करलो दुनिया मुठ्ठी मे.
थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .
गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .
विश्या ( वि. भो. )
गेलो असावे ना आता आपण
गेलो असावे ना आता आपण क्वार्टर फायनल ला ?
https://www.youtube.com/embed
https://www.youtube.com/embed/kn3yzJITdvI
नवीन अॅड. फार नाही आवडली.
क्वार्टरफाईनल नाही आता आपले
क्वार्टरफाईनल नाही आता आपले फक्त पहिल्या नंबरवर थांबताहेत की दुसर्यावर हेच बघायचेय.. त्यानुसार त्या ग्रूपमधील तिसरा की चौथा आपल्याशी खेळणार हे ठरणार.. जसे की ईंग्लंड किंवा श्रीलंका हे तुलनेत सोपे (ऑसी-न्यूझीलंडच्या मानाने) मिळतील.. श्रीलंका ईंग्लंडपेक्षा सोपी जाईल बहुधा..
आजचा ऑसी-न्यूझी मॅच ऑफ द
आजचा ऑसी-न्यूझी मॅच ऑफ द टूर्नामेंट झाली.. फोर सिक्स विकेटस प्रेशर तळ्यातमळ्यात दोन दर्जेदार संघातील सामना बघायला मिळाला... फक्त लो स्कोरींग झाला.. पण तरी ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळताना बघण्यासारखे सुख नाही, ते देखील वेगवान गोलंदाजांसमोर.. त्यानंतर त्यांचा काहीतरी सन्मानजनक स्कोअर व्हाहा हि इच्छाही थोडीफार पुर्ण झाली.. मग जॉन्सनची धुलाई बघायचे सुख, मॅकची फटकेबाजी.. पण यात एकतर्फी सामना बघायची खंतही हळूहळू दूर होत गेली.. शेवटी स्टार्कने उडवलेले दांडके तर अप्रतिम.. आणि त्यानंतर विल्यमसन जो गेले काही काळापासून मला आवडू लागलाय त्याने कसलीही वाट न बघता सरळ सिक्सर मारत हिशोब करून टाकणे..
न्यूझीलंड जिंकली खरी... पण या सामन्यानंतर मला ऑस्ट्रेलिया आणखी खतरनाक वाटू लागलीय.. हार्ड टीम टू बीट.. खास करून नॉकऑटमध्ये .. कारण शेवटच्या चेंडूपर्यंत लढायची वृत्ती त्यांच्यात बालपणापासूनच आहे, आजच्या सामन्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा ही स्वताला आठवण आणि जगाला जाणीव करून दिली..
श्रीलंकेचं नॅशनल अँथम मला फार
श्रीलंकेचं नॅशनल अँथम मला फार आवडतं, तेवढ्यासाठी आधीपासून चॅनल बदलून ठेवलं होतं :), कान तृप्तं झाले !
दीपांजली .. हो मला पण आवडत..
दीपांजली .. हो मला पण आवडत.. नमो नमो... श्रिलं......का..... नमो नमो....
एनिवे..मोइन अली आणी अमला मधे दाढी कोणाची....? मोइन अलीची का हशिम अमलाची...... (आवा..ज कोणाचा.. च्या चालीवर..) अशी चढाओढ आहे की काय? आत्ता मोइन अलिला बघताना त्याच्या दाढीचे केस हेल्मेटच्या ग्रिलमधे अडकुन ओढले जात असतील असा एक विचार येउन मलाच दुखायला लागले...:)
कालची ऑस्ट्रेलिया-न्युझिलंड मॅच मस्त झाली..दोन्ही लेफ्ट आर्म फास्ट बोलर्स्(स्टार्क व बोल्ट) दांड्या उडवत असताना वासिम अक्रमची आठवण आली. पण ती मॅच बघुन झाल्यावर एक विचार चाटुन गेला की सेमीफायनल जर आपल्याला न्युझिलंडमधे खेळायला लागली.. असल्या पिचवर तर?
आपल्या मॅचमधे कपिल देव म्हणाला तस आपण लुज लुज सिच्युएशन मधे होतो.. चांगले खेळलो तर त्यात काय? यु ए इ सारखी टिम होती..आणी वाइट खेळलो असतो तर यु ए इ समोर खेळाता नाही आले? असे म्हटले गेले असते. आपली टीम मस्तच खेळली.. बॅटिंगमधे एकदम शांत डोक्याने खेळले. रोहित शर्माचे काही काही शॉट्स..(खास करुन कव्हर ड्राइव्ह) सब्लाइम! पण वैद्यबुवाने कधीतरी म्हटल्याप्रमाणे... ऑफ स्टंपके बाहर के बॉलपर ऐसे कभी कभी बॅट नही लट्कवनेका रे भाइ..
टॉकिंग अबाउट हिंदी कॉमेंटरी.. कालच्या आपल्या मॅचमधे सगळ्यात एंटर्टेनिंग काय असेल तर गावस्कर-कपिल देवची हिंदी कॉमेंटरी.. ह ह पु वा.... एकदा गावस्कर अस पण म्हणाला.. त्यांचा कोण तो सगळ्यात चांगला बॅट्समन.. हायस्ट स्कोरर.. जो सहाव्या नंबरवर आला होता... तेव्हा गावस्कर म्हणाला.. इसको तो उप्पर भेजना चाहीये था...:हहगलो:
मुकुंद मी आता सहज घरच्यांना
मुकुंद

मी आता सहज घरच्यांना रायना, धवन आणि वॉट्सनची जुगलबंदी दाखवत होतो. धवन, रायना तर माकडपंथी करत होतेच पण मागे कपिलची कॉमेंटरी पण जाम टाईमपास आहे.
कसले बिन्धास्त झालेत आपले प्लेयर! बघायला मजा येते. आपले पुर्वीचे प्लेयर म्हणजे एकदम खालमुंडे. त्यात वाईट काही नाही खरं पण एक सचिन सोडला जो खेळात दादा होता तर बाकीचे थोडे घाबरुन खेळतायत असच वाटायचं. असं खेळायला आल्यावर माज वाटायचा म्हणजे पाकिस्तान, ऑस्ट्रेलियाचा वगैरे. आपले प्लेयर बोले तो "आपला काय ह्यांच्या समोर टिकाव लागणार" तोंडवर असं एक एक्स्प्रेशन घेऊन खेळायचे असं वाटायचं मला. कदाचित ते सायकॉलॉजिकल ही असेल. हे आजकालची पबलिक खुपच रिलॅक्स वाटतात. ग्रेट!
इंग्लिंडचे शॉट भारी आहेत की
इंग्लिंडचे शॉट भारी आहेत की लंकेची बॉलिंग लेम आहे म्हणावं?
३०० च्या जवळ येतील किंवा ३०० ही होऊ शकतील. आज जिंकले तर तेवढाच दिलासा जरा इंग्लंडला.
गेला रूट!
पण ठीक आहे. रिस्पेक्टेबल स्कोअर होईल.
वैद्यबुवा.. कसली
वैद्यबुवा.. कसली जुगलबंदी?
मला वाटत गेल्या ५-६ वर्षात फलंदाजीत जेवढी उत्क्रांती झाली तेवढी गोलंदाजी मधे झाली नाही.मान्य आहे की शेवटच्या १० षटकात व पॉवर प्ले (याला मराठी प्रतिशब्द?शक्ती खेळ? :))मधे क्षेत्ररक्षणावर मर्यादा असतात पण बहुतेक गोलंदाज काहीच कल्पकता दाखवत नाहीत..नुसतेच धावत येउन .. काहीच विचार न करता..चेंडुफेक करतात अस वाटत. का एकंदरीत सगळ्या गोलंदाजीचाच दर्जा घसरला आहे? की जगभरच्या धावपट्ट्या पाटा बनवल्या जात आहेत? की हा पांढर्या चेंडुंचा परिणाम आहे?काय कळायला मार्ग नाही.
आज रुटने पण रिव्हर्स स्विप सिक्स वगैरे शॉट्स मारले पण त्याचे शॉट मट़का वाटले.. त्यादिवशी डीव्हिलिरिसचे असे शॉट बघताना त्याचा उच्च दर्जा दिसुन येत होता हे माझे मत! असो...आजचा सामना चुरशीचा होइल. जयवर्धनेला चांगली खेळी करायला लागेल.. नाहीतरी तो चांगली खेळी खेळायला ड्यु (याला प्रतिशब्द काय? ) आहे.
नंतरच्या सामन्यात आज पाकिस्तान कसे खेळतात हे बघायला मी उत्सुक आहे.
आला..आला कपिल देव आला समालोचनाला.. त्याच्याच शब्दात.. अब बहो...त मजा आयेगा.. बहोत बढिया शॉट था ये.. बढिया फिल्डिंग थी ये.. इती कपिल..
१७७/६ पाकिस्तान आफ्रीदीला
१७७/६ पाकिस्तान
आफ्रीदीला वाढदिवसाचे सरप्राईज गिफ्ट मिळाले . शुन्यावर आउट झाला
मिझबा गेला ! २०२/७
मिझबा गेला ! २०२/७
आज फॅंटसी लीगमध्ये 859
आज फॅंटसी लीगमध्ये 859 पॉइंट्स

माझ्या टीममधल्या तिघांचीही (रुट, थिरी आणि संगा) शतके
माझा कॅप्टन (संगा) सामनावीर
Feeling Happy
लंकेने ईंग्लडबरोबरचा सामना
लंकेने ईंग्लडबरोबरचा सामना त्या ग्रूपमध्ये मजा आणलीय ..
आता झिम्बाब्वेनेही पाकला आडे हात घ्यावे.. शक्य आहे त्यांना २३५ चेस करणे.. बॅटींग त्यांची स्ट्रेंथ आहे.. आणि पाकचे तुर्तास सारेच गंडलेय..
म्हणजे या ग्रूपमध्येही धमाल आहेच..
क्वार्टर फायनलचा ठोकळेबाज फॉर्मेट असूनही ईंटरेस्टींग मॅचेस आणि रिझल्ट्समुळे उत्सुकता टिकून आहे..
मलापण आवडते श्रीलंकेचे
मलापण आवडते श्रीलंकेचे राष्ट्रगीत..... नमो नमो....श्रीलंका!
मला वाटत गेल्या ५-६ वर्षात
मला वाटत गेल्या ५-६ वर्षात फलंदाजीत जेवढी उत्क्रांती झाली तेवढी गोलंदाजी मधे झाली नाही
****************************************************************************************************
मी ह्या मताशी सहमत नाही ... आपण तिन्ही सामन्यात प्रतिस्पर्धिचे सगळेच गडी बाद केलेत ...
कपिल देव काल आपल्या मॅचच्या
कपिल देव काल आपल्या मॅचच्या सुरूवातीलाच म्हणे सारे प्लेअर्सने दाढी बहुत बढिया रखी है.
बुवा, क्रेडिट गोज टू गांगुली. त्यानं आपल्या टीमला माज करायला शिकवलं.
पाकची काय हालत?
Pakistan 235/7 (50.0
Pakistan 235/7 (50.0 ov)
Zimbabwe 105/3 (25.0 ov)
सीन विल्यम्स झिम्बाब्वेचा
सीन विल्यम्स झिम्बाब्वेचा सुरैश रैना आहे... बॅटींगला आला की धावफलक हलायला लागतो.. पाकिस्तानने ही विल्यम्स-टेलर जोडी फोडायला जेवढा उशीर करणार तेवढा सामना हातातून निसटत जाणार..
बुवा, क्रेडिट गोज टू गांगुली.
बुवा, क्रेडिट गोज टू गांगुली. त्यानं आपल्या टीमला माज करायला शिकवलं.
>>>>>>>
प्लस सेव्हन एटी सिक्स..
दादा मला त्याच्या फटकेबाजीसाठी वेगळा आवडतो आणि त्याच्या अॅटीट्यूडसाठी वेगळा आवडतो..
जिंकलं एकदाचं पाकिस्तान. तो
जिंकलं एकदाचं पाकिस्तान.
तो चिगुम्बुरा जर इंजुअर्ड होता तर त्याला रनर घ्यायला काय प्रॉब्लेम होता? धावायलाही त्रास होत होता त्याला.
ऐन वक्ताला पयंगारा गडबडला आणि
ऐन वक्ताला पयंगारा गडबडला आणि आफ्रिदीला खेळायचा कॉन्फिडन्स गमावला .. मेडन महागात पडली!
चला आमच्याइथे दोनचार फटाके तरी फुटतील ..
तो चिगुम्बुरा जर इंजुअर्ड
तो चिगुम्बुरा जर इंजुअर्ड होता तर त्याला रनर घ्यायला काय प्रॉब्लेम होता?
>>>>>>>>
रनर देत नाहीत ना हल्ली?
की बदलला नियम पुन्हा?
तर त्याला रनर घ्यायला काय
तर त्याला रनर घ्यायला काय प्रॉब्लेम होता >> आता रनर घेता येत नाही
ऑफ स्टंपके बाहर के बॉलपर ऐसे
ऑफ स्टंपके बाहर के बॉलपर ऐसे कभी कभी बॅट नही लट्कवनेका रे भाइ..
लटकावणे वाईट. त्यापेक्षा दक्षिण अफ्रिकेच्या डिव्हिलियर्स प्रमाणे ऑफ स्ट्ंपच्या बाहेर चार फूट जाऊन तिथला चेंडू जबरदस्ती बॅटीच्या मधोमध घेऊन लेग ला मारावा! त्याला हिंमत लागते, ते पाहून कामातुराणां न भयं न लज्जा प्रमाणे धावांतुराणां न भयं न लज्जा असे म्हणावे असे वाटले.
धावांतुराणां न भयं न लज्जा
धावांतुराणां न भयं न लज्जा
दोन्हीकडे बघणार्यांची मज्जा
दोन्हीकडे बघणार्यांची मज्जा
बुवा, क्रेडिट गोज टू गांगुली.
बुवा, क्रेडिट गोज टू गांगुली. त्यानं आपल्या टीमला माज करायला शिकवलं.
<<
मी अगदी हेच लिहिलय , २-३ पेज आधी :), त्याच्या काळात टिमचा अॅटीट्युड बदलला :).
दाढी बहुत बढिया रखी है.
दाढी बहुत बढिया रखी है.
काहीही म्हणा पण..कपिल देव "बढिया" शब्द मस्तच म्हणतो.
धावांतुराणां न भयं न लज्जा असे म्हणावे असे वाटले..झक्की..:हहगलो:
हो.. आणी दादानेच टिममधे स्वॅगर आणायला मदत केली हे सत्यच आहे. अर्थात त्याच्या आजुबाजुला त्याच्या स्वॅगरला बॅक करायला (न बोलुन) तेंडुलकर, द्रविड, सेहवाग व लक्ष्मण सारखे वर्ल्ड क्लास बॅट्समन व कुंबळे व भज्जी सारखे स्पिनर्स होते हाही तितकाच मह्त्वाचा मुद्दा!
काल झिम्बावेने हातचा सामना घालवला.. मला वाटत ते सिंगल काढायचे महत्व पुर्णपणे विसरले.. बोटावर मोजता येतील इतक्याच एकेरी धावा त्यांनी काढल्या असतील.
आणी संगाकाराची इनिंग कोणी पाहीली काय? स्मूथ अॅज सिल्क! ७० चेंडुत शतक केले पण कुठेही हिंसाचार वाटला नाही.. टॉप क्लास! त्यादिवशी डिव्हिलिअर्सची एक पद्धत व कालची संगाकाराची एक.. बोथ क्लासी इनिंग्स... बट इन अ डिफरंट वे! पण कपिल देव बरोबर बोलला.. चिडुन.. म्हणाला.. इंग्लंड कसल्यातरी विनिंग फॉर्म्युल्याला धरुन बसली आहेत अस वाटत ..पण कधी कधी वर्ल्ड कप जिंकायचा जो आवेष लागतो तो इंग्लंडच्या टिममधे नाही.. मॅच जिंकायची असेल तर कधी कधी प्लान धाब्यावर बसवुन इर्षेने खेळले पाहीजे.. प्लान वगैरे सगळे घरी ठेवुन मैदानावर समोर जी परिस्थिती असेल त्याला रिअॅक्ट करता आले पाहिजे..इति कपिल.. बरोबर आहे कपिलचे.. इंग्लंड अगदीच मरग़ळ असल्यासारखे खेळले काल.
धावांतुराणां न भयं न लज्जा
धावांतुराणां न भयं न लज्जा
रनर घेऊन नाही चालत आता हे
रनर घेऊन नाही चालत आता हे सांगितल्याबद्दल धन्यवाद.
झिम्बाब्वेला सुरुवातीला रन्स आणि बॉलची गॅप व्यवस्थित होती. एकेरी धावा काढत राहिले असतं तर अजिबात अशक्य नव्हतं त्यांना.
Pages