क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑलराऊंडर्स सुद्धा पूर्ण ऑलराऊंडर्स असले पाहिजेत, जे बॅटींग आणी बॉलिंग ह्या दोनपैकी कुठल्याही एका स्किल वर सुद्धा भरीव योगदान देऊ शकतात (जॅक कॅलिस कॅटेगरी). >>> टोटली सहमत. सोबर्स कदाचित सर्वात भारी, पण ८०ज मधे कपिल, इम्रान, हॅडली व बोथम हे चार तसे समजले जात. त्यातही कपिल व इम्रान सरस, कारण कप्तान म्हणूनही अनेकदा यशस्वी होते.

मला वाटते होल्डिंग, मार्शल वगैरे आताही यशस्वी झाले असते - कसोटीत. >> म्हणूनच मी प्रश्न लिमिटेड ओव्हर्स पुरता ठेवला होता Happy test मधे अजून बराच balanced game आहे.

ऑलराऊंडर्स सुद्धा पूर्ण ऑलराऊंडर्स असले पाहिजेत, जे बॅटींग आणी बॉलिंग ह्या दोनपैकी कुठल्याही एका स्किल वर सुद्धा भरीव योगदान देऊ शकतात (जॅक कॅलिस कॅटेगरी). > +१ फक्त असे all rounder फार क्वचितच मिळतात. बहुतेक जण एक मुख्य नि दुसरे जोडकाम केलेले असतात.

पण ८०ज मधे कपिल, इम्रान, हॅडली व बोथम हे चार तसे समजले जात. >> भाऊ ह्यांचा समकालीन South आफ्रिकेचा क्लाईव्ह राईस जो दुर्दैवाने official cricket खेळू शकला नाहि हा ह्यांच्यापेक्षा उजवा all rounder होता असे गावस्करच्या पुस्तकात वाचलेले आठवते. पण त्याला बाजूला ठेवले तर कपिल ह्या चौघांमधे अधिक उजवा all rounder होता असे मला वाटते. तो नि बोथम वगळता इतर दोघे फक्त बॅटींग च्या जोरावर त्यांच्या कारकिर्दीच्या सुरूवातीला तरी त्यांच्या respective संघांमधे येऊ शकले असते असे वाटत नाही. इम्रानची बॅटींग नंतर भयंकर सुधारली. परत limited overs चा मुद्दा आला तर कपिल किंवा बोथम सहाव्या क्रमांकावरचे explosive batsman म्हणून सहज येतात ह्याउलट बाकिच्या दोघांना ते सहज शक्य नाही, आणि फक्त बॅट्समन म्हणुन अजून वर खेळण्याएव्हढे ते कुशल नव्हते (हे वैयक्तिक मत आहे). कपिल अधिक उजवा कारण तुम्ही म्हणता तसे कप्तान पद पण त्याला झेपले. Of course, he was by far the best fielder among these 4.

जरी वर उल्लेखिलेल्या सर्वोत्तम 'ऑल रांउंडर्स'मधे बसत नसला तरीही पाकिस्तानचा अतिशय 'लो प्रोफाईल' पण अत्यंत उपयुक्त ऑल राउंडर मुद्दसर नझर [ज्याला ' गोल्डन आर्म ' संबोधलं जायचं ] याचा उल्लेख केल्याशिवाय मात्र रहावत नाहीं. १० शतकं व ६६ विकेटस ही त्याची कसोटीतली कामगिरी ! पण पाकिस्तानसाठी तो नेहमीच 'कठीण समयीं कामास' येणारा खेळाडू होता.

ज्याला ' गोल्डन आर्म ' संबोधलं जायचं >> तो पार्टनरशिप्स तोडण्यास कामी येत असे म्हणून त्याला इम्रान किंवा झहिर ने ते नाव दिलेले बहुधा.

अ‍ॅक्रॉस द टाईम किंवा कालातीत अशी खेळाडूंची तुलना करणं अवघड असतं. त्यामुळे मार्शल, होल्डिंग आत्ताच्या काळात लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट मधे यशस्वी ठरले असते का ह्याचा अंदाज बांधणं कठीण आहे. कारण अशी तुलना करताना आपण आत्ताचं क्रिकेट आणी तेव्हाचे, आपल्या आठवणींमधले किंवा वाचनामधले मार्शल आणी होल्डिंग अशी तुलना करतो.

मोठे - महान खेळाडू बदलत्या परिस्थितीला जुळवून घेण्यात यशस्वी होतात म्हणून त्यांच्या खेळात ते यशस्वी होतात. मग ती परिस्थिती एकाच टेस्ट मॅच मधल्या वेगवेगळ्या सेशन्स ची असो, स्कोअरबोर्डाप्रमाणे, टेस्ट च्या दिवसाप्रमाणे बदलणारी असो, वन-डे मधल्या पीच प्रमाणे असो, बॅटींग क्रमांकाप्रमाणे असो, समोर च्या एण्ड ला उभ्या असलेल्या बॅट्स्मन प्रमाणे असो, किंवा कालानुरूप होणारे बदल, नियमावली ह्याप्रमाणे असो.

उदाहरणर्थ, सचिन ने सुरूवात केली तो ८९-९० चा काळ आणी तो रिटायर झाला तो २०१२-१३ चा काळ ह्यामधे क्रिकेट खूप बदललं, सचिन चा फिटनेस बदलला, सहकारी खेळाडू आणी संघातली त्याची जवाबदारी खूप बदलली, पण ह्या सगळ्या बदलांना तोंड देत, त्याप्रमाणे स्वतःचा गेम अ‍ॅडजस्ट करत तो उत्तमोत्तम खेळी करत राहिला म्हणून तो मोठा - महान खेळाडू ठरला.

तसच असं गृहीत धरता येईल की मार्शल, होल्डिंग, लिली, थॉमसन वगैरे हे त्यांच्या काळातले जे मोठे - महान गोलंदाज होते, ते कालानुरूप बदलत राहिले असते आणी बदलत्या क्रिकेट वर सुद्धा आपला ठसा उमटवण्यात यशस्वी झाले असते.

एक मिनिट 'अ‍ॅक्रॉस द टाईम किंवा कालातीत अशी खेळाडूंची तुलना करणं अवघड असतं. ' हे मान्य आहे पण मी खेळाडूंची तुलना करण्याबद्दल म्हटले नाहिये. मी त्या खेळाडूंची एकंदर शैली वगैरे बघता आज त्यांना कितपत जुळवून घेता येत कितपत जमले असते ह्याबद्दल बोलतो आहे. तू लिलीचे उदाहरण घेतलेस. लिली तेंव्हा खेळल्या जाणार्‍या मोजक्या सिरीजमधे सुद्धा किती तरी वेळा दुखागतग्रस्त असे. तेंव्हाही त्याने स्वतःची अ‍ॅक्शन बदलून कारकीर्द लांबवली. त्रंव्हा आजच्या work load ला झेपणे त्याला शक्य झाले असते असे वाटत नाही. तो जेंव्हा खेळला असता तेंव्हा भेदकच राहिला असता पण किती खेळला असता हा मूळातला प्रश्न असणार. थोद़यात त्याचा आजचा शेन बाँड झाला असता. गुणवत्तेबद्दल प्रश्नच नसावा पण मूळात खेळेच किती हे सांगता येत नाही. ह्याउलट मार्शल चे उदाहरण होईल. त्याची एकंदर बॉलिंग ची शैली, अचूकता नि स्टॅमिना (त्याने ८३ च्या सिरीजमधे टाकलेले स्पेल्स बघ) बघता तो कुठल्याही काळात तेव्हढाच यशस्वी झाला असता असे वाटते.

खेळाडूंची तुलना करण्याबद्दल म्हटले नाहिये - बरोबर आहे. मुल्यमापन हा शब्द हवा होता तिथे.

कोहली - सादर प्रणाम! अप्रतिम खेळलाय.

१४ फोर्स! जबरी. हायलाईट्स बघायलाच पाहिजेत.

आजकाल विंडीज पिचेस म्हणजे स्लो अ‍ॅण्ड लो असतात. हे कसे आहे?

धवणचे पण १०० झाले असते. थोडा ओव्हर कॉन्फिडंस नडला असे वाटते. '

कालच्या गमती जमती - एकाच टाईपच्या बॉलला चौका सुद्धा अन विकेट सुद्धा.

धवणचा आधी तश्याच बॉलला चौका अन नंतर LBW.

पुजारा बिशूच्या एका बॉलला आउट अन नंतर रहाणेचा अगदी त्याच बॉलला चौका. अन लगेच दुसराही तसाच. त्याचे एकदम मागे येऊन खेळणे हे भारी होते. पुजारा कडून टॉप एज पाहणे जरा अवघड झाले होते.

बाकी बिशू काही एवढा भेदक वाटत नाही तरी पण विकेट घेतोय. म्हणजे अश्विन अन मिश्राजी मजा आणनार. स्पेशली मिश्राजींना पाहण्यासाठी मी उत्सूक आहे. बॅटसमनला कव्हर करणारे किपर सहित ६ आणि बॉलर. ब्रिंग इट ऑन !

कोहली जबरीच खेळला काल... लंच नंतरच्या पहिल्या ओव्हर मध्ये आणि टी च्या आधीच्या शेवटच्या ओव्हर मध्ये विकेट पडल्या ते वाईट झालं पण..

रहाणे ला चांगला स्टार्ट मिळतोय पण त्याला तो पुढे वाढवण्यात अपयशी ठरत आहे. मागील १० इनिंग मधे तो पुढे जाऊन वाईट रित्या आउट होत आहे.

ईंग्लंड ची जोरदार सुरूवात. अँडरसन परतलाय ह्या कल्पनेनच त्यांना मुठभर मास चढल्यासारखं वाटतय Happy

ईंग्लंड ची मिडल ऑर्डर अगदीच अनोळखी वाटते.

आज विको किती वेळ खेळतो ह्यावर मॅच चा अंतिम निकाल अवलंबून असेल असं वाटतय. (अर्थात ही टेस्ट मॅच आहे आणी ती सेशन्सगणिक जिंकायची असते.)

ईंग्लंड ची मिडल ऑर्डर अगदीच अनोळखी वाटते. >> हो मला आजकाल ती सगळी टीमच तशी वाटते.

अ‍ॅण्डरसन बराच चिवट दिसतो. २००३ च्या कप मधे पाक विरूद्ध जबरी स्विंग बोलिंग केली होती. कदाचित २००२ च्या भारताविरूद्धच्या सिरीज मधेही असावा तो. सचिनला अनेकदा काढले आहे त्याने. आणि इंग्लिश बोलर्स च्या मानाने १०-१२ वर्षे खेळतोय म्हणजे शतकोत्तर रौप्यमहोत्सव :). काही वर्षांपूर्वी तो जर खेळत असता, तर विस्डेन, गार्डियन मधे तो कसा जगातील सर्वात फिट बोलर आहे वगैरे आर्टिकल्स आली असती (आणि आपल्या येथी काही मठ्ठ लोकांनी त्यातील संदर्भ वापरले असते तसेच, शहानिशा न करता). आजकाल तो ब्रिटिश अहंगंड कमी दिसतो.

<< आजकाल तो ब्रिटिश अहंगंड कमी दिसतो.>> 'दिसतो' हा ऑपरेटिव्ह शब्द आहे इथं; पहिली कसोटी हरल्यानंतरच्या बक्षीस समारंभात कूकने पाकच्या कामगिरीबद्दल निदान औपचारिकता म्हणून तरी एकही प्रशंसापर शब्द उच्चारलेला मीं तरी ऐकला नाहीं ! अजूनही प्रत्येक दौरा, प्रत्येक स्पर्धा आपण जणूं फक्त 'अ‍ॅशेस'च्या तयारी करतांच खेळतो , असा इंग्लीश माध्यमं व खेळाडूंचा अविर्भाव असतो !

अश्विन कोहली भागीदारी बघता बघता १०० च्या जवळ पोचली. अश्विन अजून एक शतक करणार काय वेस्ट इंडिज विरुद्ध?

ऑलराउंडर म्हटलं की मला जयसुर्या आठवतो. बिचारा त्यामानाने अनरेटेडच राहीला.

कोहली भयंकर भयंकर भयंकर फार्मात आहे. मजा आणली मॅच बघायला.

भाऊ, तसेच आहे का अजून? मला कमी जाणवले गेल्या ४-५ वर्षांत.

मात्र पाक च्या मॅच नंतरचे मिलिटरी सेलेब्रेशन अनेकांना आवडले नव्हते. कुक चे ही तसेच झाले बहुधा.

या शतकाने आता कोहलीने कसोटीत सुद्धा काही सिद्ध करायचे बाकी ठेवले नाही. रिचर्डस च्या अ‍ॅटीग्वामधे, त्याच्याच नावाच्या स्टेडियम मधे टीम धोक्यात असताना १४ फोर मारून मारलेले शतक म्हणजे एकदम "औचित्यपूर्ण" :).

४२ मॅचेस मधे १२ शतके, त्यातली फक्त तीन भारतात. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व साउथ आफ्रिकेनंतर आता विंडीज मधेही शतक. फक्त इंग्लंड राहिले. तेथेही होईलच यात शंका नाही. पाक व लंका धरले नाहीत कारण ते काही फार वेगळे चॅलेंज नाही. पाक विरूद्ध तर वन डे मधे तो येताजाता मारतो Happy

<< भाऊ, तसेच आहे का अजून? >> ऑसीज तें लपवत नाहीत , इंग्लीश तें उघडपणे दाखवत नाहीत, एवढाच फरक असावा ! अर्थात, हा माझा पूर्वग्रह नसावा असं मला तरी वाटतंय !!

"अजूनही प्रत्येक दौरा, प्रत्येक स्पर्धा आपण जणूं फक्त 'अ‍ॅशेस'च्या तयारी करतांच खेळतो , असा इंग्लीश माध्यमं व खेळाडूंचा अविर्भाव असतो" - त्याच्या जोडीला त्यांचं काऊंटी प्रेम अवर्णनीय आहे. 'यॉर्कशायर कडून खेळताना ससेक्स विरुद्ध च्या सामन्यात' वगैरे सुरू झालं की मला कॉमेंट्री करियरच्या सुरूवातीच्या दिवसातला संजय मांजरेकर आठवतो - 'बंगाल विरुद्ध च्या सामन्यात मी सचिन ला म्हटलं' धर्तीवरची वाक्य मला त्याच तोडीची वाटतात.

कोहली द्विशतकाच्या मार्गावर!!

मला कमी जाणवले गेल्या ४-५ वर्षांत. >> +१. मधेच कधीतरी जाणवते तरीही.

२००३ वाल्या वर्ल्ड कपमधे ऑसीज ची ६ विकेट्स घेऊन दाणाडाण उडवलेली अँडरसन ने आठवत नाहि का ? तेंव्ह तो अगदीच रुकी होता पण. स्विंग होणार्‍या ठिकआणी धुमाकूळ घालत असे. मगफ१-२ वर्षे बाहेर होता जेंव्हा इंग्लंड बर्‍याच वर्षांनी अ‍ॅशेस जिंकले तेंव्हा (अर्थात तेंव्हा हार्मिसन नि तो एक उंच फिन दोघे असल्यामूळॅ गरज नव्हती). नंतर परत आलेला अँडरसन झहिरसारखा कात टाकून आला.

या शतकाने आता कोहलीने कसोटीत सुद्धा काही सिद्ध करायचे बाकी ठेवले नाही. >> इग्ल्संडमधे खेळेतोवर बाकी ठेवूया रे हे. तिथे फारच वाईट हाल केले होते. मधेचऑस्फ च्या बाहेर धावत जायची सवय इथेही उचलताना जाणवते. पण तरिही मला आजच्या घडीला तरी कोहली अमला, अ‍ॅबे, रूट नि स्मिथ च्या पुढे आहे असे वाटते.

अमला आणि एबी सध्या कुठल्याच शर्यतीत नाहीत माझ्या दृष्टीने. विलीयमसन इज प्रॉबाबली द बेस्ट बॅट्समन ह्या घडीला. मग रूट, कोहली, आणि स्मिथ त्या क्रमाने.

वेल, कोहली अजून इंग्लंडमध्ये खेळायचा आहेच. ते लोक भारतात त्यांच्या परफॉर्मन्सला साजेसे खेळतील, ह्यावर मी रिझनेबल ऑड्सने बेट करायला तयार आहे. विलीयमसन आणि रूट ह्यांच्या खेळातले व्हिजिबल विकनेसेस सध्या कोहलीपेक्षा कमी आहेत, हे माझे कारण.

विलीयमसन आणि रूट ह्यांच्या खेळातले व्हिजिबल विकनेसेस >> तू जे कारण म्हणतो आहेस त्याच कारणासाठी मी कोहलीला वर ढकललय. कोहलीने अ‍ॅण्डरसन exploit केलेला weakness कष्ट करून घालवलाय किंवा कंट्रोल मधे आणलाय. त्याच्याच जोरावर डाउन अंडर चार शतके आली. रूट्स किंवा विलिमसन अजून दर्जेदार स्पिन विरुद्ध खेळायचे आहेत त्यामूळे त्यांच्यात तो विकनेस्स आहे कि नाहि हे अजून उघड झालेले नाहिये.

Pages