क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< पण आपण फॅन म्हणून बोलणे आपलेही कामच नाही का? >> म्हणूनच तर माझा फॅन इथं 'फुल स्पीड'मधे चालू असतो ना !! Wink

त्या घडीला जिंकण्यासाठी आवश्यक तसाच खेळ धोनीने केला, तो यशस्वी झाला व तेंच तसल्या बालिश डांवपेचांच आपोआपच परिणामकारक उत्तर झालं >> +१

हें बघायला कितीही बरं वाटलं तरीही तें अपरिपक्वतेचंच लक्षण आहे, हें कर्णधार कोहलीला लवकरच उमगेल अशी माझी खात्री आहे. >> भाऊ मला वाटते असे प्रकार हाताळायची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असती. जो तो आपल्याला जमेल त्या प्रकारे अशा प्रकारांचे प्रत्त्युत्तर देत असतो. There is no single solution that fits all. Kohli seems to be deriving strength in a way he reacts, without letting it affect his game. There is no point in trying to convert him in another mold. Let him be with, what works for him.

सगळेच सचिन नसतात आणि सचिनसारखेच करावे ही अपेक्षा सगळ्यांकडून ठेवणे चुकीचे आहे. काहींना सहन होते काहींना अजिबात नाही तिथल्या तिथे त्याच भाषेत उत्तर देणे पण बरोबर असू शकते.

<< Kohli seems to be deriving strength in a way he reacts, without letting it affect his game. >> Amen ! Wink

हा बॉल जबरी आडवला.. पण त्याच्या आधी आयर्लंड बॅटींग करत असतानाचा ओमानच्या प्लेअरनी घेतलेला कॅच अफलातून होता..

आयर्लंड जिंकले असते तर ह्याच फिल्डींगच्या जोरावर.. कारण तो पर्यंत ओमान मॅच जिंकण्याच्या परिस्थितीत आले होते. पण नंतर परत आयरिश खेळाडूंनी गोची केली..

नेदरलँडची फिल्डींग सुध्दा जबरी आहे. आधीच्या विश्वचषकात त्यानी बरेच उत्तम क्षेत्ररक्षण केले होते

काल आमच्या ओमानची टीम आयर्लंड विरुद्ध जिंकली. त्यात मक्सूद नावाच्या ओमानच्या प्लेअरने घेतलेला हा अफलातून झेल पहा:-

http://timesofoman.com/article/79156/Videos/WATCH--ndash;-Oman's-Maqsood-snatches-unbelievable-catch

झालेल्या सगळ्याच मॅचेस नेल बाइटींग झाल्या. कालची तर जबरीच... काल पॅरलली दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाची मॅच चालू होती.. पण ती बघायच्या ऐवजी ओमान - आयर्लंड मॅचच बघितली गेली..

मुंबई वि. रेस्ट ऑफ ईंडिया ची मॅच मस्त झाली. मुंबई ६०३ (पहिली ईनिंग), शेष भारत ३०६, मुंबई १८२, शे. भा. ४८०/६. मुंबई चं खडूस क्रिकेट (बॅटींग करताना भरपूर रन्स करायचे आणी बॉलिंग करताना बचावात्मक, प्रसंगी नकारात्मक बॉलिंग करून, रन्स रोखायचे) यंदा चाललं नाही. फैझ फझल, करूण नायर, शेल्डन जॅक्सन आणी स्टुअर्ट बिन्नी ह्या सगळ्यांनी मस्त बॅटींग केली शेवटच्या दिवशी.

फेरफटका.. ती मॅच प्रचंडच इंटरेस्टींग झाली... मुंबई पहिल्या इनिंगच्या लीड वर निवांत होते.. पण ROI च्या खेळाडूंनी जबरी मॅच काढली..

And all of sudden India are 107 for 1 after 7 overs.

ही इनिंग कितीदाही पाहिली तरी परत परत पाहावी वाटते. https://www.youtube.com/watch?v=sZnr41pH0gI

ह्यात नटराज अन हेलिकॉप्टर (मिनी) दोन्ही आहेत.

हि विचित्र मॅच आहे. त्यात लिमिटेड ओव्हर्स आहेत नि हि पहिली इनिंग पण आहे. फिल्डींग रिस्ट्रीक्श्न्स आहेत. प्रॅक्टिस मॅच असावी.

फुटबॉलवर इथं वेगळा धागा नाहीं पण इथंही फुटबॉलप्रेमी असतीलच म्हणून -
अमरबहाद्दूर थापा, माझ्या अतिशय आवडत्या भारतीय फुट्बॉलपटूचं काल निधन झालं ! Sad
एक वेळ मफतलाल संघातून खेळणार्‍या अमरबहाद्दूर,रणजीत व शाम थापा यांनी मुंबईच्या फुटबॉलप्रेमीना वेडच लावलं होतं. त्यांतला अमरबहाद्दूर तर एक असामान्य प्रतिभावान, शैलीदार व जादूई खेळाडूच. भारतीय संघातूनही त्याने भरीव कामगिरी केलेली. त्याच्या अनेक अविस्मरणीय खेळी आज आठवताहेत. त्याला भावपूर्ण श्रद्धांजली !
[ क्रिकेटच्या धाग्यावर हें पोस्ट करणं तितकंसं उचित नसूनही त्याला कुठेतरी शेवटचा सलाम करणं अपरिहार्य होतं , म्हणून ]

केदार, ती मॅच ऑफिशियल नव्हती, पण टी-२० ची मुळं ज्या प्रयत्नात आहेत, त्यातला हा एक प्रयत्न होता.

३ गोष्टी मला जाणवल्या:

१) तेंडल्या चे पहिले २ शॉट्स कसले एफर्टलेस आहेत. व्वा!
२) टी-२० हा प्रकार तेंडल्या च्या विशीत (अर्ली ट्वेंटीज) आला असता, तर तेंडल्या ने काय धमाल केली असती. (एक स्वप्नरंजन, 'जर-तर' ला अर्थ नसतो हे माहीत असूनही).
३) मधेच एकदा स्कोरकार्ड दाखवलय. बाकीची टीम (एखाद-दुसरा अपवाद वगळता) कसली मिस-मॅच होती ह्या फॉर्मॅट साठी.

ती मॅच सुपर सिक्सेस म्हणून न्युझिलंड बरोबर खेळली होती. त्यात मैदानाच्या विशिष्ट ठिकाणी मारल्यावर ८ रन्स ६ रन्स असे बरेच मनोरंजनाचे प्रकार होते. म्हणून ते २७ बॉल्स मधे ७२ रन्स बनले होते.

भारतीय T20 च्या यशामधे बॉलिंग चा वाटा सिंहाचा आहे हे कुतूहलाचे आहे. किंबहुना भारतीय बॉलिंग बाकीच्या देशांच्या बॉलिंगपेक्षा प्रभावी ठरतेय हि कौतुकास्पद बाब आहे.
http://www.espncricinfo.com/magazine/content/story/978185.html

आज 'फेसबूक'वर वाचलेलं एक वाक्य - " The day Maria Sharapova said she didn't know who was Sachin Tendulkar, I knew she was on DRUGS!! " !!! Wink
भारतीय गोलंदाजीत, व विशेषतः तीला आधारभूत ठरणार्‍या क्षेत्ररक्षणात, खूपच सुधारणा आहे, हें निर्विवाद. त्यामुळे संघ मर्यादित षटकांच्या सामन्यांत समतोल व प्रभावी ठरतोय हेंही खरं. पण << भारतीय T20 च्या यशामधे बॉलिंग चा वाटा सिंहाचा आहे हे कुतूहलाचे आहे >> असं म्हणणं जरा धाडसाचं होईल. फलंदाजी हेंच आपलं अजून तरी खरं बलस्थान आहे , असं मला वाटतं.

ती वरची सचिनची मॅच मी लाईव्ह पाहिलेली.
न्यूझीलंडचा आपला स्वताचा २०-२० फॉर्मेट होता तो., १०-१० च्या दोन इनिंग.

पहिल्या डावात सचिन खेळलेला आणि आपण लीडही मिळवलेला. दुसर्‍या इनिंगमध्ये मला वाटते सेहवागने धुतलेला पण बाकी सर्व पेदरू खेळाडू असल्याने आपण तो सामना हरलेलो Happy

तो न्युझिलंडचा फॉर्मॅट नाही. इंटरनॅशनल आहे. ती सुपर सिक्स इंटरनॅशनल मॅच होती.

देशात देखील ६ अ साईड च्या नाईट मॅचेस मुंबईला होत असत. विनोद आणि सचिनने तिथेही बहुदा कोणता तरी रेकॉर्ड केलेला आहे.

असं म्हणणं जरा धाडसाचं होईल. फलंदाजी हेंच आपलं अजून तरी खरं बलस्थान आहे , असं मला वाटतं. >> फलंदाजी बलस्थान आहे हे बरोबर आहे. किंबहुना आपण त्याच जीवावर हे सामने काढतोय असे मलाही वाटत होते. पण तुम्ही मी वर दिलेली लिंक बघितलीत तर तुम्हाला लक्षात येईल कि गोलंदाजीचे आकडे तुलनात्मकरित्या इतर संघांपेक्षा अधिक उजवे आहेत. हा मलाही बाउन्सर होता. भारतीय खेळपट्ट्ञंवर खेळल्यामूळे असेल असे आधी वाटले होते पण बाहेरचे आकडे पण उत्क्रुष्ट आहेत. पेसमधला economy rate नि average दोन्ही अव्वल आहेत. Who knew !

केदार, ते नक्की चेक करायला हवे. मी सामना लाईव्ह बघितला त्यात बघितलेले आठवतेय. आजूबाजुचे नाही. तरी माझ्या आठवणीतील माहितीप्रमाणे न्यूझीलंडवाल्यांनी हा फॉर्मेट शोधला होता किंवा पुढाकार घेतला होता वगैरे..
ते सिक्स ए साईड वा हाँगकाँग सिक्सर वगैरे अगदीच गचाळ प्रकार होता.

केदार, इथे वाचा
https://en.wikipedia.org/wiki/Short_form_cricket

Cricket Max is a defunct form of cricket invented in New Zealand by former New Zealand cricketer and captain Martin Crowe which was played primarily by New Zealand first-class cricket teams in an annual competition. International matches were also played between the New Zealand Max Blacks and England (1997), West Indies (2000) and India (2003). It was essentially a very short form of test cricket, with each team permitted two innings, but a maximum of only 10 overs for each innings.

ही इंटरनॅशनल मॅच आहे यार. त्यांनी शोधला असला तरी IC ने अ‍ॅडॉप्ट केला. ६ अ साईड च्या काही इंटरनॅशनल मॅचेस झालेल्या आणि ही त्या पैकी एक आहे.

https://www.youtube.com/watch?v=J3kx5JBe6ss

ह्या क्लिप मधली पहिली पाच सेकंद बघा. त्यात अफ्रिदी चं वय २१ लिहीलय. ही मॅच १९९६ मधली आहे. म्हणजे आता त्याचं वय ४१ हवं. क्रिकईन्फो वर मात्र तो ३६ वर्षाचा असल्याचं छापलय.

नक्की काय? Happy

तेच चेक करायला हवे. दोन देशांतील असली तरी ईंटरनॅशनल म्हणून आयसीसी मान्यता होती की नव्हती. जसे सध्याच्या २०-२० रेकॉर्डला येतात. किंवा मध्यंतरी आफ्रिका विरुद्ध आशिया अश्या खंडाच्या मॅचेस झालेल्या त्या प्रयोगालाही आयसीसीने मान्यता दिल्याने ते देखील एखाद्या खेळाडूचा रेकॉर्ड बघताना मोजले जाते तसे काहीसे. माझ्यामते फॉर्मेटच भिन्न असल्याने आणि डबल रन वगैरे नियम कायच्या काय असल्याने शॉर्टर वर्जन फर्स्टक्लास म्हणूनही धरले गेले नसावे.

Pages