एपिक चॅनेल

Submitted by स्वप्ना_राज on 22 January, 2015 - 09:50

"एकांत" ह्या एपिक चॅनेल वर दर गुरुवारी रात्री १०:३० वाजता (रिपिट टेलिकास्ट - शुक्रवार रात्रौ ८:३०) लागणार्‍या कार्यक्रमामध्ये भारतातल्या एके काळच्या गजबजलेल्या पण आता ओसाड झालेल्या जागांबद्दल माहिती देतात. हा कार्यक्रम बहुतेक नोव्हेंबर २०१४ पासून सुरु झाला असावा कारण हे चॅनेलच मुळी तेव्हा सुरु झालं. माझे सुरुवातीचे काही भाग चुकले असावेत. राजस्थानमधलं भानगढ, त्रिपुरातलं उनाकोटी आणि गुजरातमधलं लखपत ह्यावरील भाग मी पाहिले. आणि त्यावरची माहिती 'संथ चालती ह्या मालिका' इथे पोस्ट केली. ती कायमस्वरुपी साठवून ठेवावी अशी सूचना झाली म्हणून हा धागा काढला.

हे चॅनेल इथे उपलब्ध आहे - https://docs.google.com/spreadsheets/d/19tI8WWcHdygXnFWpwtOwRrco61eS-1GhemitlPpLVWo/pubhtml?gid=0&single=true

कार्यक्रमांचं वेळापत्रक - http://www.epicchannel.com/schedule

ह्या बीबीवर पुढील एपिसोडस ची माहिती आहे:

एकांतः
१. लखपत, २. उनाकोटी ३. कित्तूर किल्ला ४. न्यारमा ५. अंदमान सेल्युलर जेल ६. विलासगढ ७. हळेबिडू
८. शेखावतीमधलं रामगढ ९. काश्मीरमधलं मार्तंड मंदिर १०. शिवसागर - अहोम साम्राज्याची राजधानी ११..गुजरातचं चंपानेर १२. श्रीनगरच्या हरीपर्बत वरचा किल्ला १३. लडाखचा 'चिकटन' किल्ला
१४. अंदमान निकोबारचं रॉस आयर्लंड १५. जंजिरा किल्ला १६. लखनौ रेसिडेन्सी १७. विष्णुपुर १८. विजयदुर्ग
१९. बटेश्वर २०. हंपी २१. कुलधरा २२. कुंभालगढ २३. असिरगड २४. बिजापूर २५. कांगडा फोर्ट (हिमाचल प्रदेश)
२६. जागेश्वर २७. रामनगर २८. लेह पेलेस २९. किल्ला मुबारक ३०. मेहरोली आर्किओलॉजिकल पार्क
३१. तलक्कड, मालंगी आणि वोडीयार राजे

देवलोक - सीझन १:
१. रंग २. जीवजंतू ३. स्वर्ग नरक ४. शक्ती ५. गणपतीबाप्पा ६. देवदेवतांची शस्त्रं ७. देवतांची वाहनं ८. गंगा ९.तीर्थ १०.युग ११. देवांचं अन्न १२. सृष्टीची रचना १३. दिशा १४. देवी-देवतांचे विवाह १५. देवी-देवतांचे रूप बदलणं
१६. विष्णूचे अवतार, १७. ग्रह-नक्षत्र १८. पुराण, वेद ह्यातील वनस्पती १९. पूजा आणि विधी

देवलोक चा सीझन २ सुरु होणार आहे. त्याचा वेगळा धागा काढून इथे लिंक देईन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मध्यंतरी ते पाच पांडवांच्या जन्माचं रेखाचित्र पाहिलं होतं. कसलं मस्त होतं..

"इतिहास के पन्नो सें" सुद्धा खुप आवडलं. मी खीर, तिळगुळ, उकडीचे मोदक, रसगुल्ला, लाडू हे ५-६ इतिहास बघितले. हे युट्युबवर बघता येतील. Happy

एक नंबर चॅनल आहे राव. पण घरी कोणालाच आवडत नाही. मला तोंडावर "भिकार चॅनेल बघतेस" असं म्हणून झालेलं आहे सासरच्या एका माणसाने. कहर म्हणजे हा माणूस रोज न चुकता होसुमीयाघ बघतो Angry .

असो. गुड न्युज ही आहे कि सियासत पुन्हा दाखवायला लागले आहेत. मी रवीवारी दुपारी २ पर्यंत ते सलग भाग असतात ते बघते. (ते सुरु किती वाजता होतात? मी मोस्टली ११ वाजता टिव्ही लावते तेव्हा ते चालु असतं ऑलरेडी).

"सियासत" चे एपिसोड्स युट्युबवर हवे होते राव. नुसते प्रोमोज आहेत सगळे. सगळे एपिसोड्स डाऊनलोड करुन बघता आले असते. Sad

देवलोकचा कालचा एपिसोड 'गणपतीबाप्पा' वर होता. एपिसोडच्या आधी लोकांना प्रश्न विचारतात त्यात 'उंदीर वाहन असलेला देव कोणता?' ह्याचं उत्तर दोन लोक सोडून (एक टीनेजर मुलगा आणि एक बाई जी हिन्दी जास्त कळत नाही असं म्हणाली) सर्वांनी बरोबर दिलं. तरी 'कार्तिकेयाचा लहान भाऊ कोण' ह्यावर काही लोक कन्प्यूज झाले) Happy

वेद ४००० वर्शांपूर्वीचे पण गणपतीचा (जसा आता आपण त्याला पाहतो त्या रुपात) उल्लेख १५०० वर्षांपूर्वीचा आहे. वेदात 'गणपती' उल्लेख होतो तो ' गणांचा' म्हणजे लोकांचा नायक ह्या अर्थाने. असं म्हणत की वैष्णव, शैव, शाक्त तसा गाणपत्य म्हनून ही एक पंथ होता.

हा देव आधी ब्राह्मणात फारसा प्रचलित नव्हता. मराठा लोकांत विशेशतः होळकर सारखे सरदार त्याला फार मानत म्हणून त्याचं महत्त्व पेशवाईत वाढलं.

ह्यच्या जन्माची कथा अशी की पार्वतीला मूल हवं होतं तसं तिने शंकराला सांगितलं तेव्हा तो म्हणाला की मला मूल नको आहे. मी अमर आहे तेव्हा मला पुत्राची काय गरज. तरीही तिने मूल हवंय असं म्हटलं, तुम्ही देणार नसाल तर मी स्वतः निर्माण करेन असं म्हटलं तेव्हा तो निघून गेला. मग तिने अंगाला हळदी चा लेप लावल आणि तो काधून त्यातून गणपती निर्माण केला. म्हणून तो 'अयोनिज'. तसंच 'बिना नायक' जन्मला म्हणून 'विनायक;' त्याचं शरीर आईने दिलेलं पण डोकं वडिलांनी दिलेलं म्हणूण तो दोघांचा पुत्र. शैव आणि शाक्त परंपरांना एकत्र आणणारा. त्याच्यामुळे कालीचं उग्र रुप सौम्य होऊन गौरी झाली आणि संन्यासी शिव गृहस्थ शंकर झाला.

गणपतीच्या बायका - रिध्दी लक्ष्मीचं प्रतीक तर सिध्दी सरस्वतीचं. हत्तीचं मुख हे धन शक्ती आणि स्मरणशक्तीचं प्रतीक. मोठं पोट म्हटलं तर ब्राह्मण म्हटलं तर व्यापारी ह्यांचं प्रतीक - थोडक्यात बसून काम करणार्‍याचं. हातातला अंकुश push and pull असा विरोधाभास दाखवतो. कुर्‍हाड म्हणजे परश problem analysis तर पाश problem synthesis दाखवतो. उन्दीर हा समस्यांचं प्रतीक जो गणपती सोडवतो. तो सापाचा पट्टा घालतो. पण उन्दिर सापाला घाबरत नाही आणि साप उन्दराला खात नाही.

साऊथ इस्ट एशिया त गणेश मूर्ती कवट्यांसोबत दाख वतात. तिथे तो मंगलमूर्ती नाही. शिवाचं एक गजांतक रूप ही आहे ज्यात तो गजासुराला मारून त्याचं कातडं पांघरून नाचतो. पण गणपती आणि गजासुर एक का वेगळे हे निश्चित माहित नाही.

कुबेर आणि गणपतीची एक कथा सांगितली ती नंतर लिहेन.

ऑफिसमधुन मराठीत लिहायला त्रास होतो आणि आज घरी वेळ मिळणार नाही म्हणून ही कथा इंग्रजीत टाईप करत आहे. सॉरी

Ekda Kuberaane Shankar aani parvati la Kailash war jaun apalya nagarit jewayala yaayacha aamantran dila. Shankar aani parvati doghana teva kailas sodun jaane shakya navata,
Teva tyanni amachya watine Ganesh yeil asa kuberala sangitala. Bappa la mahit hota ki kuberaane aapalya aishwaryacha pradarshan karayala he sagale ghadawun anala ahe.
To kuberachya nagarit pochala. Kuber ani tyachya sewakanni tyala bharapur ani swadishta asa bhojan waadhala. Bappa ne tyacha chattamatta kela. Mag tyani anakhi wadhala. Bappa ne tehi fast kela. Tyani ajun jewan wadhala, te khaun bappa cha 'mala bhuk lagali ahe' he palupad chaluch. Mag sewakanni nagaratun anakhi bhojan magawala tari tech. Mag aajubajuchya nagaratun saaman anawala. Tari bappa chi bhuk bhaagena. Ajun ann nahi mhanun to dukkhi zala. Teva kuberaane kailas war dhaaw ghetali ani ata kaay karu mhanun shankarala wicharala teva mahadew mhanale ki tu kharya bhavane tyala jewan dila asatas tar to kadhich trupt zala asata. Tu sampatti cha pradarshan karayala tyala bolawalas. Khajil zalelya kuberaane hyawar upaay kaay asa wicharala. Shankar mhanale ki je urale asel te kharya bhaktine tyala de.
Kuberaachya swayapak gharaat kahi bhaatachi shita/tandalache daane urale hote te kelichya paanawar ghalun tyane bappasamor thevale ani te khaun bappa chi bhuk shaant zali.

Bappa ani kuber doghe tundiltanu mhanaje 'yakshamurti' pan hi katha physical ani mental hunger hyanchyatala farak dakhawate.

Kahi jan mahadew mothe ka bappa asa hi waad ghalatat pan dar pujechya aadhi tula smarala jail ha war bappa la shankara nech dila ahe.

हि कुबेर वाली कथा गणपतीवर लहान मुलांसाठी तो अ‍ॅनिमेटेड मुव्ही निघाला (सॉरी.. नाव लक्षात नाहीये) त्यातही आहे बहुतेक. Happy

काल महाभारतात (चित्र काढुन दाखवतात ते) २ वेळा "अंबा" ची स्टोरी सांगितली. (आधी शेवट सांगितला आणि मग अपहरण वाला पार्ट. असं उलटं का दाखवलं माहित नाही). "अंबा" आणि तिला स्वयंवरातुन अपहरण करुन आणणारे "भिष्म". मध्येच परशुराम कुठुन आला मला कळले नाही. Uhoh

अंबा भिष्मांना सत्य सांगते तेव्हा ते तिची सन्मानपुर्वक पाठवणी करतात. ती तिच्या प्रियकर राजाकडे जाते आणि तो तीला अपह्रुत स्त्री म्हणुन हाकलुन लावतो तेव्हा ती परशुरामांच्या आश्रमात जाते.

Swara@1, धन्यवाद नको प्लीज.

पियू, अंबा भीष्मांना सांगते की तिने शाल्वराजाला मनोमन वरलंय. तेव्हा ते तिला त्याच्याकडे पाठवतात. पण तो तिचा स्वीकार करायला नकार देतो म्हणून ती परत येऊन भीष्माला आपल्याशी लग्न करायला सांगते. ते म्हण्तात की मी ब्रह्मचर्याची शपथ घेतल्याने असं करू शकत नाही. मग ती त्याचं मन वळवायला मदत करावी म्हणून परशुरामांकडे जाते. ते भीष्माला सांगतात पण भीष्म ऐकत नाहीत म्हणून ते त्यांना मरेपर्यंत द्वंद्वाचं आव्हान देतात. पण कोणीच कोणाचा पराभव करु शकत नाही. अंबा निराश होऊन निघून जाते. हिचा पुढचा जन्म शिखंडीचा.

>>देवलोकचे जुने एपिसोड बघायला मिळतील का?

ह्या चॅनेलवरच्या कुठल्याच कार्यक्रमाचे व्हिडीओज मला मागे शोधले तेव्हा मिळाले नाहीत. आता आहेत का निदान मला तरी माहित नाही.

रच्याकने, त्या 'सियासत' मधल्या मुरादचा असा देवदास का झालाय? आणि केव्हढे ते केस वाढवलेत.

Yesterday's episode was on weapons used by Gods and Goddesses. The anchor asked Mr. Pattnaik where the Trishul came from. He said that since Shiva is present since the beginning of time and he appeared with Trishul no one knows where it came from. Some think that the 3 parts of the Trishul represent Bhulok, Swarg and Paataal. Some say they represent Sattv, Rajaa and Tamas gunas.

There is one story associated with this Trident. There was a demon called Andhakasur. If his blood fell on earth, a new Andhakasur would be born out of it - sort of like Raktbeeja. Shiva impaled him on the Trishul to drain his blood (maybe it didn't fall on earth. that was never explained). When all the bad blood drained away, Andhakasur the demon turned into Andhakasur the worshipper.

Vishnu also had lots of weapons - a discus called Sudarshana, a Gadaa called Kaumodini, a Talwar called Nandak and something called Saarang (I think bow and arrow). Because of this Saarang he is called Saarang/Sharang-paani - the one who holds Saarang in his hands.

The story of Rishi Dadhichi giving up his bones to make the Vajra was shown.

आज लॉस्ट रेसिपि़ज चा एपिसोड थोडा पाहिला. शेफ आदित्य राजस्थानात, बहुतेक जैसलमेरमध्ये, गेला होता. तिथे एका लमाणी किंवा रबानी (नीट ऐकू आलं नाही) कम्युनिटीच्या माणसाने ७ अनाजकी खिच्डी करुन दाखवली. एका भांड्यात बाजरी आणि ज्वारी घेऊन आधी कुटली. मग पाणी उकळून त्यात मूग, कसली तरी डाळ, तांदूळ, कुटलेली बाजरी-ज्वारी, तीळाच्या बिया (म्हणजे काय?) आणि गहू घातले. मीठ घालून शिजवले आणि ताकाबरोबर ही खिचडी वाढली. ह्या समाजातल्या बायका नेहमी काळी वस्त्रं नेस्तात. ह्यामागची कहाणी अशी की हे लोक जैसलमेरला आले तेव्हा तिथल्या राजाने त्यांच्यातल्या एका मुलीशी लग्न करायची इच्छा व्यक्त केली. पण तिच्या वडिलांना हे मान्य नव्हतं. राजाच्या दरबारातल्या एका माणसाने त्या मुलीला वाचवायला तिला जैसलमेरहून कच्छला सुरक्षित नेऊन ठेवलं. हे कळताच संतापलेल्या राजाने त्या दरबार्‍याचा खून केला. त्याचा शोक म्हणून ह्या बायका आजतागायत काळी वस्त्रं नेसतात.

>>इथल्या स्वप्नाच्या पोस्ट मी नियमित वाचतो. असा एखादा चॅनेल निघालाय याचेच मला खुप कौतूक वाटतेय

हो ना दिनेशदा, अगदी २ तास पाहिलं तरी वेळ फुकट गेल्यासारखं वाटत नाही Happy

मारवाडा नावाच्या जमातीतल्या एका माणसाने 'गुड मुठिया' म्हणून एक मिठाईचा प्रकार सांगितला. ह्यात साहित्य म्हणजे गव्हाचं पीठ आणि गूळ. हा गूळ पण केशरी किंवा पिवळा नसुन पांढरसर होता. त्या माणसाने आधी गुळाचे तुकडे केले. त्याच्या बायकोने गव्हाची कणीक मळली आणि त्याच्या छोट्या पुर्‍या करून त्यात गूळ भरला. आणि परत बंद करून लाडू वळले. मग चुलीवर पाणी गरम केलं आणि त्यात चक्क गवत घातलं. मग त्या गवतावर ते लाडू वर झाकण ठेवून शिजवले. गवत असल्याने ते लाडू ओले होत नाहीत. वाफेवर शिजल्यासारखे होतात.

काल संरचना हा भाग बघितला. त्यात रेन water हार्वेस्टिंग कसं करायचे हे दाखवलं.

आधी मध्य प्रदेश, मांडू (मांडव) मधला जहाज महाल दाखवला. तिथे पावसाचं पाणी कसं साठवायचे, खेळवायचे हे सर्व दाखवलं. जाकुझी बाथ आणि सोना बाथ इफेक्ट्स पण प्रचलित होते त्याकाळी. हे १५व्या शतकातलं दाखवलं.

कान्हेरी गुंफा कशा बांधल्या बुद्धीस्ट लोकांनी आणि त्यातलं रेन water हार्वेस्टिंग दाखवलं. फार ग्रेट अगदी, हे २००० वर्षापूर्वीचं दाखवलं.

फार सुंदर प्रोग्रॅम. सर्व इतिहासकार डिटेल माहिती देतात. डायग्रामने समजावतात.

देवालोकाचा कालाकॅं एपिसोड देवतांची वाहनं ह्या विषयावर होता. पटनाईक ह्यांच्या मते आधी लोक निसर्ग, पशु,, पक्षी अश्या विविध गोष्टींची पूजा करत असतं. पुढे समुहाने जगणं आलं. गावं वसली आणि ह्या सर्व देवता एकाच मंदिरात आल्या. मग प्रत्येक देवतेला वाहन मिळालं,

शंकराच वाहन नंदी म्हणजे जंगली बैल. शेतात जो बैल कामाला लावतात त्याचा प्रजननाच्या दृष्टीने काही उपयोग नसतो. त्यासाठी जंगली बैल लागतो पण तो शेतीच्या कामाला उपयोगी नसतो. शंकर हा देव म्हटलं तर बैरागी तसंच त्याचं एक रूप संसारी सुध्दा आहे. त्याचा हा स्वभाव दाखवायला च बहुधा त्याचं वाहन नंदी असावा. शंकराच्या देवळात कासव असतं पण ते त्याचं वाहन नव्हे. तर ते योगाचं दर्शक आहे. कासव जसं आपले चारी पाय आत ओढून घेतं तसं खरा योगी आपली इन्द्रियं आवरून धरू शकतो.

ब्राह्मदेवाच्म वाहन हंस पण तो swan म्हणजे राजहंस नव्हे तर goose म्हणजे हंस. हा पाण्यावर शांत दिसत असला तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगाने फिरस्त असतात. ब्र्हमा अनेक कथांतून सदैव बेचैन, अशांत दाखवला आहे. म्हणून शांततेच प्रतिक असलेला हंस त्याचं वाहन असावा. सरस्वतीचं वाहण क्रेन पक्षी तर दुर्गा पंजाब मध्ये सिंहावर तर बंगालमध्ये वाघावर. ह्याचं कारण सिंह हा राजांच लक्षण म्हणून चीन, सिंगापूर, श्रीलंका इथे कधीही सिंह नव्हते तरी त्यांच्या ध्वजात सिंहाचं प्रतिक आहे. दुर्गा ही राजांची देवता. तर वाघ म्हणजे cat family आपल्या पिल्लांची काळजी घेण्यासाठी प्रसिद्ध. तशी देवी भक्तांची काळजी घेते.

शिवाच्या शांत रुपाचं वाहन नंदी तर उग्र काळभैरव ह्या रूपाचं वाहन कुत्रा. लक्ष्मीचं वाहन घुबड जे धनाचा नाश करणाऱ्या उंदरांना खातं. असंही म्हणतात की हे लक्ष्मीच्या अलक्ष्मी नावाच्या बहिणीचं प्रतिक आहे, लक्ष्मी घुबडावर बसून आली तर वाईट आणि हत्तीवर बसून आली तर गुडलक् असाही समज आहे.

कामदेवाचं वाहन पोपट आणि रतीचं मैना. म्हणून 'तोता-मैनाकी कहानी'. खरंच पुरानी आहे तर Happy असंही मानतात की कार्तिकेयाचं वाहन मयुर हा मूलचा तारकासुर राक्शस. गणपतीबप्पाचा उंदीर म्हणजे पण एक राक्षस असंही मानलं जातं. भारतात काही ठिकाणी गणपतीचं वाहन मोरही दाखवतात.

एक गोष्ट मात्र नक्की की वाहन हे नेहमी नर असतं. मादी कधीच नाही.

यमाचं वाहन म्हैस, धिमी पण patient, एका सरळ रेषेत चालणारी. माण्साच्या जन्मापासून मृत्यु न थकता, कंटाळता त्यचा पाठलाग करत असतो आणि शेवटी त्याला गाठतो हे प्रतिक. यमुना नदीचं वाह्न कासव.

विष्णूचं त्याच्या अव्तारकार्यात कुठलंही वाहन नसतं. राम आणि लक्शम्ण ह्यांना हनुमाना च्या पाठीवर बसु न उडताना पाहून हनुमान हे त्यांचं वाह्न असा गैरसमज होऊ शकतो (म्हणे!) पण तो त्यांचा भक्त. विष्णूच वाह्न गरुड हा कधीकधी पोपटासरखा हिरवा दाखवतात ते विष्णू आणि कामदेव ह्यांच्यात साम्य दर्शवायला.

गरुड विष्णूचं वाहन कसा ह्यावर एक कथा सांगितली. कश्यप ऋषिंच्या दोन बायका बहिणी-बहिणीच - एकीच नाव कद्रू तर दुसरीचं विनता. पण दो घिचं पटायचं नाही. एके दिवशी त्यांच्यात पैज ला गली की उच्चैश्रवा नावाचा घोडा कुठल्या रंगाचा. कद्रू म्हणे तो पूर्ण पांढ रा नाही तर विनताचं म्हणणं की तो पूर्ण शुभ्र आहे. जी हरेल ती दुसरीची दासी. खरं तर तो घोडा पूर्ण पांढरा पण कद्रू ने आपल्या मुलांना म्हणजे सापांना त्याच्या शेपटीला लटकायला सांगितलं जेन्णेकरुन ती शेपटी काळीपांढरी दिसेल. विनता हरली आणि कद्रूची दासी झाली. पण तिला कद्रूने सांगितलं की मला स्वर्गातून अमृत आणून दिलंस तर तुला मुक्त करेन.

पुढे गरुडाचा जन्म झाल्यावर विनताने त्याला अमृत आणायला सान्गितलं. त्यानेही इन्द्राचा पराभ्व करून ते आणलं. पण ते त्याला सापांना द्यायचं नव्हतं म्हनूनयत्याने त्यांना सांगितलं कि तुम्ही आंघोळ करून या तोवर मी अमृत वाढतो. ते गेले तेव्हा त्याने स्वर्गात अमृत परत नेऊन दिलं. साप आल्यावरह्खूप चरफडले पण अट अमृत आणायची होती ती गरुडाने पूर्ण केली होती त्यामुळे विनाता म्हणजे गरुडाची आई मुक्त झाली.

हे सगळं विश्णू पहात होते. गरुडाने एकही थेंब न चाखता अमृत परत केलं म्हणून त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनि त्याला कारण विचारलं. तेव्हा तो म्हणाला की त्याला अमृताचा मोह नव्हता. फक्त आईला सोडवायचं होतं. हा त्यच्या योग्यासार खा स्वभा व पाहून विष्नूने त्याला सोबत राहशील का असं विचारलं त्याने एक अट घातली की विष्णूने त्याला शरीराखाली वाहन म्हणुन वापरावंच पण डोक्यावरही ठेवावं. तेव्हा विष्नूने त्याला आपल्या ध्वजावर ठेवलं म्हणून तो गरुड ध्वज.

शुध्दलेखनाच्या चुकांबद्दल सॉरी. ऑफिस मधू न लिहिताना फार त्रास होतोय. कही खोडायला गेलं की सगळे शब्द उलटेपालटे होतात. का माहित नाही.

ब्रह्मदेव आणि कृष्णाची एक कथा पण सांगितली पण ती घरुन लिहेन.

ऑडियन्समधून एकाने फोन करुन विचारलं की कोणी विचित्र प्राणी वाह्न नाहीत का? ह्यावर पट्ट्नाईक ह्यांनी २ उदाहरनं दिली. एक कुबेर जो नर म्हणजे माणसावर बसून येतो आणि दु सरी चामूडा जी पिशच्चावर बसून येते म्हणून तिला पिशाच्च वाहिनी म्हणतात.

मला वाटत एकांत च्या दुसर्‍या सिझनचा रिपिट टेलिकास्ट सुरु आहे. काल रत्री ११ वाजता 'कुलधरा' चा एपिसोड दाखवत होते.

>>सरस्वतीचं वाहन मोर नाही का?

बरोबर आहे. मला नीट आठवत नाही. पण बहुतेक त्यांनी असं सांगितलं की काही चित्रांत तिचं वाहन क्रेन पक्षी दाखवतात.

अंजू Happy

देवलोकचा आजचा एपिसोड 'गंगा' नदीवर होता. हिची मूर्ती नेहमी मंदिराच्या किंवा शहराच्या मुख्य दरवाज्यावर असते. हाती घडा घेतलेल्या एका सुन्दर स्त्रीची ही मूर्ती असते. तिच्या वाहनाबद्दल थोडं confusion आहे. काहींच्या मते ती मगरावर स्वार. तर काहींच्या मते मकरावर म्हणजे capricorn वर. capricorn च्या शरीराचा पुढचा भाग हत्तीचा आणि मागचा माश्याचा. गंगा नदीत डॉल्फिन्स असतात ज्याना 'गंगा डॉल्फिन्स' म्हणतात. कदाचित capricorn म्हणजे हे डॉल्फिन्स असावेत.

गंगा पृथ्वीवर कशी आली ह्याच्या अनेक कथा आहेत. एक आहे विष्णूच्या वामन अवताराची. त्याने पहिल्या पावलात भूलोक आणि दुसऱ्यात स्वर्ग पादाक्रांत केला होता. स्वर्गात वाहणारी ही नदी त्याचा पाय लागताच त्याच्या पावलासोबत पृथ्वीवर आली. दुसरी कथा अशी की ब्रह्माने विष्णूच्या वामन अवताराचं पाउल स्वर्गात पडताच ते धुवायला आपल्या कमंडलूतील पाणी टाकलं त्याची गंगा झाली. अश्या रीतीने ती विष्णूशी जोडली गेली आहे. तर आणखी एक कथा शिवाची. शिव पार्वतीचा विचार मनात येताच गाऊ लागला. ते दिव्य गाणं ऐकून विष्णूचं पाण्यात रुपांतर झालं आणि ब्रह्मदेवाने ते पाणी आपल्या कमंडलूत घेतलं तीच गंगा. अश्या रीतीने ती शिवाशी जोडली गेली आहे. अर्थात शिवाशी जोडली गेलेली आणखी एक गंगा कथा भगीरथाची सुध्दा. त्याच्या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून त्याने तप करून गंगेला पृथ्वीवर यायला राजी केलं पण ती म्हणाली की माझ्या वेगाने पृथ्वी फाटेल तेव्हा त्याने शंकराला विनंती करून तिला आपल्या जटेत सामावून घ्यायला राजी केलं. म्हणून ती भागीरथी. गंगेला 'जान्हवी' का म्हणतात? तर ती जेव्हा पृथ्वीवर आली तेव्हा सगळीकडे नाचत बागडत फिरत होती. तिच्या आवाजाला कंटाळून जहानु नावाच्या ऋषीने तिला पिऊन टाकलं. तिने त्याची क्षमा मागितल्यावर त्याने आपल्या कानातून बाहेर काढलं. 'जहानु ची मुलगी' म्हणून 'जान्हवी'.

ह्या गंगेचा आणि अर्धनारीनटेश्वराचा काय संबंध? एकदा पार्वती खूप चिडली. शंकराने गंगेला आपल्या डोक्यावर बसवून घेतलंय. त्याचं आपल्यावर प्रेम नाही अशी तक्रार करू लागली तेव्हा शंकराने तिला घट्ट मिठी (!!!) मारली. त्यांची दोन शरीरं एक झाली (बाप रे! दो बदन एक जान ह्या हिंदी चित्रपटातल्या आवडत्या कल्पनेचा उगम हा आहे?) तोच अर्धनारीनटेश्वर.

गंगेची बहिण यमुना. पण दोघीत फरक फार. गंगा गोरी तर यमुना सावळी. गंगेचा प्रवाह तीव्र तर हिचा शांत. गंगा थोडीशी manipulative तर यमुना साधीभोळी. गंगा शिवाशी जोडली गेलेली तर यमुना विष्णूशी. कृष्णाच्या एका पत्नीचं नाव कालिंदी म्हणजे यमुना.

'दक्षिण गंगा' ही कल्पना कशी आली? एका कथेनुसार कावेरी ही 'दक्षिण गंगा'. अगस्त्य ऋषी गंगेला कमंडलू मध्ये घेऊन दक्षिणेला जात होते. तेव्हा गणपती कावळ्याचं रूप घेऊन आला आणि त्याने त्या कमंडलू ला धक्का दिला. गंगा वाहती झाली आणि तिची कावेरी झाली. तर गोदावरि माहात्म्यात गोदावरी ही 'दक्षिण गंगा'. ह्यानुसार पार्वतीला गंगा शंकराजवळ नको होती. दक्षिणेत गौतम ऋषींचा आश्रम होता. तिथे गणेश गाईचं रूप घेऊन आला, ऋषींनी त्यला दगड फेकून मारला आणि ती गाय मेली. आता गोहत्येच पाप लागलं तेवा प्रायश्चित्त घ्यायला हवं तेव्हा गणेश स्वरुपात प्रकट झाला आणि त्याने ऋषींना सांगितलं की शंकराला गंगेला दक्षिणेत पाठवायल सांगा. शंकराने ते केलं आणि अश्या तऱ्हेने बाप्पाने आपल्या आईच्या उरावरची सवत दूर केली Happy

शेवटची कथा भीष्माची. शंतनू/शांतनु राजा गंगेवर भाळला आणि त्याने तिच्याशी लग्न करायची इच्छा व्यक्त केली. तिने अट घातली की माझं स्वातंत्र्य अबाधित रहायला हवं. त्याने मान्य केलं. जन्माला आलेले सात मुलगे तिने नदीच्या पाण्यात बुडवून मारले तरी राजा काही बोलला नाही कारण तिने त्याला सोडून द्यायची धमकी दिली. पण तिने आठवा मुलगा बुडवायची तयारी केली तेव्हा मात्र राजा मध्ये पडला. तू हे का करतेस असं त्याने विचारलं तेव्हा ती म्हणाली की आता आपला सहवास संपला. मग तिने सांगितलं की ही मुलं म्हणजे वसू आहेत. त्यांनी वशिष्ठ ऋषींची नंदिनी गाय पळवली होती म्हणून त्यांनी त्यांना शाप दिला की त्यांचं स्वर्गातलं वास्तव्य संपून त्यांना पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल पण जन्मल्यावर एक वर्षानंतर त्यांना स्वर्गात परतता येईल. गंगा मूळची स्वर्गातली म्हणून त्यांना मुक्ती द्यायचं काम ती करत होती. राजाने आपला आठवा मुलगा मागितला तेव्हा तिने सांगितलं की त्याला जिवंत ठेवायला सांगून तो त्याला एक दु:खी आयुष्य जगायचा शाप देतोय पण राजा ऐकेना. तेव्हा ती म्हणाली की ती तो मुलगा त्याला आता देऊ शकत नाही पण ती त्याला जिवंत ठेवेल आणि योग्य वेळ येताच राजाकडे पाठवेल. एव्हढं बोलून ती मुलासकट स्वर्गात निघून गेली.

हा मुलगा पुढे देवव्रत भीष्म झाला. आणि एक दु:खी आयुष्य त्याच्या वाट्याला आलं. असं म्हणतात की कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाने भीष्मांना शरशय्या दिली तेव्हा गंगा खूप चिडली. आपल्या मुलाचं हे प्राक्तन आहे हे माहीत असूनही तिने अर्जुनाला शाप दिला की तुझ्या पितामहाना तू जसा मृत्यू दिलास तसाच मृत्यू तुला तुझा मुलगा देईल.

Pages