विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

३ मॅच चा स्कोर डिव्हिलिअर्स ने एकसाथ बनवला. बहुदा भारताविरुध्दच्या उरलेल्या धावा वेस्ट इंडीज विरुध्द काढल्या आहेत. इंडीया आणि इंडीज नावांमधे गैरसमज झाला असेल Wink

मागच्या मॅचमधे गेल व सॅम्युअल ने मिळुन ३०० केले.. आज त्या दोघात मिळुन फक्त ३! .. ३ दिवसांच्या स्पॅनमधे आकाशातुन एकदम धरतीवर आले बिचारे..

कबीर.. ते सगळे वाचण्यापेक्षा डीव्हिलिरसची बॅटींग बघताना जी मजा आली.. ती कुठल्याच शब्दात पकडता येणार नाही..:)

साआ च्या फिल्डींगला काय झालय.. जाँटीला परत बोलाव म्हणाव आता.. ८ ओव्हर मध्ये २ कॅच सोडले.

आता डिव्हिलिअर्सचा खेळ पाहत होते. काय खेळलाय. क्लास हाच एक शब्द. बॉलर काय फिल्डर पण गांगरले होते. कसले कॅचेस सोडलेत.

मागच्या सामन्यात गेल व सॅम्युअल्स ने मिळुन ३०० केले... आज त्या दोघात मिळुन फक्त ३!.. ३ दिवसाच्या दरम्यान आकाशातुन धरतीवर आले बिचारे..

कबीर.. ते सगळे वाचण्यापेक्षा डीव्हिलिरसची फलंदाजी बघताना जी मजा आली.. ती कुठल्याच शब्दात पकडता येणार नाही..:)

(मराठी भाषा दिन आहे असे कबीर म्हणाला म्हणुन माझे आधीचे.. दर्शनफलकावरचे लिहीलेले संपुर्ण मराठीत बदलुन...:) )

हिम्सकूल.. कसला जबरी झेल पकडला डीव्हिलिरसने.. आजचा दिवस त्याचाच दिसतोय.. पलंगावरुन बरोबरच्या बाजुने उतरलेला दिसतोय आज तो..:)

आणी हो.. गेल व सॅम्युअल्स एवढ्या स्वस्तात बाद झाले आज हे बघुन माझ्या पण मनात तेच आले हिम्सकूल..

आणी अजुन एक सुंदर झेल... या वेळेला मिलरने पकड्ला.. वेस्ट इंडिज ४ बाद... चला .. झोपायला जावे आता...

नंदिनी.. त्याच्या फलंदाजीला तु म्हणालीस तोच शब्द बरोबर आहे.. उच्च दर्जा!

लिहीता लिहीता अजुन एक गडी बाद.. ५ बाद ५३!

अगागा काय कुटलाय द.आ. नी! धमाल! आपल्याविरुद्ध थोडे तरी असे खेळायला पाहीजे होते म्हणजे आपली गोलंदाजी/क्षेत्ररक्षण याचा कस लागला असता. आणि ग्रुप मॅचेस मधे हरलो असतो तरी फरक पडला नसता.

साहेबाच्या देशात राहून साहेबाला सपोर्ट न करता >>> तो फक्त पार्कातल्याच साहेबाला सपोर्ट करतो.

>> चिमण, साहेबाच्या देशात राहून साहेबाला सपोर्ट न करता लंकेला सपोर्ट करणे शोभते का तुला???
माझ्या सपोर्टनं काय होणारे? मी भारताला सपोर्ट केला होता ट्राय सेरीजमधे! काय झालं? Lol

न्युझिलंड ऑस्ट्रेलिया मधे माझा घोडा ऑस्ट्रेलिया! ते जिंकले की ते त्या ग्रुपमधे १ नं वर असतील. भारत पण १नं वर राहील. म्हणजे आपली त्यांची १/४ फायनल मधे गाठ पडण्याची शक्यता कमी होईल की नाही?

१४४ बॉल मध्ये १०० आणि पुढच्या १५६ बॉल मध्ये ३०८ अनबिलिव्हेबल. >

हॉल्डर ने ५ ओव्हर मधे २ मेडन टाकुन ९ धावा दिलेले. आणि नंतर तो १० ओव्हर मधे १०८ धावा दिलेले. म्हणजे ५ ओव्हर मधेच १०० धावा दिले.

एबीडीने हिसकावले! >> +१, एक स्लॉग स्वीप एका हाताने मारलेला च्यामारी (तोही डाव्या). रीव्हर्स स्वीप केला तो सिक्स कसा गेला हे देवालाच माहित. काहिच्या काही शॉट्स होते, असे पण मारु शकतात का ? अशाने काही दिवसांनी आय सी सी ला 'नो बॉल' सारखे 'नो शॉट्स' वगैरे काढावे लागतील Lol

अगागा काय कुटलाय द.आ. नी! धमाल! आपल्याविरुद्ध थोडे तरी असे खेळायला पाहीजे होते म्हणजे आपली गोलंदाजी/क्षेत्ररक्षण याचा कस लागला असता. आणि ग्रुप मॅचेस मधे हरलो असतो तरी फरक पडला नसता.>>>>>>> ऐसा कैसा बोलता तुम चिमण? आपल्या विरुद्ध खेळता नाही आलं कारण आपण बॉलिंग/फिल्डिंग चांगली केली. मी केव्हा पासून तेच रेकॉर्ड लावतोय पण अफ्रिकेची बॉलिंग लै भारी आहे! इंडिजला किती सहज गुंडाळलं ह्यातच ते दिसून येतं. Happy

मी सकाळी ३:०० ल सहज उठलो अन स्कोअर बघून हसायलाच लागलो! Lol

तो इम्रान ताहिर भारी वाटतोय मला. आपल्या मॅचच्यावेळी पण त्याला सगळ्यात कमी मारला होता. इतक्या जबरी फास्ट फॉरमॅट मध्ये इतकी इकॉनॉमिक बॉलिंग म्हणजे काही चेष्टा नाही. आता विंडिजच्या तर त्यानी विकेट्स पण काढल्या. हुशार बॉलर आहे!

Pages