विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

1 NEW ZEALAND 4 4 0 0 0 +3.589 754/110.2 649/200.0
2 SRI LANKA 4 3 1 0 0 +0.128 1113/195.4 1112/200.0
3 BANGLADESH 3 1 1 0 1 +0.130 507/100.0 494/100.0
4 AUSTRALIA 3 1 1 0 1 -0.305 493/100.0 383/73.1

साउथ अफ्रिकेची बॅटींग बघत नाहीये का कोणी ?
जोरदार स्कोर् पुन्हा एकदा, मोठ्या फरकाने जिंकणार आज पण !

South Africa 360/4 (46.6 ov) Sad

इतका मोठा स्कोर नको रे. पाकिस्तानला बाहेरचा रस्ता दाखवायचा असेल तर कमीत कमी मार्जिन ने साउथ आफ्रीका जिंकायला पाहिजे. पण असे दिसत नाही

हारायला नको. फक्त नेटरनरेट मधे मागे पडली तरी पुष्कळ आहे Happy
आयर्लँडने वेस्ट इंडीजला हरवले आहे. त्यामुळे युएई , झिब्बांवे असे ३ जिंकतील मॅच
आणि पाकिस्तानने भारत वेस्ट इंडीज कडुन पराभव पत्करला आहे आफ्रीकेकडुन पण पत्करतील म्हणजे ते देखील आयर्लँड, झिब्बांवे, युएई बरोबर जिंकुन ३ मॅच जिंकतील अश्यावेळेला नेटरनरेट महत्वाचा ठरेल Happy

आपल्या बोलर्स - फिल्डर्सचा फार अभिमान वाटतोय अजुन्॑च :), इतक्या किरकोळ स्कोअर मधे गुंडाळ्ले साउथ अफ्रिकेला :).

लोकांना पाकिस्तान क्वार्टरमधून बाहेर का हवीय.. येऊ दे की .. आणि भारताबरोबर पुढेही जाऊदे.. सेमी किंवा फायनलला भारत-पाक बघायला किती मजा येईल पुन्हा...

२०० तरी होणार का आयर्लंडचे.. तेव्हढे तरी व्हायला पाहिजेत म्हणजे जरा तरी नेट रन रेट बरा राहिल त्यांचा..

काय मारले राव त्या आमला नी? अन देखणे शॉट होते! ए बी ड विलियर्ससारखे रानटी नाही आजिबात! Lol
बॅटच फॉलो थ्रु वगैरे क्लासच!
येवढे रन केले तरी ६ फक्त ४च. ह्या अशा लोकांपासून जपून राहिले पाहिजे. सतत सापळे रचतच राहिले पाहिजे ह्या लोकांकरता. आपले रोहित शर्मा, धवन, कोहली पण हे (चिकटून राहून रन) करु शकतात पण अ‍ॅज ऑलवेज मला पहिल्या बॉलिंगची चिंता लागून राहते!

आईच्ची कटकट! हे पाहिलं का तुम्ही! Lol
http://www.icc-cricket.com/cricket-world-cup/videos/media/id/3227/extrao...

अमला भारीच आहे. लंकेच्या दोघांची खेळी पण मस्तच.

आजच वाचले की साऊथ अफ्रिकेने आत्तापर्यंत ४००+ धावा ५ वेळा केल्या आहेत. तसेच भारतानेही ५ वेळा ४०० पेक्षा धावा केल्या आहेत. भारीच की हे. Happy

सा अफ्रिका विरुद्ध भारत फायनल असायला हवी. पहिले सा अ बॅटिंग - स्कोअर ४०० + आणि भारत चेस करून विजेता. स्टेन १० - ०- ८० - आय विल टेक इट. Happy

अफ्रिका मस्तच टीम आहे. पण त्यादिवशी आपण सरस ठरलो. ते चेस करताना भांबावतात. दरवेळी टॉस त्यांनी जिंकला म्हणून ४०० + होतोय. आपण चेस पण मस्त करतो. क्रेडिट गोज टू द्रविड कॅप्टन्सी !!

>> सगळ्या मॅचेसमधे ५० ओव्हर्स खेळणे ही ग्यानबाची मेख आहे. रन होतात आपोआप.
असं काही नाही हां! गावसकरचा विक्रम आठवा Lol
http://www.espncricinfo.com/magazine/content/story/500411.html

छोट्या टीम्स ना पहिलीच बॅटींग देण्यात यावी. उगाच रेकॉर्ड वर रेकॉर्ड होत असतात.
रेकॉर्डच करायचे असेल तर मोठ्या टीम्स बरोबर करुन दाखवा ना.

छोट्या टीम्स ना पहिलीच बॅटींग देण्यात यावी. उगाच रेकॉर्ड वर रेकॉर्ड होत असतात.
रेकॉर्डच करायचे असेल तर मोठ्या टीम्स बरोबर करुन दाखवा ना.>>>
+१०००००००००

उगाच ३५०-४०० धावा करण्यात टाईमपास करायचा. जे संघ दोनशे-अडीचशेच्या आत राम म्हणतात त्यांच्या समोर चारशेचे टारगेट ठेऊन काय उपयोग?

बांग्लादेशने ही जर मॅच जिंकली तर त्यांचे नेटरनरेट वाढतील आणि इंग्लंडला सुपर ८ मधे यायला फारच मेहनत करावी लागणार आहे

उगाच ३५०-४०० धावा करण्यात टाईमपास करायचा. >>> नायतर काय, अश्याने म्याच संपवुन घरी जायला पण उशीर होतो. Proud

बांग्लादेशने ही जर मॅच जिंकली तर त्यांचे नेटरनरेट वाढतील आणि इंग्लंडला सुपर ८ मधे यायला फारच मेहनत करावी लागणार आहे
>>>

बांग्लादेशला ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात एक पॉईंट मिळून त्यांचे गुण विषम झाले आहेत ना?
मग ते ईंग्लंड वा श्रीलंकेशी गुणांची बरोबरी नाही साधू शकणार.. (त्यांचाही एखादा सामना, वा बांग्लादेशचा आणखी एखादा सामना अनिर्णित राहिल्या शिवाय..)

बाकी भारत-बांग्लादेश क्वार्टर फायनल झाली तर बघायला काही मजा नाही Sad

Pages