाऊ शकणारी आहे. तिच्याबाबत कोणीही प्रशासनाकडे तक्रार केलेली नाही. का केलेली नाही हा भाग वेगळा आहे. पण प्रशासनाने त्याची दखल घेऊन ती पोस्ट स्वतःही उडवलेली नाही. आता प्रत्येक ठिकाणी कसे प्रशासन लक्ष घालणार हा मुद्दा आपण आपल्या-आपल्यात अगदी हिरीरीने मांडू शकतो. सायबर सेलला काय सांगणार?

अर्थात, हे माझे, म्हणजे एका 'ले मॅन'चे मत आहे.

प्रशासन समर्थ असणारच ह्याची जाणीवही आहे.

बेफिकीर
पोस्ट अप्रकाशीत केली आहे. दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.
तिनदा सांगायचा उद्देश की काही सभासदांची आम्ही जे काम करावे अशी इच्छा असते ते काम खरेतर पोलिसांचे आहे आणि आम्ही ती शहानिशा करू शकत नाहि हे सांगणे आहे. या धाग्याचा सुरुवातीचा कल पाहता काहींचा असा समज होऊशकतो की प्रशासनाने फोन कॉल ही गोष्ट पुरावा धरून कारवाई केली आहे. म्हणून भविष्यासाठी हे स्पष्ट करणे योग्य राहील.

>उदाहरणार्थ, त्या निमित्ताने स्क्रुटिनीखाली आलेले स्थळ इतर गोष्टींसाठी चेक केले गेले तर

मायबोलीच्या तिच्या आकारामुळे आधीच स्क्रुटिनीखाली आहे आणि त्याची आम्हाला जाणीव आहे.

>>>काहींचा असा समज होऊशकतो की प्रशासनाने फोन कॉल ही गोष्ट पुरावा धरून कारवाई केली आहे. म्हणून भविष्यासाठी हे स्पष्ट करणे योग्य राहील.<<<

अगदी!

दखल घेण्याबद्दल मनापासून आभार वेबमास्टर!

अलिकडे रोज वैद्यबुवा मला एकदा तरी तुम्ही इनसेन अहात, डोके फिरले आहे, बिघडले आहे, डोके चेक करुन घ्या, काही खरे नाही अशा कमेन्ट लिहितात. मी ह्या कमेन्ट्सवर एकदाही त्यांना उत्तर दिले नाही. कारण मला त्यांचा अनुल्लेख करायचा होता. >>>>>> अलिकडे म्हणजे नक्की केव्हा? मला आठवत नाही कित्येक महिन्यांमध्ये मी तुला उद्देशून काही म्हंटल्याचे. असो. मी काल परवाच खरं तू उघडलेल्या दोन पैकी कुठल्यातरी एक बाफं वर थोडं सविस्तर लिहिणार होतो पण नेमका तेव्हा वेळ नाही मिळाला.
एकंदरित बर्‍याच जणांना तुझा राग आहे किंवा त्यांना तुझ्याबद्दल काहीतरी प्रॉबलेम आहे असा तू बर्‍याच काळापासून समज करुन घेतलेला दिसतोस. फक्त माझ्यापुरतेच बोलायचे म्हंटले तर मी इथे बर्‍याच लोकांविषयी कधी त्यांच्या तोंडावर कधी इतर बाफंवर बोलतो त्यामुळे तुझ्याशी माझी खास दुश्मनी अशी काही.
ऑन्लाईन फोरम वर बोलताना ह्या सगळ्याचा जर आपल्याला त्रास व्हायला लागला तर मग आपण इथे का आणि कशासाठी येतो ह्याबद्दल परत विचार करायला हवा.
ऑन्लाईन फोरम वर येऊन आपण जेव्हा शेकडो सदस्यांशी बोलतो तेव्हा त्यांनी कुठल्याही विषयात/संदर्भात आपल्याला हवा तसा रिस्पॉन्स देतील ही केवळ अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला ज्या सदस्यांशी संवाद साधायला आवडतो (आणि त्यांनाही आपल्याशी संवाद साधण्यात रस आहे असं गृहित धरु) त्याच सदस्यांबरोबर आपण आपला वार्तालाप सुरु ठेवू शकतो इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करुन.
आपण कोणाला आवडत नाही किंवा आपल्याविषयी कोणाच्या मनात काय आहे हा फोकस ठेवून जर इथे वावरायला लागलो तर वेड लागायची पाळी येइल.

वैद्यबुवा ह्या बिनडोक सदस्याला मानसोपचारांची तीव्र व तातडीची गरज आहे.

आता हे वाचावेतः

>>>ऑन्लाईन फोरम वर बोलताना ह्या सगळ्याचा जर आपल्याला त्रास व्हायला लागला तर मग आपण इथे का आणि कशासाठी येतो ह्याबद्दल परत विचार करायला हवा.
ऑन्लाईन फोरम वर येऊन आपण जेव्हा शेकडो सदस्यांशी बोलतो तेव्हा त्यांनी कुठल्याही विषयात/संदर्भात आपल्याला हवा तसा रिस्पॉन्स देतील ही केवळ अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला ज्या सदस्यांशी संवाद साधायला आवडतो (आणि त्यांनाही आपल्याशी संवाद साधण्यात रस आहे असं गृहित धरु) त्याच सदस्यांबरोबर आपण आपला वार्तालाप सुरु ठेवू शकतो इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करुन.
आपण कोणाला आवडत नाही किंवा आपल्याविषयी कोणाच्या मनात काय आहे हा फोकस ठेवून जर इथे वावरायला लागलो तर वेड लागायची पाळी येइल.<<<

माननीय प्रशासन,

निव्वळ उदाहरणादाखल तसे लिहिलेले आहे, कृपया राग मानू नयेत.

सगळ्यावर आपली मतं दिलीच पाहिजेत का बेफिकिर? Lol सतत स्टेज वर ते माईकचं बोंडूक हवच असतं हा तुम्हाला ल्हान पोराला अंगठा लागतो तसा. गपा की जरा कदी मदी! Proud

बेफिकीर (आणि वैद्यबुवा),

आपण सगळ्यांनीच या बाफचं गांभीर्य अबाधित ठेवायला पाहिजे, बरोबर ना? Happy

आ.न.,
-गा.पै.

माननीय अ‍ॅडमिन यांनी एक स्वतंत्र धाग काढुन एखादा आयडी का उडवला गेला याची कारणे तिथे नमुद करावीत, जेणेकरुन सुपातल्यांनाही त्याची जाणिव व्हावी.

नंदिनी यांना विनंती आहे की लेखन थांबवू नये व वैवकु सारख्या विकृत माणसा ला कायदेशीर कारवाई करुन धडा शिकवावा.

Pages