कृपया लक्ष द्या.

Submitted by नंदिनी on 9 February, 2015 - 07:23

अ‍ॅडमिन, वेबमास्टर आणि इतर मायबोलीकर. परत एकदा हाच्ग बीबी एडिट करतेय. कारण जे काही चालू आहे ते अत्यंत धक्कादायक आणि डिस्टर्बिंग चालू आहे.

आता २०:०८ वाजता मला +९१९०२८५८८८४१ या क्रमांकावरून फोन आलेला आहे. पलिकडची व्यक्ती म्हणे मी वैभव कुलकर्णी बोलत आहे. मी पुन्हा फोन केलात तर पोलिस कंप्लेंट करेन इतके बोलून फोन बंद केलेला आहे.

माझा नंबर या व्यक्तीकडे कसा गेला माहित नाही, तो माझ्यादृष्टीनं फार महत्त्वाचा इशु नाही. पण हे अशापद्धतीनं फोन करणं, एखाद्या बीबीवर फोन नंबर मागनं आणि मग फोन करणं इज क्रीपी आणि हॉरीबल.

बहुतेक या व्यक्तीला मानसोपचारांची नितांत गरज आहे. पण मनोरूग्ण म्हणून त्याचे असले नखरे आणि धंदे इग्नोर करायचे का?

आजचा अख्खा दिवस मायबोलीच्या इतक्या वर्षांमधला सर्वांत वाईट दिवस होता. इतकंच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आत्ता नंदिनींनी बदललेला मजकूर वाचला.

वैवकु,

तुम्ही जर त्यांना फोन केलेला असलात तर एक लक्षात ठेवा, जाहीररीत्य काहीही बोलून नंतर फोनवर गोष्टी सेटल होणे हे सर्वत्र होत नसते. त्यात पुन्हा नंदिनी हा एका स्त्रीचा आय डी आहे.

तेव्हा मूर्खपणा कृपया बंद करावात.

वैवकु,

आता सायबर क्राईम सेल खुप सतर्क झाली आहे. तुमच्या आय पी अ‍ॅड्रेस वरुन तुमचा पत्ता ट्रॅक करुन तुमच्यावर कारवाई करता येउ शकते. कृपया हे प्रकार त्वरीत बंद करा. तुमच्या स्वतःसाठी तरी.
हे प्रकरण इतके गंभीर वळण घेइल असे वाटले नव्हते पण ते आले आहे. वेळीच सावध व्हा.

Mazya vipu madhe pn ekda yeun number de mg bolato n ekda yeun mi gammat karat hoto mhanatayet he sabhya gruhasth...

Aso, nandinila phone kelat... maza number kuthun hi milala asel tar to adhi delete kara
Mala mafi magayala hi phone karayacha prayatn karanar nahit ashi apeksha ahe.

Vaivakunbaddal rag ahech pan nandinicha number tyana denaryachi tr mala kilas yetey.
Kiti nirlajj manas asu shakatat yach udaharan baghun dhanya dhanya watal

वैवेकु
कुठल्याही सभासदाचे (स्त्री पुरुष कुणीही) जाहिर फोन नं मागणे बंद करा. आणि कुणाही सभासदावर वैयक्तिक शेरेबाजी बंद करा. नाहीतर नाईलाजाने तुमचे सभासदत्व रद्द करावे लागेल.

एक बाब अतिशय स्पष्ट करू इच्छितो. सर्वांनाच उद्देशून!

वैभव वसंतराव कुलकर्णी ह्या मुलाने अगदी सुरुवातीला मला उद्देशून प्रतिसादांची अत्यंत हीन पातळी गाठलेली होती. नंतर माझ्या गझला माझ्या मदतीला धावल्या व त्याच्या लक्षात आले की हा माणूस असे घालून पाडून बोलण्यासारखा नाही. त्यानंतर आमची प्रत्यक्ष आयुष्यात मैत्रीही झाली. वैवकुचा स्वभाव मात्र बदलला नाही. भर सभागृहात गायन चालू असताना सर्वांसमक्ष कवी आणि गायकाला सुनावणे की ही गझल नाही, कवीवर्य प्रदीप निफाडकरांच्या घरी जाऊन त्यांच्याशी स्पष्ट बोलून येणे वगैरे प्रकार वैवकु करतच राहिला.

मात्र मायबोलीवरील काही आय डीं च्या वर्तनाबाबत मला एक गोष्ट व्यवस्थित माहीत आहे की विपर्यासही त्वरीत करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

तेव्हा,

जर कोणाचा चुकून माकून असा समज होत असेल की वैवकुंना नंदिनींचा नंबर मी दिला तर ह्याचक्षणी ते विचार मनातून परतवा. मी नंदिनींना ओळखतही नाही, त्यांचा नंबर माझ्याकडे नाही आणि असता तरी मी तो कोणालाही दिला नसता.

हे लिहिण्याचे कारण (पुन्हा लिहितो) इतकेच आहे की अ‍ॅडमीनच्या विपूमध्ये झालेले रणकंदन पाहून कोणते आय डी कशावर घसरतील ह्याचा मला आता अजिबात अंदाज येत नाही आहे.

-'बेफिकीर'!

Bhushan dada, if ur reply isfor me then trut me i know u will never give phone number even if u have...

वेमा, या व्यक्तीने केवळ नंबर मागितलाच नाही तर मिळवून नंदिनीला प्रत्यक्ष फोनही केला. अशा व्यक्तीला केवळ वॉर्निंग देणार का?

नंदिनी, तू खरंच सायबर क्राइमकडे तक्रार कर.

>>>या व्यक्तीने केवळ नंबर मागितलाच नाही तर मिळवून नंदिनीला प्रत्यक्ष फोनही केला.<<<

ह्यातील 'मिळवून' ह्या शब्दाला प्रशासन जबाबदार नाही. हे सगळे नंदिनींनी येथे जाहीर केले नसते किंवा असे प्रकार मायबोली सदस्यांमध्ये एरवी घडत असते व जाहीर केले जात नसते तर तुम्हाला कळलेही नसते.

कृपया, हे सगळे थांबवा असे माझे नम्र आवाहन आहे.

तो माणूस तसा नाही आहे. त्याने सर्वांची त्रिवार माफी मागीतलेली आहे.

दस्तुरखुद्द वेबमास्टरांनी प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कानउघाडणी केलेली आहे.

वेमा, अतिशय घाणेरडी भाषा वापरून या माणसाने लिहिले आहे. मागेही त्याने असेच चाळे केले आहेत. त्याला केवळ तंबी देऊन अजून एक संधी देताय?

गुड.

वेमा, या व्यक्तीने केवळ नंबर मागितलाच नाही तर मिळवून नंदिनीला प्रत्यक्ष फोनही केला. अशा व्यक्तीला केवळ वॉर्निंग देणार का?<<< सीरीयसली???

वेबमास्टर, नक्की काय केल्यावर या व्यक्तीचा आयडी रद्द होइल? मी तुम्हाला त्याचे सर्व एडिटेड प्रतिसाद ऑलरेडी मेल केलेले आहेत. त्यानं माझा नंबर देणार्‍या व्यक्तीला हजार रूपये इनाम अशी पोस्ट लिहिली होती.

मी प्रामाणिक मत नोंदवलं
त्यावर नंदिनी कुत्सित्पणे म्हणाली असेल तर माहीत नाही पण रियानं हसायला नको होतं
मायबोलीवरील काही कटु आठवणींमुळे मी नंदिनीला प्रतिसाद देताना जपून देत असतो इतकंच

मला रिया आणि नंदिनी यांचा फोन नंबर खरखुरा जो देइल त्याला रोख १००० रु प्रतेक फोन नंबर मागे देण्याचे
अत्ता इथे जाहीर करत आहे (माझ्याकडे आत्त तेवढेच आहेत
)

* काही नियम व अटी लागू

ही वरची ओरिजिनल पोस्ट. रणकंदन यावरून चालू झालं. त्यानंतर चार पाच अशाच किळसवाण्या पोस्ट्स आल्या, मी वैतागून बीबी अप्रकाशित केला. दुसरा बीबी ओपन केला तिथं फताफता नाचत पहिला प्र्तिसाद यानंच दिला. नंतर मामीनं कमेंट केल्यावर याने लिहिलेला दुसरा प्रतिसाद

आता उडवालात ना तो धागा मग आता काय झालं

नंबर मागीतले त्यात काय वाईट स्त्रियांचे असले म्हणजे काय झालं
ही असुरक्षितता आपल्या मनातच घर करून असेल तर मी काय करणार

नंबर मिळाला असता तर मनमोकळेपणे बोलून मनातले गैरसमज दूर करता येतात यास्तव मागीतलेले
बाकी मला माझा नंबर देण्यात काहीच अडचण नाही
९०२८५८८८४१ हा माझा नंबर आहे मी महाराष्ट्रात पंढरपुरात राहतो

आणि जरा काही खुट्ट झाले की संयोजकाना कळवणे म्हणजे आपण आपल्या स्त्रीत्वाचा अगाउ गैरफायदा घेणे नव्हे काय मी काय बोध घ्यावा हा कसला स्त्रीसक्षमीकरण प्रयत्न म्हणायचा

असो आपल्याला वाटले तर आपला नंबर आपण स्व्तःदेवू शकता किंवा मला फोन करू शकता

स्व्तःला आपला एकतर्फी मित्र समजणारा

वैवकु

हाही प्रतिसाद मी अ‍ॅडमिनकडे पाठवून तक्रार केली.

त्यानंतर या आयडीनं मला प्रत्यक्ष फोन केला. विपुमध्ये धुमाकूळ चालूच आहे. तरीदेखील केवळ वॉर्निंग.

धन्य आहे!!!! असो. न लिहिण्याचा निर्णय घेतलाच आहे. तो आता कटेकोरपणे अमलात आणला जाईल

>>>आयडी उडालेला दिसतोय.<<<

हो. आय डी उडालेला दिसत आहे.

एवढे सगळे घडत असताना, वैवकुने नंबर मागितला यावरून तणातणी होत असताना ज्याने इमानेइतबारे नंदिनीचा नंबर त्याला पोचवला त्या माणसाच्या भिकारीपणाची हद्द आहे.

हा माणूस मला जास्त धोकादायक आणि मोठा प्रॉब्लेम वाटतो. अर्थातच नंदिनीबरोबर झालेल्या कुठल्या तरी वादांचे स्कोर सेटल करण्यासाठी हे केले असणार त्याने.

हे प्रकरण माबोबाह्य आहे अर्थातच पण वैवकुपर्यंत नंबर पोचवण्याचे महत्कार्य करणारा इसम कोण, एकच इसम आहे की चेन आहे याचा शोध लावून किमान नंदिनीपर्यंत तरी ही माहिती पोचवायला हवी. जेणेकरून कुणापासून सावध रहायचं आहे हे कळेल.

मला वैवकु या आयडीपेक्षाही हा साळसूद इसम भयानक वाटतो.

म्हणजे उडालेला वैवकु हा फार साधाभोळा आहे असे म्हणणे नाही.

ओके. आयडी उडालेला असेल तर उत्तम.

बेफिकीर. माझा नंबर तुम्ही अथवा इतर कुठल्याही मायबोलीकरानं दिला असेल तर तो माझा कन्सर्न नाही. माझा नंबर याआधी एक दोन मासिकं आणि इंटरनेटवर ऑलरेडी उपलब्ध आहे आणि याची मला कल्पना आहे.

मुद्द होता तो "नंबर मागून जाहीर इनाम देण्याच्या किळसवाण्या वृत्तीचा!!

>>>बेफिकीर. माझा नंबर तुम्ही अथवा इतर कुठल्याही मायबोलीकरानं दिला असेल तर तो माझा कन्सर्न नाही. माझा नंबर याआधी एक दोन मासिकं आणि इंटरनेटवर ऑलरेडी उपलब्ध आहे आणि याची मला कल्पना आहे. <<<

'तुम्ही' ह्या शब्दाबद्दल इतकेच म्हणू शकतो की तुमचा हा प्रतिसाद कोणत्या मनस्थितीत आलेला आहे ह्याचा मला अंदाजसुद्धा करता येत नाही. तुम्ही कोण, मी कोण, आपण एकमेकांना ओळखतसुद्धा नाही. नंबर्स एकमेकांकडे असणे तर असंबद्धच आहे. तुमचे नंबर्स कुठे उपलब्ध आहेत ह्यात मला स्वारस्य नाही.

असो! तुम्हाला अपेक्षित तो प्रतिसाद प्रशासनाकडून मिळालेला दिसत आहे. तुमचे अभिनंदन!

नीधप ह्यांच्या प्रतिसादातील सेकंडलास्ट विधानाशी सहमत!

मी बेफिकीर असल्यामुळे इतके नक्की लिहिणे माझे कर्तव्य आहे की चुकूनमाकून नंदिनी वैवकुशी बोलल्या असत्या तर वैवकुने अत्यंत मनापासून त्यांची माफीच मागीतली असती. अर्थात, ह्याला आता काहीच संदर्भ नाही. बाकी, वैवकुने मला गेल्या पंधरा मिनिटांत केलेले दोन कॉल्स मी रिजेक्ट केले हेही येथे नमूद करणे मी माझे कर्तव्य समजतो.

-'बेफिकीर'!

वैवेकु यांनी फोन करण्याच्या अगोदर जे केले ते त्यांचा आयडी काढण्यासाठी पुरेसे आहे. आणि तो काढला आहे.

पण नंदिनी यांचा फोन जर अनेक ठिकाणी सार्वजनिक रित्या कुणालाही पाहता येत असेल तर, तर वैवेकु यांच्या नावाने दुसर्‍या कुणितरीच फोन केला असेल ही पण शक्यता आहे. ज्या व्यक्तीला असा त्रास द्यायचा असेल ती स्वतःचे नाव सांगूनच देईल असे नाही.

हे लिहण्याचा उद्देश असा की एका सद्स्याने फोन आला अशी तक्रार केली तर , लगेच ज्या व्यक्तीचा फोन आला अशी तक्रार आहे, त्या व्यक्तीवर (ते सिद्ध होईपर्यंत) आम्ही कारवाई करणे हे चुकीचे ठरेल. पुन्हा दोन व्यक्तींमधे नक्की काय संवाद झाला याची शहानिशा करणेही अवघड आहे. बरं आम्ही कुणाला तरी हद्दपार केल्याने प्रत्यक्ष आयुष्यात (मायबोलीबाहेर) फरक पडेलच असे नाही.

असा फोन येणे ही अतिशय गंभीर बाब आहे याची मला कल्पना आहे. आणि अशा गंभीर गोष्टींचा सर्व तपास आणि कारवाई (मायबोलीबाहेरचीही) करणे ही पोलीसांच्या अखत्यारीतली गोष्ट आहे. त्यामुळे मी असे सुचवेन की यापुढे अशा परिस्थितीत जरूर सायबर क्राईम सेल कडे तक्रार करा. ते सर्व गोष्ट पडताळून पाहतील आणि योग्य ती कारवाई करतील. आमचे त्यांना पूर्ण सहकार्य नेहमीच असेल.

झाला प्रकार वाईटच! त्यामुळे नन्दिनी सारख्या सक्षम लेखिकेला इथे न लिहण्याचा निर्णय घ्यावा लागतोय हे अजुनच वाईट!

नंदिनी, हा बिबी मुद्दाम डीलीट करत नाही आहे. कारण उद्द्या सायबर क्राईम सेल ने आमच्या कडे तपासाची शहानिशा केली, तुम्ही म्हटल्याप्रमाणे २०:०८ वाजता तुम्हाला नेमका कुणाचा फोन आला, तो किती वेळ चालला होता, नक्की वैवेकू कडूनच आला होता का हे त्यांना तपासून पाहू दे.
तुम्हीही हा गुन्हा इतका गंभीर आहे हे म्हटले आहे तेंव्हा जरूर पोलिसात तक्रार करा आणि तुमच्या कॉलचे डीटेल्स द्या.

फार काहीतरी विचित्र झाले आहे इतकेच कळते आहे
वैवकुंना जबरी शिक्षा झाली पण !!

कसे का असेनात माझे आवडते गझलकार होते ते !
बिचारे .. विठ्ठलाचे अनेक शेर केले त्यांनी

काल फेबु वर त्यांनी एक गझल टाकलेली त्यात शेवटच्या शेरात ते म्हणाले की....

वाटेल ते ते बोललो रागावला नाही प्रभू
होत्या शिव्याही घातल्या ..."ह्या विठ्ठलाच्या आयच्या ..."

बिचारे भ्रमात राहिले ......विठ्ठलाने असा नाही तर असा दणका दिलाच शेवटी !! Happy

आता डो़के ठिकाण्यावर आले असेल बहुतेक . पण मला असेही वाटते की त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा वगैरे नोंदवला जावा अश्या पवॄत्तीचा माणूस नाही तो. त्याला सोडून दिले पाहिजे. आता मायबोली सदस्यत्व रद्द झालेच आहे ही शिक्षाही पुरेशी वाटते.

सतीश वालेकर,

एखाद्या संकेतस्थळाचा दर्जा आजकाल खरे तर कशावर ठरतो असे मला वाटते माहीत आहे का? मला तर वाटते की संकेतस्थळ किती जुने आहे ह्यावर! अन्यथा जोमाजोमात सुरू केलेली संकेतस्थळे जोमाजोमात बंद पडत आहेत आणि मायबोली शानसे चालू आहे. एखादा आय डी ब्लॉक होणे किंवा कोणीतरी कोणा स्त्री आय डी चा नंबर मागणे ह्यापेक्षा हे महत्वाचे आहे की हे सगळे पचवून एक संकेतस्थळ अजूनही कित्येकांसाठी 'आपले हक्काचे' आहे.

सायबर क्राईमकडे तक्रार करण्याइतका मोठा गुन्हा येथे घडलेला नाही असे माझे मत आहे.

एका कोणा क्ष सदस्याने एका जुन्या स्त्री सदस्याचा नंबर मागताना अत्यंत हीन पातळी गाठली, ह्यावर संकेतस्थळाच्या प्रशासनाने योग्य ती कारवाई केलेली आहे.

कृपया, आता तरी विषय संपवा असे सर्वांनाच नम्र आवाहन!

तिने ज्या नंबर वरून तिला फोन आला तो दिलाय की. तो आणि वैवकुंच्या प्रतिसादात त्यांनी स्वतः दिलेला नंबर एकच दिसतोय.
असो, वेमांनी योग्याच कारवाई केलेली आहे.

maitreyee ,
तो फोन करणार्‍या व्यक्तीने देलेला क्रमांक आहे. पण त्याच फोन नंबर वरून आला होता , किती वाजता आला होता, किती वेळ होता, नंबर हॅक झाला होता का, हे पोलीस नंदीनी यांच्या फोनच्या रेकॉर्डवरून पडताळून पाहतील.

Pages