कृपया लक्ष द्या.

Submitted by नंदिनी on 9 February, 2015 - 07:23

अ‍ॅडमिन, वेबमास्टर आणि इतर मायबोलीकर. परत एकदा हाच्ग बीबी एडिट करतेय. कारण जे काही चालू आहे ते अत्यंत धक्कादायक आणि डिस्टर्बिंग चालू आहे.

आता २०:०८ वाजता मला +९१९०२८५८८८४१ या क्रमांकावरून फोन आलेला आहे. पलिकडची व्यक्ती म्हणे मी वैभव कुलकर्णी बोलत आहे. मी पुन्हा फोन केलात तर पोलिस कंप्लेंट करेन इतके बोलून फोन बंद केलेला आहे.

माझा नंबर या व्यक्तीकडे कसा गेला माहित नाही, तो माझ्यादृष्टीनं फार महत्त्वाचा इशु नाही. पण हे अशापद्धतीनं फोन करणं, एखाद्या बीबीवर फोन नंबर मागनं आणि मग फोन करणं इज क्रीपी आणि हॉरीबल.

बहुतेक या व्यक्तीला मानसोपचारांची नितांत गरज आहे. पण मनोरूग्ण म्हणून त्याचे असले नखरे आणि धंदे इग्नोर करायचे का?

आजचा अख्खा दिवस मायबोलीच्या इतक्या वर्षांमधला सर्वांत वाईट दिवस होता. इतकंच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा फार सुरेख अप्रतीम आहे अगदी वाचतच रहावे संपूच नये असे वाटते

जादू आहे आपल्या लेखनात
अतीशय उत्तम लिहिता आपण मला नेहमीच खूप आवडते

(संपादित)

वैवकु, मागे माझ्या एका कवितेवर बरळल्यामुळे तुम्हाला अ‍ॅडमीनने चांगलंच खडसावलं होतं आणि पुन्हा असलं काही केल्यास कारवाई केली जाईल हे सांगितलं होतं हे विसरलेले दिसताय तुम्ही.

फालतू प्रतिसाद देणे बंद करा. आवडली तर आवडली म्हणा नाहीतर नाही आवडली म्हणा. बस्स.

नंदिनी हा ही धागा डिलिट कर प्लीज.

insane? <<<<< मला हा इंग्रजी शब्द कळत नाहीये माझे इंग्रजी ज्ञान कच्चे आहे

पण माझा एक शेर आठवला जमल्यास भावना समजून घ्याव्यात

मी असाच आहे बरका त्यामुळेच जगतो आहे
नाहीतर मी नसते का मरण्याचे धाडस केले

Sad

are you completely insane?<<<< सीरीयसली तसंच वाटतंय!!!!

खूप दिवसांनी काहीतरी मायबोलीवर टाकावंसं वाटलं तर सगळा उत्साहच गेला. तिसरा पार्ट अलमोस्ट लिहून रेडी होत आला होता. पण आता टाकणार नाही.

डिस्क्लेमर: निगेटीव्ह कमेंट्समुळे ही उद्विग्नता आलेली नाही पण दोन स्त्री आयडींचे खरेखुह्रे मोबाईल नंबर मागून ते देणार्‍याला हजार रूपये जाहीर इनाम वगैरे जे काही बरळलं गेलंय त्याणं ही उद्विग्नता आली आहे.

नंदिनी नाराज झाल्याने प्रतिसाद खोडून काढत आहे
तरीही ह्यात काहीही म्हणजे काहीही आक्षेपार्ह लिहिले नव्हते !! तरी असो
क्षमस्व

अरेरे ...वैवकुच्या अर्थहीन प्रतिसादांबद्दल आपणांस एका चांगल्या कथेला मूकावे लागणार वाटतेय.. Sad
वैवकु आपणांकडून असल्या बाष्कळ प्रतिसादांची अपेक्षा नव्हती.

मायबोलीवर यापुढे लेखन बंद!!>>> अरे नंदिनीताई काय हे Sad Sad :(. मायबोली वैवकु सारख्याच आयडीनी बनलेली नाही. तुमच्यासार्ख्या किंवा नवोदीत तसेच अनेक दर्जेदार लेखनाला, लेखकांना मायबोलीने (माबो आयडीने) नेहमीच appreciate केले आहे. त्यामुळे प्लीज प्लीज एका आयडीच्या बालीश प्रतिसादामुळे असे करू नका. प्लीज

यापुढे नंदिनीला वाईट वाटेल असे प्रतिसाद देणार नाही असे लिहून देतो
पण माझ्या प्रतिसादा वरून नाराज होवून तिने चाहत्याना नाराज करू नये अशी विनवणी

च्या नसत्या कमेंटसमुळं तू लेखन बंद करू नकोस प्लीज.>>> प्रश्न केवळ माझा नाही. माझ्या कमेंटवर जो आयडी हसला होता त्याच्याहीबद्दल त्यानं असंच बोलणं चालू केलं होतं. माझ्यामुळे दुसर्‍या कुणाला त्रास झाला तर त्याला जबाबदार कोणे????

बरं, वैतागून तो बीबी डीलीट केला तरी याचे तारे चालूच आहेत. या बीबी वर स्वतःचा मोबाईल नंबर टाकलाय. उद्या परस्पर आमच्या नावानं याला कुणी फोन केले आणि काय झालं तर क्कोण जबाबदार??

काहीतरी सभ्यतेचे मॅनर्सचे एटीकेट्स वगैरेची अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे का? गेली सात वर्षं मायबोलीवर लिहितेय. कित्येक वादविवादांंमध्ये भाग घेतलाय, भांडणं केलीत, निगेटीव्ह कमेंट्स दिल्यात, मलापण कुणीतरी दिल्यात पण हा असला विकृत प्रकार पहिल्यांदा पाहिला. आताही त्याचा प्रत्येक कमेंटवर फार संयम ठेवून प्रतिसाद दिलेला आहे.

माझा फोन नंबर देणार्‍याला हजार रूपये इनाम देणार आहेत म्हणे हे जहागिरदार. मायबोली म्हणजे काय डान्स बार वाटला????????????? बायापोरींचे फोन नंबर जाहीरपणे मागून पैसे उडवायला???????? नंतर अंगलट आल्यवर म्हणे मी गंमत केली. मग प्रतिसाद एडिट केले.

आम्हाला समजलेत काय हे?????
मायबोलीवर लिहिणं हे खरंच तापदायक होत चाललेलं आहे.

अहो चिडू नका ताई माझा खुलाशाचा प्रतिसाद पुन्हा देतोच इथे प्लीज गैरसमज करून घेवू नका व पसरवूही नका !!!!!
आपल्या ह्या अश्या पावित्र्यामुळे माझ्या सदस्यत्वाला बाधा आणण्याचा आपला प्रतय्न आहे का असेल तर तसे सांगा स्पष्ट मीच निघून जाईन !!!

तो प्रतिसाद ......

______________

आता उडवालात ना तो धागा मग आता काय झालं

नंबर मागीतले त्यात काय वाईट स्त्रियांचे असले म्हणजे काय झालं
ही असुरक्षितता आपल्या मनातच घर करून असेल तर मी काय करणार

नंबर मिळाला असता तर मनमोकळेपणे बोलून मनातले गैरसमज दूर करता येतात यास्तव मागीतलेले
बाकी मला माझा नंबर देण्यात काहीच अडचण नाही
९०२८५८८८४१ हा माझा नंबर आहे मी महाराष्ट्रात पंढरपुरात राहतो

आणि जरा काही खुट्ट झाले की संयोजकाना कळवणे म्हणजे आपण आपल्या स्त्रीत्वाचा अगाउ गैरफायदा घेणे नव्हे काय मी काय बोध घ्यावा हा कसला स्त्रीसक्षमीकरण प्रयत्न म्हणायचा

असो आपल्याला वाटले तर आपला नंबर आपण स्व्तः देवू शकता किंवा मला फोन करू शकता

स्व्तःला आपला एकतर्फी मित्र समजणारा

वैवकु

_____________

hyaa udaaharaNaachyaa pratisaadaat dusaRyaa oLeet ""kaay vaaeeT"" ...hyaa shabdaanaMtar coma (= ,) dyaayachaa raahilaa xamasv

_____________
नंबर मागीतले त्यात काय वाईट , स्त्रियांचे असले म्हणजे काय झालं ? असे वाचावे प्लीज
नंबर मागीतले त्यात काय....... वाईट स्त्रियांचे असले म्हणजे काय झालं ? असे वाचूनये अशी प्रार्थना

कॉपी पेस्ट करताना जसेच्या तसे करावे म्हणून तिथे संपादित केले नाही क्षमस्व

ह्यापुढे बायकांच्या वाट्याला जायचे नाही कानाला खडा काहीही अर्थ काढून माझी बदनामी होवू शकते
तेव्हा कानाला खडा

इतकेच काय मी मायबोलीवर गझलविभाग सोडून कुठेही फिरकणार नाही अशी प्रतिज्ञा !!!

Ha dhaga vahata zalay yacha arth admin ne sagal vachalay...
Tarihi vaivaku ya id wr kahich karavayi ka zali nahiyeyach valid karan admin kade aselch..
Te kalel kai?

Vaivaku u lost all d respect i had fr u

Ithun pudhe ek gosht lakshat theva mi changalya gharatali mulgi ahe. Paise deun number vagaire magayache prakar mazyasobat karanyachi himmat punha kelit tr gath mazyashi ahe...

Tumhala tumhi swata far gund vagaire watat asal mhanun mala dhamaki deun ghabaravanyacha prayatn karat asal tr ek lakshat ghya ki tumhala mahit nahi tumhi konashi panga ghetay te

रीया, धागा वाहता नाहिये. या महाशयांच्या तांडवनृत्याला कंटाळून मी वेगळा बीबी काढला तर तिथंपण येऊन धांगडधिंगा चालूच आहे.

सर्वात आधी यांनी या दोन मुलींचे नंबर देणार्‍याला हजार रूपयाचे इनाम घोषित केले होते त्याबद्दल आता चकार शब्द बोलत नाहीत. असो. अति झालं आणि हसू आलं.

Paise deun number vagaire magayache prakar mazyasobat karanyachi himmat punha kelit tr gath mazyashi ahe...<< अरेच्या रिया पैसे देण्याचा अर्थ असाही लावली जाईल ह्याचीकाहीच कल्पना आप्ली नाही मला

क्षमस्व रिया माफ कर मला मी अनभिज्ञ होतो की असाअर्थ लावला जाईल म्हणून
मी संयोजकांची नंदिनीजींची व मामींची माफी मागीतली आहे
तुझीही माफी मागतो प्लीज आय बेग टो यू ऑल माझ्या सदस्यत्वाला इजा पोचवू नका प्लीज मझे सर्व गझललेखन इथे आहे ते पुसलेजाईल अशी भीती वाटते

मला हे इतकेसोडून काहीही शिक्षा करा पण प्लीज सदस्यत्व ......नको प्लीज मला माफ करा मी सपशेल माफी मागतो
माझ्या बोइलण्यातून चुकीचे अर्थ निघतात व ते इतके वाईट आहेत ह्याचीपुसटशी कल्पनाही मला नव्हती

प्लीज माफी असावी काही करा मला वाचवा माझे सदय्सत्व वाचवा मी प्राणांतिक भीक मागतोय माफ करा माफ करा माफ करा

वैवकु,

तुम्ही मला विपू केलीत म्हणून ह्या धाग्यावर आलो. मी सहसा इतर काही लेखन वाचत नाही त्यामुळे अनेक गोष्टी मला समजतच नाहीत. येथे तुम्ही काहीतरी विचित्र प्रकार केलेला दिसत आहे. तुम्ही एक सभ्य मुलगा आहात हे मला व्यक्तीशः माहीत आहे, पण तुमचा अतीस्पष्ट स्वभावही मला माहीत आहे. ह्या स्वभावामुळे आपण गाजतो असा गैरसमज चुकून झालाच असेल तर तेवढा कृपया टाळावात. अनेक ठिकाणी अशी स्पष्टोक्ती चमकून दिसते हे खरे आहे. पण स्त्रियांशी बोलता-वागताना जे बोलले जाते त्याचे विविध अर्थ निघू शकतात हे तुम्हाला माहीत नसेल असे नाही. तेव्हा संपूर्ण काळजी घ्या की तुमच्या एखाद्या विधानाचा काही तिसराच अर्थ तर निघणार नाही ना?

नंदिनी येथील जुन्या सदस्या आहेत व त्या येथे नियमीतपणे लिहितात. त्यांचा वाचकवर्गही मोठा आहे आणि बहुधा त्यांचे येथील अनेकांशी प्रत्यक्ष आयुष्यातही (मायबोलीमुळेच) मित्रत्वाचे संबंध आहेत. तसेही, असे काहीच नसले तरीही स्त्रियांचे नंबर मागणे (पैश्याची वगैरे भाषा करून) हे अजिबात चांगले नाही.

तुम्ही मला म्हणाला आहात की मी तुम्हाला मदत करावी. आपले गझलेमुळे असलेले मैत्रीचे संबंध लक्षात ठेवून मी खालील दोन प्रकारची मदत तुम्हाला करत आहे.

१. नंदिनी व संबंधितांची जाहीर माफी मागण्याचा सल्ला देत आहे. तुमच्या मनात तसले काहीही असू शकत नाही हे मी व्यक्तीशः जाणतो, पण हा प्रकार येथेच संपवण्याची त्यांना विनंती करावीत.

२. दुसरी मदत म्हणजे मी सर्व संबंधितांना विनंती करत आहे की वैवकु हा प्रत्यक्ष आयुष्यात व्यवस्थित सभ्य माणूस आहे ह्या माझ्या विधानावर विश्वास ठेवून कृपया ह्या धाग्यावर त्याने केलेल्या आगळीकीबाबत त्याला एकदा माफ केले जावे.

नंदिनी,

लेखन बंद करण्याचा निर्णय घेऊ नयेत असे मला वाटते. मी तुमचे लेखन आजवर वाचलेले नाही, पण तुमच्या लेखनाचे कित्येक चाहते आहेत हे मला माहीत आहे. एखाद्या घटनेमुळे असा काही निर्णय घेऊ नयेत असे म्हणावेसे वाटते.

-'बेफिकीर'!

दोनी धागे वाचले.
यापूर्वी माबोवर वाद, निगेटिव कॉमेंट्स वगैरे झाले पण हे असे फोन नं. द्या वगैरे झाले नव्हते. Sad

शब्दात (दुसर्‍याला हर्ट होइल अशा शब्दात विशेषकरुन) खूप सामर्थ्य असते. ते जपुन वापरायला हवेत. या प्रकरणावरुन ज्याने हे केले त्याला आणि इतरही बाफांवर काही अतिशहाणे लोक दुसर्‍यांच्या मनाला लागेल असे कुजकट लिहित असतात त्यांना थोडेफार शिकता आले तर शिकावे.

नंदिनी,
या एका माणसामुळे तुमचे लिखाण आवडीने वाचणार्‍यांना ते वाचता येणार नाही. वर लिहिलेल्या कॉमेंट्स वरुन त्याला धडा मिळाला आहे असे दिसतेय. कृपया आपल्या निर्णयाचा फेरविचार जरुर करा.

वैवकु,

मी ह्या धाग्यावर तुमच्यामुळे आलो व तेव्हा ह्या धाग्यावर नंदिनींनी फक्त एक ते दहा आकडे लिहिलेले दिसले. ह्याचा अर्थ त्यांनी ह्या धाग्यातील मजकूरही डिलीट केलेला असावा.

तो निर्णय त्यांचा आहे. हे तुमच्यामुळे झाले असे त्यांचे म्हणणे असेल तर तुम्ही त्याचा अर्थ समजून घ्यायला हवात व स्वतःच्या आंतरजालीय जाहीर व्यासपीठांवर बोलण्याच्या लकबीत आमूलाग्र बदल करायला हवेत.

मात्र, एक तुमच्यापेक्षा वयाने ज्येष्ठ म्हणून सांगतो, मी तुम्ही सांगितलेल्या सर्वांच्या विपू वाचल्या. तुम्ही सर्वांची अनेकदा माफी मागीतलेली दिसत आहे. मात्र माफी मागण्याबरोबरच तुम्ही असेही म्हणताना दिसत आहात की मायबोलीवरील सदस्यत्व जाण्याला तुम्ही फार घाबरता. ही बाब घाबरण्यासारखी नाही. येथील प्रशासनही दयाळू आहे. शिवाय, तुम्ही मायबोलीवर सरस गझलाही दिलेल्या आहेत. एवढे करून सदस्यत्व गेले तर त्यातून तुम्हालाच एक चांगली शिकवण मिळेल. सदस्यत्व जाण्याला घाबरण्यापेक्षा आपल्यामुळे कोणाला 'वैयक्तीक' (पुन्हा लिहितो, 'वैयक्तीक') मनस्ताप होत नाही ना ह्याची काळजी अधिक घ्यावीत.

-'बेफिकीर'!

तिसराच अर्थ???
दुसऱ्याचा नंबर तिसऱ्याकडून पैसे देऊन मागणे याचा पहिला आणि दुसरा अर्थ काही असला तर मलातरी समजला नाही.

ओळखदेख नसताना फाजिल सलगीचे प्रतिसाद लिहिणे, घाणेरडा अर्थ निघेल असे प्रतिसाद लिहिणे आणि मग वर साळसूदपणाचा आव आणून माफी मागणे, असा उद्देश नव्हताच, लिहिण्यात चूक झाली वगैरे लिहिणे असल्या प्रकाराला स्टॉकिंग म्हणतात. आणि हा गंभीर गुन्हा आहे.

Pages