क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्षा आवडता असला तरीही प्रत्यक्ष क्रिकेटचे बारकावे लक्षात आणून देण्यात तो कमी पडतो व ही कमतरता भरून काढायला तो हास्यविनोद व फालतू आंकडेवारीचा खूपच आधार घेतो, हें जाणवतं व खटकतंही. माझाच हा चूकीचा ग्रह झला असेलही पण हर्षाबद्दल पूर्वग्रह मात्र नक्कीच नाहीं. किंबहुना कौतुकच आहे.

भाऊ - त्या दृष्टीने कधी विचार केला नव्हता या आधी, पण खरे असेल. अर्थात तरीही 'एक्स्पर्ट फॅन' या पर्स्पेक्टिव्ह ने केलेली त्याची कॉमेन्टरी चांगली असतेच. असामी - सहमत.

<< तरीही 'एक्स्पर्ट फॅन' या पर्स्पेक्टिव्ह ने केलेली त्याची कॉमेन्टरी चांगली असतेच >> एकदम मान्य. गैरसमज नको म्हणून पुन्हा सांगतो, मलाही हर्षा आवडतोच. क्रिकेट ही त्याची खरीखुरी 'पॅशन' आहे, ही एकच गोष्टही तो आवडायला मला पुरेशी आहे. मला खटकणारी ती एकच बाब मुद्दाम सांगितली त्याचं कारणही तो मला आवडतो हेंच आहे; क्रिकेटचे बारकावे गावसकरसारखे त्याच्या लक्षांत न येणं समजण्यासारखं आहे पण आंकडेवारीचा अतिरेक तर तो थांबवू शकतोच ना !.

<< तरीही 'एक्स्पर्ट फॅन' या पर्स्पेक्टिव्ह ने केलेली त्याची कॉमेन्टरी चांगली असतेच >> एकदम मान्य. गैरसमज नको म्हणून पुन्हा सांगतो, मलाही हर्षा आवडतोच. क्रिकेट ही त्याची खरीखुरी 'पॅशन' आहे, ही एकच गोष्टही तो आवडायला मला पुरेशी आहे. मला खटकणारी ती एकच बाब मुद्दाम सांगितली त्याचं कारणही तो मला आवडतो हेंच आहे; क्रिकेटचे बारकावे गावसकरसारखे त्याच्या लक्षांत न येणं समजण्यासारखं आहे पण आंकडेवारीचा अतिरेक तर तो थांबवू शकतोच ना !.

"क्रिकेटचे बारकावे गावसकरसारखे त्याच्या लक्षांत न येणं समजण्यासारखं आहे " - भारतीय कॉमेंटेटर्स मधे ह्या बाबतीत गावसकर बिनतोड आहे. त्याच्या (बराच) खाली मांजरेकर येतो.

सचिन च्या शेवटच्या कसोटीनंतर चा सगळा समारंभ हर्षा ने फारच सुंदर कव्हर केला होता. तो तास-दीड तास त्यानं अक्षरशः जिवंत केला होता. पूर्ण वेळ तोच बोलत होता, पण किती आणी काय बोलावं आणी प्रसंग कसा खुलवावा ह्याचा तो एक परिपाठ होता. टीव्ही वर सचिन ला निवृत्ती घेताना बघून जे वाटत होतं ते हर्षानं तंतोतंत शब्दबद्ध केलं होतं. त्या दिवशी जितकं भावनिक वाटलं, त्यात हर्षाच्या बोलण्याचा वाटा सुद्धा लक्षणीय होता.

<< सचिन च्या शेवटच्या कसोटीनंतर चा सगळा समारंभ हर्षा ने फारच सुंदर कव्हर केला होता.>> खरंय. [फक्त समालोचक म्हणून मला त्याचं काय खटकतं तें सांगितलं; इतर बाबतींत तर हर्षा आदर्शवतच आहे !]

भाऊ थोड्या वेळाने हर्षा एकमेव समालोचक आहे असे म्हणणार अशी पुसटशी शंका मनाला चाटून गेली Wink

फेफे, तू गावस्करबद्दल जे लिहिलय ते तंतोतंत प्रेम पन्निकरला लागू होते. मॅच रिपोर्ट तर वेगळी गोष्ट होती. त्याचे live feeds आधी ऐकले/बघितले आहेत. किती अचूक विश्लेषण असे. wow !

"गावस्करबद्दल जे लिहिलय ते तंतोतंत प्रेम पन्निकरला लागू होते." - प्रेम पन्निकर मुळे तर मी ईंग्रजीमधले मॅच रिपोर्ट्स वाचायला लागलो. पण त्याच्या क्रिकेट च्या ज्ञानाविषयी कळण्याईतकं मला कळत नव्हतं.

गावसकर बरेच वेळा जे प्रेडिक्ट करतो ते बघायला मजा येते. तो पुढचा बॉल बघून आलाय असं वाटतं.

<< भाऊ थोड्या वेळाने हर्षा एकमेव समालोचक आहे असे म्हणणार अशी पुसटशी शंका मनाला चाटून गेली >> मीनाकुमारीच्या अगदीं निस्सीम चाहत्याने सहज जरी 'तिच्या एका हाताला सहा बोटं होतीं' असं म्हटलं, तरी तो तिचा दुष्मन असल्यासारखंच तिच्या इतर चाहत्याना वाटतं. म्हणून पुन्हा पुन्हा हर्षाबद्दल चांगलं लिहीणं अपरिहार्य वाटलं ! Wink

गवसकरच्या बारीक निरीक्षणाबद्दल - बॅटच्या कडेला लागून उंच उडालेला अगदीं सोपा झेल 'स्लीप'मधल्या क्षेत्ररक्षकाने हातात घेवून सोडला. सगळ्यानाच तें हास्यास्पद व अक्षम्य वाटलं व एका समालोचकाने तसा शेराही मारला. त्यावर गावसकरचं निरिक्षण होतं - " नुसतीच बॅटची कडा लागून गेलेला तो चेंडू नव्हता तर स्क्वेअर-कट करताना जोरात 'चॉप' केलेला तो चेंडू होता; असे चेंडू खूप जोरात स्पीन होत असतात व प़कडताना खूप काळजी घ्यावी लागते. वास्तविक ,हें ओळखून विकेटकीपरने जावून तो झेल पकडणं अधिक योग्य होतं . झेल सोडल्याचं हें समर्थन नसून , झेल वाटला तेवढा सोप्पा नव्हता, हें लक्षांत घेणं हा मुद्दा आहे ! "

"म्हणून पुन्हा पुन्हा हर्षाबद्दल चांगलं लिहीणं अपरिहार्य वाटलं !" - जाऊ दे भाऊ, एक फर्मासपैकी व्यंगचित्र च टाका हर्षा वर Happy

भाऊ - तुमचा पॉइण्ट समजला होता. नो कन्फ्युजन. मी बराच काळ ऑफलाईन असल्याने इथे लिहू शकलो नाही.

प्रेम पणिक्कर बद्दल मीही विचारणार होतो. आजकाल तो रीडिफ मधे लिहीत नाही. इतरत्र लिहीतो का? की फक्त ट्विट्स?

<< प्रेम पणिक्कर बद्दल मीही विचारणार होतो.>> खरंच, बरेच दिवस कुठें वाचनात नाहीं आलं त्यांचं लिखाण.
<< एक फर्मासपैकी व्यंगचित्र च टाका हर्षा वर >> आपकी फर्माइश , म्हणून ....

आई, अग सूनेने एवढंच तर म्हटलं ना तुला , ' अख्खा दिवस करायचीच असेल
कॉमेंटरी, तर निदान त्या हर्षासारखी तरी करा ' !!
aajibai.JPG

इंग्लंडची आताची वन डे टीम चांगली आहे हे खरं पण टेस्ट टीमबद्द्ल निदान मी तरी अजून तसं म्हणणार नाही. इनफॅक्ट टेस्ट टीममध्ये अ‍ॅलिस्टर कूक आणि जो रुट वगळता इतर बॅट्समनच्या क्षमतेबद्दल अद्यापही प्रश्नचिन्हच आहे.

जॉनी बॅरीस्टॉव्ह श्रीलंकेविरुद्ध यशस्वी झाला असला तरी पाकीस्तानच्या बॉलिंगविरुद्ध इट्स अ डिफरंट बॉल गेम! शिवाय त्याचं विकेटकिपींग अत्यंत सदोष आहे. इंग्लंडने गॅरी बॅलन्सला पुन्हा पाचारण केलं आहे. बॅलन्सचं टेक्नीक सदोष आहे हे अनेकदा सिद्धं झालेलं आहे. जेम्स व्हिन्स अद्यापही चाचपडतोच आहे. अ‍ॅलेक्स हेल्स काही प्रमाणात यशस्वी झाला असला तरी स्टार्ट मिळाल्यावरही आऊट होण्याची त्याला खोड आहे. मोईन अली बॅट्समन म्हणून बराचसा अपयशी ठरला आहे आणि बॉलर म्हणून बरेच ऑप्शन्स इंग्लंडला मिळू शकतील.

बॉलर्सपैकीही एक ब्रॉड आणि काही प्रमाणात प्लंकेट सोडता कोणी खास नाही. मिसबाह आणि युनूस खान / अझर अली सेट झाले तर इंग्लंडला कपाळ बडवून घेण्यास भाग पडू शकतं.

इंग्लंड-पाकिस्तान चांगली सुरू झाली आहे. वोक्सने प्रोबिंग बॉलिंग करत 2 बळी मिळवले आहेत. 21.2 मध्ये पाकिस्तान 65/2.

<< मिसबाह आणि युनूस खान / अझर अली सेट झाले तर इंग्लंडला कपाळ बडवून घेण्यास भाग पडू शकतं.>> पाकिस्तानची गोलंदाजी इंग्लंडमधे अधिक भेदक ठरेल ही दाट शक्यता आहेच पण फलंदाजी बहरेल कीं नाहीं यावर मात्र प्रश्नचिन्ह. उपखंडातल्या फलंदाजांची इंग्लंडमधे त्रेधातिरपीट उडण्याचीच शक्यता जास्त.

पाक- १२६-२ ! << मिसबाह आणि युनूस खान / अझर अली सेट झाले तर इंग्लंडला कपाळ बडवून घेण्यास भाग पडू शकतं.>>या विधानानुसार मिसबाह आणि युनूस खान ही अनुभवी जोडी सेट तर होतेय. बघूं आतां विधानाचा दुसरा भागही खरा होतो का !!

मिस्बाहच्या नाबाद ११० कौतुकास्पद !! पाक -२८२-६ .
कालची 'टिपीकल' इंग्लीश विकेट मात्र वाटली नाही. बॉल खास स्विंग होताना दिसला नाही. अँडरसनची गैरहजेरी इंग्लंडला चांगलीच जाणवली असावी.
वे.इंडीज बोर्ड प्रेसिडेंट संघाविरुद्ध सरावाच्या सामन्यात भारतीय संघ बरा खेळलाय, विशेषतः फिरकी गोलंदाजी प्रभावी ठरतेय .

पाकिस्तानची पाचव्या विकेटची भागीदारी मस्तच झाली.. ती विकेट पडली नसती तर इंग्लंड बॅकफूटवर होते.. रादर तो पर्यंत इंग्लंडची परिस्थिती गंभीर होती..

"अँडरसनची गैरहजेरी इंग्लंडला चांगलीच जाणवली असावी." - सहमत.

ईंग्लंड अजुनही चांगल्या लेगस्पिन समोर चाचपडतात (लगान च्या कचरापासून ते पाकिस्तान च्या यासिर शाह पर्यंत - व्हाया शेन वॉर्न). नोव्हेंबर मधे भारत-ईंग्लंड सामन्यात अमित मिश्रा (फॉर्म मधे असला तर) खेळला तर मजा येईल.

पाकिस्तान ला विकेट वगैरे मिळाली की रमिझ राजा स्वतः खेळत असल्यासारखा खुश होतो.

Pages