क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< " वेळच सांगेन." >> कोणत्याही नविन प्रशिक्षकाबद्दल हें अर्थात आहेच. पण कुंबळे यशस्वी होण्याची शक्यता अधिक. मुख्य कारणं -
१] धोनी, विराट व कुंबळे यांच्यात 'जिद्द' व 'जिंकण्याची ईर्षा' हे समान गुण प्रकर्षाने असल्याने त्यांची लय सहज जुळेल;
२] कुंबळे अभ्यासू वृत्तीचाच असल्याने, 'प्रशिक्षक' म्हणून आवश्यक असलेली मानसिकता तो आत्मसात केल्याशिवाय रहाणार नाही;
कुंबळेकडून आणखी एक महत्वाची अपेक्षा अशी - ' गोलंदाजी केली कीं माझी जबाबदारी संपली' ही आपल्या गोलंदाजांची परंपरागत वृत्ती तो साफ मोडून काढेल; त्याच्या करिअरमधे त्याने कधीही बॅटींग आपल्यासाठी दुय्यम आहे असं मानलं नाही !

असामी, आय थिंक कुंबळे जिनीयस असला, तरी मुरलीधरन किंवा तेंडुलकरसारखा तो नव्हता. त्याची प्रज्ञा ही कसोटीच्या दगडावर (पन इन्टेन्डेड) घासून घासून उजळली आहे, त्यामुळे तो कर्स्टनच्या जवळ जाणारा वाटतो. तसेही 'स्पिन' आणि 'बॉलिंग' हे दोन्ही भारतीय खेळाडूंचे सध्याचे मेन इशुज आहेत, त्यावर त्याने मेहनत घेऊन चार गोष्टी शिकवल्या, तर खूप बरे होईल, असे वाटते.

कुंबळे ची लढाऊवृत्ती, अथक प्रयत्न आणी बॉलिंग ईंटेलिजिअन्स हे मला भावलेले गुण होते. पहिले दोन कोहलीकडे आहेत जर त्याला कुंबळे च्या अनुभवाची जोड मिळाली तर फार छान होईल.

कुंबळे जिनीयस असला, तरी मुरलीधरन किंवा तेंडुलकरसारखा तो नव्हता. >> बरोबर. ते अजून वेगळ्या दर्जाचे खेळाडू आहेत. मी गिफ्टेड अशा अर्थाने वापरत होतो कि त्याच्यात जन्मजात क्रिकेटची गुणवत्ता होती. तो आधी मिडीयम पेसर होता, फिरकीकडे उशिरा वळला. जिगरबाज बॅटींग हा जन्मजात होती. त्याने अपार कष्ट घेऊन बॉलिंग मधल्या त्रुटी सुधारल्या, इंजरीनंतर अ‍ॅक्शन बदलली नि overseas record सुधारला. हे सगळे गिफ्टेड असण्याचे लक्षण आहे. माझा मुद्दा ह्या अनुषंगाने होता कि अशा खेळाडूंच्या इतरांकडून असलेल्या अपेक्षा (खेळ सुधारण्याबद्दल किंवा कमिटमेंटच्या) स्वतःच्या पातळीवर जाणार्‍या असतात. किती खेळाडू त्या परिक्षेला उतरू शकतील ह्यावर कोचचे यशापयश ठरेल. (सध्याच्या संघावर नजर टाकली तर राहाणे, कोहली, विजय, अश्व्नि असे खेळाडू आहेत हे पटकण जाणवते, इतरांबद्दल माहित नाही) असो, काहीच नाहि तरी स्पिन बद्दल (टा़कणे नि खेळणे) ह्या दोन्ही बाबतींमधे सुधारणा झाली तरी कुंबळे सार्थकी लागला असे म्हणू.

aggressive Kohali नि defensive कुंबळे हे काँबो नक्कीच interesting असेल हे नक्की.

अभिनंदन कुंबळे.
कप्तानी आणि प्रशिक्षकपद या दोन भिन्न स्किल आहेत.
कुंबळे हा कप्तानापेक्षा प्रशिक्षकाच्या भुमिकेत जास्त फिट बसू शकतो असे वाटते तरी.
बाकी लहानपणी आमच्याईथे पोरांमध्ये चालणारी एक वार्ता (कदाचित खरीही असेल) .. कुंबळे हा भारतीय टीममधील सर्वात स्कॉलर (अभ्यासात) खेळाडू आहे..

शास्त्री - गांगुलीच्या भांडणात गांगुलीने कुंबळे पाठीमागे ताकद लावली. आजच्या टाईम्सला बरंच आहे ह्याबद्दल. इट सिम्स कुंबळेला कोच बनविन्यात सचिनपण सहभागी होता.

गेल्या १८ महिन्यांत भारतीय टीम वर्ल्ड बीटर्स झाली, हे वाचून हसू आवरेना. बांग्लादेशशी सीरीज लॉस वगैरे विसरले वाटतं. मुद्दाम शास्त्रीच्या बाजूने लिहिलेला लेख वाटतो.

सचिनचे डायरेक्ट गांगुलीसारखे नाही. तर सचिन, गांगुली, द्रविड, लक्ष्मण आणि जम्बो ह्यांना क्रिकेट त्यांच्याकडे एकवटायचे आहे असा एक थॉट आहे. त्यामुळेच द्रविड आणि जम्बो अ‍ॅडमिनिस्ट्रेशन मध्ये आले असे BCCI ला वाटते.

तर गांगुली, सचिन आणि लक्ष्मण हे तिघेही अ‍ॅडव्हाजरी समिती वर आहेत. ज्यांनी निवड केली. गांगुली हा शास्त्रीच्या प्रेसेंन्टेशनच्यावेळी अनुपस्थित राहिला असे आर्टिकल म्हणत आहे. अर्थात क्रिकेट प्रेमींना जम्बो आणि सचिन व गांगुलीचे रिलेशन नव्याने सांगायची गरज नाही.

दु:खदायक का? पॉलिटिक्स तर बिसीसीआय पण करते आहे. मग प्लेअर्सनी हातात घेऊन जर वेगळे वळण लावले तर मला आवडेल. त्यामुळे जम्बो अन द्रविड जेंव्हा निवडून आले तेंव्हा मला आनंद झाला.

दु:खदायक का? >> कुंबळे चे नाव short listed candidates मधेही नव्हते, गांगुलीने ते अ‍ॅड करायला लावले हे कशाच्या जोरावर हे कळायला हवे. गांगुली जो कोच निवड समितीचा भाग होता त्याने प्रत्येक candidate च्या presentation च्या वेळी हजर राहणे जरुरी होते असे मला वाटते. हे असे पडद्याआडचे सूत्रधार नको असे वाटते. BCCI politics खेळतेय म्हणून खेळाडूंनीहि खेळावे हे दु:ख दायक वाटते. (खेळाडू कितीही नामवंत असले तरी अस्सल राजकारण्यांच्या पुढे politics खेळण्यामधे त्यांचा टीकाव लागणार नाही. कुंबळे त्याच्या प्लेयर असण्याच्या दिवसांमधे प्लेयर्स association चा पुरस्कर्ता होता. तेंव्हा लोधा समितीच्या शिफारसी नुसार तो परत त्याच कामास लागू नये म्हणून BCCI ने त्याला कोच बनवले हे लेखात लिहिल्याप्रमाणे असेल तर गांगुली BCCI विरुद्ध आहे असे मला वाटत नाही, परत ह्यात सगळ्या प्रकारात कुंबळे नि प्लेयर्सच्या हिताचा बळी जातोय. सचिन ला politics जमत नाही हे त्याच्या कप्तानपद्दच्या कारकिर्दी मधे उघड झाले आहे. द्रविड नि लक्ष्मण ह्या सगळ्या पलीकडे आहेत असा माझा समज होता.) कुंबळेने त्याच्या कारकिर्दीमधे कधी politics चा आधार घेतल्याचे वाचले नाहि त्यामूळे किमान त्याची निवड ह्या politics शिवाय झाली असती तर आवडले असते.

भा, माला वाटते, बांग्ला लॉस च्या वेळी शास्त्री नव्हता किंवा सुट्टीवर होता. शास्त्रीच्या काळात टीम सुधारली हे खरे आहेच ना. (हि बोलाफुलाची गाठ असू शकते हे मान्य पण फ्लेचरच्या पेक्षा बदलता सूर जाणवत होता).

शास्त्री कोच झाला असता तर धोनीचा पत्ता लागलीच कट झाला असता... पॉलिटीक्स तर सगळीकडेच आहे.. शास्त्रीबद्दल तरी वाईट वाटून घ्यायचे कारण नाही Happy

मलाही शास्त्री अजून १ वर्षे राहिला असता तरी चालले असते असे वाटते. नाहीतरी विराट अन शास्त्रीचं मेतकुट सर्वज्ञात आहे. विराटला टीम टोटली ताब्यात घेता आली असती अन पुढच्या विश्वचषकासाठी टीम बिल्डप चालू झाले असते.

धोणी तसेही पुढचा एकदिवशीय विश्वकप खेळू शकणार नाही, असे आत्ता तरी वाटतेय. त्यामुळे विराटला दोन वर्ष आधीतरी कॅप्टन बनवायला हवे. शास्त्री राहिला असता तर कदाचित पुढच्या वर्षी तो एकदिवशीय मॅचेसा कप्तान झाला ही असता.

कुंबळे, सचिन, द्रविड, लक्ष्मण हे सगळे जन्टलमन कॅटेगिरीतले आहेत. गांगुली आधी रिटायर झाल्यामुळे त्याला प्लेअर टू अ‍ॅडमिन असा ट्रान्झिशन वेळ खूप मिळाला. गांगुली एकटाच कुंबळेचे नाव पुढे आणू शकत नाही, इतरांची मदत पण असेल असे मला वाटते.

होतंये ते टीमच्या दृष्टिने चांगल की वाईट हे आधी लिहिल्याप्रमाणे काळच ठरवेल. पण पॉलिटिक्सपायी टीम सफर होऊ नये.

असल्या 'पॉलिटीक्स'चा परिणाम पुन्हा परदेशी प्रशिक्षक नेमण्यात न होवो म्हणजे मिळवलं !!
[ किंबहुना, हें टाळण्यासाठीच तर परदेशी प्रशिक्षक नेमण्याचं धोरण नव्हतं ना अजूनपर्यंत राबवलं जात होतं ? ]

आजच मनात आलेला विचार (शास्त्री-गांगुली वादाबद्दल) - गांगुली तसाही लेफ्ट आर्म स्पिनर्सना फारसा रिस्पेक्ट द्यायचा नाही. Wink

गांगुली तसाही लेफ्ट आर्म स्पिनर्सना फारसा रिस्पेक्ट द्यायचा नाही. डोळा मारा >> Lol चॅपेल लेफ्ट आर्म स्पिन बॉलिंग पण करत असे का ? Wink

"गांगुली तसाही ****** ना फारसा रिस्पेक्ट द्यायचा नाही" ह्यातली गाळलेली जागा हवी तशी भरता येईल. Happy

आज गांगुली ने त्याची बाजू मांडली आहे. अर्थात त्याने आता काहीच फरक पडणार नाही.

ईंग्लंड ने काहीच्या काही स्कोअर चेस केलाय श्रीलंकेच्या विरुद्ध. जबरदस्त!

<< गांगुली तसाही लेफ्ट आर्म स्पिनर्सना फारसा रिस्पेक्ट द्यायचा नाही. >><< चॅपेल लेफ्ट आर्म स्पिन बॉलिंग पण करत असे का ? >> शिवाय, शास्त्री तसा अगदीं रिस्पेक्ट द्यावाच असा कांहीं लेफ्ट आर्म स्पीनर नव्हताच !

प्रशिक्षकाच्या निवडीच्या वेळीं इछुकानी नुसतं प्रेझेंटेशन सादर न करतां प्रत्यक्ष हजरही रहावं, अशी अट होती का ? आणि असली, तरीही निवडीच्या वेळीं स्वतःच्या गैरहजेरीचं समर्थन गांगुलीने शास्त्रीच्या गैरहजेरीने केलंय , तें अजिबात नाहीं पटलं. शास्त्रीबद्दल मला खूप प्रेमादर आहे अशातला भाग नाही. पण तो एक ज्येष्ठ व अनुभवी कसोटीपटू आहे, ''डायरेक्टर' म्हणून त्याने बर्‍यापैकी कामगिरी आत्तांच केलीय. त्याच्याबद्दलचं गांगुलीचं वागणं, बोलणं फारच औचित्यभंग करणारं वाटतं.

दोघांचेही वागणे सामान्य क्रिकेटप्रेमींना बुचकळ्यात टाकणारे आहे. >> शास्त्रीचे नाहि वाटले रे. गांगूलीचे नक्की वाटले. अशा मह्त्वपूर्ण मिटीग च्या वेळी कॅब ची मिटींग घेणे अडले होते का ? ती किंवा हि मिटींगही पुढे ढकलता आली नसती का ? कुंबळेच्या नथीमधून गांगू बाण मारून घेतो असे वाटते दर वेळी वाचताना. "त्याच्याबद्दलचं गांगुलीचं वागणं, बोलणं फारच औचित्यभंग करणारं वाटतं." हे भाऊंनी बरोबर पकडले आहे. शास्त्री प्लेयर म्हणून कसाही असला तरी इतर भारतीय कोचेस च्या तुलनेमधे त्याने नवशिका संघ घेऊन अधिक चांगले रिसलट्स दाखवले आहेत (अगदी बोलाफुलाची गाठ पडल्याचा फायदा त्याला देऊनही) .निव्वळ ह्या कारणासाठी तरी त्याचा मुलाखतीच्या वेळी समिती मधल्या प्रत्येक सदस्याने हजर राहणे मोरली जरूरी होते असे मला वाटते.

ईंग्लंड ने काहीच्या काही स्कोअर चेस केलाय >> नवा इंग्लंड संघ खरच जबरदस्त वाटतोय. हे इंग्लंड मधले निकाल आहेत हे मान्य करूनही त्यांची एकंडर अ‍ॅटीट्यूड नि आत्मविश्वास बघता पुढच्या वर्ल्ड कप पर्यंत असाच टिकला तर नक्की संभाव्य विजेते म्हणून गणता येईल.

आजच्या घडीला तरी ईंग्लंड चे कसोटी आणी मर्यादीत सामन्यातले संघ खूप प्रबळ आहेत.

शास्त्री-गांगुली वादाविषयी मला असं वाटतं की ईतक्या सोन्याची अंडी देणार्या कोंबडी च्या बाबतीत काहीही राजकारण न होता सरळ आणी पारदर्शक पणे निवड होईल ही अपेक्षा ठेवणं naive आहे. ह्या सगळ्याच्या पुढे जाऊन भारतीय क्रिकेट चं आणी संघाचं भलं व्हावं ही अपेक्षा आहे आणी कुंबळे ती पूर्ण करेल अशी आशा आहे.

अंतर्गत वाद आणि राजकारण चव्हाट्यावर आले आहेत, बुचकळ्यात टाकावे असे काही नाही. पण येस्स, आपल्याला याची कल्पना नसली तर तसे वाटणारच. इथे आधी कोणी अश्या काही राजकारणाचा उल्लेख केला असता तर त्यालाही लोकांनी काहीही बोलतोस म्हणून वेड्यात काढले असते Happy

अरे मीच केला होता तो उल्लेख. अन मला काही ह्या नविन वाटत नाही. राजकारण हे असणारच. पण मुद्दा आहे की कुंबळे त्याचा बळी होतोय की तो किंग ठरणार आहे. ( किंग मेकर गांगुली)

इथे आधी कोणी अश्या काही राजकारणाचा उल्लेख केला असता तर त्यालाही लोकांनी काहीही बोलतोस म्हणून वेड्यात काढले असते >> हे पण तुझ्या धोनी कोहली वादासारखेच आहे का ? Wink

सरळ आणी पारदर्शक पणे निवड होईल ही अपेक्षा ठेवणं naive आहे >> हे खरय नि मान्य फक्त खेळाडू पिसून निघू नयेत अशी भाबडी इच्छा रे.

किंग मेकर गांगुली >> काय तात्या ? There is only one King Maker. साहेब Wink

आजच्या घडीला तरी ईंग्लंड चे कसोटी आणी मर्यादीत सामन्यातले संघ खूप प्रबळ आहेत. >> हो. अँडरसन नसल्यावर किंवा त्याचा उतरणीचा काळ सुरू झाला कि खाली येतील असे वाटले होते पण ब्रॉड ने सुकाणू अचूक उचलले आहे. कदाचित कुक नंतर थोडे issue येतील टेस्ट मधे, reliable सलामी नसल्यामूळे स्मिथ नंतर आफ्रिकेचे सुरू आहे तस.

आफ्रिके च्या संघाची निवड reservation च्या basis वर होतेय गेले वर्षभर म्हटल्यावर त्यांच्या कामगिरीचा लंबक असा झुलता का आहे हे लक्षात येतेय.

"हे पण तुझ्या धोनी कोहली वादासारखेच आहे का ? ............ हो .. त्याच अनुषंगाने बोल्लो" - यह जो पब्लिक है वह सब जानती है! Wink

"फक्त खेळाडू पिसून निघू नयेत अशी भाबडी इच्छा रे." - सहमत. पण बहुदा तसं होणार नाही असं वाटतय.

ईंग्लंड च्या टीम मधला अंडररेटेड आणी तितकाच उपयुक्त खेळाडू मला मोईन अली वाटतो. १ ते ८ कुठल्याही क्रमांकावर जवाबदारीने फलंदाजी करणारा आणी उपयुक्त स्पिनर म्हणजे थोडक्यात धोनी ला जडेजा जसा व्हावा असं वाटत होतं तसा (भावे प्रयोग).

अफ्रिकेची टीम ही चाहत्यांसाठी फ्रस्ट्रेशन गिफ्ट रॅप करून आणते.

Pages