एपिक चॅनेल

Submitted by स्वप्ना_राज on 22 January, 2015 - 09:50

"एकांत" ह्या एपिक चॅनेल वर दर गुरुवारी रात्री १०:३० वाजता (रिपिट टेलिकास्ट - शुक्रवार रात्रौ ८:३०) लागणार्‍या कार्यक्रमामध्ये भारतातल्या एके काळच्या गजबजलेल्या पण आता ओसाड झालेल्या जागांबद्दल माहिती देतात. हा कार्यक्रम बहुतेक नोव्हेंबर २०१४ पासून सुरु झाला असावा कारण हे चॅनेलच मुळी तेव्हा सुरु झालं. माझे सुरुवातीचे काही भाग चुकले असावेत. राजस्थानमधलं भानगढ, त्रिपुरातलं उनाकोटी आणि गुजरातमधलं लखपत ह्यावरील भाग मी पाहिले. आणि त्यावरची माहिती 'संथ चालती ह्या मालिका' इथे पोस्ट केली. ती कायमस्वरुपी साठवून ठेवावी अशी सूचना झाली म्हणून हा धागा काढला.

हे चॅनेल इथे उपलब्ध आहे - https://docs.google.com/spreadsheets/d/19tI8WWcHdygXnFWpwtOwRrco61eS-1GhemitlPpLVWo/pubhtml?gid=0&single=true

कार्यक्रमांचं वेळापत्रक - http://www.epicchannel.com/schedule

ह्या बीबीवर पुढील एपिसोडस ची माहिती आहे:

एकांतः
१. लखपत, २. उनाकोटी ३. कित्तूर किल्ला ४. न्यारमा ५. अंदमान सेल्युलर जेल ६. विलासगढ ७. हळेबिडू
८. शेखावतीमधलं रामगढ ९. काश्मीरमधलं मार्तंड मंदिर १०. शिवसागर - अहोम साम्राज्याची राजधानी ११..गुजरातचं चंपानेर १२. श्रीनगरच्या हरीपर्बत वरचा किल्ला १३. लडाखचा 'चिकटन' किल्ला
१४. अंदमान निकोबारचं रॉस आयर्लंड १५. जंजिरा किल्ला १६. लखनौ रेसिडेन्सी १७. विष्णुपुर १८. विजयदुर्ग
१९. बटेश्वर २०. हंपी २१. कुलधरा २२. कुंभालगढ २३. असिरगड २४. बिजापूर २५. कांगडा फोर्ट (हिमाचल प्रदेश)
२६. जागेश्वर २७. रामनगर २८. लेह पेलेस २९. किल्ला मुबारक ३०. मेहरोली आर्किओलॉजिकल पार्क
३१. तलक्कड, मालंगी आणि वोडीयार राजे

देवलोक - सीझन १:
१. रंग २. जीवजंतू ३. स्वर्ग नरक ४. शक्ती ५. गणपतीबाप्पा ६. देवदेवतांची शस्त्रं ७. देवतांची वाहनं ८. गंगा ९.तीर्थ १०.युग ११. देवांचं अन्न १२. सृष्टीची रचना १३. दिशा १४. देवी-देवतांचे विवाह १५. देवी-देवतांचे रूप बदलणं
१६. विष्णूचे अवतार, १७. ग्रह-नक्षत्र १८. पुराण, वेद ह्यातील वनस्पती १९. पूजा आणि विधी

देवलोक चा सीझन २ सुरु होणार आहे. त्याचा वेगळा धागा काढून इथे लिंक देईन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ना खुप छान लिहीतेस. तुझ्यामुळे खुप छान माहिती आम्हाला मिळते. इथे हे सगळे कार्यक्रम दिसत नाहीत त्यामुळे तुझ्या माहितीचा उपयोग होतो.

पेरु, झेलम, माझं ह्यात काहीच नाही. जे ऐकते ते लिहिते. पण ऐकायला खूप मजा येते. माझी खात्री आहे की मला फक्त ५०% पोचव ता येतंय. Sad

मी बघितला कालचा देवलोकचा एपि. देवदत्तंची शैली खूप सुंदर आहे विषय मांडुन दाखवण्याची.. अगदी कुणालाही समजेल अश्या सोप्या भाषेत सांगतात ते.

ती ब्रह्मा आणि कृश्णाची कहाणी अर्धवट ऐकली मी कारण ब्रेकनंतर टीव्ही लावायला पाच एक सेकंद उशीर झाला.

ब्रह्माने गवळ्यांसोबत भोजन करताना कृष्णाला पाहिलं आणि विचार केला की हा कसा देव. साध्या गवळयांसोबत बसुन जेवतो. म्हणून त्याने कृष्णाच्या गाई गायब केल्या आणि त्या शोधायला कृष्ण गेल्यावर त्याचे सवंगडी गाय ब केले. कृष्णच तो. त्याने अंतर्ज्ञानाने सगळं जाणलं. मग गाई आणि सवंगडी स्वतःतुन निर्मा ण केले. संध्याकाळी नेहमीप्रमाणे गोपाल आणि गाई गोकुळात परतल्या. ब्र्हमदेवाने काही दिवसांनी येऊन पाहिलं तर गोकुळात कोणाला संशयही आला नव्हता की हे खरे गोपाळ आणि गाई नाहीत. सगळं सुरळित सुरु होतं. तो वरमला आणि त्याने कृष्णची माफि मागत गाई आणि गोपाल परत केले.

महबूब स्टुडीओ मध्ये ४-६ डिसेंबर टा ईम्स लिटफेस्ट आहे त्यातही देवदत्त ह्यांचं एक सेशन आहे.

I think last 4 episodes of Raja, Rasoi and Anya Kahaniya are being aired now. Yesterday's episode was about North Indian food.

An interesting story was told about the tradition of छप्पन भोग that is offered to the deity in Krishna temples worldwide. When Krishna lifted the Gobardhan, the residents of Gokul remained below it for days - some say for a week, some say for a month. Krishna made sure that they were sustained with food and water from the mountain itself. When it stopped raining the people expressed gratitude by offering him a food consisting of 56 items = 7 days * 8 prahars of each day Happy

They also shared an anecdote about the famous gilawati kebab of Lucknow. It is said that Nawab Wajid Ali Shah's teeth were not in mint condition because of his lifestyle. But he still wanted to eat Kebabs so he ordered his chef to make such a kebab of which meat will melt as soon as it is put in mouth. The chef had to toil hard but he managed to create such a kebab which has since become famous.

I will watch both episodes of Devlok on Saturday night and then post here.

अग हो, दम बिर्याणी म्हणे इमामवाडा बांधायला आलेल्या मजुरांना खाणं म्हणून बनवली जायची.

येस्स! मी पण आज बराच बॅकलॉग भरून काढला. तुझ्यामुळे केवढी माहिती मिळतेय, स्वप्ना! आणि तू डिलीजन्टली इथे लिहीत राहतेस याबद्दल तुझं कौतुक आहे. हा धागा मस्त आहे एकदम.

देवलोकच्या दोन एपिसोडस चा रिपीट टेलिकास्ट काल रात्री पाहिला. टीव्ही लावायला थोडा उशीर झाल्याने सुरुवातीचा काही भाग चुकला. दोन एपिसोड्स एकत्र पहायचे होते म्हणून ऑडिओ रेकॉर्ड करुन घेतला.

गीतेमध्ये ७०० verses आहेत. आणि १८ अध्याय आहेत. महाभारतात सुध्दा १८ प्रकरणं आहेत.महाभारत युद्ध १८ दिवसात झालं. आणि त्यात १८ सैन्यं होती - ७ पांडवाची आणि ११ कौरवांची. गीतेत कृष्णाने म्हटल्याप्रमाणे शरीराला ९ दारं असतात - दोन डोळे, दोन कान, नाक, तोंड वगैरे. ९ + ९ = १८ म्हणून बहुतेक हे रिलेशनशिप बद्दल चं भाष्य आहे. (मला हे स्पष्टीकरण काही झेपलं नाही)

वेद आणि गीतेचा संबंध काय? तर उपमा अशी की वेद हे गवत आणि उपनिषद म्हणजे गाय जी गवतावर चरते. श्रीकृष्ण हा गवळी. जे दूध निघतं ते म्हणजे गीता.म्हणजे गीता हे वेदांच्म सार होय. मग गीतेचं सार काय? गीतेची सुरुवात अशी की धृतराष्ट्र संजय ला विचारतो की कुरुक्षेत्रावर माझे मुलगे आणि पांडूचे मुलगे काय करत आहेत? हा प्रश्न इंटरेस्टिंग असा की त्याने इथे कौरव ते आपले पण भावाच्या मुलांना पांडूची मुलं असं म्हटलं आहे. इथे आपले-परके हा भेद सुरु झालाय. संजय दुर्योधन काय म्हणतो ते सांगतो. इथे कळतं की दुर्योधन नर्व्हस आहे. एव्हढं सैन्य, द्रोणाचार्य, भीष्म, कर्ण आहेत पण तो असुरक्षित आहे. पण अर्जुन मात्र दिग्मुढ झालाय. त्याने आपले-परके असा भेदभाव केला नाहीये. माझ्याच कुटुंबाला मी मारलं तर धर्म काय राहिला असा त्याचा प्रश्न आहे. शंका आहे म्हणून तो कृष्णाच्या जवळ जातो. तो कौरवांनी केलेल्या अन्यायाचा पाढा आधी वाचतो. पण तरी अर्जुन ह्या कारणांसाठी सुध्दा युद्ध करू इच्छित नाही. मग कृष्णाचा बोलण्याचा सूर बदलतो. positive and negative motivation देऊन, त्याला नपुंसक म्हणूनही अर्जुन ऐकत नाही. तेव्हा कृष्ण म्हणतो की इथे कोण मरणार आहे? सगळे अमर आहेत. अर्जुन चकित होतो तेव्हा कृष्ण म्हणतो की जीवन-मृत्यू सगळं खोटं आहे. हे चालूच असतं. मग तो अधिक खोलात जातो. म्हणतो की तुळा वाटत जे डोळ्यांना दिसतं ते सत्य आहे. पण तसं नाहीये. ते खूप महान आहे. क्षितिजापलीकडे अजून खूप आहे. जग एका नदीच्या प्रवाहां सारखं आहे. कृष्ण २ शब्द योजतो - यज्ञ आणि योग.

यज्ञ म्हणजे देवाणघेवाण - नातं किंवा रिलेशनशिप. आयुष्यात काही द्यायला लागतं, घ्यायला लागतं, मग तुमची इच्छा असो वा नसो. तेव्हा आयुष्य म्हणजे यज्ञ च आहे. योग म्हणजे कनेक्शन. आपलं नातं - हृदयाशी, मेंदूशी, आत्म्याशी. आत जीवात्मा आहे, बाहेर परमात्मा. तेव्हा अर्जुन युध्द सोडून पळाला तर तो परमात्म्यापासून पळतोय. अर्जुन म्हणतो पण मी मनाला कसं काबूत ठेवू? त्याची ही डळमळ बघून कृष्ण पुन्हा आपला रोख बदलतो. जणू काही तो एका भेदरलेल्या पोराची माता आहे. मग तो अर्जुनाला 'देव' हा कॉन्सेप्ट समजावतो. तो सांगतो की तुळा कोणाचाही आधार नसेल तेव्हा देव तुझां आधार होईल. एका अर्थी भयभीत अर्जुनासाठी कृष्ण देवाची नाव घेऊन येतो. तो म्हणतो की तुळा काहीही अडचण आली तरी मी आहे. इथे अर्जुन त्याला विचारतो की 'मी आहे' म्हणजे तू तुझ्याबद्दल बोलतो आहेस् का? तेव्हा कृष्ण त्याला आपलं विराट स्वरूप दाखवतो.

भयभीत माणसाला शहाणपण शिकवणारे बरेच भेटतील पण कृष्ण त्याला आत्मविश्वास मिळवून देतो. जेव्हा अर्जुन शांत होतो तेव्हा कृष्ण त्याला ज्ञान द्यायला सुरुवात करतो. जनावार अन्न मिळवण्यासाठी यातायात करतात पण माणूस आपल्या आयुष्याचा अर्थ शोधायचा यत्न करतो. (कृष्णाने कलीयुगात येऊन बघावं आता!!) खरं तर त्याला हे शोधायला फार लांब जायची गरज नाही कारण त्याच्यात आत्मा असतो पण हे तो विसरून जातो आणि दुसर्याला आपल्याबद्दल काय वाटतं ह्यातून आयुष्याचा अर्थ शोधायला लागतो. मग मोहमाया सुरु होते. दुसर्यासाठी न करता स्वत:च्या आनंदासाठी काम करावं. तुळा युद्ध का करायचं नाही तर लोक निंदा करतील की ह्याने स्वत:च्याच माणसांना मारलं म्हणून? तू जिंकशील ह्याची हमी नाही किंवा हरशील च असंही नाही. मग टेन्शन का घेतोस? परफेक्ट व्हायचा प्रयत्न करू नकोस. कोणाच्याही स्तुतीसाठी काही करू नकोस.

हिंदू धर्मात हे अमुक तमुक करा म्हणून सांगितलं गेलेलं नाहिये. कृष्ण म्हणतो - action तुझी, त्यावरची reaction तुला झेलायची आहे आणि reaction वरचं repercussion सुध्दा तुझीच जबाबदारी. तुझ्या आयुष्याची जबाबदारी तुझी स्वत:ची. दुसर्या कोणाला दोष देऊ शकत नाहीस. मी काही सल्ला देणार नाही. खर पाहता युद्धाच्या शेवटी कौरव मारले गेले, पांडवांचे सगळे पुत्र मारले गेले, यादवांचा सुध्दा नाश झाला. मग निष्पन्न काय झालं? पण सत्य असं आहे की हे सगळं होणारच होतं.

इथे महाभारताच्या अश्वमेध पर्वातली एक कथा दाखवली की युद्धानंतर कृष्ण आणि अर्जुनाची भेट होते तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो की तू युद्धाच्या वेळी जो उपदेश केलास तो आम्ही आता विसरलोय. पुन्हा सांगशील का? कृष्ण म्हणतो की तेव्हा जे सांगितल ते त्या परिस्थितीनुसार योग्य होतं. युद्धाच्या संदर्भात होतं. परत कसं सांगू? पण अर्जुनाने पुन्हा विचारलं तेव्हा कृष्ण म्हणाला मी विचार करून सांगतो. इथे अर्जुन सामान्य माणसासारखा वागतोय. प्रसंग गेला की माणूस सगळं शहाणपण विसरून जातो. तेव्हा कृष्णाची सुध्दा अर्जुना कडून जास्त अपेक्षा नाही. कृष्णासाठी अर्जुन एका छोट्या मुलासारखा आहे (इथे विठाई म्हणजे कृष्णाच्या आईरुपाचा उल्लेख झाला). त्याला पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय. हा जन्म गेला, पुढच्या जन्मी, मग त्याच्या पुढच्या जन्मी. कधीतरी त्याला समजेलच. आणि मोक्षप्राप्ती होईल.

प्रेक्षकातून कोणितरि विचारलं की गीता संस्कृतात आहे तर भाषा कळत नसेल तर मला कशी कळणार? तेव्हा पटनाईक म्हणाले की ज्ञान निर्गुण असतं, भाषा सगुण असते. ज्ञान पाणी तर भाषा भांडं. तहान लागल्याला पाणी हवं असतं, भांड काहीही असो. संस्कृत हे भांडं आहे.

सूत्रसंचालीकेने त्यांना विचारलं की गीतेतला सर्वात interesting concept तुम्हाला कोणता वाटतो? तर ते म्हणाले की योग. ते ज्ञान नाही तर अनुभव आहे.

गुरुवारचा एपिसोड 'तीर्थ' ह्या विषयांवर होता.

सर्वच धर्मात तीर्थयात्रा असते. लोक पूर्ण आयुष्य एकाच गावात घालवत असत. रुटीन मधून सुटका व्हावी, त्यांचं अनुभव क्षेत्र विस्ताराव हा उद्देश असावा. सामवेदात दोन प्रकारची गाणी आहेत - ग्राम म्हणजे गावातली आणि आरण्य म्हणजे जंगलातली. जंगल म्हणजे जिथे आपला काही कंट्रोल नाही अशी जागा, जिथे नवे अनुभव मिळतात. बुद्धाच्या चरित्रात पण सिद्धार्थ यात्रेला जातो पण परत येतो तो बुध्द. महाभारतात पण पांडव वनवासात काय करणार म्हणून कृष्ण त्यांना तीर्थयात्रेला जायला सांगतो. अश्या रीतीने २००० वर्षांपूर्वी प्रथम नदी, जंगल, तळी, पर्वत अश्या ठिकाणच्या तीर्थांचे वर्णन येतं.

'तीर्थ' ह्या शब्दाचा अर्थ काय? आजकाल तर मूर्तीच्या अभिषेकचं भक्तांना देण्यात येणारं पाणी हा अर्थ आहे. पण खरा अर्थ असा आहे - नदीचे दोन तट असतात. नदी पार करायला होडी लागते पण नदी फारशी खोल नसेल तर (ज्याला इंग्लिश मध्ये Ford म्हणतात) दुसरा किनारा नदीच्या पात्रातून चालून गाठता येतो. तीर्थ म्हणजे नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्याकडे कोणाच्याही मदतीशिवाय जाणे. हा लौकिकार्थ झाला. पण ह्याचाच वेगळा अर्थ असा की सगुण जगातून निर्गुण जगात कोणाच्याही मदतीशिवाय जाणे. जैन धर्मात ज्यांना देवस्वरूप मानतात अश्यांना तीर्थंकर म्हणतात. तीर्थंकर म्हणजे जो तीर्थं शोधून काढतो आणि पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती मिळवतो तो.

आता विष्णूच्या चार धामांबद्दल. आदिशंकराचार्य (ज्यांचा हिंदू धर्माच्या स्थापनेत मोठा सहभाग आहे) ह्यांनी ह्या चार धामांच्या जागी मठांची स्थापना केली. एक आहे बद्रीकापूर जे हिमालयात आहे. इथे विष्णूने नरनारायण ह्या रूपात तपश्चर्या केली. बद्री म्हणजे बोरं. बोराच्या झाडाखाली त्याने तप केलं. दुसरं धाम म्हणजे पुरुषोत्तम क्षेत्र म्हणजे पूरीचं जगन्नाथ. जिथे विष्णू जेवतो इथे जगातला सगळ्यात मोठा प्रेशर कुकर आहे. रोज हजारो भांड्यातून अन्न शिजतं, त्याचा नैवेद्य दाखवतात आणि आनंद बाझार म्हणून जागा आहे जिथे हा भोग मिळतो. दक्षिणेत रामेश्वर आहे तिथे विष्णू स्नान करतो. आणि पश्चिमेच्या द्वारकेत तो राजा आहे. ही चार धामं आहेत.

शंकराची बारा ज्योतिर्लिंगे. तसं प्रत्येक गावाच्या बाहेर एक शिवलिंग असतं. शंकर तसा सन्यासी देव तेव्हा फार भव्य वगैरे मंदिर नसतं. पण आदिशंकराचार्य ह्यांनी भारतात १२ ठिकाणं निश्चित केली होती. इथे शंकर स्वयम्भू रूपात प्रकट झाले होते. असं म्हणतात की शंकर सर्वप्रथम एका अग्नी स्तंभाच्या रूपात भक्तांसमोर प्रकट झाले होते. ह्या बारा जागी असं रूप दिसलं म्हणतात. केदारनाथ हिमालयात आहे. काशी विश्वनाथ आहे, उज्जैनजवळ कालभैरव आहे. महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर आहे. आंध्र प्रदेशात श्रीशैलम आहे. इथे मल्लिकार्जुन रूपात शिवाची पूजा होते. तमिलनाडु मध्ये रामेश्वरम आहे.

देवीची शक्तीपीठं आहेत. दक्षाची मुलगी सती हिचा शंकराबरोबर विवाह झाला होता. पण दक्ष आणि शंकर ह्याम्च्म पटत नसे. दक्ष ब्राह्मण होता आणि नियमांचे काटेकोर पालन करणारा. शंकर बैरागी, नियमाशी फारसं सोयरसुतक नसलेला. दक्षाने शंकराला यज्ञात आमंत्रण दिलं नाही. त्याचा अपमान केला म्हणून सतीने त्याच्याशी बाद घातला, आणि रागाने अग्निप्रवेश करून जीव दिला. तिचा मृतदेह पाहून शंकराने यज्ञाचा नाश केला, दक्षाचे डोकं उडवलं. शांत झाल्यावर त्याने दक्षाला दुसरं डोकं दिलं. पण सतीचा मृतदेह घेऊन तो सगळीकडे शोक करत फिरू लागला. साक्षात देवाला असं रडत फिरताना पाहून सगळ्या जगाची गती थांबली. हे कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून विष्णूने चक्राने तिच्या देहाचे तुकडे केले. तिचे डोळे, कान, हात, पाय वगैरे जिथे पडले त्याची शक्तीपिठ झाली. कोलकाता इथे तिचा पाय, ज्वालामुखी मध्ये जीभ, नैनादेवीत डोळे. असंच म्हणायला पाहिजे की भारत हा देवीच्या शरीरापासून बनला आहे. असं म्हणतात की ब्रिटिशांनी भारताचा नकाशा बनवला. पण एक थिअरी अशीही आहे की तीर्थयात्रा करणाऱ्या लोकांनी भारत आधी map केला होता.

गणपतीची कुठली तीर्थयात्रा आहे का असं संचालीकेने विचारलं तेव्हा त्यांनी अष्टविनायक यात्रेबद्दल सांगितलं. तसंच भारतातल्या सर्व लोकांना माहीत नसेल अश्या यात्रा कुठल्या असं विचारलं तेव्हा पंढरपूर, वारकरी संप्रदाय, विठ्ठल हा सर्व उल्लेख झाला. दक्षिणेत तामिळनाडू मध्ये मुरुगन (कार्तिकेय) ची पूजा होते. पलनी मध्ये आठ पर्वतांची यात्रा असते (मुरुगनची मूर्ती नेहमी पर्वतावर असते). मलेशिया हा प्रामुख्याने मुस्लीम देश. पण तिथे गेलेल्या तमिळ व्यापार्याम्नी बाटू केव्हज मध्ये मुरुगन ची मूर्ती आणि मंदिर बांधलं. तिथे दरवर्षी Thaipusam च्या वेळी मोठी यात्रा भरते. अश्या रीतीने तीर्थामुळे यात्री येतात तसंच यात्री सुध्दा नवी तीर्थक्षेत्रे बनवतात.

वैष्णोदेवी च्या यात्रेला गेलं की परतताना भैरव च्या मंदिरात गेल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नही म्हणतात त्यामागची कथा अशी, वेदवती नावाच्या एका स्त्रीला रामाशी लग्न करायचं होतं. पण राम एकपत्नीव्रत धारण केलेला तेव्हा तो म्हणाला की मी ह्या युगात तुझ्याशी लग्न करू शकत नाही. दुसऱ्या कुठल्या तरी युगात करेन. युग बदलेल आणि राम नव्या रूपात येऊन तिच्याशी लग्न करेल तोवर तिने तप सुरु केलं. तिची परीक्षा घ्यायला भैरव नामक एक तांत्रिक साधू तिथे आला आणि त्याने भोजन मागितलं. तिने जेवण देऊ केलं तेव्हा तो म्हणाला की त्याला तांत्रिक भोजन (शारीरिक) हवं आहे, तेव्हा तिने आपण रामाला वरलं असल्याचं सांगितलं. आणि आपण हे करू शकत नाही असंही सांगितलं. पण तो ऐकेना, बळजबरी करू लागला तेव्हा ती पळू लागली. तो तिच्या मागे लागला (आद्य शक्ती कपूर!). ती अनेक गुहातून पळत राहिली. शेवटी रागाने तिने त्याचे मस्तक धडावेगळं केलं. तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला (!). त्याने क्षमा मागितली. मग देवीने क्षमा केली. आणि त्याला सांगितलं की मला भेटायला भक्त येतील तेव्हा तुझं दर्शन नक्की घेतीलं. अजून एक गोष्ट - खरं तर देवी म्हटली की सामान्यत: तिला रक्तबळी देतात पण वैष्णोदेवी शाकाहारी आहे.

बऱ्याच यात्रात असं असतं की अमुक अमुक मंदिरात गेल्याशिवाय यात्रा सफल होत नाही. मंदिरं जोडणं हा यामागचा उद्देश आहे. उदाहरणार्थ. जसं तिरुपती ला गेलं तर कालहस्तीला जावं लागतं. तिरुपती म्हणजे वैष्णव मठ तर कालहस्ती शैव मठ. वैष्णोदेवी शाक्त मठ तर भैरव शैव मठ.

शबरी मालेच्या यात्रेबद्दल एकाने प्रश्न विचारला. इथे केवळ पुरुष जातात आणि त्यांना ब्रह्मचर्याची शपथ घ्यावी लागते. काही दिवस काळे कपडे घालून जावं लागतं. पर्वतावर १८ अतिशय steep steps आहेत ह्या चढून जावं लागतं. इथे अय्यपाचं मंदिर आहे. ह्याचं दुसरं नाव हरिहरसुता. केरळात एक राजा होता त्याला मुलबाळ नव्हतं. त्याने शंकर आणि विष्णूची पूजा केली. त्यांनी जे मूल दिलं त्याचं नाव राजाने अय्यप्पा किंवा मणीकंठ ठेवलं. तेव्हाच राणीने एका मुलाला जन्म दिला. दत्तक मुलावर राणीचा फारसा जीव नव्हता. त्याचा काटा काढायचा एक बेत ती आखते. ती सांगते की मला ताप आलाय आणि वाघिणीचं दूध हवंय. तो जंगलात जाऊन दूध आणतो आणि ते पण वाघावर स्वार होऊन येऊन. तिथे एका राक्षसीला मारतोही. तेव्हा सगळे म्हणतात की ह्यालाच राजा करा. पण अय्यप्पा ला माहित असतं की त्याच्या आईला तो पसंत नाही तेव्हा तो तिला सांगतो की मला राज्य नको, मी लग्न करणार नाही, तुझाच मुलगा राजा होईल. तो पर्वतावर जाऊन बसला. म्हणून ही यात्रा पर्वतावर होते.

दिल्लीत कावड यात्रा असते. श्रावण महिन्यात ही होते. गावातली मुलं गंगेच्या किनारी जाऊन पाणी कावडीत भरून आणतात आणि घरात नेऊन पिंडीवर त्याचा अभिषेक करतात. नदीवरून येताना ही कावड खाली ठेवायची नसते. मध्ये विश्रांती घ्यायची असल्यास ती झाडाला टांगून ठेवतात. पूर्ण रस्ताभर ही कावड नेणाऱ्या लोकांसाठी व्यवस्था असते. कावडी छान सजवलेल्या असतात. दक्षिणेत सुध्दा ही कावडयात्रा असते. कावड ही सांसारिक जीवनाचं प्रतिक समजली जाते. कदाचित शंकर बैरागी, त्याला सांसारिक जीवनात यायचं नसतं म्हणून त्याला तुला संसारात पडावंच लागेल असं सांगायचा उद्देश असावा.

वैष्णोदेवीच्या संदर्भातील वरील विवेचन खूपच प्रभावशाली झाले असून तिच्या संदर्भातील अनेक कथा भक्तजनांत आढळतात. 'रक्षक' या नात्याने तिला मानणारे आणि पूजणारे यांची संख्या तर अफाटच आहे. भैरवनाथ प्रकरण छान शब्दबद्ध केले आहे. मला वाटते माता वैष्णोदेवीने ह्या भैरवाचा तिच्यामागील ससेमिरा संपविण्यासाठी हनुमानाची मदत घेतली होती आणि मग त्या दोघांत दीर्घकाळ युद्धही झाले होते. भैरवनाथाचा जरी पराभव झाला असला तरी त्याचा शिरच्छेद अखेरीस मातेनेच केला अशी कथा आहे.....[मात्र शिरच्छेदाने मृत्यू आल्यानंतर हाच भैरोबा पुन्हा माता वैष्णोदेवीकडे येऊन तिची क्षमा कशी काय मागू शकतो ? हे समजण्याच्या पल्याड आहे. पण देवीच्या अशा शेकडो कथांबाबत काही शंका उपस्थित करू नये हेच योग्य. 'एपिक चॅनेल' कार्यक्रमातही शंकेला स्थान दिले गेलेले मला कधी आढळले नाही.]

हनुमानाला या श्रमानंतर खूप तहान लागल्यामुळे देवीने बाणाने पर्वत फोडला आणि त्यातून बाहेर पडलेल्या जलधारांनी हनुमानाने आपला कंठ ओला केला....त्या धारेचे मग नदीत रुपांतर झाले व तिला "बाणगंगा" असे देवीने नाव दिले, अशीही एक उपकथा आहे.

एपिकमधील या सार्‍या कथा स्वप्ना_राज अतिशय प्रसन्नरितीने शब्दबद्ध करून ज्याना ते कार्यक्रम पाहाता येत नाही त्यांच्यासाठी अगदी साग्रसंगीत मेजवानी रुपाने सादर करतात त्याबद्दल त्यांचे आभार मानावे लागतीलच.

[जाताजाता.....इतक्या सुंदर लिखाणामध्ये स्वप्ना_राज यानी हिंदी चित्रपटातील अतिशय बदनाम झालेल्या एका खलनायकाचे नाव भैरवनाथ संदर्भात घेतले याचे मला खूप वाईट वाटले; त्यामुळे त्या कथेचा बाजच बिघडून गेल्यासारखे वाटले मला....कथानकाच्या रंजकतेसाठी त्याची काहीही आणि कधीच गरज नव्हती....असो.]

स्वप्ना , छान लिहीते आहेस. मी हे एपिसोड्स रेकॉर्ड करुन बघते. पण जे लोक बघु शकत नाहीत, त्यांनाही हे वाचून माहिती मिळेल. मी सियासत , राजा रसोयी और अन्य कहानीया सुद्धा बघते. सियासत आता संपत आले .

अशोक, आपल्या प्रतिसादाबद्दाल आभार. ह्याचं सारं श्रेय देवदत्त पट्टनाईक ह्यांना. मी फक्त त्यांनी सांगितलेलं इथे टाईप करते.

सॉरी पण त्या तांत्रिकाला 'शक्ती कपूर' ची उपमा दिली ते आपल्याला का खटकलं ते मला कळलं नाही. त्याने वेदवतीवर बळजबरी करायचा प्रयत्न केला. ते वागणं शक्ती कपूरच्या अनेक चित्रपटातल्या व्यक्तिरेखेसारखंच आहे. शक्ती कपूरच्या वैयक्तिक जीवनाबद्दल मला काही माहित नाही. तो ही अ‍ॅक्टींग करतो तरी तो बदनाम आणि ज्याने हे घृणास्पद कृत्य करायचा प्रयत्न केला (किंवा निदान तशी कथा सांगितली जाते) त्याला मात्र ही उपमा दिलेली खटकली? का? त्याला देवीने माफ केलं (किंवा पुरुषप्रधान संस्कृतीत रचल्या गेलेल्या कथेत तसं दाखवलं गेलं) म्हणून? त्याचं दर्शन घ्यायला भक्त जातात म्हणून?

असो. आपण आपली बाजू मांडलीत. मी माझी. ह्या विषयावर इथे अधिक वाद नसावा ही माझी विनंती.

ऑर्किड, अग 'राजा, रसोई' पण संपतंय बहुतेक. मागच्या एपिसोडमध्ये आता शेवटचे चार एपिसोड्स राहिलेत असं म्ह्टलं त्यांनी. सियासत कधी संपतंय? रोज ९ ते १० बघायला कसंतरी जमवावं लागतंय पण बघायचं सोडायला जीवावर येतंय. सुरुवातीपासून बघता आली नाही ह्याची हळहळ तर आहेच.

स्वप्ना, गुरुवीरचा एपिसोड पाहिला नव्हता. आता माझं झालंय नाही पाह्यला तरी हरकत नाही स्वरा ने लिहेलंच Happy छान लिहीलंय ...

स्वप्ना , नक्की कधी संपणार ते माहित नाही. पण आता जहांगिरला निसा सापडली आहे आणि त्यांच्यातला काटा अली कुलीही मेला आहे. त्यामुळे लवकरच त्यांचा निकाह होणार आणि सिरीयल संपणार.

मुग्धटली, मला निदन एक महिना तरी बुध-गुरु देवलोक पाहता येणार नाही. शनिवारी रिपिट टेलिकास्ट पाहून लिहेन Sad

Pages