एपिक चॅनेल

Submitted by स्वप्ना_राज on 22 January, 2015 - 09:50

"एकांत" ह्या एपिक चॅनेल वर दर गुरुवारी रात्री १०:३० वाजता (रिपिट टेलिकास्ट - शुक्रवार रात्रौ ८:३०) लागणार्‍या कार्यक्रमामध्ये भारतातल्या एके काळच्या गजबजलेल्या पण आता ओसाड झालेल्या जागांबद्दल माहिती देतात. हा कार्यक्रम बहुतेक नोव्हेंबर २०१४ पासून सुरु झाला असावा कारण हे चॅनेलच मुळी तेव्हा सुरु झालं. माझे सुरुवातीचे काही भाग चुकले असावेत. राजस्थानमधलं भानगढ, त्रिपुरातलं उनाकोटी आणि गुजरातमधलं लखपत ह्यावरील भाग मी पाहिले. आणि त्यावरची माहिती 'संथ चालती ह्या मालिका' इथे पोस्ट केली. ती कायमस्वरुपी साठवून ठेवावी अशी सूचना झाली म्हणून हा धागा काढला.

हे चॅनेल इथे उपलब्ध आहे - https://docs.google.com/spreadsheets/d/19tI8WWcHdygXnFWpwtOwRrco61eS-1GhemitlPpLVWo/pubhtml?gid=0&single=true

कार्यक्रमांचं वेळापत्रक - http://www.epicchannel.com/schedule

ह्या बीबीवर पुढील एपिसोडस ची माहिती आहे:

एकांतः
१. लखपत, २. उनाकोटी ३. कित्तूर किल्ला ४. न्यारमा ५. अंदमान सेल्युलर जेल ६. विलासगढ ७. हळेबिडू
८. शेखावतीमधलं रामगढ ९. काश्मीरमधलं मार्तंड मंदिर १०. शिवसागर - अहोम साम्राज्याची राजधानी ११..गुजरातचं चंपानेर १२. श्रीनगरच्या हरीपर्बत वरचा किल्ला १३. लडाखचा 'चिकटन' किल्ला
१४. अंदमान निकोबारचं रॉस आयर्लंड १५. जंजिरा किल्ला १६. लखनौ रेसिडेन्सी १७. विष्णुपुर १८. विजयदुर्ग
१९. बटेश्वर २०. हंपी २१. कुलधरा २२. कुंभालगढ २३. असिरगड २४. बिजापूर २५. कांगडा फोर्ट (हिमाचल प्रदेश)
२६. जागेश्वर २७. रामनगर २८. लेह पेलेस २९. किल्ला मुबारक ३०. मेहरोली आर्किओलॉजिकल पार्क
३१. तलक्कड, मालंगी आणि वोडीयार राजे

देवलोक - सीझन १:
१. रंग २. जीवजंतू ३. स्वर्ग नरक ४. शक्ती ५. गणपतीबाप्पा ६. देवदेवतांची शस्त्रं ७. देवतांची वाहनं ८. गंगा ९.तीर्थ १०.युग ११. देवांचं अन्न १२. सृष्टीची रचना १३. दिशा १४. देवी-देवतांचे विवाह १५. देवी-देवतांचे रूप बदलणं
१६. विष्णूचे अवतार, १७. ग्रह-नक्षत्र १८. पुराण, वेद ह्यातील वनस्पती १९. पूजा आणि विधी

देवलोक चा सीझन २ सुरु होणार आहे. त्याचा वेगळा धागा काढून इथे लिंक देईन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल 'राजा, रसोई' चा एपिसोड दक्षिण भार तावर होता. अवियल कसं बनलं ह्याची कथा अशी की अज्ञातवासाच्या वेळी भीम विराटाच्या मुदपाकखान्यात होता पण त्याला फरसा स्वयंपाक येत नव्हता (मी तर तो उत्तम आचारी होता असं वाचलं अहे. असो). मग एके दिवशी त्याने होत्या त्या भाज्या नारळाच्या दुधात शिजवून वाढल्या आणि ती डिश सर्वांना आवडली. तेच अवियल.

मैसूरपाक फेमस करायचं श्रेय वोडियार राजघराण्यात ल्या एका राजाला जातं. त्याने एकदा आपल्या आचार्‍याला काहीतरी हटके बनवायला सांगितलं. त्या आचार्‍याने बनवलं आणि ती डिश राजाला आवडली. त्याने तिचं नाव ' मैसूरपाक' ठेवलं. आणि मग त्या आचार्‍यला ती अनेकांना खिलवायला सां गितलं. ही गोष्ट ९० वर्शांपूर्वीची. आजही त्या आचार्‍याचे वंशज तो बनवतात.

हैदराबादचं प्रसिध्द पत्थर का गोश्त. निजामांपैकी एक निजाम जंगलात गेला होता.... शिकारीला. त्याला एकदम कबाब खायची इच्छा झाली. आचार्‍याने तिथलाच एक ग्रॅनाईट चा दगड घेतला आणि त्यावर एक मांसाचा तुकडा भाजला. त्या दगडाची चव त्यात उतरली आणि निजामाला ते कबाब फार आवडले. मग राज्वाड्यात परतल्यावर ते तसेच ग्रॅनाईटवर बनवले जाऊ लागले. आज तिथल्या घरांत सुध्दा हे कबाब बनले तर ग्रॅनाईटवर च बनतात.

ह्या निजामाच्या फलकनुमा पॅलेसमध्ये म्हणे एक टेबल आहे ज्याच्यावर १०१ म्हणजे निजाम + १०० पाहुणे बसून एकत्र जेवू शकतात. जेवायच्या खोलीत बरीच चित्रं टांगली आहेत. तेव्हाच्या काळात मेन्यू नव्हता. त्य चित्रांकडे बोट दाखवून निजाम ऑर्डर देई आणि आचारी जेवण आणत. Happy

rmd, असं ही सांगितलं की बाबा बूदान (नाव नीट ऐकायला आलं नाही) नावचा एक सूफी फकिर येमेनहून भारतात येताना फक्त सात कॉ फीच्या बिया सोबत घेऊन आला आणि अश्या तर्हेने इथे कॉ फी आली. ह्याचे अरेबिका आणि रोबस्टा असे प्रकार सांगितले. रोबस्टा अरेबिका पेक्शा मोठे झाड असतं

गुरुवारचा देवलोकचा एपिसोड 'युग' ह्या कल्पनेवर होता. भारतात ही कल्पना आहे की नित्य म्हणजे परमात्मा. बाकी सर्व अनित्य म्हणजे नश्वर आहे. काल हा cyclical आहे. म्हणून उद्या आणि काल दोन्ही ला 'कल' म्हणतो. जैन लोकांत काळाला 'नागिणीची' उपमा दिली आहे. नाग जसा नागमोडी चालतो तसंच काळ. चांगला काळ म्हणजे उत्तसर्पिन म्हणजे सापाचा वरचा भाग. आणि वाईट काळ म्हणजे अवसर्पिन. खूप छान काळ म्हणजे सुषम सुषम, मग सुषम दुषम इथे वाईट गोष्टींना सुरुवात होते. मग दुषम दुषम म्हणजे अतिशय वाईट काळ. मग दुषम सुषम आणि मग परत सुषम सुषम.

हिंदू धर्मात ४ युग आहेत. अर्थात काळ अनंत आहे. ही युगं माणसाने आपल्या सोयीसाठी बनवली आहेत. जसं एक दिवस आणि ४ रात्रीचे तर चार दिवसाचे असे आठ प्रहर. हा ४ आकडा अतिशय महत्त्वाचा आहे. घरचे चार कोनाडे, चार मुख्य दिशा, ४ वर्ण आणि ४ आश्रम (ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्याशी). तशी ४ युगं - सत्य/कृत, त्रेता, द्वापार आणि कलि. मग होतो प्रलय आणि मग पुन्हा सत्य/कृत. पण इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रकृती म्हणजे निसर्ग ह्याला युगं नसतात. ती असतात संस्कृतीला. निसर्गात ऋतू असतात.

मग युगं बदलतात कशी? असं म्हणतात की धर्म नावाची एक गाय आहे. सत्ययुगात तिला चार पाय असतात. मग माणूस जसा वाईट होत जातो तसा तिचा एक पाय नष्ट होतो. ३ पाय असतात तेव्हा त्रेतायुग. २ पाय असतात तेव्हा द्वापार आणि १ पायावर कलियुग. तोही गेला की प्रलय होतो.

दुसरी कल्पना अशी की विष्णू झोपतो तेव्हा प्रलय असतो. तो हळूहळू डोळे उघडतो तेव्हा कृत, तो अवतार घेतो (राम, कृष्ण) आणि काम करतो तेव्हा त्रेता, द्वापार आणि कलियुग. जेव्हा थकून झोपतो तेव्हा पुन्हा प्रलय. जेव्हा विष्णू झोपतो तेव्हा योगमाया किंवा योगनिद्रा (ही एकाच देवीची २ रूपं आहेत) जगाची काळजी घेते. विष्णू निर्दिस्त असताना तिचं नाव योगनिद्रा आणि तो जागा असताना योगमाया.

राम त्रेतायुगात होऊन गेला तर कृष्ण द्वापारयुगात. असं म्हणतात की कृत कालात सर्व ठीकठाक चाललं होतं. काही कायदे करायची आवश्यकता नव्हती. मग परशुराम आले तेव्हा ते युग संपलं आणि पहिली चोरी झाली (कोण्या राजाने जमदग्नीची गाय चोरली). मग रुल्स आले आणि ते पाळणारे मर्यादापुरुषोत्तम राम आले. म्हणून 'रघुकुल रिती सदा चलि आई' हा तुलसीदास ह्यांचा प्रसिध्द दोहा त्रेतायुगावर आहे. रांम आला की त्रेता युग समाप्त. पुढे द्वापार युगात थोडं confusion सुरु झालं. कायदे, नियम पाळून सुध्दा अधर्म होऊ लागला, धर्म नव्हे. उदा. द्रोण, भीष्म ह्यांनी आपल्या कर्तव्याचं पालन केलं पण तरी ते अधर्माचे धनी झाले. त्यांच्यामुळे पांडवांना त्रास झाला. कृष्ण आला आणि द्वापर युग संपलं. मग आलं कलियुग =- इथे काय बरोबर आणि काय चुक ह्याबद्दल मतभेद आणि वाद. आता कली आला की कलियुग संपेल.

मग रामाची एक कथा दाखवली. सीतेच अपहरण झाल्यावर राम वनातून फिरून थकून बसला असताना काही ऋषी तिथे आले आणि त्यांनी त्याला काय झालं म्हणून विचारलं तेव्हा त्याने सितेबद्दल सांगितलं. त्यांनी आम्ही तिच्या सुटकेसाठी यज्ञ करू म्हटलं. मग रामाला आश्रमात चलायची विनंती केली. तो म्हणाला आता येऊ शकत नाही, पुढे येईन. तेव्हा त्यातला एक ऋषी म्हणाला की वचन दे, ह्या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी येशील, ह्या युगात नाही तरी पुढल्या युगात येशील. तेव्हा राम त्यांना वचन देत म्हणाला की मी येईन तेव्हा सर्वांना खूप आनंद होईल. बहुतेक पुढे कृष्ण अवतारात तो त्यांच्या आश्रमात गेला.

असंही म्हणतात की कृष्ण काय किंवा राम काय दोघेही 'योनीज' म्हणजे ज्यांचा जन्म स्त्रीगर्भातून झाला असे. त्यांनी आयुष्य ही भोगलं आणि मृत्यूचा ही अनुभव घेतला. पण एक लोक असाही आहे की जिथे अयोनिज म्हणजे स्वयम्भू असे देव असतात जसे शिव, विष्णू. ह्या लोकात (काही ह्याला गोलोक म्हणतात, जैन धर्मियात सिद्धलोक म्हणतात). इथे जनम किंवा मृत्यू नाही, म्हातारपण नाही. भयं, दु:ख, भूक नाही. वसंत ऋतू सोडून दुसरा ऋतू नाही. इथे देव बालरूपात आहे.

वाल्मिकी रामायणात सीतेच्या तोंडी एक वाक्य आहे. राम तिला वनवासात माझ्याबरोबर रानात न येता राजवाड्यात रहा असं म्हणतो तेव्हा ती म्हणते आजवरच्या प्रत्येक रामायणात मी तुझ्यासोबत आले. मग आताच का नाही म्हणतोस? म्हणजे ह्याआधी ही रामायण झालं होतं आणि ह्यापुढेही होत रहाणार.

हीच कल्पना 'हनुमानाची मुद्रिका' ह्या कथेत दाखवली. रामाचा अवतार संपत आला तेव्हा एक यमदूत त्याला आता अवतार संपवायची वेळ झाली असं सांगायला आला. राम जायला तयार होता पण हनुमान त्याला जाऊ देणार नाही ही त्याला खात्री होती म्हणून त्याने आपली अंगठी जमिनीच्या एका भेगेत घातली आणि ती आण असं मारुतीला सांगितलं. मारुती सूक्ष्म रूप घेऊन लगेच जमिनीत घुसला. आणि नागलोकात पोचला. तिथे वासुकी ह्या नागांच्या राजाने त्याचं स्वागत केलं. तेव्हा मारुतीने आपलं मार्गदर्शन करायची विनंती केली. वासुकीने त्याला एका पर्वताकडे नेलं. तो होता अंगठ्याचा पहाड. मारुती म्हणाला एव्हढ्या अंगठयामधून मी रामाची अंगठी कशी शोधू तेव्हा वासुकी म्हणाला की ह्या सगळ्या अंगठ्या त्याच्याच आहेत. ह्याआधी सुध्दा अनेकदा एक वानर त्याची अंगठी शोधायला आला होता आणि पृथ्वीवर रामाचा अवतार संपला. हे अनेक युगापासून चालू आहे आणि पुढेही चालू राहणार. ह्यातून अशी शिकवण द्यायचा उद्देश की माणूस जन्मणार, मरणार आणि पुन्हा जन्म घेणार. हे चक्र अविरत आहे आणि कोणाला थांबवता येणार नाही.

शुध्दलेखनाच्या चुका माफ करा प्लीज. लिहायचं खूप आहे म्हणून करे़क्ट करायच्या भानगडीत पडले नाही.

बुधवारचा एपिसोड 'देवांचं अन्न' ह्या विषयांवर होता. त्यावरचं रेकॉर्डिंग ऐकून नंतर लिहेन.

राजा, रसोई चा कालचा एपिसोड 'पूर्व आणि ईशान्य-पूर्व भारतातलं अन्न' ह्या विषयावर होता. मला फार काही आठवत नाही. पण मुर्शिदाबाद नावाच्या शहरात 'माही पुलाव' प्रसिध्द आहे. हा पुलाव म्हणजे चक्क फिशबिर्यांणी असते. लखनौ मधले नबाब कोलकात्यात येऊन राहिले आणि मग त्यांची बिर्याणी प्रसिध्द झाली. पण सगळ्यांनाच मटण्/चिकन परवडेना तेव्हा स्थानिक लोकांनी मांसाची कमी भरून काढायला बटाटा घालून बिर्याणी बनवायला सुरुवात केली. कोलकात्याची ही बिर्यांणी सुध्दा प्रसिध आहे.

ईशान्य-पूर्व भारतात बर्‍याच ठिकाणी पोर्क खात असले तरी मणीपूर मध्ये मात्र वैष्णव पंथाचा प्रभाव होता. त्यामुळे इथे बर्‍याच अंशी शाकाहार प्रचलित आहे. तरी मजा अशी की मांसे हे मांसाहार समज ले जात नाहीत. Happy

चहाबद्द्ल एक मनोरंजक आख्यायिका सांगितली. एक ऋषी तप करत होते पण त्यांना सारखी झोप यायला लागली. मग त्यांनी आपल्या पापणीचा एकेक केस काढून टाकायला सुरुवात केली जेणेकरून झोप येणार नाही. त्यांचा प्रत्येक केस जिथे जिथे पडला तिथे तिथे चहाचं रोप उगवलं. म्हणून चहा घेतला की झोप येत नाही. Happy

१६ तारखेचा एपिसोड 'देवाचं अन्न' ह्यावर होता.

आपल्या शरीराला योगशास्त्रात 'अन्नकोश' म्हणतात. म्हणजे जे अन्न आपण खातो त्यांनी आपलं शरीर बनतं. आणि ही एक साखळी आहे. वनस्पती प्रकाश, पाणी, माती खातात. पशु वनस्पती खातात. पशुंना अन्य पशु खातात, माणूस खातो. माणूस वनस्पती खातो. अन्नाशिवाय जग असंभव आहे. जसं भाषेला 'ब्राम्हण' म्हणतात. तसं अन्नाला सुध्दा 'ब्राम्हण' म्हणतात. असं मानतात की अन्नात देव असतो. जो खातो तो देव आणि तो जे खातो ते सुध्दा देव. हे मंत्र, आपली धार्मिक कर्म ह्या सर्वात प्रकर्षाने बिंबवलं जातं. जेणेकरून अन्नाशिवाय जीवन नाही हे माणूस विसरणार नाही.

देवांना नेहमी दूध किंवा फळं का वाहतात? तर पृथ्वीला 'वसुंधरा' म्हणातात. म्हणजे 'वसू' ला धारण करणारी. 'वसू' म्हणजे वनस्पती. म्हणजे पृथ्वी ही एका अर्थी गाय आणि ह्या वनस्पती हे तिचं दूध. दुधापासून बरंच काही मिळतं. कच्चं दूध असतं, उकळून असतं , तूप, लोणी, ताक, दही. उदा. यज्ञात आगीत तूप ओततात. आग म्हणजे देवतांच्या भुकेचं प्रतिक आहे. तिला शांत करायला तूप घालतात. हे दुधापासून बनत. गोरसात गोमुत्र, मध, गूळ घालतात. हे सुध्दा देवाला वाहतात. पुराणात तर विष्णूला क्षीरसागरात दाखवलंय. म्हणून दूध वाहतात.

फळं का? कच्ची आणि पिकलेली फळं त्यांच्या चवीनुसार निरनिराळ्या देवतांना वाहतात. देवीला आंबट फळं वाहतात उदा आवळा, लिंबू, मिरची. ड्रायफ्रूट्स शंकराला वाहतात. हिमालयात ऋषी सुकलेली फळं बरोबर ठेवत. शंकर बैरागी म्हणून त्यालाही त्याचाच नेवैद्य असेल. शंकर हा संसारी देव नाही पण विष्णू आहे. म्हणून शंकराला unprocessed म्हणजे कच्चं दूध वाहातात. पण विष्णूला processed दूध म्हणजे लोणी, तूप असं वाहतात. म्हणजे मेहनत करून बनवलेल्या वस्तू. म्हणूनच कृष्णाला सुध्दा तूप, लोणी लागतं. शंकराला शक्यतो शिजवलेलं अन्न वाहात नाहीत. अन्नकुटचा दिवाळीच्या वेळचा उत्सव असतो त्यात छप्पन भोग म्हणजे कृष्णासमोर अन्नाचा डोंगर उभा करतात. अश्या तऱ्हेने देवाला जे वाहातात ते त्याच्या लाईफस्टाईलशी मिळताजुळतं असतं.

मग हा भोग देवीला का दाखवत नाहीत? Traditionally देवीला बळी देतात. शेळी, म्हैस, पक्षी असा. आजकाल हे बं द झालं आहे. देवीच नाव आहे 'रक्तविलासिनी' म्हणजे जिला रक्त आवडत अशी. भूदेवी ही एक गाय आहे जी सर्वांना दूध देते मग आपण तिला काय द्यायचं? तर ती कालीच्या रूपात रक्त पिते आणि गौरीच्या रूपात दूध देते. हे cycle of life. म्हणजे तुम्ही जेव्हा खाणं खाता तेव्हा कोणाचा तरी बळी देता हा concept. शाकाहारी सुध्दा जे अन्न खातात ते शेतातून येत. ही शेतं तयार करायला नदी, डोंगर, जंगलं उजाड करावं लागतं. तिथले अनेक प्राणी मरतातच. संस्कृती निर्माण करायला प्रकृती म्हणजे निसर्गाचा नाश करावा लागतो. ह्याची आठवण राहावी म्हणून हा बळी. भागवत पुराणात एक कथा आहे की भूदेवी विष्णूला म्हणते की लोक मला फार त्रास देत आहेत. तर मला त्यांचं रक्त हवं आहे. म्हणून राम आणि कृष्ण रूपात विष्णूने युद्ध केलं. म्हणून रामायण, महाभारत ही युद्ध झाली. ते एक प्रकारचे बळी होते. एक कथा आहे ती अशी की अर्जुन आणि भीम भांडत होते की कुरुक्षेत्रवरचा सर्वात महान योद्धा कोण? तेव्हा त्यांना सांगण्यात येत की एका डोंगरावर एक डोकं आहे, त्याला धड नाहीये. त्या डोक्याला वरून पूर्ण कुरुक्षेत्र दिसत होतं त्याला विचारा. तर ते डोकं म्हणत की मला कौरव पांडव दिसले नाहीत, मला फक्त एव्हढंच दिसलं की कृष्णाचं चक्र फिरत होतं, राजे मरत होते, त्यांचं रक्त सांडत होतं. आणि भूदेवी कालीच्या रूपात ते रक्त पीत होती. लक्ष्मी आणि अलक्ष्मी ह्या बहिणी. घराबाहेर लिंबू आणि मिरच्या लावून अलक्ष्मीला बाहेर ठेवतात आणि घरात लक्ष्मीला लिंबाचा नैवेद्य दाखवतात.

अयोध्येत एका जागी सीतेचं स्वयपाकघर आहे. रामायणात असं म्हणतात की सीता अतिशय छान जेवण बनवू शकत असे. द्रौपदीचं स्वयंपाकघरात जो येईल त्याला जेवण मिळतं अशी तिची ख्याती होती. वनवासात मात्र तिच्याकडे काही नसतं तेव्हा दुर्योधन तिला खिजवायला दुर्वास आणि अन्य ऋषींना पांडवांकडे जेवायला पाठवतो. मग ती त्यांना सांगते की तुम्ही आंघोळ करून या तोवर मी काहीतरी बनवते. ते निघून जातात तेव्हा तिला रडू फुटतं. तेव्हा कृष्ण येतो आणि म्हणतो की काहीतरी असेल न घरी. तर ती म्हणते की बघ ही रिकामी भांडी. जे होतं ते आम्ही संपवलं. पण त्या भांड्याला भाताचा एक कण चिकटलेला असतो. कृष्ण तो खातो आणि त्याचं पोट भरतं. तिथे सगळ्या ऋषींच पण पोट भरतं. आता द्रौपदीकडे जाऊन खाता येणार नाही. तिला वाईट वाटेल म्हणून ते तिथूनच निघून जातात. मग ती कृष्णाला म्हणते की मला लोकांना वाढून सवय आहे. मला हे बरं वाटत नाही. तेव्हा कृष्न तिला सूर्याची उपासना करायचा सल्ला देतो. सूर्याने तिला एक थाळी दिली. म्हणजे 'माताजीका भंडार' सारखीच कल्पना. म्हणजे स्वयंपाकघरात नेहमी जेवण असेल. जोवर द्रौपदी जेवत नसे तोवर थाळीत खाणं मिळे. त्यामुळे सगळ्यांना जेवायला घालून शेवटी ती जेवे.

मग फक्त बायकाच चांगलं जेवण बनवायच्या का? तर नल-दमयंतीची कथा आहे. दोघे राजघराण्यातील पण परिस्थिती अशी आली की ते गरीब झाले आणि नलाला स्वयंपाक्याची नोकरी करावी लागली. ही कथा केरळात प्रसिध्द आहे. तिथे चांगलं जेवण बनवणाऱ्या माणसाला नलाची उपमा देतात. मल्याळी महाभारतानुसार नल हा जगातील सर्वात चांगला स्वयंपाकी.

शबरीची कथा सुध्दा दाखवली. सर्वांना माहीत आहे म्हणून इथे देत नाही.

देवाला पान-सुपारी देतात कारण ते संसारिक जीवनाचे प्रतिक आहे. जेवणानंतर पान खाणं म्हणजे तुमचं आयुष्य सुखी आहे. कृष्ण आणि विष्णूला वाहतात, शंकराला नाही.

,खूप मस्त माहिती देतेयस ग स्वप्ना, मला चॅनेल पाहता येत नाही, तू लिहिलेले वाचून दुधाची तहान ताकावर भागवते.

२३ तारखेचा एपिसोड 'सृष्टीची रचना' ह्यावर होता.

४००० वर्षांत ह्याबद्दल बऱ्याच कहाण्या आहेत. सर्वप्रथम वेदांत काय लिहिलं आहे ते पाहू. वेदांत एक प्रसिद्ध कविता आहे - नासदीय सूत्र म्हणून. ४०० वर्षांपूर्वी कोणी असं काही लिहिलं आहे ह्यावरून आपल्या संस्कृतीच्या समृध्दतेची कल्पना यावी. ह्यात कवी म्हणतो की आधी काय होतं? जल का स्थल? प्रकाश का अंधार? आधी श्वास कोणी घेतला? उष्णता होती का थंडी? मग म्हणतो कदाचित देवांनी जल बनवलं असावं. पण मग त्यांची निर्मिती कोणी केली?त्यांच्या आधी काय होतं? ह्या कवितेत तो speculation करतोय की कदाचित देवतांना माहीत असेल किंवा नसेलही. तो आणखी एक म्हणतो जगात काहीही निर्मिती होण्याआधी इच्छा असतेच असते. म्हणजे पहिली इच्छा होती हे नक्की. मग जगाची निर्मिती झाली. इच्छा हे बीज आणि ब्रह्मांड म्हणजे त्याचं फळ. तर अथर्ववेदात असं म्हणतात की कामदेव आधी आला. पण सगुण कामदेव नाही. तर तत्त्वाच्या रूपातले कामदेव. म्हणजे काम किंवा इच्छा ह्यातून जग निर्माण झालं. यजुर्वेदात पुरुषवेद नावाचा यज्ञ होता. ह्या यज्ञात असं म्हणतात की दुनिया म्हणजे प्रजापती. त्याच्या डोक्यापासून ब्राह्मण, हातांतून क्षत्रिय, पोटातून वाणी तर पायांपासून शूद्र आले. थोडक्यात काय तर प्रजापतीच्या त्यागातून सृष्टीची निर्मिती झाली. सृष्टीचा इथला अर्थ समाज असा घ्यायचा.

वेद असं म्हटलं तरी त्यात ३-४ ग्रंथ येतात. समिता (नीट ऐकु आलं नाही) ज्य्याच्यात मंत्र असतात. दुसऱ्यात यज्ञाचे डीटेल्स असतात. आरण्यक असतात ज्यात फिलोसॉफीकल विचार असतात. आणि उपनिषद असतात ज्यात चर्चा असते. आरण्यकात प्रजापतीचा उल्लेख आहे. त्यांनी एका स्त्रीला पाहिलं जिचं नाव शतरूपा - जिची अनेक रूपं असतात. मोहित होऊन ते तिच्यामागे धावू लागले. तिने अनेक माद्यांची रूप घेतली. प्रजापतीने नराची रूपं घेतली. उदा. ती गाय तर ते बैल. ती घोडी तर ते घोडा. असं करत करत हत्ती ते मुंगी अशी सगळी रूपं त्यांनी घेतली. आणि त्यातून प्राणीसृष्टी निर्माण झाली. काही ठिकाणी असा उल्लेख आहे की मनुने जग निर्माण केलं. मनू आणि शतरूपाचा विवाह झाला आणि त्यातून मानव जातीची निर्मिती झाली.

ब्रह्माने सृष्टीची रचना कशी केली? ब्रह्मांड ह्या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्माचं अंडं. ब्रह्माच्या मनातून मानसपुत्रांचा जन्म झाला. जसे चार स्नातककुमार ज्यांनी लहान मुलाच्या रुपात जन्म घेतला. पण त्यांना संसारात काही रस नव्हता. ते संसारी झाले. मग आले सप्तर्षी. पण स्त्री नसेल तर जगाची निर्मिती कशी झाली? तेव्हा ब्राह्मणे स्त्रीची निर्मिती केली आणि प्रत्येक ऋषीला एकेक पत्नी दिली. त्यातून जीवजंतू निर्माण झाले. ह्या ऋषीत सर्वात प्रसिध्द कश्यपमुनी. कश्यप चा अर्थ आहे कासव. त्यांच्या अनेक बायका आणि प्रत्येकीपासून वेगवेगळे जीवजंतू निर्माण झाले. अदितीपासून आदित्य म्हणजे देव, दितीपासून दैत्य, कद्रूपासून नाग तर विनितापासून पक्षी, तीनिपासून मासे. ही ब्रह्मासोबत निगडीत एक कॉमन कथा आहे.

शैव मठात काय कथा आहे? इथे असं म्हणतात की शंकर अर्धनारीनटेश्वर आहे. जेव्हा सृष्टीची रचना झाली तेव्हा प्रथम हिरण्यगर्भ आला. हा शब्द वेदांत आढळतो. ह्याचा अर्थ होतो golden womb. ह्या मतप्रवाहात ह्या गर्भाला फार महत्त्व आहे. असं म्हणतात की हा गर्भ कमळाच्या रूपात होता. जेव्हा हे फूल उमललं तेव्हा आतून ब्रह्मदेव निघाले. त्यांच्यासमोर शंकर अर्धनारीनटेश्वर रूपात प्रकट झाले. ते पाहून ब्रह्माने पुरुष आणि स्त्रीची निर्मिती केली. पुरुषरुपाला पाहून मनु तर स्त्रीरुपाला पाहून शतरूपा निर्माण केली. आणखी एक कथा आहे की शंकराने स्वत: अर्धनारीनटेश्वर रूपाचे दोन भाग केले. शिवापासून पुरुष तर शक्तीपासून स्त्री निर्मण झाली.

वैष्णव पंथात एक elaborate story आहे. जगात प्रथम काही नव्हत. मग विष्णू जागृत झाले. मग ब्रह्मांड निर्माण झालं. जेव्हा विष्णू उठून श्वास घेऊ लागले तेव्हा इच्छा जागृत होतात. त्यांच्या नाभीतून एक कमळ उगवत. त्यात ब्र्हम्देव असतात. ते डोळे उघडतात तेव्हा घाबरतात कारण त्यांना कोणी दिसत नाही. एकटेपणा वाटतो. म्हणून त्यांना कोणीतरी दुसरा निर्माण करावा असं वाटतं. अश्या रीतीने भयापासून जगाची निर्मिती झाली. मग त्यांनी स्त्रीची निर्मिती केली. तिच्यावर मोहित होऊन तिच्यामागे धावू लागले आणि जग निर्माण झाल. आणखी एक कथा आहे. एका असुराने प्रलयानंतरपृथ्वीला पाण्याच्या आत दाबून ठेवलं होतं. ब्रह्माच्या नाकातून एक वराह निघाला. तो समुद्राच्या आत गेला आणि त्याने पृथ्वीला वर काढलं. तेव्हा पृथ्वीवर वनस्पती उगवल्या आणि जग निर्माण झालं. एका उपकथेनुसार अमृतमंथनामुळे जग निर्माण झालं.ह्यात विष्णूचा कासव अवतार होता. आणि एक कथा अशी की विष्णूने एका छोट्या माश्याच रूप घेतलं. त्याला मोठ्या माश्यापासून मनुने वाचवलं तेव्हा संस्कृती निर्माण झाली. एका कथेनुसार विष्णू हयग्रीव होतात - हयग्रीव म्हणजे घोड्याचं तोंड. त्याने प्रलयाच्या पाण्यापासून वेद वाचवले. तेव्हा जग निर्माण झालं. तर एका कथेनुसार प्रलयाच्या आधी एक छोटा मासा मनुला म्हणाला की तू एक नाव बनव त्यात वनस्पतीच्या बिया, प्राणी आणि वेद ठेव. जेव्हा प्रलय येतो तेव्हा हा मासा त्या नावेच रक्षण करतो आणि प्रलय संपल्यावर मनु जग निर्माण करतो. अश्या तऱ्हेने वैष्णव पंथात अनेक कथा आहेत आणि सगळ्यांची मुळं वेदांत आहेत. आरण्यक आणि उपनिषदात आहेत.

शाक्त मठात लोककथा आहेत. पण सार्वत्रिक समज असा आहे की शंकर तप करत होते तेव्हा प्रलय होता. काही जीवन नव्हतं. पहाडावर बर्फ होतं. कुठेही सृजन नव्हतं. मग देवी पार्वतीच्या रूपात पर्वतातून प्रकट झाली आणि तिने शंकराकडे जाऊन आपल्याशी विवाह करायची विनंती केली. तेव्हा शंकराच्या तपाच्या आगीने बर्फ वितळले, नद्या झाल्या. भूमी सुपीक झाली आणि वनस्पती उगवल्या. मग प्राणी आले. देवीच्या मुळे शंकर, किंवा पुरुष, किंवा आत्मा, जागृत झाले. इथे सर्व रचना देविमुळे झाली असं मानतात. एक आणखी कथा आहे की आधी देव नव्हते. फक्त कुमारी देवी होती. तिचं नाव होतं आदिमाया शक्ती. तिने एका पक्षाच्या रूपात ३ अंड्याना जन्म दिला. त्यातून त्रिदेव निघाले. मग ती ब्रह्मदेवाकडे जाऊन म्हणाली की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. पण ती माता म्हणून त्याने नकार दिला. तेव्हा ती चिडली आणि 'तुझी कधी पूजा होणार नाही' असा शाप दिला. मग ती गेली विष्णूकडे. तो लाजला तेव्हा तिनेच त्याच्याशी लग्न करायला नकार दिला. मग गेली शंकराकडे. ते म्हणाले की तुझ्याकडे ३ डोळे आहेत, माझ्याकडे २ आहेत. तुझा एक डोळा मला दे तर मी लग्न करेन. जेव्हा ते तिसरा डोळा तिच्याकडून घेऊन आपल्या कपाळावर लावतात तेव्हा त्यातून आग बाहेर येते. देवी राख होते. मग तिघांना वाईट वाटतं. मग ते तप करून राखेतून ३ देवी निर्माण करतात. सरस्वती जी ब्रह्माची बायको होते. लक्ष्मी विष्णूची तर पार्वती शंकराची. बाकी राखेतून ग्रामदेवी निर्माण करतात. ह्या कथा वेदांत नाहीत, लोकांनी ह्या कथा रचल्या आहेत पण इथे स्त्रीचं योगदान महत्त्वाचं मानलं गेलं आहे हे विशेष. तंत्रात स्त्रीतत्व आधी जागृत होतं तर वेदांत पुरुषतत्व. पण दोन्ही बरोबर असतात.

ह्यात एक भेद आहे. रचना कशाची - प्रकृतीची (वनस्पती, प्राणी वगैरे) का संस्कृतीची (मन, आत्मा)? Objective or subjective?

Audience मधून एकाने बायबल मधल्या दुनियेच्या निर्मितीचा प्रश्न विचारला. तेव्हा देवदत्त म्हणाले की ती linear story आहे - एक देव, जगाची एक सुरुवात, एक अंत, जगायची एक पध्दत (commandments). पण हिंदू, जैन किंवा बौध्द धर्मात असं नाहीये. इथे अनेक सृष्टी, अनेक उगम, अनेक अंत, अनेक देवता म्हणून अनेक कथा. मनु आहे, त्याचे वडील सूर्यदेवता आहेत, प्रजापती आहे, स्नातककुमार आहेत, दक्ष प्रजापती आहेत. ह्या प्रत्येकाची कथा आहे. तुम्ही देवीला महत्त्व देत असल तर शाक्त परंपरेतल्या कथा आहेत. निद्रिस्त देव पाहीजे तर विष्णूच्या कथा, बैरागी देव पाहिजे तर शंकराच्या कथा अशी विविधता आहे.

सियासत संपल का?
नुरजहां नाम्करण झाल नीसाच . मग काय झाल?
एपिक चॅनेल्चे एपिसोड्स कुठे पहायला मिळतात का?

.

Yesterday's 'Raja, Rasoi Aur Anya Kahaniya' episode was perhaps the last one. It covered food in Western part of the country.

In Rajasthan, a dish used to be made from rabbit - called 'खट खरगोश' - in royal kitchens. They used to stuff the rabbit with spices and put it in a ditch to cook over some specific type of leaves. I couldn't totally understand what the lady was saying. Then there was mention of the famous laal maas. The characteristic red color is imparted to the dish because of Mathiyani chilli which some king in some Rajasthani village had specially got for his farmers.

Then it was the turn of Goa and the famous dishes like Sorpotel and Vindaloo. Much of the credit for these dishes goes to the Portuguese. The Sorpotel uses vinegar. It keeps the meat fresh for longer duration and must have come handy during long see voyages. Some of the Portuguese married local women and settled down. The local women of course disliked the bland taste of the original Portuguese food and added their own spices to enhance the taste.

When it came to Maharashtra, the vegetarian Peshewa food was mentioned. Kolhapur's famous Tambda and Pandhara rassa was talked about. It seems the original pandhara rassa has lot of cashewnuts in it but the version served in restaurants makes ample use of corn flour to impart the white color as the restaurants cannot afford to use so much of cashew.

Mumbai was mentioned specifically Happy The legendrary Wada Pao and of course the Pao Bhaji. There are many stories about how the Pao Bhaji came into existence. Some say it was prepared for the mill workers to keep them sustained for longer hours. Some say the traders at the BSE - working later hours while performing trades with foreign countries - needed something to eat during the night so the nearby restaurants started the practice of putting together leftovers of the day's vegetables gravies along with spices and Pao Bhaji was born. The word 'Pao' has interesting origins. Some say it was sold in a quartet hence the name Pao as in quarter. Another legend goes that the dough for making this bread was kneaded by feet hence the word Pao Happy

The episode ended with mention of Gujarati Thali.

देवलोकचा २४ तारखेचा एपिसोड 'दिशा' ह्या विषयावर होता.

वास्तुशास्त्र म्हणजे काय? तर आपण सगळे स्पेस आणि टाईम दोन्हीत असतो. टाईम manage करता येतो तो astrology ने आणि स्पेस manage करता येते वास्तूशास्त्रानुसार. म्हणजे घराची रचना विशिष्ट प्रकारे केली की घरात पोझिटिव्ह एनर्जी रहाते आणि सुख-समृध्दी मिळते.

वास्तुशास्त्राचा वेदांशी काय संबंध आहे? तर वेदांत 'दिग्' म्हणजे 'दिशा' ला खूप महत्त्व आहे. तसंच वास्तुशास्त्रासुध्दा आहे. दोन्हीत त्याच दिशा आहेत. वैदिक यज्ञात एक यज्ञ पश्चिमेला, एक पूर्वेला (हा देवतांसाठी) तर एक दक्षिणेला (हा पितरांसाठी असतो). वास्तुशास्त्रात सुध्दा असं म्हणतात की पश्चिमेला वरुण देवता आहे. हा समुद्राचा देव म्हणजे तिथूनच सगळं पाणी येतं. जीवन येते. पूर्वेला इंद्र आहे. तर दक्षिणेला यमराज म्हणजे मृत्यू. वेदांत हेच सांगितलं आहे.

वास्तुशास्त्राचा पुराणांशी काय संबंध आहे? पुराणात दिग्पाल म्हणजे दिशांच्या संरक्षकांबद्दल बरंच काही लिहिलं आहे. ८ + २ = १० दिशा आहेत. कार्डीनल म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. तर ओर्डीनल म्हणजे आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. वर आणि खाली ह्या उरलेल्या दोन दिशा. असे १० दिग्पाळ असतात. मंदिरांत ह्यांच्या मूर्ती असतात. उत्तरेचा दिग्पाल कुबेर म्हणजे यक्षांचा राजा. दक्षिणेत यमराज म्हणजे मृत्यू. पूर्वेला इद्र. पश्चिमेला वरुण. नॉर्थ-ईस्ट मध्ये ईशान. कोणी म्हणतात हा शिव तर कोणी म्हणतात चंद्र. साऊथ-वेस्ट मध्ये नित्ती. ही मृत्यूची देवता आहे. साऊथ-ईस्ट मध्ये अग्नी. नॉर्थ-वेस्ट मध्ये वायू. अस म्हणतात की ह्या आठ दिशांत एक नर आणि एक मादी हत्ती असतात. आणि ते आकाशाला तोलून धरतात. वरची दिशा ब्रह्मदेवाची तर अधो विष्णूची. काही लोकांच्या मते अधो दिशेला शेषनाग आहे आणि त्यावर विष्णू पहुडले आहेत. आणि विष्णूत जग आहे. वास्तुपुरुष विष्णूचं रूप मानतात. विष्णू नॉर्थ-ईस्ट मध्ये डोकं आणि साऊथ-वेस्ट मध्ये पाय अश्या स्थितीत आहे असं मानतात.

ह्या १० दिग्पालाचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तर हे दहा जण एकमेकांना balance करतात. उदा. उत्तरेला कुबेर म्हणजे वृद्धी. तर दक्षिणेला यम म्हणजे मृत्यू. पश्चिमेला वरुण म्हणजे खारं पाणी तर पूर्वेला इंद्र म्हणजे पाउस अर्थात गोडं पाणी. हे स्पेसला balance करतात.

सर्वांच्या घरात मंदिरं नॉर्थ-ईस्ट दिशेला का असतात? उत्तर दिशा कशी ओळखायची तर धृवतार्यावरून. हा अढळ मानतात. उत्तरेला कैलास अर्थात शंकर आहेत. पूर्वेला सूर्योदय होतो अर्थात वृद्धी. अश्या रीतीने नॉर्थ-ईस्ट permanance + growth दर्शवते. म्हणून कदाचित ह्या दिशेला एव्हढ महत्त्व असावं. इथे भागवत पुराणातली धृवताऱ्याची गोष्ट दाखवली. उत्तरेला नेहमी आत्म्याशी जोडलं जातं. तिथेच कैलास जो पर्वत आणि म्हणून अचल आहे. कदाचित हेच ह्या कथेतून दाखवायचं असावं.

शंकर नेहमी उत्तरेत बसून दक्षिणेकडे पहाताना दाखवतात. दक्षिणेत शंकराची 'दक्षिणमूर्ती' म्हणून एक प्रसिद्ध मूर्ती आहे. ही मूर्ती वडाच्या झाडाखाली बसून वेदांचे ज्ञान (जे अनंत आहे) देत आहे असं मानतात. वडाचं झाड पण permanance दर्शवते. त्यामुळे ध्रुवतारा, पहाड, वड, बर्फ जो हलत नाही हे सगळे अढळतेचे द्योतक. तर उलट दिशेला म्हणजे दक्षिणेकडे यम आणि वैतरणी नदी (जी भूलोक आणि पितृलोक ह्यांना विभागते). निधन झाल्यावर डोकं दक्षिणेला आणि पाय उत्तरेला ठेवतात. जेणेकरून मृत व्यक्ती शंकराकडे पहातेय. मुखाग्नी दिल्यावर त्याचा आत्मा दक्षिणेकडे वैतरणी पार करून पितृलोकात जाईल अशी कल्पना.

बहुतकरून मंदिरं पुर्वाभिमुखि असतात जेणेकरून उगवत्या सूर्याचा पहिला किरण मूर्तीवर पडेल. भक्त पश्चिमेला सन्मुख असतो. सूर्याची किरणं मूर्तीवरून परावर्तीत होउन भक्तावर पडतात. मंदिरला स्त्रीच्या शरीराच्या रूपात डिझाईन केलेलं असतं. गर्भगृह म्हणजे गर्भाशयाच्या ठिकाणी देवाची स्थापना केलेली असते.

प्रेक्षकांपैकी एकाने विचारलं की असं कुठलं मंदिर आहे का जिथली मूर्ती पूर्वाभिमुख नाही. देवदत्त म्हणाले की अशी अनेक मंदिरं आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी पश्चिमेला सन्मुख आहे. असं म्हणतात की लक्ष्मीचा जन्म समुद्रातून झाला आणि तिचे पिता वरुण म्हणून ती पश्चिमेला पहातेय. दुसर्या एका मंदिराची एक अशी कथा आहे की रामाचा अभिषेक झाला तेव्हा दक्षिनेहून बिभीषण आला. परत जाताना आपली आठवण म्हणून एक मूर्ती द्या असं त्याने रामाला सांगितलं. तेव्हा रामाने नारायण म्हणजे निद्रिस्त विष्णूची मूर्ती दिली. बिभीषण घेऊन निघाला पण मूर्ती एव्हढी जड की त्याला ती लंकेत नेताच आली नाही. श्रीरंगम च्या जवळ कुठेतरी तो बसला. आणि ती मूर्ती अजूनही दक्षिणेकडे पहात तिथेच आहे.

रामायणात नेहमी उत्तर आणि दक्षिण दिशांचा उल्लेख येतो पण महाभारतात असा स्पष्ट उल्लेख नाही. इथे कृष्णाची कथा तो मथुरेहून (पूर्व दिशा) द्वारकेकडे (पश्चिम) जातानाची आहे त्यामुळे प्रथमच समुद्राचं वर्णन विस्ताराने आलं आहे. भारतात दोन प्रकारचे हायवेज होते असं इतिहास सांगतो - उत्तरपथ आणि दक्षिणपथ. उत्तरपथ पश्चिम ते पूर्व आणि दक्षिणपथ उत्तर ते दक्षिण जातो. दक्षिणपथ रामायणाशी निगडीत आहे तर उत्तरपथ महाभारताशी.

पण ह्या सर्वाचा अर्थ असा नाही की दक्षिण दिशा वाईट आहे. कारण पौराणिक कथा कधीच शब्दश: घ्यायच्या नसतात. मानसशास्त्रानुसार उत्तर म्हणजे डोकं, मेंदू, मन तर दक्षिण म्हणजे जिथे मूलाधार चक्र असतं, जिथे निगेटिव्ह एनर्जी असते. पण माणसाचा प्रवास नेहमी उत्तरेच्या दिशेने असतो जसं कमळाच फूल उत्तरेला तोंड करून फुलतं. पण उत्तरेला देव आणि दक्षिणेला राक्षस ही चुकीची कल्पना आहे.

देवलोकचा ३० तारखेचा एपिसोड 'देवी-देवतांचे विवाह' ह्या विषयावर होता.

आपल्या फिलॉसॉफी मध्ये दोन प्रकारचे forces वर्णन केले आहेत - एक आहे प्रकृती म्हणजे निसर्ग किंवा material reality. ही सगुण शक्ती आहे. दुसरी शक्ती आहे पुरुष. ह्याचा आर्थ शब्दश: 'नर' असा घ्यायचा नाही. तर ह्याचा अर्थ आहे मन, आत्मा, spiritual reality. ही निर्गुण शक्ती आहे. ह्या दोन शक्तींच्या मिलनाला 'विवाह' म्हणतात. विवाह म्हणजे शरीर आणि आत्मा ह्यांचं मिलन.

विष्णूच्या भगवान राम अवतारात एक पत्नी तर कृष्ण अवतारात अनेक पत्नी. असं का? प्राणीजगतात पाहिलं तर 'विवाह' हा संस्कार नसतो. 'लग्न' हा प्रकृतीतला concept नाही तर संस्कृतीतला आहे. निसर्गात अनेक प्रकाराचे पशु-पक्षी आहेत. काही जातीत आयुष्यभर एकच साथीदार असतो जसं हंस किंवा गरुड. पण हत्ती, वाघ किंवा सिंह ह्या प्राण्यात एक नर अनेक मादीसमवेत असतो. मधमाशी तर एकच राणी माशी असते. अश्या प्रकारे विविधता आहे. तसंच प्रत्येक युगाप्रमाणे, काळाप्रमाणे विवाहाच्या अनेक रिती असू शकतात. राम एकपत्त्नीत्व मानत असला तरी दशरथाच्या तीन बायका होत्या. भागवतात कृष्णाच्या आठ बायका तर द्रौपदीचे पाच पती.

शंकराच्या लग्नाबद्दल अनेक कथा आहेत पण विष्णूच्या लग्नाबद्दल फार माहिती नही. पण दोन कथा प्रचलित आहेत. दक्षिणेकडे विष्णूच्या मूर्तीजवळ दोन देवी असतात - श्रीदेवी आणि भूदेवी. उत्तरेत मात्र एकच पत्नी - लक्ष्मी. श्रीदेवी आणि भूदेवी ही लक्ष्मीची दोन रूपं आहेत. भूदेवी म्हणजे earth आणि श्रीदेवी म्हणजे ऐश्वर्य. हिरण्याक्ष नावाचा राक्षस भूदेवीला समुद्रात आत घेऊन गेला. तेव्हा विष्णूने वराह रूपात तिला वाचवलं. तिने त्याला वरलं तेव्हा विष्णूचं नाव झालं 'भूपती'. अमृतामंथनात श्रीदेवी/लक्ष्मी निघाली. सगळे तिच्यावरून भांडू लागले तेव्हा ती म्हणाली मी माझां नवरा स्वत: निवडणार आणी तिने विष्णूला वरलं. म्हणून तो 'श्रीपती' किंवा 'श्रीनिवास'. उत्तरेत त्याला 'लक्ष्मीवल्लभ' म्हणजे 'लक्ष्मीचा प्रिय' असं म्हणतात.

देवांत काहीच ब्रह्मचारी आहेत. इथे दोन विचारधारा आहेत - एक अशी की जगाचं रहाटगाडगं चालवायला लग्न करायला हवं. दुसरी अशी की लग्न केल्याने आध्यात्मिक/तांत्रिक शक्ती कमी होतात. उदा. हनुमान ब्रह्मचारी आहे म्हणून त्याचं तपोबल जास्त आहे. म्हणून त्याला 'वज्रांगी' म्हणातात. शंकराचं भैरव रूप ब्रह्मचारी मानतात. मुरुगन चं 'दंडपाणी' रूप ब्रह्मचारी मानतात. गणपतीची सुध्दा दोन रूपं आहेत - एकांत त्याच्या ऋद्धी-सिद्धी अश्या दोन बायका आहेत. तर एकांत तो ब्रह्मचारी आहे.

देवी कुमारी सुध्दा आहे आणि माता सुध्दा आहे. हे एक रूपक आहे. नांगर चालवायच्या आधीचं शेत हे कुंवार पण पिक येत ते शेत माता रूपात. म्हणून धरती कुमारी आहेत (लाल रूपात) आणि माता पण (हिरव्या रूपात).पण जेव्हा देवी उग्र रूप घेते तेव्हा ते रूप कुमारिकेचं असतं. दक्षिणेत 'कन्याकुमारी' बद्दल एक प्रसिद्ध कथा आहे. ही एक ग्रामदेवी होती. हिचं शंकरावर प्रेम होतं आणि त्यानेही तिच्याशी लग्न करायला संमती दर्शवली होती. पण देवांचा ह्या लग्नाला विरोध होता कारण हे लग्न केल्याने ती पत्नी, माता होईल आणि तिची शक्ती कमी होईल असं त्यांचं म्हणणं होतं. तिने त्यांना त्रास देणारया बाणासुराचा वध करावा असं त्यांना वाटत होतं कारण त्याचा वध एका कुमारिकेच्या हातून शक्य होता. त्यांनी तिला लग्नापासून परावृत्त करायचा प्रयत्न केला पण तिने ऐकलं नाही. ती म्हणाली की त्याचा वध होईल, माझ्याकडून नाही तर आणखी कोणाकडून तरी. शंकर कैलासाहून निघाले होते आणि एका ऋषीच्या मतानुसार मध्यरात्रीचा समय विवाहाला शुभ होता.

हे ऐकून नारद म्हणाले की आपण शंकराच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन हे लग्न मोडू या. शंकर विवाहाला यायला निघाले असताना नारदाने त्यांना वाटेत गाठलं. आणि पहाट व्हायला काही क्षण बाकी आहेत असं खोटं सांगितलं. शंकराने त्यावर विश्वास ठेवला आणि मुहूर्त टळला म्हणून तो कैलासावर परत गेला. कन्याकुमारीचं लग्न झालं नाही. तिने वाट पाहिली आणि शेवटी रडायला सुरुवात केली. अश्रुंनी तिचा सारा शृंगार. मेंदी, आलता धुवून गेला. म्हणून कन्याकुमारीला समुद्राच्या पाण्याचा रंग वेगवेगळा आहे असं म्हणतात. तिने उग्र रूप धारण केलं आणि बाणासुराचा वध केला.

बहुसंख्य देवांच्या अनेक बायका असल्या तरी समाजात एकपत्नी आणि एकपती अशी रीत आहे. तसं कसं? तर अनेक वर्षांपूर्वी जरी स्त्रियांना एकच पती असणं अनिवार्य होतं पण पुरुषांना अनेक विवाह करता येत असत. असं म्हणतात की त्याच्याही आधी बरीच वर्षं हीच मुभा स्त्रियांना सुध्दा होती. महाभारतात कुंतीच्या तोंडी 'पांडू' ला उद्देशून एक संवाद आहे की अनेक वर्षापूर्वी स्त्री-पुरुष मोकळ्या तऱ्हेने वावरत आणि कोणाच्या मुलाला जन्म द्यायचा ह्याची निवड करायचं स्वातंत्र्य बायकांना होतं. पण एक तरुण होता ज्याचं नाव होतं श्वेतकेतू. त्याने आपल्या वडिलांना म्हटलं की मला माझ्या आईचं परपुरुषाबरोबर फिरणं पसंत नाही. त्यांनी म्हटलं की प्रथा अशीच आहे. जिथे हवं तिथे जायचं स्वातंत्र्य तिला आहे. तो म्हणाला की मग मी तुम्हाला वडील कसं मानू? कश्यावरून तुम्ही माझे वडील? तर त्याचे वडील म्हणतात की पिता हा प्रेमाने पिता होतो, बिजाने नाही. श्वेतकेतूने असा नियम घातला की पत्नी पतीसोबत एकनिष्ठ असायला हवी. मग पुरुषप्रधान संस्कृती आली. आणि स्त्रियांचं स्वातंत्र्य गेलं. काही जण म्हणतात त्यामुळे समाजाची प्रगती झाली तर काही म्हणतात अधोगती झाली. असो.

शास्त्रांत लग्नाचे अनेक प्रकार आहेत. एक आहे असुरविवाह ज्यात मुलीची खरेदि केली जाते. देव विवाह आहे ज्यात तुम्ही एखाद्या माणसाची सेवा केलीत, त्याला मदत केलीत तर दक्षिणा म्हणून तो आपली मुलगी देतो. मग आहे ऋषी विवाह ज्यात ऋषी एखाद्या राजा किंवा पित्याकडे येऊन म्हणतो मला यज्ञात पूजापाठ करायला यज्ञपत्नी पाहिजे आणि तो राजा किंवा पिता आपली मुलगी त्याला देतो. गंधर्व विवाह म्हणजे लव्ह मेरेज. पिशाच विवाह म्हणजे मुलीला पळवून नेऊन लग्न करण. ब्रह्म विवाह म्हणजे मुलीच्या वडिलांना सांगून लग्न करणं.

देवाच्या दोन बायका असतात - एक लोक पत्नी असते आणि दुसरी अलोकिक पत्नी असते. किंवा एक भोगपत्नी जी दिनचर्येसाठी असते. दुसरी मोक्षपत्नी असते जी आध्यात्मिक जीवनाशी निगडीत असते. मुरुगन ची एक कथा आहे. तो एका आदिवासी मुलीच्या प्रेमात पडला आणि तिला वश करायला त्याने गणपतीची मदत मागितली. त्याप्रमाणे गणेशाने हत्तीचं रूप घेऊन तिला घाबरवलं आणि मुरुगन ने येऊन वाचवलं. हा प्रणय चा concept ह्या कथांतून अश्यासाठी आला की भारतात एक काल असा होता की यज्ञ-याग होत पण ते ब्राह्मण करत. सर्वसामान्य लोकांना काय चाललं आहे ते फारसं कळत नसे. दुसरीकडे वैरागी लोक होते जे सर्वसंगपरित्याग करायचा सल्ला देत होते. त्यामुळे आयुष्य एन्जॉय करणं आणि देवदेवता ह्यांचा काही संबंध नाही अशीच सर्वसाधारण धारणा होत होती. ह्या कथातून असं सांगायचं होतं की देवांना सुध्दा विलासी जीवन प्रिय आहे.

प्रेक्षकांतून एकाने प्रश्न विचारला की देव आणि माणूस असं लग्न होऊ शकतं का? गणिकाचं मंदिरातल्या देवांशी लग्न झालं आहे असं मानत. लौकिकार्थाने त्यांचे अनेक प्रियकर असले तरि नवरा म्हणजे देव. आणि त्या अर्थाने त्या 'सदैव सवाष्ण' असत. अर्थात पुढे देवदासी प्रथा स्त्रियांचं शोषण करायला वापरण्यात येऊ लागली. भक्त कधीकधी देवाला च आपला पती/पत्नी मानतात. उदा. संत मीराबाई.

देवलोकचा ३१ तारखेचा एपिसोड 'देवी-देवतांचे रूप बदलणं' ह्या विषयावर होता.

देवाचं रूप कोणी पाहिलं आहे? जगात जे जे काही आहे त्यात देव आहे असं आपण म्हणतोच की. कोणी म्हणतं देव सगुण आहे तर कोणी म्हणतं तो निर्गुण आहे. तो पुरुष आहे का स्त्री आहे? बालक आहे का वृध्द? कोणाला माहीत नाही. म्हणून पौराणिक कथांत देव वेगवेगळ्या रूपांत दाखवतात. हजारो वर्षांपूर्वी दगड, झाडं ह्याची पूजा करायची पध्दत होती. कारण त्यांच्यात देव वसलेला आहे अशी त्यांची श्रद्धा होती. जसं दगडांत यक्ष, पाण्यात अप्सरा, झाडांत गंधर्व. उदा. भागवतात कृष्णाने झाडांतून दोन गंधर्वांना मुक्त केल्याची कथा आहे. देव पशुचं रूप घेऊ शकतो. उदा. गाय. आजकाल हे शब्दश: घेतलं जातं. पण असं रुपक आहे की धरतीमाता/भूदेवी/निसर्ग म्हणजे गाय आहे.

कधीकधी दोन प्राण्यांतून तिसरा प्राणी निर्माण झाल्याच्या गोष्टी असतात. उदा. गणपतीला हत्तीचं डोकं. विष्णूचा एक अवतार आहे हयग्रीव म्हणजे मानवी शरीरावर घोड्याचं डोकं. नरसिंहावतार आहे. ओडीशामध्ये एक महाभारत आहे त्यात एक प्रसिद्ध गोष्ट आहे - कृष्ण ९ प्राण्याचं (उदा. कोंबडा, मोर, बैल, सिंह, हत्ती, साप) बनलेलं एक रूप घेतो आणि अर्जुनाजवळ येतो. अर्जुन घाबरतो. तसंच शैव पंथात शंकराच 'शरभ' म्हणून एक आठ पायवाल्या सिंहाचं रूप आहे. पंचमुखी/दशमुखी हनुमान आहेत. भगवद्‌गीतेत कृष्णाच्या विश्वरूपात सर्व प्राणी, पक्षी आणि झाडं सुध्दा दिसतात.

स्त्री पुरुषाचं किंवा पुरुष स्त्रीचं रूप घेऊन शकतो का? विष्णूचं मोहिनी (मोह म्हणजे attract) रूप प्रसिद्ध आहे. असुर तर काय शंकर सुध्दा तिच्याकडे आकर्षित होतात. योगवाशिष्ठ मध्ये एका राणीची गोष्ट आहे. तिच्या नवऱ्याचं असं म्हणणं असतं की स्त्रिया मूर्ख असतात. पण ती खूप विद्वान असते. तेव्हा नवऱ्याला ज्ञान आणि gender ह्याचा काही संबंध नसतो हे शिकवायला ती पुरुष रूप घेउन त्याच्याशी बोलायला जात असते.

देवाला अनेक सिद्धी प्राप्त असतात पण सामान्य मनुष्य सुध्दा सिद्धी प्राप्त करू शकतो. तप करून अश्या सिद्धी प्राप्त करता येतात. पण रूप का बदलतो ह्याला महत्त्व आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी हे केलं जात असेल तर वाईट. जशी इंद्र-अहिल्येची कहाणी आहे. त्याला शाप मिळाला आहे. महिषासुराची कहाणी आहे. जो म्हैस, हत्ती, सिंह किंवा मनुष्य अशी रूपं घेऊ शकत असे. अशीच आदी' म्हणून एका असुराची कहाणी आहे. ह्याने शंकराच रूप घेतलं जेणेकरून तो पार्वतीला वश करू शकेल. पण पार्वतीने त्याला ओळखले कारण तिला दिव्यदृष्टी होती. पण विष्णूने शंखचुडा नामक असुराचं रूप घेतलं होतं कारण त्याची पत्नी वृंदा पतिव्रता होती आणि त्यामुळे तो मरत नव्हता. वृंदाला एक क्षण असं वाटलं की हा आपला नवरा आहे आणि तिचं पातिव्रत्य तेव्हढ्या क्षणात भंग झालं. देव-असुर युद्धात शंखचुडा मारला गेला. त्याने आपला विश्वासघात केल्याचा बोल तिला लावला तेव्हा तिने आपण त्याच्याशी एकनिष्ठ असल्याचं सांगितलं. मग तिला विष्णूच्या कपटाविषयी कळलं. ती तुळशीचं रोप बनली. विष्णूला वाईट वाटलं. आणि त्याने तिला वर दिला की जोवर तुळशीचं पान वाहिलं जात नाही तोवर माझी पूजा संपूर्ण होणार नाही.

पार्वती तप करत असताना तिची परीक्षा घ्यायला शंकर विविध रूपं घेऊन येतात. कधी सुंदर पुरुष बनून 'कशाला त्या भस्म फासलेल्या बैराग्याशी लग्न करतेस? मी एव्हढा सुंदर आहे माझ्याशी कर' असं सांगतो. तर कधी एक वृद्ध बनून 'माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझ्याशी लग्न कर' असं म्हणतो. संतोषी मां ची कहाणी आहे ज्यात ती रस्त्यावरच्या म्हाताऱ्या भिकारी बाईचं रूप घेऊन भक्तांची परीक्षा घेते.

मग रामायणातील एक लोककथा (गुजरातेत प्रचलित असलेली) दाखवली. रावणाने सीतेचं अपहरण केलं. राम आणि त्याची सेना सेतू बांधून लंकेत प्रवेश करायच्या तयारीत आहे हे रावणाला त्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं. सीता आपल्याला वश होत नाही म्हणून रावण भडकला होता. शेवटी त्याच्या सेनापतीने त्याला रामाचं रूप घेऊन सीतेकडे जायचा सल्ला दिला. रावणाने लगेच तसं केलं. त्याला पाहून सीता आनंदित झाली. तिने त्याला तू रावणाचा वध केलास का वगैरे विचारलं. सीता त्याला इथून लवकर जाऊ या असं म्हणत असतानाच रावणाचा एक सेवक तिथे आला. तो रामभक्त असल्याने त्याने रामाच्या रुपातल्या रावणाला सीतेला घेऊन जा, मी तुला अडवणार नाही असं सांगितलं. सीतेने हा सेवक कपटी आहे, त्याला मार असं सांगूनसुध्दा रामाच्या रुपातल्या रावणाने त्याला मारायला नकार दिला. एव्हढंच काय पण राम समजून सीता बिलगली तेव्हा रावण स्वत:च शरमिंदा झाला. सेनापतीने सैनिकांना रावणाच्या रूप बदलण्याची माहिती देण्याचं विसरलो म्हणून रावणाची माफी मागितली. चिडलेल्या रावणाने त्या सेवकाला बोलवायची आज्ञा दिली ज्याला त्याने रामाच्या रूपात असताना मारायला नकार दिला होता. थोडक्यात काय तर रामाचं नुसतं रूप घेतलं तेव्हा त्याचे आचारविचार रामासारखे झाले होते. कारण तेव्हा त्याच्यात देव होता. हे ह्या कथेचं सार.

भागवतात एक कथा आहे की एक माणूस म्हणाला मी मोरपीस असलेला मुकुट घालतो म्हणजे मी सुद्धा कृष्ण होईन. कृष्ण म्हणाला ठीक आहे, तू हो कृष्ण, हे घे माझं सुदर्शनचक्र. तो माणूस ते चक्र हातात घेताच त्याच्या वजनाखाली चिरडला जातो.

प्रेक्षकांतून एकाने प्रश्न विचारला की शंकराच्या रूप बदलण्याची एखादी कथा आहे का? तर दक्षिण भारतातली एक कथा सांगितली. एक भक्त असते जिची मुलगी गरोदर असते आणि तिची प्रसूत होण्याची वेळ आलेली असते. त्यामुळे त्या भक्त स्त्रीला मुलीकडे जायचं असतं. पण नदीला पूर आल्याने ती जाऊ शकत नाही. ती शंकराची प्रार्थना करते तेव्हा तिचं रूप घेऊन शंकर त्या मुलीचं बाळंतपण करतात. आणि एक कथा आहे की वृंदावनात रासलीला असताना एक नियम होता की कृष्ण हा एकटा पुरुष तिथे असेल, बाकी सर्व गोपी असतील. पण देवतांना सुध्दा रासलीला पाहायची इच्छा असते पण ते ह्या नियमामुळे जाऊ शकत नाहीत. म्हणून ते यमुना नदीकडे जातात. ती त्यांना नदीत डुबकी मारायला सांगते जेकेकारून ती त्यांना स्त्रीरूप देऊ शकेल. अश्या म्हणतात की नारद मुनी, अर्जुन, शंकर अश्या तऱ्हेने स्त्रीरूप घेऊन रासलीलेत सामील झाले. एक आणखी कथा आहे की एकदा राधा कृष्णाला रासलीलेच्या वेळेस भेटायला आली. त्याला दुसऱ्याच कोणाबरोबर नृत्य करताना पाहून ती रागावली. तेव्हा कृष्ण म्हणाला की माझ्याबरोबर नाचणारे माझे गुरु नटराज आहेत. रासलीलेत फक्त बायकाच असतील असा नियम तूच घालून दिला आहेस म्हणून हे स्त्रीरूप घेऊन नृत्य करत आहेत.

Pages