Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30
क्रिकेटवरील पहिले दोन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"धोनीने ऑस्ट्रेलियाला
"धोनीने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात व्हाईटवॉश द्यायचा पराक्रम केला.
कल्पनाच नव्हती मला. टीम स्पोर्ट समजत राहीलो नं भौ आपण क्रिकेट ला. 
श्रीलंकेला मायदेशात पराभूत केले.
आशिया चषकमध्ये पाकिस्तानची जिरवली." - धोनी ने ईतकं वेगवेगळं केलं?
असामी सांघिक खेळ तर आहेच. पण
असामी
सांघिक खेळ तर आहेच. पण आपण इथे कर्णधाराचे मूल्यमापन त्याने मिळवलेल्या विजयांच्या आकड्यावरून करत आहोत ना. माझ्यामते ही पद्धत प्रचलितच आहे, मी धोनीप्रेमाखातर बनवली नाहीये
आज धोनीने थिसारा परेराची
आज धोनीने थिसारा परेराची विकेट आपल्या रेप्युटेशनवर मिळवली.
धोनीने स्टंपिंग केलेय तर फलंदाज क्रीजमध्ये पोहोचणारच नाही अश्या काहीश्या विचारात अंपायरने त्याला बाद देऊन टाकले.
बाकी त्यानंतरचा रन आऊट आपल्या नावलौकीकाला साजेश्या चपळाईनेच केला. हल्ली दर सामन्यात तो कीपींगचे कौशल्य दाखवतोय आणि समालोचटांची तारीफ झेलतोय.
युवराजने मस्त मारले काही फटके ज्यात युवराज टच दिसला. तरी मला तो तितका विश्वासार्ह वाटला नाही आजच्या खेळीत. पण येत्या सामन्यात त्याचा फ्लो आणखी चांगला होऊ शकतो. प्लस त्याचा बॉलिंग फॅक्टर पाहता विश्वचषकात वॅल्युएबल प्लेअर होऊ शकतो.
धोनीचा एकच षटकार पण बघायला अगदी मजा आली. किती सहज किती सहज..
अवांतर - श्रीलंकेच्या प्रत्येक सामन्यात समालोचट त्यांना गतविजेता म्हणून चिडवतात ते बघून दया येते.
असामी सांघिक खेळ तर आहेच. पण
असामी
सांघिक खेळ तर आहेच. पण आपण इथे कर्णधाराचे मूल्यमापन त्याने मिळवलेल्या विजयांच्या आकड्यावरून करत आहोत ना. माझ्यामते ही पद्धत प्रचलितच आहे, मी धोनीप्रेमाखातर बनवली नाहीये >>
मी न लिहिलेल्या पोस्ट्चे उत्तर मला उद्देशून लिहिल्यामूळे तुझ्या पोस्टच्या शेवटच्या वाक्यावर किती विश्वास ठेवायचा ह्याबद्दल शंकाच आहे
एक मोहम्मद आमिर द्या राव, India will be world beater.
फे.फे. मी देशात होतो. पुण्याच्या त्या पिचबद्दल ती सध्या रेलेड केली आहे असे वाचले. पण एकंदर ज्या तर्हेने श्रेयस अय्यर नि लाड खेळले त्यावरून demons are in mind हे असावे असे वाटले.
असामी, का ती पाकिस्तानी
असामी, का ती पाकिस्तानी फिक्सिंगची किड मागत आहात. तसेही सचिन आपल्याकडे वीस बावीस वर्षे होता. प्रत्येक विश्वचषकात खेळायचाही दमदार. पण तरीही आपल्याला विश्वविजेता बनायला त्याच्या कारकिर्दीचे बावीसावे वर्ष उजाडावे लागलेच ना.
थोडक्यात कितीही चांगले रिसोर्सेस असले तरी ते योग्य प्रकारे वापरणारा नसेल तर व्यर्थ आहे.
सचिनची पाकिस्तान इनिंग काय
सचिनची पाकिस्तान इनिंग काय होती राव ... अजून धुंदी उतरायला तयार नाही.
सचिनची पाकिस्तान इनिंग काय
सचिनची पाकिस्तान इनिंग काय होती राव ... अजून धुंदी उतरायला तयार नाही. >> २००३च्या विश्वचषकातील असेल तर अगदी.. अगदी. त्यात समोर सेहवाग.. जल्ला सोने पे सुहागा का काय ते होतं.
तीच तीच.
तीच तीच.
सचिनची पाकिस्तान इनिंग काय
सचिनची पाकिस्तान इनिंग काय होती राव ... अजून धुंदी उतरायला तयार नाही. >>
त्याच्या पहिल्या तीन सर्वोत्रुष्ट ODI innings मधे आहे ती. उरलेल्या दोन माझ्यापुरत्या तरी डेझर्ट स्टॉर्मवाल्या दोन.
असामी, का ती पाकिस्तानी फिक्सिंगची किड मागत आहात. >> अदमासे दिडशे वर्षांपूर्वी लोकमान्य टिळकांनी इंग्रज सरकारला उद्देशून जो प्रश्न विचारला होता तो मला तुला विचारावासा वाटत आहे.
(असो, भल्या ग्रुहस्था, मी गेले दहा दिवस इथे काहीही लिहिलेले नाही तेंव्हा मला उत्तर का देतो आहेस ? )
मी गेले दहा दिवस इथे काहीही
मी गेले दहा दिवस इथे काहीही लिहिलेले नाही तेंव्हा मला उत्तर का देतो आहेस ? >>>> तो तुझ्या "एक मोहम्मद आमिर द्या राव" ह्या वाक्याबद्दल म्हणत असावा. मोहम्मद आमिर फिक्सींग प्रकरणामुळे बॅन्ड होता ना..
अहा, त्याच्या पहिल्या
अहा, त्याच्या पहिल्या वाक्यानंतर गॅप नसल्यामूळे मला अजिबातच टोटल लागली नाही, अगदी रैना झाला माझा आमिरसमोरचा.
काय खेळतायत बांगलादेशी!
काय खेळतायत बांगलादेशी!
जिंकले. भारत वि. बांग्ला देश
जिंकले. भारत वि. बांग्ला देश फायनल!
शकीब काल (पहिल्या ३ ओव्हर)
शकीब काल (पहिल्या ३ ओव्हर) मस्त गोलंदाजी करत होता. खेळवत होता सरफराज ला. ३र्या (का २र्या) ओव्हर च्या शेवटच्या बॉलला लेट कट चा चौकार बसला, पण ती पूर्ण ओव्हर आणि तो शॉट विषेश बघण्यासारखे वाटले मला .
जरा विषयांतर होतंय, पण
जरा विषयांतर होतंय, पण मार्टिन क्रोचं कॅन्सरने निधन झाल्याची बातमी नुकतीच आली आहे.
माझ्या आवडत्या खेळाडूंपैकी एक. त्याला श्रद्धांजली.
अरेरे. श्रद्धांजली, आर आय पी
अरेरे. श्रद्धांजली, आर आय पी मार्टिन
किवींचा रिचर्ड्स म्हणत असत ना त्याला?
RIP Martin Crow. 1992 च्या
RIP Martin Crow. 1992 च्या वर्ल्ड्कप मधला त्याचा performance कमाल होता.
मार्टिन क्रो!! न्युझिलंड
मार्टिन क्रो!!
न्युझिलंड संघातील अत्यंत भरवश्याचा कलात्मक तरीही आक्रमक असा हा फलंदाज! माझ्या अत्यंत आवडत्या फलंदाजांपैकी एक!
विनम्र श्रद्धांजली!
श्रद्धांजली मार्टीन
श्रद्धांजली मार्टीन क्रो.
1992 मधील तुझी कामगिरी क्रिकेटरसिकांच्या कायम लक्षात राहील.
भारत-बांग्लादेश पहिल्या सामन्यालाच मी भाकीत केले होते की ही अंतिम सामन्याची रंगीत तालिम आहे.
खरे ठरले.
भारत-बांग्लादेश पहिल्या
भारत-बांग्लादेश पहिल्या सामन्यालाच मी भाकीत केले होते की ही अंतिम सामन्याची रंगीत तालिम आहे.
खरे ठरले.>>>>
ऋन्मेSSष, तुझे काही कनेक्शन्स आहेत का?

कालची सामीचे शेवटचे षटक सुरु असताना ज्या पद्धतीने २ नो बॉलची खैरात आणि १५ धावा... अनुभवी गोलंदाज'असूनही.....
पण बांगलादेश ने ओव्हरऑल खुप चांगला खेळ केलाय ह्या स्पर्धेत!!
RIP Martin Crow. 1992 chya
RIP Martin Crow. 1992 chya World Cup madhala sagalyat kalpak captain. Deepak Patel la bowling open karayala lavun bhalya bhalyanchi mati gunga keli hoti tyani. Apla shrikant tya ploy madhe fasun long on la catch deun out zala hota.
RIP Martin Crow.
RIP Martin Crow.
मार्टीन क्रोंना
मार्टीन क्रोंना श्रद्धांजली...
१९९२ला त्यांनी आणि मार्क ग्रेटबॅचनी सुरुवातीला फुल दंगा केला होता.. त्यामुळे मजा यायची मॅच बघायला... तिथपासून वनडे मधली समीकरणं बदलायला सुरुवात झाली... आणि गोलंदाजीत सुरुवातीलाच दिपक पटेल चे ऑफस्पिन आणून ऑसीजची पहिल्या मॅच मध्येच दांडी गुल केली होती..
शर्मा सुरू झाला.. गरीबांच्या
शर्मा सुरू झाला.. गरीबांच्या पोरांना मारतोय..
बाकी कोहली कितीही मोठा का छावा असेना. फटकेबाजी तर रोहीत शर्माचीच बघायला मजा येते.
मार्टीन क्रो जेव्हढा जबरदस्त
मार्टीन क्रो जेव्हढा जबरदस्त बॅट्समन (टेक्निक म्हणा किंवा शैलीम्हणा) होता त्यापेक्षा अधिक ताकदीचा Strategist होता. त्याचे क्रिकेटवरचे लेख अफलातून आहेत. इथे काही बेस्ट लेख वाचता येतील.
http://www.espncricinfo.com/ci/content/story/977971.html
फटकेबाजी तर रोहीत शर्माचीच बघायला मजा येते >> असच काही नाहि रे. कोहलीचे cover drives, extra cover drives किंवा whiplash करत लेग कडे बॉल काढायचे शॉट्स तेव्हढेच breath taking असतात. विशेषतः cover drive तर जीव ओवाळून टाकायच्या लायकीचा असतो.
रोहित शर्मा ला जितक्या संधी
रोहित शर्मा ला जितक्या संधी मिळाल्या, तितक्या संधींनंतर तर शंकर दयाळ शर्मांनी सुद्धा ईतपत बॅटींग केली असती. घ्या नविन वादाला तोंड.
harsh comment रे ! त्याचे ODI
harsh comment रे ! त्याचे ODI stats तरी भन्नाट आहेत काही वर्षांमधले. टेस्ट बाबत सहमत. कदाचित अजून थोडा वेळ दिला तर limited overs cricket सारखाच तिथेही सुटेल अशा आशेवर संधी देत असावेत.
अनुमोदन असामी. रोहीतला शिव्या
अनुमोदन असामी. रोहीतला शिव्या घालणे ही आजकालची नवीन फॅशन आहे. (याआधीची फॅशन ही आगरकरला शिव्या घालणे ही होती.)
त्याच्या वनडेतल्या इंनिग्ज भारी आहेत. अतिशय सहज सुंदर, तंत्रशुद्ध आणि तरीही वनडेच्या फॉर्मला साजेशी अशी बॅटींग करतो तो.
टेस्टमध्येही भारतातली कामगिरी चांगली आहे. मलातर वाटतं त्याला टेस्टमध्ये जरा आधी संधी द्यायला हवी होती. तब्बल १०६ वनडे खेळून मग टेस्ट डेब्यू झालं त्याचं.
फेरफटका, संधी मिळून फक्त
फेरफटका,
संधी मिळून फक्त मॅचेस वाढतात. पण सरासरी, स्ट्राईकरेट, शतके, मॅन ऑफ द मॅच, सिरीज हे स्वता कमवावे लागते.
रोहीत शर्मा मर्यादीत क्रिकेटबद्दलच आपण बोलत असू तर सध्या टीम काढताना कोहलीनंतर दुसरे नाव त्याचे लिहले जात असेल हे फॅक्ट आहे.
असामी, @ कोहली हो नक्कीच. पण मी ती माझी वैयक्तिक आवड लिहिली होती
मार्टिन क्रोला श्र्द्धांजली.
मार्टिन क्रोला श्र्द्धांजली. क्रिकेटच्या 'ऑल टाईम ग्रेट'च्या यादींत सहज बसणारा व चमकणारा खेळाडू !
<< कालची सामीचे शेवटचे षटक सुरु असताना ज्या पद्धतीने २ नो बॉलची खैरात आणि १५ धावा... अनुभवी गोलंदाज'असूनही.....>> हें खरं असलं तरीही आमिरसारख्या गोलंदाजाच्या शेवटच्या षटकात आक्रमक फटकेबाजी करत बांगलादेशच्या फलंदाजानी अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची योग्यता व मानसिकता सिद्ध केली हेंही खरं.
शाहिद आफ्रिदी निवृत्तिचा फेरविचार करण्याच्या निर्णयाचाच त्याला आतां फेरविचार करावा लागणार, हें निश्चित; काल शेवटीं तर तो परत परत चार-पांच खेळाडूंची बैठक घेवून काय करावं तें विचारत होता [ धोनी व त्याच्यातला फरक उठून दिसला ]
धोनी सध्यां अफलातून यष्टीरक्षण व नेतृत्व करतोय; केवळ एकट्या ऋन्मेषजींच्या पाठींब्याने प्रेरित होवून !!
Pages