एपिक चॅनेल

Submitted by स्वप्ना_राज on 22 January, 2015 - 09:50

"एकांत" ह्या एपिक चॅनेल वर दर गुरुवारी रात्री १०:३० वाजता (रिपिट टेलिकास्ट - शुक्रवार रात्रौ ८:३०) लागणार्‍या कार्यक्रमामध्ये भारतातल्या एके काळच्या गजबजलेल्या पण आता ओसाड झालेल्या जागांबद्दल माहिती देतात. हा कार्यक्रम बहुतेक नोव्हेंबर २०१४ पासून सुरु झाला असावा कारण हे चॅनेलच मुळी तेव्हा सुरु झालं. माझे सुरुवातीचे काही भाग चुकले असावेत. राजस्थानमधलं भानगढ, त्रिपुरातलं उनाकोटी आणि गुजरातमधलं लखपत ह्यावरील भाग मी पाहिले. आणि त्यावरची माहिती 'संथ चालती ह्या मालिका' इथे पोस्ट केली. ती कायमस्वरुपी साठवून ठेवावी अशी सूचना झाली म्हणून हा धागा काढला.

हे चॅनेल इथे उपलब्ध आहे - https://docs.google.com/spreadsheets/d/19tI8WWcHdygXnFWpwtOwRrco61eS-1GhemitlPpLVWo/pubhtml?gid=0&single=true

कार्यक्रमांचं वेळापत्रक - http://www.epicchannel.com/schedule

ह्या बीबीवर पुढील एपिसोडस ची माहिती आहे:

एकांतः
१. लखपत, २. उनाकोटी ३. कित्तूर किल्ला ४. न्यारमा ५. अंदमान सेल्युलर जेल ६. विलासगढ ७. हळेबिडू
८. शेखावतीमधलं रामगढ ९. काश्मीरमधलं मार्तंड मंदिर १०. शिवसागर - अहोम साम्राज्याची राजधानी ११..गुजरातचं चंपानेर १२. श्रीनगरच्या हरीपर्बत वरचा किल्ला १३. लडाखचा 'चिकटन' किल्ला
१४. अंदमान निकोबारचं रॉस आयर्लंड १५. जंजिरा किल्ला १६. लखनौ रेसिडेन्सी १७. विष्णुपुर १८. विजयदुर्ग
१९. बटेश्वर २०. हंपी २१. कुलधरा २२. कुंभालगढ २३. असिरगड २४. बिजापूर २५. कांगडा फोर्ट (हिमाचल प्रदेश)
२६. जागेश्वर २७. रामनगर २८. लेह पेलेस २९. किल्ला मुबारक ३०. मेहरोली आर्किओलॉजिकल पार्क
३१. तलक्कड, मालंगी आणि वोडीयार राजे

देवलोक - सीझन १:
१. रंग २. जीवजंतू ३. स्वर्ग नरक ४. शक्ती ५. गणपतीबाप्पा ६. देवदेवतांची शस्त्रं ७. देवतांची वाहनं ८. गंगा ९.तीर्थ १०.युग ११. देवांचं अन्न १२. सृष्टीची रचना १३. दिशा १४. देवी-देवतांचे विवाह १५. देवी-देवतांचे रूप बदलणं
१६. विष्णूचे अवतार, १७. ग्रह-नक्षत्र १८. पुराण, वेद ह्यातील वनस्पती १९. पूजा आणि विधी

देवलोक चा सीझन २ सुरु होणार आहे. त्याचा वेगळा धागा काढून इथे लिंक देईन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नालायक हॅथवेवाल्यांनी शुक्रवारपासून एपिक चॅनेल बंद केलंय. फोन करून विचारलं तर म्हणतात आमच्या साईडने टेक्निकल इश्यू आहे. अजून दुरुस्त करताहेत वाटतं. Angry

कालचा `द ग्रेट एस्केप'मधला `एस्केप फ्रॉम रेझांग ला' छानच होता. (१९६२, चीनविरुद्धची चकमक) विशेषत: शेवटी त्या घटनेतल्या दोघा खर्‍या जवानांना दाखवलं तेव्हा तर अंगावर अक्षरश: काटा आला!

आतापर्यंतचे तीनही भाग पहाडी, डोंगराळ भागात चित्रिकरण झालेलेच आहेत. कॅमेरावर्क खरंच अफलातून आहे.

कार्यक्रमाच्या सुरूवातीच्या निवेदनासोबत (माँटाज?) जी चित्रं/अ‍ॅनिमेशन दाखवतात त्यात शिवाजीमहाराजांच्या आग्र्याहून सुटकेसारखी चित्रंही आहेत.

काल आणि परवाचा लॉस्ट रेसिपीज एपिसोड पाहिला. खुप मस्त पदारथ दाखवले. तांदळाच्या शेवयांचे पुडींग करणारी आज्जी इतकी गोड होती की तिला प्रत्यक्ष जाऊन भेटावेसे वाटले. तिने अगदी दुधापासुन सगळे घरचे वापरलेले.

माझ्या कॉलेजमध्ये वसईवरुन येणा-या इस्ट इंडीयन मुली होत्या तेव्हापासुन हे ईस्ट इंडीयन म्हणजे नेमके कोण हा प्रश्न पडलेला. चांगली माहिती मिळाली. त्यांचे मराठीही मजेशीर असायचे. काल त्या शेफच्या तोंडचे हिंदी ऐकुन खुप गम्मत वाटली.

सगळ्यात मस्त आणि सोपा पदार्थ कांजी कढी वाटला. तांदळाच्य कांजीत (पेजेत) नारळ दुध, कवचधारी मासे आणि भाज्या घातल्या, खोबरे, धणे मिरच्या वाटुन लावले आणि हे सगळे मिश्रण भाज्या शिजेतो उकळले. अगदी सोप्पा आणि करुन पाहण्यासारखा पदार्थ.

परवाच्या पदार्थात पारशी अंड्याची बर्फी पाहुन मात्र पोटात गोळाच आला. १५ अंडी, अर्धा किलो साखर, अर्धा किलो तुप, भरपुर क्रिम आणि बर्फीत घातलेला व वरुन पेरलेला सुका मेवाही जवळजवळ अर्धा किलोच होता .

तो शेवटचा पोपटीसारखा पदार्थही सुरेख.

एपिक चॅनेलचे कार्यक्रम खुप सुरेख आहेत. ठाकुरांच्या कथेवरचे एपिसोड ही मस्त वाटले. नियमित चॅनेल बघण्याइतर्का वेळ मिळत नाही याचे खुप वाईट वाटतेय.

मग असे असताना त्या मूर्ती किमान दीड हजार वर्षे जुन्या आहेत हे कसे समजणार? बाहेरचे लाकूड जास्तीत जास्त १४ वर्षे जूने असेल आणि आतले द्रव्य कोणीच बघितले नाहीये, त्याची टेस्ट करणे तर दूरच.

नेटवर गुगळून पहिले असता प्रत्यक्ष वस्तू ट्रान्सफर करत नाहीत तर डोळे आणि हात बांधून जे काही करतात त्याला पुजारी आत्मा ट्रान्सफर केला म्हणतात. मूर्ती मात्र नवीन , निंबाच्या झाडाच्या असतात. त्यामुळे मुर्ती दीड हजार वर्षे जुन्या हा क्लेम बरोबर नाही. प्रथा जुनी आहे म्हणता येईल

अरे, ह्या हॅथवेवाल्यांचा आणि एपिकचा काय प्रॉब्लेम झालाय? दोन आठ्वडे देवलोक चुकलंय त्यामुळे आत्मा जळतोय माझा. एपिकला मेल पण पाठवली. Sad

Hello,
Me navin sabhasad ahe.... epik channel kharach khup vegal ahe... ani tyavarache program hi...
Ekant me adhi pahat hote....chan ahe serial...

Pages