कृपया लक्ष द्या.

Submitted by नंदिनी on 9 February, 2015 - 07:23

अ‍ॅडमिन, वेबमास्टर आणि इतर मायबोलीकर. परत एकदा हाच्ग बीबी एडिट करतेय. कारण जे काही चालू आहे ते अत्यंत धक्कादायक आणि डिस्टर्बिंग चालू आहे.

आता २०:०८ वाजता मला +९१९०२८५८८८४१ या क्रमांकावरून फोन आलेला आहे. पलिकडची व्यक्ती म्हणे मी वैभव कुलकर्णी बोलत आहे. मी पुन्हा फोन केलात तर पोलिस कंप्लेंट करेन इतके बोलून फोन बंद केलेला आहे.

माझा नंबर या व्यक्तीकडे कसा गेला माहित नाही, तो माझ्यादृष्टीनं फार महत्त्वाचा इशु नाही. पण हे अशापद्धतीनं फोन करणं, एखाद्या बीबीवर फोन नंबर मागनं आणि मग फोन करणं इज क्रीपी आणि हॉरीबल.

बहुतेक या व्यक्तीला मानसोपचारांची नितांत गरज आहे. पण मनोरूग्ण म्हणून त्याचे असले नखरे आणि धंदे इग्नोर करायचे का?

आजचा अख्खा दिवस मायबोलीच्या इतक्या वर्षांमधला सर्वांत वाईट दिवस होता. इतकंच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>वैवेकु यांच्या नावाने दुसर्‍या कुणितरीच फोन केला असेल ही पण शक्यता आहे<<<

मा. वेमा,

नंदिनींनी त्यांच्या सेलफोनवर आलेला नंबरही दिलेला आहे.

असो.

तुमच्या सर्व मतांनुसार वागण्यास बद्ध!

-'बेफिकीर'!

शहाणे असतील तर वैवकुंनी आता संकेतस्थळांवरचा आपला बेछूट वावर थांबवला पाहिजे . मायबोलीवरही डुप्लीकेट आयडी घेवून परत येणे वगैरे प्रकार करू नये .

काही मानसिक आजार असेल तर उपचार केले पाहिजेत
त्यापेक्षा चांगले गझल लेखन कसे करता येइल ह्याचा विचार करावा .
काही असो आता झाले ते झाले .

त्यांना ह्या कामी व उर्वरीत आयुष्यातील वाटचालीत अनेकनेक शुभेच्छा

हा विषय खरोखर थांबला पाहिजे असे बेफीकीर सरांसारखेच मलाही वाटत आहे

बेफ़िकीर... मला माफ करा.. पण मि गेलि १० वर्शे मि मायबोलि वरचा नियमित वाचक आहे. तुमचे पण साहित्य वाचत असतो.. सगल्यांचेच... पण मला जरा आज खटकले म्हणुन मि पोस्ट केले..

कृपया, आता तरी विषय संपवा असे सर्वांनाच नम्र आवाहन!
<<
<<

प्रकरण गंभीर दिसतय, तरिही बेफिकीरजी म्हणतायत त्याला अनुमोदन.
तरीही शेवटचा निर्णय नंदिनी यांचा आहे.

लिहिलेले वाक्य खोडले की हा धागा रद्द केला जाऊ नये, पुढील शहानिशेच्या दृष्टिकोनातून!

माननीय प्रशासन,

हॅट्स ऑफ

अजून एक वाक्य लिहिण्याची आवश्यकता भासत आहे.

हा धागा प्रतिसादांसाठी बंद होऊ नये असे वाटत आहे.

ह्याचे कारण......

वैवकु यांनी केलेल कृत्य अतिशय निंदनीय आहे .मामीच्या एका बाफ वरही असाच प्रकार केला होता . यावेळी योग्य ती कारवाई केल्याबद्दल प्रशासनाचे आभार !

Vaivaku tumhi mahan ahat....
Itak hounahi ek navach koni tari ya id ne yeun kiti balishpana karal?

Ha id tumacha nahi ase tumche mat asrl tr mazya vipu madhe tumhich swatahun dileli kabuli ekda vachun ya.... bahuda page number १७ wr milel

काय झाले ते अर्धवट कळले. पण वैवकु तुमची भाषाच काय ते बोलते. एका मान्यवर सदस्येला अशी भाषा वापरुन बोलणे आणी परत फोन- बक्षिस वगैरे जाहीर करणे हा कळसच आहे. आवरा.

वेबमास्टर, मी पोलिसांकडे सध्यापुरतं तरी तक्रार न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मोबाईल वर तो नंबर ब्लॉक केलेला आहे. त्यामुळे सध्या तरी माझ्यापुरतं ठिक आहे. परत दुसर्‍या नंबरने त्यानं अथवा इतर कुणी अनावश्यक कॉल केलाच तर योग्य त्या पद्धतीनं प्रकरण हाताळता येईलच.

सध्या मी हे दोन्ही धागे अप्रकाशित करू शकते का?

नंदिनी,
तुम्ही काय करावे हे तुमचे तुम्ही ठरवायचे आहे. पण तुमचा निर्णय दुर्देवी आहे असे मला वाटते. अशा सारख्या अत्यंत गंभीर प्रकाराची खरोखरच शहानिशा व्हावी असे मला वाटत होते.

पण हा धागा अप्रकाशीत व्हावा असे तुम्हाला का वाटते , त्यामुळे तुमचे काय नुकसान होते आहे हे समजेल का? उलट मायबोलीवर असे प्रसंग येऊ नयेत म्हणून आपण ते गंभीरपणे घेतो, त्याबाबत योग्य त्या ऑथॉरीटीजना पूर्ण सहकार्य देतो हा पारदर्शकपणा होणार नाही का?

हा धागा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून तुम्ही स्वतःच सार्वजनिक मंचावर तुमच्या अनुभवाबद्दल लिहलंत आणि ते योग्यच आहे, पण आता एकदम ते अप्रकाशित का करायचे?

तुम्ही मला तुम्हाला आलेल्या कॉलचे स्क्रीनशॉटही देणार होतात ना? म्हणजे परत असा प्रसंग घडला तर आपल्याकडे थेट पुरावाच असेल ना? आणि परत असे होऊ नये म्हणून ते एक उदाहरण असेल ना?

मी खूप गोंधळात पडलो आहे. मायबोलीवरचा तुम्हाला आलेला अत्यंत वाईट अनुभव, तुमचे लेखन मायबोलीवर करणार नाही अशी घोषणा, त्यावर मायबोली प्रशासनाने तातडीने कारवाई केली, तुम्हाला पोलीसात जाण्याचा सल्लाही माझ्यासकट काही जणांनी दिला, तूम्ही मला कॉलचे स्क्रीनशॉटही देणार हे ही कळवलं आणि आता हे अचानक काहीच घडलं नाही असं होण्यासाठी म्हणून अप्रकाशीत करायचं? तुमचे मत एकदम का बदलले?

लोकहो,

नंदिनी यांनी पोलिसांत न जाण्याचा घेतलेला निर्णय यथोचित वाटतो. वैवकु यांच्या नावे वासपीडेचा (स्टॉकिंग) गुन्हा नोंदवला गेला तर प्रथम पोलीस गुन्हेगाराची नियत (इंटेंट) पाहतील. वैवकु यांचा फोन करण्याचा हेतू नंदिनी यांना मुद्दाम त्रास देण्याचा नसावा. त्यामुळे पोलिसांच्या हाती फारसं काही लागणार नाही. मधल्यामध्ये नंदिनी यांचा मनस्ताप कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे एकंदरीत सुयोग्य निर्णय आहे.

नंदिनी, वैवकु आणि इतर सन्माननीय सदस्य यांनी लिहिलेले मजकूर मी पूर्णपणे वाचलेले नाहीत. माझं मत अपुऱ्या माहितीवर बेतलेलं असल्याची जाणीव आहे.

आ.न.,
-गा.पै.

<<हा धागा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून तुम्ही स्वतःच सार्वजनिक मंचावर तुमच्या अनुभवाबद्दल लिहलंत आणि ते योग्यच आहे, पण आता एकदम ते अप्रकाशित का करायचे?>> + १११११

1.धागा अप्रकाशित करु नये. Let this be a lesson to people who take others for granted.

2.नंदिनींचा निर्णय प्रॅक्टिकल आहे. सुधारण्याची एक संधी त्यांनी दिली आहे..पण परत त्रास देणे सुरु झाले तर क्षणाचाही विलंब न लावता लगेच तक्रार नोंदवावी.

धन्यवाद नंदिनी, तुमच्या कडून कॉलचा स्क्रीनशॉट मिळाला आहे.
हा धागा तसाच प्रकाशित ठेवत आहे पण "आपली मायबोली" या ग्रूपमधे हलवला आहे. त्यामुळे तुमच्या अडचणीचे निराकरण होईल आणि धागा प्रकाशित राहिल्यामुळे पारदर्शकता ही राहील.

माझ्या छोट्याश्या मायबोली कारकिर्दीत पाहिलेला सर्वात दुर्दैवी प्रकार.

नंदिनी यांनी वेगळा धागा काढत याला प्रसिद्धी मिळवून देणे, तसेच एडमिन यांची कारवाई देखील योग्य. जेणेकरून यापुढे असे काही पोस्ट करताना एखादा हजार वेळा विचार करेन.

प्रकरण यापुढे वाढू न देण्याचा नंदिनी यांचा निर्णयही योग्य. भले तो निर्णय झाली ती शिक्षा पुरे झाली या विचारातून घेतला असेन वा स्वताचा मनस्ताप टाळायला तसे केले असेन.

वैवकु यांचे माफीचे प्रतिसाद ज्या कळकळीने दिलेले होते ते वाचत असताना त्यांच्याबद्दल एक क्षण सहानुभुतीही वाटली, खोटे नाही बोलणार...
पण काही चुकांमध्ये संशयाचा फायदा देणे वा एखादी चूक माफ करणे होत नाही. ही चूक देखील अश्याच चुकांमध्ये मोडते. किंबहुना कळत असो वा नकळत, हि चूक नसून गुन्हा आहे.
जर नंदिनी यांच्या जागी आपली सख्खी बहिण असती तर आपली काय भुमिका असती असा विचार केल्यास आपले आपल्याला उत्त्तर मिळून जावे.

जर संबंधितांना प्रकरण इथेच थांबवायचे असेल तर कोणी आपले पर्सनल स्कोअर सेटल करायला या प्रकरणाचा वापर करू नये. यातून आता फक्त बोध/धडा घेणेच योग्य.

मायबोली आपली वाटत असल्याने येथील वातावरण गढूळ होऊ नये किंवा कोणत्याही महिला सभासदाला इथे वावरताना किंचितही असुरक्षितता वा संकोच वाटू नये या भावनेतून चार शब्द लिहिले.

झाल्या प्रकाराचा मी तीव्र निषेध करतो, तसेच नंदिनी यांना माझे समर्थन आहे.

ऋन्मेऽऽष यांच्या वरील संदेशास अनुमोदन.

वैवकु यांची क्षमायाचना पाहून क्षणभर मलाही सहानुभूती वाटली होती. त्यांनी संपर्क क्रमांकाच्या पैसे देऊ केले होते त्यास दौलतजादा म्हणावंसं वाटंत नाही. नंदिनी यांची माफी मागायला खिशातले सगळे पैसे घालवायची तयारी आहे, असा काहीसा अतिरिक्त आणि अनावश्यक उत्साह यामागे वाटतो. पण अर्थात नंदिनी आणि प्रशासक याबाबत अधिक जाणतात.

माझं हे मत अपुऱ्या माहितीवर बेतलेलं असू शकतं. कारण मी सगळा मजकूर वाचला नाहीये.

-गा.पै.

वेमा/अ‍ॅडमिन,
तुम्ही पोस्टीत म्हटल्याबद्दल हि गोष्ट आताच विचारून घेते,

वैयक्तिक शेरेबाजी बद्दल मायबोलीचे धोरण कुठे लिहून ठेवलय काय?
एखाद्या आयडीला सतत टारगेट करून शेरे मारणे? हे आणि नक्की कुठले आडाखे बांधून ठरवू शकतो की सायबर गुन्हा मध्ये हे वागणे 'धरू' शकतो कारण स्टाकींग बरोबरच हे वैयक्तिक शेरे आहेत?

लेखनावर प्रतिसाद देता देता, त्या आयडीबद्दल कोडगा, मेंटल ऑब्सेशन असे संबोधन देणे आहे वगैरे वगैरे कुठल्या प्रकारात येते?

असे काही आधीच लिहिले असल्यास वाचायला मिळेल का?

झालेल्या दुर्दैवी घटनेला पुर्णविराम मिळाला याचे बरे वाटले. घटनेच्या संबंधितांनी त्यांचे निर्णय घेतलेत / घेतील, या पुढच्या प्रतीक्रियांमधे भावनांना आवर घालून; 'तेल ओतणारे' शब्द, सल्ले टाळले जातील अशी अपेक्षा!
नंदिनी, शांत चित्ताने परत पेन (की-बोर्ड) हाती घ्यावा...आपणास शुभेच्छा!

मंदार जोशी या विकृत आयडीने मी जयंत फाटक याना दिलेला माझा मोबाइल नंबर माझ्या परवानगीशिवाय मिसळपाववर एक ठिकाणी विनाकारणच प्रकाशित केला होता.

काही वेळाने मिपा प्रशासनाने तो प्रतिसाद उडवला.

या प्रकारातून जोशीबुवा योग्य तो धडा घेतील ही अपेक्षा. दूसर्‍याच्या विपुतून तिसर्‍याचा नंबर घेऊन चौथ्याला परस्पर देऊन मजा बघत बसणे या लबाड विकृतीचाही मी निषेध करत आहे.

ह्या सर्व घटनेने मायबोलीवर काही चांगले घडेल अशी आशा बाळगणे गैरवाजवी आहे.

वैयक्तीक टीका, जातीय उल्लेख करुन टीका, पक्षीय निष्ठांवर टीका यासारखे प्रकार बंद होतील का ? मला वाटत नाही. "आपले मत मला पटत नाही पण व्यक्ती म्हणुन मी आपला आदर करतो " ही संस्क्रूती निर्माण होईल असे वाटत नाही. याचे कारण बेलगाम बेछुट टीक करणे, सोपे असल्याने मानवी प्रवृत्तीना मोकळे रान मिळते.

मुळातच सदस्यत्व नोंदणी कोणतेही खात्रीचे वैयक्तीक रेकॉर्ड न तपासता दिली जाते. इमेल आय डी हा बोगस असु शकतो. मग ड्यु आय डी तयार होऊन एखाद्या व्यक्तीला त्रास देणे सहज घडु शकते.

मायबोली प्रशासन आपल्या सदस्यांची सरसकट संख्या वाढवण्याच्या पेक्षा दोन प्रकाराने सदस्यत्व देऊ शकते. ज्यांची आय डी व्हेरीफाय झाली आहे अश्यांना लेखनाचा/ प्रतिक्रियांचा अधिकार. अन्य फक्त वाचु शकतील.

ह्या आधाराने चुकीच्या लिखाणाची माफी न मागीतल्यास पोलीस केस चा मार्ग मोकळा होईल.

थोडे अवांतर करतो. जो काही प्रकार झाला त्याबद्दल अनुकंपा आहे.

पण मायबोलिवर किती प्रमाणात रोज चिखलफेक होत असते? अलिकडे रोज वैद्यबुवा मला एकदा तरी तुम्ही इनसेन अहात, डोके फिरले आहे, बिघडले आहे, डोके चेक करुन घ्या, काही खरे नाही अशा कमेन्ट लिहितात. मी ह्या कमेन्ट्सवर एकदाही त्यांना उत्तर दिले नाही. कारण मला त्यांचा अनुल्लेख करायचा होता. मी नाही बोललो म्हणून त्यांनी रोज लिहून लिहून आता एक दिवसात ते कुठेतरी थांबले. पण मला फार सखेद आश्चर्य वाटले की ज्या व्यक्तीशी माझा काडीचाशी संबंध येत नाही त्यानी माझ्याबद्दल इतके उग्र लिहावे. आणि ह्याचे परिणाम असे झाले की त्यांचेच मित्र अमितव हे देखील असेच बोलायला लागले. अमितव आणि माझाही कुठे संबंध येत नाही. आम्ही अगदी तुरळक कधीतरी बोललो असेल इतकेच. पण मैत्रि म्हणून असे काही नाही.

मी इथल्या प्रशासकांना कधी ह्याबद्दल तकार केली नाही कारण हे वाद आपण आपले मिटवलेले बरे असतात. पण इथे जी चिखलफेक सुरु असते ती फार त्रासदायक असते.

प्रकाशकांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी विपु बघायची जी सोय केली आहे ती आधी बंद करावी. लोक उठसुठ इतरांच्या विपुत डोकावतात आणि त्याचा खूप फायदा घेतात. काही जण गप्पांच्या पानावर इतरांच्या विपुच्या लिंक पुरवतात हे देखील गैर वटते. विपु ही एखाद्या मेल सारखी ..पत्रासारखी गोष्ट आहे. ती वाचायला कुणालाही अनुमती असणे हे मला गैर वाटते.

धन्यवाद. चुभुदेघे.

त्यांनी संपर्क क्रमांकाच्या पैसे देऊ केले होते त्यास दौलतजादा म्हणावंसं वाटंत नाही. नंदिनी यांची माफी मागायला खिशातले सगळे पैसे घालवायची तयारी आहे, असा काहीसा अतिरिक्त आणि अनावश्यक उत्साह यामागे वाटतो<<< त्यांनी पोस्ट्स एडिट केल्या होत्या, पण वास्तविक त्यांनी आधी "या दोन आयडींचे खरेखुरे मोबाईल क्रमांक देणार्‍याला मी हजार रुपये इनाम देईन" ही पोस्ट टाकली. त्यावर मी अ‍ॅडमिनकडे तक्रार केल्यावर मग त्यांनी चार पाच अत्यंत हीन कमेंट्स टाकल्या, आणि मग प्रकरण शेकेल हे लक्षात आल्यावर माफी मागायला सुरूवात केली.

हे स्पष्टीकरण अशा लोकांसाठी ज्यांना नक्की काय झालं ते माहित नाहीये.

माबो सदस्यांना माबोवर त्यांच्याशी होणार्‍या वागणूकीबद्दल, आणि येथील बाफ, विपु मधेच सीमित राहणार्‍या पोस्ट्स बद्दल तक्रार असेल तर त्यापेक्षा हा प्रकार वेगळा आहे. दोन्हीची गल्लत करू नये.
(नंदिनी, हे तुला उद्देशून नाही. तेवढ्यात तुझी पोस्ट आली म्हणून खुलासा).

झालेल्या गैरप्रकारावर मायबोली प्रशासनाने तातडीने केलेली कारवाई पाहून मन आश्वस्त झाले .

नंदिनी तुला खूप मनस्तापातून जावं लागलंय पण तू ज्या हिमतीने ही गोष्ट समोर आणलीयेस , त्यामुळे यापुढे

अश्या प्रकारांना नक्कीच आळा बसणार आहे..

तुझं लेखन यापुढेही तू चालू ठेवशील इथे, हे वाचून खूप छान वाटलं..

Pages